डावे-उजवे

विकास's picture
विकास in राजकारण
25 Mar 2014 - 1:16 am

सध्या मेधा पाटकर यांनी राजकारणप्रवेश केल्याने त्यांना जरा माध्यमांकडून आदरयुक्त वेळ मिळत आहे असे वाटते. त्यात त्या आपकडून निवडणूक लढवत असल्याने तर काय दुधात साखर! अर्थात, त्यांच्या काही मुद्यांवर माझा जरी आक्षेप असला तरी त्यांच्याबद्दल आदर आहे. काल त्यांची एनडीटीव्ही वर बरखा दत्त यांनी तरूण स्त्री-पुरूषांच्या समोर घेतलेली मुलाखत पाहीली. काहीवेळेस स्वतःच्या डाव्या विचारसरणीस प्रामाणिक तर काही वेळेस आप ची बाजू घेत राजकारणी वृत्ती दाखवणे असे दोन्ही चालले होते. पण हा चर्चा विषय मेधाताईंवर नाही, तर त्यांनी केलेल्या एका विधानावर आहे...

मुंबईमधनं जशा साम्यवादी डाव्या विचारसरणीच्या मेधाताई आपच्या तिकीटावर लढत आहेत तशाच भांडवलशाही उजव्या विचारसरणीच्या मीरा सन्याल देखीळ लढत आहेत. बरखा दत्त यांनी मेधाताईंना प्रश्न विचारला की त्या कायम भांडवलवादाच्या विरोधातल्या डाव्या विचारांच्या असताना, त्यांना भांडवलवादाच्या बाजूच्या उजव्या मीरा सन्याल पक्षसहकारी म्हणून कशा चालतात. त्याला मेधाताईंनी राजकारणी व्यक्तीला शोभेसे उत्तर दिले: शरीरास डावी आणि उजवी अशा दोन्ही बाजू लागतात. तसेच समाजाला पण लागतात... :) यात अर्थातच कुठेतरी पोथीनिष्ट साम्यवादापासून त्यांनी फारकत (किमान टिव्हीवर) घेतली असे वाटू शकते. तसेच नुसत्या साम्यवादाने काही होऊ शकेल हे वास्तवात शक्य नाही हे कुठेतरी मान्य केल्याचे दिसते... मग त्यासाठी गांधी-फुले-आंबेडकरांनी काय केले असते तसेच मी म्हणते वगैरे बचावात्मक विधान झाले पण त्यांच्या बोलण्यातला हा मुद्दा मला खरेच महत्वाचा वाटला...

समाजवादाचे आकर्षण असले तरी नेहरूंनी सुवर्णमध्य आणण्याचा प्रयत्न केला असे म्हणले जाते. ते खरे देखील आहे, त्याचे काही ठोस फायदे देखील त्या काळाला अनुसरून झाले. पण काहीच १००% आदर्श असू शकत नाही हे मान्य केले तर त्यांच्याच धोरणाचा एक परीपाक म्हणून हळू हळू परमिटराज येत गेले आणि समाजवाद/साम्यवादाचे प्रेम/आकर्षण म्हणून त्यावर आधारीत अशी आपली परराष्ट्रनिती ठरू लागली ज्याचे देशाला नक्कीच तोटे झाले असे वाटते. (याचा अर्थ आपण अमेरीकेला चिकटायला हवे होते असा घेण्याची गरज नाही). अजून एक महत्वाचा तोटा म्हणजे सरकारवर अवलंबून रहाणे - नोकर्‍यांसाठी आणि अनेक सुविधांसाठी. फोनसाठी दहा दहा वर्षे थांबायला लागायचे हे इथल्या तरूण पिढीस माहीत आहे का? डाव्यांचा आणि समाजवाद्यांचा प्रभाव असताना, सगळेच साधे रहाण्याचे दाखवण्याच्या प्रयत्नात भोंदूगिरी करायचे. डाव्याविचारसरणीने इन्किलाब झिंदाबाद म्हणत कारखान्यात संप आणले, नक्षलवादाला खतपाणी घातले. डाव्या+समाजवादी विचारसरणीने उद्यमशिलतेवर मात्र पाणी सोडले, सरकारे मोठी केली, परमिट राज आणले, सबसिडी आणल्या आणि भ्रष्टाचाराची कुरणे तयार केली. १९९० पर्यंत देश हा प्रांतिक होता. देशवासीयांमधे प्रांतिकता अधिकच होती.

मला नक्की कधी ते माहीत नाही, पण खाजगी कंपन्यातले पगार हे भरमसाट वाढणे आणि मालक जाहीररीत्या अब्जाधिश होणे हा प्रकार साधारण १९९१ नंतरच्या भांडवलाशीच्या उदयानंतर होऊ लागला. भारतीयातल्या उद्यमशीलतेला काही अंशी त्यानंतरच्या काळात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळू लागले. आयटीक्रांतीने तसेच इतर अनेक गोष्टींनी तर त्यात भरच पडली. अजून एक भर पडण्याचे कारण म्हणजे तरूणाई! पण त्याच बरोबर काळजी वाटावी अशी आहेरे-नाहीरे दुही पण वाढीस लागली, वैयक्तीक आयुष्यातले ताणतणाव वाढले हे देखील कटू वास्तव आहे. मात्र जे शिकले त्यांचे नोकरीसाठीचे सरकारवरील अवलंबित्व पण संपवता आले. असे बरेच काही आंबट-गोड. अजून एक म्हणजे, मुक्तार्थव्यवस्थेने अर्थव्यवस्थेची फळे ही चार मेट्रोशहरे सोडल्यास इतरत्र पण पसरू लागली. तमाम प्रोफेशनल्स स्वतःची गावे, राज्ये सोडून इतर राज्यांमधे जाऊ लागले. हळूहळू परप्रांतियांना जवळ करणे (कॉस्मोपॉलीटन) हे सर्वत्र वाढू लागले आहे. (अर्थात ही नुसती सुरवात आहे). कुठेतरी नॅशनल ईंटीग्रेशनला ह्या खाजगीकरणामुळे अप्रत्यक्ष फायदा झाला.

तरी देखील, भ्रष्टाचार करण्यात ह्या दोन्ही बाजू तितक्याच परीणामकारी अर्थात भ्रष्टाचारी आहेत असे वाटते.

आज आपल्याला देश म्हणून कशाची गरज आहे? डाव्या विचारसरणीची का उजव्या विचारसरणीची? जर उत्तर दोन्हीची, पक्षी: मध्यम/centrist मार्गाची असे असेल तर नक्की काय? बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स घेयच्या ऐवजी आपण वर्स्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स तर घेत नाही आहोत ना?

सरकारवर सर्व सेवा-सुविधांसाठी अवलंबून असणे महत्वाचे का सरकार कमी करून (योग्य कायदे करून) खाजगी उद्योगांवर देश मोठा करणे महत्वाचे?

देशातला एक महत्वाचा प्रश्न हा सामाजिक विषमता आहे. तो सोडवायचा असेल तर सरकारवर अवलंबून रहायचे का जनतेने त्यावर सामाजीक कर्तव्य लक्षात ठेवून उत्तरे शोधावीत? तो सोडवायचा म्हणजे भांडवलशाहीस विरोध करायचा का त्यातून मिळणारे फायदे काही अंशी समाजकार्यात खर्‍या अर्थाने पसरतील हे बघणे महत्वाचे? (नुसते उत्पन्नाच्या २% चेक CSR च्या नावाखाली फाडणे नाही!)

अजून देखील काही मुद्दे या संदर्भात मांडता आले तर अवश्य मांडावेत!

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

25 Mar 2014 - 4:11 am | अर्धवटराव

प्रथम प्रश्न हा येतो कि भारताला डावी विचारसरणी, साम्यवाद, समाजवाद वगैरे टाळता येणं शक्य होतं काय? तर अजीबात नाहि. धर्माच्या बाबतीत सुधारणा झाल्या, सामाजीक सुधारणा झाल्या, राजेरजवाडे जाऊन राजकीय सुधारणा झाल्या... या सगळ्यात कॉमन काय होतं तर एक मक्तेदारी मोडुन दुसरा पसारा मांडायच्या आधिचा संधीकाल. माणसाचा लढुन दमलेला, थकलेला, पण स्वतंत्र मोकळा उष्ण श्वास. आर्थीक सुधारणेच्याबाबतीत देखील हेच होत होतं व हि परिस्थिती डाव्याविचारसरणीला सर्वाधीक पोषक असते...एस्पेशिअली गरीब व विपुल लोकसंखेच्या समाजात/देशात. त्यामुळे भारताचा लंबक डाविकडे झुकणे अगदी अपरिहार्य होते.

