केजरीवालांचे आजचे काशीतले भाषण १५-२० मिनिटे पाहत होतो. केजरीवालांनी अत्यंत नकारात्मक भाषण केले. संपूर्ण वेळ फक्त मोदींवर टीका करत होते. निवडून आलो तर आपण स्वतः किंवा आपला पक्ष नक्की काय करणार आहे याविषयी भाषणात चकार शब्द नव्हता. मोदी निवडून आले तर तुमचे कसे वाटोळे होईल हाच भाषणातला मुख्य मुद्दा होता. बाकी काहीच नव्हते. मोदी कसे वाईट आहेत, मोदी आणि राहुल अंबानी-अदानींच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देशातील लघूउद्योग संपुष्टात येतील आणि शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील, मोदी निवडून आल्यास वाराणशीतले सर्व लघुउद्योग बंद पडतील व आजूबाजूच्या शेतकर्यांना आत्महत्या कराव्या लागतील, नरेंद्र मोदींनी केवळ बड्या उद्योगपतींचा विकास केला आहे. मोदींच्या गुजरातमध्ये आतापर्यंत तब्बल ६०,००० लघुउद्योग बंद झाले, मोदींनी शेतक-यांच्या जमिनी हिसकावून अदानी आणि अंबानी यांना दिल्या, मोदी प्रत्येकवेळी मतदारांना धमक्या देऊन निवडून येतात ... मोदीनिंदा, मोदीनिंदा आणि मोदीनिंदा ... या व्यतिरिक्त त्यांच्या भाषणात काहीच नव्हते.
आपला पक्ष महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी इ. कशी कमी करणार आहे, देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपल्याकडे काय योजना आहेत, देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा आपण कशी करणार आहोत, आपल्या पक्षाचे परराष्ट्र धोरण काय आहे, शेतकर्यांसाठी आपण काय करणार आहोत, आपल्याकडे विकासाच्या कोणत्या कल्पना आहेत या व अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी चकार शब्दही काढला नाही.
नेहमीच्या पद्धतीनुसार नाटकीपणा केलाच. सकाळी माध्यमांना सोबत घेऊन गंगेत डुबक्या मारल्या. नंतर भाषण सुरू असताना मध्येच ३-४ मिनिटे थांबले. कारण हे होते की कुठूनतरी मशिदीतली बांग ऐकू येत होती. बांग संपेपर्यंत थांबून आणि सकाळी गंगेत डुबक्या मारून आपली दिखाऊ धर्मनिरपेक्षता व लांगूलचालन दाखवून दिले. आजूबाजूला बरीच मुस्लिम वस्ती असलेले मैदान निवडण्यातही काँग्रेससारखीच चतुराई दिसली.
१९८७-८९ या काळात वि.प्र.सिंग जशी नाटके करत असत तसेच केजरीवालांनीही आज केले. त्यांनी अंबानी बंधूंचे स्विस बँकेत खाते असून यामध्ये कोटीच्या-कोटी काळा पैसा असल्याचा आरोप केला व अंबानी बंधूंच्या स्विस बँकेतील खाते क्रमांकही जाहीर केले- खाते क्रमांक- ५०९०१६०९८३ आणि ५०९०१६०९८४. वि.प्र.सिंग यांनीही बोफोर्स प्रकरण जोरात असताना राजीव गांधींच्या स्विस बॅंक खात्याचे क्रमांक असेच जाहीर केले होते. त्याच धर्तीवर केजरीवालांनी तोच नाटकीपणा केला. परंतु २०१४ मधील मतदार १९८८ च्या तुलनेत जास्त शिक्षित आहे याची त्यांना कल्पना नसावी.
एकंदरीत एक अत्यंत नकारात्मक भाषण व कमालीचा नाटकीपणा केजरीवालांनी आज वाराणशीत केला.
---------------------------------------------------------------------------
केजरीवाल व इतरांवर आज वाराणशीत शाई फेकल्याचे दाखवत होते. यापूर्वी योगेंद्र यादवांना शाई फासणारा 'आप'चाच कार्यकर्ता होता. 'आप'ने त्याच्याविरूद्ध काहीच कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी हरयानामध्ये केजरीवालांना काळे झेंडे दाखविणारे 'आप'चेच कार्यकर्ते होते. मनीष सिसोदियांना पाटण्यामध्ये काळे झेंडे दाखविणारे देखील 'आप'चेच कार्यकर्ते होते. स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यासारखी खोडसाळ कृत्ये करून सहानूभूती मिळविणे आणि इतर पक्षांवर दोष ढकलणे ही 'आप'ची नवीन स्ट्रॅटेजी दिसतेय.
प्रतिक्रिया
28 Mar 2014 - 4:14 pm | संजय क्षीरसागर
अशा वेळी बॅक-अॅरो क्लिक केला की प्रतिसाद पुन्हा दृगोचर होतो
28 Mar 2014 - 4:33 pm | ऋषिकेश
तो पूर्वपरिक्षण केले असेल तर होतो. मी थेट प्रकाशित करा वर क्लीकवले होते :(
29 Mar 2014 - 11:19 am | संजय क्षीरसागर
आभारीये.
29 Mar 2014 - 10:42 am | संजय क्षीरसागर
तुमच्या आदर्शांची बायोग्राफी (काय तर म्हणे मगर पकडून शाळेत नेली!) इतपत आहे. त्यामुळे इतकी प्रगल्भ बॅकग्राऊंड कळणं अवघड आहे.
न तुम्हाला इन्कमटॅक्सच्या हायरार्कीचा अनुभव दिसतोयं न सरकारी प्रोसिजर्सचा.. इतक्या कमी कालावधीत Asstt Commissioner या पदावरनं Jt Commissioner of Income Tax अशी पदोन्नती घरी बसून मिळत नाही. त्यात कार्यकौशल्य आणि कामाचा झपाटा लागतो. ज्या पद्धतीनं तुम्ही प्रतिसाद देतायं त्यावरनं Jt Commissioner of Income Tax ही काय चिज असते याची तुम्हाला शून्य माहिती आहे. इतक्या Highest Post वरनं राजीनामा देणं येरागबाळ्याचं काम नाही. (व्यक्तिगत जीवनात असा विचार करण्याचं साहस करणं देखिल मुश्कील आहे). अर्थात या अधी तुम्ही स्वतःच्या पोस्टमधे इतकी बेभान वक्तव्यं केली आहेत (की त्याच वेळी मी लिहीलं होतं, अशी वक्तव्य इथल्या कोणत्याही सदस्याबद्दल केली असती तर आयडीची दशा झाली असती). तुमचा केवळ व्यक्तिगत द्वेष आहे आणि अत्यंत किरकोळ आणि तद्दन फालतू मुद्दे काढून त्यांच्यावर वैयक्तिक राळ उडवणं चालू आहे.
29 Mar 2014 - 11:09 am | संजय क्षीरसागर
Arvind Kejriwal earned a degree in Mechanical Engineering from IIT Kharagpur in 1989. He joined the Indian Revenue Service in 1992 and set up Parivartan in Jan 2000. He was a Deputy Commissioner of Income Tax in Nov 2000 (याचा अर्थ Asstt Commissioner ते Deputy Commissioner अशी पदोन्नती!) when he took two years sabbatical to work full time on Parivartan. He is currently on another two year leave working full time on Parivartan.
त्या काळात त्यांनी समाजकार्य केलं आहे! अर्थात त्याबद्दल सरकारनं त्यांना माफ करावं अशी अपेक्षा नाही. पण किमान सारसार विचार करतांना कोणताही सूज्ञ माणूस अशा कार्याची दखल घेईल... आणि व्यक्तिद्वेष असलेला फक्त कॉपी पेस्ट मारुन पुढचा फालतू मुद्दा काय काढावा याच्या शोधात राहील!
29 Mar 2014 - 1:03 pm | असंका
संजयजी, ३१ मार्च च्या दोन दिवस आधी तुम्हाला या असल्या पोस्ट वाचून त्यावर उत्तर द्यायला वेळ काढता येतोय? तुमची पोस्ट वाचल्याशिवाय रहावत नाही म्हणून आमचाही वेळ जातोय!
जरा एक एप्रिल पर्यंत थांबता का...? आम्ही पण दोन चार कामे संपवून सपोर्ट (मागूनच हां...) द्यायला येतो....कसं?
29 Mar 2014 - 1:24 pm | संजय क्षीरसागर
The only way to beat the Time is to be ahead of it!
कामं डेडलाईनपूर्वीच संपवण्यात मजा आहे. त्यात हा विषय जिव्हाळ्याचा आहे म्हणून वेळ काढतोयं (नाही तर टाईमपासचे इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत). एक एप्रिलपासनं मी बँक ऑडिटसाठी परगावी असणार आहे तस्मात होता होईल तेवढं केजरीवालांसाठी करण्यात आनंद आहे. साला, तो माणूस उघड्या जीपमधनं बिनधास्त फिरु शकतो आणि लोकात मिसळू शकतो. याला म्हणतात अंतर्बाह्य पारदर्शकता. नाही तर बाकीचे, विमानातून उतरायंच, भडकावू भाषण ठोकायचं, की निघाले पुढे. केवळ सत्तेचा हव्यास आणि बेरजेचं राजकारण. सीटस किती लागतील आणि नाही लागली तर कुणाशी हात मिळवून पंतप्रधान व्हायचं हीच विवंचना!
