थोर धर्मनिरपेक्ष समाजवादी नेते मुलायम सिन्ग यादव यांनी अत्यंत संतापजनक वक्तव्य केले. शक्ती मिल परिसरातील बलात्काराचा आरोप असणार्या बहुतेक आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली. त्या पार्श्वभूमीवर सिंग साहेबांनी अशी मुक्ताफळे उधळली की लडके तो लडके है. ऐसी गलतियां हो जाती है. उनके लिये फासी की सजा गलत है.
अर्थात अशा चुका मुलांकडून होतातच. त्याकरता फाशी देणे चूक आहे.
हे असले विचार करताना त्या मुलीचे आयुष्य विनाकारण उध्वस्त झाले आहे वगैरे विचार का नाही झाला ते कळले नाही. अत्याचार झालेली मुलगी कुणाची तरी कन्या, सून, बायको, प्रेमिका, आई असू शकते आणि त्या लोकांवर काय प्रसंग गुदरला असेल असा विचारही ह्या थोर समाजवाद्याने केल्याचे जाणवत नाही.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असले ज्वालाग्राही विचार एका अनुभवी राजकारण्याने का मांडले असावेत?
मला सुचणारे एकमेव कारण म्हणजे फाशीची शिक्षा सुनावले गेलेले सगळे लोक मुसलमान होते हेच. त्यांना फाशी होणार ह्या विचाराने मुलायमजींचे मृदू मन व्याकुळ झाले आणि त्यातून हे उद्भवले असावे. दिल्लीत निर्भया प्रकरणी संबंधित आरोपींना फाशी सुनावली गेली तेव्हा मुलायमजींना दयेचा असा पान्हा फुटल्याचे स्मरत नाही. असे करुन आपण मुसलमानांचे तारणहार आहोत ह्या मुद्दावर शिक्कामोर्तब होईल असा काही हिशेब असावा.
आपले काय मत?
प्रतिक्रिया
14 Apr 2014 - 3:18 am | खटपट्या
याच्यावर कडी अबू आझमी ने केलीय
14 Apr 2014 - 4:48 am | आत्मशून्य
अन त्यासाठी त्याने तर कुठल्या धार्मीक कायद्याचा हवाला की काय सुधा दिलाय बहुदा ... म्हणे पिडीत व्यक्तीलाही फाशी दिली पाहीजे. कहर आहे.
अवांतरः- एका पक्षाच्या आमदाराने त्याला एका वेगळ्या कारणासाठी मुस्काडात मारलीच होती... कमी पडली म्हणायला हवे. यांची नेते म्हणवुन घ्यायची लायकी आहे ?
14 Apr 2014 - 4:53 am | स्पंदना
पिडीत व्यक्तीला फाशी हा सरळ सरळ इस्लामी कायदा आहे. त्यांच्यामते ज्या स्त्रीवर बलात्कार होतो तीच अपराधी असते. कारण त्या योगे तिने माहीत नसलेल्या व्यक्तीशी शारिरीक संबंध केले. अस काहीतरी मला सरळ सांगतासुद्धा येत नाही असला कायदा आहे.
14 Apr 2014 - 4:58 am | आत्मशून्य
म्हणूनच फक्त धर्माचाच "प्रिसाइज" उल्लेख टाळला.
14 Apr 2014 - 4:37 am | स्पंदना
सगळे मुसलमान? एकाच आडनाव जाधव आहे माझ्या मते.
14 Apr 2014 - 6:41 pm | आजानुकर्ण
हो. विजयअली जाधवखाँ नाव आहे त्याचे.
14 Apr 2014 - 10:36 am | रमेश आठवले
vote के लिये कुछ भी करेगा
14 Apr 2014 - 3:58 pm | नितिन थत्ते
माझ्या माहितीप्रमाणे फाशी देऊ नये इतकेच म्हटले आहे. त्यांना सन्मानाने किंवा अदरवाइज सोडून द्यावे असे म्हटल्याचे ऐकलेले नाही.
[मागे माजी राष्ट्रपतींनी काहींची फाशीची शिक्षा दयेच्या अर्जानुसार रद्द केली त्यावेळीही बर्याच जणांना राष्ट्रपतींनी त्यांना सोडून दिल्यासारख्या प्रतिक्रिया सुशिक्षित जन्तेने व्यक्त केल्या होत्या].
