केजरीवालांचे वाराणशीतील भाषण

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
25 Mar 2014 - 8:49 pm
गाभा: 

केजरीवालांचे आजचे काशीतले भाषण १५-२० मिनिटे पाहत होतो. केजरीवालांनी अत्यंत नकारात्मक भाषण केले. संपूर्ण वेळ फक्त मोदींवर टीका करत होते. निवडून आलो तर आपण स्वतः किंवा आपला पक्ष नक्की काय करणार आहे याविषयी भाषणात चकार शब्द नव्हता. मोदी निवडून आले तर तुमचे कसे वाटोळे होईल हाच भाषणातला मुख्य मुद्दा होता. बाकी काहीच नव्हते. मोदी कसे वाईट आहेत, मोदी आणि राहुल अंबानी-अदानींच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देशातील लघूउद्योग संपुष्टात येतील आणि शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील, मोदी निवडून आल्यास वाराणशीतले सर्व लघुउद्योग बंद पडतील व आजूबाजूच्या शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतील, नरेंद्र मोदींनी केवळ बड्या उद्योगपतींचा विकास केला आहे. मोदींच्या गुजरातमध्ये आतापर्यंत तब्बल ६०,००० लघुउद्योग बंद झाले, मोदींनी शेतक-यांच्या जमिनी हिसकावून अदानी आणि अंबानी यांना दिल्या, मोदी प्रत्येकवेळी मतदारांना धमक्या देऊन निवडून येतात ... मोदीनिंदा, मोदीनिंदा आणि मोदीनिंदा ... या व्यतिरिक्त त्यांच्या भाषणात काहीच नव्हते.

आपला पक्ष महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी इ. कशी कमी करणार आहे, देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपल्याकडे काय योजना आहेत, देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा आपण कशी करणार आहोत, आपल्या पक्षाचे परराष्ट्र धोरण काय आहे, शेतकर्‍यांसाठी आपण काय करणार आहोत, आपल्याकडे विकासाच्या कोणत्या कल्पना आहेत या व अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी चकार शब्दही काढला नाही.

नेहमीच्या पद्धतीनुसार नाटकीपणा केलाच. सकाळी माध्यमांना सोबत घेऊन गंगेत डुबक्या मारल्या. नंतर भाषण सुरू असताना मध्येच ३-४ मिनिटे थांबले. कारण हे होते की कुठूनतरी मशिदीतली बांग ऐकू येत होती. बांग संपेपर्यंत थांबून आणि सकाळी गंगेत डुबक्या मारून आपली दिखाऊ धर्मनिरपेक्षता व लांगूलचालन दाखवून दिले. आजूबाजूला बरीच मुस्लिम वस्ती असलेले मैदान निवडण्यातही काँग्रेससारखीच चतुराई दिसली.

१९८७-८९ या काळात वि.प्र.सिंग जशी नाटके करत असत तसेच केजरीवालांनीही आज केले. त्यांनी अंबानी बंधूंचे स्विस बँकेत खाते असून यामध्ये कोटीच्या-कोटी काळा पैसा असल्याचा आरोप केला व अंबानी बंधूंच्या स्विस बँकेतील खाते क्रमांकही जाहीर केले- खाते क्रमांक- ५०९०१६०९८३ आणि ५०९०१६०९८४. वि.प्र.सिंग यांनीही बोफोर्स प्रकरण जोरात असताना राजीव गांधींच्या स्विस बॅंक खात्याचे क्रमांक असेच जाहीर केले होते. त्याच धर्तीवर केजरीवालांनी तोच नाटकीपणा केला. परंतु २०१४ मधील मतदार १९८८ च्या तुलनेत जास्त शिक्षित आहे याची त्यांना कल्पना नसावी.

एकंदरीत एक अत्यंत नकारात्मक भाषण व कमालीचा नाटकीपणा केजरीवालांनी आज वाराणशीत केला.

---------------------------------------------------------------------------

केजरीवाल व इतरांवर आज वाराणशीत शाई फेकल्याचे दाखवत होते. यापूर्वी योगेंद्र यादवांना शाई फासणारा 'आप'चाच कार्यकर्ता होता. 'आप'ने त्याच्याविरूद्ध काहीच कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी हरयानामध्ये केजरीवालांना काळे झेंडे दाखविणारे 'आप'चेच कार्यकर्ते होते. मनीष सिसोदियांना पाटण्यामध्ये काळे झेंडे दाखविणारे देखील 'आप'चेच कार्यकर्ते होते. स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यासारखी खोडसाळ कृत्ये करून सहानूभूती मिळविणे आणि इतर पक्षांवर दोष ढकलणे ही 'आप'ची नवीन स्ट्रॅटेजी दिसतेय.

प्रतिक्रिया

इष्टुर फाकडा's picture

25 Mar 2014 - 8:58 pm | इष्टुर फाकडा

काँग्रेस ने मोदींचा रस्ता काटायला सोडलेली मांजर असावी असंच केजरीवाल चं सगळं चाललेलं आहे सध्या :)

विकास's picture

25 Mar 2014 - 9:02 pm | विकास

केजरीवाल व इतरांवर आज वाराणशीत शाई फेकल्याचे दाखवत होते.

तरी या वेळेस गाडीची काच कशी फुटली नाही?

सकाळी माध्यमांना सोबत घेऊन गंगेत डुबक्या मारल्या.
*clapping*
तुम्हाला माहीत नसेल कदाचीत पण *secret* गंगेत डुबकी मारली की आपली सगळी पापे धुतली जातात आणि आपण परत धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होतो. (पण मग मोदी उडी का मारत नाहीत? *scratch_one-s_head* )

यासंदर्भात अनरीअल टाईम्स मधे आलेला विनोद बघण्यासारखा आहे.

Keju
Ganga purifies herself after washing over Kejriwal’s holy body in Varanasi

Before after

>>>सकाळी माध्यमांना सोबत घेऊन गंगेत डुबक्या मारल्या.

प्रसारमाध्यमांच्या पापांचं क्षालन झालं असावं असं मानायला जागा आहे तर...
(मुळात प्रसारमाध्यमं पाप करतात का?)
बा द वे (तुमचा तो) तरुण तेजपाल कुठंय हो सध्या? ;)

Modi for vision.
Rahul for division...!..!..!...!
Kejriwal for Televisions ...!!!!!!

प्रसार माध्यमांचे शेअर्स नक्कीच वधारतील!

विकास's picture

25 Mar 2014 - 9:39 pm | विकास

आणि मिपावरील सध्याचे धागे revision! ;)

रमेश आठवले's picture

25 Mar 2014 - 11:00 pm | रमेश आठवले

मी राहुल फॉर illusion असे ऐकले आहे.

दिव्यश्री's picture

25 Mar 2014 - 11:45 pm | दिव्यश्री

मस्तच ... *lol* काय पण हाणलाय... :D

प्रचेतस's picture

25 Mar 2014 - 9:40 pm | प्रचेतस

कंटाळा आला आता अश्या धाग्यांचा

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Mar 2014 - 10:26 am | डॉ सुहास म्हात्रे

+१००

या रवंथापेक्षा आता पहा, नीट विचार करा आणि योग्य वाटेल त्याला मत द्या... पण मत जरूर द्या... असेच वाटते.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

26 Mar 2014 - 2:06 pm | विश्वनाथ मेहेंदळे

तरी धागा उघडून आवर्जुन वाचलात ??

निवडून आलो तर आपण स्वतः किंवा आपला पक्ष नक्की काय करणार आहे याविषयी भाषणात चकार शब्द नव्हता. मोदी निवडून आले तर तुमचे कसे वाटोळे होईल हाच भाषणातला मुख्य मुद्दा होता. वरील वाक्याशी पुर्ण सहमत. केजरीवाल याचे परीक्षण करताना हा विचार महत्वाचा आहे. महत्वाचे म्हणजे केजरीवाल याना हे माहीत आहे की आपण सरकार बनवत नाही. त्यामुळे बोलायला काय जाते? मला व्यक्तीशा हा मुद्दा पटतो की राहुल आणि मोदी हे उद्योगपतीचा वापर करतात व त्याना त्याचा मोबदला ही देतात. हे सर्वमान्य गुपित आहे. पण शासनकर्ता म्हणुन मी मोदीना जास्त योग्य मानतो. कारण शासनात भावनेपेक्षा व्यवहाराला महत्व असावे.
(अनुस्वार सापडत नाही. मदत करा.)

मराठी कथालेखक's picture

27 Mar 2014 - 4:37 pm | मराठी कथालेखक

तंत्र (taMtra) , मंत्र (maMtra), संत्र (saMtra)

मारकुटे's picture

26 Mar 2014 - 7:24 am | मारकुटे

केजरीवाल व इतरांवर आज वाराणशीत शाई फेकल्याचे दाखवत होते. यापूर्वी योगेंद्र यादवांना शाई फासणारा 'आप'चाच कार्यकर्ता होता. 'आप'ने त्याच्याविरूद्ध काहीच कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी हरयानामध्ये केजरीवालांना काळे झेंडे दाखविणारे 'आप'चेच कार्यकर्ते होते. मनीष सिसोदियांना पाटण्यामध्ये काळे झेंडे दाखविणारे देखील 'आप'चेच कार्यकर्ते होते. स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यासारखी खोडसाळ कृत्ये करून सहानूभूती मिळविणे आणि इतर पक्षांवर दोष ढकलणे ही 'आप'ची नवीन स्ट्रॅटेजी दिसतेय.

हे सगळं संघाच्याच चालीवर चालू आहे म्हणायचं !

ऋषिकेश's picture

26 Mar 2014 - 9:51 am | ऋषिकेश

भाजपा = मोदी हे समीकरण आणि आअप=केजरीवाल हे समीकरण दोन्हीचा अतिशय वीट येऊ लागला आहे.
दोन्ही पक्षांच्या समर्थकांनी यापलिकडे जाऊन बोलावे.

माझे मतः
केजरीवाल मोदींना हरवण्याची शक्यता बरीच कमी आहे, मोदी व केजरीवाल यांच्याहून कितीतरी चांगले उमेदवार कित्येक भागांतून उभे आहेत. तेव्हा ही व्यक्तीकेंद्रीत लढाई कंटाळवाणी आहे!

मंदार दिलीप जोशी's picture

26 Mar 2014 - 10:13 am | मंदार दिलीप जोशी

जास्तीत जास्त बालीशपणा आणि तमाशा करण्याचा या माणसाने चंगच बांधला आहे. वैताग आलाय अशा बातम्यांचा आता. निदान या वैतागासाठी तरी वाटते मधी एकदा सोळा मे ही तारीख उजाडते आहे.

नानासाहेब नेफळे's picture

26 Mar 2014 - 10:38 am | नानासाहेब नेफळे

गुजरातच्या विकासाच्या पोकळ गप्पा ऐकून आम्हालाही कंटाळा आला आहे
पृथ्वीराज चव्हाणांनी मोदींना डीबेटसाठी आमंत्रण दिले आहे
केजरीवालांनीही नरेंद्रभाईंना डीबेटचे आव्हान केले आहे
परंतु नेहमीप्रमाणे मोदींनी आपला उद्धट स्वभाव कायम ठेऊन खुल्या चर्चेतुन पळ काढला आहे.लोक मुर्ख असतात परंतु इतकेही मुर्ख नसतात हे अजून भाजपाला लक्षात आलेले नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Mar 2014 - 10:45 am | llपुण्याचे पेशवेll

खुल्या डिबेटचे आमंत्रण देण्यारा बाबांनी (पृथ्वीराजबाबा) स्वतः मुख्यमंत्री झाल्यापासून किती फायली सह्या करून पास केल्या ते सांगा. अभ्यास करून शेरे देणे, सुधारणा करून मग सही करणे ही प्रक्रीया तर दूरच राहीली. बाबा नुसता फायलींवर बसून राहतो असे फाईलसही सम्राट घड्याळवाले काकाजी म्हणतात. हल्ली कोणीही कोणाला आव्हान देतो. मुंगीने हत्तीला आव्हान द्यावे, आणि मुंगी मारणे हा कायद्याने गुन्हा असल्याने हत्तीने दुर्लक्ष करावे तर मुंगी लगेच टेरी (!) बडवून घेणार की 'हत्ती मला घाबरला, हत्ती मला घाबरला'. असो चालायचेच.

मूकवाचक's picture

26 Mar 2014 - 11:50 am | मूकवाचक

मिपावरच्या निष्णात डिबेटपटूंचे कौशल्य आणि चिकाटी पाहता डिबेटसाठी दिलेली आव्हाने हा डिबेटची प्रक्रिया सुरू राहिल्याने निवडणुका अनिश्चित कालावधीकरता स्थगित करण्यासाठी रचलेला डाव असू शकतो अशी साधार भीती वाटते. असो.

मंदार दिलीप जोशी's picture

26 Mar 2014 - 10:57 am | मंदार दिलीप जोशी

लोक मुर्ख असतात परंतु इतकेही मुर्ख नसतात हे अजून भाजपाला लक्षात आलेले नाही.

तुम्ही नानासाहेब नेफळे, ग्रेटथिन्कर, टॉपगिअर्ड फिलोसॉफर असे कितीही डुआयडी काढलेत तरी ते आम्ही ओळखू शकतो हे तुमच्या लक्षात आलेले नाही.

मृत्युन्जय's picture

26 Mar 2014 - 11:49 am | मृत्युन्जय

राखी सावंतनेही केजरीवालाना आव्हान दिले आहे. अजुन केजरीवालांनी उत्तरच दिलेले नाही

श्रीगुरुजी's picture

26 Mar 2014 - 12:50 pm | श्रीगुरुजी

>>> परंतु नेहमीप्रमाणे मोदींनी आपला उद्धट स्वभाव कायम ठेऊन खुल्या चर्चेतुन पळ काढला आहे.

चर्चा बरोबरीच्या लोकांमध्ये होउ शकते. कुठे १२ वर्षांहून अधिक काळ गुजरातसारख्या मोठ्या रा़ज्याचे मुख्यमंत्रीपद यशस्वीपणे सांभाळणारे मोदी आणि कुठे दिल्लीसारख्या छोट्या राज्याचे मुख्यमंत्रीपद ४९ दिवसात सोडून देऊन पळ काढणारे केजरीवाल!

केजरीवालांप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाणसुद्धा मोदींबरोबर चर्चा करण्यासाठी पात्र नाहीत. त्यांना केवळ दिल्लीश्वरांच्या कृपेने मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. ते स्वतः निवडून सुद्धा आलेले नाहीत. त्यांनी आधी निवडून येऊन दाखवावे आणि नंतर चर्चेचे आव्हान द्यावे.

केजरीवाल आणि चव्हाण यांनी आधी स्वतःला सिद्ध करावे, आपली कार्यक्षमता दाखवून द्यावी आणि नंतर शड्डू ठोकावा.

>>> लोक मुर्ख असतात परंतु इतकेही मुर्ख नसतात हे अजून भाजपाला लक्षात आलेले नाही.

तुम्ही आजवर 'ग्रेटथिंकर', 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर', 'नानासाहेब नेफळे' अशा अनेक नावांनी वावरलात. एका नावाने 'आप' आणि 'केजरीवालांना' शिव्या द्यायच्या आणि दुसर्‍या नावाने त्यांचे कौतुक करायचे अशी तुमची स्ट्रॅटेजी. इथले सभासद तुम्ही समजता तितके मूर्ख नसतात हे अजून तुमच्या लक्षात आलेले दिसत नाही.

