गेले अनेक दिवस ठाकरे बंधुंंमधे कलगीतुरा झडतो आहे. कुणी कुणाला सूप पाठवले, कुणी कुणाला फोन करायला हवा होता , बाळासाहेबांचे स्मारक कधी, कसे, किती पैशात वगैरे वगैरे अनेक निरर्थक मुद्दे उगाळले गेले. नेहमीची राडेबाजी, मारामार्या वगैरे "विधायक" कार्यक्रमही उत्साहात पार पडले.
ह्या कुठल्याही मुद्द्यांत जनतेचे भले करण्याची भाषा नाही. निव्वळ वारसाहक्कावरून भाऊबंदकी. ह्या लोकांकडे सत्ता नसती तर कुठल्या सामान्य कुटुंबात होणार्या भाऊबंदकीत आणि ह्या भांडणात काही फरक नाही.
निवडणुकीच्या तोंडावर असली भांडणे सुरु करून ती चिघळत ठेवणार्या ह्या दोन्ही पक्षांना सुज्ञ मतदार तांदळातील खड्यासारखे बाजूला सारू शकतात. पण दुर्दैवाने आपले मतदार तसे नाही. ह्या पोकळ वरकरणी भावनेला हात घालणार्या भाषणांना लोक बळी पडतील असेच दिसते आहे.
माझी इच्छा अशी आहे की ह्या दोन्ही पक्षांना (म्हणजे अर्थातच "त्या" दोघांना) लोकांनी जोरदार धूळ चारावी आणि मतपेटीतून एक सणसणीत श्रीमुखात भडकवून त्यांना शुद्धीवर आणावे. पण दुर्दैवाने मोदी लाटेचा दोघांना फायदा होईल अशीच लक्षणे दिसत आहेत.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/shiv-sena-slam...
प्रतिक्रिया
5 Apr 2014 - 9:43 pm | अत्रुप्त आत्मा
5 Apr 2014 - 9:50 pm | हुप्प्या
केतकरांशी मी कधी सहमत असेन असे वाटले नव्हते. पण ह्याच विषयावर त्यांचा हा अग्रलेख.
http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-editorial-divya-marathi-4571...
6 Apr 2014 - 8:00 pm | आजानुकर्ण
हुप्प्यांशी मी कधी सहमत असेन असे वाटले नव्हते मात्र या लेखाशी संपूर्ण सहमत.
6 Apr 2014 - 1:02 am | खटपट्या
कंटाळा आला आहे दोघांची भांडणे ऐकून.
शिवसेनेचे मनसे बरोबर पटत नाही
भाजपचे शिवसेनेशी पटत नाही
कोन्ग्रेस चे राष्ट्रवादी बरोबर पटत नाही
मनसे चे भाजप बरोबर पटते पण एकत्र येवू शकत नाहीत
कोन्ग्रेस चे राष्ट्रवादी बरोबर पटत नसताना दूर जाऊ शकत नाहीत
आप चे कोणाबरोबरही पटत नाही. पण एक हाती सत्ता आणण्याएवढी ताकद नाही.
मतदार गोंधळलेला आहे
6 Apr 2014 - 2:34 am | एकुलता एक डॉन
हा लेख पण वाचनिया आहे
http://www.loksatta.com/loksabha/sattarth-blog-by-devidas-deshpande-on-c...
6 Apr 2014 - 9:57 am | विवेकपटाईत
जगाची रीत आहे. दिल्लीत एक म्हण आहे 'बादशाह के बेटों के नसीब मे या तो तख्त (सिंहासन) होता है तख्ता . भावांना मारल्याशिवाय गादी मिळणे अशक्य. महाभारतापासून चालत आलेली रीत आहे. आता युद्ध होत नाही तर तोंडी शस्त्र चालतात. त्यात नवल काय. अनेक उदाहरणे आहेत
शिंदे भाऊ बहिण, राहुल आणि वरूण (एकाला वारसा मिळाला आणि एकाला वनवास)
6 Apr 2014 - 11:02 am | श्रीगुरुजी
राज ठाकरे पवारांच्या योजनेनुसार काम करत आहे असं दिसतंय. एकीकडे पवारांना अचानक राजप्रेमाचा उमाळा आला आहे व गेल्या काही दिवसांपासून ते राज व मनसेवर स्तुतीसुमने उधळण्यात मग्न आहे. दुसरीकडे वडे, सूप, कोणी कोणाला फोन करून असे पूर्णपणे विसंगत विषय भाषणात आणून राज प्रचार भलतीकडेच नेण्यात यशस्वी झाला आहे. राजच्या योजनेला उद्धव बळी पडल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीतले मुख्य मुद्दे सोडून उद्धवला भलत्याच विषयांवर बोलणे भाग पडत आहे.
