कार्तिकस्वामी व कुमार वयातील स्त्रीद्वेष्टेपणा

शुचि's picture
शुचि in काथ्याकूट
7 Apr 2014 - 7:27 pm
गाभा: 

कार्तिकस्वामी ची अनेक नावे आहेत - सुब्रह्मण्य, स्कंद, कुमार, गुहा, षडानन वगैरे. त्याची ज्या रुपात जास्त भक्ती होते ते म्हणजे "कुमार" रूप.

आदी शंकराचार्यरचित सुब्रह्मण्य भुजंगाष्टकातही खालील श्लोक येतो -

इहायाहि वत्सेति हस्तान्प्रसार्या-
ह्वयत्यादराच्छङ्करे मातुरङ्कात् |
समुत्पत्य तातं श्रयन्तं कुमारं
हराश्लिष्टगात्रं भजे बालमूर्तिम् || १८||

जेव्हा शंकरानी बाहू पसरून प्रेमाने हाक मारली तेव्हा घाईघाईत आईच्या मांडीवरून उठून शंकरांकडे धाव घेणार्या व त्यांना अत्यंत प्रेमाने मिठी मारणार्‍या कुमार (रूपातील) कार्तिकेयाचे मी ध्यान करतो.
______________________
अर्थात कुमार रुप म्हणजे पौगंडावस्थॆच्या आधीची काही वर्षे. ज्या वयात बहुसंख्य मुलांना मुलींबरोबर खेळणे आवडत नाही / त्यांचा राग येतो/ अथवा आतापर्यंत एकत्र असलेले मुला-मुलींचे गट वेगवेगळे होऊ लागतात ते वय.
______________________
मला शंका ही आहे की कार्तिकस्वामी कुमार रूपातच भजला जातो त्यामुळे त्याचे त्या वयातील गुण/आवडी/निवडी अधोरेखित होता असतील काय? उदाहरणार्थ त्याचा स्त्रीद्वेष्टेपणा. त्याने पार्वतीवर रुसून मी तुझे तोंडही पाहणार नाही म्हटले होते आदि. शिवाय कार्तिकस्वामीच्या देवळात स्त्रियांना जाण्याची बंदी वगैरे.
______________________
केवळ एक शंका!!!

प्रतिक्रिया

चुकीच्या वेळी काढलेला धागा... सध्या अशांत असलेले वातावरण बघता वेळ चुकली असे खेदाने म्हणावेसे वाटते.

किसन शिंदे's picture

7 Apr 2014 - 11:44 pm | किसन शिंदे

अशांत असलेले वातावरण बघता वेळ चुकली असे खेदाने म्हणावेसे वाटते.

शुचिमामीय ती! तिने बरोब्बर वेळ साधली!! ;-)

स्त्री मुक्ती वाद्यांचे विचार वाचण्यास उत्सुक

मारकुटे, स्त्रीमुक्तीवादीच का मी तर जे कोणी अजून कुमार वयातून मेंटली बाहेरच पडले नाहीत अशा सर्वांचेदेखील विचार ऐकू इच्छिते :)

स्त्रीयांनी कार्तिकेयांचे दर्शन घेऊ नये, असे कोणतेही शास्त्र सांगत नाही. परंतु महाराष्ट्रातील स्त्रिया केवळ कार्तिक पौर्णिमेलाच स्वामींचे दर्शन घेतात. दक्षिणेतील स्त्रीया या गोष्टी मानत नाही त्या वर्षभर दर्शन घेतात. महिला कार्तिक स्वामींचे दर्शन वर्षातून फक्त कृतिका नक्षत्रावरच घेऊ शकतात कारण त्या दिवशी स्वामी बाल अवस्थेत असतात, अशीही आख्यायिका आहे.

स्वरूपवान कुमार कार्तिकेय स्वामी

आदूबाळ's picture

7 Apr 2014 - 7:54 pm | आदूबाळ

+१

किंबहुना स्त्रियांनाही मुरुगनची नावं असतात.