नानासाहेब नेफळे's picture

26 Mar 2014 - 1:40 pm | नानासाहेब नेफळे

त्येच की !नरेंद्र मोदींनीही गुजरातचे मुख्यमंत्री व्हायच्या आधी साधी ग्रामपंचायतीचीही निवडणुक कधी लढवली नव्हती, मग थेट त्यांना कोणताहि अनुभव नसताना मुख्यमंत्रीपदी कसे बसवले गेले?

एक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जे की अमेरिकेतुन संगणकशास्रात M.S झालेले, दुसरे केजरीवाल IIT तुन M tech झालेले, यांच्यापूढे आपला काही टिकाव लागणार नाही.. आपण आपल्या 'बरोबरीच्याच' लोकांबरोबरच योग्य आहोत याचा साक्षात्कार नरेंद्र मोदींना झाला ,हे ही नसे थोडके..
केजरीवाल जर बरोबरीचे नाहीत तर त्यांच्या १६ प्रश्नांची थातुरमातुर उत्तर द्यायची गरज काय होती आणि जर उत्तरंच द्यायचीत तर खुली चर्चा पृथ्विराज चव्हाण व केजरीवालांसोबत करुन दाखवा..
शौर्याचे, विजिगिषु वृत्तीचे डोस उठसुठ जगाला पाजणार्या संघाच्या एका स्वयंसेवकाने अशा क्लैब्याचे दर्शन घडवावे हे काही बरे नव्हे...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Mar 2014 - 2:39 pm | निनाद मुक्काम प...

पृथ्वीराज ह्यांनी आधी काका पुतण्याची डिबेट करावे
मूळ मुद्दा फायली का हलत नाहीत.
पृथ्वी व केजू ह्यांच्या सारख्या सहकारी पक्षाच्या कुबड्या घेऊन मोदी ह्यांनी सरकार स्थापन नाही केले.
त्यांच्यात कशी तुलना होऊ शकते.

श्रीगुरुजी's picture

26 Mar 2014 - 5:19 pm | श्रीगुरुजी

>>> पृथ्वीराज ह्यांनी आधी काका पुतण्याची डिबेट करावे

आपल्याला 'लकवा' झालेला आहे का नाही याविषयी त्यांनी काकांशी सखोल व गंभीर चर्चा करावी आणि मग मोदींना आव्हान द्यावे.

श्रीगुरुजी's picture

26 Mar 2014 - 5:17 pm | श्रीगुरुजी

>>> त्येच की !नरेंद्र मोदींनीही गुजरातचे मुख्यमंत्री व्हायच्या आधी साधी ग्रामपंचायतीचीही निवडणुक कधी लढवली नव्हती, मग थेट त्यांना कोणताहि अनुभव नसताना मुख्यमंत्रीपदी कसे बसवले गेले?

कारण त्यांच्यात पात्रता होती आणि गेल्या १२+ वर्षात त्यांनी आपली पात्रता सिद्ध केली आहे. दुसरीकडे आयआयटीतून एम टेक झालेले जबाबदारी झटकून केवळ ४९ दिवसात धूम पळून का गेले हे सांगा ना.

>>> एक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जे की अमेरिकेतुन संगणकशास्रात M.S झालेले, दुसरे केजरीवाल IIT तुन M tech झालेले,

लालू सुद्धा डॉक्टरेट आहे, राहुल सुद्धा एम फिल आहे (म्हणे)!

>>> यांच्यापूढे आपला काही टिकाव लागणार नाही.. आपण आपल्या 'बरोबरीच्याच' लोकांबरोबरच योग्य आहोत याचा साक्षात्कार नरेंद्र मोदींना झाला ,हे ही नसे थोडके..

तुम्ही वाट्टेल ते गोड गैरसमज करून घ्या!

>>> केजरीवाल जर बरोबरीचे नाहीत तर त्यांच्या १६ प्रश्नांची थातुरमातुर उत्तर द्यायची गरज काय होती आणि जर उत्तरंच द्यायचीत तर खुली चर्चा पृथ्विराज चव्हाण व केजरीवालांसोबत करुन दाखवा..

अजाण व्यक्तीला थातुरमातुर दिलासा देऊनच वाटेला लावायचे असते. ज्ञानी व्यक्ती अज्ञानी व्यक्तिंबरोबर वादविवादात व्यर्थ वेळ घालवत नाहीत.

>>> शौर्याचे, विजिगिषु वृत्तीचे डोस उठसुठ जगाला पाजणार्या संघाच्या एका स्वयंसेवकाने अशा क्लैब्याचे दर्शन घडवावे हे काही बरे नव्हे...

बरं मग?

नानासाहेब नेफळे's picture

26 Mar 2014 - 5:42 pm | नानासाहेब नेफळे

पृथ्विराज असतील वा केजरीवाल, जाहिर चर्चेला ते तयार आहेत यातच त्यांचे मेरीट्स आहेत.. नरेंद्र मोदी पळ काढण्यात तरबेज आहेत ..
करन थापरच्या इंटरव्हुमधुन पळ काढणे
जाहीर चर्चेच्या आव्हाणातुन पळ काढणे
महाराष्ट्राला दुष्काळनिवारणासाठी दिलेल्या मोफत मदतीच्या वचनातुन पळ काढणे व मदतीचे पैसे मागणे .हे बघा इथे
http://www.esakal.com/esakal/20140326/4634611105938493251.htm

श्रीगुरुजी's picture

26 Mar 2014 - 8:28 pm | श्रीगुरुजी

उद्या कोणीही सोम्यागोम्या मोदींना चर्चेसाठी आव्हान देईल. दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडून पळून आल्यामुळे केजरीवालांकडे असल्या फालतू प्रश्नांसाठी व आव्हानासाठी भरपूर रिकामा वेळ आहे. मोदी व्यस्त आहेत. असल्या फालतू चर्चांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही.

मोदींचं नंतर बघू. प्रथम केजरीवालांनी माझ्या खालील प्रश्नांची उत्तरे द्यावीत व माझ्याशी जाहीर चर्चा करावी.

(१) सभेत भाषण सुरू असताना कोठून तरी लांबून बांग ऐकू आल्यावर ४-५ मिनिटे भाषण थांबवून स्वस्थ उभे का होते? असे करायला बांग म्हणजे काय राष्ट्रगीत वाटले का त्यांना?

या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिल्यावर पुढील प्रश्न विचारीन.

चव्हांणांनी माझ्या खालील प्रश्नाचे उत्तर द्यावे.

(१) अशोक चव्हाणांवर आदर्श प्रकरणी आजतगायत कारवाई का केली नाही?

या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिल्यावर पुढील प्रश्न विचारीन.

श्री गावसेना प्रमुख's picture

27 Mar 2014 - 8:29 am | श्री गावसेना प्रमुख

मास्तर नाना वात्र्य विद्यार्थी आहे,त्याच्या नादाला नका लागु,

नानासाहेब नेफळे's picture

27 Mar 2014 - 12:50 pm | नानासाहेब नेफळे

उद्या कोणीही सोम्यागोम्या मोदींना चर्चेसाठी आव्हान देईल. दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडून पळून
आल्यामुळे केजरीवालांकडे असल्या फालतू प्रश्नांसाठी व आव्हानासाठी भरपूर रिकामा वेळ आहे. मोदी व्यस्त
आहेत. असल्या फालतू चर्चांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही.
मोदींचं नंतर बघू.

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचा चारवर्षे मुख्यमंत्री ,त्याअधी पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री ,सत्तरच्या दशकात अमेरीकेतुन संगणकशास्त्रातील पदवी घेतलेला..." सोम्या ",
मॅगसेसे पुरस्कार मिळालेला ,आयआयटी इंजिनिअर,रेवेन्यु खात्याचा कमिशनर, दिल्लीत वचनांची पुर्ती करणारा मुख्यमंत्री ,दहा वर्षं समाजसेवेत घालवलेला.. "गोम्या "
जर हे' सोमेगोमे' आहेत तर यांच्यापासुन पळ काढणायची मोदींना गरजच काय???? एकदाच ,फक्त थोडे तास द्यावेत चर्चेसाठी नरेंद्रभाईंनी व या दोघा सोम्यागोम्यांना निष्प्रभ करुन दाखवावे..

श्रीगुरुजी's picture

27 Mar 2014 - 12:59 pm | श्रीगुरुजी

>>> महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचा चारवर्षे मुख्यमंत्री ,त्याअधी पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री ,सत्तरच्या दशकात अमेरीकेतुन संगणकशास्त्रातील पदवी घेतलेला..." सोम्या ",

इतक्या पदव्या असून उपयोग काय? शेवटी काँग्रेसमध्येच कुजले ना? आणि ४ वर्षे मुख्यमंत्री असून नक्की काय कामगिरी केली? मंत्रालयाच्या आगीत सिंचन घोटाळ्याचा फाईल्स नष्ट होणे आणि अशोक चव्हाण, सुशीलकुमार, निलंगेकर इ. आदर्श घोटाळ्यातून अलगद सोडविणे ही महान कामगिरी समजली तर प्रश्नच मिटला. त्यांना वादविवादाची एवढी हौस असेल तर विनोद तावडे, गिरीश बापट इ. ना आव्हान देऊन चर्चा करावी. मोदींबरोबर चर्चा करण्याकरता आधी त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल.

>>> मॅगसेसे पुरस्कार मिळालेला ,आयआयटी इंजिनिअर,रेवेन्यु खात्याचा कमिशनर, दिल्लीत वचनांची पुर्ती करणारा मुख्यमंत्री ,दहा वर्षं समाजसेवेत घालवलेला.. "गोम्या "

जिथे जाईल तिथून पळून जाणे एवढंच यांनी आतापर्यंत केलंय. यांच्याशी कसली डोंबलाची चर्चा करायची?

>>> जर हे' सोमेगोमे' आहेत तर यांच्यापासुन पळ काढणायची मोदींना गरजच काय???? एकदाच ,फक्त थोडे तास द्यावेत चर्चेसाठी नरेंद्रभाईंनी व या दोघा सोम्यागोम्यांना निष्प्रभ करुन दाखवावे..

नरेंद्र मोदींसमोर हे आधीच निष्प्रभ आहेत. अगदीच चर्चेसाठी उतावीळ असतील तर गुजरातमधील भाजपच्या एखाद्या आमदाराशी चर्चा करून हौस भागवून घ्यावी.

नानासाहेब नेफळे's picture

27 Mar 2014 - 1:47 pm | नानासाहेब नेफळे

सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स नष्ट होणे, सुशीलकुमार शिँदे निलंगेकर यांना आदर्शतून अलगद सोडवणे ..

याची उत्तरे चव्हाणांना विचारता येतील, जर मोदी जाहीर चर्चेला तयार असतील तर..अशा चर्चेत तावडे बापट व राणाभिमदेवी थाटात 'पुराव्यानिशी' अगडबंब आरोप करणारे व नंतर गायब होणारे किरीट सोमय्या वगैरेंची टीमच घेऊन येता येईल. चव्हाण व केजरीवाल दोघेही एक्स्पोझ होतील...हिच वेळ आहे काँग्रेसला जनतेसमोर एक्स्पोझ करायची..
पण.... नरेंद्र मोदी असे करणार नाही याचे कारण आहे त्यांच्या मंत्रीमंडळातील अत्यंत 'स्वच्छ ''कार्यक्षम' मंत्री बाबू बोखिरीया,व पुरषोत्तम सोलंकी ,त्याच बरोबर दहा वर्षे गुजरातमध्ये लोकायुक्त का नेमला नाही याचाही जाब त्यांना द्यायला लागेल.
बोखिरियाना तीन वर्षांची शिक्षा झाली आहे.
http://m.timesofindia.com/india/Babu-Bokhariya-Gujarat-minister-sentence...

पुरषोत्तम सोलंकी
http://www.dnaindia.com/india/report-hc-found-him-guilty-in-rs400-cr-sca...
यावर आपले काय म्हणणे आहे श्रीगुरुजी? की आता कोर्टही खोटारडे झाले?

नानासाहेब नेफळे's picture

29 Mar 2014 - 8:18 pm | नानासाहेब नेफळे

या इथे वरती जो प्रतिसाद आहे. त्याचा प्रतिवाद कुणीही केलेला नाही ,कृपया या प्रतिसादाचा प्रतिवाद कुणीतरी करावा अशी मी मित्रत्वाची विनंती करतो.

मंदार दिलीप जोशी's picture

1 Apr 2014 - 12:28 pm | मंदार दिलीप जोशी

तो प्रतिसाद प्रतिवाद करायच्या लायकीचा नाही

नानासाहेब नेफळे's picture

1 Apr 2014 - 1:07 pm | नानासाहेब नेफळे

का नाही? काय चूकीचे आहे त्या प्रतिसादात!
आपल्याकडे उत्तर नसेल तर तसे स्पष्ट सांगा, या धाग्यावरचे प्रत्येक माझे प्रतिसाद श्रीगुरुजींना आणि तूम्ही प्रतिवादीत केले आहेत. परंतु हा प्रतिसाद रिक्त सोडला कारण इतक्या उघड मुद्द्याचे उत्तर तूमच्याकडे नाही...
परत एकदा मित्र्त्वाची विनंती करतो, आपण त्या प्रतिसादाचा प्रतिवाद करावा.
http://www.misalpav.com/comment/566824#comment-566824

गब्रिएल's picture

1 Apr 2014 - 1:14 pm | गब्रिएल

काय चूकीचे आहे त्या प्रतिसादात!
सग्ळच चुकलं की वो तुम्चं.
त्याचं आसम हाय नेभळे साय्ब. तुम्च्या गुर्जींच म्हन्न हाय की 'तुमि पुरावे माग्ता. म्हंजे तुम्च्याशी चर्चा श्यक्य नाय.' आता गुर्जी बद्ला नायतर माग्णि बद्ला. काय म्हंता?

मंदार दिलीप जोशी's picture

1 Apr 2014 - 1:32 pm | मंदार दिलीप जोशी

:D

श्रीगुरुजी's picture

1 Apr 2014 - 2:12 pm | श्रीगुरुजी

>>> तो प्रतिसाद प्रतिवाद करायच्या लायकीचा नाही

+१

सहमत!

नानासाहेब नेफळे's picture

27 Mar 2014 - 1:02 pm | नानासाहेब नेफळे

बांग हे काय राष्ट्रगीत आहे का

त्यांच्या सभेत अनेक मुस्लिम आले असतील, त्यांच्यासाठीतरी नमाज पठण पवित्र आहे, त्या अनुषंगाने ,त्यांच्या भावनेचा आदर राखण्यासाठी केजरीवाल थांबले असतील.

अशोक चव्हाणांना तिकिट

मुद्दा मान्य आहे..तिकीट द्यायला नको होते.परंतु येदुरप्पांना टिकीट देणार्या भाजपसारख्या पक्षाने व अशा पक्षाचे व त्याच्या विचारधारेच जाहिर समर्थन करणार्यांनी असे प्रश्न विचारायचा नैतिक अधिकार गमावला आहे.

