साहित्य- ५-६ उकडलेले बटाटे,३-४ स्लाइस ब्रेड,
साधारण २.५ ते ३ वाट्या मटारदाणे,
साधारण पेरभर आलं ,२-३ लसूण पाकळ्या, २-३ हिरव्या मिरच्या ,
मीठ, तेल, रवा किवा ब्रेडक्रम्स
कृती-
आलं मिरच्या लसणीची पेस्ट करुन घ्यावी.
बटाटे उकडून सोलून घ्यावेत, नंतर ते कुस्करावेत.त्यात चवीनुसार मीठ,चमचाभर आलं मिरची लसणीची पेस्ट घालावी.ब्रेडचे स्लाइस पाण्यातून काढून नंतर दाबून पाणी काढून ते बटाट्यात मिसळावेत.मळून गोळा करुन घ्यावा.
चमचाभर तेलावर मटार वाफवून घ्यावेत, त्यात १.५ ते २ चमचे आलं मिरची लसणीचे वाटण घालावे, चवीनुसार मीठ घालावे व चांगली वाफ काढावी.
बटाट्याच्या गोळ्यातून लिंबाएवढा गोळा घेऊन खोलगट आकाराची पारी करावी.त्यात मटारचे सारण घालावे. पारी बंद करावी,चपटी करुन रवा किवा ब्रेडक्रम मध्ये घोळवावी. असे सर्व पॅटिस करावेत.
(बटाट्याचा गोळा किवा मटारचे सारण यातले एक काहीतरी उरलंच तर ते भाजीत घालता येते.)
तव्यावर तेल सोडावे व पॅटिस लावावेत. वरुनही तेल सोडावे.पॅटिस शॅलोफ्राय करावेत.
टोमॅटो केचप, चिंचगुळाची चटणी ह्यापैकी हवे त्या बरोबर गरम गरम सर्व्ह करावे.
ह्या साहित्यात १६/१७ पॅटिस होतील.
प्रतिक्रिया
23 Feb 2014 - 11:08 pm | सुहास झेले
जबरदस्त.. फोटोतून एक-एक उचलून घ्यावेसे वाटत आहेत :)
23 Feb 2014 - 11:21 pm | मधुरा देशपांडे
काय भारी दिसतोय फोटो. मस्तच.
23 Feb 2014 - 11:23 pm | पैसा
मस्त! मस्त!! मस्त!!!
23 Feb 2014 - 11:35 pm | आदूबाळ
क्या बात!
25 Feb 2014 - 11:14 am | पियुशा
वॉव !
23 Feb 2014 - 11:41 pm | अत्रुप्त आत्मा
:HAPPY:
24 Feb 2014 - 7:30 am | रेवती
पॅटिसांचा रंग छान आलाय. फोटू व कृती नेहमीप्रमाणेच छान!
24 Feb 2014 - 7:52 am | स्पंदना
आह! पाणी सुटल तोंडाला.
आज करतेच.
24 Feb 2014 - 8:30 am | कच्ची कैरी
झक्कास !!!
24 Feb 2014 - 8:35 am | मुक्त विहारि
झक्कास
24 Feb 2014 - 11:11 am | अजया
मस्त!
24 Feb 2014 - 12:21 pm | ज्ञानव
कणसाचे दाणे+ चीज चालतील का?
24 Feb 2014 - 12:51 pm | नितिनभालेराव
रवा दोन्ही साइड ला लावायचा का?
24 Feb 2014 - 2:51 pm | स्वाती दिनेश
रवा दोन्ही बाजूना लावायचा, रव्यात्/ब्रेड्क्रम मध्ये पॅटिस घोळवून घ्यायचे.
कॉर्न +चीजचे सारणही छान लागते.कॉर्न उकडून त्याला आलं मिरची लसणीचे वाटण माइल्ड लावायचे आणि चीजकिसून त्यात घालायचे. खूप छान लागतात ते ही पॅटिस..
24 Feb 2014 - 1:15 pm | विनटूविन
मधुमेहीना वर्ज्य
बटाट्याशिवाय करता येतील का?
24 Feb 2014 - 1:40 pm | मदनबाण
किती तो इमोशनल अत्याचार सहन करावा आम्ही ! ;)
एकदम आवडेश... :)
24 Feb 2014 - 2:33 pm | मनीषा
छान पा. कृ.
करून बघायला हवी .
24 Feb 2014 - 2:52 pm | सानिकास्वप्निल
मटारचे पॅटिस आवडले.
मस्तं
24 Feb 2014 - 6:46 pm | अनन्न्या
करून पाहते.
24 Feb 2014 - 10:00 pm | आरोही
मस्त आहेत हा पदार्थ
24 Feb 2014 - 10:15 pm | Mrunalini
मस्तच दिसतायत पॅटिस!!
25 Feb 2014 - 11:17 am | सविता००१
छानच लागतात हे पॅटिस. शिवाय मका-चीज चेही सारण अफाट मस्त लागते. तशा टिक्क्या/पॅटेस यांची पाकृ मागे दिपक-कुवेत ने दिली आहे. क्लासिक लागतात.