घर खरेदी विषयक माहिती / सल्ला हवा आहे ......

jaydip.kulkarni's picture
jaydip.kulkarni in काथ्याकूट
13 Mar 2014 - 12:52 pm
गाभा: 

काही महिन्यापूर्वी आम्ही पुण्यात फ्ल्याट बुक केला आहे, सदर ची वस्तू धायरी येथे आहे , सदर ची वास्तू बुक करण्यापूर्वी जागेविषयी आवश्यक ती माहिती घेतली होती तसेच बिल्डर खात्रीलायक आहे याची देखील शहानिशा केली होती. बिल्डिंग पूर्ण बांधून तयार आहे तसेच आतल्या सोयी देखील २ महिन्यापूर्वी जवळपास पूर्ण झाल्या आहेत तरी हि बिल्डर ताबा देण्यासाठी थांबायला सांगत आहे ....ह्या साठी completion certificate चे करान तो पुढे करत आहे.

हे certificate कोण issue करते तसेच असे ताबा मिळवण्या साठी हे कितपत आवश्यक आहे, बिल्डर च्या सांगण्याप्रमाणे certificate मिळायच्या आधी जर ताबा दिला तर ठराविक रक्कम दंड स्वरुपात भरावी लागते ....ह्यात कितपत तथ्य आहे . हे विचारण्याचे कारण म्हणजे त्याच सोसायटी मध्ये माझ्या शेजारचे लोक राहायला आले आहेत पण आम्हा काही जणांना certificate चे कारण दिले जात आहे .
completion certificate चे स्टेटस कुठे ऑन लाईन चेक करता येते का ?

२) ह्याच घरासाठी बँके कडून कर्ज घेतले आहे, बँक कर्मचारी आता Title deed of declaration रजिस्टर करायला सांगत आहेत. काही लोकांच्या मते हे आवश्यक नसते. बँक स्वतःच्या फायद्यासाठी हे करायला लावते , जर हे रजिस्टर केले नाही किंवा करण्यास उशीर झाला तर काय परिणाम होवू शकतात. जर उशिरा रजिस्टर करायचे असेल तर काय करावे लागते

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

13 Mar 2014 - 12:56 pm | प्रसाद गोडबोले

बिल्डर काहीतरी खरेदीपत्र करा त्यासाठी ४% व्हअ‍ॅट भरा असे म्हणतोय . बॅन्केचे लोन काढायच्या वेळेस केले होते ते म्हणे सेल डीड , ते आणि हे वेगळे म्हणे !

हा नक्की काय घोळ आहे कोणी सांगेल का ?

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2014 - 1:18 pm | पिलीयन रायडर

completion certificate बद्दल मी सांगु शकते..

हो, हे certificate आवश्यक आहे.. पण अशा अनेक सोसायटीज आहेत जिथ completion certificate नसुनही लोक अनेक वर्ष रहात आहेत.. गुगलुन पहा..समजा एकाहुन जास्त बिल्डींग असतील तर पार्शिअल completion certificate मिळु शकते बहुदा. त्यामुळे असेल कदाचित..

तुमच्या केस मध्ये बिल्डरचे काही चुक नाही.. तो कायदेशीररित्या योग्य तेच बोलत आहे. आमच्याही बिल्डरने ह्या साठीच १-२ महिने उशीरा पझेशन दिले.. पण तुमच्या केस मध्ये बाकीचे लोक रहात आहेत आणि तुम्ही मात्र नाही हे कसे ते कळत नाही.. बिल्डरला विचारले का की असे का? काय म्हणाला तो?

काही बेंका सुद्धा completion certificate शिवाय शेवटची disbursement देत नाहीत.

ऑन्लाईन काहीही माहिती मिळणार नाही तुम्हाला. खरं तर ह्यात बिल्डरच फार साटं लोटं असतं.. अनेकदा तर म्हणे फक्त फोटोज पाहुन हे सर्टिफिकेट देतात.

बिल्डरचा पैसा अडकलेला असतो, त्यामुळे पझेशन रोखण्यात त्याचा काही स्वार्थ असेल असं वाटत नाही.

पझेशनच्या आधी घरात १० वेळा फिरुन एक एक फरशी, नळ, प्लंबिंग, इलेक्टिकल कनेक्शन्स चेक करुन घ्या. सगळे पैसे क्लिअर करु नका. थोडेसे पैसे बाकी ठेवा. म्हणजे काही प्रॉब्लेम निघाला तर बिल्डरचा गळा धरता येतो. सगळे पैसे एकदा दिले की मग बिल्डर तुम्हाला अजिबात सापडणार नाही...

बिल्डरला शेजार्यांच्या ताब्या विषयी विचारले तेव्हा म्हणाला कि त्या साठी दंड भरला गेला आहे (बिल्डर ने स्वतः) . ग्राहकासाठी ७५००० हजाराचा दंड भरणारा बिल्डर मी पहिल्यांदा पहिला :) .
पण हे खरे वाटत नाही, म्हणून शोधतोय completion certificate चे काय झाले , कोण issue करते , त्यासाठी काही ऑन लाईन सोय आहे का हे पाहत होतो .
व्यंकटेश बिल्डकौन असे ह्या बिल्डर चे नाव आहे .....

कवितानागेश's picture

13 Mar 2014 - 10:44 pm | कवितानागेश

CC सिडको किंवा महापालिका इश्यु करते. त्यानंतर OC ocupation cert. पण असतं. सोसायटी फॉर्म करताना ही कागदपत्रे आवश्यक असतात. आणि ती बिल्डरनीच पूर्ण करणं आवश्यक आहे. एखाद्या वकीलाशी बोलून घ्या.

मैत्र's picture

14 Mar 2014 - 2:58 pm | मैत्र

विश्वासू बँक असेल तर तिथे चौकशी करा

कंप्लीशन महानगर पालिका देते. त्यानंतरच पझेशन लेटर देता येतं
लोन देणारी बँक जर व्यवस्थित असेल उदा. एच डी एफ सी (बँक नव्हे गृह कर्ज संस्था)
तर ते या गोष्टी नीट तपासतात. त्यांच्या कडून खात्री करून घ्या.