श्रीगुरुजी's picture

27 Mar 2014 - 1:10 pm | श्रीगुरुजी

>>> मुद्दा मान्य आहे..तिकीट द्यायला नको होते.परंतु येदुरप्पांना टिकीट देणार्या भाजपसारख्या पक्षाने व अशा पक्षाचे व त्याच्या विचारधारेच जाहिर समर्थन करणार्यांनी असे प्रश्न विचारायचा नैतिक अधिकार गमावला आहे.

बरं मग निदान तुमच्या 'आप'समर्थकांनी किंवा गंगेहून निर्मळ असणार्‍या केजरीवालांनी तरी हा प्रश्न विचारला का? हा प्रश्न विचारण्याचे नैतिक, अनैतिक, राजकीय, सामाजिक, भावनिक, धार्मिक, निधर्मी इ. सर्व हक्क निदान केजरीवालांना आणि 'आप'ला तरी नक्कीच आहेत. मग ते अजून गप्प का? ('आप' काँग्रेसची 'बी' टीम तर नाही ना?)

अरे पावट्या तुझ्या डोक्यातला अंधार अजुन गेलेला दिसत नाही म्हणुन थोडेसे असे, तुझे 'सोम्या आणि गोम्या' दोघेही परावलंबी, पराधीन म्हणजेच दुसर्‍याचा आधार असल्याशिवाय त्यांना धड उभेही राहता येत नाही कींवा दोन पावलेही टाकता येत नाहीत आणि म्हणे आमच्याबरोबर चर्चा करा. मोदी स्वबळावर तिन वेळा निवडुन आलाय कोणाच्याही कुबड्या घेतल्याशिवाय आणि स्वताच्या कर्तबगारीवर पंतप्रधानपदाच्या उमेद्वारीपर्यन्त पोहोचलाय. अशा माणसाने काय म्हणुन या असल्या सोम्या आणि गोम्याना प्रतिसाद द्यावा ?? त्या सोम्या आणि गोम्यानी पाडलेला प्रकाश दाखव आणि नंतर चर्चेचे आव्हान कर.

अरे तुझा तो साळ्सूदपणाचा आव आणणारा भम्पक गोम्या धड दोन महीने दिल्लीचे राज्य चालवु शकला नाही आणि म्हणे मी देश चालवणार, लोकांच्या डोक्यावर टोपी घालणे आणि रस्त्यावर घोळ्क्याने किंचाळण्याइतके सोपे आहे का ते ??? त्याची दहा वर्षाची तथाकथीत समाजसेवा इथे ठळकपणे व विस्ताराने समोर मांडता येइल का तुला ???

आणि तो दुसरा तुझा सोम्या कधी आणि कोणती निवड्णुक लढवुन मुख्यमंत्री झाला सांगशिल का ???

आता पडला का प्रकाश..!!!! ग्रेट........नान्या ????

प्रसाद१९७१'s picture

27 Mar 2014 - 5:01 pm | प्रसाद१९७१

महाराष्ट्राला दुष्काळनिवारणासाठी दिलेल्या मोफत मदतीच्या वचनातुन पळ काढणे व मदतीचे पैसे मागणे

हे उत्तम करते आहे गुजरात सरकार. सगळे २२ कोटी महराश्ट्राच्या सत्ताधीशांचा कार्यकर्त्यांनी लुटुन खाल्ले. परत द्या ते पैसे गुजराथ ला.

बॅटमॅन's picture

26 Mar 2014 - 5:51 pm | बॅटमॅन

लालू सुद्धा डॉक्टरेट आहे, राहुल सुद्धा एम फिल आहे (म्हणे)!

बाकी काही असो पण राहुल अन लालूची तुलना केजरीवाल अन पृथ्वीराज चव्हाणांबरोबर करणे काही पटले नाही. हा फक्त वादासाठी वाद झाला.

सव्यसाची's picture

26 Mar 2014 - 6:53 pm | सव्यसाची

पृथ्वीराज चव्हाण आणि अरविंद केजरीवाल यांच्या शिक्षणाचा मुद्दा गुरुजीनी काढला नव्हता. मला वाटते अश्या अतार्किक मुद्द्यावर असेच अतार्किक उत्तर बरे असते. :-)
बाकी शिक्षण लई झाले म्हणून तो चांगला मुख्यमंत्री हे काही पटले नाही बुवा!!

बॅटमॅन's picture

26 Mar 2014 - 8:09 pm | बॅटमॅन

हम्म तेही आहेच म्हणा. :)

प्रदीप's picture

26 Mar 2014 - 7:14 pm | प्रदीप

राहुल सुद्धा एम फिल आहे

छे! छे! एजन्सी फ्रान्स प्रेस (AFP) ची बातमी, ५ मार्चच्या अंकात आमच्या येथील इंग्रजी दैनिकाने छापली होती. त्यातून उर्ध्रुत करतो. बातमी मोदी व राहूल ह्यांच्याविषयी आहे.

"One is a former tea boy, the other a Harvard and Cambridge-educated scion of India's biggest political dynasty"

पुढे...

"Often portrayed as a reluctant leader, he [राहूल गांधी] gave up a business career to enter politics"....

आहात कुठे!! राहूल गांधी चुकून सत्तेवर आलाच तर तो थेट चंद्रावरून शिक्षण घेऊन आला आहे, आणि शुक्रावर अथव थेट सूर्यावरच त्याचा बिझीनेस होता तो सोड्न भारतातील गरीब बिचार्‍या जनतेचा उद्धार करण्यासाठी तो आता पृथ्वीतलावर अवतरला आहे, असे वाचावयास मिळेल ह्याची खात्री बाळगावी!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Mar 2014 - 9:12 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अजाण व्यक्तीला थातुरमातुर दिलासा देऊनच वाटेला लावायचे असते. ज्ञानी व्यक्ती अज्ञानी व्यक्तिंबरोबर वादविवादात व्यर्थ वेळ घालवत नाहीत.

+१००

मुर्खांशी वाद घालण्यात अर्थ नसतो, ते तुम्हाला त्यांच्या पातळीवर आणुन ठेवतात. :)

विकास's picture

26 Mar 2014 - 7:24 pm | विकास

केवळ फॉर दी रेकॉर्ड दुरुस्ती:
दुसरे केजरीवाल IIT तुन M tech झालेले, यांच्यापूढे आपला काही टिकाव लागणार नाही.

केजरीवाल हे B.Tech. आहेत, M.Tech. नाहीत.

मोदी पॉलीटीकल सायन्स मध्ये MA - Gujarat University, Ahmedabad आहेत.

बंडा मामा's picture

26 Mar 2014 - 11:51 pm | बंडा मामा

तिथेच तर फरक आहे. MA - Gujarat University आणि B.Tech from IIT
पण ते जाऊ दे.. केजरीवाल हुशार आहेत हे त्यांचे कट्टर विरोधकही मान्य करतात. आणि मोदी तितके तल्लख नाहीत हे त्यांचे समर्थकही मान्य करतात. त्यांचे इंग्रजी भाषण ऐकले नाहीत का कधी.

विकास's picture

27 Mar 2014 - 12:04 am | विकास

तिथेच तर फरक आहे. MA - Gujarat University आणि B.Tech from IIT

हा एक नवजातीयवाद आहे असे म्हणायचे का? बाय द वे, मोदींनी पॉलीटिकल सायन्स मधे मास्टर्स केले आणि त्यातच ते पुढे आहेत. मात्र दिल्लीहून पळायची सुरवात केजरीवाल यांनी आय आय टी नंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंट मधे जाऊन केली. कदाचीत तिथे पण जमले नसावे. ;)

बंडा मामा's picture

27 Mar 2014 - 2:21 am | बंडा मामा

नव/जुना जातियवाद इथे कुठुन आला? IIT मधून बी टेक करायला आणि गुजरात युनिवर्सिटी मधुन आर्ट्सची डिग्री घ्यायला एकच कॅलीबर लागते असे तुमचे मत आहे का?

तरीही मी जाऊ दे म्हणालो होतो. शिक्षण कुठून का घेतले असेना हुशारी कुणाकडेही असू शकते. त्यासाठीच मी केजरीवालचे उदाहरण दिले होते.

उदा, हा विडीयो बघा: मोदींनी पळ काढला वगैरे तर सोडून द्या, किती बत्थड सारखी मक्ख चेहर्याने उत्तरे देत होते मोदी ते पाहा. हा माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान व्हावा असे कसलेही तेज/बुद्धीमत्ता मोदींच्यात दिसत नाही.

अर्धवटराव's picture

27 Mar 2014 - 5:17 am | अर्धवटराव

या मुलाखतीला जर कोणि मोदिंचा पळकुटेपणा म्हणत असेल तर त्यांना केजरीवालांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा म्हणजे 'त्याग' , 'तत्वनिष्ठा' वगैरे वाटणं स्वाभावीक आहे.
असो. सरणावरच्या प्रेतांनी मनोरंजन करणं - वांझोट्या ज्ञानाच्या पदव्या देणं आणि न पेलणार्‍या जबाबदार्‍यांनी त्यागी बनवण्याचे प्रयोग भारताला नवीन नाहि. एकवेळ मोदिला मृत्यु आहे... पण केजरीवाल अमर आहे.

विकास's picture

27 Mar 2014 - 6:06 am | विकास

नव/जुना जातियवाद इथे कुठुन आला? IIT मधून बी टेक करायला आणि गुजरात युनिवर्सिटी मधुन आर्ट्सची डिग्री घ्यायला एकच कॅलीबर लागते असे तुमचे मत आहे का?

चुकीचे गृहीतक आहे. कारण प्रत्येकजणाला आय आय टीला जावेसे वाटते असे तुम्हाला म्हणायचे आहे, जे हास्यास्पद आहे.

शिक्षण कुठून का घेतले असेना हुशारी कुणाकडेही असू शकते. त्यासाठीच मी केजरीवालचे उदाहरण दिले होते.
केजरीवाल ढ आहेत का नोबेल पारीतोषिकाच्या लायकीचे आहेत ह्या बद्दल मी काहीच म्हणत नाही. पण आय आय टी तून शिकले म्हणून हुषार असे म्हणायचे असते तर त्यात काहीतरी कॉम्प्लेक्स भाव नक्कीच आहे...

मोदींनी पळ काढला वगैरे तर सोडून द्या, किती बत्थड सारखी मक्ख चेहर्याने उत्तरे देत होते मोदी ते पाहा. हा माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान व्हावा असे कसलेही तेज/बुद्धीमत्ता मोदींच्यात दिसत नाही.

खालील फोटोतला कसा देशाचा पंतप्रधान काय विश्वनायकच वाटतोय नाही का? :)

AK

AK

जोशी 'ले''s picture

27 Mar 2014 - 1:06 pm | जोशी 'ले'

=))

बंडा मामा's picture

27 Mar 2014 - 3:58 pm | बंडा मामा

१. आपण चित्रे दिलेला माणूस ना मी पंतप्रधानाचा दावेदार समजतो ना तो स्वतः तसे म्हणतो.
२. मी व्हिडीयो दिला आणि आपण फोटो दिलेत. फोटो पाहुन आपण गुणवत्ता जज करणार असणार तर काय बोलायचे.

वेताळ's picture

31 Mar 2014 - 10:30 am | वेताळ

लेकानो शिक्षणाचा आणि बुध्दीमत्तेचा संबध असतो हे तुम्हाला कोणी शिकवले रे?
साधा ग्रज्युएट नसलेल्या गेटस कडे ढिगबंडल आयआयटीयन्स चाकरी करतात.

इंग्रजी फाडफाड येत असेल तरच तल्लख. असे म्हणायचे का मामा तुम्हाला ?

बंडा मामा's picture

27 Mar 2014 - 4:01 pm | बंडा मामा

नाही. ज्या भाषेत इंटरव्यु देत आहोत त्या भाषेवर प्रभुत्व आणि कठोर प्रश्नांचा सामना सडेतोड मुद्दे मांडून ह्याला मी तल्लखपणा मानतो.

तिथेच तर फरक आहे. MA - Gujarat University आणि B.Tech from IIT

अडाण्यांचा मुकुटमणी शोभावा असा हा प्रतिसाद आहे. म्हणजे काय तर इंजिनिअर (किंवा कदाचित डॉक्टरही) म्हणजेच तल्लख बुध्दीमत्तेचे आणि आर्ट्सवाले आडाणी. आधीच विंजिनिअर आणि त्यातून आय.आय.टीचा म्हणजे काय बोलायलाच नको.सगळ्या जगाची अक्कल केवळ यांनाच दिलेली आणि इतरांना काही समजत नाही.गुजरात युनिव्हर्सिटी म्हणजे किस झाड की पत्ती.आधीच आर्ट्सवाले म्हणजे थोडेसे 'मेन्टली चॅलेन्ज्ड' आणि त्यातून गुजरात युनिव्हर्सिटी म्हणजे ते किती मंद असतील याची कल्पनाच केलेली बरी!! या असल्या विकृत मानसिकतेचा मला स्वतःला भयंकर त्रास झाला आहे त्यामुळे असले कोणीतरी काहीतरी बरळायला लागले की ते प्रचंड डोक्यात जाते.

आणि आय.आय.टी खरगपूरची काय मातब्बरी सांगता?मी पोस्ट ग्रॅज्युएट केले आहे त्या संस्थेत ३०-३५ आय.आय.टी खरगपूरचे बी.टेक होते आणि अनेक आय.आय.टी खरगपूरवाल्यांना तिथे प्रवेश मिळालाही नव्हता. (अर्थातच आमच्याच संस्थेतील लोकांना जगातील सगळी अक्कल दिली आहे आणि बाकीचे आडाणी असा माझ्याकडे नक्कीच नाही-- अशा अ‍ॅटिट्यूडवाल्यांना इंटरव्ह्यूमध्येच वगळले जाते :) )

या असल्या 'होलिअर दॅन दाऊ' अ‍ॅटिट्यूडमुळे भारतातील कित्येक विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे (आपल्याच समाजातील मोठ्या माणसांनी आणि इतरांनी). या प्रकाराला जितका होईल तितका विरोध केलाच पाहिजे.

त्यांचे इंग्रजी भाषण ऐकले नाहीत का कधी.

कोणाच्याही भाषणाचा आणि कर्तृत्वाचा संबंध जोडायला काय सगळे आम आदमी पार्टीवाले वाटले का या कंसमामाला?

पिशी अबोली's picture

27 Mar 2014 - 12:19 pm | पिशी अबोली

+१००००००

मालोजीराव's picture

27 Mar 2014 - 1:02 pm | मालोजीराव

यावरून जगातल्या नामवंत कंपन्यांचे कॉलेज ड्रॉपआउट असणारे संस्थापक आठवले…ज्यांच्या पदरी हे आय आय टी, एम आय टी वाले काम करतात

बंडा मामा's picture

27 Mar 2014 - 4:03 pm | बंडा मामा

मालोजीराव,

तरीही मी जाऊ दे म्हणालो होतो. शिक्षण कुठून का घेतले असेना हुशारी कुणाकडेही असू शकते.

ह्या माझ्या प्रतिसादातील वाक्याचा अर्थ काय होतो?

त्या दृष्टीनं आमचे सांगलीचे वसंतदादा पाटील हे लौकिकार्थानं (फक्त) प्राथमिक शिक्षण घेतलेले माजी मुख्यमंत्री हुशार ठरावेत.

