साहित्यः
४ वांगी, १ मोठा कांदा, १ छोटा बटाटा, तेल, मोहोरी, हिंग, हळद, केप्र गोडा मसाला, केप्र झटपट उसळ मसाला, तिखट, मीठ
कृती:
१) कांदा उभा चिरून घ्या. वांगी आणि बटाटाही उभट चिरा. (त्याचे ज्युलिअन्स करून घ्या.)
२) एका पसरट कढईमध्ये (किंवा पॅनमध्ये) ४-५ टबलस्पून तेल घ्या. मध्यम आचेवर तेल तापत ठेवा.
३) तेल गरम झाल्यावर त्यात हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करून घ्या.
४) मग त्यात कांदा टाकून चांगला परतून घ्या. मग त्यात वांगी आणि बटाट्याचे ज्युलिअन्स टाकून चांगले परतून घ्या.
५) गॅस मध्यम आचेवर किंवा त्यापेक्षा थोड्या कमीच आचेवर ठेवा. अधून मधून भाजी परता. भाजी करपणार नाही याची काळजी घ्या. पॅनवर झाकण ठेवू नका.
६) भाजी शिजत आली की त्यात चवीनुसार तिखट, मीठ, गोडा मसाला, उसळ मसाला घालून भाजी चांगली परतून घ्या. भाजी नीट शिजली की गॅस बंद करा. नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची मस्त वांग्याची भाजी तयार.
प्रतिक्रिया
26 Feb 2014 - 8:39 pm | मुक्त विहारि
झक्कास....
आमची फेवरीट भाजी म्हणजे, वांग्याची भाजी......
26 Feb 2014 - 8:46 pm | साती
चार वांग्यांना चार पाच टेबलस्पून तेल?
वांग्याचे काप पोहतील एवढ्या तेलात!
26 Feb 2014 - 9:26 pm | Pearl
बरोबर आहे तुमचं. तेल जास्त होईल.
वरील रेसिपीमध्ये ४-५ टीस्पून किंवा आपापल्या अंदाजानुसार तेल घालावे.
26 Feb 2014 - 10:03 pm | सस्नेह
नाही, ५ वांगी अन एक बटाटा, १ कांदा म्हणजे एवढं तेल हवंच. या भाजीला रस नसल्याने तेलाशिवाय वांबी शिजणार नाहीत.
26 Feb 2014 - 9:08 pm | वेल्लाभट
वांगं......... जीव की प्राण....... टायटल बघून क्षणार्धात धागा उघडला.
मस्त भाजी आहे.... वेगळी.... गुड!
27 Feb 2014 - 7:01 pm | सुहास झेले
यप्प... अगदी ह्येच बोलतो :)
26 Feb 2014 - 10:06 pm | सस्नेह
चटपटीत लागते ही भाजी. वेगळीच गोडी/
26 Feb 2014 - 10:33 pm | आत्मशून्य
वाचन खून साठवली च पाहिजे.
27 Feb 2014 - 3:42 am | रेवती
छान दिसतीये भाजी.
27 Feb 2014 - 7:45 am | कच्ची कैरी
साधी , सरळ आणि मस्त !
27 Feb 2014 - 4:23 pm | पिंगू
मस्त आणि चटपटीत..
27 Feb 2014 - 4:25 pm | अनन्न्या
खूपदा होतात, पण त्यात कांदा, मसाले नाही घालत! आता अशी करून पहायला पाहिजे.
27 Feb 2014 - 11:09 pm | आदूबाळ
हे जिंदगीत पहिल्यांदा वाचलं. ज्युलियन्स म्हणजे?
27 Feb 2014 - 11:38 pm | आयुर्हित
ज्युलियन्स म्हणजे बारीक फोडी/काप (जसे फ्रेंच फ्राईज मध्ये असतात तसे)म्हणायचे असेल त्यांना.
पण माझ्या मते ज्युलियन्स म्हणजे अगदी बारीक काप अगदी केसर असतो तसे.(हे आल्याचे करतात हे ऐकले आहे)
27 Feb 2014 - 11:51 pm | सानिकास्वप्निल
ज्युलियन्स म्हणजे पातळ उभे काप, चायनीज पदार्थ बनवण्यासाठी जसे गाजर, कोबी, भोपळी मिरची, आले पातळ उभे चिरतात त्यांना ज्युलियन्स म्हणतात.
28 Feb 2014 - 6:03 pm | आरोही
करून बघेन ...वांगी खूप आवडतात ...+)
28 Feb 2014 - 7:56 pm | इन्दुसुता
वेगळा प्रकार, करून बघायला हवा.