डॉक्टर झाकीर नाईक …

सुहासदवन's picture
सुहासदवन in काथ्याकूट
22 Feb 2014 - 2:28 pm
गाभा: 

तु नळीवर बरेच विडीयो उपलब्ध असतात. असेच काही विडीयो पाहत असताना ह्या महाशयांचे काही समुपदेश प्रकारचे विडीयो पहाण्यात आले.

त्यातील काही विडीयो इथे डकवत आहे.
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=jmRV_ggeMFY
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=ibrdAl3T7oc
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=PRz6oNkOzec
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=uRnWZEUkFRQ

एवढ्या प्रचंड जनसमुदायाला आणि प्रश्न कर्त्याला एवढ्या सहजतेने हाताळताना पाहून आणि बऱ्याच वेळेला प्रश्न विचारणारी व्यक्ती ज्या सहजतेने मुस्लिम धर्मात प्रवेश करू इच्छिते ते पाहून थोडे भीतीयुक्त आश्चर्य वाटणे साहजिक आहे.

ह्या महाशयांविषयी आणि ते सांगत असलेल्या मुस्लिम धर्माबद्दल इथल्या चर्चेमधून जाणून घ्यायला आवडेल.

टीप. ह्या महाशयांची इतर धर्माबद्दल प्लस मुस्लिम धर्माबद्दल असणारी जाण मात्र दाद देण्याजोगी आहे.

प्रतिक्रिया

ह्या अनुषंगाने हिंदू धर्माबद्दल देखील चर्चा होऊ दे ….

संपत's picture

22 Feb 2014 - 2:51 pm | संपत

ही चर्चा वाचू शकता
http://www.misalpav.com/node/21720

आशु जोग's picture

24 Feb 2014 - 3:10 pm | आशु जोग
डँबिस००७'s picture

24 Feb 2014 - 4:34 pm | डँबिस००७

कुठल्या अनुषंगाने हिंदु धर्माची चर्चा अपेक्षित आहे ?

झाकिर नाईकच्या दृष्टीतुन बघितलेल्या की वोरिजिनल ?

बाकी तिथे उपस्थित असलेले लोक(व्हीडिओ मधिल)मुसलमान धर्मात जायला उतावीळ होते हे आपण
कसे काय मानले.

आशु जोग's picture

24 Feb 2014 - 4:38 pm | आशु जोग

तुमचं म्हणण काय हाय

कवितानागेश's picture

24 Feb 2014 - 4:42 pm | कवितानागेश

ह्या महाशयांची इतर धर्माबद्दल प्लस मुस्लिम धर्माबद्दल असणारी जाण मात्र दाद देण्याजोगी आहे.>>
नाही!!
हा माणूस पूर्ण खोटं बोलत असतो.

हो.. हिन्दु धर्माचे सामान्य ज्ञान असलेलाही या माणसाशी सहज वाद घालू शकतो.. पण एव्हढ्या जमावासमोर त्याच्या सोबत वाद घालताना काहीतरी मोहिनी पडत असावी..

आत्मशून्य's picture

24 Feb 2014 - 11:30 pm | आत्मशून्य

स्न्वादासाठी ?

काय अहे, त्याला मिपावर बोलवले तर धागा या वादापेक्षा गांधी- नत्थु, जातीयवादी, कंपूबाज, ब्रह्मण अब्राह्मण या दिशांकडे जाण्याची शक्यताच जास्त.

आत्मशून्य's picture

25 Feb 2014 - 2:21 pm | आत्मशून्य

तुम्हाला पाशवी शक्तिंची ताकत माहित नाही काय ? त्यांच्यापुढे तो किस झाड की पत्ती हय वो ...?

टवाळ कार्टा's picture

25 Feb 2014 - 3:35 pm | टवाळ कार्टा

=))

मंदार दिलीप जोशी's picture

25 Feb 2014 - 3:56 pm | मंदार दिलीप जोशी

अनुमोद्न

प्रसाद गोडबोले's picture

24 Feb 2014 - 11:20 pm | प्रसाद गोडबोले

वाद त्यांच्याशी घालावा जे "समजुन घेणे "च्या बौधिक पातळीला पोहचले आहेत ... इथे काय ह्यांची लेव्हल ? ह्यांच्याशी वादविवाद करु एकादे मत पटवुन दिले तर हे ऐकणार आहेत काय ? उलट तुमचाच मुडदा पाडतील ....

अहो जिथं बुध्दासारखण खणखणीत तर्कशास्त्र हिंदुंनी खोडुन काढलं ...तिथं हे किस खजुर की पत्ती ...

असो
बाकी
डार्विनला यडा मानणार्‍यांशी बोलणण्यात आपला अमुल्य वेळ वाया घालवु नये असा माझा तुम्हाला एक सल्ला आहे .
.
पटलं तर घ्या !!

अत्रुप्त आत्मा's picture

25 Feb 2014 - 11:14 am | अत्रुप्त आत्मा

आझम कँम्पसला या नाइकाला २/४वेळा ऐकलाय. वैचारिक दृष्ट्या लादेनपेक्षा डेंजर आहे हा. लोकांना मूलतत्ववादी असणे कसे योग्य आहे, हे ब्रेनवॉशिंग सगळ्या प्रकारच्या पावडर वापरून करण्यात तरबेज माणूस आहे हा. वास्तविक याला'च अतिरेकी म्हणून आत टाकायला पाहिजे!

मंदार दिलीप जोशी's picture

25 Feb 2014 - 3:56 pm | मंदार दिलीप जोशी

अनुमोद्न

यांचे काही व्हिडीओ पाहिले आहेत, पण माझा या विषयात अभ्यास नगण्य असल्याने फार खोलात जात नाही.

पण मला सध्या सिडनीत फार प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात दिसणारे मुस्लिम. आणि त्यांच्या भाषा आणि राहणीमानावरून ते धर्मांतरीत असावेत असं वाटतं. थोडक्यात गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे...