साहित्यः
३-४ लहान कारली (व्यवस्थीत सोलाण्याने साल खरवडून घेणे)
२-३ चमचे खरवडलेले कारल्याचे साल / खडबडीत भाग (आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
१ कांदा उभा चिरलेला
२-३ लसूण पाकळ्या + पेरभर आले चिरुन
२ हिरव्या मिरच्या चिरलेल्या (आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
थोडीशी कोथींबीर
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून अनारदाना पावडर (आमचूर पावडर किंवा चिंचेचे बुटुक ही वापरु शकता)
१ टीस्पून पंजाबी गरम-मसाला (रोजच्या वापरातला मसाला ही चालेल)
मीठ चवीप्रमाणे
पाकृ:
कारल्यांना मधोमध चीर देऊन आतला बियांचा भाग काढून टाकावा. (बिया कोवळ्या असतील तर त्या सारणासाठी घेऊ शकता)
कारल्यांना मीठाच्या पाण्यात १५-२० मिनिटे भिजवून ठेवावे, तसेच खरवडलेल्या भागाला ही थोडे मीठ चोळून ठेवावे.
१५-२० मिनिटांनी मीठाच्या पाण्यातले कारले स्वच्छ गार पाण्याने धुवून, किचन टिश्युने टिपून घ्यावे.
खरवडलेल्या भागाला ही स्वच्छ धुवून , चाळणीत निथळत ठेवावे.
मिक्सरच्या भांड्यात कांदा, हिरवी मिरची, आले, लसूण, कोथींबीर व अनारदाना पावडर (येथे चिंच वापरत असाल तर ती घ्यावी) एकत्र करुन भरडसर वाटून घ्यावे.
पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून त्यात हे वाटण घालून परतून घेणे.
त्यात हळद, पंजाबी गरम-मसाला व मीठ घालून कोरडे होईपर्यंत परतावे.
सारण गार होऊ द्यावे.
आता कारल्यच्या कापलेल्या भागात तयार सारण नीट भरावे व कारले दोर्याने गुंडाळून घट्ट बंद करावे.
पॅनमध्ये थोडे जास्तं तेल गरम करुन सर्व कारली टाकावीत व मंद आचेवर परतावी.
मधे एकदा झाकून वाफ काढा व झाकण काढून पुन्हा परतत रहा.
कारली बर्यापैकी शिजली की ती एका प्लेट्मधे काढावी व त्याच पॅनमध्ये थोडा उभा चिरलेला कांदा परतावा.
कांदा जरासा ब्राऊन होऊ लागला की त्यात कारली घालून खमंग परतावी. (कांद्याची स्टेप ऑप्शनल आहे)
सर्व्ह करतेवेळी कारल्याचा दोरा सोडवून सर्व्ह करावीत.
मग बघताय काय... या मस्तं आबंट-वरण भात आणी ही भरली कारली जेवायला, आहे की नाही फक्कड बेत :)
नोटः
ही कारली तुम्ही भाकरी, चपाती, आमटी-भात कशाहीबरोबर सर्व्ह करु शकता.
प्रवासासाठी घेऊन जायची असल्यास कारल्यात भरण्यासाठी कोरड्या मसाल्यांचा वापर करावा.
लाल-तिखट, हळद, पंजाबी गरम-मसाला, आमचूर पावडर, बडीशेपपुड, धणे-जीरेपूड व मीठ एकत्र करावे.
तेलात कारल्याचा खडबडीत भाग परतणे त्यात वरील सर्व मसाले घालून परतणे व हे सारण भरून कारली शॅलो फ्राय करावी.
कोरडी असल्यामुळे साईड डिश म्हणून ही सर्व्ह करु शकता.
सारणाचे प्रमाण कारल्यांप्रमाणे बसवावे.
ही पाककृती मी आईकडून शिकले आणी आईने तिच्या शीख मैत्रीणीकडून :)
प्रतिक्रिया
7 Mar 2014 - 2:24 am | सुहास झेले
आहाहाहा.... काय जबरी पाककृती आणि सादरीकरण... पहिल्या फोटो बघतच राहिलो कितीतरी वेळ. आता कारली खावीच लागतील ;-) :)
7 Mar 2014 - 2:29 am | शिद
अगदी हेच आणि असेच म्हणतो... ज ब रा ट...!!!
13 Apr 2014 - 12:25 am | विजुभाऊ
सानिका.
भरवां करेला लखनौ ईश्टाईल...... ही बघा http://misalpav.com/node/16188
7 Mar 2014 - 3:53 am | मयुरा गुप्ते
कसलं सुंदर सादरीकरण्...आहाहा!
आंबट वरण्..ह्म्म..पॉईंट टु बी नोटेड.
-मयुरा.
7 Mar 2014 - 4:28 am | कंस
लाजवाब दिसताहेत कारली.
फोटो अप्रतीम !!!!
7 Mar 2014 - 7:59 am | कच्ची कैरी
उचलुन खावीशी वाटताय आहेत कारली ,मस्तच !
7 Mar 2014 - 8:42 am | मुक्त विहारि
खल्लास.....
7 Mar 2014 - 9:02 am | अजया
तों.पा.सु.......
