ह्या निर्बुद्ध "सकाळ" चं काय करायचं????

जिन्क्स's picture
जिन्क्स in काथ्याकूट
26 Sep 2012 - 1:15 am
गाभा: 

ह्या निर्बुद्ध "सकाळ" चं काय करायचं???? देवकर, भुजबळ, तटकरे आणि आता अजितदादा...राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने किती हि मोठा घोटाळा केला तरी आमच्या दैनिक "सकाळ" मध्ये ती बातमी कुठेच नसते (जी बाकी वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईन असते).
"टीम अण्णा मध्ये फूट" ही बातमी फ्रंट पेज वर हेडलाईन देणारा सकाळ, ७०००० कोटी च्या सिंचन घोटाळ्याच्या बातमीकडे सपशेल दुर्लक्षं करतो.
सकाळ मधल्या पत्रकार मित्रांनो निरपेक्षं पत्रकारिता जपा. कुणाचं मुखपत्र बनून राहू नका. नाहीतर तुमचा "सामना" व्हायला वेळ नाही लागायचा...
सकाळचा नियमित वाचक - जिन्क्स

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

26 Sep 2012 - 1:40 am | श्रीरंग_जोशी

आवडत्या वृत्तपत्राबाबत तुमच्या भावना समजू शकतो पण निर्बुद्ध हे विशेषण काही पटले नाही बुवा.
तुम्ही जे म्हणताय ते करायला तर अधिक बुद्धिमान लोक लागतील.

सुहास's picture

26 Sep 2012 - 5:32 am | सुहास

ह्या निर्बुद्ध "सकाळ" चं काय करायचं????

सोप्पं आहे..! पेपरवाल्याला सांगून तो बंद करायचा...!

देवकर, भुजबळ, तटकरे आणि आता अजितदादा...राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने किती हि मोठा घोटाळा केला तरी आमच्या दैनिक "सकाळ" मध्ये ती बातमी कुठेच नसते (जी बाकी वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईन असते).

धिस इज अ पवार ग्रुप पेपर.. बाय द वे, लोकमतच्या दर्डांची बातमी वागळेंनी कुठे दाखवली होती...?

असो.. मला वाटते, भोचक यांची स्वाक्षरी आठवते का?
"काय? तुम्ही पत्रकार आहात..? कोणत्या पक्षाचे..?"

--सुहास

भरत कुलकर्णी's picture

26 Sep 2012 - 5:37 pm | भरत कुलकर्णी

लोकमत ने दर्डांची बातमी लोकमत मध्ये निश्चित छापली होती. अगदी सिबीआय चा छापा पडल्याचेही छापल्याचे आठवते.
त्यातल्या त्यात आताशा लोकमत चांगलाच येतो आहे.
दिव्य मराठी एकदम बकवास वाटतो आहे. स्थानिक बातम्यांना महत्व कमी अन उत्तर भारतीय जास्त. त्यांच्या पुरवण्यांचे लेख मात्र छान असतात.

लेका तुला वाटलं तर बन्द कर की सकाळ

आग्रह आहे का कुणाचा

अगं अगं म्हशी ...

जिन्क्स's picture

26 Sep 2012 - 11:21 am | जिन्क्स

अहो बंदच करणार होतो...पण सवय झाली आहे हो.
काय आहे ना की सकाळी सकाळी हातात 'सका'ळ घेतला नाही कि 'तिकडे' सुरळित होत नाही. :(

अन्या दातार's picture

26 Sep 2012 - 4:01 pm | अन्या दातार

च्यायला लोकांना चहा/कॉफी लागते 'तिकडे' नीट होण्यासाठी. तुम्ही 'सकाळ' खाता का पिता??

<< संपादित.>>

इष्टुर फाकडा's picture

27 Sep 2012 - 2:03 pm | इष्टुर फाकडा

काय आहे ना की सकाळी सकाळी हातात 'सका'ळ घेतला नाही कि 'तिकडे' सुरळित होत नाही.

.....नळीत होते का बघा ;)

पक पक पक's picture

27 Sep 2012 - 5:36 pm | पक पक पक

सकाळी सकाळी हातात 'सका'ळ घेतला नाही कि 'तिकडे' सुरळित होत नाही.

सकाळ हातात घेता ..? मग बसता कशावर..? ;)

आशु जोग's picture

27 Sep 2012 - 11:34 pm | आशु जोग

सोड रे तो सकाळ
त्याची सुरळी कर

धागाकर्त्याने फारच टेन्शन घेतलेले दिसते...

मुन्नाभाई एम बी बी एस पहावा

आशु जोग's picture

27 Sep 2012 - 11:37 pm | आशु जोग

>> काय आहे ना की सकाळी सकाळी हातात 'सका'ळ घेतला नाही कि 'तिकडे' सुरळित होत नाही. <<

जिन्क्स साहेब याचा नेमका अर्थ काय ?

संपादक

हे असले प्रतिसाद स्वतः धागाकर्त्यानेच टाकावेत हे बरे नव्हे. विषयाचे गाम्भीर्य नष्ट होते.

शिल्पा ब's picture

26 Sep 2012 - 9:02 pm | शिल्पा ब

अय्या गडे ! मग इथे अशे धागे कशे काढणार?

इथे अशे धागे कशे काढणार?
- आणि तुम्ही असंबंध प्रतिसाद कशे देणार

मृगनयनी's picture

27 Sep 2012 - 11:54 am | मृगनयनी

सहमत टू जिन्क्स..
"सकाळ"चा पूर्वीचा दर्जा थोडा कमी झाल्यासारखा वाटतो.. पूर्वी "नानासाहेब परूळेकरांनी" पुण्यात सुरु केलेले वृत्तपत्र.. म्हणून सकाळ'कडे आदराने पाहिले जायचे. "सकाळ"मधली भाषा, मांडणी, उच्चस्तरीय विनोद हे प्रॉपर पुणेकरांना साजेसेच होते....
पण नन्तर पुण्यात बाहेरचे लोक्स येऊ लागले.. आणि पुण्यातच स्थाईक होऊ लागले. . . व मूळचे पुणे कुठेतरी हरवत गेले......त्याबरोबरच टिपिकल पुणेरी पत्रकारही हरवून गेले..

