म्हणून नथुराम उजवा ठरतो.....

महेश_कुलकर्णी's picture
महेश_कुलकर्णी in काथ्याकूट
20 Feb 2014 - 12:23 pm
गाभा: 

गेले २-३ दिवस, २३ वर्षापासून रखडलेल्या राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींच्या कारवाईवरून वेगवेगळया घडामोडी घडत आहेत. दया याचिकेची वेळीच दखल न घेतल्याने आपोआपच दोषींची फाशी रद्द होवून शिक्षेचे जन्ठेपेमध्ये रुपांतर झाले. इकडे लगेच तामिळनाडू सरकारने तमिळ अस्मिता दाखवत दोषींना सोडण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानाची हत्या करून देखील फक्त भाषेची अस्मिता म्हणून त्या ‘दहशतवादा’चे समर्थन होते हे खरेच शोचनीय आहे. देशाला अग्रक्रमी(Nation First) ठेवून निर्णय घेणारा राजकीय पक्ष अथवा सरकारी धोरणे सध्या अभावाने पाहायला मिळतात. सगळीकडे फक्त मतपेटीचा विचार आणि त्यातच ह्या दुर्दैवी निर्णयाने अजून एक भर टाकली.

गांधी घराण्यातील हत्येचा विषय निघाल्यावर आपसूकच इंदिरा गांधी आणि बापू यांच्या हत्येची आठवण झाली नाही तरच नवल. (आपण जरी विसरायाचा प्रयत्न केला तरी प्रसारमाध्यमे आणि खुद्द कॉंग्रेसचे उपाध्यक्ष श्री. राहुल गांधी ह्याची आठवण करून देत राहतील.)

आज कोणतीही प्रसारमाध्यमे राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांना दहशतवादी संबोधण्यास धजावत नाही. परंतू बापुंचा मारेकरी(नथुराम) आता ‘पहिला दहशतवादी’ म्हणून संबोधला जातो.

खरे तर वेगळ्या खलिस्तानसाठी प्रयत्न करणारे जर्नेलसिंग यांच्या हत्येचा सूड किंवा श्रीलंकेत होत असणाऱ्या तामिळींच्या अत्याचाराचा सूड म्हणून भारतातील पंतप्रधानाना जबाबदार धरणारे लोक जे भाषा आणि धर्म यांचा संकुचित विचार करत होते व भारतापासून वेगळे होण्याची मागणी करत होते ते खरे दहशतवादी होत.

उलटपक्षी अखंड आणि धर्मनिरपेक्ष भारत (जिथे सर्व धर्मांना सारखी वागणूक असेल आणि कोणत्याही विशिष्ट धर्माचे लांगुलचालन करणारी धोरणे नसतील.) याच्यासाठी कायम आग्रही राहणारा व यांच्याआड येणाऱ्या गोष्टींना बाजूला करण्यासाठी त्यावेळेस जे करता आले ते करणारा नथुराम मात्र दहशतवादी. ज्याला देशाचे नियम व कायदे मोडून काहीही करायचे नव्हते म्हणूनच स्व:ताहून शरण आला व हसत हसत फाशीला सामोरे गेला. कोणताही दया अर्ज न देता.

वरील सगळ्या गोष्टी लक्षात घेता एवढेच वाटते की देशाची अखंडता डोळ्यासमोर ठेवून कायद्याने चुकीचे ठरवलेले पाऊल उचलूनदेखील त्यावर ठाम राहणारा नथुराम कायम या सगळ्यात उजवा ठरतो.

टीप: इथे कोणाच्याही चुकीच्या गोष्टींचे समर्थन करायचा हेतू नसून तिन्ही गांधी जे कायमच देशाचा केंद्रबिंदू ठरले आहेत यांच्या हत्या वर मारेकरी यांचे शक्य तेवढे तटस्थपणे समीक्षण करण्याचा प्रयत्न आहे.

प्रतिक्रिया

अमोल मेंढे's picture

20 Feb 2014 - 12:29 pm | अमोल मेंढे

गांधी जे कायमच देशाचा केंद्रबिंदू ठरले आहेत यांच्या हत्या वर मारेकरी यांचे शक्य तेवढे तटस्थपणे समीक्षण करण्याचा प्रयत्न आहे.

टीप खरी वाटत नाही...

महेश_कुलकर्णी's picture

20 Feb 2014 - 12:34 pm | महेश_कुलकर्णी

अमोलजी,
हीच तर गम्मत आहे...एखाद्या माणसाने कितीही खरे सांगायचा प्रयत्न केला तरी कुठले तरी पूर्वग्रह त्याच्या म्हणण्याच्या आड येतात. :(

प्रतिसादाबद्दल धन्यवाद...

ज्ञानव's picture

20 Feb 2014 - 12:35 pm | ज्ञानव

फक्त चर्चा तीही.....संपादित

महेश_कुलकर्णी's picture

20 Feb 2014 - 12:37 pm | महेश_कुलकर्णी

आपले दुर्दैव दुसरे काय??

प्रकाश घाटपांडे's picture

20 Feb 2014 - 12:37 pm | प्रकाश घाटपांडे

म्हणुन नथुराम वेगळा ठरतो असे म्हटले असते तर आपल्या टीपेशी ते सुसंगत ठरले असते. दाभोलकरांच्या मारेकरी व गांधींचे मारेकरी यात समान सूत्र म्हणजे विचारांचा मुकाबला विचारांनी करता येणे अशक्य झाले म्हणून त्या व्यक्तीलाच संपवून टाका. याचे कुठल्याही पातळीवर उदात्तीकरण वा समर्थन हे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रित्या करणे मला अविवेकी वाटते.

महेश_कुलकर्णी's picture

20 Feb 2014 - 12:39 pm | महेश_कुलकर्णी

समर्थन करणे हा हेतूदेखील नाहीये..

प्रकाश घाटपांडे's picture

20 Feb 2014 - 12:43 pm | प्रकाश घाटपांडे

आपल्याला समर्थन करण्याचे देखील अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे. आपला तो हेतु नाही ही गोष्ट वेगळी.

मंदार दिलीप जोशी's picture

25 Feb 2014 - 3:46 pm | मंदार दिलीप जोशी

नथुराम गोडसे अमर रहे

ज्ञानव's picture

20 Feb 2014 - 12:51 pm | ज्ञानव

की

विचारांचा मुकाबला विचारांनी करता येणे अशक्य झाले म्हणून त्या व्यक्तीलाच संपवून टाका.

हे अविवेकी आहे.
लादेनच्या विचारांचा मुकाबला कसा करता आला असता? मग लादेनला मारून टाकणे अविवेकी आहे का? नथुरामजी ह्यांचेसाठी गांधी लादेन एवढेच भयंकर असतील त्या काळात. भारतीय सीमेवर जे झाले त्यास गांधी कारणीभूत आहेत असा काहीसा विचार त्यांनी केला असेल का?

उगाच काहीबाही अर्थ जोडु नका.विचारस्वातंत्र्याचा व लिखाणस्वातंत्र्याचा गैरफायदा आहे हा.

