अजित पवार, धरण आणि धमकी

काळा पहाड's picture
काळा पहाड in काथ्याकूट
19 Apr 2014 - 12:45 am
गाभा: 

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व आज पुन्हा "बोललं". पाणी प्रश्न सोडवायचा आहे ना? मग सुप्रिया सुळेंनाच मतदान करा. तसं नाही केलं तर तुमच्या गावचं पाणीच बंद करू, अशी धमकी अजित पवार यांनी दिल्याचं वृत्त आज 'मुंबई मिरर'नं दिलं. काकांचा "विनोद" ताजा असतानाच पुतण्याच्या नवीन वाचाळतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस् ची पुन्हा दातखीळ बसली आहे.

'एखाद्या गावानं माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात जाऊन मतदान केल्यानं ती काही निवडणूक हरणार नाही. मात्र मला जर समजलं की मासाळवाडी गावाने पक्षाच्या विरोधात मतदान केलं तर गावाला पाणी मिळणार नाही, हे लक्षात ठेवा' असं हे महाशय म्हणाले.

महाराष्ट्र टाईम्स च्या वृत्तानुसार 'भारतीय लष्करात जवान असलेल्या संदीप ठोंबरे यांनी २००६ मध्ये पक्षाकडून पाणी प्रश्न सोडवला जाईल असे वचन देण्यात आल्याची आठवण करून दिली. यानंतर अजित दादांनी त्याला तुरुंगाची हवा खावी लागेल, असे धमकावले'.

धरणाचे पाणी वाढवण्याची अभिनव योजना सादर केल्यानंतर अजित दादांनी एक मानभावी उपोषण केलं होतं. आता ही धमकी पहाता माध्यमे याचा सक्रीय पाठपुरावा करणार हे निश्चित. सकाळ मध्ये मात्र ही बातमी 'अजितदादांच्या बदनामीचे षडयंत्र' अशा प्रकारे दिली गेली आहे.

प्रतिक्रिया

निलरंजन's picture

19 Apr 2014 - 6:52 am | निलरंजन

दादागिरी करण्यात दादांचा हात कुणीही धरू शकणार नाही
धमकी देणे हा तर त्यांचा आवडीचा छंद आहे
प्रत्येक गोष्टीची बातमी होत नाहीये म्हणून आपल्या ला कळत नाही
पूर्व हवेलीत प्रचार करण्यासाठी दादानी शिरूर लोकसभा सीट निवडून न दिल्यास शेतकर्यांना शेतजमिनीवर MIDC ची आरक्षणे टाकण्याची धमकी दिली होती

आशु जोग's picture

19 Apr 2014 - 9:57 am | आशु जोग

फेसबुकप्रमाणे मिसळीवरही आता ताज्या बातम्या मिळायला लागल्या, आनंद वाटला

काँग्रेस, राष्ट्रवादी, बिजेपी सगळे एका माळेचे मणी आहेत. बाबा रामदेवसारख्या माणसानं सुद्धा काय प्रकार केलायं तो पाहा. (अर्थात, बिजेपीचा उमेदवार किती दिव्य आहे ते वेगळं सांगायला नकोच.)
Baba 'Black Money' Ramdev caught on tape talking money with BJP candidate..

आणि उमा भारती मोदींबद्दल काय म्हणाल्यात
त्याचा हा विडीओ!
सत्तेसाठी हे लोक काय वाट्टेल ते करतील.

माहितगार's picture

19 Apr 2014 - 11:00 am | माहितगार

राजकीय आणि सहकारी संस्थातील पदावर कोणत्याही व्यक्तीस जास्तीत जास्त १० ( दुसर्‍या निवडणूकीत २/३ पेक्षा अधिक मते पडल्यास १५ वर्षे) निवडून येण्याची/राहण्याची मर्यादा हवी. मग ते कुणीही असू दे.

या निमीत्ताने धागा जाहीरात :
निवडणूक प्रक्रीयेतील (मला) अपेक्षीत बदल

हुप्प्या's picture

19 Apr 2014 - 11:28 am | हुप्प्या

भारतातील थोर लोकशाहीने अशी परंपरा निर्माण केली आहे की निवडणुका तोंडावर आल्या की नेते जनतेच्या पाया पडतात आणि निवडून आले की जनतेला पायदळी तुडवतात.
पवारांचा हा तीर्थस्वरुप निवडणुकीच्या तोंडावरच जनतेला लाथा घालण्याचे धाडस करतो तो निवडून आल्यावर त्यांच्यावर काय फवारे उडवेल ते ओळखणे अवघड नाही.
जनतेने असल्या माजोरड्या नेत्यांना मतपेटीतून पेकाटात लाथ घालून उकिरड्यावर फेकावे.

सुहासदवन's picture

19 Apr 2014 - 12:00 pm | सुहासदवन

जनतेने असल्या माजोरड्या नेत्यांना मतपेटीतून पेकाटात लाथ घालून उकिरड्यावर फेकावे.

जनतेच्या पायात निवडणुकांपुरत्या पैशाच्या बेड्या घातल्यावर जनता कशाला त्यांना लाथा मारतेय.
मुळात ह्या आणि अशा अनेक नेत्यांनी इतक्या वर्षात आपल्या जनतेचे पद्धतशीर ब्रेन वॉशिंग करुन त्यांची दुरचा विचार करण्याची मतीच कुंठीत करुन ठेवली आहे. जनतेला काहीही कळत नाहीये आता.

मराठी_माणूस's picture

19 Apr 2014 - 9:05 pm | मराठी_माणूस

नैसर्गिक साधनसंपत्ती , पर्यायाने जनतेच्या हक्काची साधनसंपत्ती स्वतःच्या मालकीची असल्याच्या थाटात बोलणे ही सत्तेची धुंदी आहे

राजेंद्र मेहेंदळे's picture

21 Apr 2014 - 7:59 pm | राजेंद्र मेहेंदळे

नासाने एका नव्या उपग्रहाचा शोध लावला. त्याचा सातबारा शरद पवारांच्या नावे आहे म्हणे

श्रीगुरुजी's picture

20 Apr 2014 - 2:32 pm | श्रीगुरुजी

>>> काकासाहेब, विठ्ठ्लरावांचा पुणे आता रहिला नाही हेच खरे.

विठ्ठलराव, काकासाहेब नसले तरी माईसाहेब आणि त्यांचे यजमान नानासाहेब आहेत की! *YAHOO*

*LOL*

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Apr 2014 - 5:38 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बरोबर बोल्लास.अगदी सह-सरकार्यवाह शोभतोस हो!

श्रीगुरुजी's picture

20 Apr 2014 - 8:18 pm | श्रीगुरुजी

>>> बरोबर बोल्लास.अगदी सह-सरकार्यवाह शोभतोस हो!

सह-सरकार्यवाह म्हणजे काय हो सौ.माईसाहेब नानासाहेब कुरसुंदीकर-नेफळे?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Apr 2014 - 11:19 am | माईसाहेब कुरसूंदीकर

ईश्श ,हे काय विचारणे झाले हो गुरुजी? हे म्हणजे नरेंद्र मोदींनी "दंगल म्हणजे काय हो?" वा राष्ट्रवादीने 'भ्रष्ट्राचार म्हणजे काय हो?" विचारण्यासारखे झाले.
(स्तब्ध्)माई

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2014 - 12:30 pm | श्रीगुरुजी

>>> ईश्श ,हे काय विचारणे झाले हो गुरुजी?

नानासाहेब,

आता तुम्ही अय्या,ईश्श हे पण सुरू केलेलं दिसतंय. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळे तुम्हाला चांगलाच जोर आलेला दिसतोय! :yahoo:

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Apr 2014 - 2:35 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

नमोपुराण,गुजरात विकासाचे ढोल बडवणे ह्यातून आपण सर्वोच्च न्यायालयासाठी वेळ देता हे वाचून ह्यांना व मला आनंद वाटला.

