मतदान---शंभर टक्के

निलरंजन's picture
निलरंजन in काथ्याकूट
18 Apr 2014 - 8:54 pm
गाभा: 

भारत देश म्हणजे गेली साठ वर्षे मानाने संसदीय लोकशाही राबविणारा देश , देशाला आपल्या लोकशाही चा सार्थ अभिमान
लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले राज्य वा देश पण इतके असूनही देशाला अजूनही निवडून आलेला प्रतिनिधी शंभर टक्के लोकांनी निवडलेला नाही

नक्की होतेय काय ?

कशी होईन समर्थ लोकशाही?

मतदान सक्तीचे करावे का?

लोकांना मतदानासाठी खेचून आणण्यामधे नेते कमी पडतात का?

मतदान केंद्रावर पोहचायाची व्यवस्था नक्की कुणी करायची?

निवडणूक आयोगाने नक्की काय करावे म्हणजे शंभर टक्के मतदान होईल आणि सुदृढ सशक्त लोकशाही अस्तित्वास येईल?

तुमचे प्रत्येक प्रामाणीक प्रतिसाद मिळवून देईल देशाला महान
मग तुमचा प्रतिसाद नक्की नोंदवा

प्रतिक्रिया

साती's picture

18 Apr 2014 - 9:46 pm | साती

मतदान सक्तीचे नाही तर स्वेच्छेचे व्हायला हवे.
बाकी चर्चा या त्या धाग्यावर हल्लीच। झालीच आहे.

निलरंजन's picture

20 Apr 2014 - 10:22 pm | निलरंजन

पण जर मतदान सक्ती चे केले आणि मतदानात आधुनीक तंञज्ञान वापरले जस की ऑनलाईन वोटिंग तर काय हरकत हे?

पैसा's picture

21 Apr 2014 - 10:48 am | पैसा

१००% मतदारांना मतदानाचा हक्क मिळवून द्या. मग १००% मतदानाचे पाहता येईल.

ऋषिकेश's picture

21 Apr 2014 - 11:40 am | ऋषिकेश

मतदान हे ऐच्छिकच हवे.
ज्यांना स्वतःचे मत नाही किंवा देऊ इच्छित नाहीत त्यांनी मतदान न करणे योग्यच आहे. मतदान न करणे म्हणजे इतरांनी निवडलेल्या नेतृत्त्वाला दिलेली ब्लँकेट मान्यता झाली. ती ज्यांना द्यायची आहे त्यांना त्यापासून का रोखावे?