खालील विषयांवर निश्चित अशी माहिती कुणाकडे असल्यास हवी आहे.
सहसा बिल्डर गाळा धारकाना पार्किंग वाटून देतो. यात स्टिल्ट खाली पार्किंग हवे असेल तर काही पैसे आपल्या करारात न दाखवता रोखीने घेतो. नंतर काही काळाने इमारतीचे खरेदी खत करून सहकारी गृहरचना संस्था स्थापन केली जाते. काही कालाने दुचाक्यांची संस्ख्या वाढते .अशी वेळ आल्यास चारचाकी बाहेर हकलण्याचे दडपण जनरल बॉडीचा ठराव करून किंवा अनधिकृत्त पणे धमकी वगैरे देऊन आणण्यात येते. अशा स्थितीत बिल्डरने केलेले वाटप वा जनरल बॉडीने केलेला ठराव यात
कायदेशीरित्या महत्ता कोणाची.(who supercedes whom ? )
एखाद्या सहकारी संस्थेत गाळा मूल मालकाने वापरावा असा नियम आहे. अपरिहार्य कारणासाठी हा गाळा दुसर्यास भाड्याने देण्याची परवानगी सचिवाकडून मिळाल्याखेरीज गाळा भाड्याने देता येत नाही. आता प्रश्न असा आहे की सचिव जनरल बॉडीच्या एखाद्या ठरावाचा आधार घेऊन अशी परवानगी नाकारू शकतो का ? समजा जनरल बॉडीने असा ठराव केला की जागा भाड्याने देताना भाडेकरू विशीष्ट धर्माचा, कुटुंब असलेला, शाकाहारी असा असला पाहिजे तर असा ठराव राज्यघटनेच्या कोणत्यातरी मूलभूत अधिकारावर गदा आणणारा म्हणून बहुमताने संमत झालेला असेल तरीही बेकायदेशीर ठरवता येईल काय ?
प्रतिक्रिया
15 Apr 2014 - 8:32 pm | पैसा
मला पण याबद्दल माहिती पाहिजे. पार्किंग बिल्डरकडून विकत घेतले असेल तर सोसायटी गाडी बाहेर ठेवा म्हणून कसे सांगू शकेल?
सहकारी सोसायटीमधे आपण शेअर होल्डर असतो आणि गाळ्याची मालक सोसायटी असते त्यामुळे भाड्याने द्यायला नकार देऊ शकेल असे वाटते. (पण नियम माहिती नाही.) तसेच भाडेकरूबद्दल अटी घालायचेही कारण नाही. कारण आपल्या फ्लॅटमधे काय चालते याच्याशी इतर फ्लॅटधारकांचा काही संबंध नाही. (काहीतरी बेकायदेशीर कृत्य सोडून)
15 Apr 2014 - 8:43 pm | ज्ञानव
नाही असा नियम आहे. पण सहकारी संस्था होण्याआधी आपण एकमेकांना ओळखत नसल्याने आणि बिल्डर विकतच घ्या म्हणून आग्रही असल्याने आपण पार्किंग विकत घेतो. सहकारी संस्थेत गाडीधारक जर कमी असतील तर जे गाडी धारक नाहीत ते कशाला कोर्टात जाणार आणि जर गाडी धारक जास्त असतील तर त्यांनी आधीच बिल्डरला पैसे देऊन जागा विकत घेतली असल्याने आणि त्यांची संख्या जास्त असल्याने ते एकमेकांना सांभाळून घेतातच ह्या "सिस्टीम"मुळे बिल्डरचे फावते. आमच्या इथे एका सदनिका धारकाने पावसाळ्यात दुसर्याच्या पार्किंग मध्ये गाडी लाऊन त्याला सांगितले कि तू बिल्डरकडून पार्किंग विकत घेतले आहेस सोसायटीकडून नाही जास्त बडबड केलीस तर गाडी फोडून ठेवीन. पण ह्या दादागीरीत गाळाधारक भरडला जातो.
भाडे तत्वाने घर देताना सदर सहकारी संस्थेची नियमावली काय सांगते त्यानुसार वागावे लागते.
पण शाकाहारी किंवा जातीबाबत आग्रही सचिव किंवा बॉडी ह्याविरुद्ध सहकार आयुक्तांकडे तक्रार करता येते.
15 Apr 2014 - 10:58 pm | काळा पहाड
म्हणजे पहिल्या बाबतीत हा माणूस नियम सांगतोय. आणि फोडण्याबाबतीत हा गुन्हा आहे आणि पहिल्या नियमभंगापेक्षा जास्त वाईट प्रकार आहे हे त्याच्या गावीही नाही की काय? काहीही बोलायला स्वतःला काय "जाणता राजा" समजतोय की काय?