प्रज्ञाविवर्धन स्तोत्र सुंदर चालीत ऐकले आहे. तेव्हापासून रोज म्हणते. शंकरसंभव, ब्रह्मचारी, उमापुत्र, स्कंद, क्रौन्चाराति, गांगेय , ताम्रचूडश्च वगैरे नावे आहेत. १२ की १६ आठवत नाही.

आयुर्हित's picture

8 Apr 2014 - 2:53 pm | आयुर्हित

संस्कृतमधील प्रज्ञाविवर्धन स्तोत्र व त्याचा इंग्रजी अनुवाद

आईने त्यांना लग्नाची गळ घातली तेंव्हा सगळ्या स्त्रिया तुझ्या सारख्या आहेत म्हणजेच माता समान आहेत असे ते म्हणाले. अर्थात नेहमिच्या यशस्वीकलाकारान्नी स्त्रि द्वेश्टेप्णाचे लेबल त्यांवर लावून करायची ती xxxपन्ती केलीच.

महारुद्र हनुमाना बाबतहि विचार सुनवा काही शंका राहिल्या असल्यास

HTML Online Editor Sample

संपादित

मी ऐकलेली आख्यायिका काहीतरी वेगळीच होती अन ती आत्ता आठवत नाही. पण पार्वतीवर चिडून त्यांनी यापुढे एकाही स्त्रीचे तोंड न पाहण्याची शपथ घेतली होती अशी काहीशी होती.

वय वगैरे काढायचं कारण नाही. प्लीज डोंट गेट पर्सनल.

आत्मशून्य's picture

7 Apr 2014 - 10:49 pm | आत्मशून्य

पण पार्वतीवर चिडून त्यांनी यापुढे एकाही स्त्रीचे तोंड न पाहण्याची शपथ घेतली होती अशी काहीशी होती.

सर्व स्त्रिया मातेप्रमाणे आहेत. म्हणूनच त्यांना अविवाहीत रहायचे होते. यामधे स्त्रिद्वेश न्हवता. पण पार्वतीवर चिडून त्यांनी यापुढे एकाही स्त्रीचे तोंड न पाहण्याची शपथ घेतली होती ही कथेची अर्धी बाजु आहेच (पुर्ण बाजु आपले विस्मरण कमी होता होता प्रकाशात येइलच) पण स्त्रिद्वेश म्हणून न्हवेच तर आधीची प्रतिज्ञा मोडायला लागु नये इतकाच त्यामागे हेतु होता. नशीब एखाद्या देवीने एखाद्या राक्षसाचा वध गेला म्हणून तिला पुरुषद्वेष्टे ठरवण्याइतपत अजुन पातळी कोणी बेगड्या व्यक्तीने गाठली नाहीये ते.

HTML Online Editor Sample

संपादित

अवांतर :- समजा आपल्या पगाराची फिकीर न बाळगता मी प्रतीसाद खरडला, "तुमचा पगार कीती तुमी बोल्ते किती .." तर तो पर्सनल धरला जाइल काय ?

दुसरी गोष्ट मी "कुमारवयातील" = तात्पुरता (जस्ट अ फेज) स्त्रीद्वेष्टेपणा म्हणाले आहे. पुढे मुरुगनने वल्ली व देवसेनेशी लग्न केले आदि गोष्टी मी वाचून आहे.

विकास's picture

7 Apr 2014 - 7:56 pm | विकास

ज्या वयात बहुसंख्य मुलांना मुलींबरोबर खेळणे आवडत नाही / त्यांचा राग येतो...

त्या वयात मुलींना मुलांबरोबर खेळणे आवडते असे म्हणायचे आहे का?

बाकी कार्तिकेयस्वामी आणि गणपती या भावंडांबद्दल माझ्या माहिती प्रमाणे दोन विरुध्द गोष्टी आहेत... उत्तरेत (महाराष्ट्रासहीत) कार्तिकेय हा ब्रम्हचारी आहे आणि गणपतीस दोन पत्नी आहेत. तर दक्षिणेत कार्तिकेयास दोन पत्नी असून गणपती ब्रम्हचारी आहे.