माझ्या अनुपस्थित (विचार पटले असतील तर) तुम्ही सपोर्ट करावा अशी विनंती आहे.
30 Mar 2014 - 8:51 am | असंका
आपण ज्यांना प्रतिसाद देत आहात, ते भारले गेल्याप्रमाणे किंवा कर्तव्य असल्याप्रमाणे प्रतिसाद देत आहेत. त्यांना समाधानकारक उत्तर देणे अवघड नसून अशक्य आहे. कुठ्ल्याही गोष्टीला हास्यास्पद करणे, ही फार सोपी गोष्ट आहे. गंभीर लोकांच्या बाबतीत तर फारच सोपे. केजरीवाल पळून गेला असं म्हणणं किती सोपं आहे...अगदी श्री़कृष्णाला रणछोडदास म्ह्णण्याइतके!! त्यामागे काही वैचारीक भूमिका आहे का हे कशाला बघायचे? पण केजरीवाल फक्त मुख्यमंत्रीपदावरून पळाला इत़कंच म्हणून विरोधक का थांबत आहेत? त्याआधी, तो सरकारी नोकरीतून पळाला, त्याच्याही आधी टाटा स्टील मधून पळाला, आणखी थोडे शोधले तर असे बरेच प्रसंग सापडतील की... मागे आमरण उपोषण जाहीर केले होते....मग तो अजून जिवंत कसा!! विरोध करणे महत्त्वाचे!!
अगोदर स्वतःला मुख्यमंत्री म्हणून सिद्ध करा, मग राष्ट्रीय पातळीवर या! ~२+२=४ (ज्योति बसू का एव्ह्ढे मागे पडले काय माहीत!~१९७७-२००० मुख्यमंत्री असूनही! २+२=४?)
त्याहून सोपे....सरकारी नोकरी पूर्ण करून मगच राजकारणात या. (मनमोहनसिंग!-आणि ते काय एकटे थोडेच आहेत..)
आणखी सोपे- चांगली टाटा स्टील मधली नोकरी होती....पुन्हा टाटा स्टील ला नवीन माणूस शोधायचा खर्च्...किती नुकसान या एका माणसामुळे.
थोडा जिव्हाळ्याचा विषय- नोकरी करायचीच नव्हती, तर, IIT/UPSC मधली एक जागा का अडवलीत्...एखाद्या गरजूला कामी आली असती....!!
(ज्यांची उद्दिष्टे मोठी असतात, त्यांना लहान गोष्टीत अडकून राहून चालत नाही, हे तर आम्हाला पण कळते. पण मग केजरीवालविरुद्ध प्रचार करण्याचे कर्तव्य कसे पार पाडणार?)
30 Mar 2014 - 10:11 am | नानासाहेब नेफळे
विचार करायला लावणारा प्रतिसाद.
30 Mar 2014 - 6:14 pm | बंडा मामा
उत्तम प्रतिसाद.
माझ्या मते हा चुकीचा समज आहे. आज पहिल्यांदा आपल्याला भारतात एका नॉन कन्व्हेश्नल पक्षाला लोकसभेत आणायची संधी मिळाली आहे. भले ३-४ खासदार येतील, पण ही सुरुवात होणे फार गरजेचे आहे. जेव्हा आआप नव्हता तेव्हा आपण सगळेच एक्स्क्युज द्यायचो की काय करणार पर्यायच नाही, सगळ्याच पक्षात भ्रष्ट नेते आहेत, सगळेच पक्ष सत्तेला हापापलेले आहेत इ.इ. आता पर्याय निर्माण होतो आहे तर पुन्हा एकदा नव्या एक्स्युजच्या शोधात आहोत. हा दबावगट लोकसभेत निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे.
30 Mar 2014 - 6:55 pm | गब्रिएल
माग्च्या वर्साला तुमी इयर येन्ड्ला बिजी र्हानार म्ह्नून पर्तिसाद न्हाय देना म्हनाला व्हता नाय्का? म्हंजे या येळेला प्रगतिच म्हनायचि की वो ! कांग्रेस... आप्ल त्ये कांग्रासुएल्न्स... का तसच कायबाय ;)
29 Mar 2014 - 8:10 pm | श्रीगुरुजी
>>> साला, तो माणूस उघड्या जीपमधनं बिनधास्त फिरु शकतो आणि लोकात मिसळू शकतो. याला म्हणतात अंतर्बाह्य पारदर्शकता. नाही तर बाकीचे, विमानातून उतरायंच, भडकावू भाषण ठोकायचं, की निघाले पुढे. केवळ सत्तेचा हव्यास आणि बेरजेचं राजकारण. सीटस किती लागतील आणि नाही लागली तर कुणाशी हात मिळवून पंतप्रधान व्हायचं हीच विवंचना!
स्वतःवर शाई फेकण्याचे इव्हेंट्स् स्वतःच्या कार्यकर्त्यांकडूनच मॅनेज करायचे, स्वतःला मारहाण झाल्याचे इव्हेंट्स् स्वतःच्या कार्यकर्त्यांकडूनच मॅनेज करायचे आणि नंतर मारहाण करणार्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना अहिंसेचे डोस पाजण्याचे नाटक करून आपण आधुनिक गांधीबाबा असल्याचा आव आणायचा, भेटीची वेळ न मागता आणि न ठरवता थेट मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर जाऊन धडकायचं आणि मुख्यमंत्र्याकडे अशा न ठरविता आलेल्या आगंतुकांना भेटायला वेळ नसला तर "तुम्ही मला भेटत नाही, म्हणजे तुम्ही मला घाबरलात आणि तुम्ही भ्रष्टाचारी आहात" असा स्वतःच न्यायनिवाडा करून स्वतःचीच पाठ थोपटून घ्यायची, कोणताही पुरावा आणि आधार नसलेले बेलगाम आरोप बिनधास्त करायचे आणि आरोप सिद्ध करण्याची कोणतीच जबाबदारी घ्यायची नाही, स्वतःच मुलाच्या डोक्यावर हात ठेवून घेतलेल्या शपथा मोडायच्या, निवडणुकीच्या आधी जी आश्वासने दिली त्याच्या बरोबर विरूद्ध वर्तन निकाल लागल्यावर करायचे, माझ्या बरोबर चहा प्यायचं तिकीट ५ हजार रूपये, माझ्याबरोबर जेवायचं तिकिट २० हजार रूपये कारण मी आम आदमी, बांग ऐकू आली की राष्ट्रगीत सुरु असल्यासारखे गप्प उभे रहायचे आणि खरीखुरी जबाबदारी स्वीकारायची वेळ आली की धूम पळून जायचे ... यालाच म्हणतात अंतर्बाह्य पारदर्शकता!
29 Mar 2014 - 9:56 pm | संजय क्षीरसागर
आता फक्त इतकंच म्हणा की त्यांनी सोनिया गांधीं आणि मोदी दोघांकडून एकावेळी सुपारी घेतली आहे. पण त्या दोघांनाही याची कल्पना नाही.... फक्त श्री गुरुजींनाच ही आतली बातमी माहिती आहे!
29 Mar 2014 - 10:53 pm | नानासाहेब नेफळे
संजयजी ,हे श्रीगुरुजी माझ्या एका प्रतिसादाचे उत्तर न देताच धाग्यावर इतरत्र प्रतिवाद करत आहेत ,
नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळातील 'स्वच्छ' आणि कार्यक्षम मंत्री बाबु बोखिरीया आणि पुरषोत्तम सोलंकी यांच्या विषयी एक प्रतिसाद मी लिहला होता, त्याचा प्रतिवाद न करताच श्रीगुरुजींनी चर्चा पूढे चालू ठेवली आहे.
कृपया आपण त्यांना माझ्या मुद्द्याचा प्रतिवाद करावा अशी मित्रत्वाची विनंती करावी, अशी मी आपल्याला मित्रत्वाची विनंती करतो.
हे बघा या इथे तो मुद्दा आहे.
http://www.misalpav.com/comment/566824#comment-566824
29 Mar 2014 - 11:57 pm | संजय क्षीरसागर
ते अलाँग विथ तोतया प्रेसिडेंट, पापभीरु आणि कॉपीपास, ही बिजेपी टीम फक्त फालतू मुद्दे आणि इकडची तिकडची आकडेवारी घेऊन चर्चा करण्यात वाकबगार आहेत.
30 Mar 2014 - 2:39 pm | श्रीगुरुजी
>>> ते अलाँग विथ तोतया प्रेसिडेंट, पापभीरु आणि कॉपीपास, ही बिजेपी टीम फक्त फालतू मुद्दे आणि इकडची तिकडची आकडेवारी घेऊन चर्चा करण्यात वाकबगार आहेत.
मी माझ्या प्रत्येक प्रतिसादामध्ये पुरेसे पुरावे आणि सबळ आकडेवारी देऊन माझे मुद्दे मांडतो. तुम्ही निराधार आणि खोटे आरोप करण्यात वाकबगार आहात. "अरविंदबरोबर दीड तास" या धाग्यात तसूभरही पुरावे व आधार नसताना, "मोदींनी रिलीफ कॅम्प्सची मदत थांबवून ते बंद केले" असा धादांत खोटा आरोप केला होता. तो आरोप खोटा होता हे सिद्द करणारे मी पुरावे दिले होते. त्याचबरोबर तुम्ही जो आरोप करत आहात तो सिद्द करणारे पुरावे द्या असे अनेक वेळा सांगितले. शेवटी तुम्ही कबूल केलेत की तुमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, पण तरीसुद्धा तुम्ही आरोप चालूच ठेवणार.