असो... या हरवत जाणार्‍या पुण्याबरोबरच सकाळ'चा दर्जाही हरवत गेला... पवारांनी परूळेकरांच्या "सकाळ"ला काबीज केल्यामुळे तसेच विजय कुवळेकरांसारख्या मान्यवरांनी "सकाळ"ला सोडचिठ्ठी दिल्यापासून "सकाळ"चा दर्जा खरोखर ढासळत चाललेला आहे...असेच वाटते...

धन्या's picture

23 Apr 2014 - 11:13 pm | धन्या

"सकाळ"मधली भाषा, मांडणी, उच्चस्तरीय विनोद हे प्रॉपर पुणेकरांना साजेसेच होते....
पण नन्तर पुण्यात बाहेरचे लोक्स येऊ लागले.. आणि पुण्यातच स्थाईक होऊ लागले. . . व मूळचे पुणे कुठेतरी हरवत गेले......त्याबरोबरच टिपिकल पुणेरी पत्रकारही हरवून गेले..

असो... या हरवत जाणार्‍या पुण्याबरोबरच सकाळ'चा दर्जाही हरवत गेला...

माणूस किती कोत्या मनोवृत्तीचा असू शकतो याचं उत्तम उदाहरण.

पुण्याभोवती भींत का नाही बांधून घेतली "प्रॉपर" पुणेकरांनी? अशी भींत बांधली असती म्हणजे "बाहेरचे लोक्स" पुण्यात आले नसते. मुळचे पुणे हरवले नसते.

आत्मशून्य's picture

25 Apr 2014 - 3:30 am | आत्मशून्य

चीनच्या भिंतीला जबरा स्पर्धा भेटली असती न्हाई ... ? अन त्यावरच्या पाट्या म्हणजे कहर च..

धन्या's picture

25 Apr 2014 - 10:52 am | धन्या

आणि मग या पुण्याच्या भींतीवरील "उच्चस्तरीय" विनोद असलेल्या पाटयांचे उच्चस्तरीय दर्जा असलेल्या सकाळमध्ये फोटो छापून आले असते. ;)

बॅटमॅन's picture

24 Apr 2014 - 1:13 am | बॅटमॅन

मृगनयनी बाई या मिपाच्या दिग्विजयसिंग आजपासून. आपण तर बॉ फिदा झालो यांवर. ताजमहाल आहे नुस्ता ;)

मृगनयनी's picture

25 Apr 2014 - 10:49 am | मृगनयनी

वरती पाजळलेले दिवे पाहून नाईलाजाने इथे प्रतिक्रिया द्यावी लागत आहे:-

मुळात "ताजमहाल" ही वस्तुतः मुस्लिमांची अमानत नसून आग्रा येथे जाट लोकांनी बांधलेले "शिव-मंदिर" आहे. आग्रेश्वर- तेजाजी शिवमंदीर !!!! सध्याच्या ताज-महालाची बांधणी, वास्तुकला, भिंतींची रचना इ. गोष्टी या हिन्दु पद्धतीच्या आहे. व मुस्लिमांना ज्या ठिकाणी दफन केले जाते, त्या ठिकाणाला "महल" असे कधीच संबोधले जात नाही.
औरंगजेब, शहाजहांन.. इ. राजांनी हिन्दु धर्म नष्ट करण्याच्या उद्देशाने अनेक मंदिरे उध्वस्त केलीत. परन्तु त्या मन्दिरांपैकी "तेजो-महाला"चे सौन्दर्य पाहून त्यांनी तो स्वतः'च्या "कामा"साठी वापरला. असो...
सांगायचा उद्देश इतकाच आहे, की सध्या ज्याला ताज-महाल संबोधले जाते... ते परमशिवाचे पवित्र स्थान असून तेजो-महालाचा ताजमहाल झाल्याने त्याचे महत्व व पावित्र्य कमी होत नाही. : इथे उगीच टिवटिव करणार्‍यानी ताज-महालाचा पूर्व-इतिहास जाणून घेतला तर बरे होईल.

त्याचप्रमाणे या धाग्यावर आम्ही प्रतिक्रिया दिल्यानंतर जवळजवळ दीड वर्षांनी आमच्या मनोवृत्तीवर टीका करणारे लोक.. इथे पाहून आम्ही "धन्य" जाहलो!!!.. असो.. आपल्याला कळले असेलच.. की प्रॉपर पुणेकर आणि बाहेरचे यांच्या ज्ञान व माहिती यांत किती फरक आहे!!!
पुण्याबाहेरून आलेल्या काही अर्धवट लोकांमुळेच पुण्याचे जास्त नुकसान होत आहे.. हे मात्र खरे!!!!

(संपादित)

त्याचप्रमाणे या धाग्यावर आम्ही प्रतिक्रिया दिल्यानंतर जवळजवळ दीड वर्षांनी आमच्या मनोवृत्तीवर टीका करणारे बुद्धिमांद्य आलेले- लोक.. इथे पाहून आम्ही "धन्य" जाहलो!!!..

त्याचे काय झाले, तुमची ही मुक्ताफळे हा धागा आता दिड वर्षांनी वर आल्याने आमच्या वाचनात आली. हल्ली असं मी कुणाला उत्तर देत नाही. मात्र तुमचा तो "पुणे शहर ही आमच्या घराण्याची जहागीरी होती" अशा आविर्भावातील प्रतिसाद वाचून आम्हीही "धन्य" झालो. म्हटलं, खरडावे चार शब्द आपणही. :)

तुमच्या लिखाणावरुन तुम्ही अध्यात्माच्या क्षेत्रातील जाणकार असाव्यात असे वाटते. ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात माऊलींनी म्हटलं आहे,

हें विश्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना चराचर । आपण जाहला ॥ २१३ ॥

अपल्याकडून तरी अशा लिखाणाची अपेक्षा नव्हती. असो. मोठे व्हा.