प्रकाश घाटपांडे's picture

20 Feb 2014 - 1:08 pm | प्रकाश घाटपांडे

लादेन हा काही विचारांची लढाई लढत नव्हता. त्यामुळे हे उदाहरण गैरलागू.
>नथुरामजी ह्यांचेसाठी गांधी लादेन एवढेच भयंकर असतील त्या काळात.<
होय त्यांच्याशी नथूरामला विचारांनी लढता येत नव्हते तो इतर वेळी विचार करणारा गृह्स्थ असून सुद्धा!
>>भारतीय सीमेवर जे झाले त्यास गांधी कारणीभूत आहेत असा काहीसा विचार त्यांनी केला असेल का? <<
तसा विचार त्याने केला म्हणुन तर गांधीजींचा खून केला.विचार पटले नाहीत करा खून.

ज्ञानव's picture

20 Feb 2014 - 2:14 pm | ज्ञानव

धर्म संरक्षण, धर्म वृद्धी वगैरे त्याचे विचारच होते कि .....तसा विचार अमेरिकेने केला म्हणुन तर लादेनचाचा खून केला. विचार पटले नाहीत करा खून......

>>भारतीय सीमेवर जे झाले त्यास गांधी कारणीभूत आहेत असा काहीसा विचार त्यांनी केला असेल का? तसा विचार त्याने केला म्हणुन तर गांधीजींचा खून केला.विचार पटले नाहीत करा खून......

तुलना लादेन आणि गांधी नसून विचार पटले नाहीत तर करा खून हे कितपत योग्य किंवा विवेकी आहे ह्या अनुषंगाने...इतकेच

आनन्दा's picture

25 Feb 2014 - 6:18 pm | आनन्दा

थोडासा फरक आहे.
नथुरामच्या मते गांधी वैचारिक अतिरेकी होते. आणि सीमेवर/ सीमेपलीकडे त्याच्या देशबांधवांवर होणार्‍या अत्याचारांना त्यांचा वैचारिक अतिरेक कारणीभूत होता. इतर हत्या आणि गांधीहत्या यांमध्ये मूलभूत फरक हाच आहे ही नथुरामने गांधींना मारले ते त्यांच्या भूतकाळासाठी नाही, तर त्यांच्या भविष्यकाळासाठी.

मंदार दिलीप जोशी's picture

25 Feb 2014 - 3:46 pm | मंदार दिलीप जोशी

अनुमोदन.
नथुराम गोडसे अमर रहे

महेश_कुलकर्णी's picture

20 Feb 2014 - 1:14 pm | महेश_कुलकर्णी

विषय ३ गांधीवरून दाभोळकर मार्गे लादेनकडे गेला... :)

श्रीगुरुजी's picture

20 Feb 2014 - 1:18 pm | श्रीगुरुजी

>>> दाभोलकरांच्या मारेकरी व गांधींचे मारेकरी यात समान सूत्र म्हणजे विचारांचा मुकाबला विचारांनी करता येणे अशक्य झाले म्हणून त्या व्यक्तीलाच संपवून टाका.

दाभोळकरांचे मारेकरी अजूनही सापडलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विचारांच्या विरूद्ध असणार्‍यांनी त्यांना संपविले असा निष्कर्ष ते सापडेपर्यंत काढता येत नाही.

दाभोळकरांना खरोखरच त्यांचे विचार सहन न होणार्‍यांनी मारले का त्यांना मारल्यामुळे त्यांच्या हत्येची सुई आपोआप 'सनातन'वर व पर्यायाने हिंदू संघटनांवर वळेल हे गृहीत धरून कोणीतरी 'सनातन' विरोधकाने त्यांना मारले का त्यामागे बिल्डरमाफिया, राजकारणी वगैरे मंडळी होती हे अजून समजलेले नाही.

पोलिसांना त्यांचे मारेकरी कोण हे आतापर्यंत समजलेले असणार आहे. सुरवातीचे काही महिने 'सनातन' विरूद्ध जंग जंग पछाडून सुद्धा काहीच पुरावे मिळाले नाहीत. तो पर्यंत मोलाचा वेळ वाया जाऊन खर्‍या मारेकर्‍यांना सुखरूप निसटायची संधी मिळाली. त्यामुळे या हत्येमागे 'सनातन' नसून कट्टर 'सनातन' विरोधक असलेला एखादा राजकारणी असावा असे वाटते. पोलिसांना तो कोण हे कळले असावे, पण राजकीय दडपणामुळे त्यांचे हात बांधले गेले असावेत असे वाटते.

आनन्दा's picture

20 Feb 2014 - 1:30 pm | आनन्दा

+१ मला या प्रकरणात काही "धर्मनिरपेक्ष" लोकांचा हात असल्याचा पहिल्यापासून संशय आहे. पण पुरावे नसल्यामुळे न बोलणे उत्तम.

दुश्यन्त's picture

20 Feb 2014 - 4:57 pm | दुश्यन्त

दाभोलकर यांची हत्या झाल्यावर माझ्या मते खरा आनंद या तथाकथित धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी लोकांनाच झाला असावा. कारण हिंदुत्ववाद्यांना झोडपायला एक नवीन बहाणा मिळाला. निखिल वागले वगैरे आतातायी पत्रकार तर दिसेल त्या सेना -भाजप नेत्याला जणू काही त्यांनीच सुपारी देवून दाभोलकरांना संपवले अश्या अविर्भावात ओरडत होता. सर्वत्र हे ढोंगी पुरोगामी लोक काही पुरावा / तपास होण्याआधीच दाभोलकर आणि गांधी हत्या यात साम्य शोधत होते. दाभोलकर यांच्या हत्ये मागे अन्य काही शक्यता असू शकतात ( संपत्ती वाद , चळवळी मधील अंतर्गत वाद वगैरे ) असे वाटते.
(इथे मिपावर मी कुणावर वैयक्तिक टीका करत नसून माझा रोख खास करून माध्यमामध्ये दाभोलकर हत्ये विषयी बोलणारे विचारवंत/ राजकारणी यांच्याकडे आहे)

आनन्दा's picture

20 Feb 2014 - 1:28 pm | आनन्दा

तरीही फरक येतोच.
गांधींजींची हत्या करण्याचा निर्णय केतीही अविवेकी असला, तरी त्यामागे त्याचे काहीतरी तर्कशात्र होते. भले ते चूक असेल, पण त्याचे मूळ हे राष्ट्रभक्ती हेच होते. फारतर आपण त्याला वाट चुकलेला म्हणू शकतो, पण किमान देशद्रोही म्हणू नये अशी आशा आहे.
दाभोळकरांची हत्या ही आर्थिक हितसंबंधातून झालेली आहे असा होरा आहे. तस्मात या दोन्ही घटनांना एकाच तराजून तोलू नये.

महेश_कुलकर्णी's picture

20 Feb 2014 - 1:44 pm | महेश_कुलकर्णी

आनंदाजी नथुरामबद्दल लिहिताना अगदी हेच मला म्हणायचे आहे..

भले ते चूक असेल, पण त्याचे मूळ हे राष्ट्रभक्ती हेच होते. फारतर आपण त्याला वाट चुकलेला म्हणू शकतो, पण किमान देशद्रोही म्हणू नये अशी आशा आहे.