पुरावे नसताना पूर्वग्रहदूषित खोटे आरोप करणे, नौटंकी, इव्हेंट मॅनेजमेंट, खोटी आश्वासने, जबाबदारी झटकून पलायन करणे इ. बाबतीत केजरीवाल कुप्रसिद्ध आहेत. तुमच्यासारखे त्यांचे अनुयायी त्यांचाच कित्ता गिरवत आहेत.
30 Mar 2014 - 3:05 pm | संजय क्षीरसागर
पोस्टवरचा तो प्रतिसाद नीट वाचावा. माझ्याकडे पुरावे नाहीत म्हणजे `राममंदिर (अजून तरी) बांधून झालं नाही' त्यामुळे पुरावा देता येत नाही असा आहे. पण विकासाच्या पडद्यामागे विभाजनाचा अजेंडा आहे याबद्दल मी कधीच माघार घेतलेली नाही.
स्वतः मोदींचं वक्तव्यं आणि वाजपेयींनी भर सभेत केलेलं वक्तव्यं (खरं तर मोदींची कानउघडणी) हे स्पष्ट पुरावे रिलीफ कँप्सबद्दल दिले होते. तुम्ही बहुदा सर्व प्रतिसाद नीट वाचले असते तर लक्षात आलं असतं की मोदींचं सदरहू भाषण गुजराथ सरकारनं दडवून ठेवलं होतं. आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ते एसायटीला देण्यात आलं.
30 Mar 2014 - 3:22 pm | श्रीगुरुजी
>>> पोस्टवरचा तो प्रतिसाद नीट वाचावा. माझ्याकडे पुरावे नाहीत म्हणजे `राममंदिर (अजून तरी) बांधून झालं नाही' त्यामुळे पुरावा देता येत नाही असा आहे.
तुम्हाला कणभर सुद्धा पुरावा देता आलेला नाही. तशी कबुली तुम्हीच दिली होती. रिलीफ कॅम्प्सची मदत थांबविली किंवा ते कॅम्प्स बंद केले असा जावईशोध तुम्ही लावला होता. प्रत्यक्ष काँग्रेसने सुद्धा आजतगायत असा आरोप केला नाही कारण तसे करणे म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास झाला असता. याउलट काँग्रेसच्या वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्याने (श्रीप्रकाश जैस्वाल) यांनी लोकसभेत अधिकृत लिखित उत्तरात रिलीफ कॅम्प्समधील दिलेल्या मदतीबद्दल सविस्तर माहिती दिली होती. त्याची मी लिन्क दिलेली होती. त्या लिंकबद्दल तुमचे काय मत आहे?
>>> पण विकासाच्या पडद्यामागे विभाजनाचा अजेंडा आहे याबद्दल मी कधीच माघार घेतलेली नाही.
पडलो तरी नाक वर !
>>> स्वतः मोदींचं वक्तव्यं आणि वाजपेयींनी भर सभेत केलेलं वक्तव्यं (खरं तर मोदींची कानउघडणी) हे स्पष्ट पुरावे रिलीफ कँप्सबद्दल दिले होते. तुम्ही बहुदा सर्व प्रतिसाद नीट वाचले असते तर लक्षात आलं असतं की मोदींचं सदरहू भाषण गुजराथ सरकारनं दडवून ठेवलं होतं. आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ते एसायटीला देण्यात आलं.
मोदींचे ते भाषण २००२ सालापासून प्रसिद्ध आहे. ते दडवून ठेवण्याचा प्रश्नच नव्हता कारण आंतरजालावर व इतरत्र ते खूप पूर्वीपासून उपलब्ध आहे. मोदीविरोधक त्या भाषणाचा आजवर उल्लेख करत आलेत (अगदी १५-२० दिवसांपूर्वी २-३ वेगवेगळ्या वाहिन्यांवरील चर्चांमध्ये त्या भाषणाचा उल्लेख आला होता), पण ते पहिल्या अर्ध्या भागाबद्दलच बोलतात. उर्वरीत अर्ध्या भागाबद्दल मोदीविरोधक मौन पाळतात कारण तो भाग त्यांना गैरसोयीचा आहे.
असो. बहुत काय लिहिणे. पुन्हा एकदा विचारतो. मोदींनी रिलीफ कॅम्प्स बंद केले होते किंवा रिलीफ कॅम्प्सची मदत थांबविली होती हे खोटे आरोप सिद्ध करण्यासाठी कणभर तरी पुरावा आहे का तुमच्याकडे?
30 Mar 2014 - 3:43 pm | संजय क्षीरसागर
काय ज्योक मारतायं! त्या भाषणाची सीडी गुजराथ सरकारनं दडवली होती.
तुमच्याकडे भाषणाचा कोणता उर्वरित भाग आहे तो द्या बरं. जो माणूस इतकी बेताल वक्तव्यं करु शकतो तो अर्ध्यातनं यू टर्न मारुन एकदम सहिष्णू होईल हे असंभव आहे. तरी ही पाहूच.
आणि तुम्ही परत परत तोच मुद्दा दळतायं. त्यांचा हेतू त्यांच्या स्वतःच्या भाषेतून उघड आहे. आता वरुन त्यांनी काय देखावा दाखवला ही समर्थकांची सारवासारवी आहे.
30 Mar 2014 - 3:54 pm | श्रीगुरुजी
वर अवतरण चिन्हात लिहिलेली इंग्लिश वाक्ये नक्की कोणी लिहिली आहेत? त्याची लिंक देता का? विकीपीडीया तर नव्हे?
>>> तुमच्याकडे भाषणाचा कोणता उर्वरित भाग आहे तो द्या बरं. जो माणूस इतकी बेताल वक्तव्यं करु शकतो तो अर्ध्यातनं यू टर्न मारुन एकदम सहिष्णू होईल हे असंभव आहे. तरी ही पाहूच.
काय खोटं बोलताय राव? यूट्यूबवरील त्या भाषणाची लिंक मी दिली होती आणि त्यावर तुमचा गुळमुळीत प्रतिसाद देखील आला होता. तरी पुन्हा तेच मागताय.
>>> आणि तुम्ही परत परत तोच मुद्दा दळतायं. त्यांचा हेतू त्यांच्या स्वतःच्या भाषेतून उघड आहे. आता वरुन त्यांनी काय देखावा दाखवला ही समर्थकांची सारवासारवी आहे.
मी नाही, तुम्हीच तो मुद्दा पुन्हा पुन्हा दळताय. त्यांचा हेतू काय होता/आहे याचे स्वतःच्या मनाने निष्कर्ष काढण्याचे तुमचे दळण सुरूच आहे.
30 Mar 2014 - 6:06 pm | संजय क्षीरसागर
आणि त्यावर मी गुळमुळीत प्रतिसाद दिला?
हा माझा प्रतिसाद आहे :
वाजपेयींनी कान उघडणी केली आहे, स्तुती नाही. आणि याला तुमच्याकडे उत्तर नाही.
अर्थात, विषय काय चाललायं ते तुमच्या बहुदा लक्षात येत नाहीये. क्वोट अर्थात विकीपिडियाचा आहे (आणि ते त्याच वेळी लक्षात यायला हवं होतं). मी म्हणतोयं की मोदींनी स्वतः मदत रोखण्याच्या उल्लेख केला आहे. त्यावर तुम्ही म्हणता `त्या' भाषणाचा `उर्वरित भाग' तुमच्याकडे आहे. मला ही आश्चर्य वाटलं, आयला जिथे गुजराथ सरकार भाषण दडवतं आणि सध्या ते SIT च्या ताब्यात आहे ते आपल्यासारख्या संग्राहकाकडे कसं?
30 Mar 2014 - 8:56 pm | श्रीगुरुजी
>>> वाजपेयींनी कान उघडणी केली आहे, स्तुती नाही. आणि याला तुमच्याकडे उत्तर नाही.
वाजपेयींनी कानउघाडणी केली आहे असा तुम्ही सोयिस्कर समज करून घेतलेला आहे. म्हणूनच मी तुम्हाला चित्रफीतीचा उरलेला अर्धा भाग बघायला सांगितला जो तुम्ही सोयिस्कररित्या दुर्लक्षित केला होता.
>>> अर्थात, विषय काय चाललायं ते तुमच्या बहुदा लक्षात येत नाहीये.
तुम्ही मुद्दाम वेड पांघरून पेडगावला जात आहात हे माझ्या लक्षात येतंय आणि तुमच्याही लक्षात येतंय. म्हणून तर कोणताही पुरावा न देता खोटे आरोप करणे आणि चित्रफीतीची लिंक न देता केवळ पहिल्या अर्ध्या भागावरच प्रतिसाद देणे सुरू आहे.
>>>> क्वोट अर्थात विकीपिडियाचा आहे (आणि ते त्याच वेळी लक्षात यायला हवं होतं).
