मी छंद म्हणून लघुकथा लिहितो. यातील काही वेगवेगळ्या मासिकांमधून वेळोवेळी प्रसिद्धही झाल्या आहेत. या कथांचे पुस्तक प्रकाशित करण्याची माझी इच्छा आहे. परंतू वेगवेगळ्या लोकांचे मराठी प्रकाशकांबद्दलचे अनुभव ऐकून प्रकाशकांचे दरवाजे ठोठावण्याची माझी इच्छाही नाही आणि माझ्याकडे तेवढा वेळही नाही. दुसरं म्हणजे मी कुणी प्रस्थापित लेखक नाही किंवा माझं पुस्तक कितपत खपेल याची आज काहीच खात्री नाही. त्यामुळे प्रकाशकाच्या दॄष्टिनं ही व्यावसायिक जोखीम आहे. त्यामुळे प्रकाशक यात रस घेणार नाहीत हे सहाजिक आहे. म्हणूनच पुस्तकाचा येणारा उत्पादन खर्च (छपाई वगैरे) उचलण्याची माझी तयारी आहे, म्हणजेच ही जोखीम मी घेण्यास तयार आहे. परंतू याबरोबरच पुस्तकाचं marketing आणि distribution, व्यावसायिक प्रकाशकाच्या मदती शिवाय जवळ जवळ अशक्य आहे. त्यामुळे पुस्तकाचं उत्पादन तुम्ही तुमचं तुम्ही केलंत तरीही पुस्तक दुकानांमधून उपलब्ध करुन देण्यासाठी किंवा वर्तमानपत्रांमधून त्याचं परिक्षण आणवण्यासाठी वगैरे, प्रकाशकांचे पाय पकडण्याशिवाय पर्याय नाही असे दिसते. माझ्या मित्रमंडळींनी दिलेल्या सल्ल्यानुसार प्रकाशक मंडळी हा वर्ग काही फार विश्वास ठेवण्याच्या लायकीचा असतोच असं नाही.
अर्थात सर्वच प्रकाशक असे असतील असं मी म्हणत नाही पण कोण चांगला आणि कोण वाईट हे कसं ठरवणार? हात पोळल्यावरच (किंवा न पोळल्यावर) कळेल. त्यामुळे कुणाला याबाबतीत काही अनुभव असल्यास किंवा कुणी काही सल्ला देऊ शकल्यास मी आभारी होईन.
प्रतिक्रिया
1 Oct 2008 - 5:21 pm | आनंदयात्री
उदय सप्रे म्हणुन आमचे एक मित्र आहेत मिपावर त्यांना विचारा. त्यांना याबाबतीत अनुभव आहे.
6 Oct 2008 - 12:45 pm | इनोबा म्हणे
सहमत आहे.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
3 Oct 2008 - 7:02 am | गणा मास्तर
http://www.granthayan.com/marathi/services.aspx
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
6 Oct 2008 - 12:39 pm | बी टी गॉडवीट
ग्रंथायनची वेबसाईट बघितली. ही माहिती उपयुक्त आहे. आपल्या मदतीकरता धन्यवाद.
6 Oct 2008 - 5:03 pm | विसोबा खेचर
मी छंद म्हणून लघुकथा लिहितो. यातील काही वेगवेगळ्या मासिकांमधून वेळोवेळी प्रसिद्धही झाल्या आहेत.
माझा सल्ला - तूर्तास तरी असेच काही मासिकात वगैरे लिहीत रहावे.
ते लेखन वाचून प्रकाशकच आपल्या दाराशी गोंडा घोळवत आला पाहिजे या मताचा मी आहे...
नाय आला तर गेला उडत! आपण आपले स्वत:करता स्वान्तसुखाय लिहीत रहावे व दुनियेला फाट्यावर मारावे...!
तात्या.
7 Oct 2008 - 5:36 pm | बी टी गॉडवीट
तात्या
तुमचं म्हणणं अगदी शम्भर टक्के बरोबर आहे. आणि गेली साधारण पंधरा एक वर्षं मी अगदी तुम्ही म्हटल्याप्रमाणे स्वान्तसुखाय लिहित आलोय. यात दोन वेळेस तुम्ही म्हटल्याप्रमाणेच प्रकाशक दाराशी येऊन दोन पुस्तके प्रकाशितही झाली.
पण त्यानंतर आता मागच्या काही वर्षात कुणी ढुंकूनही बघत नाहीये!! (यावरुन खरं तर स्वतःचा वकूब ओळखून घेणं आवश्यक आहे, पण ते मनुष्य म्हटल्यावर जमत नाही!) आणि दुसरं अगदी मनापासून सांगायचं तर आता खिशात दोन पैशे खुळखुळायला लागल्यावर असली खुळं सुचायला लागलीयेत. त्यामुळे खरं तर या प्रस्तावाचा अर्थही तितकाच आणि मर्यादितच आहे.