नेहरुंनी जे काहि आर्थीक आणि राजकीय धोरण अवलंबीलं ते बेस्ट नसलं तरी बेस्ट पॉसीबल होतं त्याकाळात. त्यापलिकडे काहि करण्याच्या परिस्थितीत भारत नव्हताच. नेहरुंना डाव्या विचारसरणीचा भविष्यात पराभव होणार आहे हे कळलं नसेल कदाचीत... आणि त्याकाळात ते कोणालाहि उमगणं शक्य नव्हतं. पण तरिही त्यांनी साम्यवाद असफल झाल्यास बॅकअप प्लॅनचे बिजारोपण करुन ठेवले होते कि काय शंका येते. स्वतः नेहरु चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले होते व श्रीमंतांना देखील देशाची तेव्हढीच काळजी असते जेव्हढी सर्वसामान्य जनतेला, हे ते स्वानुभवाने जाणुन होते. टाटा, बिर्ला, बजाज आदि मंडळींचं एका नव-साम्यवादि राष्ट्रात अदरवाईज जे पतन झालं असतं ते नेहरुंनी होऊ दिलं नाहि. त्यामुळे पुढे मागे जर एखादी विचारसरणी फेल झाली तरी देशाचा कारभार थांबणार नाहि याची तरतूद आपल्या सरकारने (अनावधानाने ??) करुन ठेवली होती कि कसं हा प्रश्न पडतोच.

राहिला प्रश्न आज भारताने कुठलं मॉडेल स्विकारावं (हे बघा कुत्सीक मिपाकर... लागले नमो नमो ओरडायला ;) )
साम्यवाद तर अशक्य आहे. तेव्हढं सशक्त केंद्र सरकार बनणार आहे काय येत्या काहि दशकात तरी ?( आता हे बघा आणखी काहि कुत्सीक मिपाकर... लागले केजरीवाल केजरीवाल ओरडायला ;) ) नरसींहराव सरकारने धरणाचे दरवाजे उघडले. ते अफाट पाणि कोण भगिरथ रोखेल आज? गंगेला जटेत बांधुन जनकल्याणाअसाठी तिचा प्रवाह चेनलाईझ करणार्‍या शिवाची आवष्यकता आहे... व जनताजनार्दन हा अवतार घेईलच पुढेमागे. भारताला भारतीय मॉडेलच विकसीत करावं लागेल हे निश्चित.
अजुन बरच काहि आहे टंकण्याजोगं. ब्रेक के बाद मिलेंगे :)

विजुभाऊ's picture

3 Apr 2014 - 4:52 pm | विजुभाऊ

एक म्हण चपखल बसते " देअर इज नथिंग राईट विथ लेफ्ट अ‍ॅन्द देअर इस नोथिन्ग लेफ्ट विथ द राईट"

मेधाताईंची ही मुलाखत मी अजून ऐकली/पाहिली नाही त्यामुळे त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते बघावं लागेल.
राहता राहिला प्रश्न डाव्या-उजव्याचा.
वास्तविक १९६०-७० या काळात डावे आणि उजवे जितके स्पष्ट होते, तितके ते आता राहिले नाहीत जगभरातही. डाव्यांतले उजवे आणि उजव्यांतले डावे; डाव्यांतले मध्यममार्गी आणि उजव्यांतले मध्यममार्गी; कडवे डावे आणि कडवे उजवे आणि कडवे मध्यममार्गी हे विविध विचारप्रवाह नेहमी दिसत आले आहेत राजकारणातही.
मला वाटतं साध्य आणि साधन यातल्या कशाला महत्त्व द्यायचं हा केवळ वैचारिक नाही तर नैतिकही मुद्दा आहे.
हा 'मध्यममार्ग' फार सापेक्ष असतो अनेकदा म्हणून त्याची व्याख्या करता येत नाही - मला तरी येत नाही.

भारतात सत्तेवर कुणीही येवो, त्यांना कडवेपणाची भूमिका घेऊन चालत नाही हे वेळोवेळी दिसलं आहे. त्यामुळे सर्वसमावेशकता अपरिहार्य आहे - पण तसं केलं की 'भूमिका' नाहीशी होण्याचा धोका असतो. मेधाताईंसारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा सक्रिय राजकारणातला प्रवेश मला अत्यंत रोचक वाटतो तो या दृष्टिकोनातून. मूळ तत्त्वे न सोडता थोडी लवचीक भूमिका घेण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे - त्यातून व्यवस्थेत, रचनेत आणि वातावरणात चांगला बदल होईल अशी अपेक्षा मला आहे - ती फार भाबडी आहे याची जाणीव मला आहे, तरीही :-)

विकास's picture

25 Mar 2014 - 8:37 am | विकास

मेधाताईंची ही मुलाखत मी अजून ऐकली/पाहिली नाही त्यामुळे त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते बघावं लागेल.

मी तूनळीवर ऐकली आहे. पण तुम्ही त्यावर लेख लिहीणार असल्याने येथे लिहायचे टाळत आहे.

मेधाताईंसारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा सक्रिय राजकारणातला प्रवेश मला अत्यंत रोचक वाटतो तो या दृष्टिकोनातून. मूळ तत्त्वे न सोडता थोडी लवचीक भूमिका घेण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे

सहमत. किंबहूना त्यांनी हे आधीच करायला हवे होते असे वाटते. आपल्याकडे राजकारणत न जाणे म्हणजे आदर्श असला काहीसा प्रकार आहे. पण त्यातून त्या बाहेर येत असल्या तर उत्तमच आहे आणि स्वागतार्ह आहे. उद्या त्या जर जिंकल्या तर त्यांना सांसदीय राजकारण, त्यात सक्रीय असतानाच्या मर्यादा आणि तडजोडी समजतील आणि आशा आहे की त्यातून त्यांना तुम्ही म्हणता ती लवचिकता येईल.

मला वाटतं साध्य आणि साधन यातल्या कशाला महत्त्व द्यायचं हा केवळ वैचारिक नाही तर नैतिकही मुद्दा आहे.

बरोबर आहे. फक्त गंमत अशी असते की नैतिकतेची व्याख्या देखील तुम्ही सत्ताकारणात असलात तर ज्या स्तरावर असाल तेथे बदलू शकते. स्वार्थी तडजोड म्हणून नाही तर देशासाठीची priority म्हणून. त्यावर अधिक इथे लिहीत बसत नाही.

आत्मशून्य's picture

25 Mar 2014 - 4:00 pm | आत्मशून्य

संस्थळाचा टिवी बनवु नका... मिपाच ठेवा.

नितिन थत्ते's picture

25 Mar 2014 - 4:43 pm | नितिन थत्ते

स्वातंत्र्यानंतर राबवलेल्या धोरणांबाबत एक दुवा.

A key principle of the Bombay Plan was that the economy could not grow without government intervention and regulation. Under the assumption that the fledgling Indian industries would not be able to compete in a free-market economy, the Plan proposed that the future government protect indigenous industries against foreign competition in local markets.
त्यातील एक इंटरेस्टिंग वाक्य
Although Jawaharlal Nehru, the first Prime Minister of India, did not officially accept the plan, "the Nehruvian era witnessed [what was effectively] the implementation of the Bombay Plan; a substantially interventionist state and an economy with a sizeable public sector."

स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांना समाजवादाचे आकर्षण होते म्हणून भारत डावीकडे गेला हे सत्य नाही. तत्कालीन उद्योगपतींना (भांडवलदारांना) जे हवे होते तेही लायसन्स-परमिट राजच होते.

नेहरूंवर निदान त्या काळात तरी ते पुरेसे डावे नाहीत अशीच टीका होत असे. डाव्या विचारसरणीचे गारुड देशावर इतके होते की तत्कालीन भाजप सुद्धा आपले अधिकृत धोरण म्हणून गांधीवादी समाजवाद असे सांगे.