ये हुई ना बात! मला ते केव्हाच समजलं होतं कारण तुमच्याकडे कोणतेही अधिकृत पुरावे नाहीत. ती चित्रफीत गुजरात सरकारने दडपून ठेवली होती ही पण तुमचीच थाप आणि त्याला पुरावा काय तर म्हणे विकीपिडीया. रिलीफ कॅम्प्सची मदत थांबविली आणि कॅम्प्स बंद केले ही जशी थाप होती तशी चित्रफीतीची थाप तुम्ही मारली.
>>> मी म्हणतोयं की मोदींनी स्वतः मदत रोखण्याच्या उल्लेख केला आहे.
पुन्हा एकदा खोटं बोलत आहात. मोदींनी मदत रोखण्याबद्दल किंवा कॅम्प्स बंद करण्याबद्दल चित्रफीतीत चकार शब्द काढलेला नाही. युपीए सरकारमधील वरिष्ठ कॅबिनेट मंत्री श्रीप्रकाश जैस्वाल यांनी लोकसभेत लेखी उत्तरात कॅम्प्समध्ये दिल्या गेलेल्या मदतीची कबुली दिली आहे.
>>> त्यावर तुम्ही म्हणता `त्या' भाषणाचा `उर्वरित भाग' तुमच्याकडे आहे.
तुम्ही पुन्हा पेडगावला निघालात. ती चित्रफीत माझा खाजगी दस्तावेज नाही. ती सार्वजनिक चित्रफीत गेली अनेक वर्षे आंतरजालावर व वाहिन्यांकडे उपलब्ध आहे. त्या चित्रफीतीची लिंक सुद्धा मी दिलेली होती. त्या चित्रफीतीतील संपूर्ण संभाषणातील वाक्ये सुद्धा मी माझ्या प्रतिसादात दिली होती.
>>> मला ही आश्चर्य वाटलं, आयला जिथे गुजराथ सरकार भाषण दडवतं आणि सध्या ते SIT च्या ताब्यात आहे ते आपल्यासारख्या संग्राहकाकडे कसं?
परत तोच गोबेल्ससारखा खोटा आरोप! तुमच्या खोटं बोलण्याला काहीच सीमा नाही का? जे भाषण गेली अनेक वर्षे सार्वजनिक संस्थळावर सर्वांना उपलब्ध आहे, ते म्हणे गुजरात सरकारने दडविले? याला आधार काय तर विकीपिडीयावरील कोणीतरी खरडलेल्या ४ ओळी! आणि ते भाषण म्हणे माझ्या संग्रहालयात आहे? अजून किती खोटे बोलाल? 'आप'चे कार्यकर्ते झालात म्हणजे लगेच केजरीवालांसारखी खोटे बोलण्याची घटनात्मक परवानगी मिळाली का?
30 Mar 2014 - 3:09 pm | नानासाहेब नेफळे
श्रीगुरुजी ,आपल्याला अनुमोदन आहे. आपण आपल्या आकडेवारी सह बाबू बोखिरिया आणि पुरषोत्तम सोलंकी या मोदी सरकारातील दोन अतिशय 'कार्यक्षम' मंत्र्यांविषयी असलेल्या प्रतिसादाचा प्रतिवाद करावात व मोदी विरोधाकांची तोंडे बंद करावीत अशी मी आपल्याला मित्रत्वाची विनंती करतो.
हे बघा या इथे.
http://www.misalpav.com/comment/566824#comment-566824
30 Mar 2014 - 3:25 pm | श्रीगुरुजी
मी यापूर्वीच प्रतिसाद दिलेला आहे. आपण वेगवेगळ्या डूआयडींच्या माध्यमातून परस्परविरोधी प्रतिसाद लिहिण्यात व्यस्त असल्याने कदाचित आपल्या पाहण्यात आला नसावा. खालील पानात माझा प्रतिसाद आहे. तो वाचून त्यावर आपली प्रतिक्रिया व काही आक्षेप असल्यास कळवावे.
http://www.misalpav.com/node/27408
30 Mar 2014 - 6:16 pm | बंडा मामा
श्रीगुरुजी तुम्ही प्रतिसाद दिला आहे पण प्रतिवाद केलेला नाही. डूआयडी वगैरे अवांतरपणा करुन टाळाटाळ केली आहे. मांजर डोळे मिटून दुध पिते तसे करू नका.
30 Mar 2014 - 9:02 pm | श्रीगुरुजी
श्री रा रा नानासाहेब नेफळे उपाख्य ग्रेटथिंकर उपाख्य टॉपगिअर्ड फिलॉसॉफर हेच मांजर डोळे मिटून दूध पिते तसे करत आहेत. एक आयडी वापरून ते केजरीवालांना खोटारडे म्हणतात व 'आप' ही खाप पंचायत आहे असे लिहितात, तर दुसर्या आयडीने 'आप'च्या व केजरीवालांच्या बाजूने लिहितात. मी त्यांना स्वतःची विश्वासार्हता सिद्ध करण्याची व स्वतःची पात्रता वाढविण्याची संधी दिली आहे. त्यांनी प्रथम ते सिद्ध करावे.
30 Mar 2014 - 9:33 pm | नानासाहेब नेफळे
श्रीगुरुजी, आपण या धाग्यावर माझ्या प्रत्येक प्रतिसादाचे प्रतिवाद केले आहेत, अन तेही अत्यंत विद्युतवेगाने... त्यावेळी अवांतर पोरकटपणा आपण केला नाहीत वा आपल्याला पोरकटपणा करायची गरज भासली नाही. परंतु अडचणीत टाकणारा प्रश्न विचारल्यानंतर आपण त्यामुद्द्यापासून पळ काढत आहात, आपण अत्यंत तर्कशुद्ध प्रतिसाद देण्यासाठी प्रसिद्ध आहात(काही मिपाकरांचे असे मत आहे), कृपया आपण माझ्या मुद्द्याचा प्रतिवाद करावा अशी मी आपल्याला मित्रत्वाची विनंती करतो.
मोदी मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम व स्वच्छ मंत्र्यांविषयी तो प्रतिसाद होता.
हा तो प्रतिसाद.
http://www.misalpav.com/comment/566824#comment-566824
30 Mar 2014 - 9:36 pm | श्रीगुरुजी
>>> श्रीगुरुजी, आपण या धाग्यावर माझ्या प्रत्येक प्रतिसादाचे प्रतिवाद केले आहेत,
मी तुम्हाला त्यावेळी आपली विश्वासार्हता व पात्रता सिद्ध करण्याची संधी देत होते. परंतु दुर्दैवाने अशा अनेक संधी तुम्ही घालविल्या. आता शेवटची संधी देत आहे. ती संधी स्वीकारा.
30 Mar 2014 - 2:56 pm | श्रीगुरुजी
>>> त्याचा प्रतिवाद न करताच श्रीगुरुजींनी चर्चा पूढे चालू ठेवली आहे.
मी यापूर्वीच प्रतिसाद दिलेला आहे. कदाचित आपल्या पाहण्यात आला नसावा. खालील पानात माझा प्रतिसाद आहे. तो वाचून त्यावर आपली प्रतिक्रिया कळवावी.
http://www.misalpav.com/node/27408
30 Mar 2014 - 3:30 pm | संजय क्षीरसागर
अर्थात इतक्या उघड गोष्टींचा खुद्द मोदी आले तरी प्रतिवाद करु धजणार नाहीत तिथे इतरांची काय कथा!
बाय द वे, आजच्या सत्यमेव जयते मधे असं उघडकीला आलं की ५७४ पैकी १३६ विद्यमान खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत (खून, बलात्कार, अपहरण, दरोडे) . म्हणजे Not only FIRs filed but Charges framed by the court! फक्त अजून सुनावणी चालू आहे म्हणून ते दोषी आहेत हे सिद्ध व्ह्यायचंय (अर्थात इथले काही विद्वान सदस्य, `गुन्हा शाबित नाही ना झाला? मग काय हरकत आहे', म्हणणारे देखिल आहेत.) आणि मजा म्हणजे त्याच न्यायानं (Unless proved, Not guilty); खरं तर त्यांना निष्पापंच म्हणायला हवं! आपलं महान सरकार त्यांना निर्लज्जपणे सत्तेवर राहू देतंय.
उगाच लफडं नको म्हणून त्या १३६ सदस्यांचा पक्षिय उहापोह अमीरनं घडवला नाही इतकंच!
विधानसभांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. लोकसभेत एकूण संख्येच्या ३०% तर सर्व विधानसभात मिळून एकूण संख्येच्या ३१% आमदार याच कॅटेगरीत आहेत. त्यात बाबु बोखिरीया आणि पुरुषोत्तम सोलंकी आहेत!
30 Mar 2014 - 3:42 pm | श्रीगुरुजी
>>> अर्थात इतक्या उघड गोष्टींचा खुद्द मोदी आले तरी प्रतिवाद करु धजणार नाहीत तिथे इतरांची काय कथा!
मोदी कशाला पाहिजेत? अहो मी फक्त एक लिंक दिली, तर लगेच आपल्याकडे पुरावे नाहीत असे तुम्हाला कबूल करावे लागले.
>>> विधानसभांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. लोकसभेत एकूण संख्येच्या ३०% तर सर्व विधानसभात मिळून एकूण संख्येच्या ३१% आमदार याच कॅटेगरीत आहेत.
