वाईन क्रीम

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
8 Oct 2008 - 3:05 pm

आमच्या त्सेंटाआजीच्या आजीची ही 'रेशिपी' लिखाळमंडळी आमच्याकडे आले असताना केली होती.तेव्हा चवीसाठी त्यांच्याकडे विचारणा करा,:)

साहित्य - ५०० मिली व्हाइट वाइन, १०० ग्राम ( साधारण १ वाटी भरुन) साखर, एका लिंबाचा रस, १ चिमूट मीठ, २ अंडी, २ चमचे मोंडामिन किवा आरारुट किवा स्टार्च
कृती - लिंबाचा रस काढणे. मोंडामिन थोड्या पाण्यात विरघळवून घेणे.गुठळ्या झाल्या तर त्या मोडणे.त्यात चिमूटभर मीठ घालणे. एका जाड बुडाच्या पातेल्यात वाइन+साखर घेणे व मंद आचेवर गरम करत ठेवणे.त्यात लिंबाचा रस घालणे,ढवळणे. अंडी फोडून त्यातील पिवळा बलक घालणे व ढवळणे.अंड्यातील पांढरे भरपूर फेटून त्याचा आयश्ने तयार करणे. म्हणजेच अंड्यातील पांढरे इतके फेटणे की त्याचा पांढरा फोम तयार होतो; त्याला 'आयश्ने' म्हणतात.
मोंडामिन घालून सतत ढवळत राहणे.आच मंदच ठेवणे. शिजले की त्यात आयश्ने घालून ढवळणे. थोडे थंड झाले की सेट करण्यासाठी सेटिंगबाउल मध्ये ओतणे. पूर्ण थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ८ ते १० तास ठेवणे.
थंड सर्व्ह करणे.

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Oct 2008 - 3:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त दिसत्ये रेशिपी! डांकशन!

(पण आचेवर ठेवलं की अल्कोहोल गेला उडत!):-(

अदिती

नंदन's picture

8 Oct 2008 - 3:10 pm | नंदन

लेखात वाईनक्रीमबद्दल वाचून विचारणारच होतो :). अंडी, आरारूट इ. मुळे थोडा सूफलेचा दूरचा नातलग वाटतो आहे. इथे फस्क्लास व्हाईट वाईन्स मिळतात. एकदा ट्राय करून पहायला हवे :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

जैनाचं कार्ट's picture

8 Oct 2008 - 3:20 pm | जैनाचं कार्ट (not verified)

:D
=))
:)

आज आली माझ्या कामाची डिश !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

शाल्मली's picture

8 Oct 2008 - 3:35 pm | शाल्मली

अहाहा.. अतिशय मस्तच लागते वाईनक्रीम..
आणि केसुंच्याआधी आम्ही चव बघितल्यामुळे तर अजूनच छान लागत होते. ;)

आता मी पण करून बघीन..

--(स्वाती ताईच्या हातचे वाईनक्रीम चाखलेली) शाल्मली.

केशवसुमार's picture

8 Oct 2008 - 4:55 pm | केशवसुमार

काय ही आज कालची पिढी
मादक पेयांच्या किती आहारी गेली आहे..
श्रीराम!!
(मादक पेये आणि प्राण्याची प्रेते न खाणारा) केसु

शाल्मली's picture

8 Oct 2008 - 5:03 pm | शाल्मली

हा हा..
ही सगळी जळजळ बोलत्ये हो लोकांची.. पित्त काही उगाच उटल नव्हतं.. ;)

--(प्रचंड जळजळ झालेल्या केसु काकांची पुतणी) शाल्मली

छोटा डॉन's picture

8 Oct 2008 - 3:39 pm | छोटा डॉन

वर्णनतर ट्रीपमध्ये पोटभरुन ऐकले होते, आज पाहिलेही ...
आता पुढच्यावेळी आपण करुयात, केसुही येतीलच !

अवांतर : ह्यच्याबरोबर खायला मस्त " बटाटा वेफर्स" भारी लागतील का ?

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

सहज's picture

8 Oct 2008 - 4:07 pm | सहज

नंदन म्हणाला तसे वाईनक्रीम हा नवा प्रकार पाकृ मधे येईल ही आशा होतीच.

स्वगतः - बास. आजवरच्या सर्व खाद्यपदार्थाची एक यादी करतो व सगळे साहीत्य घ्यायचे म्हणल्यास काय किंमत होतोय व जर्मनीचे विमान तिकिट किती होतोय बघुन ठरवुच या. :-)

विसोबा खेचर's picture

8 Oct 2008 - 4:33 pm | विसोबा खेचर

ओहोहो..! वाईनक्रिमची पाकृ सह्हीच आणि फोटूही झकास...

लिखाळकाका-काकूंची आणि त्या मेल्या केसूची मज्जा आहे बॉ! :)

आपला,
(वाईनप्रेमी) तात्या.

केशवसुमार's picture

8 Oct 2008 - 5:02 pm | केशवसुमार

तात्याशेठ,
त्या मेल्या केसूची मज्जा आहे बॉ! हे बाकी खरं.. १५- २० मिनिटात स्वातिताईंचे घर...
लिखाळकाका-काकूंची मात्र मज्जा नाही बर का.. ते तिकडे खूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊप दूर राहतात.. बिचारे .... 8}
(१५- २० मिनिटात स्वातिताईंच्या घरी पोचू शकणारा)केसु... :P

छोटा डॉन's picture

8 Oct 2008 - 5:05 pm | छोटा डॉन

.. १५- २० मिनिटात स्वातिताईंचे घर...
लिखाळकाका-काकूंची मात्र मज्जा नाही बर का.. ते तिकडे खूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊप दूर राहतात.. बिचारे ....

असेच म्हणतो ...
( आजसुद्धा केसुशेठ फुल्ल फॉर्ममध्ये )

(१५- २० मिनिटात स्वातिताईंच्या घरी पोचू शकणारा) छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

यशोधरा's picture

8 Oct 2008 - 4:40 pm | यशोधरा

>>स्वगतः - बास. आजवरच्या सर्व खाद्यपदार्थाची एक यादी करतो व सगळे साहीत्य घ्यायचे म्हणल्यास काय किंमत होतोय व जर्मनीचे >>विमान तिकिट किती होतोय बघुन ठरवुच या.

मी पण!! मी पण!! स्वातीताई, आले गं मी.... :)

मनिष's picture

8 Oct 2008 - 4:47 pm | मनिष

जर ऑनसाईटची संधी मिळाली तर जर्मनी मागून घेईन म्हणतो... स्वातीताई, चालेल ना? ;)

धूप मे निकलो, घटाओं मे नहाके देखो; जिंदगी क्या है ये किताबें हटाकर देखो!

ऋषिकेश's picture

8 Oct 2008 - 5:04 pm | ऋषिकेश

वा!
क्रीमी रंग आणि पेल्यांचा आकार दोन्ही खूप आवडले..
मी कडक (हार्ड) ड्रिक घेत नसल्याने आधी हिरमुसलो होत.. पण तापवल्यावर अल्कोहोल उडून जणार असल्याने आता कोण बनवतंय आणि मला बोलावतंय प्यालला त्याची वाट पाहत आहे

-(अल्कोहल गेले उडत म्हणत पिणारा) ऋषिकेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Oct 2008 - 6:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किती किती पाककृत्या, मित्रमंडळी म्हणतात तसे खादाडीला आणि या वाईनसाठी जर्मनीला आलं पाहिजे असे वाटत आहे.
केसूचे सतत काहीतरी ओरपतांनाचे फोटो पाहतो, तेव्हा आम्ही जळतो त्याच्यावर :)

लिखाळ's picture

8 Oct 2008 - 9:23 pm | लिखाळ

वाईनक्रिम खरंच छान झाले होते.
स्वातीताईच्या जर्मन आजींच्या आजींचा तो खास पदार्थ आहे. म्हणजे अगदी पारंपारीक जर्मन पदार्थ आहे.
मिपाकर नशिबवान म्हणून तो इथे वाचायला मिळाला आणि आम्हाला चाखायला :)
--लिखाळ.

प्राजु's picture

9 Oct 2008 - 12:50 am | प्राजु

स्वातीताई,
आता बहुतेक एकदा जर्मनी ट्रिप करावीच लागणार मला असं दिसतं आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Oct 2008 - 1:16 am | बिपिन कार्यकर्ते

स्वाती ताई, सध्या तरी खूप छान दिसतंय एवढीच प्रतिक्रिया देतो. चवीला कसं लागतं हे तुझ्या घरी येऊन पिऊन बघेन तेव्हाच सांगेन. ;)

(अल्कोहोल प्यायल्यावर उडणारा) बिपिन.

चित्रा's picture

9 Oct 2008 - 2:53 am | चित्रा

दिसताना काहीसे आयरिश क्रीम सारखे दिसते आहे. पण अर्थात वाईन आहे त्यात. पहायला पाहिजे कसे लागते ते.
काही सुगरणी पाककृती सांगताना इतकी काचकूच करतात की काय सांगावे! पण तुमच्या आजी अशा मोकळ्या स्वभावाच्या आहेत हे फारच छान.
त्यामुळे नवीन नवीन पाकक्रिया समजतात.

सुक्या's picture

9 Oct 2008 - 3:39 am | सुक्या

झकास !! रेशिपी भारी दिसत्ये.
त्ये वाईन जरा जास्त टाकली तर चालनं का? आमाला वाईच जास्त घेयाची सवय हाय म्हुन म्हनलं.

पानी अडवा , पानी जिरवा . . . . पेयाला मातुर वाईनच वापरा ..
सुक्या (बोंबील)

सुनील's picture

9 Oct 2008 - 8:46 pm | सुनील

झकास! फोटोही खासच!