मालोजीराव's picture

27 Mar 2014 - 10:25 am | मालोजीराव

केजरीवालांप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाणसुद्धा मोदींबरोबर चर्चा करण्यासाठी पात्र नाहीत. त्यांना केवळ दिल्लीश्वरांच्या कृपेने मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. ते स्वतः निवडून सुद्धा आलेले नाहीत. त्यांनी आधी निवडून येऊन दाखवावे आणि नंतर चर्चेचे आव्हान द्यावे.

गुर्जी…तुम्ही मोदीप्रेमामुळे वाहावत जाता कधी कधी…तुमच्या पोस्ट अभ्यासपूर्ण असतात म्हणून नेहमी वाचतो.

पृथ्वीराज चव्हाण कराड मधून उभे राहिले तर समोरच्याचे डीपोजीट जप्त करतील इतकी ताकद आहे.त्यांची चूक इतकीच कि ते काँग्रेससारख्या पक्षात आहेत. स्वतंत्र निर्णय घेण्याची सूट असती तर मोदींच्या योग्यतेचे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते.

स्वतंत्र निर्णय घेण्याची सूट असती तर मोदींच्या योग्यतेचे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते.

याविषयी असहमती दर्शवायचे कारण नाही. तरीही...

पृथ्वीराज चव्हाण कराड मधून उभे राहिले तर समोरच्याचे डीपोजीट जप्त करतील इतकी ताकद आहे.

१९९९ मध्ये याच पृथ्वीराज चव्हाणांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता.त्यानंतर पृथ्वीराजांनी लोकसभेची निवडणुकही लढवली नाही.मग हे नक्की कोणत्या आधारावर म्हणता?

मालोजीराव's picture

27 Mar 2014 - 11:25 am | मालोजीराव

१९९९ मध्ये याच पृथ्वीराज चव्हाणांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता.त्यानंतर पृथ्वीराजांनी लोकसभेची निवडणुकही लढवली नाही.मग हे नक्की कोणत्या आधारावर म्हणता?

९१,९६,९८ मध्ये चव्हाण जिंकले होते हे नजरेआड कसं केलत…१९५७ ते १९९८ पर्यंत त्यांच्या घरातलाच खासदार होता (प्रेमलाकाकी आणि आनंदकाका).
९९ च्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात होते…तत्कालीन स्थितीप्रमाणे श्रीनिवास पाटलांना फायदा होणार उघड होतं.

क्लिंटन's picture

27 Mar 2014 - 11:31 am | क्लिंटन

हो बरोबर आहे ना. पृथ्वीराज १९९१,१९९६ आणि १९९८ मध्ये जिंकले होते. तसे तीन निवडणुका जिंकलेले अनेक खासदार आहेत.तरीही इतर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती असणे म्हणजे त्या मतदारसंघावर पूर्ण पकड हवी (अशी पकड नरेन्द्र मोदी किंवा वाय.एस.राजशेखर रेड्डी, सोनिया गांधी इत्यादींचीही नाही). तितकी पकड पृथ्वीराजांची आहे का हाच प्रश्न आहे.

मालोजीराव's picture

27 Mar 2014 - 12:57 pm | मालोजीराव

तितकी पकड पृथ्वीराजांची आहे का हाच प्रश्न आहे.

बरोबर आहे, त्यांना तिकीट मिळालं असतं तर कदाचित स्पष्ट झालं असतं
असो
माझा मुद्दा त्यांच्या पात्रतेबद्दल होता…केजरीवाल बरोबर त्यांची तुलना गैर वाटली.

श्रीगुरुजी's picture

27 Mar 2014 - 1:05 pm | श्रीगुरुजी

>>> माझा मुद्दा त्यांच्या पात्रतेबद्दल होता…केजरीवाल बरोबर त्यांची तुलना गैर वाटली.

पृथ्वीराज चव्हाण उच्चविद्याविभूषित आहेत. परंतु काँग्रेसमध्ये त्यांची हुशारी वाया गेल्यासारखी वाटते. त्यांची कारकीर्द मनमोहन सिंगांसारखी वाटते. सुदैवाने अधिकार पद आहे पण दुर्दैवाने निर्णयक्षमतेचा अभाव आणि निष्क्रीयता आहे. गेल्याच आठवड्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर निष्क्रीयता जास्तच खुपते.

नानासाहेब नेफळे's picture

28 Mar 2014 - 3:53 pm | नानासाहेब नेफळे

मुद्दा मान्य बरं का !
परंतु ही गुजरातमधली निर्णयक्षमता का ढेपाळते आहे तेही जरा स्पष्ट करा.
हे बघा इथे.
http://www.misalpav.com/comment/566824#comment-566824

प्रसाद१९७१'s picture

27 Mar 2014 - 5:04 pm | प्रसाद१९७१

त्यांची चूक इतकीच कि ते काँग्रेससारख्या पक्षात आहेत. स्वतंत्र निर्णय घेण्याची सूट असती तर मोदींच्या योग्यतेचे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते.

हे थोडेफार मान्य आहे. पण काँग्रेस पक्षात रहायचा निर्णय त्यांचाच आहे.

विवेकपटाईत's picture

26 Mar 2014 - 7:23 pm | विवेकपटाईत

नेफळ;, गप्पांवर विश्वास ठेवू नका , फक्त प्लान्निंग कॅमिशन चे अहवाल वाचा. गुजरात मध्ये विकास जास्त झाला हे सत्य आहे. नद्या जोडण्यात आलेल्या आहे. सरदार सरोवरचे पाणी दूरपर्यंत पोहचले आहे. महाराष्ट्रातले उद्योग गुजरात कडे जास्त आहे. गेल्या दहा वर्षात फक्त १ शेतकर्याने खराब शेतीमुळे आत्महत्या केली आहे. (विश्वास नसेल तर माहिती कृषी विभाग ज्यांचे मंत्री माननीय शरद पवार आहे आर टी आईच्या माध्यमातून मिळू शकेल). महाराष्ट्रात ८०,००० कोटी खर्च करून किती जमीन ओलीता खाली आली आहे, मुख्यमंत्री सांगू शकतील का? शिवाय केजरीवाल जोर जोरात ओरडून खोट बोलण्याशिवाय काही ही करत नाही. (अर्थातच त्यांची लगाम आणखीन कोणाच्या हातात आहे) अश्या माणसाची चर्चा करणे म्हणजे मूर्खासमोर बांसुरी वाजविणे आहे.

विकास's picture

26 Mar 2014 - 8:16 pm | विकास

एकापेक्शा जास्त असाव्यात

सहमत.

पुढचे वादाकरता नसून माहिती/चर्चेकरता आहे. :)

According to NCRB database number of suicides during 2005-2009 in Gujarat 387

त्याला दिलेला दुवा मिंट.कॉमचा आहे. त्यात NCRB चा उल्लेख नाही जरी Government Data असे म्हणले असले तरी.

Suicides in India या चॅप्टरमधे NCRB शेतकर्‍यांचा उल्लेख स्वयंरोजगारांमधे करते. त्यांची वेगळी वर्गवारी दिसली नाही. गुजरातमधे ज्या काही आत्महत्या दाखवल्या आहेत त्या विशेष करून आजारपणातून आलेल्या नैराश्यामुळे असल्याचे ही वर्गवारी दाखवते. महाराष्ट्रातील आत्महत्या आजारपण आणि कौटूंबिक कलह/प्रश्न (ज्यात कदाचीत कर्ज म्हणून शेतकरी येत असतील, नक्की माहीत नाही) असे दाखवते. एकंदरीत त्या विदाचा उपयोग शेतकर्‍यांची माहिती काढण्यासाठी दिसला नाही.

केजरीवालांनी ५०००+ आकडा जो गुजरातसंदर्भात वापरला तो पूर्णपणे खोटा असावा असे वाटते. तुम्हाला त्या आकड्यासंदर्भात अधिक माहिती असल्यास अवश्य सांगावीत.

वर जो केवळ एक आत्महत्येचा मुद्दा आला आहे. तो गुजरातसरकारच्या केजरीवालांच्या आरोपास दिलेल्या अधिकृत उत्तरातील आहे:

Kejriwal had alleged at the Varanasi rally that over 5,000 farmers have committed suicide in Gujarat over crop failure in the last 10 years. To this Gujarat government stated, "This is a blatant lie. During his visit to Gujarat, Kejriwal had claimed that 800 farmers had committed suicide in the last 10 years. He is so excited with forging figures that now he claims to over 5,000 farmers have committed suicides in Gujarat. The fact is only one farmer has committed suicide due to crop failure in the last 10 years."

मी ८०० चा आकडा ऐकला होता. ५००० बद्दल मला माहिती नाही.

चिरोटा's picture

26 Mar 2014 - 11:30 am | चिरोटा

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देशातील लघूउद्योग संपुष्टात येतील आणि शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील, मोदी निवडून आल्यास वाराणशीतले सर्व लघुउद्योग बंद पडतील व आजूबाजूच्या शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतील,

तसे मनमोहन पंतप्रधान असताना लघुद्योग बंद पडतच आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या मोजायच्या तर सर्वात जास्त आत्महत्या पृथ्वीबाबांच्या राज्यात्,खालोखाल आंध्रप्रदेशात आहेत .दोन्ही ठिकाणी कॉन्ग्रेस्वालेच अनेक वर्षे खुर्च्या गरम करत आहेत.
केजरीवाल महाराष्ट्र दौर्‍यात याविषयी बोलले का?

विवेकपटाईत's picture

26 Mar 2014 - 7:30 pm | विवेकपटाईत

उद्योग उघडतात आणि बंद ही होतात. दुसर्या कुठल्याही राज्यापेक्षा जास्त जास्त उद्योग गुजरात मध्ये आहे. सर्वात कमी शेतकर्यांनी गुजरात मध्ये आत्महत्या केली आहे (फक्त १ दहा वर्षात). भू संपादना बाबतीत गुजरातचे धोरण सर्वात श्रेष्ठ आहे. आणि सर्वात खराब महाराष्ट्रात. दोन वर्ष आधी चंद्रपूरला गेलो होतो. तेंव्हा नोएडा एक्स विवाद जोरात होता. जेंव्हा मी सांगितले प्रती हे. कोटी पेक्षा जास्त आणि ६% विकसित जमीन. (तिची किमंत ही कित्येक कोटी होईल) तरी ही शेतकरी नाराज आहे. हे ऐकून एकाच टिप्पणी आली: आम्ही मूर्ख आहोत.

सचिन's picture

26 Mar 2014 - 9:55 pm | सचिन

अरे .... या "क्रेझी"वाल वर किती वेळ घालवायचा रे ? देवा सोळा मे लवकर येऊ दे रे बाबा !!!

.....नादी जास्त लागु नये मिपाकरहो.

बंडा मामा's picture

26 Mar 2014 - 11:54 pm | बंडा मामा

एका मोदी मिनिअननी लिहिलेला पूर्वग्रह दुषीत लेख वाचण्या पेक्षा प्रत्यक्ष विडीयो प्रत्यक्ष पाहून जे काय ते ठरवावे:

इराद्यानं मोदींना वडोदरा गाठावा लागला याची चर्चा इथे झालीये. जर मोदी इतके ग्रेट आहेत तर त्यांना असा दुहेरीपणा शोभत नाही.

आज तर जम्मूत मोदींनी हाईट केली. अरविंदना AK 49 असं संबोधून ते पुढे म्हणाले की केजरीवाल ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट आहेत! आता काय फरक राहीला काँग्रेसी नेत्यात आणि मोदींच्यात? भावी PM इतका खोटारडा आणि भंपक वक्तव्य करणारा असू शकतो याचं नवल वाटतं. अर्थात स्वतःच्या सत्ताभिलेषाला दुसरा शह देतोयं असं वाटल्यावर असा बेलगामपणा स्वाभाविक आहे.

वर दिलेल्या लिंकमधलं हे निरिक्षण अत्यंत योग्य आहे :

For a prime ministerial candidate of the BJP this was clearly a rather low blow. Rather than debate issues that Mr Kejriwal has brought out, especially on gas prices, the Adani-Ambani connect, alleged growth figures in Gujarat etc Modi instead chose to make insinuations and target Kejriwal with such falsehoods.

आणि केजरीवालांचा हा ट्विट देखिल लक्षात घेण्यासारखा आहे :

Did Modi ji call me an agent of Pakistan and AK 49? Kya PM ke daawedar ko ye bhasha use karna shobha deta hai? .....

एकतर स्वतःच स्वतःच्या गुरुंना (अडवानी) फुल्ल हॉर्सपॉवर दाखवून पंतप्रधानपदासाठी उतावळे झालेत आणि आता (बहुदा) वडोदर्‍यात पण साशंकता निर्माण झाल्यामुळे पार बिथरलेत.

आता अशाच चुका करत करत शेवटी (इथले पापभीरु सदस्य आलेत त्याप्रमाणे) `मूळ मुद्यावर' येणार!

अर्धवटराव's picture

27 Mar 2014 - 12:29 am | अर्धवटराव

भारताच्या नकाशावरुन काश्मीर नाहिसं करणं खरच सिरीयस मॅटर नाहि? गरज नसताना उगाच काश्मीरमधे सार्वमत घावे वगैरे भाषा करणार्‍यांना डोक्यावर बसवणं समर्थनीय आहे? दहा वर्षे गुजरातमधे काँग्रेसी नेत्यांचं हत्याकांड चाललय म्हणणं वार्‍यवर सोडुन देण्यालायक आहे? आपण काय बोलतोय, त्याचे रिपल इफेक्ट काय होऊ शकतात याचे भान सोडुन काहिही बरळत सुटायचं? भारतात विरोधीपक्षाने प्रपोज केलेल्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराविरुद्ध लढणारा दिल्लीचा भूतपूर्व मुख्यमंत्री काश्मीरला भारतापासुन विलग करणारे नकाशे मिरवतो, भारताची काश्मीरच्या सार्वमताबाबतची आजवरची अधिकृत भुमीका पायदळी तुडवणार्‍यांशी सलगी करतो, हा मॅसेज आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा घेतला जाईल याची काहिच काळजी करायची नाहि? एखाद्याला बेताल वक्तव्यासाठी इग्नोर करतो म्हटलं तरी त्याची काहि लिमीट? अगदीच स्पष्ट बोलायचं तर केजरीवाल अ‍ॅक्च्युली जोड्याने बडवण्याच्या लायकीचं बोलतोय आणि त्याचं कौतुक होतय?? देशातल्या देशात राजकीय पक्षांनी कितीही भांडावं, पण जागतीक पातळीवर भारताचं नाक नकटं करुन विरोधकांना अवलक्षण करण्याची हि निंदनीय दुर्बुद्धी समर्थनीय म्हणावी काय?

मोदी व केजरीवाल या अजिबातच तुल्यबळ नसलेल्या लढाया लढण्यात मला इंटरेस्ट नाही. ना केजरीवाल पंतप्रधानपदाचा दावा करताहेत ना आआप स्वबळावर सरकार स्थापन करणे शक्य आहे. त्यामुळे सरकार बनवु न शकणार्या आआपच्या परराष्ट्र धोरणांमध्ये मता फारसा इंटरेस्ट नाही. इतके नक्की दिसतेय की आआप (भाजपा व काँग्रेसपासून मुळातूनच वेगळा असल्याने)एक उत्तम - व अतिशय गरजेचा / सत्ताधार्‍यांशी हातमिळवणी न करणारा - विरोधी पक्ष होऊ शकेल व त्यासाठी त्या पक्षाला या निवडणुकीत मत देणे फार चुकीचे ठरू नये.

