गाभा:
मित्रानो मला एक मदत हवी आहे.
तुम्हाला scythe कुठे मिळेल किंवा कुठे बनवून मिळतील याची काही माहिती आहे का ?
https://lh4.googleusercontent.com/-9qKODmP4ZFw/UwoECz1G9ZI/AAAAAAAACRc/q...
https://lh4.googleusercontent.com/-BDfeFz1Ay68/UwoEHjs_0aI/AAAAAAAACRg/t...
आपल्याकडे इंधनावर चालणारे गवत काढणी यंत्रे खूप आहेत. पण अशाप्रकारचे यंत्र ( scythe ) मी महाराष्ट्रात तर कुठेही पहिले नाही …
माझ्या एका मित्राला त्याच्या farmhouse च्या जागेत वाढलेले गवत बिन इंधनाचे यंत्र वापरून काढायचे आहे.
तेव्हा भारतात हे कुठे मिळेल वा पत्ता दिला तर बरे होइल. मला मिपावरील मित्रांकडून नक्कीच मदत मिळेल असे वाटते ।
गुगल search करून झाले आहे… पण काही उपयोग झाला नहि… सर्व भारताबाहेरील माहिती मिळत आहे .
तुम्ही अधिक माहिती खालील दुव्यावर पाहू शकता।
प्रतिक्रिया
23 Feb 2014 - 8:46 pm | जोशी 'ले'
दापोली किंवा राहुरी कृषी विद्यापिठाशी संपर्क साधुन पहा काहि मदत मिळते का
23 Feb 2014 - 9:19 pm | पैसा
कुठे मिळालं तर सांगा. मला पण पाहिजे आहे. मात्र त्याची ब्लेड्स बघून भीती वाटली. एखादं शस्त्र असावं असं वाटतंय.
23 Feb 2014 - 10:03 pm | आत्मशून्य
असले हत्यारवाला माणुस सैतानाच्या कसल्याशा दाराची वगैरे राखण करत असतो बघा हे घेउन. :)
23 Feb 2014 - 9:56 pm | शैलेन्द्र
अहो, स्थानिक लोहाराकडुन बनवून घ्या ना.. फार कठीण नाही वाटत..
24 Feb 2014 - 3:09 pm | पिंगू
नंदन, गवत कापणी साठी जो विळा मिळतो, त्यालाच काठीचे एक्स्टेंशन लावुन असा वापर सहज करता येईल..