बाकी दाभोलकर प्रकरणात अजून पोलिसांनाच काही सुगावा नाही उगाच त्यावर काही तर्कशास्त्र लावण्याची आता तरी काही गरज भासत नाही.

अर्धवटराव's picture

20 Feb 2014 - 1:30 pm | अर्धवटराव

दाभोलकरांचा खुन नेमक्या कोणत्या कारणावरुन झाला याची १% सुद्धा माहिती आपल्याकडे नाहि. गांधीहत्येशी दाभोलकर मर्डरची नाळ जुळायचं एकमेव कारण म्हणजे अजुनही दाभोळकरांच्या खुनाबाबतचं अंधारलेलं वलय. या वलयात अनंत शक्यता समानतेने सामावल्या आहेत... सरकारने/सत्ताधारी पक्षाने मुद्दाम त्यांचा खुन करवला, हिंदु धर्मीयांना पुरोगामी विचारांप्रती नेणार्‍या व्यक्तीला परधर्मीयाने संपवला, दाभोलकरांच्या अनौरस मुलाने आपल्या आईच्या दु:खांचा बदला घेतला, दाभोलकरांना अचानक काहि धनलाभ होणार होता जो कुणाला तरी खुपत होता, "द" पासुन सुरु होणार्‍या अडणावांच्या प्रसिद्ध व्यक्तींना ठार मारणारा सायको किलर तयार झाला होता, दाभोलकरांना खुन्याकरवी आत्महत्या करायची हुक्की आलि होती, मिपावर धाग्यांचा रतीब कमि झालेला दाभोलकरांना व काहि मिपाकरांना बघवला नाहि, अ.निं.स. ने आपल्या फायद्याची सनसनाटी तयार करायला दाभोलकरांचा बळी दिला... अशा अनंत शक्यता आहेत.

प्रसाद गोडबोले's picture

20 Feb 2014 - 1:36 pm | प्रसाद गोडबोले

कसल्या एक से एक शक्यता शोधुन काढल्यात ...

दाभोळकरांनी जादुटोणा विरोधी कायदा म़जुर करु घेण्यासाठी तर हे बलिदान केले नसावे ना ?
किंव्वा जसे मॉरीआर्टीला दाखवण्यासाठी शेरलॉक मेल्याचे नाटक करतो तसे काहीसे तर केले नसावे ना ?

परिस्थिती संभाओनासे भरी हुई है :)

या गदारोळात दाभोलकरांच्या मृत्युबाबत जि शब्दांची आतिषबाजी होते त्याबद्दल मात्र खेद वाटतो. व्यक्ती दाभोलकर त्यांच्या चाहत्यांना दु:खात लोटुन गेले आणि कार्यकर्ते दाभोलकर अनेक सकारात्मक शक्यतांना पूर्णविराम लाऊन गेले :(

आत्मशून्य's picture

20 Feb 2014 - 6:41 pm | आत्मशून्य

जसे मॉरीआर्टीला दाखवण्यासाठी शेरलॉक मेल्याचे नाटक करतो तसे काहीसे तर केले नसावे ना ?

अगागा! कहर. असो, शेवटचा एपिसोड बघता शरलॉकनेच ब्रिटन सोडावे लागु नये म्हणून पुन्हा मॉरीऑर्टीला परत आणले की काय मानायला जागा आहे.

प्रभाकर पेठकर's picture

20 Feb 2014 - 3:24 pm | प्रभाकर पेठकर

प्रकाश घाटपांडे साहेब,

दाभोलकरांच्या मारेकरी व गांधींचे मारेकरी यात समान सूत्र म्हणजे विचारांचा मुकाबला विचारांनी करता येणे अशक्य झाले म्हणून त्या व्यक्तीलाच संपवून टाका.

हे विधान पटलं नाही. विचारांचा मुकाबला विचारांनी करता येणे अशक्य झाले म्हणून नथुराम गोडसेने महात्मा गांधींना संपविले ही वस्तुस्थिती नाही. 'गांधी हत्या आणि मी' ह्या त्यांच्या बंधूंनी , गोपाळ गोडसेंनी, लिहीलेल्या पुस्तकात गांधी हत्या करण्यामागची नथुराम गोडसेंची वैचारिक बैठक विशद केली आहे. त्यानुसार, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या भवितव्याचे निर्णय घेण्याची संसदेला असावी तेवढी मोकळीक राहिली नाही. उपोषणाचे हत्यार उपसून संसदेचे निर्णय आपल्याला हवे तसे फिरविण्याचे हत्यार गांधीजींनी वापरायला सुरुवात केली. ५५ कोटीं पाकिस्तानला देण्याचा निर्णय अशा उपोषणाच्या हत्यारानेच स्वतःच्या मनाप्रमाणे गांधींनी वळवून घेतला. तसेच फाळणी संदर्भातील त्यांच्या हिन्दू विरोधी भूमिकेने प्रषासनाला त्यानी हतबल केले होते. ह्या सर्व (आणि अशा अनेक) घटनांनी व्यथित होऊन नथुराम गोडसेने विचार केला की महात्मा गांधींचे 'अस्तित्व' हा देशाच्या प्रगतीतील अडसर ठरतो आहे. ते जिवंत आहेत तो पर्यंत स्वतःच्या शरिराचा (उपोषण मार्गाने ते संपविण्याच्या धमकीचा) वापर करीत राहतील. हे शरीर नाहिसे झाले तर तर भारत सरकार पाकिस्तान बाबतीत, भारताच्या प्रगती बाबत 'योग्य' तो निर्णय घेण्यास मोकळे राहिल त्यांच्यावर महात्माजींच्या उपोषणाला झुकून त्यांना पटतील असे निर्णय घेण्याची, घेतलेले फिरविण्याची नामुष्की येणार नाही.

'गांधी हत्या आणि मी' ह्या पुस्तकात श्री. गोपाळ गोडसे ह्यांनी नथुरामांच्या वैचारीक बैठकीबद्दल त्याच्याशी चर्चा करूनच हे विचार मांडले आहेत. हे पुस्तक मी जवळ जवळ १०-१२ वर्षांपूर्वी वाचले आहे. शब्द इथे-तिथे होण्याची शक्यता आहे पण तपशील वरिल प्रमाणेच आहे.

ज्यांनी चर्चा करायला पाहिजे होती, गांधीजींचे विचार परिवर्तन करण्याचा प्रयत्न करायला हवा होता त्या काँग्रस पक्षाने कांही प्रामाणिक आणि आत्यंतिक प्रयत्न केले नाहीत. केले असतिल तरी गांधीजींनी आपला हेकटपणा सोडला नाही. शेवटी काँग्रसला नमतं घ्यावं लागलं. त्यांची ही हतबलता पाहता नथुरामाला महात्माजींचे 'शरीर' संपविणे हा एकच मार्ग उरलेला होता. (निदान त्याचा तसा समज होता).