मनसेची स्थापना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हितासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने योजना आखून केली हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.
6 Apr 2014 - 12:42 pm | मारकुटे
>>>मनसेची स्थापना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हितासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने योजना आखून केली हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.
अगदी योग्य !!
6 Apr 2014 - 10:07 pm | श्रीगुरुजी
अगदी २ महिन्यांपूर्वीपर्यंत मनसे पक्ष म्हणून संपल्यातच जमा होता. युती व आघाडी अशा दोघांनीही मनसेला आपल्यात घेतले नव्हते. मुळात मनसेला जेमतेम ५-६ टक्के मिळाली होती. 'आप'च्या उदयानंतर महाराष्ट्रात मनसेला सुद्धा अजून एक पर्याय निर्माण होऊन मनसे पूर्णपणे निष्प्रभ पक्ष झाला होता. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. युतीबरोबर समझोता करण्याचा पक्षांतर्गत दबाव वाढत होता.
अगदी अशा नेमक्या वेळी थोरले पवार मनसेच्या मदतीला धावून आले. पक्षाची परवानगी न घेता गडकरींनी राजची भेट घेऊन राजला विनाकारण महत्त्व प्राप्त करून दिले. मनसेने लोकसभा निवडणुक लढवू नये अशी गडकरींनी अत्यंत अव्यहार्य व अतर्क्य विनंती राजला करून पूर्णपणे निष्प्रभ झालेल्या पक्षाला नवसंजीवनी प्राप्त करून दिली व मनसे हा गंभीर दखल घेण्याजोगा पक्ष आहे असे वातावरण निर्माण केले. गडकरींनी हे पवारांच्या सूचनेनुसारच केले असावे.
त्यानंतर पुण्यात सभेसाठी मैदान द्यावे असा स. प. महाविद्यालय व्यवस्थापनावर आर आर पाटलांनी दबाव आणून सेना-भाजपच्या बालेकिल्ल्यात मनसेला सभा घेण्यासाठी मैदान मिळवून दिले.
नंतर गेले काही दिवस थोरले पवार मनसेवर स्तुतीसुमने उधळत आहेत.
गडकरी व पवारांचे साटेलोटे लपून राहिलेले नाही. राष्ट्रवादी मनसेला आतून मदत करत आहे हेदेखील लपून राहिलेले नाही. फक्त सेना-भाजपच्या मतांमध्ये फूट पाडणे या एकमेव उद्देशासाठीच मनसेला काँग्रेस-राष्ट्रवादीने जन्माला घातलेले आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेमुळे युतीचे १० उमेदवार पडले होते. तर विधानसभा निवडणुकीत मनसेच्या १३ व मतांच्या विभाजनामुळे अजून २५ अशा तब्बल ३८ जागांवर युतीचा पराभव झाला होता. गुहागरची हमखास जागासुद्धा गडकरींमुळे राष्ट्रवादीकडे जाऊन युतीने ३९ वा आमदारही घालविला. मनसे नसती तर २००९ मध्ये युती १३३ व आघाडी ११८ अशी स्थिती झाली असती व युतीला सरकार स्थापनेसाठी जोरदार संधी मिळाली असती.
6 Apr 2014 - 11:58 am | जातवेद
म्हणजे काय कॉग्रेस ला मतदान करायचे म्हणता?
6 Apr 2014 - 12:47 pm | नितिन थत्ते
हो अर्थातच ते तसं म्हणतायत....
