कारल्याच्या काचऱ्या

आरोही's picture
आरोही in पाककृती
24 Feb 2014 - 9:58 pm

आज मी अत्यंत साधी सोपी अशी कारल्याच्या भाजीची रेसिपी देत आहे ..हि करायला खूप साधी आहे ..बऱ्याच जणांना माहित हि असेल कदाचित ...

साहित्य : कारली ४,कांदा १ ,लाल तिखट १ चमचा ,हळद १ चमचा ,मीठ आवडीनुसार ,आमचूर पावडर अर्धा चमचा ,जीरा पावडर अर्धा चमचा ,तेल ३ चमचे .

कृती: सर्व प्रथम कारली धुऊन त्याच्या गोल गोल पातळ चकत्या करून त्याला मीठ लावून १ तास ठेवून द्या ..
आता कढाई मध्ये तेल तापत ठेवून द्या .
कारल्याला आता चांगले पाणी सुटले असेल ते पाणी हाताने पिळून काढून घ्या ..या मध्ये कारले कुस्करले जातील पण हरकत नाही चालतात तसे.
आता तापलेल्या तेलावर ते कारले टाका व बारीक gas वर शिजू द्या ,आपल्याला कारले कुरकुरीत करायचे आहेत त्यानुसार ते मध्ये मध्ये परता.
थोडे कुरकुरीत झाल्यावर त्यात कांदा उभा पातळ चिरून घाला ..

kaarli

आणि पुन्हा चांगले मंद आचेवर शिजू द्या ..
कारल्याचा रंग बदलल्यावर त्यात वर दिलेल्या प्रमाणात मिरची ,हळद किंचित मीठ ,आमचूर पावडर ,जीरा पावडर ,आणि अर्धा चमचा साखर घालून पाच मी. परतून घ्या ..
मस्त कुरकुरीत कारल्याच्या काचऱ्या तयार ... +)

bhaaji

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

24 Feb 2014 - 10:04 pm | मुक्त विहारि

छान

झक्कास

आमच्या कडे ८ ते १५ दिवसांतून एकदा तरी ही भाजी होतेच.

आरोही's picture

24 Feb 2014 - 10:16 pm | आरोही

मु वि काका

अगदी याच पद्धतीने करतात का??????

मुक्त विहारि's picture

24 Feb 2014 - 10:57 pm | मुक्त विहारि

आधी

कांदा आणि इतर साहित्य आणि मग कारली.

यम्मी ,मला खुप आवड्त कारलं , आम्ही नुसते कारल्याचे पातळ काप करुन ते क्रिस्पि तळुन त्यावर मिठ अन तिखट भुर्भुरुन खातो , जन्नत जन्नत !!

आरोही's picture

25 Feb 2014 - 2:01 pm | आरोही

पियुशा डीप फ्र्याय करण्यापेक्षा अशा कमी तेलात हि छान होतात करून बघ ....+)

सुहास झेले's picture

24 Feb 2014 - 10:09 pm | सुहास झेले

मला कारली आवडत नाही... पण फोटो बघून तोंडाला पाणी सुटले :)

स्पंदना's picture

25 Feb 2014 - 3:37 am | स्पंदना

कारली आवडत नाहीत?
मग तुम्ही मराठी नाहीत. :(
अहो कारल्यासारखी चवदार भाजी खायची म्हणजे नुसता स्वर्ग. बघा डेव्हलप करा चव.
यु आर मिसींग अ लॉट.

तुषार काळभोर's picture

25 Feb 2014 - 5:03 pm | तुषार काळभोर

स्वर्ग...............!!!!

भावना कल्लोळ's picture

25 Feb 2014 - 5:22 pm | भावना कल्लोळ

अपर्णे, मला बी कारले आवडत नाही ………

कवितानागेश's picture

25 Feb 2014 - 6:29 pm | कवितानागेश

मलापण नाही आवडत. मीपण मराठी नैय्ये. ;)
पण माझी एक युपीवाली मैत्रीण कधीकधी क्रिस्पी काप आणायची, खूप परतून नुस्ते मीठ लावलेले. ते छान लागयचे.