14 Apr 2014 - 7:08 pm | हुप्प्या
नेताजी असे बरळले की हल्ली मुलगा मुलगी लग्न न करता एकत्र रहातात. त्यांच्यात लैंगिक संबंध असतात. मग एक दिवस मुलगी बलात्कार झाला म्हणून कांगावा करते आणि मुलाला पकडले जाते. मुलांकडून चुका होतच असतात. त्याकरता फाशी कशाला वगैरे वगैरे.
आता शक्ती मिल प्रकरणी हे सगळे झाले होते का एका निष्पाप मुलीला निर्जन ठिकाणी हेरून आपल्या बाकी साथीदारांना बोलावून तिच्यावर जबरदस्ती झाली होती? सत्य हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असताना अशा प्रकारचे खोटारडे दावे करुन खोटा संशय निर्माण करणे. आणि आम्ही सत्तेत आल्यावर असे कायदे बदलू असले निर्लज्ज आश्वासन देणे ह्याचे समर्थन होऊच शकत नाही.
14 Apr 2014 - 7:59 pm | आजानुकर्ण
मुलायम आणि अबू आझमी यांच्या वक्तव्यावरुन ते देहदंडाविरोधात काही तात्त्विक स्टॅँड घेत आहेत असे वाटत नाही. पुरुषसत्ताक मानसिकतेतून अशी वक्तव्ये केली आहेत असे वाटते.
14 Apr 2014 - 8:23 pm | बबन ताम्बे
खुद्द न्यायाधिशांनी असे नमूद केले आहे की " ती असहाय तरुणी रक्तबंबाळ झाली होती. वेदनेने विव्हळत होती. हात जोडून सोडण्यासाठी विनंती करत होती. पण हे नराधम तिची जराही दयामाया न येता एकापाठोपाठ एक बलात्कार करत होते." हे असले राजकारणी हे वाचत नाहीत का? की माहीत असून देखील पिडीतेबद्दल असंवेदनशील आहेत ?
15 Apr 2014 - 12:53 am | आयुर्हित
येन केन प्रकारेण महिलांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आणि
गलीच्छ राजकारण आणि धर्मांध मुसलमानांचे लांगूलचालनाचा हा प्रकार आहे.
सर्व तया स्तरावर वेळीच ह्याचा बंदोबस्त केला गेला पाहिजे.
सर्व सुज्ञ नेत्यांनी व राजकीय पक्षांनी याचा निषेध केला पाहिजे, असा घाण विचार आहे.
तिकडे जेद्दा मध्ये पहा काय ठरवलंय : Blackmailers of women to be ‘named and shamed’
15 Apr 2014 - 11:05 am | आयुर्हित
BLOG : आमच्या सेक्युलरिझमच्या श्राद्धाला यायचं हं!
रवि पत्की
Published: Monday, April 14, 2014आजचा लेख लिहिताना मन विषण्ण आहे. विचारप्रणाली स्तब्ध झाली आहे. काही सुचत नाही असं म्हणतात ना तसं झालं आहे.
गेल्या आठ दिवसांत निवडणूक प्रचारात जी कारस्थानं, छल, कपट, निर्लज्ज अभिव्यक्ती यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला त्यावरून पाताळालादेखील आपली उंची थोडी वर असल्याचा साक्षात्कार झाला असेल.
उत्तर प्रदेश हे गलिच्छ राजकारणाचं भूकंप केंद्र झालं आहे. सेक्युलरिझम या शब्दानं भारतात जितका धुमाकूळ घातला असेल तितका 'वाय टू के'नं देखील नसेल. सेक्युलरिझमचा उच्छाद आता सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. कारण त्याचा उपयोग करणारे लोक या शब्दाच्या नावाखाली त्याच्या स्थायीभावाचा दररोज मुडदा पाडत आहेत.