बॅटमॅन's picture

25 Apr 2014 - 12:23 pm | बॅटमॅन

मृग नयनी,

पेशवाईत पुण्यात आलेल्यांनी निजामशाहीपासून पुण्यात आलेल्यांवर बाहेरचे इ.इ. टीका करणे म्हणजे हाईटच झाली, नै?

बाकी ताजमहालाबद्दलचे अज्ञानही वाखाणण्याजोगे आहे.

आत्मशून्य's picture

25 Apr 2014 - 4:07 pm | आत्मशून्य

मृगनयनीG ना घाबरून राहण्यातच भलाई आहे असे माझ्या कडिल त्यांच्या एका प्रतिसादाचा स्क्रीन शॉट सांगतो.

अवांतर:- माझ्याकडिल या खाजिन्याचे (तेच हो अदृश्य झालेले साद-प्रतिसाद) एखादे जालिय प्रदर्शन भरवावे काय ?

आदूबाळ's picture

25 Apr 2014 - 6:29 pm | आदूबाळ

जालिय प्रदर्शन

भरवाच.

माझी "विश लिस्ट" पाठवू का? ;)

आत्मशून्य's picture

26 Apr 2014 - 12:43 am | आत्मशून्य

माझी "विश लिस्ट" पाठवू का?

"विश लिस्ट" ? माझे आणी इतर सदस्यांचे असे (धागे, वयनी, खरदी) साद-प्रतिसाद ज्यात हमखास अद्रुश्य होण्याचे तडाखेबंद पॉटेन्शीअल माझ्या नजरेतुन आहे तेवडेच स्र्किन शॉट मी घेउन तारिखवार सेव करत आलेलो आहे (निव्वळ हौस, मौजमजा आणी २ टीबी जागा उपलब्ध आहे म्हणूनच). परंतु असले स्गळेच प्रतिसाद माझाकडे उपलब्ध असतीलच असे मात्र नाही, त्यामुळे विशलिस्ट कितपत पुरी करता येइल याबाबत शंका आहे.

विणोदाचा क्षीन प्रयत्ण केला हो...

बॅटमॅन's picture

25 Apr 2014 - 6:37 pm | बॅटमॅन

हा हा हा, जालीय प्रदर्शन भरवावेच ;)

प्यारे१'s picture

25 Apr 2014 - 6:40 pm | प्यारे१

ओ स्क्रीन शॉट मला पाठव रे!

सुरुवातीची 'सुरुवात' आम्हीच नारळ फोडून केलेली. इतना हक तो बनता ही है हमरा. ;)

आत्मशून्य's picture

26 Apr 2014 - 12:34 am | आत्मशून्य

ही व्यनीत लिंक देउ की... ? इथेच डाकवु ? स्क्रिनशॉटची ? माझ्या आकाउंटला यामुळे काही धक्का लागणार नाही ना ?

@प्रशांतG

इतना हक तो बनता ही है हमरा.

नक्किच.

असो आज वाट पाहुया संपादक काय म्हणतात ते, अन्यथा उद्या पर्यंत स्क्रिनशॉटची लिंक सर्वानाच उघड करेन. बाकी हे विवीध (व जुने) अद्रुश्य साद-प्रतिसाद जाम नोस्टेल्जिक करतात बुआ. खरोखर कलादालनाची शोभा वाढवण्या इतका भारी साहित्य प्रकार आहे हा.

ओ लिंक आम्हांसही द्या. पायजे तर व्यनि तरी कराच.

अरेरे. इथे आपलं घोर अज्ञान पाहून एक मिपाकर असल्याची शरम वाटली. समोरच्याला प्रत्यूत्तर न करता आपण केवळ अन् केवळ असबंध बडबड करत आहात हे कदाचित आपल्याला ठाऊक नसावं. आधीच जातीवाचक, प्रादेशिक अस्मितेच्या प्रतिसादांतून आपल्या एकूण अगाध बुध्दीचे प्रदर्शन करत लोकांना विनाकारण भडकवत तर आहातच पण लोकांचे छान मनोरंजनही करत आहात. आपल्या एकुण लिखानावरून आपण प्रचंड धार्मिक असल्याचं दिसून येतंय. मग त्यासंबंधी लोकांचं ज्ञान वृध्दींगत करणारे लिखान करा ना! का उगा असले बाष्फळ प्रतिसाद टाकून आपल्या मर्यादा उघड करताय?

असो.

सुज्ञ असाल तर शांत बसाल, आणि नसाल तर चालूच ठेवा तुमच्या बाललीला.

या प्रतिसादातले नक्की काय संपादित केले गेले? बराचसा आक्षेपार्ह मजकूर आहे तसाच आहे की.

याला म्हणतात +व अ‍ॅटिट्यूड!! :))

बॅटमॅन's picture

25 Apr 2014 - 6:38 pm | बॅटमॅन

;) =))

पुण्यात जसे तथाकथित श्रेष्ठत्वाचा अभिमान लावणारे जन्मतात
तसेच मंडईच्या एका कोपऱ्यात जन्मणारी श्वानवंशीय प्रजा सुद्धा स्वतःचे जन्मगाव पुणे सांगू शकते. मला एक कळत नाही, पुण्यात जन्माला यात तुमचे काय कर्तृत्व ?
तुम्ही कोणत्यातरी दुर्गम,दुष्काळी भागात जन्माला आला असतात तरी त्या मध्ये सुद्धा काही कर्तृत्व असले असते का ?

