मिपा वर सध्या अनुभवांचे पेव फुटले आहे. तेव्हा माझाही एक अनुभव .. मिपा वर माझे हे पहीलेच लेखन आहे तेव्हा चु.भु.दे. घे. :-)
मिपा वर फिरता फिरता असाच एक कौल दिसला. "मिपा चे सद्स्य किति ट्क्के भ्रष्टाचार विरोधि आसतिल". कुणाचीही प्रतीक्रिया नसनारा अन एकुन ५ मते मिळालेला तो कौल साधारण कुनी मनावर घेतल्याचे दिसले नाही. भ्रष्टाचार हा सर्वांचाच एकंदर जिव्हाळ्याचा विषय आणी रोजच्या जिवनाचा अविभाज्य घटक. भ्रष्टाचार हा कायद्याने गुन्हा आहे या वाक्याला आमच्या घरातले उंदिर सुध्धा घाबरत नाहीत. भ्रष्टाचाराच्या बाबतीत मी तसा जहाल मतवादी. या विषयावर मिपा सारख्या ठीकानी होणारे दुर्ल़क्ष थोडे खटकले.
हा किस्सा साधारण ९ वर्षापुर्वीचा... खरगपुरला शिकत असताना दसर्याच्या सुटीत सर्व मित्र मंडळी घरी परत येत होतो. काही कारनामुळे मला हावडा मेल चे नाशिक पर्यत चे तिकीट मिळाले नाही म्हनून भुसावळ पर्यंत चे तिकिट काढले. गाडीतच टी. सी. कडुन तिकिट वाढवुन घेवु हा विचार करुन मित्रांबरोबर गाडीत बसलो. मित्रांबरोबर गप्पा करत करत दिवस संपला आनि रात्री १२ च्या सुमारास गाडी भुसावळ च्या जवळ आली. टी. सी. नं तिकीट वाढवण्याची तयारी दाखवली पन ५० रुपये लाच म्हनून मागीतले. ५० रुपयाच्या तिकिटासाठी ५० रुपयांची लाच मागताना शरमेचा लवलेशही त्याच्या चेहेर्यावर दिसत नव्हता. उलट "मै हुं इसिलिये दे रहा हूं, वरना हम ऐसा नही करते" वगेरे उपकाराची दोन वाक्ये त्याने ऐकवली. नड्लेल्या नाडनं हा त्याचा धर्म, त्या धर्मालाच तो जागत होता. भुसावळ हुन पुढची गाडी २ तासांनी होती. २ तास तरी स्टेशन वर कुड्कुड्त थांबावं लागनार होतं आणी म्हनुनच तो लाच मागत होता. शब्दानं शब्द वाढला आनी "भाईसाब टिकट चाहीये तो बोलीये नही तो उतर जाईये. मेरा टाइम बरबाद मत किजीये. जैसा रुल है वैसा मैने मांगा" वगेरे बोलायला लागला. माझे मित्र ही "जाउ दे कशाला उगाच त्रास" म्हनुन मला समजवु लागले. संतापात मी लाच देउन तिकीट न काढण्याचा निर्णय घेतला. मित्र दचकुन "काय वेड लागलय का?" म्हणत माझ्याकडे बघू लागले आनी टी. सी. "जैसी आपकि मर्जी" म्हनत माझ्याकडे तुछतेने पहात निघुन गेला. पळत जाउन तिकीट काढुन परत गाडीत बसनं अशक्य होतं म्हनुन मी भुसावळ ला उतरलो अन पुढचे तीन तास थंडीत कुडकुडत त्या कुबट वातावरणात घालवले. ३ तासांनी कुठ्लीशी गाडी आली आनी मी जनरल बोगीत बसुन नाशिकला पोहोचलो.