नगरीनिरंजन's picture

25 Mar 2014 - 5:22 pm | नगरीनिरंजन

डाव्या-उजव्यात फार फरक राहिलेला नाही या आतिवास यांच्या मताशी थोडासा सहमत आहे. थोडासाच यासाठी की डाव्या-उजव्यात त्यांचे जाहीरामे सोडल्यास फार फरक कधी नव्हताच असे मला वाटते.
डावे-उजवे असे विचारांचे पिजनहोलिंग करता करता या दोन्हीत सामायिक असणारी प्रचंड उतरंडीची औद्योगिक नागरसंस्कृती तीच असताना दोन्हीचा वेगळा परिणाम पाहायला मिळेल ही अपेक्षाच भाबडी होती हे आता लक्षात येत आहे.
भारतात तर मिक्सिझम आणला गेला ज्यात गरिबांच्या कल्याणासाठी सरकारने निवडलेले भांडवलदार झटणार होते आणि सरकारी वितरण व्यवस्थेतून बाबू लोक गरिबांना घास भरवणार होते. प्रत्यक्षात भांडवलदारांसाठी समाजवाद व समाजासाठी भांडवलवाद आला आणि रेशनकार्डावर कुपोषण वाटलं गेलं.
नेहरु, गांधींना बँकरोल करणार्‍या टाटा-बिर्लांसाठी टेलरमेड अशीच ही व्यवस्था होती.
तिकडे भांडवलशाहीच्या मंदिरात म्हणजे अमेरिकेत तमाम समाजाच्या भल्यासाठी टू बिग टू फेल बँकांना आणि कार कंपन्यांना सर्कारी सलाईन लावले गेले आणि भारतीय समाजवादाचा भयंकर द्वेष करणारांनी आपल्या बोक्यांना त्याच समाजवादाचे लोणी खाऊ घातले.
थोडा विचार केला तर कळतं की संस्कृतीच्या जन्मापासून डावे-उजवे हा फरक नव्हताच; फरक असेल तर फक्त वरचे आणि खालचे एवढाच होता आणि आहे.

क्लिंटन's picture

25 Mar 2014 - 11:44 pm | क्लिंटन

चोप्य-पस्ते

मिपावर पूर्वी या संदर्भात लिहिलेले प्रतिसाद चोप्य-पस्ते करतो:

१. नेहरूंच्या काळात लायसेन्स/कोटा/परमीट राज होते.आता याचे कारण काय होते?एक उदाहरण देऊन सांगतो.मी लहान असताना काही कारणांनी आमच्या कुटुंबाला काही काळ आर्थिक संकटातून जावे लागले होते.अशी वेळ अनेकांवर येते.त्या काळात जेवायला बाहेर जाणे तर सोडाच घरचे साधे खाणे सोडून इतर काही विशेष नसायचे. त्यावेळी महिन्यातून एक क्रिमच्या बिस्किटांचा पुडा आणला जात असे.त्यातील ८ बिस्किटांपैकी ४ बिस्किटे माझी तर ४ माझ्या बहिणीची असे "रेशनिंग" असे.आता या रेशनिंगचे कारण अगदी उघड होते--रिसोर्सेसची टंचाई. नेमकी अशीच टंचाई नेहरूंच्या काळात सुरवातीला होती आणि म्हणूनच लायसेन्स/कोटा/परमीट राज ठेऊन उपलब्ध रिसोर्सची कोणी व्यर्थ उधळपट्टी करत नाही हे बघणे आणि आहेत ते रिसोर्सेस विविध उद्योगांना पुरवून वापरावे लागत होते.आज मी दिवसाला बिस्कीटांचे १० पुडे विकत घेऊ शकत असेन पण म्हणून ४ बिस्कीटांचे तेव्हाचे रेशनिंग चुकीचे होते असे मला वाटत असेल तर ते अयोग्य आहे.आता भारतीय अर्थव्यवस्थेत हे रेशनिंग किती वर्षे चालू ठेवायला हवे होते? ५/१०/१५/२० की लागली तेवढी ४४ याविषयीची माहिती माझ्याकडे नाही.त्यामुळे त्यावर काहीही भाष्य करत नाही.

२. सुरवातीच्या काळात लायसेन्स राज असणे ही पण एक गरज होती. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतात नैसर्गिक साधन-सामुग्री भरपूर होती पण त्यातील tapped resources खूपच कमी होते. तेव्हा परमिट-कोटा-लायसेन्स ठेऊन "रेशनिंग" करणे ओघाने आलेच. आणि हे resource tap करायची क्षमता खूपच कमी खाजगी उद्योगांमध्ये होती तेव्हा सरकारने पुढाकार घेऊन ते काम करायचा प्रयत्न केला हे एका प्रतिसादात म्हटलेच आहे. आता हे लायसेन्स राज कधीतरी काढून टाकणे गरजेचे होतेच. पण ते नक्की कधी करणे योग्य झाले असते (५/१०/२०/३० की प्रत्यक्षात लागली तेवढी ४४ वर्षे) यावर भाष्य करायला माझ्याकडे पुरेशी माहिती नाही तेव्हा त्यावर काहीही लिहित नाही.

३. बहुतेक सर्वच उद्योगांना उत्पादनाचा कोटा ठरवून दिलेला होता. याचे कारण परत तेच-- उपयुक्त Resources ची टंचाई. समजा देशात १०० एकक स्टील, १०० एकक वीज आणि १०० एकक इतर Resources आहेत आणि सगळ्या उद्योगांना आहेत त्याच Resources मध्ये भागवून घ्यायचे आहे. या परिस्थितीत जर बजाजने त्यांना ठरवून दिलेल्या १० पेक्षा जास्त एकक स्टील/वीज वापरली तर त्याचा अर्थ इतर उद्योगांना तेवढे Resources कमी आणि त्या उद्योगांवर परिणाम होणार! कोटा पध्दतीचे मागचे rationale हे होते. आता प्रत्यक्ष बजाजविरूध्दचा खटला नक्की कधी भरला, त्यावेळी कितपत टंचाई होती याची माहिती मला नाही. पण १९४७ नंतरची टंचाई लक्षात घेता कोटा पध्दत आणणे आता वाटते तितके वाईट नव्हते एवढाच माझा मुद्दा आहे. आता तीच धोरणे किती वर्षे राबवायला हवी होती? १९९१ पूर्वीच ती मोडीत काढता आली असती का किंवा मोडीत काढायला हवी होती का या प्रश्नांची उत्तरे द्यायला लागणारी माहिती माझ्याकडे नाही म्हणून त्यावर भाष्य करत नाही.

४. मी स्वतः समाजवादी /साम्यवादी आर्थिक विचारांचा अजिबात पुरस्कर्ता नाही. ज्या शिक्षणसंस्थेला epitome of capitalism असे म्हणता येईल अशा एका शिक्षणसंस्थेत माझे शिक्षण झाले आहे आणि बहुतांशी तेच विचार माझेही आहेत. माझ्या प्रतिसादाचा उद्देश हा की सध्या नेहरूंच्या आर्थिक धोरणांवर टिका करणारे बरेच लोक असतात. माझ्या मते ती टिका १००% समर्थनीय नाही कारण त्या परिस्थितीत उपयुक्त Resources ची टंचाई असताना नेहरूंच्या सरकारने त्या परिस्थितीतून मार्ग काढायला योग्य तेच केले.

चर्चा रंगल्यास आणखी लिहिनच.

ह्म्म.. ज्ञानात भर!! त्या जरा लिन्का पण दिल्या असतात तर बरे झाले असते.

नितिन थत्ते's picture

26 Mar 2014 - 11:59 am | नितिन थत्ते

मार्मिक प्रतिसाद आहे.

नेहरूंच्या नंतर किंवा त्यांच्याच शेवटच्या काळात उदारीकरण करावे अशी परिस्थिती आली होती की नाही हे ठाऊक नाही.

पण लायसन्स परमिट राजने उद्योगांना सुरक्षितता मिळवून दिली त्याचा उपयोग करून उद्योगांनी आपली केपेबिलिटी आणि कपॅसिटी वाढवायला हवी. पण कपॅसिटी वाढवायला पुन्हा हे लायसन्स परमिट राज आडवे येणार. किंवा सरकारी क्षेत्रातील मूलभूत उद्योगांनी रिसोर्सेसची खनिजे- पोलाद- वीज वगैरे उपलब्धता वाढवायला हवी होती ती वेगाने वाढली नाही असे दिसते. त्यामुळे टंचाईचे चक्र चालूच राहिले.

८० च्या दशकात खर्‍या अर्थाने टंचाईची स्थिती बर्‍यापैकी नियंत्रणात आली होती. त्याच्या अनुषंगाने व्हीपीसिंग-राजीव गांधी यांनी थोडेसे उदारीकरण सुरू केले होते असे दिसेल. पण त्यांनी ड्रास्टिक काही केले नाही. त्या अर्थी उदारीकरणाला पाच ते दहा वर्षे उशीर झाला असू शकेल.