16 Apr 2014 - 9:12 am | ज्ञानव
इतका विचार तुम्ही आम्ही करणार. ते लोक कृती करताना येनकेन प्रकारेण फक्त स्वार्थ साधणे जाणतात.
15 Apr 2014 - 8:49 pm | रामपुरी
बिल्डर पार्कींग, सामायिक टेरेस इत्यादी गोष्टी विकू शकत नाही. ही गोष्ट मुळातच अनधिकॄत आहे. त्यामुळे सोसायटी 'गाडी बाहेर ठेवा' म्हणून सांगू शकते. बिल्डरने पार्कींगचे वाटप केले असेल (सर्वांसाठी) आणि त्याची नोंद तुमच्या खरेदी पत्रात असेल तर गोष्ट वेगळी.
सोसायटी भाडेकरूबद्दल अटी घालू शकते परंतु विशिष्ट धर्माची अट 'कायदेशीररित्या' घालू शकणार नाही. पण इतर सदस्य वेगळ्या प्रकारे दबाव आणणे वगैरे गोष्टी करू शकतील. त्याला कसे तोंड द्यायचे हा वैयक्तिक प्रश्न आहे.
मुळात इमारत आणि ती बांधलेली जागा ही सोसायटीच्या मालकीची असते. फ्लॅटधारक हा भागधारक असतो. त्यामुळे सोसायटीला बरेच अधिकार असतात. म्हणून बरेच बिल्डर लवकर सोसायटी करत नाहीत ज्यायोगे त्या जमिनीवर अजून बांधकाम करण्याचे अधिकार बिल्डरकडे राहतील (अर्थात मोकळी जागा असेल तर). एकदा सोसायटी झाली की बिल्डरचा अधिकार संपतो.
15 Apr 2014 - 10:11 pm | खटपट्या
कायद्याने बिल्डर पार्किंग विकू शकत नाही. पण कायद्याला फाट्यावर मारून बिल्डर विकतात. आपणास कायदा माहित असूनही आपण पार्किंग विकत घेतो.
पार्किंग विकत घेतल्यावर आपल्याला त्याचे वेगळे अग्रीमेंट मिळते.
सोसायटी ला गरज वाटल्यास सोसायटी विकलेले पार्किंग ताब्यात घेवू शकते. पण असे करताना सोसायटी ने पार्किंग धारकाला त्याने बिल्डर ला दिलेले पैसे परत करावेत.(हा एक पर्याय आहे) जेणे करून कोणाचाही तोटा होणार नाही. आणि मग सोसायटी ठराव पास करून त्या पार्किग चे काय करायचे ते ठरवू शकते.
आत यात कळीचा मुद्दा हा कि जांच्या कडे गाड्या नाहीत त्यांच्या कपाळावर आठ्या येतात कारण त्यांचे पैसे यात वापरले जाणार असतात.
सर्व समजून घेणारे असतील तर यावर तोडगा निघू शकतो. केवळ कायदे आणि नियमावर बोट ठेवले तर खूप कठीण होते.
मला याचा अतिशय बेकार अनुभव आला आहे.
16 Apr 2014 - 8:10 am | कंजूस
एक अनुत्तरीत प्रश्न ज्याचे उत्तर २५ वर्षाँत मिळवून देण्यासाठी दोन्हीकडचे वकील भरपूर कमावतात .
17 Apr 2014 - 3:13 pm | प्रमोद देर्देकर
पुर्वी सोसायटीच्या प्रश्नांबाबत शंका निरसन करण्याबाबत महराष्ट्र टाईम्समध्ये अॅड. राजीव वाघ , ज्येष्ठ वकील यांचे एक चांगले सदर दर सोमवरी किंवा मंगळवारी येत असे. त्यामध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तरे देतात खालील उतारा मी तुम्हाला देतोय तो तुम्हाला उपयोगी पडतोय का ते पहावे.
प्रश्नः- आमच्या कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीतील एका फ्लॅटमालकाने स्वतःचा फ्लॅट व कार पार्किंगची जागा सोसायटीची परवानगी न घेता परस्पर भाड्याने(लिव्ह लायसन्स)दिली आहे.सोसायटीच्या इतर सदस्यांच्या गाड्या रस्त्यावर उभ्या राहत असताना लिव्ह लायसन्सधारक हा फ्लॅटमालकाच्या गाडीच्या जागी स्वतःची गाडी उभी करू शकतो काय? याबाबत कायदा काय आहे? सोसायटी याबाबत सदर फ्लॅटमालकावर काय कारवाई करू शकते?
उत्तरः- उत्तरः तुमच्या प्रश्नाचे दोन भाग होतात, त्याअनुसार उत्तर देऊ . सोसायटीच्या ज्या सभासदाला आपला फ्लॅट आणि वाहन ठेवण्याची जागा(पार्किंग स्पेस) ही लीव्ह अॅण्ड लायसन्स तत्त्वावर भाड्याने द्यावयाची असेल त्याने सोसायटीकडे ठराविक नमुन्यात(प्रिस्क्राइब्ड फॉर्म)अर्ज सादर करून प्रस्तावित भाडेकरूला सोसायटीचा नाममात्र
सदस्य(नॉमिनल मेंबर)बनवावे लागते. त्याला (फ्लॅटमालकाला) सोसायटीचे मासिक देखभाल शुल्क(मेन्टेनन्स चार्जेस)तर भरावे लागतेच, शिवाय कायद्याने वेळोवेळी ठरतील त्यानुसार फ्लॅटमध्ये स्वतः राहत नसल्याबद्दलचे शुल्क म्हणजे 'नॉन ऑक्युपेशन चार्जेस' सोसायटीला द्यावे लागतात. उपलब्ध असलेले 'पार्किंग स्पेसेस' सोसायटीने सहकार कायद्यातील बाय लॉज अनुसार सभासदांना वितरित करावयाचे असतात. तुम्ही ज्या सदस्याचा उल्लेख केला आहे त्याला पार्किंग स्पेस मिळालेली(अॅलॉट झालेली) असेल तर तो आपला फ्लॅट आणि पार्किंग स्पेसही भाड्याने देऊ शकतो. सोसायटीच्या काही सभासदांकडे पार्किंग स्पेस नाही याचा इथे काही संबंध नाही. मुंबईसारख्या शहरात हाउसिंग सोसायट्यांमध्ये उपलब्ध पार्किंग स्लॉट्सपेक्षा मोटारींची संख्या अधिक असणे ही काही असाधारण गोष्ट नाही .
17 Apr 2014 - 4:37 pm | मनीषा
सोसायटी अजून कागदोपत्री फॉर्म झाली नसेल तर पार्कींग खाजगी मालकीचे असू शकते ना ?
कारण आम्ही घर घेताना पार्कींग चे वेगळे पैसे दिले होते पण तरीही वाहने लावण्यावरुन खूप मनस्ताप झाला आहे.
17 Apr 2014 - 5:58 pm | चौकटराजा
सुप्रीम कोर्टाच्या एका निकालानुसार बिल्डरला फ्लॅट खेरीज कोणताही तुकडा खरेदीदाराला विकायला बंदी आहे. सबब यापूर्वी ज्यानी पार्किंगसाठी पैसे भरले असतील त्यांचे पैसे बुडाले आहेत असे नक्की समजावे.श्री सुरेश मेहता विरूद्ध टाटा हौसिंग डेव्हलपमेट कंपनी या खटल्यात बिल्डरला रू ५०००० च्या रिफंड सकट रू २०००० ची नुकसान भरपाई श्री मेहताना द्यावी लागली आहे. त्यासाठी आता त्या निकालाचा परिणाम म्हणून आता बिल्डर सर्व खरेदीदारांसाठी पार्किंगची सोय आहे असाच प्लॅन पास करून घेतात. किमान काही काळ तरी बिल्डर व नंतरच्या काळात सोसायटीची वादावादीतून मुक्तता होते. अशा पार्किगला अलॉटेड पार्किग म्हणतात ते खरेदी केलेले पार्किग असत नाही.
अलीकडे क्लब हाउस , जिम्नाशियम यासाठी रोख पैसे घेतले जातात. त्यांचा करारात समावेश केला जात नाही.कारण ते
"फ्लॅट" च्या व्याख्येत बसत नाहीत.
जरच एखाद्या बिल्डरने असा प्लॅन पास करून घेतला की ज्यात " फ्लॅट" खरेदी करारातच पर्किंग धरले आहे व बाग धरली आहे ज्या बागेला वा पार्किगला दुसरा दरवाजा नाही, तर पार्किग गाळ्याचाच भाग होते. हे खरे खाजगी पार्किग. ( ते ५०००० रुपयात अर्थात मिळत नाही. ते एकूण बांधकाम क्षेत्रात धरले जाते. सहसा कोणी असे पार्किंग घेत नाही व बिल्डर असा प्लान ही पास करून घेत नाही. ) हेच तत्व टेरेसला लागू होत असल्याने आपला जर टेरेस फ्लॅट असेल तर त्याला स्वतंत्र दरवाजा नसतो. पूर्वी काही बिल्डरनी वरच्या टेरेसचा काही भाग एखाद्या सदस्याला विकला असेल तर तो सोसायटी आपल्या ताब्यात घेऊ शकते. कारण तो सोसायटीच्या "कॉमन एरिया" यात मोड्तो.