या ३१ टक्क्यात आपचे सोमनाथ भारती व दस्तुरखुद्द केजरीवाल सुद्धा आहेत.
30 Mar 2014 - 3:49 pm | संजय क्षीरसागर
आहो आश्चर्यम!
एकतर तुम्ही काय लिहीतायं हे तुमचं तुम्हाला कळत नाहीये कारण तो विदा आआपा सरकार दिल्लीत सत्तेवर येण्यापूर्वीचा आहे.
बाय द वे, कोणता गंभीर गुन्हा दाखला आहे केजरीवालांवर?
30 Mar 2014 - 4:13 pm | श्रीगुरुजी
>>> एकतर तुम्ही काय लिहीतायं हे तुमचं तुम्हाला कळत नाहीये कारण तो विदा आआपा सरकार दिल्लीत सत्तेवर येण्यापूर्वीचा आहे. बाय द वे, कोणता गंभीर गुन्हा दाखला आहे केजरीवालांवर?
अजून किती वेळ वेड पांघरून तुम्ही पेडगावला जाणार आहात? तुम्ही काय लिहिताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतंय का?
आपल्याविरूद्ध एकूण ९ गुन्हेगारी खटले दाखल आहेत अशी केजरीवालांची स्वतःचीच कबुली वाचा.
http://indiatoday.intoday.in/story/arvind-kejriwal-declares-nine-crimina...
The activist-turned-politician, who had said his party will not give tickets to any person facing criminal charges, declared nine criminal cases against him, some of which entail a punishment of two years in jail or more.
त्यानंतर दाखल झालेला अजून एक एफआयआर
http://www.ndtv.com/article/india/delhi-court-summons-arvind-kejriwal-in...
अजून एक
http://www.hindustantimes.com/india-news/arvindkejriwalacommonmaninpolit...
अजून एक
http://ibnlive.in.com/news/court-frames-charges-against-kejriwal-in-defa...
अजून एक
http://indianexpress.com/article/cities/delhi/congress-mp-files-defamati...
अजून एक
http://timesofindia.indiatimes.com/lok-sabha-elections-2014/news/Code-vi...
झालं समाधान?
30 Mar 2014 - 5:49 pm | संजय क्षीरसागर
हे चार्जेस म्हणजे गंभीर गुन्हे? आहो, गंभीर गुन्हे म्हणजे काय यासाठी ती वर दिलेली लिस्ट वाचा. त्यांच्या विरुद्ध दाखल झालेले गुन्हे (उदा. बदनामी कारक वक्तव्यं, आणि (काय तर म्हणे) काळ भैरवाला जायला सहा चारचाकी गाड्यांऐवजी सतरा मोटारसायकली वापरल्या!) हे निवडणूक प्रचाराच्या काळात दाखल होणारे सर्वसाधारण चार्जेस आहेत.
आणि फालतू लिंक्स डकवण्यापेक्षा त्यांच्याविरुद्ध नक्की कोणता गंभीर गुन्हा (उपरोल्लेखित स्वरुपाचा) दाखल झाला आहे ते दाखवा.
असो, एकतर तुम्ही फारच पापभीरु आहात किंवा तुम्हाला विषयाची समज नसावी. गंभीर म्हणजे नक्की काय ते बघायचं असेल तर हा विडिओ पाहा :
काँग्रेस आमदारचा खून, कागदपत्रांची फोर्जरी आणि खाणकामासाठी अवैध पद्धतीनं स्फोटके हस्तगत करणं! एकतर त्यांना कोर्टानं तीन वर्षाची सजा फर्मावलीये.(अवैध खाणकाम आणि ५४ कोटी रुपयांचा फ्रॉड!). त्यांनी स्वतः (झक मारत) राजिनामा दिलायं. पण तुमचे आदर्श मोदी पंतप्रधानपदासाठी इतके व्याकूळ झालेत की त्यांनी अजून काहीही केलेलं नाही. धन्य ते मोदी आणि धन्य त्यांचे समर्थक.
मी सुरुवातीलाच म्हटलंय की कोणताही फालतू मुद्दा काढायचा आणि चर्चा ढवळायची.
दादा, आता मोदींची फार पीसं निघू नयेत असं वाटत असेल तर... थांबा!
30 Mar 2014 - 9:14 pm | श्रीगुरुजी
>>> हे चार्जेस म्हणजे गंभीर गुन्हे? आहो, गंभीर गुन्हे म्हणजे काय यासाठी ती वर दिलेली लिस्ट वाचा. त्यांच्या विरुद्ध दाखल झालेले गुन्हे (उदा. बदनामी कारक वक्तव्यं, आणि (काय तर म्हणे) काळ भैरवाला जायला सहा चारचाकी गाड्यांऐवजी सतरा मोटारसायकली वापरल्या!) हे निवडणूक प्रचाराच्या काळात दाखल होणारे सर्वसाधारण चार्जेस आहेत.
>>> असो, एकतर तुम्ही फारच पापभीरु आहात किंवा तुम्हाला विषयाची समज नसावी.
तुम्ही खोटं बोलत आहात आणि तुम्हाला विषयाची समज तर अजिबात नाही. म्हणून तर तुम्ही कोणतेही पुरावे न देता खोटे आरोप करत आहात.
>>> पण तुमचे आदर्श मोदी पंतप्रधानपदासाठी इतके व्याकूळ झालेत की त्यांनी अजून काहीही केलेलं नाही. धन्य ते मोदी आणि धन्य त्यांचे समर्थक.
धन्य ते लबाड केजरीवाल आणि त्यांचे आंधळे समर्थक!
>>> मी सुरुवातीलाच म्हटलंय की कोणताही फालतू मुद्दा काढायचा आणि चर्चा ढवळायची.
फालतू मुद्दे आणि निराधार आरोप तुम्हीच करत आहात. मी प्रत्येकवेळी तुम्हाला उघडे पाडून आपल्याकडे पुरावे नाहीत याची कबुली द्यायला लावली आहे.
>>> दादा, आता मोदींची फार पीसं निघू नयेत असं वाटत असेल तर... थांबा!
अहो मोदी्ची पिसे काढण्याचा प्रयत्न गेली १२ वर्षे सुरू आहे. मोदी सर्वांना पुरून उरले आहेत. त्यांची पिसे काढण्याचा प्रयत्न करणार्यांचीच पिसे झडली आहेत. त्यांच्यावर कितीही खोटे आरोप केले, त्यांची कितीही बदनामी केली, त्यांना अडकविण्यासाठी जंग जंग पछाडले तरी शेवटी "सत्यमेव जयते!".
तुम्हाला थांबा असे मी म्हणणार नाही. तुम्ही पुरावा नसताना जे काही खोटेनाटे लिहाल त्याचा मी सबळ पुराव्यानिशी प्रतिवाद करून तुम्हाला वारंवार उघडे पाडीन.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याच्या वेळी केजरीवालांवर एकूण ९ फौजदारी गुन्हे दाखल झालेले होते. त्यातील काही गुन्ह्यांना २ किंवा अधिक वर्षे तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. हे गुन्हे तुम्हाला कदाचित गंभीर वाटत नसतील. कारण म्हणतात ना "आपला तो अरविंद, आणि दुसर्याचा तो नरू"! हे सर्व गुन्हे केजरीवाल दिल्लीत निवडून यायच्या आधीपासूनचे आहेत. म्हणूनच भारतातल्या सर्व रा़ज्यांच्या विधानसभेत ३१%र् टक्के गुन्हेगार आमदार असतील तर त्यांच्यात दस्तुरखुद्द केजरीवालांचा सुद्धा समावेश आहे.
आणि आमदार झाल्यानंतर निराधार व कोणताही पुरावा नसलेले आरोप करून नेत्यांची बदनामी केल्याचे आरोप तुम्हाला फालतू वाटत असतील. पण म्हणतात ना "आपला तो अरविंद, आणि दुसर्याचा तो नरू"!
30 Mar 2014 - 9:20 pm | श्रीगुरुजी
>>> हे चार्जेस म्हणजे गंभीर गुन्हे? आहो, गंभीर गुन्हे म्हणजे काय यासाठी ती वर दिलेली लिस्ट वाचा. त्यांच्या विरुद्ध दाखल झालेले गुन्हे (उदा. बदनामी कारक वक्तव्यं, आणि (काय तर म्हणे) काळ भैरवाला जायला सहा चारचाकी गाड्यांऐवजी सतरा मोटारसायकली वापरल्या!) हे निवडणूक प्रचाराच्या काळात दाखल होणारे सर्वसाधारण चार्जेस आहेत.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरताना दस्तुरखुद्द केजरीवालांनी आपल्यावर फौजदारी स्वरूपाचे ९ गुन्हे दाखल आहेत असे अर्जात लिहिले होते. त्यापैकी काही गुन्ह्यांना कमीतकमी २ वर्षे किंवा अधिक तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. हे गुन्हे गंभीरच आहेत. तुम्हाला वाटत नसतील कदाचित कारण म्हणतात ना "आपला तो अरविंद, दुसर्याचा तो नरू"!