धोरण ठरवणे हे देशातील राजकीय परिस्थितीवर सुद्धा अवलंबून असते. १९७५ च्या आधीपासून व्हीपी सिंग पंतप्रधान असेपर्यंतच्या काळात देशातील राजकारणावर डाव्या पक्षांचा खूपच पगडा होता. बंगाल-केरळ येथे ते सत्तेत होते आणि तेव्हाच्या राजकारणात राजकारणात त्यांनी बराच वरचष्मा गाजवला. इंदिरा गांधींचे सरकार ६८ ते ७१ , ७४-७५ मध्ये, मोरारजींचे सरकार, व्हीपीसिंग यांचे सरकार डाव्यांच्या पाठिंब्यावर उभे होते. ही बाब लक्षात घ्यायला हवी.

इंदिरागांधींचे पुनरागमन ते राजीव गांधींचे पतन या काळात डाव्यांचा वरचष्मा केंद्रसरकारवर नव्हता. त्या काळात काही सुधारणा झाल्या त्या अर्थातच अपुर्‍या होत्या.

नरसिंहरावांच्या काळापर्यंत रशियाची स्थिती उघड झालेली असल्याने तोही फायदा त्यांना झाला. डाव्या विचारसरणीला सोडचिठ्ठी देणे बर्‍यापैकी सोपे झाले. तसेच त्या काळातला प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप उदारीकरणाचा समर्थक होता आणि मशीद पाडणे वगैरे उद्योगात मग्न होता.

>>>त्या काळातला प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप उदारीकरणाचा समर्थक होता आणि मशीद पाडणे वगैरे उद्योगात मग्न होता.

आणि या शब्दाच्या ठिकाणी म्हणूनच हा शब्द योग्य झाला असता. ९० च्या दशकात भाजपाने लोकांना भुलवून धर्माची आणि राममंदीराची गोळी खाऊ घातली. त्याला व्यवस्थित पद्धतीने कॉग्रेसने वरकरणी विरोध करत साथ दिली. आणि पश्चिमेच्या सत्तांना हवे तसे रान मोकळे दिले. पन्नास वर्षांनंतर व्यवस्थित कळेल की उदारीकरणाने खरोखर भारताला फायदा झाला की असियन टायगर प्रमाणे भुसा भरलेला वाघ हाती आला. जनतेचे लक्ष वेधले जाऊ नये म्हणुन मंदीर मशिद पाडापाडी चालू ठेवले. हवे तसे करार झाल्यावर मुद्दा बासनात गुंडाळला. असो.

नगरीनिरंजन's picture

3 Apr 2014 - 5:23 am | नगरीनिरंजन

अरुंधती रॉय यांच्या "द डॉक्टर अ‍ॅन्ड द सेंट" या नव्या पुस्तकात गांधी-नेहरुंना पाठबळ देणार्‍या उद्योगपतींना इंग्रजी "ग्लास सीलिंग" आडवे आल्याने स्वातंत्र्याचा जाहीरनामा केला गेला आणि नंतरची मिश्र अर्थव्यवस्था निर्माण करतानाही त्यांचाच विचार घेण्यात आणि करण्यात आला अशा अर्थाचा दावा आहे म्हणे.
पुस्तक मी अजून वाचलेलं नाही त्यामुळे खरं-खोटं अरुंधती रॉयना किंवा ज्यांनी पुस्तक वाचलंय त्यांना ठाऊक.
तसंही अरुंधती रॉय या काही "तज्ज्ञ" नाहीत बहुतेक.

आता फक्त रुमाल टाकून ठेवतो. चर्चा वाचतो आहे.

विटेकर's picture

26 Mar 2014 - 11:20 am | विटेकर

श्री. क्लींट्न यांचा प्रतिसाद संतुलीत आणि अभ्यासपूर्ण !
मला व्यक्तिशः साम्यवाद /समाजवाद कधीच पटला नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे तो एत्तदेशीय नाही आणि नैसर्गिक ही नाही. समाज ही व्यवस्था क्रूत्रिम नसून पूर्णपणे नैसर्गिक आहे, जशी व्यक्ती इवॉल्व ( संक्रमित ?) तसाच समाज ही इवोल्व होत असतो, ती एक सहज प्रक्रिया आहे. ती सरकारने निर्माण करु सरकारने नियमघालून द्यायची बाबच नव्हे. व्यक्तिप्रमाणे समाजालाही मन आणि आत्मा असते,अस्मिता असते. व्यक्ति आणि समाज परस्परावर पूर्ण्पणे अवलंबून असतात. समाज व्यक्तिचे पोषण करतो आणि व्यक्ति समाजाला अर्थ प्राप्त करुन देते. समाज जग्व्याळ यंत्र असून व्यक्ती त्याचा एक पूर्जा आहे असा निर्जीव स्म्बंध नसून समाज - व्यक्तिचे अवयव - अवयवी असे संब्ंध असतात. हाताच संबंध डोक्याशी कसा असावा हे बाहेरील व्यक्ती ठरवू शकत नाही तद्वत समाज आणि व्यक्ति याम्चे संबंध हे सरकार थरवू शकत नाही. समाज सरकार च्या मालकीचा नाही. सरकार येतील आणि जातील. समाज युगानुयुगे अक्षुण्ण्पणे चालत राहिल. समाजाचे / व्यक्तिचे आणि पर्यायाने साधनसंपत्तीचे सरकारीकरण केले की व्यक्तिची सृजनशीलता हरवते, कर्तृत्व गोठते आणि आयुष्य बेचव आणि साचे- बंद होत जाते.पर्यायाने समाजाची सृजन्शीलता लयाला जाते आणि संक्रमण थांबते , रोडावते.
नेहरुंची "साम्यवादाचे प्रचंड आकर्षण आणि गांधीजींची स्वयंपूर्ण खेडी" यामध्ये मोठी गोची झाली. मोठ्या उद्योगांचे राष्ट्रीयकरण केल्याने छोटी छोटी स्वंयंपूर्ण देशी व्यवसाय / स्त्रोत हळू हळू नष्ट झाले . पारंपारिक कौशल्य असणारा फार मोठा समाज नव्या जगात एकदम संदर्भहीन झाला. या मोठ्या उद्योगांमुळे तस्ल्याच बेगडी विकासाची भुरळ पडली,भरीला सबसिडीची भूल होतीच ! त्यामुळे आपला विकास झाला असे जे वाटत होते ते वस्तुतः ते तसे नव्हतेच , आणि त्या भौतिक विकासाची फार मोठी किंमत आपण मोजली , खेड्यांचे शहरीकरण झाले आणि शहरांचे बकालीकरण झाले. "मुख्य अर्थ" ( साधन संपत्तीची निर्मिती जसे की शेती, उद्योग )कमी / नाहीसा होऊन "गौण" अर्थाला ( सपोर्ट सर्विसेस, नोकरी , दलाली ) महत्व प्राप्त झाले,श्रमाची प्रतिष्ठा कमी झाली , पैशाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आणि भौतिक समृद्धी वाढली पण जीवनाची गुणवत्ता/कस खालावला.
मला असे वाट्ते की महात्माजींचा स्वयंपूर्ण खेडी आणि खेड्याकडे चला ही अर्थव्यवस्थाच खरिखुरी अर्थ व्यवस्था भारतीय होती ! त्याद्वारेच आपला खराखुरा विकास ( संदर्भ - विकासाची भारतीय संकल्पनाhttp://www.misalpav.com/node/25462 हा माझाच लेख - तेवढीच झैरात .. त्याला लै कमी टीआर्पी मिळाला !) झाला असता !
बाकी आता डावे काय किंवा उजवे काय सगळेच "स्वपुत्रपौत्रीअष्ट्पिढीअखंड्धन्वर्षाव -तहहयातछ्त्रचामंडीतसिंहासन" या एकाच विचारसरणीने काम करतात .. विचार केव्हाच सरणावर गेले.

नितिन थत्ते's picture

26 Mar 2014 - 12:04 pm | नितिन थत्ते

>>नेहरुंची "साम्यवादाचे प्रचंड आकर्षण आणि गांधीजींची स्वयंपूर्ण खेडी" यामध्ये मोठी गोची झाली.

नेहरूंनी स्वयंपूर्ण खेड्यांच्या कल्पनेला कसलेही उत्तेजन दिल्याचे ऐकिवात नाही.

