ससा आणि कासव..???

येडा खवीस's picture
येडा खवीस in काथ्याकूट
10 Oct 2008 - 12:15 pm
गाभा: 

्नमस्कार मित्रांनो,

लहानपणी ऐकलेली "ससा आणि कासवा"ची गोष्ट तुम्हाला माहिती असेलच!! आयुष्यात आपण बरेचदा दोन्ही रोल करत असतो. ससा आणि कासव ही दोन प्रतिकात्मक रुपे आहेत ती म्हणजे, स्वत:च्या शक्तिवर, बुध्दिवर अफाट आणि थोडासा अति आत्मविश्वास असणारा आणि स्वत:च्या छोट्याश्या शक्तिवर कमी विश्वास असला तरी धाडसाने आव्हाने स्विकारुन अथक प्रयत्न करुन शेवटी मंझिल गाठणारा...अनुक्रमे ससा आणि कासव

मला तर गोष्ट ऐकताना सुरुवातीला कासवाची आणि नंतर सशाची दया यायची...

तुम्ही तुमच्या आयुष्यात "ससा आहात की कासव"

युट्युबवर या कथेची एक छान लिंक आहे ती देतो...ज्यांना कथा आठवत नसेल त्यांच्यासाठी...

http://www.youtube.com/watch?v=TCnDQPz8GsQ

प्रतिक्रिया

विदुषक's picture

10 Oct 2008 - 12:30 pm | विदुषक

ह्या कल्पनेवर आधारित एका नितांत सुन्दर चित्रपटाची आठवण झाली .....
सई परांजपे चा 'कथा'

मजेदार विदुषक

अवलिया's picture

10 Oct 2008 - 12:42 pm | अवलिया

कथा १

ससा कासवाची शर्यत ठरते. सशाला आत्मविश्वास असतो पळत पळत जातो. एके ठिकाणी दमतो अन झोपतो. कासव हळुहळु चालत रहाते. सशाला पहाते. हळुच निघुन जाते. जिंकते.

आपल्याला आपल्या वडिलांनी अनेक वेळेस हा दाखला दिलेला असतो अन सशाप्रमाणे घाई न करता हळुहळू वागायचा सल्ला दिलेला असतो. हो ना? आता पुढील गंमत ऐका,

कथा २

ससा परत कासवाशी पैज लावतो. कासवाला आता आत्मविश्वास असतो. परत शर्यत चालु. आता ससा झोपत नाही. ठरवुन थेट जावुन पोहोचतो. कासव हळुहळु येते. रस्त्यात झोपलेला ससा दिसत नाही. येवुन पाहाते तर ससा जिंकलेला. कासव चरफडत शांत बसते.

तात्पर्य- अनुभवाने शहाणपण

आता पुढची कथा

कथा ३

कासव आता सशाशी पैज लावते. पण मार्ग कासव ठरवेल तो. ससा तयार होतो. शर्यत चालु. रस्त्यात नदी लागते. ससा थांबुन घेतो. मागाहुन कासव हळुहळू येतो. अलगद नदीत उतरतो. पलिकडे जातो. पुढे शर्यत जिंकतो. ससा हरतो.

तात्पर्य - आपले शक्तिस्थान व कमकुवत स्थान ओळखा.

कथा ४

आता ससा पुढाकार घेतो. कासवाशी मैत्रि करतो. दोघे मिळुन इतर प्राण्यांशी शर्यतीच्या पैजा लावतात अन एकत्र जिंकतात.

तात्पर्य - विना सहकार नाही उद्धार.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Oct 2008 - 12:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=))

शिप्रा's picture

10 Oct 2008 - 3:31 pm | शिप्रा

=)) नानांना साष्टांग नमस्कार

जिथे कमी तिथे आम्ही ..:)

टारझन's picture

10 Oct 2008 - 3:51 pm | टारझन

नाना .. एक नंबर हो ...

अजुन एक कथा (हे लेटेस्ट व्हर्जन आहे) :
कथेमधे कासव एका प्रोफेशनल मांत्रिकाकडे (गो/घोस्टबस्टर) जातो आणि सशाला भुतबाधा करणी कारतो .. आणि म्हणून ससा घाबरतो आणि झोपतो ..
कासव भुताच्या पाठीवर बसून अतिवेगाने शर्यत जिंकते आणि मरियम जोन्सचे विश्वरेकॉर्ड तोडते ...

तात्पर्य : उगाच कष्ट ही करू नका आणि सहकार/युती करून बक्षिसात वाटेकरी करू नका, प्रोफेशनल मांत्रिकाला थोडे पैसे द्या आणि रेकॉर्डतोड डशर्यत जिंका

(कृ. हलके घेणे)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

विजुभाऊ's picture

10 Oct 2008 - 12:46 pm | विजुभाऊ

ससा त्या पराभवातुन धडा घेतो आणि त्याच्या मुलाना सांगतो.
nrver change your priorities in between

योगी९००'s picture

10 Oct 2008 - 3:54 pm | योगी९००

कथा ५

ससा परत कासवाशी पैज लावतो. कासवाला आता आत्मविश्वास असतो. परत शर्यत चालु. आता ससा झोपत नाही. तो हळूच कासवाच्या पाठीवर जावुन बसतो. कासव हळुहळु येते. शर्यत संपताना मात्र ससा कासवाच्या पाठीवरून उडी मारतो आणि जिंकतो.

कासव परत चरफडत बसते. आणि ह्या सशाशी परत शर्यत लावायची नाही असा निश्चय करते.

तात्पर्य - दुसर्याचे पण शक्तिस्थान व कमकुवत स्थान ओळखा.

मीनल's picture

10 Oct 2008 - 5:12 pm | मीनल

ससा आणि कासव यांची शर्यत सुरू होते.
पण यावेळी ससा न झोपायचा निश्चय करतो. दमछाक करून धावतोही.
शेवटी END लाईन वर पोचतो तेव्हा कासव तिथे हजर असते. ससा हरलेला असतो.तो हळू हळू चालणार कासव कस काय आधी पोचल याचा विचार करत बसतो.

त्या कासवाची एक चापलुसी कुणालाच माहित नसते.
शर्यत लावलेल्या कासवाने आपल्या जुडवा भाईला आधीच निघून तिथे END लाईन वर आधी च हजर राहण्यास बजावलेले असते.

होत असं की ..

ससा आणि कासव यांची शर्यत सुरू होते.
पण यावेळी ससा न झोपायचा निश्चय करतो. दमछाक करून धावतोही.
शर्यत लावलेले कासव चालायला सुरू करत.ससा पार दिसेनासा झालेला पाहून गुपचूप मागे वळून घरी पळ काढतो.
शेवटी END लाईन वर पोचतो तेव्हा (जुडवा) कासव तिथे हजर असते.
ससा हरलेला असतो.तो हळू हळू चालणार कासव कस काय आधी पोचल याचा विचार करत बसतो.

तात्पर्यः शक्ति पेक्षा युक्ति श्रेष्ठ.

मीनल.