डॉ. नरेंद्र दाभोलकर हे देशाचे नेता नव्हते. त्यांच्या आततायी कृतीने देशप्रगतीला बाधा नव्हती. ते स्वत:च्या शरीराचा उपयोग करून सरकारला नमविण्याचा, त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घ्यायला लावायचा प्रयत्न करीत नव्हते. त्यांची हत्या करणारे मारेकरी आणि नथुराम गोडसे ह्यांची तुलना योग्य वाटत नाही. नथुराम गोडसेंचे 'विचार' चुकीचे असतील पण कृत्य वाटत नाही. ते देश प्रेमाने प्रेरित होते. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे नाही. (निदान तसं कांही अजून सिद्ध झालेलं नाही).

डॉ. नरेंद्र दाभोलकराची हत्या हा देशप्रेमाचा विषय ठरत नाही. मोजक्या राजकारण्यांच्या 'दुकानाचा' ठरू शकतो. म्हणून दोन घटना वेगवेगळ्या आहेत असे मला म्हणायचे आहे.

महेश_कुलकर्णी's picture

20 Feb 2014 - 3:57 pm | महेश_कुलकर्णी

अभ्यासाला सलाम :)

थॉर माणूस's picture

20 Feb 2014 - 5:23 pm | थॉर माणूस

हा ५५ कोटी आणि खून यांच्या संबंधाचा एक भयानक गोंधळ लोकांनी घालून दिला आहे. मला कळतच नाही की यातलं नक्की खरं काय?

मुळात हे वाटणीमधे भारताला पावणे पाचशे कोटी आणि पाकिस्तानला पाऊणशे कोटी ठरवले माऊंटबॅटनबरोबर भारताच्या व पाकिस्तानच्या बाजूच्या शिष्टमंडळांनी (आपल्याबाजूने अर्थातच लोहपुरूष). वीस कोटी आधीच दिलेले, काश्मिरमधे युद्धाला तोंड फुटल्यावर आपण उरलेले पैसे थकवले म्हणून माऊंटबॅटनने हा आंतरराष्ट्रीय कराराचा भंग आहे आणि युनोमधे गेलात तर हे तुमच्या विरोधात जाईल असे सांगितल्यावर गांधींनी त्याला सहमती दर्शवली.

खरी गंमत पुढे आहे, एक बाजू म्हणते की गांधी यासाठी थेट उपोषणालाच बसले (खरंतर हे हास्यास्पद आहे, एका बाजूला पाकिस्तानला युद्धाबाबत समज देताना त्यांनाच पैसे मिळावे म्हणून डायरेक्ट उपोषण कोण करेल? पण काही सांगता येत नाही). तर दुसरी बाजू म्हणते की पंजाब आणि दिल्ली प्रांतातले दंगे थांबावेत म्हणून उपोषण होते आणि गांधी या ५५ कोटींबद्दल या काळातल्या कुठल्याही वक्तव्यात काही बोललेले नाहीत. (इथे मला दंग्यांची माहिती मिळाली नाही अन त्या काळातल्या वक्तव्यांचीही).

बरं त्यावर कहर म्हणजे हे नथुराम साहेब १९४४ पासूनच गांधींवर कावलेले होते. आता ह्याला काय दृष्टांत झाला होता की गांधी पुढे जाऊन तयार होणार्‍या पाकीस्तानला द्यायचे पैसे थकवू देणार नाहीत? नथुरामने खुनानंतर लिहीलेलं लिखाण उपलब्ध आहे. त्या आधी २-३ वर्षे या माणसाची मानसिकता आणि विचार काय होते हे कुठे कळेल? म्हणजे ३ र्‍या प्रयत्नात खून यशस्वी होईपर्यंत किती वेगवेगळ्या कारणांमधून हल्ले करण्यात आले ती माहीती मिळू शकेल का?

फाळणीमधील हिंदू विरोधी भूमिका म्हणजे नक्की काय हे कुठे वाचायला मिळेल? कारण मी वाचलेल्या माहीती नुसार जिना यांना सत्ता हवी होती, आणि ती मिळणार नाही हे उमगू लागल्यावर त्यांनी मुस्लिम कार्ड खेळले. गांधी शेवटपर्यंत त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होते पण आता आजूबाजूचे सगळेच सत्तालोलूप झालेले असल्याने हे कधी घडले नाही. तसेच हे हिंदू राष्ट्र व्हावे अशी काहींची इच्छा होती. आता असे झाले तर करोडो मुस्लिम कुठेतरी घालवावेच लागणार आणि फाळणी तरी होणार किंवा कत्तल तरी. आणि धर्माधिष्ठीत राष्ट्र हे काँग्रेसच्या विचारसरणीच बसत नसल्याने अर्थातच त्याला ही विरोध होता.

माझ्या वाचनातून मला जे कळले त्यानुसार गांधींचा दोन्ही टोकांना विरोध होता. फक्त ते एकच गोष्ट विसरले की लोक देशासाठी फक्त तोवरच लढत होते जोवर पारतंत्र्यावर विजय मिळणे दृष्टीक्षेपात आले नव्हते. एकदा राष्ट्र बनणार हे दिसू लागले की मग स्वातंत्र्यसैनिक गायबले आणि मुंगळे जमायला सुरूवात झाली.

बाकी, नथुरामला खून करायचाच होता तर तो गांधींपेक्षा हैदराबादच्या निजामाचा केला असता तर हजारो हिंदूंवरचे अत्याचार सुद्धा रोखता आले असते असं नाही वाटंत? किंवा अखंड भारत निर्माणासाठी थेट जिनालाच उडवला असता तर? हरीसिंगला आपण मिळून हिंदूराष्ट्र बनवू म्हणून पटवला असता तर? जर-तर खेळायचे तर बरंच खेळता येईल.

प्रभाकर पेठकर's picture

20 Feb 2014 - 5:58 pm | प्रभाकर पेठकर

एक बाजू म्हणते की गांधी यासाठी थेट उपोषणालाच बसले (खरंतर हे हास्यास्पद आहे, एका बाजूला पाकिस्तानला युद्धाबाबत समज देताना त्यांनाच पैसे मिळावे म्हणून डायरेक्ट उपोषण कोण करेल? पण काही सांगता येत नाही). तर दुसरी बाजू म्हणते की पंजाब आणि दिल्ली प्रांतातले दंगे थांबावेत म्हणून उपोषण होते आणि गांधी या ५५ कोटींबद्दल या काळातल्या कुठल्याही वक्तव्यात काही बोललेले नाहीत.

पाकिस्तानला पैसे देण्याबाबत गांधीजी आग्रही होते तर पाकिस्तानने काश्मिरातून आधी लष्कर मागे घ्यावे तसेच जशी जमाठेवीची विभागणी केली तशीच जबाबदार्‍यांचीही (Assets and Liabilities) विभागणी करावी ह्या बाबत सरकार आग्रही होते. त्यात गांधी़जींनी उपोषणाचे अस्त्र उगारून 'पैसे देऊनच समस्या सोडवा' असा आग्रह धरला. गांधीजींचा अशा मुद्द्यावरून मृत्यू होणे काँग्रसला राजकिय दृष्ट्या परवडणारे नव्हते (गांधीजींना हे पक्के ठाऊक होते) त्यामुळे त्यांनी नमते घेतले/त्यांना घ्यावे लागले.