विकास's picture

26 Mar 2014 - 5:54 pm | विकास

चर्चेत माहितीपूर्ण प्रतिसाद येत असल्याने प्रथम सर्वांचे आभार. नेहरूंकाळापासून जो काही समाजवाद चालत आला त्याबद्दल बर्‍याचदा बोलले गेले आहे. नेहरूंच्या राजकारणापेक्षा एकंदरीत राजकारण हाताळण्याच्या क्षमतेसंदर्भामुळे मला त्यांच्याबद्दल काही आक्षेप असले तरी त्यावेळेस सुवर्णमध्य ठेवण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न हा त्याकाळासाठी योग्य होता हेच मी देखील म्हणेन. जर तत्कालीन उद्योगपतींना परमिटराज हवे म्हणून नेहरू सरकार तसे वागले असे म्हणायचे असले तर त्यात त्यांनी समाजवादी असणे जर चूक असे वादापुरते म्हणले, तर त्याहून ही अधिक चूक होती असे म्हणावे लागेल...

पण विषय खरेच तो नाही अथवा प्रामाणिकपणे मोदी-केजरीवाल-राहूलगांधी (पक्षी: सध्याची काँग्रेस) हा देखील नाही. म्हणून जाणीवपूर्वक हे सर्व शब्द मी प्रस्तावात टाळले होते अथवा अनुल्लेखाने मारले होते. काळाच्या ओघात एखादी व्यक्ती पंतप्रधान होईल, पक्ष/आघाडी सत्तेवर येईल आणि नंतर राहील अथवा जाईल... त्याचे इतके खरेच विशेष नंतर वाटेनासे होते, पण देश आणि जनतेसाठी पुढे जाण्याच्या ट्रेंड मधे आपण नक्की कसे जात आहोत हा कायम स्वरूपी बघण्याचा प्रश्न रहातो.

त्यासाठी कधी कधी डावीकडे झुकणार्‍या (डाव्या नाही) तर कधी कधी उजवीकडे झुकणार्‍या धोरणांचा अवलंब केला जातो. मात्र ते सवय लागल्यानंतरच्या काळात बदलणे अवघड जाते.

काही उदाहरणे:

  1. सोव्हीएट रशियात सर्वांना नॅचरल गॅस फुकट मिळायचा! अर्थात अ‍ॅट व्हॉट कॉस्ट हा एका वेगळ्य चर्चेचा मुद्दा आहे. पण जनतेला महीन्याला बिलं भरावी लागत नसत हे वास्तव होते. पुढे सोव्हीएट रशिया पडला, विभागला गेला. युक्रेन सरकारला ते शक्य होईना. मग करायचे काय? एका अर्थी तेच प्रश्न ऑलमोस्ट २५ वर्षांनी आजही अप्रत्यक्षपणे सतावत आहेत.
  2. भांडवलशाही अमेरीकेत: बेरोजगार व्यक्तींना हप्ता मिळणे आणि रोजच्या खाण्यासाठी फुडस्टँप मिळणे चालते. परीणामी अनेक बेरोजगार व्यक्ती आपली बुडं हलवत नाहीत अशी रीपब्लीकन्स ची तक्रार असते. त्यात काही अंशी तथ्य देखील असते. पण त्याच बरोबर हे देखील वास्तव आहे की ह्या श्रीमंत देशातील अनेक ठिकाणी शाळेत जाणार्‍या मुलांना ( ज्यांच्या आईवडीलांना रोजगार मिळतो) एकावेळचे खाणे हे शाळेत मिळणार्‍या सबसिडाईझ्ड रेट वर खावे लागते आणि तेव्हढ्याच खाण्यावर वाढत्या वयात दिवसरात्र रहावे लागते. (यात अतिशयोक्ती दुर्दैवाने अजिबात नाही).

ही दोन टोके आहेत. साम्यवादाने/समाजवादाने गरीबी गेलेली नाही. भांडवलवादाने नक्कीच संपत्ती वाटली गेली पण त्याचबरोबर विषमता पण वाढू लागली आहे. भारतात दिसणारी विषमता ही भयावह होत चालली आहे असे कधी कधी वाटते. पण त्याचे उत्तर हे नक्षलवादी अथवा अगदी बंगाली निष्क्रीय साम्यवाद असू शकत नाही, असे मला वाटते.

या सर्व मनातल्या खळबळीतून विचारलेले प्रश्न होते - going forward.. भारत आज तरूण आहे. जर तरूणांनी आउट ऑफ बॉक्स विचार केला नाही तर खरे नाही असे वाटते. भारतापुरते... आज जर मध्यममार्गी समाजवाद हवा असला तर तो नक्की आजच्या काळासाठी कसा हवा? आणि मध्यममार्गी भांडवलवाद हवा असला तर तो कस हवा हा प्रश्न आहे. का अजून कुठला मार्ग आहे जो आपण चोखाळलेलाच नाही?

विकास's picture

26 Mar 2014 - 9:07 pm | विकास

सरकारवर अवलंबून आणि स्वतःवर अवलंबून (अर्थात उद्योजकता) यातला फरक समजण्यासाठी खालील चित्रफित पाहीली नसल्यास अवश्य पहावीत:

पैसा's picture

30 Mar 2014 - 1:25 am | पैसा

सगळेच प्रतिसाद वाचनीय आहेत. राजकारण्यांमधे आज डावे उजवे असा फार फरक राहिला नाही. मात्र गरीब-श्रीमंत यातली दरी सतत वाढतच आहे. आपली प्रचंड लोकसंख्या, संपत्तीची अतिविषम वाटणी, भ्रष्टाचार इ गोष्टी पाहता अमेरिकन स्टाईलची पूर्ण खुली अर्थव्यवस्था आपल्याकडे यशस्वीपणे चालणार नाही. सत्तेत डावे येवोत किंवा उजवे, काही प्रमाणात सबसिडी ही चालू रहाणार, ठेवावी लागणार. एकेकाळी भारतीय बनावटीच्या वस्तू कमी दर्जाच्या असल्याने उद्योगांना सरकारी संरक्षण पुरवावे लागत होते. आता तशी परिस्थिती राहिली नाही. भारतीय लोकांनी अनेक मोठमोठ्या परदेशी कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत. तरीही औषधे, पेट्रोलियम अशा काही क्षेत्रात किंमतीवर सरकारचे नियंत्रण राहणे आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे असा एक मोठा वर्ग आहे की जो केवळ अशा नियंत्रित किंमती आणि सबसिड्या यांच्या मदतीने तग धरून आहे.

आपल्या देशात अफाट साधनसंपत्ती आहे, पण तिचा नियोजनपूर्वक व्यवस्थित उपयोग होत नाही. सरकारी योजना कागदोपत्री अतिशय उत्तम असतात पण त्या योग्य त्या गरजू लोकांपर्यंत पोचत नाहीत. भ्रष्टाचार आणि काळा पैसा कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना झाली पाहिजे. शेजारी देशांच्या कृपेने आपला संरक्षण खर्च हा नेहमी मोठाच रहाणार. त्यासाठीही पैसा नेहमी उपलब्ध करावा लागेलच.

लायसन्स राज आता शिल्लक राहिले तर आंतर्राष्ट्रीय स्पर्धेत मागे पडावे लागेल. जागतिकीकरणाच्या रेट्यात आता सर्वच देश सापडले आहेत. त्यात चीनला काही प्रमाणात बाजारीकरण करावे लागले आहे तर अमेरिकेला आर्थिक शिस्त आणावी लागत आहे. पूर्ण उजवी अमेरिका आणि पूर्ण डावा चीन हे दोघेही एका विचित्र परिस्थितीत सापडून आर्थिकदृष्ट्या एकमेकांवर अवलंबून झाले आहेत. हे सगळे पाहता भारताला मधला मार्ग पकडण्याशिवाय गत्यंतर नाही. भारतात रस्ते, शिक्षण, आरोग्य, संरक्षण, ऊर्जा, बँका, अन्नधान्य, वितरण या सर्व क्षेत्रात सरकारचे नियंत्रण आवश्यक आहे. दुर्दैवाने त्याचे अंशतः सुद्धा खाजगीकरण केले तर दर्जाचा विचार न करता फक्त नफेखोरीचाच विचार केला जातो. आपले उद्योगधंदे आणि उद्योगपती अजून स्वतःच्या आर्थिक हितापलिकडे काहीही पहायला तयार नसतात. जबरदस्तीने असे खाजगीकरण झालेच तर नाहीरे वाला वर्ग आणखी चेपला जाऊन मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी आणि नक्षलवादाकडे वळू शकतो. हे सगळे टाळण्यासाठी डाव्यांना जरासे उजवे आणि उजव्यांना जरासे डावे व्हावेच लागेल!