माहितगार's picture

20 Apr 2014 - 2:49 pm | माहितगार

काइ राव, कै च्या कै चुकीच्या बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करतात आणि न झालेल्या गोष्टीवर आणि दिशाभूलवर आधारीत धागेचर्चा आम्हीपण उगाच कुटत बसतो की! तेवढ्या वेळा टाकीजात जाऊन एखादा पिक्चर पाहून झाला नसता का ? खाली पहा दै. सकाळने दिलेली खरी बरोबर बातमीचा अंश:

....जी बदनामी सुरू आहे ती चुकीची असून, त्यासाठीच मी हा खुलासा करीत आहे. मी स्वतः राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व अजित पवार यांचाच कार्यकर्ता आहे. पवार कुटुंबीयांनीच या परिसराचा विकास केलेला आहे व आमच्या गावातील पाण्याचा प्रश्‍नही पवार कुटुंबीयच सोडवू शकतील, असा आम्हाला विश्‍वास वाटतो....

संदर्भ : हेच आमचे नेते रविवार, 20 एप्रिल 2014 - 03:15 AM IST

अजून काय पुरावा पाहीजे. विरोधकांनी पसरवलेल्या असत्य अफवांवर विश्वास ठेऊ नये एवढपण कळत नाही बर पत्रकारांना. आणि तुम्ही वाचकहो धागा उघडून काय वाचताय, नसत्या प्रतिसादांचा रतीब काय घालताय. चला लागा आपापल्या कामाला.

प्रश्न विचारणारा जेन्युइन प्रश्न विचारतोयं. तिथे अंधार आहे त्यामुळे आवाजावरुन व्यक्तीवेध घ्यायला लागणार आहे (आणि त्याचाच फायदा मुजोर नेत्यानं उठवलायं). प्रश्न रिलेवंट आहे आणि अजितदादांनाच विचारलायं. ते प्रश्नकर्त्याला बाहेर काढा म्हणून फर्मावतायंत. सगळ्यांच्या दबावाखाली आल्यानं आणि एकटा पडल्यानं त्याला माघार घ्यावी लागलीये आणि तो "सॉरी दादा, सॉरी दादा" म्हणतोयं. अजित पवारांनी केवळ विडिओ क्लिअर नाही म्हणून तिथल्या इन्स्पेक्टरवर दबाव आणून मॅटर हश-अप केलंय. प्रचार सुप्रिया सुळेंचा आहे आणि अजित पवार उघड धमकी देतायंत. वर प्रतिसाद देणारे फक्त माहिती गोळा करण्यात प्रविण आहेत पण विचार करण्याची क्षमता शून्य दिसतेयं.

माहितगार's picture

21 Apr 2014 - 8:46 am | माहितगार

वर प्रतिसाद देणारे फक्त माहिती गोळा करण्यात प्रविण आहेत पण विचार करण्याची क्षमता शून्य दिसतेयं.

सं.क्षी., साक्षीदाराने पाठ फिरवल्यावर विचार करून उपयोग आहे का काही म्हणून बाकी उपरोधाने लिहिले, समझा करो.

या संकेतस्थळावर `अपराध सिद्ध झाला नाही तर नेता निर्दोष' अशी सर्रास विचारधारा आहे. साक्षिदार फिरल्यामुळेच मला उलगडा करावा लागला. ज्या प्रकारे प्रकरण दाबलंय त्यावरनं या नेत्यांची काय लायकी आहे त्याची झलक दिसते. उगीच नाही चिदंबरम मोदींना `एनकाऊंटर सीएम' म्हणाले. हे सत्तांध विरोध संपवूनच टाकतात आणि जनतेला वाटतं यांची `लाट आहे'! अजित पवारांचा आता चाललेला उदोउदो तेच दाखवतो.

माहितगार's picture

21 Apr 2014 - 11:06 am | माहितगार

अबकड असा आहे आणि हळक्षज्ञ तसा नाही असं काही खरच असतं का ? सत्तेच्या खुर्चीत बसल्यावर सारेच सारखे वागतात. हळक्षज्ञही सत्तेत पोहोचल्यावर बिघडतोच. संतसम म्हणून स्वप्रसिद्धी घडवणारेही तीथे पोहोचल्यावर तसेच वागतात. खरा डेबू तुरळक प्रमाणातच जन्मतो आणि प्रसिद्धी पासून दूर असतो.

जॉर्ज ऑर्वेल आणि व्यंकटेश माडगूळकरांनी प्राण्यांचे सत्तासंघर्ष त्यांच्या कादंबर्‍यातून चांगले मांडले आहेत. ते वाचल्यावर निसर्ग नियम लक्षात येतात. आमेरीकेत आणि इतर बर्‍याच देशात राजकारण्यांना अधिकतम वर्षांची सीमा दिली जाते, तेच बरे असे माझे मत. असो.

बाकी आपण जे कखगघनी टठडढबद्दल नकारात्मक विधान केल अस काही वर म्हटलत. टठडढबद्दल इतरत्र बरीच चर्चा चालू आहे पण कखगघच्या असे विधानकरण्या साठी लागणार्‍या नैतीक अधिकारा बद्दल साशंकताच आहे.

माहितगार's picture

21 Apr 2014 - 11:12 am | माहितगार

सं.क्षी. आणखी एक राजकारणाच/राजकारण्यांच विश्लेषण करताना घाई करायची नसते. सर्वसामान्य विचारक्षमतेच्या ते पार पलिकडे जाऊन विचार करू शकतात. खाली योगी९०० यांचा प्रतिसाद आला आहे तशा अनेक शक्यता पडताळाव्या लागतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Apr 2014 - 11:31 am | डॉ सुहास म्हात्रे

सोडून द्या हो माहितगार साहेब.

(१) सत्ताधारी पक्षाने आपल्या ताकदीच्या गैर उपयोगाने स्वतःचे एखादे प्रकरण दाबून टाकणे
आणि
(२) सत्ताधारी पक्षाने त्याच्या ताब्यात असलेल्या सर्व संस्थांच्या ताकदीनिशी एखाद्या विरोधी पक्ष/माणसाचा दशकापेक्षा जास्त पिच्छा पुरवूनही एकसुद्धा प्रकरण कोर्टात दाखल करण्याएवढाही पुरावा सापडू नये.

या दोघातला फरक कळायला कमीत कमी खालील दोन गोष्टी लागतात:

(१) स्वतःच्या डोळ्यावरचा (स्वतःचा किंवा बोलवत्या धन्याचा) एकांगी चष्मा काढून समतोलपणे विचार करणे
आणि
(२) "मी एकदा एखादी गोष्ट म्हटली म्हणजे तीच खरी. मला दुसर्‍याचे कोणतेही म्हणणे ऐकायची अजिबात गरज नाही. उलट माझ्या विरुद्ध मत असण्यार्‍या कोणाचाही उद्धट आणि असभ्य भाषेत उद्धार करण्याचा मला निसर्गदत्त अधिकार आहे" ही प्रवृत्ती टाळणे. (ही प्रवृत्ती काही वेळेस स्वतःच्या विचारसरणीमधील कमतरता उघड झाल्याच्या धसक्याने झालेल्या चिडचिडीमुळे प्रत्यक्षात आलेला "ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स" या उक्तीचा परिणाम असतो !).

या वरील दोन गोष्टी व्यवहारात आणू शकणार्‍यांशी खरा वादविवाद होऊ शकतो...

अन्यथा इल्लॉजिकल आर्ग्युमेंट्स / मुद्दे भरकटवणे / सोईचे मुद्दे फुगवून सांगणे आणि गैरसोईचे मुद्दे दुर्लक्षित करणे / प्रायव्हेट लॉजिक इत्यादीने भरलेला राजकीय वितंडवादच होतो. सद्या ही भारतात राजकारणाची प्रमूख युएसपी झाली आहे. राजकारणी अश्या "सो कॉल्ड विचारवंतांची" फौज पोसून स्वार्थ साधतात हा इतिहास आहे.

"मी समतोल विचार करतो" असा दावा करत त्याच्या बरोबर विरुद्ध वागणारे "चलाख" लोक जास्त धोकादायक कारण "माझेच खरे" हे सिद्ध करायला ते कोणत्याही टोकाला जायला कमी करत नाही... कधी कधी ते स्वतः ब्रेनवॉश झालेले असतात तर कधी कधी स्वार्थ साधण्यासाठी ते हेतुपुर्र्सर तसे वागतात. या सगळ्या प्रकारात वर वर सत्याचा उदोउदो करत प्रत्यक्षात सत्याचाच खून झाला तरी त्यांत त्यांची काही हरकत नसते. कारण त्यांना स्वार्थ साधण्यासाठी / इगोला कुरवाळण्यासाठी स्वतःचा मुद्दा जिंकणे सर्वात जास्त महत्वाचे असते.