दिल्ली विधानसभेत आमदारकीची शपथ घेताना केजरीवालांवर ९ फौजदारी गुन्हे दाखल होते. त्यामुळे जर भारताच्या सर्व राज्यातील विधानसभेत ३१ %र् आमदार गुन्हेगार असतील तर त्यांच्यात दस्तुरखुद्द केजरीवालांचाही समावेश आहे.
पुरावे नसताना निराधार आरोप करून एखाद्या व्यक्तीची बदनामी करणे हा देखील गंभीर गुन्हा आहे. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्यावर अशा बदनामीचे २ खटले दाखल झाले आहेत.
30 Mar 2014 - 6:05 pm | बंडा मामा
श्रीगुरुजी,
मोदीभक्तीचा चष्मा काढून खरंच तुमचे प्रतिसाद एकदा परत वाचा. पुन्हा एकदा सर्व पक्षांची उमेदवार यादी पाहा आणि प्रामाणिक पणे सांगा कुठे भ्र्ष्ट गुन्हेगार जास्त आहेत आणि कुठे प्रामाणिक आहेत.
30 Mar 2014 - 9:26 pm | श्रीगुरुजी
>>> मोदीभक्तीचा चष्मा काढून खरंच तुमचे प्रतिसाद एकदा परत वाचा. पुन्हा एकदा सर्व पक्षांची उमेदवार यादी पाहा आणि प्रामाणिक पणे सांगा कुठे भ्र्ष्ट गुन्हेगार जास्त आहेत आणि कुठे प्रामाणिक आहेत.
मोदीद्वेषाचा चष्मा तुम्ही काढलात तर तुम्हाला सत्य परिस्थिती समजेल. 'आप'चा जन्म खूप नवीन आहे. 'आप' फक्त ४९ दिवस सत्तेवर होता. पण इतक्या कमी कालावधीत सुद्धा 'आप'ने आपले गुण उधळले. जर 'आप' ५ वर्षे सत्तेवर टिकले तर किती अराजक माजेल याची कल्पनाच करवत नाही. 'आप'चे संस्थापक केजरीवाल व सोमनाथ भारती यांच्यावर आधीपासूनच गुन्हे दाखल आहेत. सर्वच पक्षात गुन्हे दाखल असलेले उमेदवार आहेत. 'आप'ही त्याला अपवाद नाही. एक फरक आहे. 'आप' वगळता इतर कोणताही पक्ष आपण धुतल्या तांदळासारखे शुभ्र आणि गंगाजलाहून निर्मळ आहोत असे म्हणत नाही. त्यामुळेच 'आप'चा ढोंगीपणा प्रकर्षाने उठून दिसतो.
30 Mar 2014 - 7:13 pm | गब्रिएल
वो श्रीगुर्जी, जाव्द्या ! आता नवी म्हन ऐकाssssss झोप्लेल्या गाडवाला उठ्वून तेच्या म्होर्म गीता वाच्ली तर त्य्ला येकवार कळल, पन तुमी झोपेच सोंग घेत्लेल्या..................... र्हाउण्दे झालं न्हाय्तर बोल्त्याल की बोलेंगे तो बोलेंगे की बोल्ता हाय. नाय्का?
30 Mar 2014 - 12:10 am | विनोद१८
............नाही कि तुला येथे हिंग लावुनसुद्धा कोणि विचारीत नाही ते ?? वरचाच श्री. गुरुजीनी केलेल्या (२०.१० वा.) प्रतिसादावर उत्तर दे. डु. आय. डी.
आजचा ए.बी.पी न्युज (हिंदी) वर सादर केलेल्या सर्वेमध्ये तो साळसुद्पणाचा आव आणणारा आणि मनसोक्त किंचाळणारा भंपक खेचरीवाल त्याच्या भक्तांना खरोखरीच धन्य करेल (म्हणजेच कपाळावर हात मारायला लावेल). म्हणजे दिल्ली व हरयाणा वगळता ( येथे दोन्ही मिळुन किरकोळ ३ ते ६ जागा मिळतील ) इतरत्र तो कोठेच दिसणार नाही, शेवटी मोदीच तुम्हा सर्वांच्या नाकावर टिच्चुन पी. एम. होइल, तुम्हाला आवडो वा नावडो.
अरे जो रड्या धड २ महिने हातचे राज्य राखु शकला नाही तो एव्हढा मोठा खन्डप्राय देश काय चालविणार ?? डोक्यावर टोपी घालुन हातात झाडु घेउन किंचाळण्याइतके सोपे आहे का ते ?? त्याची कुवत दिसली जगाला, भारतीय मतदार आज तरी इतका दुधखुळा राहीलेला नाही. मोदी गेली ३ टर्म गुजरातमध्ये स्वबळावर राज्य करतोय व अगदी स्वपक्षीय विरोधकांवर मात करुन पंतप्रधानपदाचा उमेद्वार म्हणुन सामोरा आला, हेही नसे तसे सोपे, तुमच्यासारख्यांना आवडो वा नावडो. त्याची त्या भंपक खेचरीवालबरोबर तुलानाच होउ शकत नाही. अगदी कोणत्याही राजकीय अंगाने. कुठे ३ वेळा मुख्यमंत्री होणारा मोदी आणि कुठे ४९ दिवसांचा पळ्पुटा खेचरीवाल.
विनोद१८
30 Mar 2014 - 8:01 pm | संपत
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वीचा ए.बी.पी नेल्सन सर्वे
भाजप : 32
कोंग्रेस : २७
आआप : ८
https://www.google.co.in/search?q=abp+nielsen+survey+delhi+2013&oq=abp+n...
30 Mar 2014 - 11:45 pm | संजय क्षीरसागर
Narendra Modi ORDERED the Gujarat Genocide - In words of the people who EXECUTED it and then SAVED the criminals
आणि अजून हौस असेल तर पुरुषोत्तम सोलंकींचे प्रतापही दाखवेन. पण पार वाट लागेल हो तुमची. अर्थात, हा विडिओ पाहून अजूनही तुमच्या श्रद्धा अढळ असतील तर माझा नाईलाज आहे. कारण गंभीर गुन्हा म्हणजे काय हे आपल्या `निष्पाप' बुद्धीला समजलेलं दिसत नाही.
31 Mar 2014 - 11:00 am | श्रीगुरुजी
>>> Narendra Modi ORDERED the Gujarat Genocide - In words of the people who EXECUTED it and then SAVED the criminals
हहपुवा! तुम्हाला अजिबातच विनोदबुद्धी नाही. असे बनावट व्हिडिओ आंतरजालावर पोत्याने उपलब्ध आहेत. मोदींविरूद्ध असे अनेक मॅनेज्ड केलेले व्हिडीओ आणि स्टिंग ऑपरेशन्स आहेत. तहलका (आपल्या मुलीच्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून गेले ४ महिने तुरूंगात असलेल्या तेजपालची इतरांना ब्लॅकमेल करणारी कंपनी), कोब्रा पोस्ट, गुलैल अशा अनेकांनी अशी अनेक स्टिंग ऑपरेशन्स मॅनज करून अनेक व्हिडिओ तयार केले आहेत. न्यायालयाने अशा बनावट फितींना अनेकवेळा कचर्याच्या टोपली दाखविली आहे. अर्थात विकीपिडीआवरील ३-४ वाक्ये पुरावा म्हणून फेकणार्या आपल्या आकलनशक्तीच्या हे पलिकडचे आहे.
>>> आणि अजून हौस असेल तर पुरुषोत्तम सोलंकींचे प्रतापही दाखवेन. पण पार वाट लागेल हो तुमची. अर्थात, हा विडिओ पाहून अजूनही तुमच्या श्रद्धा अढळ असतील तर माझा नाईलाज आहे. कारण गंभीर गुन्हा म्हणजे काय हे आपल्या `निष्पाप' बुद्धीला समजलेलं दिसत नाही.
दाखवा की. घाबरताय कशाला? इतके दिवस कशाला आणि कोणाची वाट बघत होता? का कोणाच्या आमंत्रणाची किंवा मुहूर्ताची वाट बघत होता? वाट तुमचीच लागलेली आहे. तुमचा खोटेपणा अनेकवेळा उघडकीला येउन आपल्या खोटेपणाची तुम्हाला कबुली द्यावी लागली तरीसुद्धा तुमच्या या बाळलीला सुरूच आहेत. आपण कितीही खोटे आरोप केले तरी जगाचे डोळे उघडेच असतात हे तुमचा 'बाल'बुद्धीला अजून समजलेलं दिसत नाही.
बादवे, पुरूषोत्तम सोलंकीबरोबरच केजरीवालांचे प्रताप दाखविणार्या चित्रफीतही टाका. तेवढीच आमची करमणूक!
31 Mar 2014 - 11:55 am | गब्रिएल
लईच इनोदी व्हिडिओ आनि त्याला पुरावा मान्नारे तुमी तर लैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैच ग्रिरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेट. शेंबड पोरग बी सोत्तहून म्हनत नाय की मिच आंब्याच्या झाडावर दगूड मार्ला. आनि ह्ये लोक मीच लै खून क्येले म्हंतात. आयला तुमी लई येड्यासार्क ब्वोल्ता ह्ये म्हाय्त व्हत पन तुम्ची क्येस पार धाव्या स्तेज्ला पोच्ली आनि बरमद्येवपन काय्बी करू शक्नार नाय ह्येची खात्री झालि न्हव का.