क्लिंटन's picture

30 Mar 2014 - 10:09 am | क्लिंटन

आपले उद्योगधंदे आणि उद्योगपती अजून स्वतःच्या आर्थिक हितापलिकडे काहीही पहायला तयार नसतात.

That's the point. हा मानवी स्वभाव झाला.कोणतीही गोष्ट करताना त्यातून स्वत:ला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात फायदा झाला पाहिजे ही अपेक्षा ९९.९९% लोकांची असते.समाजाचे भले व्हावे म्हणून कोणतीही अपेक्षा न बाळगता काम करणारे लोक फार थोडे असतात हे समोर दिसतेच.अशी निस्वार्थी भावना हृदयातून आली तरच त्याचा उपयोग आहे.ही गोष्ट मारून मुटकून करायची नाही.तेव्हा नुसत्या तोंडदेखल्या समतेला काही अर्थ नाही.ती भावना हृदयापासून यायला हवी.आणि अशी भावना हृदयापासून येणारे लोक फार थोडे असतात.

एक उदाहरण म्हणून मागे फेसबुकवर साम्यवाद का यशस्वी होऊ शकत नाही याचे एक अत्यंत चपखल उदाहरण वाचले होते ते इथे देतो.एका वर्गात ४० विद्यार्थी असतात.पहिल्या परिक्षेत विद्यार्थ्यांना ४० पासून १०० पर्यंत मार्क मिळतात आणि सरासरी मार्क असतात ७०.तेव्हा सगळे विद्यार्थी आपल्याला सारखे म्हणून शिक्षक सगळ्यांना सरासरीइतके म्हणजे ७० मार्क देतात.यातून मुळात ७० पेक्षा जास्त मार्क मिळालेले विद्यार्थी नाखूष होतात तर ७० पेक्षा कमी मार्क मिळालेले विद्यार्थी खूष होतात.दुसऱ्या परिक्षेत विद्यार्थ्यांना मार्क मिळतात ३० ते ८० आणि सरासरी असते ५०. हे का होते? पूर्वी जास्त मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना वाटते की आपण जास्त अभ्यास का करावा?नाहीतरी शिक्षक आपले मार्क कमी करून ते इतरांनाच देणार आहेत.तर कमी मार्क मिळालेल्यांना वाटते की आपण तरी अभ्यास का करावा?नाहीतरी शिक्षक आपले मार्क वाढविणार आहेतच.परत शिक्षक सगळ्यांना सरासरीइतके ५० मार्क देतात.तिसऱ्या परिक्षेत सरासरी आणखी कमी होते आणि सगळेच विद्यार्थी नापास होतात.

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की आपल्याला काहीतरी मिळावे, आपल्याकडे इतरांपेक्षा वेगळे काहीतरी असावे असे वाटणे हा मानवी स्वभाव झाला.साम्यवादात या मानवी स्वभावाला अनुसरून नसलेली वर्तणूक अपेक्षित असते. वर दिलेल्या उदाहरणात आपण अभ्यास करूनही मार्क इतरांना मिळणार हे माहित असूनही तितकाच अभ्यास करावासा वाटणारे किती विद्यार्थी असतील?

अगदी कट्टर डाव्या विचारांमध्ये खाजगी मालमत्तेलाही विरोध असतो.सर्व काही समाजाच्याच मालकीचे असावे असे अजब तर्कट या विचारांमध्ये असते.आज माझ्या नावाने मुंबईत घर नाही म्हणून मला स्वत:ला (आणि माझ्यासारख्या अनेकांना) ते मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा करावासा वाटतो.का? कारण इतरांकडे जी गोष्ट आहे ती माझ्याकडे नाही ही बोचरी जाणीव कुठेतरी असते.रेसमध्ये मागे पडलेले मला आवडणार नाही.पण साम्यवादी व्यवस्थेत कुठेतरी ही बोचरी जाणीव होणे (हा मानवी स्वभाव आहे) या प्रकारालाच कृत्रिमपणे अटकाव केलेला असतो.आणि अशी कृत्रिम पध्दत यशस्वी होऊ शकत नाही.म्हणून ही व्यवस्था लष्कर आणि हुकुमशाहीच्या बळाचा वापर करूनच टिकवावी लागते.ते बळही जिथे अपुरे पडते तिथे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ही व्यवस्था कोसळते हे रशिया आणि पूर्व युरोपमध्ये आपण बघितले आहेच.

भारतात रस्ते, शिक्षण, आरोग्य, संरक्षण, ऊर्जा, बँका, अन्नधान्य, वितरण या सर्व क्षेत्रात सरकारचे नियंत्रण आवश्यक आहे.

आता मानवी स्वभावाची दुसरी बाजूही लिहितो.जर unbriddled freedom मिळाले तर सशक्त वर्गाकडून अशक्त वर्गावर अन्याय होणे आणि सशक्त वर्गाला तसा तो करावासा वाटणे हा पण मानवी स्वभावच झाला.तेव्हा मी उजव्या गटातला असलो तरी सरकार या यंत्रणेची गरज मला नक्कीच मान्य आहे.तरीही सरकारने कुठे आपले अस्तित्व दाखवावे?

१. ज्या industries मध्ये खाजगीकरण करणे एक तर अयोग्य आहे (संरक्षण,पोलिस)
२. ज्या industries मध्ये खाजगीकरण करण्यासाठी लागणारे बिझनेस मॉडेल बनू शकत नाही अशा industries मध्ये.उदाहरणार्थ प्राथमिक शिक्षण.यात फायदा मिळवायचा तर फी वाढविणे आले.तसे झाल्यास फी परवडत नाही म्हणून अनेकांना शिक्षणापासून वंचित ठेवणे आले.तेव्हा समाजाचे व्यापक हित म्हणून प्राथमिक शिक्षणात पूर्णपणे खाजगीकरण करणे योग्य नाही.
३. काही industries मध्ये त्या संस्थांना फायदा होतो त्यापेक्षा जास्त फायदा समाजाला होतो.याला अर्थशास्त्रात Positive externality म्हणतात.उदाहरणार्थ एखाद्या खाजगी कंपनीकडून रस्ता बांधून घेतला तर त्या कंपनीला त्या रस्त्यावरून मिळणाऱ्या टोलमधून उत्पन्न मिळेल.पण रस्ता बांधला म्हणून आजूबाजूच्या गावांचा तिथे जीवनावश्यक गोष्टी वेळेत पोहोचणे इत्यादी फायदा होईल.अशा परिस्थितीत अनेकदा संबंधित रस्त्याकडून मिळणारे उत्पन्न पाहिजे तितके (Return on equity: १६% किंवा अन्य काही) नसेल तर कंपन्या रस्ता बांधायला पुढे येणार नाहीत.तरीही समाजाला मिळणाऱ्या Positive Externalities चा फायदा लक्षात घेऊन सरकार त्या कंपन्यांना Viability Gap Funding करते आणि तसे करणे योग्यही आहे.
४. बॅंकिंग किंवा इतर अनेक उद्योगांमध्ये सरकार असावे असे मला तरी वाटत नाही.तरीही या सगळ्या उद्योगांमध्ये मानवी स्वभावातून कोणाची पिळवणूक होत नाही हे बघण्यासाठी सरकारी regulators असलेच पाहिजेत.उदाहरणार्थ टेलिकॉममध्ये Telecom Regulatory Authority of India आहे किंवा स्टॉक मार्केटमध्ये Securities and Exchange Board of India आहे (सहाराला सेबीने कसा चाप लावला आहे हे आपण बघतच आहोत) किंवा बॅंकिंगमध्ये RBI आहे. याचा अर्थ सरकारने सगळे उद्योग चालवावेत असे नक्कीच नाही.शक्य तिथे खाजगीकरण जरूर झालेच पाहिजे.पण लोकांची लुबाडणुक नको म्हणून असे सरकारी पण स्वायत्त regulators असलेच पाहिजेत.