कुमार केतकरांशी सहमत आहेत असं सुद्धा म्हणतायत.
6 Apr 2014 - 10:07 pm | हुप्प्या
सुदैवाने अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आम आदमी पार्टी आहे, कित्येक ठिकाणी अन्य अपक्ष लोकही चांगले आहेत. पण असल्या स्वार्थी, निव्वळ नातेसंबंधावर आधारित हेव्यादाव्यांपेक्षा काँग्रेस वा राष्ट्रवादी बरी.
असे वागून चालणार नाही इतपत धडा ह्या उन्मत्त नेत्यांना मिळावा अशी इच्छा आहे.
जिथे लोकांना चार पाच किलोमीटर चालून, पायपीट करून मुलाबाळांना पाणी पाजता येते तिथे ह्यांची त्यांच्या मरणासन्न नेत्याला चिकनसूप कोणी पाजले ह्याची अहमहिका लागली आहे. उन्हाळा तोंडावर आलेला असताना जनतेला ह्या गोष्टीचे सोयरसुतक का असावे?
6 Apr 2014 - 12:15 pm | आत्मशून्य
6 Apr 2014 - 2:25 pm | black pearl
*bad* :-! :! :-~ ;-~ :(~ +(~ =(~ :bad:
6 Apr 2014 - 2:41 pm | कानडाऊ योगेशु
म.न.से, शिवसेना व बी.जे.पी ह्या व्यतिरिक्त कुणा चौथ्याला मत म्हणजे काँग्रेसला मत. आणि पुन्हा म.न.से,शिवसेना व बी.जे.पी ह्यामधील कुणा एकाला मत म्हणजे मतविभागणी. म्हणजे पुन्हा काँग्रेसलाच मत. ह्या त्रांगड्यामुळे काँग्रेसला जणु फीहीटच मिळाली आहे आणि निवडणुकीआधीच महाराष्ट्रात काँग्रेसला विजय मिळाला आहे.
8 Apr 2014 - 5:14 pm | सूड
हे बाकी खरं !!
7 Apr 2014 - 5:07 pm | शिद
अगदी मनातले लिहीले आहे... काय तो बाष्कळ्पणा चालवलाय दोघांनी.
कोणाला काय फरक पडणार आहे ह्यांच्या घरातल्या अंतर्गत कुरबूरीचा. विकास काय केला कींवा काय करणार ह्या बद्दल चकार शब्द नाही फक्त ऐकमेकांवर चिखलफेक... बस्स्स.
7 Apr 2014 - 5:30 pm | चिरोटा
तरी नशीब ह्यांच्या सभांना 'लाखांची गर्दी होत नाही व दोघांनाही राष्ट्रीय स्तरावर नगण्य किंमत आहे.
8 Apr 2014 - 7:40 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
भाऊबंदकी हा मराठी लोकांना असलेला शापचं आहे. बस योग्य उमेदवाराला मतं द्या. जे साठ वर्ष सत्ता उपभोगुन सुद्धा विकास करु शकले नाही आणि पुढ्च्या वेळेला विकासासाठी आम्हालाच संधी द्या म्हणत आहेत त्यांना अथवा त्यांच्या पिल्लावळीला मत द्यायचं का नाही ते सुज्ञपणे ठरवा. आपण किती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष टॅक्स भरतो आणि त्यातुन कोणाचा विकास होतोय त्याच्यावर एक विचार होऊन जाऊ दे. :).
8 Apr 2014 - 9:00 am | विवेकपटाईत
मत देण्या आधी अवश्य वाचा:
माझ्या गर्भातून जन्मले असले तरी, ती सर्पांची (शत्रूची) पिल्ले आहेत,
8 Apr 2014 - 9:02 am | विवेकपटाईत
माझ्या गर्भातून जन्मले असले तरी, ती सर्पांची (शत्रूची) पिल्ले आहेत,
8 Apr 2014 - 5:06 pm | पुणे तिथे काय उणे
ह्या दोन्ही पक्षांना (म्हणजे अर्थातच "त्या" दोघांना) लोकांनी जोरदार धूळ चारावी आणि मतपेटीतून एक सणसणीत श्रीमुखात भडकवून त्यांना शुद्धीवर आणावे.