पिशी अबोली's picture

21 Apr 2014 - 11:45 am | पिशी अबोली

एक एक वाक्य काय जबरदस्त लिहिलय!

पैसा's picture

21 Apr 2014 - 11:55 am | पैसा

तुम्ही कसला कसला अभ्यास केलाय हे एकदा सांगून टाकाच! :D

माहितगार's picture

21 Apr 2014 - 12:11 pm | माहितगार

ज्यांना खरेच धरावयास हवे, ते चांगल्या चांगल्यांच्या ताकास तूर लागू देत नाहीत (त्यांना धरण्याचा भारताच्या सर्वोच्चन्यायालया सारखा अथवा सोडण्याचा राष्ट्रपती सारखा अधिकार माझ्याकडे दोन्हीही नाही). मी बिचारा चुकल्या माकल्या मि.पा.वाचक आणि लेखकांची डोकी धरून खाजवण्या पलिकडे काही करू शकतो का ? :) काहीच नाही!, फक्त त्यांची माझे स्व:तचेच लेखन वाचणारी डोकी थोडे, मी स्वतः कमी लिहून सोडवू शकतो, त्यामुळे आपल्या सल्ल्याचा आदर राखून सारी डोकी सोडली :) (ह. घ्या. विनोदानेच लिहिलय)

बाकी आपला प्रतिसाद आवडलाही आणि पटलाही, प्रतिसाद एकदम इस्पीकचा एक्का झालाय. वैचारीक वाचूनही आपल्या "सोडून द्या हो माहितगार साहेब" मुळे जरा बरं आणि हलकं वाटल . भरपुर धन्यवाद.

संजय क्षीरसागर's picture

21 Apr 2014 - 12:30 pm | संजय क्षीरसागर

बोलवता धनी (माझा?), सत्याचा खून (बाप्रे!), आणि प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असतांना कोर्टात दाखल करण्यासाठी पुरावा नाही (?) म्हणणं! (आणि अशी भाषा वापरुन, वर `ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स' अशी शेरेबाजी!)

मला वाटतं चर्चा त्यांच्याशीच होऊ शकते जे लोकांची दिशाभूल करत नाहीत.

प्यारे१'s picture

21 Apr 2014 - 1:04 pm | प्यारे१

>>>मला वाटतं चर्चा त्यांच्याशीच होऊ शकते जे लोकांची दिशाभूल करत नाहीत.

तरीच बरेच जण गप्प बसतात हल्ली तुमच्याशी बोलताना संजूबाबा!

संजय क्षीरसागर's picture

21 Apr 2014 - 1:20 pm | संजय क्षीरसागर

आपल्याला (आणि मलाच) माहितीये .! तरी असू द्या, (उगीच तापल्या तव्यावर पोळी भाजायची सवय कधी जाणार कुणास ठाऊक. अर्थात तसा तवा गारच आहे म्हणा!) आणि आरत्यांनी होणारी दिशाभूल थांबल्यानं सध्या लिहायला काहीच उरलेलं नाही हे ही एक कारण आहेच.

प्यारे१'s picture

21 Apr 2014 - 1:42 pm | प्यारे१

लो कर लो बात!
आम्ही गप्प बसलोय कुठे? आम्ही तर बोलतोच आहोत. तुमचाच लेख आला नाही बर्‍याच दिवसात.
आरत्यांशिवाय बाकी विषयांबद्दल लिहीलेलं वाचता येत नाही का बाळ संजय तुला?
दोन चार आमच्या कुवतीची विडंबनं टाकली त्यावर प्रतिसाद पण आले.
तुझं आमच्याकडं नीट लक्ष नाहीये यार. असं नै कराचं बाबा. श्या!