गांधीजी उठसुट उपोषणाला बसायचे आणि मौन व्रत अंगिकारायचे. लगेच, काँग्रसनेते त्यांची समजूत काढायला धावायचे. त्यामुळे पंजाबातील दंग्यांसदर्भातही एखादे उपोषण असेलच. सांगता येत नाही.

असो. माझी माहिती वाचीव आहे. अभ्यास असा कांही नाही. कांही चुकत असल्यास चर्चेद्वारे मला समजून घ्यायला आवडेल.

गांधीजींनी ५५ कोटींसाठी उपोषण केले नव्हते तर उपोषण दिल्लीतील दंगली थांबाव्यात म्हणून होते. हा मुद्दा मी मागे मिपावर मांडला आहे.तसेच या विषयावर अनंतवेळा चर्वितचर्वण झालेही आहे.तरीही एक पिंक टाकायचा मोह मलाही आवरत नाही.

मागे श्री. राजघराणे यांच्या एका चर्चेत इथे लिहिलेला प्रतिसाद जरूर वाचावा अशी विनंती करतो. त्या प्रतिसादात १८ जानेवारी १९४८ च्या इंडिअन एक्सप्रेसची इमेज चिकटवली आहे.आता परत ती इमेज चिकटवायचा प्रयत्न केला पण काही केल्या ते जमले नाही म्हणून जुन्याच प्रतिसादाचा दुवा देत आहे. त्या प्रतिसादात १८ आणि १९ तारखेच्या पेपरचाही दुवा दिला आहे. हे दोन पेपर वाचून कळेलच की ५५ कोटींचा निर्णय आणि गांधीजींनी उपोषण सोडणे यात दोन दिवसांचा फरक आहे. तरीही गांधीजींनी उपोषण ५५ कोटींसाठीच केले असे छातीठोकपणे कसे म्हटले जाते?

बहुधा तेव्हा ही चर्चा पण झाली होती की ५५ कोटी हे एकमेव कारण नसले तरी उपोषणाच्या अनेक कारणांपैकी तेही एक होते. त्याचे पुरावे देखील तेव्हा देले होते असे वाटते.

याच विषयावर मी इथे चर्चा सुरू केली होती. अत्यंत रोचक चर्चा आहे.

प्रतिसाद एक से एक. शेवट कोणत्याही कन्क्ल्युजन शिवाय आहे ;)

क्लिंटन's picture

21 Feb 2014 - 12:13 pm | क्लिंटन

प्रतिसाद एक से एक. शेवट कोणत्याही कन्क्ल्युजन शिवाय आहे :)

गांधी-नथुराम, काश्मीर, केजरीवाल इत्यादी अनेक विषयांवरील चर्चांना हे वर्णन लागू पडेल :)

मंदार दिलीप जोशी's picture

25 Feb 2014 - 3:49 pm | मंदार दिलीप जोशी

दणदणीत अनुमोदन

विकास's picture

20 Feb 2014 - 10:50 pm | विकास

नथुराम हा खुनी होता आणि माथेफिरू होता. त्यात उजवेडावे करण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे त्या संदर्भात अधिक लिहायची इच्छा नाही. पण प्रकाशरावांना एक माहिती मिळणे या हेतूने प्रश्न आहे:

दाभोलकरांच्या मारेकरी व गांधींचे मारेकरी यात समान सूत्र म्हणजे विचारांचा मुकाबला विचारांनी करता येणे अशक्य झाले

नथुराम माथेफिरू-खुनी असण्यास तुम्ही म्हणता ते कारण पूर्ण पटते. पण दाभोलकरांच्या बाबतीत देखील नक्की हेच घडले आहे का इतर काही वेगळीच कारणे देखील असू शकतात? उ.दा. साधना ट्रस्टचे मोक्याचे ठिकाण वगैरे? कुठेतरी असे वाटते की जर हे निव्वळ अंधश्रद्धाविरोधाच्या विरोधातील भडक माथ्याने केलेले काम असते तर त्या व्यक्ती आजतागायत लपून राहू शकल्या नसत्या. अजूनही नक्की काय झाले ते का समजत नाही आणि आरोपी का पकडले जात नाहीत हा मुद्दा आहे. असो.

मंदार दिलीप जोशी's picture

25 Feb 2014 - 3:45 pm | मंदार दिलीप जोशी

नथुरामचे स्टेटमेंट वाचा. अत्यंत विचारीपणाने केलेले कृत्य आहे हे. माथेफिरू अजिबात नाही.

गांधी आणि दाभोककरांचे मारेकरी यात समान सूत्र?

घाटपांडे, अहो आधी दाभोककरांचे मारेकरी सापडू देत तरी. की तुम्हाला माहितच आहे....तसे असेल आणि तुम्ही पोलिसांना माहीती देत नसाल तर तो गुन्हा ठरू शकतो हां. आधीच बोंबाबोंब कशाला.

बाकी अ.नि.स. च्या बाबतीत आर्थिक अनियमितता (म्हणजे फ्रॉड हो) च्या बातम्याही वाचल्या आहेत. तेव्हा ही हत्या आर्थिक कारणांनी झालेली देखील असू शकते. आणखी सतरा लफडी असतील....आणि हे लगेच चालले तूलना करायला. दाभोलकरांचा पुळका ज्याला यायचा त्याला येऊदे, पण तो एक नंबर हिंदूद्वेष्टा होता.

टवाळ कार्टा's picture

25 Feb 2014 - 7:00 pm | टवाळ कार्टा

दाभोलकरांचा पुळका ज्याला यायचा त्याला येऊदे, पण तो एक नंबर हिंदूद्वेष्टा होता.

कैच्याकै...उगाचच

वेताळ's picture

20 Feb 2014 - 12:39 pm | वेताळ

+१ सहमत आहे.

धर्मराजमुटके's picture

20 Feb 2014 - 12:42 pm | धर्मराजमुटके

सदा हरीत विषय !

सचिन कुलकर्णी's picture

20 Feb 2014 - 1:04 pm | सचिन कुलकर्णी

नथूरामचे उद्दातीकरण करणारा धागा वाटला शीर्षकावरून. पण आपल्या प्रतिक्रियेवरून तसे नाही हे समजले.

बाकी

पंतप्रधानाची हत्या करून देखील फक्त भाषेची अस्मिता म्हणून त्या ‘दहशतवादा’चे समर्थन होते हे खरेच शोचनीय आहे. देशाला अग्रक्रमी(Nation First) ठेवून निर्णय घेणारा राजकीय पक्ष अथवा सरकारी धोरणे सध्या अभावाने पाहायला मिळतात. सगळीकडे फक्त मतपेटीचा विचार आणि त्यातच ह्या दुर्दैवी निर्णयाने अजून एक भर टाकली.

यासाठी +१..

प्रसाद गोडबोले's picture

20 Feb 2014 - 1:30 pm | प्रसाद गोडबोले

नथुराम YZ होता ... कशाला नसत्या उचापती सांगितल्या होत्या ... होतय पार्टीशन तर होऊन दे की ... तुम्हाला थोडीच धग पोहचत होती ? मेले तर पंजाबी अन बंगाली मरत होते ... मराठी त्यात्यही स्पेशली ब्राह्मण लोकांचे काय जळत होते ?