त्या वयात मुलींना मुलांबरोबर खेळणे आवडते असे म्हणायचे आहे का?

एका विशिष्ठ वयात मुलीही बुजतात, वेगळ्याच गटात रहाणे पसंत करतात. निदान माझा तरी हा अनुभव!

प्रकाश घाटपांडे's picture

7 Apr 2014 - 7:58 pm | प्रकाश घाटपांडे

कार्तिकस्वामीच्या स्त्रीद्वेष्टेपणाची काही कथा आहे का?

प्रघा कुमारवयातील "कोणत्याही स्त्रीचे यापुढे तोंड पहाणार नाही" ही प्रतिज्ञा बस हीच ऐकलेली आख्यायिका. माझ्या माहीतीत एवढीच आहे. पुढे मग देवसेनापती होणे, हत्तीपासून वल्लीला वाचविणे, विष्णूच्या दोन मुळींनी मुरुगनच्या प्राप्तीसाठी तप करणे आदि आख्यायिका मी ऐकून आहे.

"आताच हा धागा काढण्याचे प्रयोजन काही कळ्ले नाही"...केवळ मला पडलेली एक शंका!!!

अवांतरः स्त्री-मुक्ती'वाद म्हणजे नक्की काय? प्रश्न सिरीयस आहे.

काही नियम आहेत का केव्हा धागा काढाव असा? नाही बरोबर? म्हणून काढला.

काही नियम आहेत का केव्हा धागा काढाव असा? नाही बरोबर?

बरोबर. तुम्हाला जश्या शंका पडतात तेव्हा तुम्ही उत्तरे शोधता ना; तसेच मला पडलेल्या शंकेचे मला उत्तर हवं होतं... असो.

अति-अवांतरः ह्या मध्ये स्कोर सेटलींग चा वास येतोय... बाकी चालू द्या.

बॉर्र्र!!! वास घेत बसा मग.

शिद's picture

7 Apr 2014 - 8:41 pm | शिद

खाई त्याला खवखवे... :)

बाकी चालू द्या.

जातवेद's picture

7 Apr 2014 - 8:26 pm | जातवेद

टाकली काडी..... होऊन जाउदे भुसनाळा :)

ज्याची त्याची जाण ज्याची त्याची समज :)

सुहास..'s picture

7 Apr 2014 - 8:19 pm | सुहास..

माहीत तर सगळ आहे , मग उगा चर्चा ...असो ..

दक्षिणेकडे खरच कार्तिकस्वामींचे अस्सीम भक्त पाहण्यात आले आहेत, तमीळनाडु मध्ये कार्तिकस्वामीच्या जन्म्दिनानिमीत्त सुट्टी असते, शिवाय तेथे दर्शन पात्रतेसाठी कुठलाही लिंगभेद नसतो ..बाकी मंदिरे आणि स्वच्छता याबाबत बोलणेच नको ...अतिशय पवित्र आणि मंगल वाटावे इतकी स्वच्छता असतेच ..शिवाय मंदिरे काही कालावधीकरिता बंद ही असता , ..पण एस्कॉन टेम्पल, बंगळुरु ला मला कार्तिक स्वामीचे मंदिर दिसले नाही , की( माझे लक्ष गेले नाही )

नाही "कुमार रुपातच" ही देवता पूजली जाणे अन कुमारावस्थेतील (तात्पुरता) स्त्रीद्वेष्टेपणा याची काही सांगड आहे का ते माहीत नाही. असूही शकते किंवा नसूही. शिवाय कार्तिकस्वामींबद्दल अधिक माहीती मिळावी या हेतूने धागा काढला आहे. आयुर्हित यांचा प्रतिसाद आवडला. प्रघांचाही कारण प्रघांनी प्रश्न विचारुन स्वतःच्याच अंतरंगात/माहीतीत डोकवण्यास भाग पाडलं.

