'साप्ताहिक प्राजक्त' २. शंका समाधान

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
25 Apr 2014 - 12:34 pm
गाभा: 

मित्रांनो,
नुकतेच 'साप्ताहिक प्राजक्त' वाचनात आले. एप्रिल १४ च्या अंकातील शंका समाधान भाग सादर करून काहींना विचार व्यक्त करायला विनंती करत आहे.
१. शंका - जर सर्व चराचरात भगवंत भरलेला आहे तर मग जगताना मुंग्या, डास, ढेकूण, झुरळ, उंदीर इत्यादींना मारावे का नाही? मारले तर पाप लागते का?
समाधान - संपादकांचे थोडक्यात उत्तर - (कोणत्याही भूतमात्राला मारणे पापच आहे. पण या नियमाला अपवाद आहेत.)
२. शंका - प्रश्नकर्त्याची शंका मांडताना म्हटले गेले की भागवतातील एका कथेतील राजा रहूगणाने जडभारताला हा प्रश्न केला होता. तो असा - राजा म्हणतो, 'चुलीवर ठेवलेले भांडे अग्नीमुळे तापू लागते. तेंव्हा त्यातील पाणी देखील उकळू लागते आणि पाण्यातील तांदूळ शिजतो. त्याच प्रमाणे आपला देह, इंद्रिय, प्राण आणि मन या उपाधींचा स्वीकार केल्यामुळे, सानिध्यामुळे आत्म्याला सुद्धा श्रमाचा अनुभव मिळतो?'
समाधान - आत्म्याला श्रम होत नाहीत.

वरील १. शंका - समाधानात जे म्हटले गेले आहे त्यातील नियमांना अपवाद का व कोणते असावेत?
२. शंका - समाधानात शरीर, मन आणि आत्मा यांचा संबंध काय व तो कसा यावर विचार सादर करायला उत्साहित करत आहे.

प्रतिक्रिया

कठीण प्रश्न आहे, जागा अडवून बसती. बाकी सविस्तर उत्तरे माझ्या अल्पमतीप्रमाणे नंतर सांगेन.

शशिकांत ओक's picture

25 Apr 2014 - 12:50 pm | शशिकांत ओक

अल्पमती आनंदांनी 'कठीण प्रश्न आहे' असे वेगळे म्हणायची गरज काय? सविस्तर उत्तर सापडेपर्यंत थांबले तरी चालले असते. सबब पिंक टाकलेली साभार मिळाली, इतकेच.

आनन्दा's picture

28 Apr 2014 - 12:39 pm | आनन्दा

पोच दिल्याबद्दल धन्यवाद.
असो. पहिला प्रश्न माझ्या अल्पमतीप्रमाणे.

नीतीशास्त्रानुसार आणि माझ्या माहितीनुसार कर्म करताना त्या प्रत्यक्ष कृतीपेक्षादेखील त्यामागच्या हेतूवरून त्याची योग्यायोग्यता ठरवणे आवश्यक आहे. एखद्याला मारणे ही कृतीदेखील त्यातच आली. (म्हणूनच युद्धात मरण्यार्याला स्वर्ग मिळतो असे म्हणतात, पण साधा किडा केवल मौजेसाठी मारल्यामुळे भीस्मांना शरपंजरी रहावे लागले.). त्यमुळे तुमच्या कर्माची योग्यता तुम्ही ते कोणासाठी करयात, आणि तुम्ही त्या कर्मात किती लिप्त आहात त्यावरून ठरते. त्यातला अजून एक भाग असा आहे की तुम्ही ते कर्म धर्मपालनासाठी करत आहात का? अलिप्तपणे जर धर्मपालनासाठी एखाद्याने कोणाचा खून जरी केला, तरी त्याला ते कर्म स्पर्ष देखील करू शकत नाही. किंबहुना सैनिक सीमेवर जो काही संहार करत असतात, त्यात या न्यायाने आपण देखील वाटेकरी असतो, कारण ते एकप्रकारे नि:स्वार्थ भावाने आपल्यासाठी तो संहार करत असतात.

आसो. प्रश्न एक वर माझी अल्प-मती संपली. प्रश्न २ नंतर कधीतरी.

शशिकांत ओक's picture

28 Apr 2014 - 2:38 pm | शशिकांत ओक

मित्रा,
प्रश्न एक - समर्पक उत्तर...