मालोजीराव's picture

25 Apr 2014 - 11:25 am | मालोजीराव

आमच्या नंतर एक दीड शतकाने पुण्यात आलेले लोक हे आधीपासून पुण्यात असलेल्यांना आणि नंतर पुण्यात आलेल्यांना उपरे समजतात ;) :))

बॅटमॅन's picture

25 Apr 2014 - 12:20 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

एकच मारा पण क्या मारा =))

धाग्याचे काश्मिर होणे , धाग्यावर मंत्र बसणे या नंतर आत धाग्याचा ताजमहल होणे ही नविन म्हण सुरु करावि .

बॅटमॅन's picture

25 Apr 2014 - 12:45 pm | बॅटमॅन

मी पयला =))

अगदी अगदी =))

श्री श्री श्री 840 बॅटमॅन यांचे 'मी पयला ' क्लब मध्ये हार्दिक स्वागत.

शुभेच्छुक -जेपी आणी समस्त 'मी पयला' क्लब.

(मोहरून जाऊन वगैरे) धन्यवाद!! बाकी या क्लबाचे आद्य प्रणेते मध्यवर्ती जागेत राहणारे श्री श्री श्री रा रा रा मुवि यांनाही धन्यवाद देतो. जेपीजी(इमेजवाले नै) तरुण नेतृत्व असल्याने त्यांनाही धन्यवादच!

आत्मशून्य's picture

24 Apr 2014 - 2:53 am | आत्मशून्य

त्याबरोबरच टिपिकल पुणेरी पत्रकारही हरवून गेले..

असो... या हरवत जाणार्‍या पुण्याबरोबरच सकाळ'चा दर्जाही हरवत गेला... पवारांनी परूळेकरांच्या "सकाळ"ला काबीज केल्यामुळे तसेच विजय कुवळेकरांसारख्या मान्यवरांनी "सकाळ"ला सोडचिठ्ठी दिल्यापासून "सकाळ"चा दर्जा खरोखर ढासळत चाललेला आहे...असेच वाटते...

यावर जाणकारांनी प्रकाश जरुर टाकावा...!

शिल्पा ब's picture

27 Sep 2012 - 7:46 pm | शिल्पा ब

आमचा प्रतिसाद तुमच्या धागा काढण्याशीच संबंधीत आहे पण किमान या निमित्ताने आपण विद्वान असल्याचा पुरावा मिळाला हे नसे थोडके. नै का !

धागाकर्त्याशी सहमत.पण सामना आणि सकाळ ची तुलना करू नका.सामना हे शिवसेनेचे अधिकृत व्रुत्तपत्र आहे तर सकाळ स्वतंत्र आणि निरपेक्श्तेच्या मुखवटा लावलेले बारामतीकरांचे प्रचारपत्र आहे.

चौकटराजा's picture

26 Sep 2012 - 9:33 am | चौकटराजा

आज सकाळ हे बारामतीकरांचे मुखपत्र असले तरी सकाळ पूर्वी परूळेकरांपासूनच बोटचेपे वृत्तपत्र आहे. गोय़ंकांचे धाडस तेथे कधीच नव्हते.

चिरोटा's picture

26 Sep 2012 - 11:07 am | चिरोटा

पुण्यात घराघरात सकाळ का वाचला जातो हे न उलगडणारे कोडे आहे.

आनन्दा's picture

26 Sep 2012 - 11:10 am | आनन्दा

सकाळ हा चविष्ट पेपर आहे.

आनन्दा

बॅटमॅन's picture

26 Sep 2012 - 12:57 pm | बॅटमॅन

असहमत. पुणे टाईम्स आणि संध्यानंदपेक्षा अधिक चविष्ट पेपर दुसरा असूच शकत नाही असा आमचा स्पष्ट अभिप्राय आहे.

टवाळ कार्टा's picture

23 Apr 2014 - 6:02 pm | टवाळ कार्टा

मसालेदार "चा"विश्ट्पणा हवा असेल तर मुम्बै सन्ध्या ;)

दह्नयव्द तवल क्रर्त सुच्नेसथि ;)

टवाळ कार्टा's picture

23 Apr 2014 - 6:41 pm | टवाळ कार्टा

थ्यन्कु =))

मदनबाण's picture

23 Apr 2014 - 6:51 pm | मदनबाण

हा.हा.हा... ;)
एकदा वेळ जात नव्हता म्हणुन एका एसटी बस स्टॅडवर वाचण्यासाठी काही मिळते का ते पाहत होतो... तेव्हा एक पेपर विक्रेता पोट्टा दिसला. त्याला हाक मारली आणि जवळ बोलवले. त्याच्याकडे असलेल्या अनेक वर्तमान पत्रात काय निवडावे हे समजेना...मग विचार केला नेहमी तेच तेच वॄत्तपत्र काय वाचायचे ? काहीतरी हटके वाचायला हवे.मग त्याच्याकडे पोलिस टाईम्स दिसला. घेतला आणि बस मधे जाउन बसलो.गाडी सुरु होताच पेपर वाचायला सुरुवात केली. पहिली ठळक बातमी होती डोक्यात वरवंटा घालुन खुन... मग दुसर्‍या पानावर गेलो तर त्यावर बातमी होती विळीने गळा कापला ! च्यामारी मी मनात म्हणालो की हा पोलिस टाईम्स आहे की मर्डर टाइम्स ? त्यानंतर चुकुनही तो पेपर कधी हातात घेतला नाही.

खटपट्या's picture

23 Apr 2014 - 11:54 pm | खटपट्या

त्यांचे मथळे "विळीने कापला गळा, चला आता पळा" असे काहीसे असतात. लेख लिहिणारे बहुतेक नवकवी असावेत.

@@पुण्यात घराघरात सकाळ का वाचला जातो हे न उलगडणारे कोडे आह@@@@

>>पुणेरी अभिमानातील* काही निवडक गोष्टीत. "सकाळ" चाही नंबर लागत असावा

*हलका, नम्र विनोद होता.. संबंधितांनी कृपया हलके घ्यावे ..