प्रकाश घाटपांडे's picture

7 Apr 2014 - 8:26 pm | प्रकाश घाटपांडे

कार्तिकस्वामी प्रवृत्ती चे लोक आपल्याला समाजात दिसतात. कधी कधी स्त्रियांनी ( खर तर एकाद दुसर्‍याच) आपल्या स्त्रीत्वाचे भांडवल करुन पुरुषावर अन्याय वा त्याचे नुकसान केलेले असते. त्याचा परिणाम म्हणुन त्याला स्त्रीविषयी भय व पुढे भयातून द्वेष निर्माण होतो. हे पुर्वग्रह निघता निघत नाहीत. मग तो सतत सूडाची संधी शोधत असतो. त्याची सदसदविवेकबुद्धी जागृत असेल तर सूडाचे परिवर्तन तिरस्कारात होते. तो स्त्रियांपासून लांब लांब राहण्याचा प्रयत्न करतो. अर्थात स्त्रीद्वेषाचे अन्यही कारणे आहेत.

त्याची सदसदविवेकबुद्धी जागृत असेल तर सूडाचे परिवर्तन तिरस्कारात होते.

हे असंच आहे का?

पैसा's picture

7 Apr 2014 - 8:32 pm | पैसा

बरीच नवी माहिती कळली. हल्लीच रा चिं ढेरे यांचे 'लोकदैवतांचे विश्व' वाचले. त्यातही मुरुगन स्कंद इ बद्दल विस्ताराने लिहिले आहे. पण स्त्रीद्वेष्टेपणाबद्दल काही बोलायचे नाही. कुमारवयातील मुले तसे वागतात असे ऐकले आहे.

प्यारे१'s picture

7 Apr 2014 - 8:36 pm | प्यारे१

>>>कुमारवयातील मुले तसे वागतात असे ऐकले आहे.

व्यत्यास सिद्ध होतो का?
असं वागणारे कायम कुमारवयात वगैरे असतात असा काही? ;)

प्रसाद गोडबोले's picture

7 Apr 2014 - 8:56 pm | प्रसाद गोडबोले

साऊथमधे कार्तिकेयाला दोन बायका आहेत अन गणपति ब्रह्मचारी आहे असे ऐकुन होतो ....ते असो

मला तर एक उलट शंका आहे ..

कुमारवयात मुलं स्त्रीद्वेष्टे होतात की मुली पुरुष द्वेष्ट्या ? ज्यामुली अगदी एकत्र खेळायच्या बागडायच्या त्याच अचानक कुमारवयात आल्यावर "तुम्हीवेगळे आम्हीवेगळे " असा काहीसा आव आणतात...अर्थात हे निसर्गचक्रामुळे ...
मुलांना मुलींविषयी उलट सुप्त आकर्षण वाटायला लागते ... ते नक्की काय आहे हे कळत नसते ...तरीही तो एक हवाहवासा वाटणारा अनुभव असतो ... आणि "द्वेष" तर तो नक्कीच नसतो

तात्पर्य इतकेच की कुमारवयात आल्यावर मुलांना मुलींविषयी द्वेष वाटायला लागत नसुन उलट मुलीनांच मुलां विषयी काहीतरी विचित्र वाटायला लागते ...पुढे पुरुष आणि स्त्री झाल्यावर हे फीलींग आपोआप निघुन जाते !!

शुचि's picture

7 Apr 2014 - 9:02 pm | शुचि

पुढे पुरुष आणि स्त्री झाल्यावर हे फीलींग आपोआप निघुन जाते !!