गांधी रहायला हवे होते ... मग मजा आली असती ....
पाकिस्तानले काश्मीर मधे घुसखोर घुसवल्यानंतर गांधीनी काय केले असते ?
निजामाने हैद्राबादेत रझाकारांकरवी अत्याचार सुरु केल्यावर गांधीनी काय केले असते ?
संयुक्त महाराष्ट्राबाबत गांधी काय म्हणाले असते ? बॉम्बे गुजाराथीनु की आमची मुंबई ?
६५ च्या युधात दारुण पराभव पाहिल्यावर गांधीनी काय केले असते ?
किंव्वा मुसलमानांनी मागितला म्हणुन पाकिस्तान दिला मग खलिस्तान्यांनी मागितल्यावर खलिस्तान दिला असता का ? किंव्वा तमिळनाडु दिला असता का ?
७२ च्या वेळी पुर्व पश्चिम पाकिस्तानच्या अंतर्गत कलहात नाक खुपसले असते का ?
आणिबाणि च्या वेळी कोणाची बाजु घेतली असती ?
९१ ला इकॉनॉमी ओपन केली असती का ?
९२ च्या घटनेवर काय रीअ‍ॅक्शन असती ?
कसाबला आणि त्याहीपेक्षा अफजल गुरुला गांधीनी दया दाखवली असती का ?

गांधी रहायला पाहिजे होते राव ... खरंच खुप मजा आली असती !!

यावर सविस्तर लेखन व्हावे... जरी इतिहासात जर-तर ला अर्थ नसला, तरी.. बाके क्लिंटन आणि ऋषिकेश यांच्या प्रतिसादांच्या प्रतीक्षेत.

साती's picture

20 Feb 2014 - 2:23 pm | साती

कसाबला फाशी देईपर्यंत बिचार्या गांधींचे वय किती झाले असते?

इरसाल's picture

21 Feb 2014 - 2:13 pm | इरसाल

ह्या न्यायाने "आप"ल्या आण्णांना "राज्यगांधी" (आता सरहदी राहिल्या नाहीत हो पुर्वी सारख्या) म्हटले गेले असते काय ?

सहमत आहे, पण कसाबपर्यंत ते रहायला पाहिजे होते हे म्हणणे म्हणजे अंमळ अतीच आहे ;) =))

ऋषिकेश's picture

20 Feb 2014 - 2:27 pm | ऋषिकेश

या विषयावर इतके लिहून व बोलून झाले आहे की यावर पुन्हा काही लिहिण्याइतके या धागयत/प्रतिसादांत नाविन्य नाही.
तरी माझे नाव घेतलेच आहे तर एक पिंक टाकून जातो:

जरी त्यांचा खून केला नसता, तरी इथे मांडलेल्या प्रश्नांपैकी कित्येक घटना घडेपर्यंत गांधीजी असण्याची व/किंवा वयोमानानुसार त्यांचा राजकीय सहभाग असण्याची शक्यता धुसर आहे.

मात्र ते जेव्हा होते तेव्हा यापैकी एका गोष्टींवर त्यांनी आपली मते स्पष्ट केलीच आहेत. तो म्हणजे काश्मिर प्रश्न.

पाकिस्तानले काश्मीर मधे घुसखोर घुसवल्यानंतर गांधीनी काय केले असते ?

याचे उत्तर गांधीजींनी १९४८मध्येच ४ जानेवरीच्या प्रार्थना सभेत दिले आहे. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे:

If Pakistan harasses Kashmir and if Sheikh Abdullah who is the leader of Kashmir asks the Indian Union for help, the latter is bound to send help. Such help therefore was sent to Kashmir. At the same time Pakistan is being requested to get out of Kashmir and to arrive at a settlement with India over the question through bilateral negotiations. If no settlement can be reached in this way then a war is inevitable.

प्रसाद गोडबोले's picture

20 Feb 2014 - 3:12 pm | प्रसाद गोडबोले

काय सांगता ? युध्द अटळ आहे असं गांधी म्हणाले ??
हे उशीरा सुचलेले शहाणपण असावे काय ? जर फाळणीच्याच वेळेला हा अ‍ॅटीटयुड दाखवला असता तर गांधी भारताचे लिंकन ठरले असते !!

आत्मशून्य's picture

21 Feb 2014 - 7:06 pm | आत्मशून्य

तर गांधी भारताचे लिंकन
ठरले असते !!

म्हणजे भाळि खुन होणेच ठरवले होते ? एकुणच नाथूराम द्रुश्टिकोनाला एक खतरनाक वळ्न दिलत राव. अजुन थोडे विस्कटा खरोखर रोचक लिखाण.

प्रसाद गोडबोले's picture

25 Feb 2014 - 12:51 pm | प्रसाद गोडबोले

गांधी आणि लिंकन असा लेख लिहायचा विचार कित्येक दिवस मनात आहे ...
दोघांपुढेही गृहयुध्द आणि फाळणी हा पर्याय होता ,
एकाने युध्दाचा पर्याय निवडला आणि देष एकसंध राखला तर दुसर्‍याने फाळणीचा पर्याय निवडला पण शांतता एकसंध राखली ...
दोघांचाही खुन झाला ...
लिंकन ज्याने युध्दाचा मार्ग स्विकारला होता त्याच्या अनुयायांनी खुन्याच्या जातीच्या लोकांवर अन्याय केल्याचे ऐकिवात नाही आणि गांधी ज्यांनी अहिंसेचा मार्ग स्विकारला होता त्यांच्याच अनुयायांनी त्यांच्या तत्त्वांना तिलांजली दिली .
लिंकन, ज्याने खुप मोठ्ठे युध्द पत्करुन देष एकसंध राखल्या , त्यांच्या देषात अनेक लोकांचि चित्रे नोटवर असतात ह्या उलट गांधी जे देष एकसंध राखु शकले नाहीत त्यांच्या देषात ते एकमेव नोटेवर चमकतात ...
लिंकनच्या खुन्याचे समर्थन करणारा किंव्वा गुलामगिरीचे समर्थन करणारा एकही माणुस पाहण्यात नाही .... मात्र गांधीच्या खुना/वधाचे समर्थन आणि अल्पसंख्यांच्या लांगलुंचनावर टीका करणारे कित्येक लोक पाहण्यात आहेत .
लिंकन गेले पण आता गुलामगिरी ह्यामुद्द्याला घेवुन त्यादेषात अराजक माजेल अशी काही चिन्हे नाहीत ...हिकडे गांधी गेले पण अल्पसंख्यलांगलुंचन ह्यामुद्द्यावर एकडे आजही अराजकता आहे ...
लास्टली गुलामगिरी समर्थक कोण्या माथेफिरुने त्यांच्या देषात राष्ट्रीय चिंन्हांचा अवमान केला तर त्याला कडक शिक्षा होईल ...आणि आम्ही अमरजवान स्मारकाला लाथमारण्यार्याचे काय होते ह्याची वाट पहात आहोत ....

असो .

नितिन थत्ते's picture

25 Feb 2014 - 1:33 pm | नितिन थत्ते

जरूर लिहा. आम्ही वाचू तो.