परिकथेतील राजकुमार's picture

26 Sep 2012 - 11:54 am | परिकथेतील राजकुमार

>>पुणेरी अभिमानातील* काही निवडक गोष्टीत. "सकाळ" चाही नंबर लागत असावा
अतिशय चुकीचे विचार.

सकाळची 'रद्दी' महिन्याच्या शेवटी किती उपयोगाला पडते हे तुम्हाला काय कळणार ?

तसेच सकाळच्या बर्‍याच पुरवण्यांचे पेपर हे गुळगुळीत आणि चांगल्या दर्जाचे असल्याने दुध दुभत्याच्या कपाटात वापरता येतात. मित्रांकडून चोरुन आणलेल्या पुस्तकांना कव्हर म्हणून देखील ह्याचा खूप उपयोग आहे. लोड शेडिंगच्या काळात पंखा म्हणून देखील दर्जेदार उपयोग होतो.

प्रसाद१९७१'s picture

23 Apr 2014 - 6:24 pm | प्रसाद१९७१

ही जुनी गोष्ट आहे. आता मटा, लोकसत्ता, अगदी लोकमत पण घेतात लोक.

स्पा's picture

26 Sep 2012 - 11:58 am | स्पा

@@@सकाळची 'रद्दी' महिन्याच्या शेवटी किती उपयोगाला पडते हे तुम्हाला काय कळणार ?

तसेच सकाळच्या बर्‍याच पुरवण्यांचे पेपर हे गुळगुळीत आणि चांगल्या दर्जाचे असल्याने दुध दुभत्याच्या कपाटात वापरता येतात. मित्रांकडून चोरुन आणलेल्या पुस्तकांना कव्हर म्हणून देखील ह्याचा खूप उपयोग आहे. लोड शेडिंगच्या काळात पंखा म्हणून देखील दर्जेदार उपयोग होतो. @@@@

ह्या ह्या ..
हो..
माझ्याकडे अशीच रद्दी हिंदुस्तान times ने सुद्धा जमते ..
वार्षिक १९९ रुपयात मस्त ४०० पर्यंत रद्दीचे पैसे येतात .. शिवाय.. पेपर वाचायला मिळतो तो वेगळाच फायदा

साती's picture

28 Sep 2012 - 9:12 am | साती

१९९ रुपयांत रद्दीचे ४०० पैसे? बहोत घाटे का सौदा है.
सकाळ लावा किमान ४० रु. तरी येतील.
;)

sagarpdy's picture

26 Sep 2012 - 12:01 pm | sagarpdy

संध्यानंद सुरु करा

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2012 - 1:07 pm | प्रभाकर पेठकर

प्र. के. अत्रे एकदा आपल्या भाषणात म्हणाले होते, 'सकाळचा उपयोग फक्त 'सकाळी'च विशेष होतो.'

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Sep 2012 - 4:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वर सर्वांनी म्हटलंय ना, सकाळ आवडत नाही तर मला दै. सकाळ आवडतो, कोणाचं काय म्हन्नं आहे. :)

पेप्रावाले आपल्या आपल्या धंद्याच्या हिशोबाने काम करतात त्यात दै.सकाळवाल्यांनी दैनिकांच्या परंपरा वग्रै मोडाव्यात असं मला वाटत नाही, जे चाललं आहे, ते बरं आहे, नव्हे उत्तम आहे. पेप्रांची तुलना करायची असेल तर मराठीतलं कोणता पेपर सॉरी दैनिक घ्यावं म्हणजे सकाळची तुलना होईल. दै. लोकमतने पाहा. मा.श्री अजित दादांचा कसा डोळ्याचे चिपडे काढतांनांचा फोटो टाकला आणि वर लिहिलं 'पवार पाय उतार' खालची बारीक ओळ 'सिंचन भ्रष्टाचाराचे आरोप भोवले'. तुलनेत सकाळनं पाहा अजितदादांचा काय प्रसन्न चित्र टाकलंय.(अहाहा.) आणि शीर्षकही संपादकांची म्याचुरिटी दाखवते 'अजित दादांचे राजीनामास्त्र बारीक ओळीत ''नि:पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी घेतला निर्णय.'' (छापील पेप्रात लाईकचं बटन असतं तर क्लिक केलं असतं असो) तर दोन दैनिकांच्या या दोन बातम्यांचा अभ्यास केला तर लक्षात येतं की लोकमतला राष्ट्रवादीच्या नेत्यांचे प्रसन्न चेहरे दाखवण्याचा नेहमी कंटाळा येतो[पाहा तटकरे, भुजबळांचे काय ?] तुलनेत सकाळने दर्डांचे [कोळशांच्या प्रकरणात] फोटो चांगले टाकले आहेत. सकाळ पेपर कसा स्वच्छ असतो बातम्या असो नसो त्याला पाहावं वाटतं लोकमतचं तसं नाही. दै. सकाळचं संपादकीय दै. लोकमतच्या तुलनेत चांगलं सुस्पष्ट मत व्यक्त करणारं असतं. लोकमतचं तसं नाही, डचकत डचकत आलेलं ते संपादकीय असतं. असो. अजून खूप बारीक सारिक तुलना करुन मत मांडलं असतं. पण, टंकाळा आला.

टीपः दै. सकाळचा मी पत्रकार, लेखक, संपादक, वगैरे नाही. माझी दै. सकाळची कोणतीही एजन्सी वग्रै नाही. दै. सकाळ आंतरजालावर बाजू मांडण्यासाठी कोणत्याही प्रकारचं मानधन देत नाही. धन्यवाद. :)

-दिलीप बिरुटे

यावर बरंच पूर्वी मिपावर पण लिहून झालं आहे.