या निमित्ताने पुढिल मुद्द्यावर मात्र चर्चा व्हावी असे वाटते:

गरज नसताना उगाच काश्मीरमधे सार्वमत घावे वगैरे भाषा करणार्‍यांना डोक्यावर बसवणं समर्थनीय आहे?

माझ्या आठवणीनुसार भारताची अधिकृत भुमिका अशी आहे:
युनोच्या सुचवणीप्रमाणे भारत सार्वमत घ्यायला तयार आहे, त्या आधी पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मिरमधून सौन्य परत घ्यावे ही पूर्वअट भारताने घातली आहे. जोवर हे होत नाही तोवर भारतव्याप्त भागात निवडणुका घेत आहे, ज्या हे दाखवून देत आहे की तेथील जनता भारतात रहायला अनुकूल आहे.

तेव्हा काश्मिरात रेफरेन्डम घ्यावे ही मागणी मुळातून भारत विरोधी वाटत नाही किंबहुना ती भारताच्या अधिकृत भुमिकेशी सुसंगत अहे - अर्थात त्याची (बहुदा नजीकच्या भविष्यात अजिबात पूर्ण होऊ न शकणारी ;) ) पूर्वअट पाळूनच!

क्लिंटन's picture

27 Mar 2014 - 10:10 am | क्लिंटन

तेव्हा काश्मिरात रेफरेन्डम घ्यावे ही मागणी मुळातून भारत विरोधी वाटत नाही किंबहुना ती भारताच्या अधिकृत भुमिकेशी सुसंगत अहे

पूर्णपणे अमान्य. १९५७ मध्ये काश्मीरच्या घटनासमितीने एकमताने ठराव करून काश्मीर भारताचा भाग आहे हे मान्य केले. त्यानंतर भारत सरकारने काश्मीरात सार्वमत घ्यायची मागणी कायम धुडकावून लावली आहे. त्या घटनासमितीच्या निवडणुका कशा झाल्या वगैरे स्वतंत्र चर्चेचे विषय आहेत.तरीही काश्मीरात सार्वमत घ्यावे ही मागणी भारताच्या अधिकृत भूमिकेशी सुसंगत आहे हे म्हणणे अयोग्य आहे.

हे वक्तव्य ऋषिकेशकडून येईल अशी अपेक्षा नव्हती. असो.

ऋषिकेश's picture

27 Mar 2014 - 10:48 am | ऋषिकेश

अपेक्षा वगैरे सगळं ठिक आहे, कोणी काय अपेक्षा कराव्यात यावर माझा धरबंद असु शकत नाही.

मुळात काश्मिरच्या घटनासमितीचा ठराव आणि मी म्हणतोय तो UN चा ठराव या वेगळ्या गोष्टी आहेत. काश्मिरची घटनासमिती या बाबतीत भारताची अधिकृत भुमिका ठरवु शकत नाही. त्यानंतर भारताने सार्वमताची मागणी धुडकावून लावली आहे ते खरेच आहे, पण त्याचे कारण काय?

अधिक तपशीलात शिरूयातः
१. २४ जानेवारी १९५७ रोजी UN ने हा ठराव पास केला, ज्या नुसार 'that the final disposition of the State of Jammu and Kashmir will
be made in accordance with the will of the people expressed through the democratic method of a
free and impartial plebiscite conducted under the auspices of the United Nations'

सदर ठराव एकही विरोधी मत न येता मंजूर झाला होता. अर्थात भारतावर असे सार्वमत घेणे 'बंधनकारक' झाले.

त्यानंतर घटना समितीने तुम्ही म्हणताय तो ठराव एकमताने मंजूर केला. भारताची हा ठराव अनेकांना चकीत करून गेला त्यानंतर २ डिसेंबर १९५७ नंतर भारताच्या दबावाखाली पुन्हा UN एक ठराव आणाव लागला ज्यात
-- असे सार्वमत घेणे सध्याच्या परिस्थितीत शक्य नसल्याचे UN ने मंजूर केले. व आपला तिथे त्वरीत सार्वमत घेण्याचा आग्रह बाजुला ठेवला.
-- (भारताने सांगितल्या प्रमाणे) Free and fair सार्वमतासाठी काश्मिरचे "डिमिलिटरायझेशन" करणे अधिक अगत्याचे व आहे हे संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केले.
-- पहिली स्टेप म्हनून भारत व पाकिस्तानने स्वतंत्रपणे हे डिमिलीटरायझेशन कसे करावे हे समोरसमोर बसुन ठरवावे असे सुचवले.
-- जोवर हे होत नाही तोवर सार्वमताचा २४ जानेवारीचा ठराव मागे घेतला.

अर्थात भारताने सार्वमत धुडकावले नाही, तर ते घेण्यासाठी पाकिस्तान कधीही मंजूर करणार नाही अशी कल्पक अट घातली! त्यामुळे भारतची अधिकृत भुमिका आधी डिमिलिटरायझेशन करा मग सार्वमताचे बघु अशी झाली. अर्थात सार्वमताला भारताने विरोध केलाच नाही वर म्हटल्याप्रमाणे एक चतुर अट घातली आहे!

माझे म्हणणे पोचले असेल अशी अपेक्षा करतो.

क्लिंटन's picture

27 Mar 2014 - 6:23 pm | क्लिंटन

नेहरूंनी मुळातच काश्मीर प्रश्न यु.एन मध्ये नेला तो ज्या कार्टर अंतर्गत यु.एन केवळ रेकमेन्डेशन या स्वरूपाचे ठराव पास करते (आणि ते ठराव बंधनकारक नसतात) या कार्टर अंतर्गत. त्यामुळेच यु.एन ने पहिल्यांदा युध्दबंदीचा ठराव करूनही पुढचे ७-८ महिने भारतीय सैन्य त्या ठरावांना फाट्यावर मारून लढत होते. या मुद्द्यांवर मिपावर आधीच इतके चर्वितचर्वण झाले आहे की त्यावर आणखी काही नको. तरीही हा यु.एन चा ठराव भारतावर बंधनकारक कसा काय झाला असता हे समजले नाही.

या दुव्यावर दिल्याप्रमाणे यु.एन ने हा ठराव पास केल्यानंतर गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी काश्मीरल्या दिलेल्या भेटीमध्ये काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून सार्वमताचा प्रश्नच नाही असे म्हटले.

ही गोष्ट बरीच जुनी झाली. नंतरच्या काळातही भारत सरकारने वेळोवेळी सार्वमत घ्यायची मागणी धुडकावून लावली होती. २००० साली फारूख अब्दुल्ला मुख्यमंत्री असताना काश्मीरला स्वायत्तता द्यावी असा ठराव काश्मीर विधानसभेत पास झाला.त्यावेळी पंतप्रधान वाजपेयींनी तर म्हटले की कोणी जर राज्यांना अधिक अधिकार द्यावे अशी मागणी करत असेल तर त्यावर नक्कीच विचार होईल.पण कोणी जर काश्मीरात १९५३ पूर्वीची परिस्थिती आणा अशी मागणी करत असेल तर ते मात्र अजिबात मान्य केले जाणार नाही.तसेच २००१ मध्ये भारत सरकारने अधिकृतपणे काश्मीरात सार्वमत घ्यायची मागणी अमान्य केली. त्यापूर्वी १९८९ मध्ये राजीव गांधींनी पाकिस्तान भेटीतही काश्मीरातील सार्वमत हा 'settled issue' आहे असे म्हटले होते असे वाचल्याचे पक्के आठवते. (आता दुवा मिळत नाही).

असे असतानाही आआपच्या नेत्यांनी सार्वमताचे टुमणे लावलेले कसे काय समर्थनीय आहे?

यावर तुमचे उत्तर काय ऋषिकेश? या प्रशांत भूषण, कमलमित्र चिनॉय आणि कंपनीला काश्मीरात सार्वमत व्हावे असे वाटत असेल तर त्यापूर्वीची पायरी-- पाकिस्तानने पी.ओ.के मधून बाहेर जाणे, दहशतवादी कारवाया थांबविणे इत्यादी कराव्यात हे आजपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही पाकिस्तानला सांगितलेले नाही. तसे सांगितले असल्यास जरूर निदर्शनास आणा.

की आपलं सार्वमताची मागणी करून आणि त्याला समर्थन देऊन आपण किती लिबरल आहोत हे दाखवायचा केविलवाणा प्रयत्न?असो. भारतात लोकशाही आहे त्यामुळे काहीही बोलायचा (खरं म्हणजे बरळायचा) हक्क प्रत्येकाला आहेच.

यावर उत्तर आधीच दिले होते पण ते काहि प्रॉब्लेममुळे प्रकाशितच झाले नाही - पेज नॉट फाऊंड एरर आला :( म्हणून इतकं पुन्हा टंकत बसलो नाही.
असो.

गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचे नुसते वक्तव्यच महत्त्वाचे नाही. तर त्यानंतर भारताने उचलेलली अनेक पावले महत्त्वाची आहेत. त्यापैकीच एक UN वर दबाव वाढवणे आहे. माझ्या मुळच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे या प्रयत्नांचे फलित म्हणजे स्वतः UNनेच रेफरेंडमचा ठराव मागे घेतला. तेव्हा रेफरेंडमचा निर्णय बंधनकारक असायचा प्रश्नच येत नाही.

मात्र त्यावेळी भारताची भुमिका काय होती? आमच्याशी राजा हरिसिंगाने अ‍ॅक्सेशनचा करार केलाय, तेव्हा काहिहि झाले - लोकेच्छा काहिहि असेल तरी आम्ही काश्मिरवरील हक्क सोडणार नाही अशी आडमुठी भुमिका भारताने तेव्हाही घेतली नव्हती. लोकांचे मत जाणुन घेता येईलच, मात्र त्या आधी काश्मिरचे "डिमिलिटरायझेशन" होणे गरजेचे आहे. माझा मुद्दा इतकाच लिमिटेड आहे, किंबहुना यात भारताने दाखवलेले कुटनितीक चातुर्य हायलाईट करणे माझा मुख्य उद्देश आहे.

राहता राहिला प्रश्न प्रशांत भुषण यांचा. पहिल्याच प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मला त्यांच्या काय किंवा केजरीवाल यांच्या काय वक्तव्यात एका मर्यादे पलिकडे अजिबात रस नाही कारण त्यांना सध्या तेव्हढे महत्त्व का द्यावे असा प्रश्न मला पडतो. माझी इतकी उर्जा या वाचाळवीरांच्या प्रत्येक वक्तव्यावर मी खर्च करू शकत नाही - इच्छाही नाही.

तरी त्यांचा प्रश्न/मत सार्वमत हे पाकव्याप्त काश्मिरबद्दल नसून 'भारतव्याप्त काश्मिरमध्ये भारतीय सैन्य हवे का नको? यावर सार्वमत घ्यावे' अश्या अर्थाचे होते असे आठवते. मला त्यांचा हा प्रश्न मुलतः AFSPA सारख्या कायद्याशी निगडीत वाटतो. आणि माझे स्वतःचे मत सद्यस्थितीतील AFSPA कायद्याच्या विरोधात आहे.

मंदार दिलीप जोशी's picture

28 Mar 2014 - 3:09 pm | मंदार दिलीप जोशी

"लोकांचे मत" या मध्ये काश्मीरी पंडितांना सुद्धा सामील करा आणि मग बघा मजा....

सुनील's picture

28 Mar 2014 - 3:14 pm | सुनील

त्याने मजा बघण्याइतपत फरक पडू नये. कारण जरी सर्वच्या सर्व पंडित कश्मिर खोर्‍यात परतले तरी त्यांची टक्केवारी ५ च्यावर जात नाही.

ऋषिकेश's picture

28 Mar 2014 - 3:18 pm | ऋषिकेश

+१

मागे श्री गुरूजी व माझी झालेली चर्चा शोधा. त्यात त्यांनी योग्य आकडेवारी (व चुकीची टक्केवारी ;) ) दिली होती.
एकुण हिंदूंपैकी २५% हून अधिक हिंदूंना विस्थापित व्हावे लागले, मात्र ते झाले नसते तरी काश्मिरात ते अल्पसंख्यच राहिले असते, तेव्हा ते परतले तरी निष्कर्षात फरक पडू नये.

मुळात ज्यांना काश्मिर वेगळे हवे आहे त्याची कारणे निव्वळ धार्मिक नसावीत, नाहितर त्यांनी काश्मिर पाकिस्तानात विलीन करावे अशी मागणी केली असती. त्यांना ते स्वतंत्र हवे असण्यामागे आर्थिक + वेगळे आंटरराष्ट्रीय राजकारण आहे असे मला वाटते, मात्र त्याबद्दल पुन्हा कधीतरी :)

मंदार दिलीप जोशी's picture

28 Mar 2014 - 3:26 pm | मंदार दिलीप जोशी

ते काश्मीरात अल्पसंख्य कसे झाले? काश्मीरचा इतिहास काय? ते पण शोधा.

असो. जनमत काय असायचे ते असो. ती जमीन भारताच्या मालकीची आहे. त्या जागेचे आम्हाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वही आहे (अमरनाथ वगैरे).
तुम्हाला रहायचे नसेल तर पाकीस्तानाच चालू लागा असे सांगायला हवे त्यांना.

सुनील's picture

28 Mar 2014 - 3:28 pm | सुनील

अरेच्चा! मजा बघता बघता रागावलात? असं नाय करायचं!! मजा बघायची!!!

;)

ते काश्मीरात अल्पसंख्य कसे झाले? काश्मीरचा इतिहास काय? ते पण शोधा.

किती मागे जायचं ते ही सांगा! माझ्या माहितीप्रमाणे हिंदु काश्मिरात किमान गेली शंभरवर्षे तरी अल्पसंख्यच आहेत! काश्मिरीपंडित तिथेच रहात असतानाही.

ऋषिकेश's picture

28 Mar 2014 - 3:18 pm | ऋषिकेश

+१

मागे श्री गुरूजी व माझी झालेली चर्चा शोधा. त्यात त्यांनी योग्य आकडेवारी (व चुकीची टक्केवारी ;) ) दिली होती.
एकुण हिंदूंपैकी २५% हून अधिक हिंदूंना विस्थापित व्हावे लागले, मात्र ते झाले नसते तरी काश्मिरात ते अल्पसंख्यच राहिले असते, तेव्हा ते परतले तरी निष्कर्षात फरक पडू नये.

मुळात ज्यांना काश्मिर वेगळे हवे आहे त्याची कारणे निव्वळ धार्मिक नसावीत, नाहितर त्यांनी काश्मिर पाकिस्तानात विलीन करावे अशी मागणी केली असती. त्यांना ते स्वतंत्र हवे असण्यामागे आर्थिक + वेगळे आंटरराष्ट्रीय राजकारण आहे असे मला वाटते, मात्र त्याबद्दल पुन्हा कधीतरी :)

सुनील's picture

28 Mar 2014 - 3:16 pm | सुनील

तरी त्यांचा प्रश्न/मत सार्वमत हे पाकव्याप्त काश्मिरबद्दल नसून 'भारतव्याप्त काश्मिरमध्ये भारतीय सैन्य हवे का नको? यावर सार्वमत घ्यावे' अश्या अर्थाचे होते असे आठवते.