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Apr 2014 - 2:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

जाउंद्या संजय सायेब ! मी काय म्हणायचे ते अगदी स्पष्ट लिहीले आहे. तरी ते तुम्हाला समजणे (किंवा समजून घेणं) जरा कठीणच आहे. अहो आम्ही पामर काय तुमच्यासारख्या सर्वज्ञानी माणसांना सांगणार ? शिवाय सढळ हाताने कडक भाषा / श्या वापरून बोलणार्‍या काही संताची परंपरा चालवत तुम्ही तुमची शब्दसुमने उधळत असता. आम्ही तेवढे पोहोचलेले नाही. तेव्हा जाऊच द्याना :)

स्वगत : मी माझा प्रतिसाद कोणाला दिला आहे हे काही जणांना कळायला कठीण जाईल असा संशय आल्यानेच मी तो मायन्यात खास नामनिर्देश करून लिहीला होता. तरीसुद्धा सद्य परिस्थिती जरा जास्तच कठीण असल्याची (परत एकदा) खात्री पटली. :)

प्यारे१'s picture

21 Apr 2014 - 2:05 pm | प्यारे१

>>>>> परिस्थिती जरा जास्तच कठीण असल्याची (परत एकदा) खात्री पटली. :)

बोले तो चेमिकल ;) लोचा क्या?

पण जनरली मेडिकेशन असतंय ना?

मायन्यात खास नामनिर्देश करून लिहीला होता.

सोडायला सांगीतल्यामुळे आम्ही सोडला, आपल्या निशाण्यावर कायपण नव्हत तरी बी गावलं ?

तसं आम्ही सोडलय बरीक त्यामुळे हे अवांतरः बाकी तो लोटपोट स्मायली कसा द्यायचा मिपातंत्र आम्ही अजून शिकलो नाही याचा खेद वाटला. कृ खरेच प्रगत स्मायली तंत्र दुवा द्यावा. हि नम्र विनंती

प्यारे१'s picture

21 Apr 2014 - 2:42 pm | प्यारे१

= ) ) हे तिन्ही स्पेस न दे ता लिहा. =))

माहितगार's picture

21 Apr 2014 - 2:52 pm | माहितगार

प्रशांत आवले साहेब लोटपोट स्मायली =)) तंत्र-ज्ञान देण्यासाठी अनेक धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Apr 2014 - 1:14 pm | अत्रुप्त आत्मा

हेच सर्व लोकांना कळण्यासाठी(तरी) ...एक्का काका..प्लीज त्या सुलतानची स्टोरी लिहा ना.."वाइट व्यवस्थेतली चांगली माणसं---सुलतान" असं काहितरी शिर्षक देऊन लिहा...प्लीज!

माहितगार's picture

21 Apr 2014 - 9:08 am | माहितगार

हा वर माझा इथला पहिलाच प्रतिसाद मी विचारकरूनच दिला तो पुन्हा एकदा खाली देतोय.

राजकीय आणि सहकारी संस्थातील पदावर कोणत्याही व्यक्तीस जास्तीत जास्त १० ( दुसर्‍या निवडणूकीत २/३ पेक्षा अधिक मते पडल्यास १५ वर्षे) निवडून येण्याची/राहण्याची मर्यादा हवी. मग ते कुणीही असू दे.

या निमीत्ताने धागा जाहीरात :
निवडणूक प्रक्रीयेतील (मला) अपेक्षीत बदल

निलरंजन's picture

20 Apr 2014 - 10:30 pm | निलरंजन

अजित दादाच आहेत ते
आणि सकाळ बद्दल बोलायचे तर त्यांच्या पेपरमध्ये त्यांची बदनामी कोण करील ते पण निवडणूका असताना?
दबाव प्रभाव वापरून हे प्रकरण मागे पाडले जाईल
बघत राहा...

संजय क्षीरसागर's picture

20 Apr 2014 - 10:40 pm | संजय क्षीरसागर
देव मासा's picture

21 Apr 2014 - 2:05 am | देव मासा

सिनेमात जे दाखवतात ते अगदीच काही खोटे नसते , हेच खरे करून दाखवले आहे त्या अजित ज्यादा पवारने

मदनबाण's picture

21 Apr 2014 - 6:53 am | मदनबाण

सत्तेची मस्ती अजुन काय ? धरणात काय मुतायचं का ? असा निर्लज्य प्रश्न विचारणारे हेच "दादा" बरं का !