खरय!! जायला हवं :)

सुबोध खरे's picture

8 Apr 2014 - 9:35 am | सुबोध खरे

कुमार वयात शरीरात होणार्या संप्रेरकांच्या बदलामुळे विरुद्धलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होते. असे का होते ते नीट कळत नाही. त्यातून इतर मुले/ माणसे आपल्याला चिडवतील या भीतीने मुले बहुधा "मला मुली आवडत नाहीत" असा पवित्रा घेतात.( यात डिनायलचा बराच भाग आहे )
त्यातून जर शाळेत मुले आणि मुलीनी आपसात बोलायचे नाही मिसळायचे नाही असे वातावरण असेल ( मुलांचि आणि मुलींची शाळा वेगळी असेल तर अजूनच) तर त्याचे दृढीकरण होते.
असा पवित्रा मुली घेत नाहीत याचे कारण मुलांमध्ये जसे ब्रम्हचर्याचे उदात्तीकरण केले गेले आहे तसे स्त्रियांमध्ये नाही. उलट मुलगी जन्माला आल्यापासून तिच्या मनावर अमुक तमुक कर किंवा करू नको नाहीतर तुझे सासरी कसे होणार हे बिंबवले जाते. थोडक्यात मुलीला लग्नाशिवाय पर्याय नाही. पण मुलाला लग्न म्हणजे पायातील बेडी तुमच्या भौतिक किंवा अध्यात्मिक प्रगतीमध्ये येणारा अडसर असे शिकवले गेल्याचा हा परिपाक आहे. मुंजीत सुद्धा शिक्षणासाठी जाणार्या मुलाला( बटूला) मामा "जाऊ नको. मी तुला माझी मुलगी देतो" असे काहीसे सांगतात.
त्यामुळे कुमारवयात मुले जसा स्त्रीद्वेष्टेपणाचा आव आणतात तसा मुलीना आणणे गरजेचे नसते. अर्थात एकदा मुले त्या लाज वाटण्याच्या वयातून पार झाली कि किती जास्त मैत्रिणी आहेत त्यावर त्यांचे श्रेष्ठत्व ठरू लागते. एकंदर मुलांचे भावविश्व हे मुलींपेक्षा जास्त गुंतागुंतीचे आणि विचित्र असते. (मैत्रीण सोडून गेली तर मुलांच्या पौरुषावर डाग येतो आणि मित्र सोडून गेला तर तो तसाच होता म्हणून दोष मुलीवर न येत मुलावर येतो. मुलांना मोकळेपणाने रडता सुद्धा येत नाही. हा फार "सुरस आणि चमत्कारिक" विषय आहे
असो यावर विस्ताराने परत केंव्हा तरी.

प्रसाद गोडबोले's picture

8 Apr 2014 - 1:38 pm | प्रसाद गोडबोले

इतर मुले/ माणसे आपल्याला चिडवतील या भीतीने मुले बहुधा "मला मुली आवडत नाहीत" असा पवित्रा घेतात

वैयक्तिक , किमान माझ्या तरी असा अनुभव नाही , :) गिरीजा आमच्या गल्लीतल्या तिच्या मैत्रिणीला भेटायला यायची तेव्हा माझे मित्र मला इतकं चिडवायचे की अगदी गिरीजालाही ते कळाले होते ...;) मला कधी त्याची भिती वगैरे वाटली नाही उलट ते चिडवणे आवर्डायचेच ...काहीतरी वेगळेच फीलींग होते ते ... त्यानंतर परत तसे कधी झालेच नाही :D

अवांतर : केवळ ह्याच कारणासाठी "शाळा" हा पिक्चर आपल्याला लैच आवडला होता ...चला आज परत पाहेन :)

बॅटमॅन's picture

8 Apr 2014 - 1:59 pm | बॅटमॅन

सहमत. द्वेष्टेपणाची झूल पांघरायची कधी वेळच आली नाही. तेव्हा बरोबरच्या कुणी मित्राचीही द्वेषभावना होती असे जाणवले नाही. द्वेषाचा फुकट आरोप मात्र कशाला करतात देव जाणे. असो.

शुचि's picture

8 Apr 2014 - 4:07 pm | शुचि

analysis आवडला.