असे असेल तर वर झालेली सर्वमतावरील चर्चा व्यर्थ गेली! ;)

ऋषिकेश's picture

28 Mar 2014 - 3:19 pm | ऋषिकेश

:)

राहता राहिला प्रश्न प्रशांत भुषण यांचा. पहिल्याच प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मला त्यांच्या काय किंवा केजरीवाल यांच्या काय वक्तव्यात एका मर्यादे पलिकडे अजिबात रस नाही कारण त्यांना सध्या तेव्हढे महत्त्व का द्यावे असा प्रश्न मला पडतो. माझी इतकी उर्जा या वाचाळवीरांच्या प्रत्येक वक्तव्यावर मी खर्च करू शकत नाही - इच्छाही नाही.

हे वाचाळवीर आहेतच.तरीही जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाचा नेता असे काहीतरी बोलत आहे.त्यातूनही बोलणार्‍या पक्षाचा नेता बाबा दूरदर्शींच्या दूरदर्शी पक्षाचा नाही तर दिल्लीत २९% मते आणि २८ जागा जिंकणार्‍या पक्षाचा नेता आहे.तेव्हा या गोष्टीला इतके निग्लेक्ट करणे कितपत योग्य आहे?

तरी त्यांचा प्रश्न/मत सार्वमत हे पाकव्याप्त काश्मिरबद्दल नसून 'भारतव्याप्त काश्मिरमध्ये भारतीय सैन्य हवे का नको? यावर सार्वमत घ्यावे' अश्या अर्थाचे होते असे आठवते.

यातील भारतव्याप्त या शब्दावरच मुळात आक्षेप आहे.भारतात लोकशाही आहे याचा हा गैरफायदा घेतल्यासारखे झाले. आणि आआपला उठल्यासुटल्या सगळ्या गोष्टीवर सार्वमते घ्यायची खाज असेलही.पण काश्मीरातून सैन्य काढून घेतले तर त्याचे नक्की काय परिणाम होतील (अंतर्गत सुरक्षा, परराष्ट्रधोरण इत्यादी) याचा सारासार विचार करण्यासाठी लागणारी सगळी माहिती सामान्य जनतेला नसते आणि तशी देणे योग्यही नाही. आपल्या एरियात बाग हवी की शाळा हवी यावर सार्वमत घेणे वेगळे आणि इतके दूरगामी परिणाम करू शकणार्‍या गोष्टीवर सार्वमत घेणे वेगळे एवढी जाण प्रशांत भूषण जे काही बरळला त्यात काहीही गैर न वाटणार्‍या मिपावरील अतिलिबरल लोकांना कशी नाही याचेच आश्चर्य वाटते.

असो.

एक उत्तम - व अतिशय गरजेचा / सत्ताधार्‍यांशी हातमिळवणी न करणारा - विरोधी पक्ष होऊ शकेल व त्यासाठी त्या पक्षाला या निवडणुकीत मत देणे फार चुकीचे ठरू नये.

अगदी माझ्याच भावना मांडल्यात. आणखीन एक गोष्ट म्हणजे आआपच्या निवडणूक निधी जमवण्याच्या पद्धतीमुळे त्याना मोठ्या उद्योगांची गरज नसेल म्हणून लॉबिंगला बळी पडण्याची शक्यता कमी. (अवांतर : लॉबिंगवरून आठवले, कोणी अमेरिकन राजकारणावर आधारित 'हाउस ऑफ कार्ड्स' बघते का? अतिशय रंजक मालिका)

बाकी काश्मीर सार्वमताबद्दलची माहिती मला पूर्ण नवीन होती. आभार.

योग्य वेळी आली आहे ही मालिका नाही?

USA काय किंवा आपण काय्...माणूस इथून तिथून एकच....!!

संपत's picture

28 Mar 2014 - 11:15 am | संपत

अगदी योग्य वेळी.. थोडे अतिरंजित असेल तरी वरवर राष्ट्रहिताच्या वाटणाऱ्या एका खेळीमागे चार खेळीनंतर होऊ शकणारा स्वताचा फायदा बघणे अतिशय रंजक.

आज काश्मीर मधल्या फुटीरतावादी पक्षांचं म्हणणं देखील सार्वमताच्या बाजुने आहे...व त्यांना देखील आपण भारताचे नागरीकच समजतो.
आआप केंद्रात सत्तेवर येते कि नाहि हा वेगळा भाग झाला. पण भारताप्रमाणेच बाहेर देखील आआपला मोदिंविरुद्ध लढणारा पक्ष म्हणुन मिडीया कव्हरेज मिळतय. तेंव्हा घरातल्या भांडणाला चव्हाट्यावर आणु नये, त्यामुळे शत्रुला काहिएक फायदा मिळु नये असं वाटतं.
मी जे काहि थोडंफार राजकारणाबद्दल वाचन करतो त्यात बरेचदा तत्कालीन निवडणुका व राजकीय पक्षांच्या भुमीकांचा लेखाजोखा असतो, त्याच्या प्रत्यक्ष्य-अप्रत्यक्ष्य परिणामांचा उहापोह असतो. आआपकडे आपण एक जबाबदार राजकीय पक्षाची बीजं असणारा पक्ष म्हणुन पाहात असु तर त्यांच्याकडुन योग्य त्या खबरदारीची अपेक्षा आहे. अन्यथा बेताल राजकीय पक्षांची आपल्याकडे वानवा नाहिच.

आआपकडे आपण एक जबाबदार राजकीय पक्षाची बीजं असणारा पक्ष म्हणुन पाहात असु तर त्यांच्याकडुन योग्य त्या खबरदारीची अपेक्षा आहे. अन्यथा बेताल राजकीय पक्षांची आपल्याकडे वानवा नाहिच.

सहमत आहे.
फक्त एखाद्या पक्षाला- थेट बोलायचं तर आआपला - एकाच व्यक्तीच्या माकडचाळ्यांवरून, एखाद्या वक्तव्यावरून जोखुन - खरतर त्यावरून नुसतीच राळ उडवून देत - आपण घाई करतोय का? अशी शंका येऊ लागली आहे. अशी वक्तव्ये, चुका सगळेच पक्ष करतात. एकाने एक उदा काधले की लगेच समोरच्याचे दुसरे उदा काढणार.

आआपच्या उमेदवारांची यादी पाहिली की खरंतर आनंदून जावंस वाटतं असे उमेदवार उभे आहेत. एका वाचाळवीरामुळे त्यांना सार अव्हेरून टाकावं असं वाटत नाही. असो.

अर्धवटराव's picture

27 Mar 2014 - 8:38 pm | अर्धवटराव

माझा मुख्य आक्षेप आपण कुठल्या बाबतीत वाचाळवीरता खपवुन घ्यावी यावर आहे. देशांतर्गत मुद्द्यांवर करा ना कंठशोक... कुणि नाहि म्हटलय... पण देशाच्या सीमारेषांच्या मर्यादा पाळायला हव्यात.

दुसरा मुख्य आक्षेप तर स्वतः पक्षप्रमुखांच्या वाचाळवीरतेचा आहे. विरोधी मताचा आदर, त्याचे विरोध करण्याचे हक्क सर्वथैव मानणे हा लोकशाहिचा गाभा. अशी सर्वात मोठी लोकशाही मिरवणारा भारत हा जगमान्य देश. या देशाच्या निवडुकीत विरोधिपक्षाकडुन एक संभाव्य प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार जाहिर होणं. व या उमेदवारावर एक दशकभर विरोधकांचं शिरकाण करण्याचा आरोप करणं. त्याला केंद्राची हरकत नसल्याचा प्रच्छन्न आरोप करणं. हि संपूर्ण घटना मला फार गंभीर वाटते. याला फक्त वाचाळवीरता म्हणुन सोडुन देणं थोडं कठीण जातं. अशा कट्यांचे नायटे होतात व ते देशाच्या इभ्रतीला मारक ठरु शकतात.

केवळ केजरीवालंविरुद्ध राळ उठवावी इतक्या क्षुल्लक कारणासाठी हा आलाप नाहि. आआपचा राजकारणातला उदय अनेकांगानी आशादायक आहेच. भारताच्या राजकारणाला व्यक्तीसमस्या, भ्रष्टाचारविरोध वगैरे मुद्द्यांवर फोकस करायला लावणारे आआपचे कार्यक्रम केवळ फँटसी न राहता ते वास्तवात उतरावे म्हणुनच नुकताच जन्माला आला असतानाही आआपकडुन जास्त जबाबदारीने वागण्याची अपेक्षा आहे.

विकास's picture

27 Mar 2014 - 8:49 pm | विकास

संपूर्ण प्रतिसादाशीच समहमत पण विशेष करून खालील भागाशी:

केवळ केजरीवालंविरुद्ध राळ उठवावी इतक्या क्षुल्लक कारणासाठी हा आलाप नाहि. आआपचा राजकारणातला उदय अनेकांगानी आशादायक आहेच. भारताच्या राजकारणाला व्यक्तीसमस्या, भ्रष्टाचारविरोध वगैरे मुद्द्यांवर फोकस करायला लावणारे आआपचे कार्यक्रम केवळ फँटसी न राहता ते वास्तवात उतरावे म्हणुनच नुकताच जन्माला आला असतानाही आआपकडुन जास्त जबाबदारीने वागण्याची अपेक्षा आहे.

राजकारणात आले ते देखील उत्तमच पण त्यानंत\र जे काही चालले आहे ते आक्षेपार्ह आहे.

भुमिका व अपेक्षा समजली. अंशतः सहमतीचे काहि छोटे मुद्दे आहेत पण ते काही खरे नव्हे!

माझ्या दृष्टीने आआपची भारतीय परिप्रेक्ष्यातील अपेक्षित भुमिका व तुमच्या अपेक्षित भुमिका यात बरेच मोठे अंतर आहे. त्यामुळे आपले एकमत होणे बरेच कठिण आहे. :)

उपास's picture

27 Mar 2014 - 12:43 am | उपास

अहो संक्षि, त्याबतीत तुम्ही बरोब्बर तुमच्या बाब्या म्हणजे केजरीवालच्या लायनीवर गेल्यात.. आपल्याला अडचणीचं ते सगळं सोडून द्ययाचं आणि आपलचं घोडं पुढे दामटत राहायचं!
तुम्हाला मागे मी म्हटलं होतं की आपली अमेरिकन लोकशाही नाहिये, तेथे तुम्ही सोयीस्कर दुर्लक्श केलतं. दोन्ही कडून उभं राहाणं काहीच गैर नाही आणि वाराणसीतल्या एखाद्या मतदार संघाने (किंवा कुठल्याही एका मतदारसंघाने) भारताचा भावी पंतप्रधान ठरवावा असं तुमचं मत असेल तर धन्य झाली.
आपण काही मोदी समर्थक नाही पण केजरीवालपासून खुप मोठा धोका ढळढळीत दिसतोय भारताला.. आंतरराष्ट्रीय पातळीवर वर अर्धवटरावांनी म्हटल्याप्रमाणे भारताची प्रतिमा मलिन करुनच सोडणार तो..! ढोंगीपणा, स्वार्थीपणा आणि आपण आहोत त्यापेक्षा ग्रेट असं दाखवणं ह्यात केजरीचा हात सद्ध्या तरी कुणी धरेल असं वाटत नाही, गंमत म्हणजे सुशिक्षित लोकं जी केजरीच्या बाजूने होती, दिल्ली प्रकरणानंतर बाजूला झालेयत एवढं सुद्धा कळेना त्याला!

विकास's picture

27 Mar 2014 - 12:57 am | विकास

अरविंदना AK 49 असं संबोधून ते पुढे म्हणाले की केजरीवाल ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट आहेत! आता काय फरक राहीला काँग्रेसी नेत्यात आणि मोदींच्यात?

मोदींनी जे पाहीले ते सांगितले काँग्रेसने दुर्लक्ष केले हा फरक आहे. मोदींनी "ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट" म्हणलेले नाही. त्यांचे वाक्य असे आहे: "There are three AKs in Pakistan who are being admired. AK 47, AK Antony and AK49. This third one, AK 49, has just launched a political party," अर्थात केजरीवालांच्या एकाच वेळेस खुळचटपणामुळे आणि लबाडीमुळे ते असे काही वागत आहेत जे पाकीस्तानच्या पथ्यावर पडत आहे आणि म्हणून पाकीस्तान त्यांचे कौतुक करत आहे... असे काय ते करत आहेत? खालची चित्र पहा...

हे आप च्या संस्थळावरचे आहे. नकाशातले काश्मीर भारतात नाहीच! तेच अरूणाचल प्रदेशाचे पण... अर्थातच बोंबाबोंब झाल्यावर ते काढून टाकण्यात आले आहे. पण माहीतीतंत्रज्ञानाच्या जगात काही कायमस्वरूपी खोडणे अवघडच असते. तेच येथे पण झाले आहे: (इंडीया टूडे मधून घेतलेला आहे).

AAP Map
The embarrassing botch-up on the AAP website's donations page, a map of India which showed parts of Kashmir as a part of Pakistan, has now been removed from the website, yet it has already been circulated on Twitter.
गंमत म्हणजे पब्लीकने ते लक्षात आणून दिल्यावर तो भारतीय दंडविधानानुसार बेकायदेशीर नकाशा तात्काळ काढून टाकण्यात आला. पण भारताचा अधिकृत नकाशा मात्र ठेवण्यात आला नाही. असे का करावे? का पाकीस्तानच्या भावना दुखावतात म्हणून?
हे दुसरे रेडीओ पाकीस्तानचे ९ जाने. २०१४ चे अधिकृत ट्वीट आहे. ते अजूनही ट्वीटरवर मिळू शकते.

PakRadio

त्या व्यतिरीक्त आपचे नेते प्रशांत भूषण काय म्हणाले ते माहीत असेलच. नक्षलवादासंदर्भात आत्ता चर्चा नको. तो मुद्दा पण येईलच लवकर...

थोडक्यात मोदींच्या भाषणात एके हे एजंट आहेत असे म्हणलेले नसताना देखील, कस्सा माझा गरीबबिचार केजरू... ट्वीट करतो, "Did Modi ji call me an agent of Pakistan and AK 49? " ... ह्याला खोटारडेपणा म्हणायचे नाहीतर काय म्हणायचे?

आपल्या सक्ख्या/सावत्र भावाला विरोध करण्यासाठी कुणी आपल्या आईला भर रस्त्यावर नागडं करावं, तसलं वागतोय केजरीवाल... आणि त्याचं कौतुक होतय भारतात... अहो राजकारण, सत्तासंघर्ष वगैरे ठीक आहे. तो मोदी किंवा दुसरं कुणीही सत्तेत यावं, येऊ नये, काय व्हायचं ते होईल. हे जाणं येणं सुरुच असतं. पण देशाची इज्जत विकुन इमानदारीची टोपी विकत घेणार्‍यांचं पीक उपजावं हे अत्यंत लांछानास्पद आहे.