सेक्युलरिझम हा शब्द ब्रिटिश लेखक हॉलीओक यानं पहिल्यांदा वापरल्याची नोंद आहे. या शब्दाचं अवलोकन करताना त्याच्या कक्षा खूप विस्तीर्ण झाल्या आहेत. हॉलीओक म्हणतो, सेक्युलरिझम म्हणजे मानवाचं ऐहिक सुख शोधणं. याकरिता विज्ञानाची कास धरणं हे सूत्र ठरतं.
जे उचित आहे ज्यातून मानवी कल्याण होईल ते सेक्युलरिझम.
सेक्युलरिझमच्या संकल्पनेत निधर्मी राज्याची संकल्पना आहे. त्यात राज्यकर्त्यांनं सर्व धर्म समान मानणं, प्रत्येक समुदायाला स्वत:च्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचं स्वातंत्र्य असणं आणि सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे सत्तेकरिता कोणत्याही धर्माचं लांगूलचालन न करणं याचा अंतर्भाव आहे.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सेक्युलरिझमची माळ ओढणारे राज्यकर्ते इमाम बुखारींना जाऊन भेटतात. त्यांचा पाठिंबा मागतात. बुखारी तो देतात. या गोष्टीला अल्पसंख्याकांचा सन्मान ठेवणं म्हणतात. सहारणपूरचा उमेदवार नरेंद्र मोदींचे तुकडे करायचं म्हणतो. त्याला अल्पसंख्याकांची अस्मिता म्हणतात. 'कारगिल युद्धात फक्त मुसलमान सैनिक मेले, याला अल्पसंख्याकांचा गौरव म्हणतात.', 'बलात्काराची प्रकरणं मुलांकडून होणारच' याला अल्पसंख्याक मुलांची पौगंडावस्थेतील निष्पाप मानसिकता म्हणतात.
वरील सर्व संतमहात्मे कोण आहेत? उत्तर प्रदेशातील राज्यकर्ते, राजमान्य, राजर्षी सेक्युलरिझममंडित, लांगूलचालन संपन्न, प्रजाअहितवादी सत्तापिपासू नेते.
वाईट याचं वाटतं की आपला उल्लू सीधा करण्याकरिता या लोकांनी अल्पसंख्याकांची बुद्धी बधिर करून ठेवली आहे. उत्तम शिक्षण, पायाभूत सुविधा, रोजगार, सर्वव्यापी प्रगती, जीवनमानात आमूलाग्र सुधार या गोष्टींचं महत्त्व हे सत्तापिपासू अल्पसंख्याकांना सांगणार नाहीत. धर्मावर कायमच संकट आहे हे सांगत शेकडो र्वष त्यांना झुलवत ठेवणार. सीतारों के आगे जहाँ और भी है, चला प्रगती करू या. आयुष्य बदलू या असं कधी सांगणार नाहीत. वर एवढे सगळे उद्योग राजरोसपणे करून जगाला सेक्युलरिझमची पट्टी पढवायला मोकळे.
वाचकांना वाटेल, भगव्या दहशतवादाबद्दल मी काहीच उल्लेख करत नाही. पण एक गोष्ट या निवडणुकीत निश्चित दिसत होती, की भाजपनं विकासाचा अजेंडा हाती घेतला आहे. ज्वालाग्राही मुद्दे टाळले आहेत. अमित शहांची प्रतिक्रिया समर्थनीय नाही, पण सेक्युलरिझमचं श्राद्ध घालणारेच लोक सेक्युलरिझमचे प्रवचनकार आहेत हे नक्की!
15 Apr 2014 - 2:09 pm | ऋषिकेश
हे मत जालावर अनेकदा व्यक्त झालं आहे तेव्हा त्याला इतका विरोध झालेला दिसत नाही.
उलट मुलींनीच तंग कपडे घालु नये, रात्री बाहेर भटकु नये, एकट्याने बाहेर जाऊ नये असे सांगण्याची अहमिका लागलेली होती.
नेमके मुलायमसिंग बोलल्याने अचानक (मराठीच नव्हे एकुणच) आंतरजालावर अनेकांच्या भुमिकांनी युटर्न घेतलेला आहे.