>>> पण यामुळे युतिची सत्ता स्थापनेची सन्धी जाइल आणि परत त्याचा फायदा कोन्ग्रेसलाच होइल. त्यापेक्शा आत्ता युतीसाथी मत देउन नन्तर होणार्या विधान्सभा निवड्णुकीत ह्या दोघान्ना धडा शिकवावा.
18 Apr 2014 - 8:29 pm | आयुर्हित
माझ्या मते, राज ठाकरेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचे डोहाळे लागलेले आहेत, असेच दिसते
उद्धव-राज एकत्र येऊ शकतात
उद्धव ठाकरे व माझ्यात कुठलेही घरगुती वाद नसून राजकीय मतभेद आहेत आणि भविष्यात कदाचित आम्ही एकत्र येऊही शकतो असे उद्गार मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत काढले आहेत. सीएनएन-आयबीएनला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुढे काहीही घडू शकते हे सांगताना उद्धव-राज एकत्र येऊही शकतात असे सूचक विधान करून विधानसभेच्या निवडणुकांमध्ये वेगळे चित्र बघायला मिळेल असे संकेत त्यांनी दिले आहेत.
नरेंद्र मोदींना आपला पाठिंबा असून आपले खासदार त्यांना बिनशर्त पाठिंबा देतील असे सांगत भाजपाला आपला पाठिंबा नाही व राजनाथ सिंहांना आपण महत्त्व देत नाही याचा पुनरुच्चार ठाकरेंनी केला. यंदा अकरा जागांवर मनसे लोकसभेच्या निवडणुका लढवत असून त्यातील केवळ दोन जागांवर त्यांचा सामना भाजपाच्या उमेदवाराशीही आहे. बाकी ठिकाणी मनसे व शिवसेना आमने सामने आहे. भाजपाच्या मतांची विभागणी टाळण्यासाठी त्यांनी ही खेळी खेळल्याचे बोलले जात असले तरी मी मला पाहिजे त्या ठिकाणी उमेदवार दिल्याचे व माझी काय ताकद आहे हे निवडणुकीनंतर दिसणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
21 Apr 2014 - 4:56 pm | बालगंधर्व
भौ बनदकीए असले तरे मननेय बलासहेब थकरे गेलयापासुन शिवसेनाअमधये रम रहिला नहे. उह्दव थक्रे हे नेमी बयकासारके भनदत असतत. हेनी अस केला तेने तस केला. अमाला असा अवदत नहे. अमला तसा अवदत नहे. कुहुप बोर होताआ त्यनच भशन अयकुन. तयपेश्का राज थाक्रे च्नग्ले अहेत. ते जे बोतलाआत, ते क्रुन दकवतात. अनि जरे इथे कितिहि भनद्ले हे लोक तरे शेवते निवदुन अले/ तर मोदिसहेब प्रन्तप्रधन होनर अहेत. शरद पवर सहेब अता महतरे झलेत.