बंडा मामा's picture

27 Mar 2014 - 2:23 am | बंडा मामा

अर्धवटराव असले बरेच मुद्दे/विडीयो आले आणि गेले. केजरीवालचे काश्मिर विषयी काय मत आहे हे स्पष्ट आहे. त्याने बर्‍याचदा ते मांडले आहे. उगाच नकाशे काढले आणि प्रशांत भुषण काय म्हणाले वगैरे वरुन सभ्यतेच्या मर्यादा सोडू नयेत.

अर्धवटराव's picture

27 Mar 2014 - 2:37 am | अर्धवटराव

नकाशे, प्रशांत भूषण, काँग्रेस नेत्यांची हत्या वगैरे तुम्हाला सिरीयस वाटाव्या असा माझा काहि आग्रह नाहि. देशाच्या सीमेपलीकडे त्याचे काय व्हायचे ते परिणाम झालेच आणि होतीलच.

विकास's picture

27 Mar 2014 - 6:00 am | विकास

मर्यादांच्या बाबत बोलताना ... नकाशासंदर्भातील परत वरच्या प्रतिसादातील भाग चोप्य पस्ते करतो...

गंमत म्हणजे पब्लीकने ते लक्षात आणून दिल्यावर तो भारतीय दंडविधानानुसार बेकायदेशीर नकाशा तात्काळ काढून टाकण्यात आला. पण भारताचा अधिकृत नकाशा मात्र ठेवण्यात आला नाही. असे का करावे? का पाकीस्तानच्या भावना दुखावतात म्हणून?

केजरीवालांनी खालील गोष्टी स्पष्ट केल्या होत्या...

  1. राजकारणात येणार नाही.
  2. (मुलांच्या डोक्यावर हात ठेवून) काँग्रेस भाजपाला पाठींबा देणार नाही आणि घेणारही नाही.
  3. ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यांच्या खात्यावरील त्या काळातली (दिल्लीतली) वीज बील थकबाकी माफ करेन.
  4. दिल्लीत आमदार झालेल्यांना (त्यात स्वतः एके पण आले) खासदारकीची तिकीटे दिली जाणार नाहीत.
  5. वगैरे वगैरे

तेंव्हा भातावरून शिताची परीक्षा केली तर चालेल नाही का?

चिगो's picture

28 Mar 2014 - 3:56 pm | चिगो

पण देशाची इज्जत विकुन इमानदारीची टोपी विकत घेणार्‍यांचं पीक उपजावं हे अत्यंत लांछानास्पद आहे.

क्या बात, अर्धवटराव.. अत्यंत धारदार वाक्य. च्यामारी, तुम्ही लढाच निवडणूक आता..

प्रसाद१९७१'s picture

27 Mar 2014 - 6:01 pm | प्रसाद१९७१

जो भाग भारताच्या ताब्यात नाही तो भारतानी त्याच्या नकशात का दाखवावे? उद्या भारत चीन पण दाखवेल नकाशात.

विकास's picture

27 Mar 2014 - 6:51 pm | विकास

जो भाग भारताच्या ताब्यात नाही तो भारतानी त्याच्या नकशात का दाखवावे? उद्या भारत चीन पण दाखवेल नकाशात.

त्या नकाशात श्रीनगर पण भारतात नसल्याचे दाखवले आहे. मग तुमचे असे म्हणणे आहे का की श्रीनगर भारतात नाही म्हणून?

चीन अरूणाचल प्रदेश त्यांच्या नकाशात दाखवते. आपचा नकाशा पाहीला तर त्यात तो भाग देखील डिस्प्युटेड म्हणून दाखवला आहे...

प्रसाद१९७१'s picture

28 Mar 2014 - 5:59 pm | प्रसाद१९७१

श्रीनगर पण भारतात नसल्याचे दाखवले आहे

जर तुम्ही श्रीनगर ला गेलात तर तुम्हाला कळेल की ते खरच भारतात नाहीये. लष्कराच्या बळावर दाबुन ठेवले आहे.

श्रीगुरुजी's picture

28 Mar 2014 - 9:19 pm | श्रीगुरुजी

पाकिस्तानची सरहद्द ओलांडून श्रीनगरमध्ये अतिरेकी घुसतात व तिथून उर्वरीत भारतात जाऊ शकतात. काश्मिरवरून भारत-पाकिस्तानमध्ये ४ वेळा युद्ध झालेले आहे. त्यामुळे तिथे लष्कर अत्यावश्यक आहे.

तुमच्या वाक्यावरून तुम्हाला असे म्हणायचे असावे की काश्मिरी जनतेला भारतात रहायचे नाही व निव्वळ लष्कराच्या जोरावर त्यांना गप्प करण्यात आले आहे आणि संधी मिळाली तर तिथली जनता भारताच्या बाहेर पडेल.

चॅथम इंटरनॅशनल या इंग्लंड मधील संस्थेने २००९ मध्ये काश्मिरमध्ये एक सर्वेक्षण केले होते. त्यांचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे -

काश्मिर स्वतंत्र देश म्हणून हवा - ४३ % (श्रीनगर खोर्‍यातील बहुसंख्य नागरिकांना काश्मिर स्वतंत्र देश हवा आहे. जम्मू व लडाख मधील नागरिकांचे मत उलटे आहे)

भारतात विलिनीकरण हवे - २८% (श्रीनगर खोर्‍यातील बहुसंख्य नागरिकांना भारताबरोबर विलिनीकरण नको आहे. जम्मू व लडाख मधील नागरिकांचे मत उलटे आहे.)

पाकिस्तानात विलिनीकरण हवे - २ % (फक्त २ टक्के)

सध्याची ताबारेषा ही कायमस्वरूपी सीमारेषा करावी (म्हणजे भारताकडील भाग भारताकडे आणि पाकिस्तानने बळकावलेला पाकिस्तानकडे) - १९ %

माहित नाही/भारत-पाकिस्तान संयुक्त नियंत्रण - ८ %

एकंदरीत भारतातच रहायचे असे ४७ % लोकांचे मत आहे व स्वतंत्र व्हायचे असे ४३ % लोकांना वाटते. निम्म्याहून जास्त लोकांना भारताच्या बाहेर जावयाचे नाही. स्वतंत्र काश्मिर किंवा भारतात विलिनीकरण किंवा सध्याची ताबारेषा हीच कायमस्वरूपी सीमारेषा असेच ३ मुख्य पर्याय दिसत आहे. असे विचित्र मतविभाजन असल्यामुळे काश्मिरमध्ये सार्वमतातूनसुद्धा बहुमताने कोणताही तोडगा निघणे अशक्य आहे. त्याचप्रमाणे काश्मिर खोरे व लडाख आणि जम्मूतील लोकांची मते पूर्णपणे परस्परविरोधी आहेत.

हा अहवाल इथे उपलब्ध आहे.

http://www.chathamhouse.org/sites/default/files/public/Research/Asia/051...

जर तुम्ही श्रीनगर ला गेलात तर तुम्हाला कळेल की ते खरच भारतात नाहीये. लष्कराच्या बळावर दाबुन ठेवले आहे.
येक लंबर निर्बुद्ध प्रतिसाद. का काय आएसाय का दावूदकड्न काय मलिदा येतोय काय?

चीन अरूणाचल प्रदेश त्यांच्या नकाशात दाखवते

अरुणाचल प्रदेश कधी भारतात होआ? ब्रिटिशांच्या कृपेनी तो भारताला जोडला गेला.
आणि दिल्लीत मणिपुरी मुलाला चीनी म्हणुन तुम्हा भारतीय लोकांनीच मारला आणि त्याला चीनी म्हणत होते.

जर तो चीनी होता तर मग मणिपुर आणि अरुणाचल, मेघालय भारतात कसे?

क्लिंटन's picture

28 Mar 2014 - 6:05 pm | क्लिंटन

दिल्लीत मणिपुरी मुलाला चीनी म्हणुन तुम्हा भारतीय लोकांनीच मारला

तुम्हा भारतीय लोकांनी म्हणजे याचा अर्थ तुम्ही भारतीय नाही का?

बाकी चालू द्या.

प्रसाद१९७१'s picture

28 Mar 2014 - 6:07 pm | प्रसाद१९७१

जन्मानी भारतीय ( जे कोणाच्या हातात असते ?).

मी भारतीय आहे की नाही ह्या पेक्षा मी काय लिहीले आहे त्यावर विचार करा. टीपिकल भारतीय मनोवृत्ती दाखवू नका.

बंडा मामा's picture

28 Mar 2014 - 11:53 pm | बंडा मामा

मी भारतीय आहे की नाही ह्या पेक्षा मी काय लिहीले आहे त्यावर विचार करा. टीपिकल भारतीय मनोवृत्ती दाखवू नका.

अवास्तव मागणी केली आहेत तुम्ही. ह्या स्वघोषीत पॉलीटीकल अ‍ॅनालिस्ट लोकांच्या डोक्यात काहीही शिरणार नाही.

गब्रिएल's picture

30 Mar 2014 - 6:47 pm | गब्रिएल

जल्मानम भार्तिय पन कर्मानं कोन? पाकीस्तानी की चीनी की हायब्रीड... नाय येक शंखा आप्लि :)

मंदार दिलीप जोशी's picture

27 Mar 2014 - 6:53 pm | मंदार दिलीप जोशी

मित्रा, ज्या भागाचा अधिकृतरित्या ताबा सोडलेला नाही तो भाग कागदोपत्री आपल्या नकाशात दाखवणे योग्य आहे. कारण त्याने आपला त्या भागावर क्लेम राहत असावा. उद्या युद्ध झालेच तर तो भाग आपण प्रत्यक्षात ताब्यात घेऊ शकतो. जर आत्ताच तो दाखवला नाही तर क्लेप सोडून दिल्यासारखे आहे, मग युद्धात जय झाला तरी तो भाग आपण आपला आहे असे म्हणू शकत नाही - अर्थात हे भारत हा आंतरराष्ट्रीय (वाचा: अमेरिकन) दडपणाखाली अती झुकणारा देश आहे आहे हे समजूनच लिहीले आहे.

नाहीतर चीन सारखे देश असूरी लष्करी ताकदीच्या आणि मुख्य म्हणजे ठाम राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर वाट्टेल ते परदेशी प्रदेश आपल्या नकाशात दाखवतात (यातली दुसरी गोष्ट नक्कीच आपल्याकडे नाही).

प्रसाद१९७१'s picture

28 Mar 2014 - 5:54 pm | प्रसाद१९७१

ज्या भागाचा अधिकृतरित्या ताबा सोडलेला नाही

अधिकृत रित्या म्हणजे काय?

ह्याच कॉग्रेस सरकार नी "कसेल त्याची जमिन" असा कायदा आणुन ब्राह्मणांच्या जमिनी लाटल्या.
पाकिस्तान आता तो भाग गेली ६२ वर्ष कसत आहे, मग तो त्यांचा नाही का?

प्रसाद१९७१'s picture

28 Mar 2014 - 5:57 pm | प्रसाद१९७१

नाहीतर चीन सारखे देश असूरी लष्करी ताकदीच्या

तुमचे लष्कर म्हणजे देवाचे सैन्य आणि चीन चे लष्कर म्हणजे "असुरी"?????

असे नसते हो. जरा मोठे व्हा.

आणि युद्धात जय वगैरे होइल असली दिवास्वप्न बघु नका. सैन्या कडे २० दिवस पुरेल एव्हडा पण दारुगोळा नाहीये.
कारगील च्या छोट्याश्या चकमकीत बोफोर्स चे तोफगोळे संपायला आले होते.

गब्रिएल's picture

30 Mar 2014 - 6:50 pm | गब्रिएल

मंग तर तुमच्या म्हण्ण्यापर्माने हे भुस्काट कॉन्ग्रेस सर्कार पाडलं पायजेच नाय्का? वा वा प्रसाद१९७१म्हंत्यात, वोट फॉर मोदी. लै झ्याक नाय्का?

श्रीगुरुजी's picture

27 Mar 2014 - 2:01 pm | श्रीगुरुजी

>>> आज तर जम्मूत मोदींनी हाईट केली. अरविंदना AK 49 असं संबोधून ते पुढे म्हणाले की केजरीवाल ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट आहेत!

भारताचा नकाशात काश्मिर वगळल्यामुळे व काश्मिरमध्ये सार्वमत घ्यावे अशी मागणी 'आप'च्या वरिष्ठ नेत्याने केल्यामुळे काही जण केजरीवालांना आयएसआय चे हस्तक व पाकिस्तानचे एजंट म्हणत आहेत. जर केजरीवालांना या टीकेचा राग आला असेल, तर असे न म्हणता आपण त्यांना उदारमतवादी व निधर्मी म्हणूयात. आता तरी खूष ना!

श्रीगुरुजी's picture

27 Mar 2014 - 9:00 pm | श्रीगुरुजी

>>> आज तर जम्मूत मोदींनी हाईट केली. अरविंदना AK 49 असं संबोधून ते पुढे म्हणाले की केजरीवाल ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट आहेत! आता काय फरक राहीला काँग्रेसी नेत्यात आणि मोदींच्यात? भावी PM इतका खोटारडा आणि भंपक वक्तव्य करणारा असू शकतो याचं नवल वाटतं. अर्थात स्वतःच्या सत्ताभिलेषाला दुसरा शह देतोयं असं वाटल्यावर असा बेलगामपणा स्वाभाविक आहे.

केजरीवाल तर गेले अनेक महिने हाईट करत आहेत. गुजरातेत जाऊन कोणत्याही पुराव्याशिवाय त्यांनी थेट गंभीर आरोप केले की,"मोदी आपल्या विरोधकांना विकत घेतात किंवा मारून टाकतात". अशा गंभीर आरोपांसाठी कोणतेही पुरावे द्यायची त्यांना गरज वाटत नाही. कदाचित विरोधकांना ते मॅनेज करत असतील. पण ते थेट त्यांना मारून टाकतात? अशा मारल्या गेलेल्यांची यादी आहे का केजरीवालांकडे?

परवा वाराणशीत बोलताना बेजबाबदार आरोपांची नवीन उंची त्यांनी गाठली. "मोदी वाराणशीतून निवडून आले तर इथले सगळे उद्योगधंदे बंद पडतील. वाराणशीच्या आजूबाजूच्या गावातील सर्व शेतकरी आत्महत्या करतील." असे अत्यंत बेलगाम आरोप त्यांनी केले. स्वच्छ राजकारणाचा पुकारा देणारा व व्यवस्था बदलायला ज्याने अवतार धारण केला आहे, अशा महात्म्याने असे बिनबुडाचे गंभीर आरोप करावे याचा अत्यंत खेद वाटतो. मोदी वाराणशीतून निवडून आले तर ते इथला विकास करणार नाहीत किंवा ते या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करतील असे आरोप एकवेळ ठीक आहेत. पण ते निवडून आले तर इथले सगळे उद्योगधंदे बंद होतील आणि सर्व शेतकर्‍यांना आत्महत्या करावी लागेल? केजरीवालांच्या बाबतीत किती खालची पातळी गाठावी याला काहीच मर्यादा दिसत नाही.

>>> आणि केजरीवालांचा हा ट्विट देखिल लक्षात घेण्यासारखा आहे :
>>> Did Modi ji call me an agent of Pakistan and AK 49? Kya PM ke daawedar ko ye bhasha use karna shobha deta hai? .....

केजरीवालांनी आणि आप समर्थकांनी जरा अंतर्मुख होऊन आपण जे बिनबुडाचे सनससाटी आरोप करत आहोत ते आपल्याला शोभा देतात का याचा विचार करावा.