बाकी, त्यांनाच काय कोणत्याही गुन्हेगाराला फाशी देऊ नये असे मत मांडणारा हा लेख रोचक आहे
15 Apr 2014 - 2:11 pm | ऋषिकेश
अर्थात "काय म्हटलंय यापेक्षा कुणी म्हटलंय" याच्यात अधिक स्वारस्य आणि त्यावरून मताची योग्यता ठरवणार्या समाजात याहून वेगळे वागणे अपेक्षितही नाही म्हणा!
15 Apr 2014 - 10:11 pm | हुप्प्या
उगाच विरोधासाठी विरोध करु नका. मुलायमसिंग हा कायम फाशी वा मृत्युदंडाच्या विरोधात होता असे स्मरत नाही. बलात्कार्यांबद्दल विशेष पुळका होता असे म्हणावे तर दिल्लीत घडलेला, भारतभर गाजलेला निर्भया बलात्कार खटला चालू असताना वा त्या बलात्कार्यांना शिक्षा झाल्यावर मुलायमसिंगाला प्रेमाचा पाझर फुटला नव्हता.
मात्र निवडणुकीच्या तोंडावर, विशिष्ट धर्मीयांच्या समूहाला सामोरे जाताना, विशिष्ट धर्माच्या लोकांना फाशी झाली म्हणून नेताजींच्या मनात दयेचा निर्झर खळाखळा वाहू लागला असे मानायला जागा आहे.
राजकारण्यांनी मांडलेल्या विचारांचे स्पष्टीकरण देताना त्याकडे ससंदर्भच पाहिले पाहिजे. उगाच निर्वात पोकळीमधे हे मत त्याकडे बघायचे आणि मग इतक्या लोकांचा विरोध का बरे आहे असे आश्चर्य व्यक्त करणे म्हणजे एक तर वेड पांघरून पेडगावला जाणे किंवा बिनडोकपणा.
16 Apr 2014 - 12:15 am | आजानुकर्ण
मुलायम यांच्या वक्तव्यावरुन फाशीविरोधात किंवा बलात्काराच्या गुन्ह्यासंदर्भात त्यांचे काही गंभीर मत आहे असे दिसले नाही. लडके तो लडके होते है म्हणजे मुलांना बलात्काराचे लायसनच असते असे ध्वनित होते.
(केवळ बलात्काराचा गुन्हा गंभीर असला तरी तो शिक्षेसंदर्भात खुनाच्या गुन्ह्याइतकाच गंभीर मानला जाऊ नये असे मला वाटते. बलात्काराच्या गुन्ह्याची शॉक व्हॅल्यू जास्त दिसण्यामागे पुरुषप्रधान मानसिकता व योनिशुचिता वगैरे मुद्दे आहेत. दिल्लीसारख्या घटना, शक्तीमिल सारख्या घटनांमधील रिपीट ऑफेंडर्स, लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना विशिष्ट कलमे घालून जास्त शिक्षा करण्याची तरतूद असावी. बलात्कार व खून हे दोन्ही गुन्हे एकाच पातळीवर आणून ठेवल्यास बलात्कारित स्त्रीला गुन्हेगार जिवंत ठेवण्याची शक्यताही कमी राहते. )
16 Apr 2014 - 8:34 am | ऋषिकेश
अगदी सहमत आहेच, कंसासकट!
मी मुलायमसिंहांबद्दल म्हणतच नव्हतो, माझे निरिक्षण आंतरजालीय युजर्सबद्द्लचे आहे. मुलायमसिंहांनी गैरौद्गार काढल्यावर त्यांना हिरीरीने झोडपणार्यांपैकी काहिंनी स्वतःच महिन्यांपूर्वीच मुलींनीच तंग कपडे घालु नयेत, रात्री बाहेर एकटं फिरलं तर असं होणारच ना! वगैरे उद्गार काढले होते (जणु काही रात्री तंग कपडे घालून बाहेर पडलेल्या मुलीवर बलात्काराचं मुलांना लायसन्सच आहे).