माज्याकड्न तुमास्नी सुबेच्चा आनि मॉठ्ठाठ्ठाठ्ठाठ्ठाठ्ठाठ्ठाठ्ठाठ्ठाठ्ठाठ्ठाठ्ठाठ्ठाठ्ठाठ्ठाठ्ठाठ्ठा पूस्पगूच. ही ही ही
31 Mar 2014 - 8:52 am | विनोद१८
विनोद१८
31 Mar 2014 - 10:40 am | संजय क्षीरसागर
गुन्हा सिद्ध झाला नाही तरी व्यक्तीची मानसिक घडण काय आहे हे जाणणं आगत्याचं आहे. त्या मानसिकतेतून हेतू आणि हेतूसाठी कृत्य अशी शृंखला आहे.
केजरीवालांचा हेतू भ्रष्टाचार निर्मूलन आहे आणि मोदींचा (अंतस्थ) हेतू हिंदुत्त्व आहे (वरुन मात्र ते `विकास' दाखवतायंत).
कालच्या `सत्यमेव जयते' चा हा विडिओ "Criminalization of Politics" जरुर पाहा. भारतीय राजकारणाची आणि पर्यायनं देशाच्या भवितव्याची काय वाट लागलीये ते लक्षात येईल.
इथल्या सदस्यानं स्वतःच्या नांवाप्रमाणेच प्रतिसाद देऊन मला मोदींविरुद्ध FIR फाईल करायला सांगितलंय. त्यापेक्षा स्वच्छ हेतू असलेला निवडून द्या म्हणजे असे उमेदवार आपसूकच सत्तेपासनं दूर राहातील.
31 Mar 2014 - 11:08 am | श्रीगुरुजी
>>> गुन्हा सिद्ध झाला नाही तरी व्यक्तीची मानसिक घडण काय आहे हे जाणणं आगत्याचं आहे. त्या मानसिकतेतून हेतू आणि हेतूसाठी कृत्य अशी शृंखला आहे.
*yahoo*
>>> आणि मोदींचा (अंतस्थ) हेतू हिंदुत्त्व आहे (वरुन मात्र ते `विकास' दाखवतायंत).
*yahoo*
>>> केजरीवालांचा हेतू भ्रष्टाचार निर्मूलन आहे
*yahoo*
>>> कालच्या `सत्यमेव जयते' चा हा विडिओ "Criminalization of Politics" जरुर पाहा. भारतीय राजकारणाची आणि पर्यायनं देशाच्या भवितव्याची काय वाट लागलीये ते लक्षात येईल.
आयुष्यात पहिल्यांदाच निवडणुक लढविणार्यावर तब्बल ९ फौजदारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असतील तर भारतीय राजकारणाची आणि पर्यायनं देशाच्या भवितव्याची काय वाट लागणारच.
>>> इथल्या सदस्यानं स्वतःच्या नांवाप्रमाणेच प्रतिसाद देऊन मला मोदींविरुद्ध FIR फाईल करायला सांगितलंय. त्यापेक्षा स्वच्छ हेतू असलेला निवडून द्या म्हणजे असे उमेदवार आपसूकच सत्तेपासनं दूर राहातील.
+१
म्हणूनच मोदींना निवडून द्या.
31 Mar 2014 - 11:40 am | गब्रिएल
जावंद्या गुर्जी. मी आलिगेशन केलं म्हंजे तेच खर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र बाकी सग्ल जग खोखोखोखोखोखोखोखोखोखोखोटटटटटटटटटटटटटट आसं म्हंन्नारी जमात लय खट आसतिया. मंग त्ये राजकारान आसो कि तत्वद्यान. आसल्या डोस्क्याच भुस्कट झ्यालेल्या मानसाबरोबर येळ घालावन्याबिगर तुमी येका दगडाला ह्ये काय चांगल सांगीतल तर त्येला पटलं. सोडा, आसतात काय्काय हाताबायेर ग्येलेल्या क्येसा. बरमद्येव सुद्द हात टेकल आनि म्हनल काय बुद्दि फिर्लि आनि आसं नग तयार क्येलं. काय म्हंता? ;)
31 Mar 2014 - 3:20 pm | विनोद१८
इथल्या सदस्यानं स्वतःच्या नांवाप्रमाणेच प्रतिसाद देऊन मला मोदींविरुद्ध FIR फाईल करायला सांगितलंय. त्यापेक्षा स्वच्छ हेतू असलेला निवडून द्या म्हणजे असे उमेदवार आपसूकच सत्तेपासनं दूर राहातील.
ज्या ठाम आवेशाने ढळ्ढळीतपणे १००% खोटे लिहून खरेपणाचा खेच्रुवाली संभावीत आव आणुन आपल्या समजुतीप्रमाणे जे लिहिलेत ते जर सत्य आणि सत्यच असेल आणि जर तेव्हढी धमक असेल तर जा न्यायालयात आणि करा कायदेशीर कारवाई त्या मोदीविरुद्ध, नुसत्याच फुकट्च्या हंता नकोत, हातात जर काही सबळ आणि कायद्याला मान्य असणारे व टिकणारे पुरावे असतील तर बोला. केवळ निरर्थक वांझोटे वादविवाद काय कामाचे ??? शिळ्या कढीला उत फार दुसरे काय.
केजरीवालांचा हेतू भ्रष्टाचार निर्मूलन आहे आणि मोदींचा (अंतस्थ) हेतू हिंदुत्त्व आहे (वरुन मात्र ते `विकास' दाखवतायंत).
खेच्रुवालचे वरवरचे हेतु व लक्षणे आता काही बरी वाटत नाहीत, सुरवातीला तो काहीतरी चांगले करेल असे वाटले होते नंतर संधी मिळुनही २ महीन्यात पळाला तेही त्याच्या पद्धतीप्रमाणे त्याच्या मतदारांना न विचारता. बाहेर आल्यावर उढ्योग काय करतोय तर नुसताच कांगावखोरपणा, गमजा मारतोय देश चालविण्याच्या, डोक्यावर टोपी घालुन हातात खराटा घेत किंचाळुन का देश चालविता येतो ?? कुठे २ महिन्यात सत्ता झेपत नाही म्हणुन हात टेकणारा खेचरु आणि कुठे तिसर्यांदा दिल्लीपेक्षा मोठ्या राज्याचे राज्यशकट हाकणारा मोदी ??? तुलनाच होउ शकत नाही. एक पळ्पुटा व एक सर्व विरोधकांच्या (अगदी खान्ग्रेसचे केन्द्र सरकार धरुन ) नाकावर टिच्चुन तिसर्यांदा आपल्या राज्यावर आपली मांड पक्की करणारा मोदी.... कोण अधिक प्रुवन ??? एक लक्षात घ्या मोदी जर दोषी असता आणि तसे पुरावे मिळाले असते तर या खान्ग्रेसने त्याला केव्हाच फासावर लटकविले असते. आज तो आपली तिसरी टर्म चालवित आहे, यातच सगळे आले.
बरे जरा सांगा 'हिंदुत्त्व' म्हणजे काय ??? तुमची व्याख्या काय ?? हिंदु कोणाला म्हणावे ??? असेल उत्तर तर द्या.
31 Mar 2014 - 10:57 am | वेताळ
सत्यमेव जयते कार्यक्रमात भाषण करताना पाहिले कि अंगावर रोमांच उभे राहतात.
31 Mar 2014 - 12:52 pm | वेताळ
संजयजी हे खेचरवाल सर व आमिरखानचे शो पहातात. खेचरवाल हे स्वःता भारतिय घटना व न्यायालये ह्या पेक्षा उच्च आहेत्.त्यामुळे ते देतील ते पुरावे हे सत्यवचन असतात हे तुम्ही मान्य केलेच पाहिजे.आमिरखान त्याच्या प्रचंड कामाच्या व्यापातुन वेळ काढुन नाममात्र मानधनातुन भारतिय समाजाला सत्याचे होलसेल डोस पाजत असतात.त्यामुळे संजयजी जे दाखवतील ते सत्यवचन समजा.
31 Mar 2014 - 1:12 pm | बॅटमॅन
प्रतिसाद वाचून करमणूक झाली आणि अंमळ खेदही वाटला. मॅगसेसेच्या वेबसायटीवरच्या बायोग्राफीला निकालात काढलेले पाहून आश्चर्य वाटले. केजरीवालच्या नावावर ९ गुन्हे दाखल असतील तर बाकीच्यांचं बघा की ओ. मशिदी फोडणे, दंगे करणे, भैया लोकांना पळवून लावणे, आझाद मैदानात दंगे करून अमर जवानच्या स्मारकास इजा पोचवणे, इ.इ. नी अराजक येत नै, मात्र चार निदर्शने काय केली तर मात्र अराजक येते. मज्जाच आहे सगळी! राहुल गांधीपेक्षा मोदी कधीही १०० पटीने बरे पण याचा अर्थ असा नव्हे की सगळे तिथे आलबेल आहे. असो.
31 Mar 2014 - 2:22 pm | चिगो
बॅटमॅनराव, आमच्या राहुलबाबांना मध्ये घ्यायची गरज नाही. वयस्कांच्या कोर्टात "जुव्हेनाईल"ला कशाला ओढताय? ;-) त्यांना वेगळे नियम लागू आहेत..