तो एक विचारवंत ||

१.आत्मसंरक्षणासाठी केलेली प्राण्यांची/शत्रूची हत्या आणि एका सैनिकाने राज्य/धर्म रक्षणासाठी शत्रूवर केलेला(हल्ला नव्हे)प्रतीहल्ला, एका राजाने/शासकाने अपराध्याला दिलेला मृत्युदंड किंवा शिक्षा हे परमधर्म/परमकर्तव्यच आहे.

२.आत्मा हा अविनाशी असल्याने तो शरीररूपी कपडे धारण करतो व जीर्ण झाल्यास बदलत असतो.

नैनं छीदन्ति शस्त्राणि ! नैनं दहति पावकः !
न चैनं क्लदन्त्यापो ! न शोषितः मारुतः !!

गीतोपदेश
https://www.youtube.com/watch?v=_IZcpGpalXE

या जन्मी,या भूमीवर काय कमावले ते सर्व शेवटी येथेच सोडून जावे लागते.असं म्हटलं जातं,की आधीच्या जन्मातील पाप-पुण्याचं गाठोडं तेव्हढ पुढील जन्मी वाहून न्यावे लागते. हे पूर्व–संचिताचे/नियतीचे ऋण पुढील जन्मी सव्याज फेडावे लागतात.हे श्रद्धावान माणसे निश्चित मानतात आणि म्हणूनच थोड्या फार प्रमाणात सचोटीने,श्रद्धेने आणि सद्भावनेने वागणारी माणस या जगात आढळतात.

”जशी मती,तशी गती”हा शास्त्र–नियमच आहे.शरीर,मन आणि आत्मा यांचा संबंध हा अन्योन्य संबंध आहे.पाप व पुण्य हे या मुळेच समजून घेणे महत्वाचे आहे. हे ज्या दिवशी सर्व तज्ञ/जाणकार समजतील त्या दिवशीच खरी मासाची प्रगती होईल व सर्वांना स्वर्गात राहिल्याचे समाधान मिळेल.कोणतेही अपराध (कायिक/मानसिक/प्रज्ञा/नैतिक असे कोणताही आजार होणार नाही. अज्ञानामुळे आजार झालाच तर शरीर,मन आणि आत्मा या तिघांना एकत्रित रित्या काम लावून तो झटपट व पूर्ण बरा करता येईल.

शशिकांत ओक's picture

25 Apr 2014 - 4:45 pm | शशिकांत ओक

सविस्तर उत्तरा बद्दल...

ग्रीक तत्त्वज्ञानात भुमितीचे प्रश्न सोडवले आहेत .त्यांची पध्दत खरी वैज्ञानीक आहे .ते म्हटतात प्रथम काही गोष्टी विनासिध्दतेने खऱ्या आहेत असे मानायचे .याला आपण गृहीतके म्हणू .ही एक चौकट धरली तर याच्या आतल्या सर्व गोष्टी खऱ्या ठरतात .हा पाया धरला तर वरचा डोलारा टिकणार .जर काही ठेवल्यावर डोलारा कोसळला तर (अ)ती गोष्ट खोटी अथवा (ब)आपला पायाच चुकतोय . येथे (ब)चा पर्याय धरून ग्रीकांनी फारच मोठी कामगिरी केली .
आता हे उदाहरण तुमच्या शंकेला लावा .(कपिलमुनींचा सांख्ययोग याचे विवेचन करतो ) आणि आपण "भगवंत आणि आत्मा" संकल्पनेच्या गृहितकांशी थांबतो .
बघा पटतंय का ?

माहितगार's picture

26 Apr 2014 - 12:24 pm | माहितगार

कंजूसजी आपल्या प्रतिसादातील विषयावर आपण इतरत्र काही लेखन केले असल्यास जरूर दुवा द्यावा अथवा सवडीनुसार वेगळा धागा काढावा, आपण काय म्हणू पहात आहात ते समजून घेण्यास निश्चित आवडेल.

(बाकी ओकांच्या धाग्यावर आलो आहेतर त्यांच्या धागाचर्चे करीता त्यांना समविचारींची साथ लाभो ही शुभेच्छा.)

शशिकांत ओक's picture

25 Apr 2014 - 2:54 pm | शशिकांत ओक

१. शंका माझ्या नाहीत. मी सादर केल्या. २. ज्या तत्वज्ञानात्मक विचारांना आपली मान्य आहेत त्यातून आपल्याला सुचणारी उत्तरे मिळावीत अशी अपेक्षा करतो.

आत्मशून्य's picture

25 Apr 2014 - 4:32 pm | आत्मशून्य

हां गो गोवा गोन चित्रपटातील संवाद खराच म्हणावा की ?