16 Apr 2014 - 9:53 am | क्लिंटन
बाकी असल्या विषयांमध्ये आणि त्यावरील चर्चांमध्ये मला फारसा इंटरेस्ट नाही आणि समज तर त्याहूनही कमी आहे. तरीही जेव्हा इंटरनेट युजर्स मुलींनी तंग कपडे घालू नयेत वगैरे म्हणतात याचा अर्थ तंग कपडे घातलेल्या मुलींवर बलात्कार करायचे लायसेन्स मुलांना आहे असे मला तरी वाटत नाही. मुलींनी तंग कपडे घालू नये असे म्हटले जाते तेव्हा त्यामागे एक गृहितक असते की तंग कपड्यांचा आणि बलात्काराचा काहीतरी संबंध आहे. तसा संबंध नाही असे अनंतवेळा सिध्द झाले आहे.तेव्हा असे चुकीचे गृहितक घेतल्याबद्दल अशांना झोडपायचे असेल तर जरूर झोडपावे.पण अशा मंडळींना तंग कपडे घातलेल्या मुलींवर बलात्कार करायचे लायसेन्स मुलांना आहे असे म्हणायचे असते असे मला तरी वाटत नाही.
आपल्या घराची कडीकुलपे व्यवस्थित लावावीत असे म्हटले जाते तेव्हा चोरांना कुलपे लावली नाहीत म्हणून चोरी करायचे लायसेन्स असते असे कोणाला म्हणायचे नसते. (आणि तसे म्हणायचे असल्यास तो मनुष्य कैच्याकै बरळत आहे हे नक्की).तरीही चोरी झाली तर नुकसान आपलेच होते त्यापासून वाचावे म्हणून काळजी घ्यावी इतकाच म्हणायचा हेतू असतो. आपली समाजव्यवस्था अशी आहे की (आपल्याला आवडो की न आवडो) बलात्कारित स्त्रीला स्टिग्मा सहन करावा लागतो.तेव्हा तसे होऊ नये म्हणून काळजी घेणे क्रमप्राप्त आहे.आता तंग कपडे न घालणे ही योग्य प्रकारची काळजी आहे का नाही हा वादाचा मुद्दा नक्कीच आहे पण तंग कपडे घालू नका असे म्हणणार्यांचा असे लायसेन्स मिळालेले असते असे म्हणायचा हेतू असतो असे मला तरी नक्कीच वाटत नाही.
16 Apr 2014 - 10:13 am | पैसा
तसेही आंतरजालीय चर्चांमधे ९० ते ९५% वेळा काय म्हटलं आहे यापेक्षा कोणी म्हटलं आहे हे पाहून 'स्टँड' घेतला जातो/भांडणे केली जातात्/विधानांचा विपर्यास केला जातो. त्यामुळे अशा चर्चांमधून काय साध्य होते ते त्या काथ्या कुटणार्यांनाच ठाऊक!
16 Apr 2014 - 10:30 am | हुप्प्या
कडीकुलपाचे उदाहरण अगदी चपखल आहे.
एखाद्या तरूण वा नवतरूणीची आईही मुलीला सांगते अंधार व्हायच्या आत घरी येत जा, एकटी दुकटी फिरत जाऊ नकोस, सोबतीला मैत्रिण असू दे वगैरे वगैरे. तेव्हा तसे न करणार्या मुलीवर बलात्कार करण्याचा लायसन मुलांना आहे असे ती मानते का? आजिबात नाही. मुलीच्या सुरक्षिततेची काळजी हेच ह्या उपदेशांमागचे कारण असते.
तेव्हा समाजातले काही घटक तरी ह्या काळजीपोटीच मुलींनी काही खबरदार्या घ्याव्यात असे सुचवत असतात असे मानायला जागा आहे.
16 Apr 2014 - 10:58 am | ऋषिकेश
घराला कडी कुलपे लाऊन काळजी घेणे वेगळे. तिथे आपण घराचे मालक असतो.
सज्ञान स्त्रीने काय घालावे काय घालु नये, कुठे जावे- जाऊ नये काय खावे-खाऊ नये हे तिला कळत नाही (अर्थात आम्हाला कळते) असा समज करून घेऊन तिला वेळोवेळी उपदेश करून "उलट तिचीच काळजी घेतोय" हा भाव गैर आहे. स्त्रियांना स्वातंत्र्याबरोबर येणार्या जबाबदारीचेही भान असते.