शक्य तिथे खाजगीकरण झाले पाहिजे असे मी का म्हणतो?
१. एखादा उद्योग "समाजाच्या" मालकीचा आहे असे आपण म्हणतो तेव्हा "समाज" म्हणजे नक्की कोण? जर एखादा बिझनेस माझ्या मालकीचा आहे तर त्या उद्योगाच्या यशासाठी मी जीव तोडून काम करेन आणि इतरांकडून करवून घेईन.पण "समाजाच्या" मालकीच्या उद्योगात असे कोण करणार? अर्थात सरकारी कंपन्यांमध्ये कोणी कामे करत नाही असे मी नक्कीच म्हणत नाही.पण शेवटी ज्यावेळी "extra mile" जायची गोष्ट येते तेव्हा खाजगी कंपन्यांमध्ये "माझी कंपनी" म्हणून जीव तोडून काम करणारे लोक असतातच.पण आपली नोकरी सुरक्षित आहे आणि जास्त काम केले तरी तितक्या प्रमाणावर परतावा आपल्याला मिळणार नाही या दोन गोष्टी कुठेतरी सरकारी कंपन्यांना अडसर ठरतात असे माझे मत आहे.ते कितपत बरोबर आहे हे माहित नाही. याचे वर्णन करणारे एक चपखल वाक्य आहे--Everybody's business degenerates into nobody's business.

२. वर म्हटल्याप्रमाणे कुठल्याही परिस्थितीत लोकांची लुबाडणुक होऊ नये हे ठरवायची जबाबदारी कोणाची?तर ती सरकारची.कारण पोलिस सरकारच्या नियंत्रणात असतात.कायद्याची अंमलबजावणी करायचे mandate पण सरकारलाच असते.तेव्हा सरकारच उद्योग चालवणार (उदाहरणार्थ बॅंका), त्यात काही वरखाली झाले तर त्याचा सरकारच तपास करणार (सरकारी बॅंकांमध्ये गैरप्रकार करून कर्जे दिली जातातच) आणि परत सरकारच पुढील कारवाई करणार यात कुठेतरी conflict of interest आहे असे मला वाटते.समजा भविष्यात कुठल्या तरी सरकारी बॅंकेत मोठा घोटाळा झाला (तसे होतच असतात. अन्यथा सरकारला वरचेवर सरकारी बॅंकांमध्ये equity का टाकावी लागते? पण काही कारणाने त्यावर जास्त चर्चा होत नाही) तर त्याची जबाबदारी कोणाची? अर्थमंत्रालयाची म्हणजेच सरकारचीच.अशा परिस्थितीत सरकार त्या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी करेल का हा प्रश्न विचारायला नक्कीच स्कोप आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे बिझनेस करणारे, नियंत्रण ठेवणारे, तपास करणारे आणि अंमलबजावणी करणारे लोक एकच नकोत.त्यात conflict of interest आहे.

तेव्हा मला वाटते की जिथे शक्य होईल तिथे खाजगीकरण आणि सरकारी regulators चे अस्तित्व आणि आर्थिक मंदी आल्यास किनेशिअन इकॉनॉमिक्स प्रमाणे तेवढ्यापुरता हस्तक्षेप अशा स्वरूपाचे सरकारचे अस्तित्व उद्योगांमध्ये असावे. शेवटी It is not government's business to be in business. अगदी कट्टर डावे (किंवा थोडेही डावे) नकोतच पण त्याचबरोबर सरकारी हस्तक्षेप अजिबात नको असे म्हणणारे कट्टर उजवे (ऑस्ट्रियन इकॉनॉमिक्सवाले) पण नकोत.

पैसा's picture

30 Mar 2014 - 10:30 am | पैसा

साम्यवादाबद्दलचे मार्कांच्या सरासरीचे उदाहरण अतिशय चपखल आहे.

Everybody's business degenerates into nobody's business.
It is not government's business to be in business.

हेही खूप आवडले.
बँकांमधील conflict of interest बद्दल काही अंशी सहमत आहे. पण पुन्हा खाजगीकरणाबद्दल भीती वाटते ती अपरिपक्व अर्थव्यवस्थेचीच. म्हणजे असं की आज सरकारी बॅंकामधे सरकारला पैसे घालावे लागतात. पण उद्या समजा अशा स्केलची खाजगी बँक खाजगी उद्योगाच्या नाकर्तेपणामुळे बुडाली तर छोट्या ठेवीदारांचे हाल कुत्रे खाणार नाहीत. आणि दुर्दैवाने आपल्याकडे ती शक्यता भरपूर आहे. टाटा बिर्ला यांच्या बँका कार्यक्षमरीत्या चालवल्या जातील खर्‍या पण मल्ल्याने बँक काढली तर?

सरकारी बँकांचं दुखणं एन पी ए हे आहे. त्याचं नीट व्यवस्थापन केलं तर सरकारला पैसे गुंतवावे लागणार नाहीत. पण पुन्हा गाडी भ्रष्टाचारापाशीच येते. नवीन कर्जं देताना काय काय प्रकार होतात आणि रिस्क अ‍ॅनालिसिसची कशी काशी केली जाते हे खूप जवळून पाहिले आहे. :( तेच वरिष्ठ दर्जाच्या अधिकार्‍यांच्या नेमणुकी आणि बढत्यांबाबत.

सिस्टीम वाईट नाही. पण ती वापरणारी माणसे हा मोठा प्रॉब्लेम आहे.

क्लिंटन's picture

30 Mar 2014 - 10:43 am | क्लिंटन

पण उद्या समजा अशा स्केलची खाजगी बँक खाजगी उद्योगाच्या नाकर्तेपणामुळे बुडाली तर छोट्या ठेवीदारांचे हाल कुत्रे खाणार नाहीत.

जोपर्यंत रिझर्व्ह बँक हा कडक पर्यवेक्षक आहे तोपर्यंत या गोष्टीची फार भिती बाळगायला नको.आणि रिझर्व्ह बँकेने आपली भूमिका आतापर्यंत तरी उत्तमपणे वठवली आहे.

टाटा बिर्ला यांच्या बँका कार्यक्षमरीत्या चालवल्या जातील खर्‍या पण मल्ल्याने बँक काढली तर?

अर्थातच त्यामुळे रिझर्व्ह बँक मल्ल्याला बँकिंग लायसेन्स देणार नाही :)

सरकारी बँकांचं दुखणं एन पी ए हे आहे. त्याचं नीट व्यवस्थापन केलं तर सरकारला पैसे गुंतवावे लागणार नाहीत.

मागे लोकसत्तामध्ये गिरीश कुबेर यांच्या लेखात म्हटले होते की मोठ्या उद्योगांना कर्ज द्यावे म्हणून सरकारी बँकांच्या डायरेक्टर्सना थेट दिल्लीतून फोन जातात.यातील खरेखोटे काय ते माहित नाही पण अशी कर्जे बुडाली तर ती जबाबदारी सरकारचीच नाही का?मी म्हणतो की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट यातूनच येतो.आपल्याच चुकीची चौकशी सरकार कितपत नि:पक्षपातीपणे करेल?तसे करणारच नाही असे म्हणत नाही पण करेलच याची खात्री नक्कीच नाही.

मारकुटे's picture

30 Mar 2014 - 11:20 am | मारकुटे

>>> रिझर्व्ह बँक हा कडक पर्यवेक्षक आहे तोपर्यंत या गोष्टीची फार भिती बाळगायला नको.आणि रिझर्व्ह बँकेने आपली भूमिका आतापर्यंत तरी उत्तमपणे वठवली आहे.

अजिबात नाही. रिझर्व बँकेचे धोरण सहकारी बँकांना संपवणे आहे, जेणेकरुन मध्यमवर्गीय आणि गरीबांना केवळ खाजगी बँकांमधे काम करणार्‍या लोकांचे पगार पुरवावे किंवा सावकाराच्या तगाद्यापायी आत्महत्या करावी लागावी.

पैसा's picture

30 Mar 2014 - 12:15 pm | पैसा

रिझर्व्ह बँकेबद्दल शंका आहे. त्यांनी योग्यप्रकारे नियंत्रण केले असते तर सरकारी बँका इतक्या वारंवार संकटात सापडल्या नसत्या. आणि प्रचंड महागाई, चलनवाढ यावर त्यांचे उपाय अजिबात निरुपयोगी ठरले आहेत असंच दिसतं आहे.

मल्ल्याला बँकिंग लायसन्स मिळालं तरीही मला आश्चर्य वाटणार नाही!

क्लिंटन's picture

30 Mar 2014 - 2:54 pm | क्लिंटन

रिझर्व्ह बँकेबद्दल शंका आहे. त्यांनी योग्यप्रकारे नियंत्रण केले असते तर सरकारी बँका इतक्या वारंवार संकटात सापडल्या नसत्या.