स्कंद व स्त्रीद्वेष्टेपणा कैच्याकै हरदासी कथा आहे.
पुराणाप्रमाणे स्कंद हा अग्नी व स्वाहा यांचा पुत्र. रूद्ररूपी अग्नीपासून सहा स्त्रियांचे रूप धारण केलेल्या स्वाहेपासून स्कंदाचा जन्म झाल्याने स्कंदाला रूद्रपुत्र म्हणूनच समजले जाते.

स्कंदाचे पालन सहा मातृकांनी अर्थात सहा कृतिकांनी केले म्हणून तो षडानन आणि कार्तिकेय झाला. तर देवसेना म्हणजे कोणी स्त्रीपार्टी नाही. देवसेना म्हणजेच देवांची अथवा इन्द्राची सेना. राक्षसांकडून देवसेनेचा पराभव होत असल्याचे पाहून इंद्राने स्कंदाला देवसेनेचा सेनापती व्हायचे आवाहन केले. देवसेनेचे पालन केले म्हणूनच त्यास देवसेनेचा पती म्हणून मानले जाते. अग्नीने स्कंदास कुकुट ध्वज दिला म्हणूनच स्कंद मूर्तीच्या हाती कोंबडा दिसतो.
ह्यात स्कंदाचा स्त्रीद्वेष्टेपणा कुठेही नाही.

हा धागा म्हणजे उगाचच तापल्या तव्यावर पोळी भाजण्याचा प्रकार वाटतो. (तसा तुमचा उद्देश नसेलही)

ही वेरूळ येथील अप्रतिम स्कंदप्रतिमा
a

मुक्त विहारि's picture

7 Apr 2014 - 9:36 pm | मुक्त विहारि

धन्यवाद...

असेल हरीदासी कथा असेल पण "मी स्त्रियांचे तोंडही पाहणार नाही" या प्रतिज्ञेच्या आख्ययिकेत तिचे मूळ आहे.

_____________________________
http://murugan.org/index.htm या साईटवर

Visnu's daughters Amirta Valli and Sundara Valli both wanted to marry Lord Murugan and were praying to him at Saravana Poikai.

Murugan appeared before them and arranged for Amirta Valli to be born as the daughter of Lord Indra and for Sundara Valli to become the daughter of sage Siva Muni and to be adopted by a hunter chieftain as his step daughter.
वाचनात आले. शिवाय देवसेना हे इंद्राच्या मुलीचे नाव असेही वाचनात आले होते.

वल्ली आपण म्हणता ते बरोबरही असेल. देवसेना = देवंचे सैन्य असेल. पण वरील कारणांमुळे मी देवसेना ही इंद्राची मुलगी असे समजत होते.

हा धागा म्हणजे उगाचच तापल्या तव्यावर पोळी भाजण्याचा प्रकार वाटतो.

परत आपल्याला तसे वाटत असल्यास मी काही करुही शकत नाही अन तशी इच्छाही नाही. परत ज्याची त्याची ...

असेल हरीदासी कथा असेल पण "मी स्त्रियांचे तोंडही पाहणार नाही" या प्रतिज्ञेच्या आख्ययिकेत तिचे मूळ आहे.

आख्ययिका ह्या शब्दांतच सर्व काही आले.

देवसेना हे इंद्राच्या मुलीचे नाव असेही वाचनात आले होते.

तेच तर म्हणतोय मी. हे सर्व रूपकात्मकच आहे. इंद्राची सेना म्हणजेच त्याच्या मुलीचे रूपक

बाकी स्कंदाचे ओरिजीन मूळचे उत्तरेकडील असे मी मानतो नंतर तो दक्षिणेत जाऊन स्थिरावला व मुरुगन म्हणून तिकडील चालीरितींसह प्रसिद्धीस आला.

शुचि's picture

7 Apr 2014 - 9:59 pm | शुचि

धन्यवाद!

अत्रुप्त आत्मा's picture

7 Apr 2014 - 10:05 pm | अत्रुप्त आत्मा

दॅट्स इट!!! किस्सा खतम!