एक साधी युक्ती सांगतो. कधीही सकाळ किंवा इ-सकाळ वाचताना अगदी सरळ डोक्यात जाईल अशा तर्‍हेची एकांगी बातमी असेल - उदा. कुठला तरी राष्ट्रवादीचा बळंच उदो उदो, संबंध नसताना मोदींना अमुक प्रकरण कसे भोवले, काँग्रेसची कशी गोची झाली आहे इ. बरेचदा काही बातम्या आणि मजकूर वाचून हे इतकं apparently उघडपणे दिसतं की याला मुखपत्र का म्हणू नये हा प्रश्न पडतो.
अशा वेळी त्या बातमीचा स्त्रोत पहा - ९९% वेळा - सकाळ न्यूज नेटवर्क - हा असतो, इतर वेळा अनंत बागाईतकर किंवा उत्तम कांबळे!
अतिशय दर्जेदार पुरवण्या आणि विकांताची वाट पहायला लावणारा सकाळ फॅमिली डॉक्टर आणि इतर अतिशय फेकू पुरवण्या काढून पार बकवास झाला आहे.
पण कागद, स्वच्छ आणि वाचनीय प्रिंट, चांगली मांडणी यामुळे सवयीने वाचला जातो. कित्येक वर्ष लोकसत्ता पुण्यात केवळ aesthetics मुळे मार खात होता.
आणि स्थानिक बातम्यांच्या अभावामुळे. हळूहळू त्यानेही स्थान मिळवले आहे विशेषतः काही प्रमाणात नि:पक्षपाती (सुमार राव सोडून) आणि मुख्यतः उत्तम पुरवण्या आणि इतर लेख.

प्रा.डॉ.: अजितदादांची बातमी अशा तर्‍हेने छापली आहे की मुळात आरोप खोटाच आहे. खरं खोटं न्यायालय / सरकार ठरवेल ना.. सकाळने कुठल्या आधारावर विधान करावे आणि कशासाठी? लोकमत कडे फक्त दर्डा आहेत, दर्जा नाही.. त्यामुळे त्याला बाजूला ठेवलेलंच बरं.

सकाळने वृत्तपत्र यापलिकडे जाऊन जो समूह निर्माण केला आहे ते त्यांचं अतिशय उत्तम व्यावसायिक धोरण आहे आणि यशाचं कारणही.
ज्याला business ecosystem म्हणावी अशा पद्धतीने, सकाळ, साम, मधुरांगण, बालाजी तांबे आणि फॅमिली डॉक्टर, बालकुमार चित्रकला स्पर्धा, पुस्तके - चिंटू / ढिंग टांग - ब्रिटीश नंदी, इतर, जागर नागरिक मंच आणि इतर बर्‍याच लहान गोष्टी यातून एक सकाळ ब्रँड आणि साखळी तयार केली आहे जी व्यवसाय म्हणून कौतुकास्पद आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Sep 2012 - 5:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सकाळने वृत्तपत्र यापलिकडे जाऊन जो समूह निर्माण केला आहे ते त्यांचं अतिशय उत्तम व्यावसायिक धोरण आहे आणि यशाचं कारणही.
ज्याला business ecosystem म्हणावी अशा पद्धतीने, सकाळ, साम, मधुरांगण, बालाजी तांबे आणि फॅमिली डॉक्टर, बालकुमार चित्रकला स्पर्धा, पुस्तके - चिंटू / ढिंग टांग - ब्रिटीश नंदी, इतर, जागर नागरिक मंच आणि इतर बर्‍याच लहान गोष्टी यातून एक सकाळ ब्रँड आणि साखळी तयार केली आहे जी व्यवसाय म्हणून कौतुकास्पद आहे.

+१

-दिलीप बिरुटे

चौकटराजा's picture

27 Sep 2012 - 8:49 am | चौकटराजा

" सकाळ" या वर्तमानपत्राचे सोडा .हा सकाळचा व्यावसायिक गट जो तयार झाला आहे. त्याचे कौतुक करावेच लागेल.

सन्जयखान्डेकर's picture

1 Oct 2012 - 12:42 pm | सन्जयखान्डेकर

तसेही माझ्या महितीत संपुर्ण नि:पक्ष असे एकही व्रुत्तपत्र किंवा वाहीनी नाही, सर्वच कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, काही उघड तर काही छुपे, किमान उघड संबंध असणारे बरे, नाहीतर कोण कोणाकडुन काय काय खावुन / घेवुन कोणत्या बातम्या देतील भरवसा नाही.
सकाळ किमान पुरवण्यांसाठी तरी वाचावासा वाटतो.

१.५ शहाणा's picture

26 Sep 2012 - 9:17 pm | १.५ शहाणा

सकाळ हा पवार कुटुबाचा भाट आहे. तो विरोधि बातमि छाप्णार नाहि.

आशु जोग's picture

27 Sep 2012 - 1:23 am | आशु जोग

>> पुणे टाईम्स आणि संध्यानंदपेक्षा अधिक चविष्ट पेपर दुसरा असूच शकत नाही असा आमचा स्पष्ट अभिप्राय आहे <<

संध्यानंद आता पूर्वीचा राहीला नाही, पूर्वीचं पुणही राहीलं नाही

सकाळची हेडींग पहा म्हणजे कळेल संध्यानंदचे मार्केट का डाऊन झाले

मैत्र's picture

27 Sep 2012 - 3:38 am | मैत्र

संपादकीय !!
अजितदादांचा दणका
http://www.esakal.com/esakal/20120927/4680348099663574360.htm
"केंद्रातील कॉंग्रेसप्रणीत आघाडीचे "यूपीए' सरकारही हादरून गेले." "अखेरीस आपला "आतला आवाज' शिरोधार्य मानून अजितदादांनी राजीनामा दिला."
"पण राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतलेली समंजस भूमिका पाहता तूर्त तरी त्यांचे मनोरथ पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. "
"94-95 मध्ये शरद पवार यांच्यावरही खंडीभर आरोप झाले होते आणि ट्रकभरून पुरावे आणण्याच्या गोष्टी केल्या गेल्या होत्या; पण त्यातून काहीच निघाले नाही. केवळ आरोपांचा धुरळाच उडाला. शरद पवारांनी रोज आरोपांना उत्तर देण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्यावर आरोप केले तरच विरोधक स्वतःकडे लक्ष वेधू शकतात, अशी त्या काळातील स्थिती होती."
अजून काय लिहायचं बाकी ठेवलंय..