(कधी एकदा इलेक्शन संपते, असं झालेला) चिगो
31 Mar 2014 - 2:27 pm | बॅटमॅन
ऊप्स...आयमाय स्वारी बरंका चिगो सर!
(खच्चून सहमत असलेला) बॅटमॅन.
31 Mar 2014 - 3:58 pm | हाडक्या
चिगो सर, तुम्हाला आता 'आचार-संहिता लागू' असेल ना.. ? ;)
(बादवे, निवडणूक काळातील तुमचे प्रशासकिय कामकाज, जबाबदार्या, प्रशासनाची भुमिका आणि त्यासंदर्भातले तुमचे अनुभव वाचायला आवडतील.!)
31 Mar 2014 - 2:34 pm | पैसा
लै भारी चर्चा! एका हिब्रू आणि एका तामिळी माणसाचा संवाद बघतोय असं वाटलं!
31 Mar 2014 - 2:38 pm | बॅटमॅन
संवाद हिब्रू आणि तमिळ माणसाचा काय किंवा माकड व बोकडाचा काय, बघण्यात कै तादृश फरक नै. ऐकण्यात मात्र आहे ;)
द्विशतकाबद्दल हबिणंदण!
1 Apr 2014 - 9:59 am | वामन देशमुख
एखाद्या धाग्यात १० नवीन प्रतिसाद असतील. प्रतिसादांच्या पहिल्या पानावर २ आणि पुढच्या पानावर उरलेले ८ असतील, तर हे दोन नवे प्रतिसाद कोणते ते कळतं, पण दुस-या पानावर गेल्यावर प्रतिक्रियांना लावलेलं 'नवीन' हे लेबल निघून जातं. मग नवीन प्रतिक्रिया नेमक्या कोणत्या ते शोधत बसावं लागतं. (चोप्य पस्ते केलेले)
(इतर अनेक धाग्यांप्रमाणेच) या धाग्यावर हा त्रास फारच होतो आहे.
'मिसळपाव'ने हा दोष दूर करावा ही त्रागावजा विनंती/ हा विनंतीवजा त्रागा!
1 Apr 2014 - 10:07 am | पैसा
दुसर्या पेजवर गेल्यावर Ctrl + F वापरा. आणि सर्च बॉक्समधे आजची तारीख टाका. म्हणजे आजच्या प्रतिक्रिया हायलाईट होतील.
1 Apr 2014 - 5:00 pm | वामन देशमुख
धन्यवाद, पैसा.
1 Apr 2014 - 10:33 am | नानासाहेब नेफळे
एक लाख अब्ज खर्व परार्ध अनुमोदन
1 Apr 2014 - 1:42 pm | वेताळ
तुम्हाला हार्दिक शुभेच्छा......
1 Apr 2014 - 8:42 pm | श्रीगुरुजी
माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी रेल्वे दुर्घटनेनंतर आपला राजीनामा दिला होता. त्याचप्रमाणे, लोकपाल विधेयक मंजूर होऊ न शकल्यानं मी मुख्यमंत्रीपद सोडलं, मी जबाबदारीपासून पळ काढलेला नाही, अशी भूमिका केजरींनी अलीकडेच एका व्हिडिओतून मांडली होती. त्यानंतर काल दिल्लीतील द्वारका इथं झालेल्या जाहीर सभेत त्यांनी आपल्यावरचा पळपुटेपणाचा आरोप खोडून काढला. जनतेपुढे आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी थेट रामायणाचा आधार घेतला आणि स्वतःची तुलना श्रीरामाशीच केली. कैकयीनं सांगितलं म्हणून राम वनवासात गेला होता. पण त्याच्यावरही भाजपनं पळून गेल्याचीच टीका केली असती, असं उदाहरण त्यांनी दिलं. अर्थात, कुठल्या कैकयीमुळे त्यांना दिल्लीचं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, हे काही त्यांनी स्पष्ट केलं नाही.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/arvind-kejriwal-rally-in-d...
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/kejriwal-releases-audio-vi...
1 Apr 2014 - 8:47 pm | शिद
सोनिया गांधी अथवा गेलाबाजार शिला दिक्षित, कोणीही... ;)
1 Apr 2014 - 8:51 pm | नानासाहेब नेफळे
कैकेयी आणि मंथरा दोघींनी युती केली व रामचंद्राला वनवासाला पाठवले..
आता विघ्नसंतोषी मंथरा कोण ते सांगायला पाहीजे का?
2 Apr 2014 - 10:01 am | मंदार दिलीप जोशी
बरोबर नान्या. कैकेयी आणि मंथरा म्हणजे म्हणजे सोनिया आणि शीला दिक्षित ;)
1 Apr 2014 - 10:51 pm | विनोद१८
....आणि सांग नान्या तुला कसे कळलेरे 'कैकेयी आणि मंथरा' दोघींनी युती केली ते ??? तुझ्याकडे सल्लामसलत करायला येत होत्या वाटते ???
2 Apr 2014 - 9:51 am | वेताळ
सगळ्या बातम्या माहित असतात.
2 Apr 2014 - 9:20 pm | अविनाशकुलकर्णी
केजरी नी मोदिचे आव्हान स्विकारु का नको या साठी सभा घेतली..एक घटना लक्षात राहिली.. कुठेतरी नमाज चालु होता तेंव्हा केजरी ने भाषण थांबवले.. एकशंका...नमाज चालु असताना भाषण करायचे नसते का?
2 Apr 2014 - 10:44 pm | शिद
अकु तुमच्या साठी हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.. बघा मनावर घ्या.
अवांतर : जीवन भाऊ कुठे गायबले?
3 Apr 2014 - 10:54 am | मंदार दिलीप जोशी
त्यांच्यासाठी ते राष्ट्रगीत असावे. ;)
5 Apr 2014 - 1:08 pm | श्रीगुरुजी
http://news.outlookindia.com/items.aspx?artid=835604
केजरीवालांना गर्दीत कोणीतरी गुद्दा मारला म्हणे. तो म्हणे भाजपचा सदस्य होता असे लगेच केजरीवाल म्हणाले. प्रत्यक्षात तो अब्दुल वाहीद नावाचा 'आप'चाच सदस्य होता.
यावेळच्या निवडणुकीत केजरीवालांचे हे नवीनच प्रकार आहेत. आपल्याच पक्षाच्या सदस्यांना आपल्यावर शाई फेकण्यास सांगणे, आपल्याला चापट्या मारावयास सांगणे आणि हे सर्व भाजप करत आहे म्हणून गळा काढणे ही त्यांची नवीन नौटंकी आहे.
5 Apr 2014 - 2:00 pm | आयुर्हित
"गुढग्याला बाशिंग" व त्याचे माकडचाळे ला पाहून असे वाटते की
कोणी निंदा कोणी वंदा, मार खाऊन tv वर येणे हाच माझा धंदा!
असे अजून किमान ५ वेळेला तरी होणार आहे, असे मला "गुढग्याला बाशिंग"च्या पूर्वानुभवावरून नक्कीच वाटते.
परंतु सहाव्या वेळी मात्र सर्वांसमोर चड्डी उतरल्याशिवाय हा गप्प बसणार नाही.
27 May 2014 - 8:47 pm | श्रीगुरुजी
गडकरींनी केजरीवालांविरूद्ध दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात अत्यंत बाणेदारपणे जामीनासाठी व्यक्तिगत बॉंड द्यायचे नाकारून तुरूंगवास पत्करणार्या २१ व्या शतकातील अवतारी महापुरूष केजरीवाल यांनी पुन्हा एकदा आपल्या पलायनवादी वृत्तीचा प्रत्यय दिला आहे. आज उच्च न्यायालयाने सुद्धा बाँडशिवाय जामीन द्यायचे नाकारल्यावर आपला बाणेदारपणा गुंडाळून ठेवून बाँड लिहून दिला व जामीन मिळवून तिहारमधून पलायन केले. यापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून त्यांनी असेच पलायन केले होते.
त्यांच्या या नौटंकीमुळे आणि "आप"मतलबी धोरणांमुळे वैतागून अनेकजण "आप" सोडत आहेत. काही दिवसांनी "आप"मध्ये "आप"ण एकटेच आहोत हे त्यांच्या लक्षात येईल.
27 May 2014 - 8:53 pm | नानासाहेब नेफळे
श्रीगुरुजी सतत केजरीवालांना टारगेट करत आहेत, याचा अर्थ भविष्यात केजरीचे खासदार मोदीला घाम फोडणार.
29 May 2014 - 2:08 pm | llपुण्याचे पेशवेll
सोडून द्या हो गुरुजी. तो केजरी वायझेड आहे. लोकांनी आधीच त्याला लाथाडला आहे मतपेटीतून. सोडून द्या. असे बालीश चाळे तो करतच राहणार.
27 May 2014 - 8:59 pm | श्रीगुरुजी
>>> श्रीगुरुजी सतत केजरीवालांना टारगेट करत आहेत, याचा अर्थ भविष्यात केजरीचे खासदार मोदीला घाम फोडणार.
तू असाच भ्रमात रहा रे माईसाहेब!
29 May 2014 - 11:30 pm | lakhu risbud
Kejriwal has few more options to grab media attention.
1.To participate in Zalak Dikhala ja.
2.To participate in Big Boss forecoming season.