रिझर्व्ह बँकेचे मॅन्डेट आहे की देशातील बँकिंग सिस्टिम स्थिर राहावी हे.रिझर्व्ह बँक प्रत्येक कर्जाचे प्रपोजल तपासायला जात नाही तर बँकेच्या कर्ज पोर्टफोलिओमध्ये काही कमीजास्त आढळल्यास रिझर्व्ह बँक कारवाई करू शकते. ही कारवाई कोणत्या स्वरूपाची असते?तर दंड लावणे, एकूण किती रक्कम कर्जाऊ द्यावी यावर नियंत्रण ठेवणे (हा आकडा एकूण इक्विटीच्या किती पट रक्कम कर्जाऊ द्यावी यावर मर्यादा असणे असा असतो म्हणजेच जर बँकेने आणखी इक्विटी उभी केली तर बँक किती रक्कम कर्जाऊ देऊ शकेल हा आकडाही वाढेल) आणि अगदीच परिस्थिती हाताबाहेर गेली तर बँकेचे संचालक मंडळाच्या प्रत्येक निर्णयावर अंकुश ठेवणे किंवा बँकिंग लायसेन्स रद्द करणे (हा प्रकार माझ्या माहितीप्रमाणे रिझर्व्ह बँकेला अजून तरी करावा लागलेला नाही.चू.भू.दे.घे) अशा स्वरूपाची कारवाई रिझर्व्ह बँक करू शकते.पण जर एखादी बँक पाहिजे तितकी इक्विटी उभी करत असेल तर अशा बँकेवर किती प्रमाणावर कारवाई रिझर्व्ह बँक करू शकेल याविषयी मी साशंक आहे.कारण जेवढी जास्त इक्विटी बँक उभी करेल तितक्या प्रमाणात ठेवीदार आणि एकूणच बँकिंग सिस्टीम जास्त स्थिर होईल. सरकारी बँकांच्या बाबतीत नेमके हेच घडत आहे.सरकारने बँकिंग सिस्टीममध्ये एकूण किती इक्विटी टाकली आहे याचे आकडे नंतर सविस्तर लिहिनच.पण हे पैसे सरकारचे म्हणजेच तुमच्याआमच्यासारख्या सामान्यांचे असतात.

प्रचंड महागाई, चलनवाढ यावर त्यांचे उपाय अजिबात निरुपयोगी ठरले आहेत असंच दिसतं आहे.

याचे कारण आहे. रिझर्व्ह बँक केवळ मोनेटरी पॉलिसी बघते.केवळ तेवढेच पुरेसे नाही.फिस्कल पॉलिसी सरकारच्या नियंत्रणात असतात.देशात अधिकाधिक पायाभूत सुविधांचा विकास व्हावा, अधिकाधिक गुंतवणुक व्हावी यासाठीचे निर्णय घ्यायचा अधिकार सरकारचा असतो. रिझर्व्ह बँक व्याजाचे दर वाढविण्याशिवाय काही करू शकत नाही पण इतर गोष्टी सरकारच्या नियंत्रणात आहेत ना. सुब्बारावांनी २०१० ते २०१३ या काळात १२-१४ वेळा व्याजाचे दर वाढविले.त्याबद्दल अनेक लोक त्यांच्यावर टिका करतात.अगदी अर्थमंत्री चिदंबरम यांनीही त्यांच्यावर टिका केली आहे.पण सुब्बारावांच्या दृष्टीने विचार केला तर ते दुसरे काय करू शकणार होते? शेवटी रथाचे एकच चाक ते सांभाळत होते.दुसरे सरकारच्या नियंत्रणात होते :(

मल्ल्याला बँकिंग लायसन्स मिळालं तरीही मला आश्चर्य वाटणार नाही!

राजनसाहेब रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत तोपर्यंत तरी असे व्हायची शक्यता नाही :) आणि तसेही ज्या २६ उद्योगांनी मुळात बँकिंग लायसेन्ससाठी अर्ज केला होता त्यापैकी सगळे उद्योग कुठच्या ना कुठच्या स्वरूपात फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्येच आहेत. आणि त्यात आय.डी.एफ.सी, आय.एफ.सी.आय, रेलिगेअर, टाटा, रिलायन्स कॅपिटल इत्यादींचा समावेश आहे. मल्ल्यासारखे शॉडी नाव त्यात नाही :)

क्लिंटन's picture

3 Apr 2014 - 10:36 am | क्लिंटन

मल्ल्याला बँकिंग लायसन्स मिळालं तरीही मला आश्चर्य वाटणार नाही!

कालच रिझर्व्ह बँकेने आय.डी.एफ.सी आणि बंधन फायनान्स यांना बँकिंग लायसेन्स दिले आहे. आय.डी.एफ.सी ही पायाभूत सुविधांसाठी फायनान्स करणारी संस्था त्या क्षेत्रात अनेक वर्षांपासून आहे. बंधन फायनान्सविषयी मला तरी काहीही माहित नाही. निदान पहिल्या राऊंडमध्ये राजन साहेबांनी रिलायन्स कॅपिटल, आदित्य बिर्ला फायनान्स यांना लायसेन्स दिलेले नाही. (टाटांनी आपला अर्ज आधीच मागे घेतला होता).मला स्वतःला वाटले होते की निदान आदित्य बिर्ला ग्रुप आणि रिलायन्स कॅपिटल यांना तरी फायनान्समधील प्रदिर्घ ट्रॅक रेकॉर्ड आणि ग्रुपचे नाव यावरून नक्कीच लायसेन्स मिळेल. तसे अजून तरी झालेले नाही. नवी लायसेन्स देताना राजन साहेब ताक सुध्दा फुंकून पित आहेत असे आताचे चित्र दिसत आहे हे एका अर्थी चांगलेच आहे.

आय.सी.आय.सी.आय लिमिटेड या पायाभूत सुविधांसाठी फायनान्स करणार्‍या संस्थेला आणि एच.डी.एफ.सी लिमिटेड या गृहकर्जे देणार्‍या संस्थेला १९९३-९४ मध्ये बॅंकिंग लायसेन्स मिळाली. त्यातूनच आय.सी.आय.सी.आय आणि एच.डी.एफ.सी या देशातील सर्वात मोठ्या खाजगी बॅंका उदयाला आल्या. अजून १५-२० वर्षांनी आय.डी.एफ.सी बँक तितकी पुढे जाईल का हे काळच सांगेल. :)

पैसा's picture

3 Apr 2014 - 11:48 am | पैसा

माहितीसाठी धन्यवाद! आय डी एफ सी बद्दल काळ ठरवील! बंधनबद्दल पुढीलप्रमाणे माहिती मिळाली. बांगला देशातील ग्रामीण बँकेच्या मायक्रो फायनान्स मॉडेलवरून ते काम करत आहेत असे दिसते.
http://www.business-standard.com/article/finance/bandhan-financial-servi...

विकास's picture

3 Apr 2014 - 4:48 pm | विकास

हे सर्व प्रतिसाद मला दिसले नव्हते! जागा लवकर उत्तर देतो... धन्यवाद!

मारकुटे's picture

7 Apr 2014 - 1:22 pm | मारकुटे

मिळाली का उत्तरे?

विजुभाऊ's picture

3 Apr 2014 - 4:56 pm | विजुभाऊ

मुक्तार्थव्यवस्थेने अर्थव्यवस्थेची फळे ही चार मेट्रोशहरे सोडल्यास इतरत्र पण पसरू लागली. तमाम प्रोफेशनल्स स्वतःची गावे, राज्ये सोडून इतर राज्यांमधे जाऊ लागले. हळूहळू परप्रांतियांना जवळ करणे (कॉस्मोपॉलीटन) हे सर्वत्र वाढू लागले आहे. (अर्थात ही नुसती सुरवात आहे). कुठेतरी नॅशनल ईंटीग्रेशनला ह्या खाजगीकरणामुळे अप्रत्यक्ष फायदा झाला

.
हे म्हणणे हे मात्र मला दिवास्वप्न वाटते. बीहार उ.प्र. मधली मंडळी नेहमीच कुठेही जायला तयार असतात. कारण त्यांच्या राज्यात त्यांचे हाल कुत्रे देखील खात नाही.
ज्यादिवशी लखनौ पटना विधानसभांत एखादा वीर द्राविडी भाषेत शपथ घेईल तो दिन खरा नॅशनल इंटीग्रेशन दिन असेल. "नॅशनल इंटीग्रेशन" म्हणजे फक्त हिंदीकरण अशाच अर्थाने वापरला जाणारा एक शुगर कोटेड शब्द आहे.

सिद्धेश सुभाश महाजन's picture

8 Apr 2014 - 9:26 pm | सिद्धेश सुभाश महाजन

छान चर्चा.

अहिरावण's picture

17 May 2024 - 7:25 pm | अहिरावण

काय ठरलं मग?