आणि हे नेहमीचे यशस्वी बातमीदारः
"दादांच्या राजीनाम्याने भाजप बुचकळ्यात"
- सकाळ न्यूज नेटवर्क

चिरोटा's picture

27 Sep 2012 - 12:51 pm | चिरोटा

संपादक सुमार केतकरांसारखाच वाय.झेड. आहे. नशीब! अजितदादाच्या राजिनाम्याने सगळे जग हादरले नाही म्हंटलय.

इरसाल's picture

27 Sep 2012 - 1:14 pm | इरसाल

कशाला म्हणायला पायजे.
ओबामा म्हटला ना की त्याची भिस्त आता मुंबईतील तरुणांवर आहे म्हणुन हाच तो जग हादरल्याचा पुरावा.
हाय काय नी नाय काय.
बादवे हे वाचले काय तुम्ही.....http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=252...
पहिल्या ३ ओळी गौर करने लायक.

ग्रेटथिन्कर's picture

27 Sep 2012 - 11:38 am | ग्रेटथिन्कर

निरपेक्ष पत्रकारीतेकरीता मी 'दैनिक बोंबाबोंब(पत्र नव्हे ,धगधगते अग्निकुंड(म्हंजे काय रे भाऊ?(कंसातले कंसाबद्दल क्षमस्व))) 'ऑनलाईन सुरु करण्याचा विचार करत आहे .तिथे प्रत्येकाच्याच नावाने निरपेक्ष बोंब मारली जाईल.विशेष म्हणजे मी ,म्हणजेच'टीनपाट अग्रलेखांचा अनभिषिक्ट सम्राट' तिथे दररोज संपादकिय लिहीण. मिपाकर पार्टनरशिप करतील काय?

मिपाकर पार्टनरशिप करतील काय?
>>>> मी तर तयार आहे. मी दररोज एक कुणाच्या तरी अस्मिता दुखावणारे (धगधगणारे )व्यंगचित्र देत जाईन. तुम्ही जामीनाची रक्कम तयार ठेवा.लगेच मात्र देऊ नका. (मी मिडियाप्रसिध्द झाल्यावर मानधन/पर्सेंटेज तेवढे वाढवायचे बघा)

विजुभाऊ's picture

27 Sep 2012 - 6:19 pm | विजुभाऊ

सकाळ नेहमीच अती मवाळ / सावध धोरण घेत आलेला आहे.
त्यात सध्या त्याची मालकी बारामतीकरांकडे आहे. त्यामुळे सकाळ च्या अशा बातम्यामधे नवे काही नाही
सकाळ चा आणखी एक वैचारीक गोंधळ म्हणजे त्याना स्वतःला आपण राष्ट्रीय्/प्रादेशीक की स्थानीक वृत्तपत्र आहोत हे ठरवता येत नाही.
त्यामुळे त्यांचा प्राधान्यक्रम मवाळ स्थानीक बातम्या मग राज्यातील महत्वाच्या बातम्या ( उदा: मंडईत दुरड्यांची मोठी आवक / शनिवारपेठेत कॅफेवर धाड / ढोलेपाटलांचे नाव स्थायी समितीत / नागपुरात हळदी-कुंकु कार्यक्रम संपन्न / दिल्लीत खाद्य जत्रा / रवांडा / बुरुंडीच या राष्ट्राध्यक्षांची श्रीलंका / जमेका भेट / ओबामांच्या पोटात दुखू लागले )
असा अनुक्रम असतो. अर्थात हे सर्व जहिरातींमधून जागा शिल्लक राहिल्यास केले जाते.
सातार्‍यात अभियम्ता दिनानिमित्त सकाळ ने जी विषेष पुरवणी प्रकाशीत केली होती त्यात विश्वेष्वरय्या यांच्या बद्दल दोन कॉलम पाच सेमी ची एक बातमी. आणि बाकी इतर उरलेली ३.७५ पाने अभिनंदनाच्या जहिरातीच होत्या. ( त्याही दादा/बापू यांच्या अभिनंदनाच्या जास्त)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Sep 2012 - 11:40 pm | निनाद मुक्काम प...

सकाळ मधील पैलतीर हे अनिवासी भारतीयांसाठी असलेले सदर ही खूपच चांगली संकल्पना आहे.
अनिवासी भारतीयांचे लेख व निवासी भारतीयांचे परदेश वारीचे लेख व ह्याहून खमंग व चुरचुरीत अश्या ह्या लेखांवर येणाऱ्या इरसाल पुणेकरांच्या प्रतिक्रिया वाचून
ह ह पु आ होते.

पैलतीर नाही हो,मुक्तपीठ ते

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Sep 2012 - 3:42 pm | निनाद मुक्काम प...

अरे बापरे सकाळ ने माझा लेख चुकून पैलतीर मध्ये छापला वाटते.
http://www.esakal.com/esakal/20111020/5284324873040486271.htm
आपण ही चूक माझ्या लक्षात आणून दिली
धन्य आहात तुम्ही
पैलतीर ह्या शब्दाचा नवीन एखादा अर्थ शोधावा म्हणतो.

आशु जोग's picture

29 Sep 2012 - 12:18 am | आशु जोग

आपला लेख वाचला छान आहे

दारु या विषयावर अनेक लेख वाचायला मिळतात पण ते सगळे जरा दिखाऊ असतात.

आपला लेख मात्र आशय आणि भाषा दोन्ही दॄष्टीने उत्तम.