धन्या's picture

27 Mar 2014 - 11:06 am | धन्या

छान चालू आहे.

आयायटीच्या यमटेकचा उदो उदो करणार्‍यांना सांगावेसे वाटते, बाबानो शालेय किंवा पुस्तकी शिक्षणाचा आणि माणसाच्या माणूस म्हणून असण्याचा विशेष संबंध नसतो.

वास्तवाचं, आजू-बाजूच्या परिस्थीचं नेमकं भान नसलेला पुस्तकी हुशार स्वतःला आणि इतरांना खडडयात घालू शकतो.

प्रसाद१९७१'s picture

27 Mar 2014 - 6:09 pm | प्रसाद१९७१

माझ्या कंपनीत तर "मी आय आय टी मधुन पास झालो" असे बोर्ड लावुन बसला तरी विश्वास बसणार नाही अशी बथ्थड आय आय टी पासआउट माणसे बघितली आहेत ( अनेक )

बंडा मामा's picture

28 Mar 2014 - 11:50 pm | बंडा मामा

आय आय टी आणि आय आय एम मधले बत्थड इथे सुद्धा मुबलक दिसतील.

मैत्र's picture

30 Mar 2014 - 9:19 pm | मैत्र

काही दहावी नापास आहेत की काय वाटावं असे बत्थड सुद्धा दिसतात - बरोबर ना?
त्यांच्या आय आय टी / आय आय एम बद्दल काहीच कल्पना नाही त्यामुळे ते बत्थड असण्याबद्दल जास्त शक्यता वाटते..

तुम्हाला वाटतात बत्थड म्हणजे १००% बत्थड असलेच पाहिजेत - कारण तुम्हाला वाटतं तेच आणि फक्त तेवढंच खरं आणि बरोबर.. - हो ना?

नानासाहेब नेफळे's picture

27 Mar 2014 - 8:13 pm | नानासाहेब नेफळे

अहो ते आय टी आय असतील ,परत विचारुन पहा.

विकास's picture

27 Mar 2014 - 8:23 pm | विकास

अहो ते आय टी आय असतील ,परत विचारुन पहा.
आय टी आय मधून असणार्‍यांना तुच्छ लेखणे हा देखील एक नवजातीयवादच आहे नाही का?

मुख्यमंत्रीपदावरुन ४९ दिवसात कुल्याला पाय लाऊन पळून गेलेले केजरीवाल यांनी सरकारी निवासस्थान मात्र अद्यापही सोडलेले नाही (काय प्रामाणिकपणा आहे बघा :P )

अशा या महाशयांना ८५,०० भाडे भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

Arvind Kejriwal told to pay Rs 85,000 as monthly rent

NEW DELHI: The Delhi government has issued a notice to former chief minister and Aam Aadmi Party chief Arvind Kejriwal to pay Rs 85,000 per month as rent for the Tilak Lane flat in which he has been staying since February 1. Party sources said no notice had been received till Thursday night, but Kejriwal would pay the rent and continue to stay in the house till August.

The AAP leader had resigned on February 14, only days after he had moved into the flat —C-II/23. Shortly after that, he had announced that he would stay in it till his daughter's exams are on, which finished last week. On Thursday, sources said he would stay in the flat for five more months and will pay the rent for that duration.

According to the norms, a Delhi minister is allowed to stay in his or her official residence for 15 days without paying rent after a particular government ceases to exist. The notice issued by the special secretary of PWD after lieutenant governor's clearance has asked Kejriwal to pay the market rent of Rs 85,000 per month from March 1 for the three-bedroom flat in central Delhi. He has also been asked to respond to the notice within a week.

Earlier this month, PWD had sent another letter to Kejriwal, asking him to vacate the flat since he had already crossed the 15-day period.

Party sources said that soon after resigning, Kejriwal had announced that he would continue to stay in the house by paying rent for the permissible six months. "Both notices were sent as per protocol. Kejriwal has not started paying rent right now since there was no intimation by the government on the amount to be paid. Once he receives the notice, he will pay the rent. He will also not stay in the house beyond the duration that has been permitted for ministers," a source said.

मुख्यमंत्रीपदावरुन ४९ दिवसात कुल्याला पाय लाऊन पळून गेलेले केजरीवाल यांनी सरकारी निवासस्थान मात्र अद्यापही सोडलेले नाही (काय प्रामाणिकपणा आहे बघा )

त्यांच्या मुलांच्या परिक्षा संपल्या की ते निवासस्थान बदलणार आहेत असे त्यांनी मुलाखतीत सांगितल्याचे आठवते.
ऐन परिक्षेत घरे बदलणे किती त्रासदायक होऊ शकते याची कल्पना असल्याने हे कारण मला संयुक्तिक वाटले.

मंदार दिलीप जोशी's picture

28 Mar 2014 - 10:06 am | मंदार दिलीप जोशी

१४ फेब्रुवारीपासून ते ऑगस्ट पर्यंत चालणारी कुठली परीक्षा असते?

ऋषिकेश's picture

28 Mar 2014 - 10:08 am | ऋषिकेश

अच्छा! ऑगस्टपर्यंत तिथे रहाणार आहेत का? मग ते अयोग्य वाटते याच्याशी सहमत आहे.

केजरीवालांनी दिल्ली सरकारला तशी विनंती केली आहे आणि त्यासाठी लागणारे जास्तीचे भाडे (तो फरक मोठा आहे) देणार आहेत. पाच बेडरुमचा फ्लॅट वगैरे बोंबाबोंब मिडियानं केली होती पण तो तीन बेडरुम आहे.

मंदार दिलीप जोशी's picture

28 Mar 2014 - 4:40 pm | मंदार दिलीप जोशी

८५००० रुपये भाडे द्यायला या माणसाकडे पैसा कुठून येणार ते उघड आहे. फोर्ड फौंडेशन नैतर लोकांकडे हात पसरणार.

पाच बेडरुमचा फ्लॅट वगैरे बोंबाबोंब मिडियानं केली होती पण तो तीन बेडरुम आहे. >>
किती तो त्याग. फ्कत ३ बेडरूमचा फ्लॅट घेतला, पण तो अजून सोडवत नाहीये सरकारी फ्लॅट. अहाहा काय प्रामाणिकपणा.

सरळ व्यवहार आहे. तुम्हाला पंचाइत असण्याचं कारण नाही.

विकास's picture

28 Mar 2014 - 8:36 pm | विकास

त्यांचे निकटवर्तीय त्यांना मदत करतायंत

हे निकटवर्तीय कोण समजायला हवे नाही का? नाहीतर एकीकडे हेलीकॉप्टर/विमानावरून बोलायचे आणि दुसरीकडे स्वतःचे झाकून ठेवायचे! त्या व्यतिरीक्त निवडणूक लढवत असताना नक्की कुणाचा निधी घेतला आहे, कुठे वापरला जात आहे वगैरे गोष्टी कायद्याने देखील गरजेच्या आहेत.

ऑगस्टपर्यंत घर ठेवणारेत म्हणत होते. ते मुलीची परीक्षा होईपर्यंत म्हणजे मे पर्यंत आहे. दिल्ली सरकारनं आता ( १ मार्च पासून) ८५,००० प्रती महिना भाडे ठरवले आहे. तीन महिन्याचं एकूण भाडं २.५५ लाख होईल. ही रक्कम त्यांना परवडणारी नसेल तर ते घर सोडतील. पण मोदी अंबानींचं विमान सोडू शकणार नाहीत. केजरीवालांनी Joint Commissioner of Income Tax म्हणून कार्यभार सांभाळला आहे. पैसे कुठून आणले याचा वॅलिड पुरावा द्यावा लागतो हे याची त्यांना कल्पना नसेल असं समजणं निवाळ अज्ञान आहे.

विकास's picture

28 Mar 2014 - 9:36 pm | विकास

केजरीवालांनी Joint Commissioner of Income Tax म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
आता हा विषय काढलाच आहे म्हणून तेथे काय दिवे लावले होते, हे ह्या हिंदू मधील Consumer Protection Council, Tamil Nadu, च्या सेक्रेटरीने लिहीलेल्या लेखात वाचू शकता: Understanding Arvind Kejriwal अर्थात असल्या लेखाने एके चाहत्यांमधे काही फरक पडणार नाही. बाब्या बाब्याच रहाणार तरी, विषय निघाला म्हणून सांगितले.... काही भाग खाली चिकटवत आहे.

Consider how he got out of government service. While serving as a Joint Commissioner in the Revenue Department (Income Tax) under the Finance Ministry, he went on a sabbatical (paid leave) from November 1, 2000 to October 31, 2002, and went abroad. One condition for such leave is that the employee must serve continuously for at least three years after return, failing which he or she must pay back the salary he drew over two years with penalty.

अर्थात केजरीवाल ते मान्य करायला तयार नव्हते आणि नेहेमीसारखा आक्रस्ताळे पणा केला. पण शेवटी जेंव्हा कारावास आणि घरजप्तीपर्यंत कायद्यानुसार वेळ आली तेंव्हा: "When it became clear the government would initiate proceedings, he announced on October 30, 2011 that he would borrow from his friends and pay the dues of Rs.9.28 lakh. He wrote to Prime Minister Manmohan Singh on November 3, 2011 enclosing the cheque." आता हे ९.२८ लाख रूपये कुणाकडून घेतले आणि त्याच्या बदल्यात काय फेवर केले ह्याला गुलदस्यात ठेवले गेले...

संजय क्षीरसागर's picture

28 Mar 2014 - 11:19 pm | संजय क्षीरसागर

त्यात `दिवे लावले' वगैरे भाषा वापरण्यात अर्थ नाही. आणि अट, घेतलेला पगार अधिक पेनाल्टी अशी होती (जी कोणत्याही सरकारी नोकरीत असते).

कुठलीही फालतू लिंक देण्या आधी रॅमन मॅगसेसे अ‍ॅवॉर्ड फौंडेशनवर प्रकाशित झालेली त्यांची ही बायोग्राफी वाचा

KEJRIWAL’S first posting was as assistant commissioner of income tax in a district in Delhi. He had a staff of around ten people who received and processed the income statements and tax returns of the residents and businesses in the area. The office had the power to conduct raids on the premises of those suspected of tax evasion and other irregularities, and to choose a few statements at random for deeper scrutiny. There was ample scope for corruption, and tax officers were expected to feed at the trough. Kejriwal would come to work on his scooter.

Kejriwal often discussed the issue of corruption with some colleagues. “There was a sense of disgruntlement among the honest officers,” he says. “If you’re corrupt, you’re in the mainstream. If you’re honest, you’re sidelined.” But he says he did not suffer because of his honesty. Many in his staff were making a lot of money on under-the-table activities, but the responsibility for taking disciplinary action did not lie with him. “It was at a much higher level,” he explains. It would have been “extremely difficult for me if I started chasing them, because then I would just be chasing them and not be doing my own work.”

Despite his misgivings about corruption, however, Kejriwal found tax matters “highly intellectually stimulating because a person will present a tax statement to you and you have to make out from that tax statement and your own investigative skills what his actual income is. I did some very good cases, so I also kind of made a name for myself in the department.” He was promoted to deputy commissioner in 2000 and was an additional commissioner when he resigned in 2006, a designation just below the top titles of chief commissioner and commissioner.

His departure came about because the job, intellectually fascinating as it was, could not prevail over Kejriwal’s spiritual side.

एकतर तुम्हाला विषयाची काहीही माहिती नाही. अत्यंत फालतू मुद्दे काढून चर्चा ढवळणं इतकाच काय तो प्रयास दिसतो.

विकास's picture

29 Mar 2014 - 12:49 am | विकास

कुठलीही फालतू लिंक देण्या आधी

ऐका हो ऐका... या पुढे जर कोणी The Hindu या वर्तमानपत्रातील लि़ंक दिली तर तीची वर्गवारी फालतू सदरात केली जाईल!

असो. आधीच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे बाब्या तो बाब्याच असणार, तेंव्हा आपला प्रतिसाद वाचताना आश्चर्य वाटले नाही आणि मला खात्री आहे की त्या "फालतू" लिंकमधील मजकूर न वाचताच पुढचे लिहीणे चालू असेल म्हणून. चालूंदेत...

तरी देखील काही वाक्यांचा समाचार घेणे क्रमप्राप्त आहे...

रॅमन मॅगसेसे अ‍ॅवॉर्ड फौंडेशनवर प्रकाशित झालेली त्यांची ही बायोग्राफी वाचा
अशा euphemistic अथवा नरोवा कुंजरोवा बायोग्राफीज टंकायला ढिगावारी प्रोफेशनल्स मिळतात... Cesar R. Bacani Jr. तर काय आंतर्राष्ट्रीय पत्रकार आहे.

आता खालील वाक्यासंदर्भात

He was promoted to deputy commissioner in 2000 and was an additional commissioner when he resigned in 2006, a designation just below the top titles of chief commissioner and commissioner.

त्याच मॅगेसेसे च्या संस्थळावर मला केजरीवाल यांच्या एका लेखाचा दुवा मिळाला. वाचत असताना एकदम भरभरून येत होते. कधी एकदा चळवळीत उडी मारतो असे होत होते, पण... मग शेवटी वाचले (त्यांच्याच लेखात म्हणजे त्यांनीच लिहीलेले असणार): Arvind Kejriwal earned a degree in Mechanical Engineering from IIT Kharagpur in 1989. He joined the Indian Revenue Service in 1992a and set up Parivartan in Jan 2000. He was a Deputy Commissioner of Income Tax in Nov 2000 when he took two years sabbatical to work full time on Parivartan. He is currently on another two year leave working full time on Parivartan.

थोडक्यात त्यांनी २००४ पर्यंत रजा घेतली हे ते मान्य करतात. आता हिंदूमधील (तुम्ही फालतू म्हणलेल्या) दुव्यामधे म्हणल्याप्रमाणे त्यांची पहीली २ वर्षे रजा पगारी होती तर नंतरची हिंदूच्या म्हणण्याप्रमाणे १८ महीन्याची केजरीवाल यांच्या म्हणण्याप्रमाणे २ वर्षांची (२४ महीन्यांची) अतिरीक्त बिनपगारी रजा घेतली होती. या सर्वासाठी त्यांनी बाँडवर सही केली होती. त्यानुसार रजा संपल्यावर सलग तीन वर्षे काम करणे अथवा दोन वर्षांचा (फुकट) घेतलेला पगार + त्यावरील व्याज देणे. अर्थातच ते करायला एके तयार नव्हते. आणि ते मॅगेसेसेच्या संस्थळावर लिहीण्यास ते विसरले. असो. होता है! ऐसा भी होता है!

संजय क्षीरसागर's picture

29 Mar 2014 - 10:42 am | संजय क्षीरसागर

.

चिगो's picture

28 Mar 2014 - 4:07 pm | चिगो

मुलांच्या परीक्षा असल्याने शासकीय घर ठेवावे लागेल, हे ते बोलले होते. "किंवा माझ्या पत्नीचे आय.टी. कमिश्नरपदाची पदोन्नती ड्यू आहे. तिला इथेच घर मिळेल, तिथे जाऊ.." एका माजी सरकारी अधिकार्‍याने सरकारी पोस्टींगबद्दल एवढा आत्मविश्वास दाखवणे, ह्याचे आश्चर्य वाटले..