माझा प्रतिसाद संपादकांनी काढून टाकावा .उगाच चर्चा भलतीकडे जायला नको .

शशिकांत ओक's picture

25 Apr 2014 - 11:14 pm | शशिकांत ओक

आपला प्रतिसाद राहिलेला चांगला. निरीश्वरवाद्यांनी ईश्ववाद्यांच्या शंकेला समाधान पुर्वक उत्तर जरूर द्यावे. शिवाय आपण शंकांचे समाधान करायला, इतरांना विचार व्यक्त करायला प्रवृत्त केले आहेत.

शशिकांत ओक's picture

28 Apr 2014 - 2:47 pm | शशिकांत ओक

दारू पिणे शरीरास व समाजास हानीकारक आहे. हे मत सर्वमान्य आहे.
म्हणून जे दारू पीत नाहीत त्यांनीच आपल्या पुढील पिढीला त्याचे दुपरिणाम समजवावेत असे कुठे आहे? दारू पिणारा देखील आपल्या पुढील पिढीला ते समजावयाला सिद्ध होऊ शकतो. असो.

प्रसाद गोडबोले's picture

29 Apr 2014 - 12:33 am | प्रसाद गोडबोले

१. शंका - जर सर्व चराचरात भगवंत भरलेला आहे तर मग जगताना मुंग्या, डास, ढेकूण, झुरळ, उंदीर इत्यादींना मारावे का नाही? मारले तर पाप लागते का?
समाधान - संपादकांचे थोडक्यात उत्तर - (कोणत्याही भूतमात्राला मारणे पापच आहे. पण या नियमाला अपवाद आहेत.)

>>> || परोपकाराय पुण्याय | पापाय परपीडनम || असं व्यासांनी स्पष्ट शब्दात सांगुन ठेवले आहे त्यामुळे कोणत्याही जीवाला मारणे हे पापच आहे ...पण आपल्या संस्कृतीत "मत्स्यन्याय" नावाचेही एक सुंदर अर्ग्युमेन्ट आहे , मोठ्ठा मासा छोट्या मास्याला खातो आणि जगतो ... आता जर तो छोट्या माशाल्या "अहिंसा " ह्या कारणाखाली मारायचे टाळेल तर तो स्वतःच नाश पावेल ... की जी परत हिंसाच झाली ! सो आपला हिंदु धर्म म्हणतो की जर मोठ्यामाश्याने छोट्यामाश्याला खाल्ले तर त्यात पाप नाही , ती निसर्गनियमांची अनिवार्यता आहे !
अवांतर १: शिवराज्याभिषेकाच्या चित्रात नेहमी एक मासा दिसतो , तो ह्या मत्स्यन्यायाचे प्रतिक आहे !
अवांतर २: हिंदु धर्माच्या मते आत्मा अस्पर्श आहे त्याला पाप/पुण्य काहीच चिकटत नाही , सो आपण आत्मबुध्दीत स्थिर झालो असु तर आपल्याला पापपुण्याची काळजी करायची गरज नाही .
अवांतर ३: अजुन सोप्प्या शब्दात , ह्या सगळ्या चर्वित चर्वणात अडकायची गरजच नाही कारण भगवंताने गीतेतच ह्या पापपुण्याच्या प्रश्नाचे सोल्युशन दिले आहे . :) भगवद्गीता is the ultimate resort !!

२. शंका - प्रश्नकर्त्याची शंका मांडताना म्हटले गेले की भागवतातील एका कथेतील राजा रहूगणाने जडभारताला हा प्रश्न केला होता. तो असा - राजा म्हणतो, 'चुलीवर ठेवलेले भांडे अग्नीमुळे तापू लागते. तेंव्हा त्यातील पाणी देखील उकळू लागते आणि पाण्यातील तांदूळ शिजतो. त्याच प्रमाणे आपला देह, इंद्रिय, प्राण आणि मन या उपाधींचा स्वीकार केल्यामुळे, सानिध्यामुळे आत्म्याला सुद्धा श्रमाचा अनुभव मिळतो?'
समाधान - आत्म्याला श्रम होत नाहीत.

>>>>उत्तर बरोबर आहे ... आत्म्याला श्रम होत नाहीत !
अवांतर १: पहा "आत्माराम" http://www.samarthramdas400.in/mar/download_lit.php

तो स्वतःच नाश पावेल ... की जी परत हिंसाच झाली !

कसलं मस्त लॉजिक आहे. :) आवडलं ब्वॉ आपल्याला.