सुनील's picture

21 Apr 2014 - 9:58 am | सुनील

बीड महाराष्ट्रात येते की बिहारात?

http://www.loksatta.com/maharashtra-news/bjp-supporters-grabs-polling-st...

आजानुकर्ण's picture

21 Apr 2014 - 7:53 pm | आजानुकर्ण

बीड रामराज्यात येत असावे.

योगी९००'s picture

21 Apr 2014 - 10:56 am | योगी९००

एक शक्यता...

कदाचित अजितदादांनी मुद्दाम सुद्धा असे म्हटंले असेल ज्यामुळे सुप्रियाताई बदनाम व्हाव्यात. नाहीतरी पुढे मागे हा पक्ष कोण चालवणार हे अजून निश्चित नाही त्यामुळे दादा आत्तापासूनच तयारी करत असावेत.

माहितगार's picture

21 Apr 2014 - 11:13 am | माहितगार

राजकारणात काहीही अशक्य नाही.

अर्थात राजकारण एवढ्यावरच असेल अस नाही डावपेच त्या पलिकडचेही असू शकतात

म्हणजे यापूर्वीचा प्रतिसाद सुद्धा (' उपरोध असेल असं वाटलं होतं पण प्रकरण गंभीर आहे') त्यावर आलेल्या प्रतिसादाला होता पण त्यातल्या एका वाक्यनं बहुदा नेम साधला.

असो, भाषा कुणाची कशी आहे ते प्रतिसाद सांगतायंत त्यामुळे वेगळं काही लिहायला नको.

एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की प्रतिवाद करायला जागा उरली नाही की दुसर्‍याला `इगोइस्ट' म्हणणं ही जुनी फॅशन आहे (पण गोष्ट इतकी उघड असते की आता त्याची सवय झाली आहे!)

मोदींनी `आपकी अदालत' वरची स्वतःची मुलाखत पूर्णपणे फिक्स करुन स्वतःची प्रतिमा उजळवण्याचा लाजिरवाणा प्रकार केला आणि जनतेला उल्लू बनवलं. त्यावरनं त्यांची मानसिकता दिसून येते त्यासाठी कोर्टात जाण्याची गरज नाही.

ते स्वतःच स्वतःला अपराधी समजतात आणि सरळ प्रश्नांना सामोरे जातांना त्यांचा चेहेरा, त्यांची बिघडलेली मनस्थिती दर्शवतो. ज्याला स्वतःच्या निर्णयावर विश्वास आहे आणि ज्यानं कोणताही अपराध केला नाही तो कदापिही अस्वस्थ होणार नाही. त्यांनी अशा प्रकारे सरळ स्टुडिओ सोडून जाणं सगळं सांगून जातं...

अर्थात, त्रयस्थपणे परिस्थितीकडे पाहणार्‍याला ते उघड दिसेल आणि ज्याला एनकेन प्रकारे बाजूच सावरायचीये तो म्हणेल `सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ द्या; आम्ही न्यायसंस्थेवर विश्वास ठेवतो' पण It indicates only one thing, he is a liar.

माहितगार's picture

21 Apr 2014 - 6:33 pm | माहितगार

सं.क्षी. तुमचं हे सगळ चालू द्या. (मी वेगळ काही विचारू इच्छितोय.) तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही चक्क चा.अ. (सीए) आहात असं लिहिलय, खरचं ग्रेट हं ! जरा एक सदस्य मदनबाण यांनी दुसर्‍या धाग्यावर http://www.misalpav.com/comment/574210#comment-574210 इथे त्यांचा अवांतर प्रश्न विचारलाय तो इथेही अवांतरच आहे.

राजकारणी संपत्ती जाहिर करतात, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे यांच्या स्वतःच्या नावावर कुठलेही {४ चाकी} वाहन नसते.असे का ?

संदर्भ: म.बां.चा मलाही पडलेला प्रश्न

तुमच्या सारख्या ज्ञानी व्यक्तीकडून जरा अकाऊंटींगच्या अंगाने समजावून सांगाना.

- राजकारणातल अकाऊंटीग आणि काऊंटींग न कळणारा माहितगार