एकदा ये माझ्याकडे चिंच-गूळ घातलेले कार्ले खायला..
...पक्की 'मराठी' होऊन जाशील !

आरोही's picture

24 Feb 2014 - 10:16 pm | आरोही

+)

हा प्रकार आवडतो. आमच्याकडे आधी जिरं-मोहरीच्या फोडणीत कांदा नीट परतून मग कारली घालतात. आमचूर पावडर, जिरे पावडर ऑप्शनल असते.

पैसा's picture

24 Feb 2014 - 10:27 pm | पैसा

आणि वरून ओलं खोबरं.

लॉरी टांगटूंगकर's picture

24 Feb 2014 - 10:36 pm | लॉरी टांगटूंगकर

कालच खाल्ली! आवडीचा प्रकार आहे.

सानिकास्वप्निल's picture

25 Feb 2014 - 12:13 am | सानिकास्वप्निल

आम्ही कारल्याच्या काचर्‍यात कांदा घालत नाही. मोहरी + हिंग + जीरेच्या फोडणीत काचर्‍या कुरकुरीत परतून घेतो, वरुन हळ्द + लाल तिखट + धणेपूड, मीठ घालतो. आमटी- भात / वरण - भाताबरोबर तोंडीलावणे म्ह्णून चांगले लागते.

आता कांदा घालून बघेन :)

मधुरा देशपांडे's picture

26 Feb 2014 - 2:31 am | मधुरा देशपांडे

असेच म्हणते. मी पण कांदा घालत नाही आणि थोडा तीळकुट घालते.
आता कधीतरी या पद्धतीने पण करून बघेन. फोटू मस्त दिसतोय.

कंजूस's picture

25 Feb 2014 - 2:59 am | कंजूस

छान आहे! आवडतात कारली .

आमच्याकडे दोन प्रकारे करतात .
१)कारल्याचे काप

वांग्याच्या कापासारखेच करायचे .वांग्याऐवजी कारल्याच्या चकत्या सरळ (मिठाचे पाण्यात पिळून वगैरे
सिक्युरिटी चेकिंग न करता
तवा बोर्डींग पास द्यायचा )
तव्यावर तेल टाकून परतायच्या
"सुरमई सारख्या लागतात"अशी
आमच्या मासे खाणाऱ्या मित्राची कॉमेंट .

२)भाजी

साहित्य

दोन कारल्याच्या चकत्या
चारपाच हिरवे टमाटे चिरून
लसूण चटणी तीन मोठे चमचे
तेल

तेलावर फक्त लसूण चटणी परता
टमाटे चकत्या मऊ होईपर्यँत परता
कारली (सरळ बोर्डिंग पास)टाका आणि शिजवा
थोडे तिखट मीठ टाका .

पाणी अजिबात टाकायचे नाही .
तेल लसूण आणि टमाट्यांनी
कडूपणा राहात /येत नाही .
टमाटे मात्र खरोखर हिरवे
कच्चे पाहिजेत .पिकायला आलेले वापरले तर भाजी फेल .

कारल्याचा वापर भारतात
सर्वठिकाणी होतो .
जपानमध्येही खातात .

कारली डायबेटिसवाले खातात
शिवाय ती "श्रृंगारपुरे" म्हणूनही वापरतात .खरेखोटे
माहीत नाही .थोडे विषयांतर
झाले .

स्पंदना's picture

25 Feb 2014 - 3:39 am | स्पंदना

या काचर्‍या अश्या भाकरीत दुमडायच्या अन चावायला सुरु करायच. आहाहा! स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच.

आरोही's picture

25 Feb 2014 - 2:02 pm | आरोही

खरच अगदी बरोबर ....+)

कच्ची कैरी's picture

25 Feb 2014 - 9:23 am | कच्ची कैरी

माझी आजी मस्त बनवायची ह्या काचर्‍या ,आजीची आठवण आली .