पालक म्हणजे शासक नव्हे! तो संभाव्य धोक्याची कल्पना देऊ शकेल, जर बलात्कार झाला तर काय करावे याची घरी चर्चा करू शकेल मात्र कोणते कपडे घालावे नी कुठे-कधी फिरावे हे नुसते सांगणे नाही तर तसे "आदेश" देणे हे पालकत्त्व नव्हे!
अर्थात यावर भरपूर चर्चा जालावर झाली आहे.
बलात्कारासंबंधी काही गैरसमज व तथ्ये हा धागा बघा. व त्यावरील चर्चाही रोचक आहे. तिथे माझे मत विस्ताराने कळेल.
असो. मुलायमसिंहांकडून याहून वेगळ्या वक्तव्याची अपेक्षाच नव्हती. त्याच निषेध करावा तितका कमीच आहे. मी त्याच्या बोलण्याचे समर्थन करत असेल असा इथे चुकुनही कोणाचा समज असेल असे वाटले नव्हते (अजुनही वाटत नाहीये).
असो. यावर वर्षापूर्वीच घनघोर काथ्या कुटल्याने आता या विषयावर रजा घेतो.
16 Apr 2014 - 9:37 am | सुहासदवन
बलात्कारित स्त्रीला गुन्हेगार जिवंत ठेवण्याची शक्यताही कमी राहते.
हे ख्ररं असू शकेल पण त्यानंतर.....
बलात्कारित स्त्रीला समाज जिवंत ठेवण्याची शक्यताही कमी राहते.
त्याचं काय?
17 Apr 2014 - 8:58 am | हुप्प्या
माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारची शिक्षा बलात्काराकरता पहिल्यांदाच दिली गेली आहे. ह्याचे दोन परिणाम संभवतात.
१. फाशीसारखी जालीम शिक्षा आहे म्हणून संभाव्य गुन्हेगार तो गुन्हा करायला कचरेल.
२. पुरावा नष्ट करावा म्हणून तो त्या बाईला ठार मारेल.
ह्यातील क्र. १ चा परिणाम जास्त प्रभावी आहे का २ हे निश्चित करण्याइतका विदा आज नाही. त्यामुळे तुम्ही हे विधान कशाच्या आधारावर करत आहात?
तसेही कुणाला ठार मारणे हे इतके सोपे असते असे नाही. त्याकरता सामग्री उपलब्ध असणे, पुरावा नष्ट करणे हे सगळे आधीच योजनाबद्ध पद्धतीने आखावे लागेल. विषयवासनेच्या आहारी जाऊन अत्याचार करणे एक पण मानवी जीव नाश करणार्या माणसाला स्वतःची संवेदनाही बधीर करावी लागते. प्रत्येक बलात्कारी तसे करू शकेलच असे नाही.
17 Apr 2014 - 10:46 am | नितिन थत्ते
पकडला गेलो तर फ़ाशी होणारच आहे.... त्या ऐवजी बाईला ठार मारलं तर पकडलं जायची शक्यता कमी होईल म्हणून मारूनच टाकूया ....
असा विचार गुन्हेगार करण्याची शक्यता आहे.
17 Apr 2014 - 11:03 am | नितिन थत्ते
सुधारणा.......
मुलायमसिंग यांनी असा विचार केला की कसे ते ठाऊक नाही. त्यांच्यावर काय टीका करायची ती करण्यास माझी हरकत नाही.
16 Apr 2014 - 10:26 am | अनुप ढेरे
हे वाक्य रोचक आहे. कुठल्यातरी फिरंगी गवर्नरने IPC लिहिताना कुठल्या तरी निबंधात लिहिलं होतं. मी या वाक्याशी सहमत आहे का नाही ते नाही माहित पण हा विचार रोचक आहे हे नक्की.
16 Apr 2014 - 12:09 pm | आनन्दा
मध्यंतरी कुठेतरी वाचले होते की फाशीची शिक्षा पण सौम्यच आहे. अश्या लोकांना खरे तर आजन्म सक्तमजुरी आणि त्यांची कमाई त्या पीडीत व्यक्तीला द्यावी.
18 Apr 2014 - 8:51 am | रमेश आठवले
http://www.news18.com/news/uttar-pradesh/lucknow/mulayams-daughter-in-la...