हा सगळा किस्सा माझ्या मित्रमंडळीत बरेच दिवस चेष्टेचा विषय होता. "साधा विचार करायचास वेड्या, ३ तास थंडीत बसलास अन जनरल बोगीतुन आलास. वेळ गेला , त्रास झाला तो वेगळा. दिले असते ५० रुपये तर आरामात आला असता" वगेरे व्यवहार ज्ञानचे बोल मला बरेच दिवस ऐकावे लागले. नंतर विचार केला, आजकाल प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार गुन्हा आहे, लाच देनारा आनी घेनारा दोन्ही गुन्हेगार असतात हे सर्वांना माहीत असतानाही केवळ आपल्या सोयीसाठी हा गुन्हा का करतो? स्वत: च्या फायद्यासाठी भ्रष्टाचाराचे समर्थन आपन का करतो? सरकार कहीच करत नाही असे म्हनत सरकारच्या नावाने गळे काढताना आपनच भ्रष्टाचाराला खतपानी घालतो याचा आपल्याला विसर का पडावा?
तेव्हापासुन मी ठरवले "लाच म्हनुन देनार नाही". कुनी काही कामासाठी पैसे मागीतले की मी सरळ नाही म्हनुन सांगतो. लोक चमत्कारीक नजरेने माझ्याकडे पाहतात. हसतात. पन मी समाधानी आहे. भ्रष्टाचाराच्या भस्मासुराला थोडा का होइना अटकाव केल्याचे समधान आहे. तुम्हाला काय वाटते?
सुक्या (बोंबील)
प्रतिक्रिया
8 Oct 2008 - 1:13 pm | मराठी_माणूस
पळत जाउन तिकीट काढुन परत गाडीत बसनं अशक्य होतं म्हनुन मी भुसावळ ला उतरलो अन पुढचे तीन तास थंडीत कुडकुडत त्या कुबट वातावरणात घालवले
अत्यंत कौतुकास्पद आणि धडसि निर्णय. त्या बद्दल तुमचे अभिनंदन
हा सगळा किस्सा माझ्या मित्रमंडळीत बरेच दिवस चेष्टेचा विषय होता.
दर्शनी जरि त्यांनी चेष्टा केली असलि तरि मनात तुमच्या बद्दल आदर निर्माण झाला असेल.
8 Oct 2008 - 2:08 pm | mina
सुक्या (बोंबील) आपल्याला यकदम पटलं राव तुमचं तत्त्व ! व्वा ..माणुस याला म्हणावं.आपल्या भारताला लागलेली भ्रष्टाचार ही किड आहे. वाळवी सारखं भारताला पोखरुन टाकणारा हा भ्रष्टाचाराचा किडा पायाखाली तुडवुन काढला पाहीजे.या भ्रष्टाचारामुळेच आज हजारों तरुण बेरोजगाराचे चटके खात आहेत. हे सत्य नाकारता येणार नाही.
9 Oct 2008 - 5:14 am | सुक्या
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
आपल्या भारताला लागलेली भ्रष्टाचार ही किड आहे या तुमच्या मताशी मी सहमत आहे. भ्रष्टाचारामुळे जेव्हा गरजु / गरीब लोकांना डावलुन इतरांना काही गोष्टींचा लाभ दिला जातो हे पाहीले की या भस्मासुराच्या तिव्रतेची जानीव होते.
अगदी मॄत्युचा दाखला घेताना सुद्दा लाच मागितली जाते. मरणा नन्तर ही याचा पिछा सुटत नाही हेच खरे.
सुक्या (बोंबील)
8 Oct 2008 - 11:36 pm | भास्कर केन्डे
असे म्हणतात की सर्वात भयानक वेदना असतात त्या प्रसुतीच्या. जर आपल्याला भ्रष्टाचार मुक्त समाज पाहिजे असेल तर या अशा प्रसुती वेदनेतून प्रत्येकाला जावेच लागेल. तरच हा भयंकर प्रकार थांबेल.
आपल्या भावना पोचल्या.
माझा अनुभवः
वाहन चालवण्याचा परवाना घेण्यासाठी मी कुठल्याही दलालाला नेमले नाही. अर्ज घेतला व खिडकी समोर रांगेत थांबलो. दोन आडीच तासांनी माझा नंबर लागला. माझा अर्ज दलालांनी भरलेला नसल्याने आरटीओ कार्याकयातल्या भडव्यांना त्यांचा वाटा मिळणारा नव्हता. त्यांच्या पै़कीच हा खिडकीत बसलेला कारकून. त्याने माझ्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला. प्रयत्न करूनही अर्जात काही सापडले नाही तेव्हा अर्ज स्वतःपाशी ठेऊन म्हणाला उद्या ये. पण मलाच एकट्याला का? असो.