आनन्दिता's picture

25 Feb 2014 - 9:31 am | आनन्दिता

आत्ताच केली.. जाम भारी झाली होती...

बटाट्याच्या काचर्या कशा करतात?

आरोही's picture

25 Feb 2014 - 2:05 pm | आरोही

आनन्दिता , बटाट्यांच्या काचऱ्या कधी केल्या नाहीयेत मी पण अशीच पद्धत असेल कदाचित फक्त मीठ लावून पाणी काढण्याची काही गरज नाही असे वाटते ..बाकी प्रोसेस सेम ...कुणाला माहित असतील तर सांगाना बटाट्यांच्या काचऱ्या बद्दल ..कशा करतात ते ????

सानिकास्वप्निल's picture

25 Feb 2014 - 4:36 pm | सानिकास्वप्निल

बटाट्यांच्या काचऱ्या करुन पाण्यात घालून ठेवाव्यात. नंतर पाणी पुर्ण निथळून घ्यावे. तेलात मोहरी +जीरे+ हिंग + कढीपत्त्याची फोडणी करावी, त्यात चिरलेला लसूण घालून परतणे. बटाट्यांच्या काचऱ्या , हळद, लाल तिखट, धणे-जीरेपूड, थोडा गरम-मसाला व मीठ घालून परतणे. बटाटे शिजल्यावर वरून थोडी साखर, कोथींबीर घालावी. आवडत असल्यास वरून थोडे सुके खोबरे पेरावे.

कांदा घातला तर भाजी थोडी ओलसर होते पण बदल म्हणून छान लागते.

अजया's picture

25 Feb 2014 - 9:55 am | अजया

आवडती भाजी. मस्तच पा.कृ. मिळाल्या! प्रत्येक पद्धतीने करुन पाहिल्या जाईल!

आरोही's picture

25 Feb 2014 - 2:08 pm | आरोही

खरच अजय ताई , मी पण नक्की वेगळ्या पद्धतीने करून बघेन ...आणि अजून एक चिंचेचा कोळ आणि कांद्याचा मसाला लावून पण करतात ती माहित आहे का कुणाला ?? कुणाला पाक कृती हवी असल्यास देईन मस्त लागते हा ती पण ...+)

>>कुणाला पाक कृती हवी असल्यास देईन मस्त लागते हा ती पण

कुणाला हवी म्हणून कशाला विचारता, जशी ही टाकलीत तशी ती पाकृ पण डकवा. फोटो मात्र विसरु नका. फोटोशिवायची पाकृ बाद धरतात इथे.

अनन्न्या's picture

25 Feb 2014 - 4:13 pm | अनन्न्या

मस्त!

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Feb 2014 - 4:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

कडू कारल्याच्या पदार्थावरच्या इतके गोड आणि चवदार प्रतिसाद ! मझा आ गया !! :)

इरसाल's picture

25 Feb 2014 - 5:25 pm | इरसाल

कडु कारले साखरेत घोळले, तुपात तळ्ले तरी ते क्रिस्पी ते क्रिस्पीच. उम्माम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म !

आवडती भाजी आहे. या भाजीचे जितके प्रकार असतील तितके आवडतात. भेदभाव नाही. ;)
तरीही पटकन केले जाणारे प्रकार म्हणून कांद्याच्या फोडणीत मिठाच्य पाण्यात उकडलेले काप, चिंच कोळ. गूळ, दाण्याचे कूट हा एक आणि मीठ लावून उकडलेल्या अख्ख्या कारल्यात मसाले, खोबरे, दा. कूट भरून तेलावर परतणे वगैरे! आता आणते कारली.

सस्नेह's picture

26 Feb 2014 - 2:23 pm | सस्नेह

काचर्‍या प्रकारात बटाटा पहिला अन कारले दुसरे.