दुश्यन्त's picture

23 Apr 2014 - 6:19 pm | दुश्यन्त

'धरणात पाणी नाही तर *तू का' हे अजित पवारांचं वाक्य किंवा ते असल निर्लज्ज काही बोलले याबद्दल सकाळने बातमी दिली नव्हती. मात्र दुसर्या दिवशी 'वादग्रस्त' विधानाबद्दल शरद पवारांनी टोचलेले कान, अजित पवारांची दिलगिरी, आत्मक्लेश याबद्दलच्या बातम्या होत्या.अजित पवारांनी काय तारे तोडले याचा पुसटसा पण उल्लेख नव्हता. अग्रलेख लिहून अजित पवारांना उपदेशहि केला होता. पवारांच्या शाई पुसून दोनदा मतदान कराच्या सल्ल्याबाबत पण बहुदा असेच घडले.

प्रसाद गोडबोले's picture

23 Apr 2014 - 11:33 pm | प्रसाद गोडबोले

ह्या वरुन आयडीया आली "आपण मिसळपाव टाईम्स हा पेपर सुरु करायचा का " :प

पिवळा डांबिस's picture

23 Apr 2014 - 11:41 pm | पिवळा डांबिस

मिसळपाव टाईम्ससकट स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे!!!
-पिवळा बबन

मिसळपाव टाईम्स चा संपादक कोण असावा यावर मिपाकरांचे मतदान घ्या

आदूबाळ's picture

24 Apr 2014 - 12:08 am | आदूबाळ

आमचं मत्त सरांना

बाबा पाटील's picture

24 Apr 2014 - 11:54 am | बाबा पाटील

मिसळपाव टाईम्स जर काढणार असाल तर तात्या अभ्यंकारांना परत बोलवा त्यांच्या इतके व्यासंगी अग्रलेख कोनी देणार नाही.

प्यारे१'s picture

24 Apr 2014 - 1:17 pm | प्यारे१

>>>व्यासंगी

उचित उपमा!

पिवळा डांबिस's picture

25 Apr 2014 - 2:19 am | पिवळा डांबिस

मिसळपाव टाईम्स जर काढणार असाल तर तात्या अभ्यंकारांना परत बोलवा त्यांच्या इतके व्यासंगी अग्रलेख कोनी देणार नाही.

१००% सहमत!!! आपण तर त्याना इथे मिपावर सॉल्लिड मिस करतो!!!
-----------------------------------------------------------------------
मिसळपाव टाईम्ससकट स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे - पिवळा बबन

टवाळ कार्टा's picture

25 Apr 2014 - 9:24 am | टवाळ कार्टा

ते गेले का पण??? कसले जबराट लेख आहेत त्यांचे

आशु जोग's picture

24 Apr 2014 - 10:29 am | आशु जोग

बकाल पेपर छानच असतो, विशेषतः ते महीला सबलीकरण... आणि महीला आत्मनिर्भरीकरण, महिला बचतगट
सगळं खूपच गोड असतं... झाशीची राणी येवून शपथ देते म्हणे गावोगावच्या महिलांना

फोट्टू असतो ना पेप्रात

नानासाहेब नेफळे's picture

24 Apr 2014 - 11:52 am | नानासाहेब नेफळे

आजकालच्या सगळ्या पेपरांमध्ये तटस्थ आणि निष्पक्ष राहणारा एकच पेपर आहे..
.
.
.

.
.
....टॉयलेट पेपर

माहितगार's picture

24 Apr 2014 - 11:57 am | माहितगार

सर्वोत्कृष्ट विनोद म्हणता नाही येणार पण वस्तुस्थितीवरच दाहक व्यंग म्हणून ह्या विडंबनाकडे बघू शकतो. धन्यवाद

धर्मराजमुटके's picture

25 Apr 2014 - 12:31 am | धर्मराजमुटके

काही नाही हो. मराठी व्याकरणात तीन प्रकारचे प्रयोग आहेत. कर्तरी, कर्मणी व भावे. वेगवेगळी वर्तमानपत्रे हा प्रयोग त्यांच्या वाक्यावाक्यांतून करत असतात. त्याच्या आनंद घ्यायचा.
मी लहान होतो तेव्हा खाडीलकरांचा नवाकाळ ग्रेट वाटायचा. मधेच लोकसत्ता आवडायला लागला. अधेमधे लोकमतही आवडत होते. अगदी थोड्या काळाकरीता "पत्र नव्हे कुत्र" ही आवडत होतं.
चालायचं. वयोमानानुसार वेगवेगळ्या हिरोईन आवडतात तसचं आहे हे ! :)

पगला गजोधर's picture

25 Apr 2014 - 10:23 am | पगला गजोधर

लहान तोंडी मोठा घास, पण धर्मराजमुटके तात्या, बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पण बद्दल, आपल्याला काय वाटायचे त्यावेळी ? आवडायचा का ?

धर्मराजमुटके's picture

25 Apr 2014 - 10:46 am | धर्मराजमुटके

त्यावेळी आम्ही जिवंत नव्हतो.

सद्या कोणते वर्तमानपत्र वाचता आपण ?

धर्मराजमुटके's picture

26 Apr 2014 - 9:50 am | धर्मराजमुटके

पैसे देऊन लोकसत्ता आणी ऑनलाईन इतर सर्व. मटा, नवशक्ती, टाईम्स. नवशक्ती त्यातल्या त्यात चांगला आहे.

उडन खटोला's picture

26 Apr 2014 - 8:16 am | उडन खटोला

सकाळ चेही तेच होइल जे युनायटेड वेस्टर्न बँकेचे झाले.

पवार ,पुतणे आणि त्यांच्या चेल्यानी उर्जितावस्थेतील युनायटेड वेस्टर्न बँकेला पद्धतशीर पणे लुटून कसे दिवाळे वाजवले ,यावर एक चांगला लेख मागे लोकसत्ता त आला होता.....