21 Apr 2014 - 5:42 pm | दुश्यन्त
२००९ला मनसेचे जे आकर्षण मतदारांना होते ते आता राहिले नाही.माझे आमदार विधानसभेत ह्याव करतील त्यांव करतील वगैरे राज ठाकरे म्हणत असत.त्यांचे जे १२-१३ आमदार निवडून आले ते सभागृहात आणि बाहेर सेटिंग करत असतात. विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसला मदत, मुंबई-ठाणे मनपा मध्ये कॉंग्रेस-एनसीपीला मदत,नाशिकमध्ये सत्ता असून प्रभाव पाडता न येणे, टोल वगैरे आंदोलन करून मध्येच माघार घेणे यामुळे मनसेचा जोर ओसरला आहे. राज यांच भाषण तरी काय असत. त्रासिक चेहऱ्याने टीका करायची, नकला, शिव्या, मध्येच बाळासाहेबांचा येणारा उमाळा.लोक पण आता कंटाळले म्हणून सभांना पूर्वीसारखी गर्दी होत नाही त्यामुळे काही सभा बंद कराव्या लागल्या.मोदींमुळे युवा मतदार महायुतीकडे वळतोय म्हणून हे पण मोदी मोदी करत आहेत. आणि राजनाथसिंह कोण असे राज यांनी विचारणे म्हणजे खरोखर जोक आहे.मोदीना पंतप्रधान करण्यासाठीच मत द्यायचं तर मग अधिकृत महायुतीच्या उमेदवाराला का मत देवू नये असा प्रश्न मतदारांनी विचारण्यपूर्वी मनसेचे कार्यकर्तेच एकमेकांना विचारात असतील.एकूण मनसे आणि राज ठाकरे म्हणजे संभ्रम अशी लोकांची धारणा होताना दिसतेय.राज ठाकरेंनी मोदीनामाचा आधार न करता (आणि केवळ शिवसेनेविरुद्ध उमेदवार उभे न करता) प्रामुख्याने सत्ताधारी आघाडीला लक्ष्य करून प्रचार केला असता तरी मनसे केवळ शिवसेनेला अपशकून करण्यासाठीच राजकारण करत आहे अशी लोकांची धारणा झाली नसती. मात्र हे न झाल्याने आता मनसेला मत म्हणजे कॉंग्रेस आघाडीला सपोर्ट हे समीकरण लोकांना पटवून देण्यात महायुती बर्याच प्रमाणात यशस्वी झाली आहे.
21 Apr 2014 - 5:56 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
सुरुवातीला स्वतः अस्तित्व सिद्ध करायचा प्रयत्न करायचा.वेळ पडली तर मारामारी,हाणामारी करून प्रसिद्ध व्ह्यायचा प्रयत्न करायचा.
ईतर राज्यांत जनतेने तेथील स्थानिक राजकिय पक्षांना निवडून दिले.द्रमुक असो वा तृणमूल वा बिजु जनता. हा प्रयोग आपल्या महाराष्ट्रात कधी यशस्वी का नाही झाला? केवळ टगेगिरी किती काळ करणार?
(महाराष्ट्रात केव्हातरी स्थानिक पक्ष सत्तेवर येतील अशा आशेवर असणारी) माई
21 Apr 2014 - 6:17 pm | दुश्यन्त
शिवसेना, मनसे आणि एनसीपी हे राज्यातले स्थानिक पक्षच आहेत.म्हणायला एनसीपीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला असला तरी तो पक्ष स्थानिकच (खास करून प महाराष्ट्रात अस्तित्व असणारा) आहे. आणि एनसीपी मधील नेत्यांचे प्रताप (भ्रष्टाचार, जमिनी हडपणे, बेताल वक्तव्ये आणि जातीयवाद (मराठा सोडून इतर जाती जसे कि ओबीसी, दलित, ब्राह्मण यांचा छुपा/उघड विरोध, संभाजी बीग्रेडला रसद वगैरे)) या गोष्टी लक्षात घेतल्या तर राज्यात एकवेळ कॉंग्रेस परवडली पण एनसीपी नको असे वाटते. अर्थात एनसीपी आणि कॉंग्रेसची आघाडी आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप-आर पी आय महायुती सत्तेत यायला हवी. भाकरी पालटायला हवी अन्यथा आपण काहीही केले तरी निवडून येतो या भ्रमामुळे सत्ताधार्यांचे प्रताप वाढत जातील. मनसे महायुती बरोबर विधानसभा निवडणुकीपूर्वी जाइल कि नाही माहित नाही मात्र निवणुकीनंतर महायुती + मनसे एकत्र सत्तेत येतील अशी शक्यता वाटते.असे झाले तर शिवसेना आणि मनसे हे स्थानिक पक्ष सत्तेत येतील अशी शक्यता आहे. तरी राष्ट्रीय पक्षांना (भाजप/कॉंग्रेस) बरोबर न घेता स्थानिक पक्ष सत्तेत येतील अशी शक्यता महाराष्ट्रात खूप कमी आहे.