मात्र फ्रिजमध्ये ८ ते १० तास ठेवणे
हे बाकी सयंमाची परीक्षा पाहणारे!

तुम्ही अंड्याचा पिवळा आणि पांढरा भाग वेगळा काढ्ण्याबद्द्ल लिहिले आहे, पण तो कसा काढावा हे सांगितलेले नाही. मी साधारणतः असे करतो -

अंड्याच्या निमुळत्या भागाला एक छोटेसे छिद्र पाडावे. अंडे हाताने हलवून हलवून त्यातील पांढरा भाग एका वाटीत काढून घेणे. पिवळा बलक अंड्यातच राहतो.

ह्या व्यतिरिक्त दुसरी कुठली चांगली पद्धत आहे का?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती दिनेश's picture

10 Oct 2008 - 11:45 am | स्वाती दिनेश

मी ही तुमच्यासारखेच अंड्यातील पांढरे व पिवळे वेगळे करते. तसे एग सेपरेटरही मिळतात बाजारात.(माझ्याकडेही आहे..पण तरी देशी पध्दतीनेच वेगळे करते..:))
स्वाती

प्रभाकर पेठकर's picture

10 Oct 2008 - 2:07 pm | प्रभाकर पेठकर

ह्या उलट करणे अधिक सोपे.
अंड्याच्या मोठ्या भागाला टीचकी मारून कवच उघडावे. पिवळा बलक अलगद वाटीत काढून घ्यावा आणि पांढरा भाग दुसर्‍या वाटीत काढावा.
अंडे असे दुभागण्याआधी ३-४ तास फ्रिज मध्ये ठेवले असेल तर जास्त चांगले. फ्रिज मध्येही अंडी ठेवताना निमुळता भाग खाली आणि मोठा भाग वर असे ठेवावे. हाताळण्यास सुरक्षित असते आणि हाफ-फ्राय करायचे झाल्यास बलक फुटत नाही.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

प्रभाकर पेठकर's picture

10 Oct 2008 - 2:18 pm | प्रभाकर पेठकर

हाय कॅलरीज कुठलेही पेय मस्स्स्स्स्तच लागते. करून पाहावे म्हणतो. बाकी ग्लासचा आकारही लाजवाब.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

स्वाती दिनेश's picture

12 Oct 2008 - 11:47 am | स्वाती दिनेश

खवय्यांनो, धन्यवाद.
आमच्या त्सेंटाआजीच्या आजीची ही पारंपरिक जर्मन रेसिपी मिपावर पाहून आजीआजोबांनाही खूप आनंद झाला.(अर्थात त्यांना मराठी समजत नसल्याने फक्त चित्र पाहून!)
नंदन,सुफलेपेक्षा हे वेगळे लागते. खाणे आणि पिणे च्या मधली स्टेज असते. खिरीसारखे- खाता आणि पिता दोन्ही येते.
सहजराव,यशो,प्राजु,डॉ. साहेब, कधी भरताय बॅग?म्हणजे वाइनक्रिम तयार ठेवते,:)
राजे,ऋषिकेश,मनिष,बिपिन .. कधीही या रे.
चित्रा,आयरिश क्रिम सारखे दिसले थोडेसे,तरी चवीत खूपच फरक आहे ग..ये ना एकदा.. खाऊनच पहा ;)
पेठकरशेट, कोणतीही साधीशी वाइन चालेल. महागडी वाइन त्यात वाया नका घालवू..;)
ज्यांना ऑनसाइटवर, नुसते फिरायला जर्मनीला यायचे आहे त्या सर्वांचे स्वागतच आहे,:)अधिक माहितीसाठी डॉन्याशी संपर्क साधा..त्याने कालच वाइनक्रिमची मजा घेतली आहे.
स्वाती

छोटा डॉन's picture

12 Oct 2008 - 12:43 pm | छोटा डॉन

अधिक माहितीसाठी डॉन्याशी संपर्क साधा..त्याने कालच वाइनक्रिमची मजा घेतली आहे.

+++++++++++++++++++१
काल २ मोठ्ठे बाऊल भरुन वाईन क्रीम खाल्ली, शेवटी डोळे मिटायला लागल्यावर बास केले ....
( स्वातीताईने त्याच्या आधी तुडुंब पोट भरेल एवढे "स्वीट कॉर्न सुप + न्युडल्स + फ्राईड राईस " असा चायनीज मेन्यु केला होता पण तो भाग वेगळा.)
एकदम जबरदस्त होती वाईन क्रीम, इच्छुकांनी लगेच जर्मनीचे तिकीट काढावे.
रहायची व्यवस्था माझ्या फ्लॅटवर होऊन जाईल, काळजी नसावी ...

अवांतर : काल " जर्मन आजी-आजोबांची" भेटही झाली, थोडक्यात कालचा दिवस एकदम उत्तम गेला ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....