थॉर माणूस's picture

20 Feb 2014 - 2:36 pm | थॉर माणूस

गांधींचा खून करण्यात आला तेव्हा त्यांनी पंच्याहत्तरी पार केलेली होती. यातल्या किती घटनांपर्यंत ते तगले असते कुणास ठावूक. तसेही स्वातंत्र्य मिळणार म्हटल्यावर पदांची संगीतखुर्ची सुरू झालेली पाहील्यावरच ते उद्वीग्न झाले होते म्हणे, त्यामुळे जगले असतेच तर पुढच्या ४-५ वर्षात भारत आणि पाकिस्तानच्या परीस्थीतीकडे पाहून त्यांनी स्वतःच देह ठेवला असता बहुतेक.

माहितगार's picture

20 Feb 2014 - 2:44 pm | माहितगार

तसेही स्वातंत्र्य मिळणार म्हटल्यावर पदांची संगीतखुर्ची सुरू झालेली पाहील्यावरच ते उद्वीग्न झाले होते म्हणे, त्यामुळे जगले असतेच तर पुढच्या ४-५ वर्षात भारत आणि पाकिस्तानच्या परीस्थीतीकडे पाहून त्यांनी स्वतःच देह ठेवला असता बहुतेक.

आपण फिरवलेल चाक आपल्या पाशीच येऊन थांबत ? गीता सांगणार्‍या कॄष्णाला यादवी पहावी लागली आणि गांधींना... ?

प्रसाद गोडबोले's picture

20 Feb 2014 - 4:07 pm | प्रसाद गोडबोले

मान्य आहे की कसाबला पाही पर्यंत गांधी खुप वृध्द झालेले अस्सते.

आपण आपली कल्पना शक्ती का नाही लढवु शकत , गांधीजींचे आधीचे वर्तन पाहुन (आणि अंडर द अ‍ॅझम्शन की वर्तन खुप ड्रॅस्टीकली बदलत नाही ) आपण नक्कीच अंदाज बांधु शकतो ना की गांधी कसे वागले असते ते ...

उदाहरणार्थ : मुसलमानांनी पाकिस्तान मागितला ...पहिल्यांदा नाही नाही म्हणाले पण सरते शेवटी गांधींनी पाकिस्तान दिला .... तसेच खलिस्तान्यांनी खलिस्तान मागितला असता तर गांधींनी तो दिला असता ... असे माझे मत आहे

महेश_कुलकर्णी's picture

20 Feb 2014 - 4:11 pm | महेश_कुलकर्णी

खलिस्तान्यांनी खलिस्तान मागितला असता तर गांधींनी तो दिला असता ...

ज्ञानव's picture

22 Feb 2014 - 10:00 am | ज्ञानव

ह्या देहाबद्दल न बोलता आपण त्यांच्या विचार आणि निर्णयांबद्दल बोलतो आहोत. तेव्हा त्या विचारानुरूप ते वागले असते पण त्यांनी संपूर्ण आयुष्यात जे काही राजकीय निर्णय घेतले त्यापैकी कॉंग्रेसने किती निर्णय अमलात आणले आणि का ? आणि किती निर्णय सोडून दिले आणि का ? गांधीनी कॉंग्रेस चालवली का ? कि इतर नेतेही निर्णय घेत होते?

थोडक्यात कॉंग्रेस आणि गांधी ह्यांची विचारसरणी एकाच प्रकारची होती का ?

नक्की गांधी हे एक प्यादे होते की पटावरची एखादी कमी जास्त महत्वाची सोंगटी?

थॉर माणूस's picture

20 Feb 2014 - 2:59 pm | थॉर माणूस

एकवेळ वेगळा ठरतो म्हणू शकतो आपण. पण उजवा ठरण्याइतके वेगळे काहीच केलेले नाही त्याने. कदाचित दक्षिणेत राजीव गांधींच्या मारेकर्‍यांबद्दल ते लोक असेच काही म्हणत असतील. आपल्या भागातला माणूस म्हणजे थोडी का होईना सिंपथी आलीच.

बाकी लिखाण ठीक आहे पण काही वाक्ये मात्र थोडी खटकली

>>> ज्याला देशाचे नियम व कायदे मोडून काहीही करायचे नव्हते म्हणूनच स्व:ताहून शरण आला व हसत हसत फाशीला सामोरे गेला. कोणताही दया अर्ज न देता.
खून केला हो त्याने... भर माणसांत. आता अजून काय केल्यावर आपण नियम व कायदा मोडला वगैरे म्हणायचं? आणि त्याने त्या काळात जवळपास संपूर्ण बहूमताने सत्तेत असलेल्या पक्षाच्या प्रमुख आधारसंभाचा खून केला होता, कुणीही कितीही आपटली असती तरी शरण येण्या शिवाय गत्यंतर नव्हते त्याला. कायद्याच्या आधारे जिवंत रहाण्याची एखादा टक्का शक्यता तरी होती. पळून जाऊन नंतर कुठे बाहेर लोकांच्या तावडीत सापडला असता तर त्यालाही चेचला असताच की लोकांनी.

>>>आज कोणतीही प्रसारमाध्यमे राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांना दहशतवादी संबोधण्यास धजावत नाही.
हे काहीसं गोंधळात टाकणारं आहे. म्हणजे नक्की काय करणं अपेक्षित आहे? कारण एलटीटीई असो किंवा खलिस्तानी दोन्हीना भारताने कधीच दहशतवादी संघटना जाहीर केल आहे. त्यांचे हस्तक असलेल्यांना परत वेगळं दहशतवादी म्हणायलाच हवंय का? ते आपोआप दहशतवादी ठरत नाहीत का? आता नथुरामला दहशतवादी म्हणत असतील तर (हे मला अजून ऐकायला मिळालेलं नाही. त्यांचा उदोउदो बराच ऐकलाय पण. नशिब जयंत्या साजर्‍या करत नाहीत अजून) ते कदाचित तो ज्या संघटनेचा होता ती संघटना दहशतवादी नाही म्हणून त्याच्या एकट्यावरच बोट उचलण्यासाठी म्हणत असतील.

महेश_कुलकर्णी's picture

20 Feb 2014 - 3:55 pm | महेश_कुलकर्णी

थोर भाऊ,
आपण प्रतिक्रिया देवून शंका उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद. जमेल तेवढे शंकानिरसन करण्याचा प्रयत्न केला आहे.

'उजवा’ ठरतो हे कृतीपाठीमागील विचाराच्या निकषावर म्हटले आहे. देश तोडण्याच्या किंवा संकुचित भाषा अस्मितेच्या कारणासाठी त्याने ही कृती केली नव्हती.

१)

"खून केला हो त्याने... भर माणसांत. आता अजून काय केल्यावर आपण नियम व कायदा मोडला वगैरे म्हणायचं?" व "कायद्याच्या आधारे जिवंत रहाण्याची एखादा टक्का शक्यता तरी होती."