तो उद्या ननव्या चकरेला उजाडला. त्यानंतर तशा तीन आणखी खिडक्या व त्या नंतर वाहन चालवण्याची परिक्षा. माझी एकट्याचीच परिक्षा झाली. बाकी सर्वांना केवळ "गाडी चालवता येते ना" असे जुजबी विचारले जात होते.
त्यानंतर पुन्हा चार चकरा मारल्यावर मला माझा परवाना मिळाला... दोन पानांचा... अगदी रजिस्टर मध्ये ठेवण्याजोगा आकार... फुल पेज साईझ... बाकी सर्वांना मात्र खिशात बसणारी पुस्तिका मिळाली. मित्र वर्गात खूप हशा झाला.
तो परवाना इतके वर्षे झाले तरी मी जतन करुन ठेवला आहे... माझ्या संकल्पांचा विजय म्हणून! त्याकडे पाहून लाच न देण्या-घेण्याच्या माझ्या संकल्पाला आणखीच बळ येते.
अर्थात तो परवाना अमेरिकेतल्या पोलिसाने पाहिल्यावर भारत हा थर्ड-वर्ल्ड देश आहे हे त्याचे मत पक्के न झाले तर नवलच!
आपला,
(भ्रष्टाचार विरोधि) भास्कर
आम्ही येथे वसतो.
9 Oct 2008 - 5:27 am | सुक्या
तुमची प्रतिक्रिया वाचल्यावर अंगावर मुठभर मांस चढल्यासारखं झालं. तुमच्यासारखी ध्येयवेडी माणसे भेटली की माझ्याही निर्धार अजुन पक्का होतो. तुमच्याही संकल्पांचा असाच विजय होत राहो ही विजयादशमीच्या निमित्ताने शुभेच्छा!
सुक्या (बोंबील)
8 Oct 2008 - 11:45 pm | नारायणी
माझी एकट्याचीच परिक्षा झाली. बाकी सर्वांना केवळ "गाडी चालवता येते ना" असे जुजबी विचारले जात होते>>> भारतात असंही होतं? मी तर कार चालवुन दाखवली होती. त्यानंतरचं परवाना मिळाला होत. आश्चर्य आहे.
8 Oct 2008 - 11:51 pm | चतुरंग
एवढंच काय, तुमची आर्.टी.ओ. मधे वरती ओळख असेल तर टेस्ट वगैरे राहूदे इन्स्पेक्टरचं तोंडही न बघता घरपोच परवाना मिळतो हे मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे! आता संगणकीकरणामुळे बराच आळा बसलाय असे समजते.
चतुरंग
9 Oct 2008 - 12:31 am | भास्कर केन्डे
येथे अमेरिकेत बसून भारतातला वाहन परवाना मिळवला एका पठ्ठ्याने. येथे परिक्षा पास होत नव्हता. गाडी घेतल्याविना भागवता येत नव्हते... तेव्हा केले हे दिव्य.
मी म्हटले की अरे बाबा त्यावर असलेल्या तारिखेला तर तू येथे होतास हे एखाद्या पोलिसाच्या लक्षात आले तर? तो म्हणतो कसा,"आपल्याला काय येडा समजला का काय? भारतात सुट्टीला गेलो होतो त्या बॅक डेटवर मॅनेज केलय. आहेस कुठं?"
काय बोलणार... कप्पाळ!
आपला,
(अचंबित) भास्कर
आम्ही येथे वसतो.
9 Oct 2008 - 12:33 am | चतुरंग
मुळात स्मार्टच असतो नाही! ;)
चतुरंग
9 Oct 2008 - 5:28 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
9 Oct 2008 - 11:04 am | मराठी_माणूस
तो अमेरिकेत परीक्षा पास होत नव्हता आणि त्याने तीथे बसुन भारताचा परवाना मिळवला आणि गाडी वापरणे चालु केले असेल तर अमेरीकेतील व्यवस्था वेगळ्या तर्हेने मॅनेज करण्या सारखेच आहे.