7 Mar 2014 - 11:41 am | जेपी
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
7 Mar 2014 - 12:13 pm | झकासराव
कारल्याची भाजी बघुन तोंडाला पाणी सुटेल अस कधी वाटलं नव्हतं बॉ...
:)
7 Mar 2014 - 12:22 pm | सविता००१
सानू............. रात्रीच्या जेवणाचा बेत ठरला.
अप्रतिम.
7 Mar 2014 - 12:25 pm | मनिष
तों.पा.सु.
मला वाटतं स्वप्निलरावांनी अख्खी वडाची बागच पुजली असेल गेल्या जन्मी (श्रेयाव्हेरः वपु)! :-)
13 Mar 2014 - 5:44 pm | अविनाश पांढरकर
+१
@सानिकास्वप्निल : सुरेख पा.कृ. आणि सादरीकरण !!!
7 Mar 2014 - 12:28 pm | पिलीयन रायडर
अहाहाहाहाहा.......!!!!
7 Mar 2014 - 1:17 pm | Mrunalini
खुप सुंदर. मस्त दिसतायत कारली. आता ह्या वेळच्या भारतवारीत करुन बघायला पाहिजेत. इथे तर काय कारली मिळत नाही.
7 Mar 2014 - 2:06 pm | अत्रुप्त आत्मा
वाह व्वा... जबरीच.
7 Mar 2014 - 2:11 pm | पिंगू
जबरी.. कारली म्हणजे केव्हाही आणि कशासोबतही खाऊ शकतो..
7 Mar 2014 - 3:18 pm | प्रफुल्ल
फक्त आणि फक्त पहिल्या फोटुसाठी!! खरच सुन्दर प्रेझेंटेशन(मराठीत ??) खुप आवडलीत तुम्ही केलेली कारली :)
7 Mar 2014 - 3:28 pm | michmadhura
मस्त पाककृती. टीपिकल कारल्याच्या भाजीला मी बघत पण नाही, पण अशी करून बघायला हवीत आता.
7 Mar 2014 - 3:29 pm | मृत्युन्जय
प्रेझेंटेशन(मराठीत ??)
सजावट किंवा सादरीकरण हे शब्द योग्य ठरतील काय?
बाकी पाकृ आणि फोटो खल्ल्लास . कारले आवडणार्या काही मोजक्या लोकांपैकी असलेला एक :)
7 Mar 2014 - 4:09 pm | प्रमोद देर्देकर
आवडेश
झकास पा.कृ.
(आवडीने कारली खाणारा)
7 Mar 2014 - 4:29 pm | रेवती
कारल्याची भाजी आवडती असल्याने हा प्रकारही आवडेल. छान कृती आहे.
7 Mar 2014 - 6:12 pm | स्पंदना
का र ली.
मस्त ग! करुन पहाणार.
7 Mar 2014 - 8:55 pm | राघवेंद्र
सुरेख पा.कृ. आणि सादरीकरण !!!
7 Mar 2014 - 10:04 pm | पैसा
भन्नाट पाकृ आणि फोटो!
10 Mar 2014 - 10:32 am | साती
आजच केली ही भरली कारली.
भन्नाट झाली.
कारलं न खाणार्या लोकांनाही आवडली.
धन्यवाद!
10 Mar 2014 - 3:27 pm | सानिकास्वप्निल
अगदी खरयं माझे ही तेच झाली कारले आवडू लागले ते ह्याच पाकृमुळे :)
पुन्हा एकदा धन्यवाद.
12 Apr 2014 - 12:26 am | अनन्या वर्तक
सनिकदि भरली कारली ह्यांचे फोटो आवडले अगदी नेहमी प्रमाणे. कारले सुद्धा तुम्ही कित्ती सुंदरतेने सादर केले आहे. मी कधीच कारले खाल्ले नाही कडू असल्यामुळे ते कसे लागेल ते सुद्धा माहीत नाही.
12 Apr 2014 - 6:05 pm | शुचि
यु आर मिसिंग समथिंग. नक्की करून बघा, खाउन बघा.
@सानिका - खूपच छान पाकृ.
13 Apr 2014 - 9:00 am | मदनबाण
आहाहा... :)
9 May 2014 - 8:13 am | राघवेंद्र
आजच करुन बघितली. छान झाली. धन्यवाद !!!
25 May 2014 - 10:37 pm | चाणक्य
मी आज केली होती. छान झाली होती......असं बायको म्हणाली :-)
धन्यवाद सानिका सोप्या पाकृ बद्दल
28 May 2014 - 1:30 pm | प्रभाकर पेठकर
>>>> छान झाली होती......असं बायको म्हणाली.
बायकोचे हे कौतुक फार सिरियसली घेऊ नका. नवर्याला हरभर्याच्या झाडावर चढवून स्वयंपाकघरात कामाला लावण्यात ह्या बायका मोठ्या वाकबगार असतात. मलाही माझ्या बायकोने असेच हरभर्याच्या झाडावर चढविले आणि आजतागायत माझ्या पाठचे स्वयंपाकघर कांही सुटले नाही. ......... सावधान *sad*
29 May 2014 - 11:14 am | चाणक्य
.
2 Jun 2014 - 11:43 pm | सानिकास्वप्निल
धन्यवाद राघव८२ आणि चाणक्य :)