किसन शिंदे's picture

7 Apr 2014 - 11:46 pm | किसन शिंदे

माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद रे वल्ली.

प्रमोद देर्देकर's picture

8 Apr 2014 - 4:42 pm | प्रमोद देर्देकर

अगदि ++++१११. धन्स रे वल्लीशेठ.
मी तर म्हणतो काही पौराणिक, अध्यात्मीक प्रश्न, शंका काही असतील तर आधी वल्ली शेठ, बॅट्या यांच्याशी ख.फ. वर किंवा व्य.नि तुन उहापोह करावा. रेडिमेड उत्तर तयार मिळेल. अथवा अगोदर तो विषय कोणत्या धाग्यामध्ये चर्चिला गेलाय ती माहिती मिळेल.
म्हणजे परत परत त्याच त्याच विषयावर काथ्याकुट नको म्हणुन म्हणतोय मी. बाकी चालु द्या.

रामदास's picture

7 Apr 2014 - 9:52 pm | रामदास

या स्वामींचे दर्शन घेतल्यास बक्कळ पयशे मिळतात असे ऐकून दर्शन घेतले पण आजही महिना संपण्याआधीच पयशे संपतात.
बाकी स्त्रीद्वेष्टेपणा मनावर घेऊ नये
छोटा हय वह.

शुचि's picture

7 Apr 2014 - 9:59 pm | शुचि

छोटा हय वह.

हाहाहा

पयशे संपले तरी हरकत नाही....

रुपये तर राहतात ना?

(रामदास काका, जरा हलकेच घ्या. आता असा फुलटॉस बॉल मिळाल्यावर कसा काय सोडायचा?)

Prajakta२१'s picture

7 Apr 2014 - 10:51 pm | Prajakta२१

हे सगळे वाचून गोंधळात भर पडलीये ….
गणपती आणि कार्तिकेयाच्या भांडणात पार्वतीने गणपतीची बाजू घेतली म्हणून चिडून जाऊन कार्तिकेय हा स्त्रीद्वेष्टा झाला आणि आई वर रुसून दूर निघून गेला मग पार्वतीने सोळा सोमवार व्रत केले तो परत येण्यासाठी.. असे ऐकले होते
खरे काय हे तो महादेवच जाणे !

अप्पा जोगळेकर's picture

8 Apr 2014 - 12:03 am | अप्पा जोगळेकर

ळ लखू रिसबूड अगदी स्वच्छ आठवत असताना उगाच कार्तिक स्वामी वगैरे पुराणात जायचे काहीच कारण नव्हते. खाजवून खरूज काढणे, बूंद से गयी तवो हौद से नही आती, बैलास जशी तांबडी चिंधी वगैरे वाक्प्रचार मनात चमकून गेले.़काललखू रिसबूड अगदी स्वच्छ आठवत असताना उगाच कार्तिक स्वामी वगैरे पुराणात जायचे काहीच कारण नव्हते. खाजवून खरूज काढणे, बूंद से गयी तवो हौद से नही आती, बैलास जशी तांबडी चिंधी वगैरे वाक्प्रचार मनात चमकून गेले.

उगाच कार्तिक स्वामी वगैरे पुराणात जायचे काहीच कारण नव्हते

बॉर्र!!! चालू द्या!!

बॅटमॅन's picture

8 Apr 2014 - 12:06 am | बॅटमॅन

कुमार वयातल्या तथाकथित लुटुपुटूच्या स्त्रीद्वेष्टेपणावर बरंच काही बोलून झालं, पण कुमारवय सरलं, लग्नबिग्न होऊन पोरं झाली तरी पुरुषद्वेषाचा टाहो फोडला जातो त्याबद्दल मात्र सहानुभूती दर्शवली जाते हे अतिशय रोचक आहे. हा नक्की कसला रडीचा डाव आहे देव जाणे. अन मजा म्ह. याबद्दल कधी कोणी बोलत नाही. हा टॅबू सबजेक्ट आहे का?

(हा प्रतिसाद जसाच्या तसा राहील याची शाश्वती अर्थातच नै- जर नै राहिला तर ज्यांना झोंबायचं त्यांना झोंबेलच म्हणा. तज्जन्य बाललीलांचे साक्षी समस्त मिपाकर होतीलच.)

अप्पा जोगळेकर's picture

8 Apr 2014 - 12:09 am | अप्पा जोगळेकर

अर दादा, तू खरे काकांचा मध्य वयातील वादळ हा लेख कसा विसरतोस.

अहो अपवादाने नियमच सिद्ध होतो.

वेट अ मिनिट. अप्पासाहेब, अहो माझा रोख मध्य वयात शरीरात होणार्‍या बदलांवर नव्हताच- पुरुषद्वेषावर होता. तो लेख यावर फोकस्ड नाही. त्याचा इशय वेगळाच आहे.

शुचि's picture

8 Apr 2014 - 12:25 am | शुचि

धन्यवाद बॅटमॅन.

अप्पा जोगळेकर's picture

8 Apr 2014 - 12:29 am | अप्पा जोगळेकर

माझ्या रिप्लाय्चा रोखही वेगळाच आहे. आसो.

त्याबद्दल मात्र सहानुभूती दर्शवली जाते हे अतिशय रोचक आहे.

कोणत्याच द्वेषाबद्दल सहानुभूती नाही रे.

Pain's picture

6 May 2014 - 10:23 am | Pain

बाडिस.

लेकराने आईवर रुसून तिच्यासोबत कट्टी केली तर ते लगेच स्त्रीद्वेष्टे ठरते काय ?
कार्तिकेयाने कोणत्याही स्त्रीला "केवळ" ती स्त्री म्हणून त्रास दिला असल्यास तो द्वेष्टेपणा असू शकतो. अन्यथा नाही.
उगा आपले काहीच्या काही..

एक तर कुमारवयातील तात्पुरता (phase only ) स्त्रीद्वेश्तेपणा बद्दल बोलणं चाललय. परत कोणत्याही स्त्रीचे तोंड पहाणार नाही या प्रतिज्ञेच्या आख्यायीकेसंदार्भात ते आहे. पूर्ण वाचा आधी.

अनन्त अवधुत's picture

8 Apr 2014 - 5:32 am | अनन्त अवधुत

'तात्पुरत्या' स्त्रीद्वेष्टेपणाचा उल्लेख कुठे आहे. आणि असेल तर तुमची तात्पुरत्या स्त्रीद्वेष्टेपणाची व्याख्या सांगा.
६ मातृकांनी मोठा केलेला कुमार त्या वयात देव सेनेचा सेनापती होता. त्याच कुमार वयात त्याने तारकासुराचा पराभव केला. कुमार वयात त्याने इतका मोठा पराक्रम केला म्हणून त्याचे त्या वयातले रूप भजले जाते ना कि कुमार वयातल्या आवडी/ निवडी सांगायला.

असो लेकरू हा शब्द व कट्टी ही कन्सेप्ट आवडली :)

अनन्त अवधुत's picture

8 Apr 2014 - 5:33 am | अनन्त अवधुत

:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Apr 2014 - 5:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

शुचे, तू पण नास्तिक होऊन जा पाहू. अश्विन-कार्तिक काही लफडीच नाहीत.

प्यारे१'s picture

8 Apr 2014 - 1:24 pm | प्यारे१

नास्तिक म्हणजे?

सौदीतले कायदे सांगण्यात अर्थ काय आहे? ते लोक तसेही मनाने ७व्या शतकाच्या पुढे आलेलेच नाहीत.

मूकवाचक's picture

8 Apr 2014 - 3:20 pm | मूकवाचक

कार्तिकस्वामी व कुमार वयातील स्त्रीद्वेष्टेपणा हे दोन स्वतंत्र विषय आहेत. असो.