एक शक्यता अशी सुद्धा होती की नथुरामची सुटका कदाचित भावनेच्या आधारावर आणि त्यांच्या कुटुंबियांनी अहिंसेचा युक्तिवाद करून झाली असती परंतु तसे नथुरामने होवून नाही दिले.
खून केला म्हणजे नियम मोडला म्हणून त्यासाठी जो दंड आहे त्याला तो सामोरा गेला.

२)

"कारण एलटीटीई असो किंवा खलिस्तानी दोन्हीना भारताने कधीच दहशतवादी संघटना जाहीर केल आहे. त्यांचे हस्तक असलेल्यांना परत वेगळं दहशतवादी म्हणायलाच हवंय का?

हो निश्चित. अफजल गुरु, कसाब यांच्या संघटना सुद्धा दहशतवादी संघटना म्हणूनच प्रसिद्ध आहेत की तरीदेखील पुन:उल्लेख करताना ‘दहशतवादी’ असे संबोधतो ना?

३)

आता नथुरामला दहशतवादी म्हणत असतील तर (हे मला अजून ऐकायला मिळालेलं नाही. त्यांचा उदोउदो बराच ऐकलाय पण. नशिब जयंत्या साजर्याल करत नाहीत अजून)

नुकत्याच एका वाहिनीवर वादविवाद कार्यक्रमाचा सूत्रसंचालक वारंवार म्हणताना मी ऐकले/पहिले आहे.

अति स्पष्टीकरण हे ह्या चर्चेला वेगळे वळण देवू शकेल व मूळ विषयापासून दूर नेईल त्यामुळे तूर्तास एवढे पुरेसे आहे.

थॉर माणूस's picture

20 Feb 2014 - 4:58 pm | थॉर माणूस

>>>एक शक्यता अशी सुद्धा होती की नथुरामची सुटका कदाचित भावनेच्या आधारावर आणि त्यांच्या कुटुंबियांनी अहिंसेचा युक्तिवाद करून झाली असती परंतु तसे नथुरामने होवून नाही दिले.

अशक्य. कारण वर दिले आहे. नथुरामला कोणत्याही परीस्थीती जगू देण्यात आले नसते. लक्षात घ्या, त्याने अशा पक्षाशी पंगा घेतला होता ज्याचा समाजावर आणि राज्यावर जबरदस्त प्रभाव होता. शासकीय कार्यवाहीमधून सुटला असता तरी "भडकलेल्या जमावाच्या मारहाणीचा" बळी म्हणून खपवला असता. आपण केवळ "आयडीअल सिचुएशन्स" पहातो त्यामुळे या गोष्टी लक्षातच घेत नाही. नथुराम जिवंत रहाणे काँग्रेसींसाठी कधीच फायद्याचे ठरले नसते.

इतर मुद्द्यांच्या बाबतीत... कसाब किंवा अफजल गुरू विषयी बोलतानाही आजकाल त्यांना वेगळे "दहशतवादी" लेबल लावावे लागत नाही असेच दिसते (implied आहे ते). ते दहशतवादी होते, हे ही दहशतवादीच होते असे माझे स्पष्ट मत आहे. देशाविरूद्ध कारवाया करणारी कुठलीही व्यक्ती दहशतवादीच असते. आणि ती जर दहशतवादी संघटनेतली असेल तर तीला वेगळे दहशतवादी सिद्ध करायची किंवा म्हणायची गरज नाही. ते उगाच पिवळा पितांबर म्हटल्यासारखेच आहे.

महेश_कुलकर्णी's picture

20 Feb 2014 - 5:40 pm | महेश_कुलकर्णी

५५ कोटींचे बळी, गांधी हत्या व मी ही पुस्तके जमेल तेव्हा एकदा कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता वाचावीत.
बाकी जर-तर वर जास्त बोलण्यात तसा काही अर्थ नाही...कारण आपण दोघेही मुद्द्यावर ठाम राहणार आणि त्यातून सिद्ध काहीच करता येणार नाही.

थॉर माणूस's picture

20 Feb 2014 - 5:56 pm | थॉर माणूस

'गांधीहत्या आणि मी' वाचलेलं आहे. म्हणूनच तर वरती ३र्‍या प्रयत्ना आधीचे लिखाण वाचायचे आहे असं म्हटलंय.

५५ कोटींचे बळी वाचलेलं नाही. पण ५५ कोटींच्या सुरस कथा इतक्या वेगवेगळ्या आहेत की इतिहास कुठला आणि कादंबरी कुठली हा प्रश्न पडावा.

बाकी, चर्चेचा मुद्दा वेगळा आहे... माझ्या मते राष्ट्रीय नेत्यांचा खून करणारे नथुरामसहीत सगळे खुनी आणि दहशतवादीच आहेत, सगळ्यांना समान मापे आणि समान शिक्षाच हवी. आणि त्यावर राजकारण व्हायला नको.

आताच्या कशातही राजकारण शोधणार्‍या जगात हे शेवटचे दोन जवळपास अशक्य आहेत हे मान्य करत आमची रजा...

प्रसाद गोडबोले's picture

20 Feb 2014 - 6:07 pm | प्रसाद गोडबोले

बाकी, चर्चेचा मुद्दा वेगळा आहे... माझ्या मते राष्ट्रीय नेत्यांचा खून करणारे नथुरामसहीत सगळे खुनी आणि दहशतवादीच आहेत, सगळ्यांना समान मापे आणि समान शिक्षाच हवी.

मदनलाल धिंग्रा , अनंत कान्हेरे ह्यांच्या विषयी आपली काय मते आहेत हे जाणुन घ्यायला आवडेल.

थॉर माणूस's picture

21 Feb 2014 - 12:31 pm | थॉर माणूस

या दोघांनी कुठल्या राष्ट्रीय नेत्यांचे खून केले होते? यांच्या मृत्यूच्या आणि भारत स्वतंत्र झाला त्या दिनाच्या मधे बराच फरक असावा नाही?

तुम्हीच ठळक केलेली माझी वाक्ये मला जे म्हणयाचं होतं ते सांगतायत. बाकी, तुम्ही गाडी दुसर्‍या ट्रॅकवर टाकत आहात. तेव्हा तिकडच्या रस्त्याला जायला वेगळा धागा काढा, उत्तर द्यावे वाटले तर लोक येतीलच. उगाच इथे विषयांतर नको.

प्रसाद गोडबोले's picture

21 Feb 2014 - 1:31 pm | प्रसाद गोडबोले

ट्रॅक बदलत नाहीये . ह्या लोकांनी ज्यांचे खुन केले ते सरकारी ऑफीसर्स होते , जे त्यांच्या नेत्यांचे प्रतिनिधित्ब करीत होते .

मला म्हणायचा मुद्दा इतकाच आहे की तत्कालीन ब्रिटीश सरकारने ह्यांना खुनी म्हणुन फासावर लटकवले तसेच भारत सरकारने माथेफिरु नथु ला लटकवले ...

.पण आज आपण मदनलाल , किंव्वा कान्हेरेंना खुनी मानत नाही ... कारण काळ बदलला .... तसेच पुढे मागे काळ बदलेल आणि लोक नथुलाही खुनी मानायचे बंद करतील

शाश्वत सत्य असं काही नसतं ...Its all matter of perceptions !!

आत्मशून्य's picture

21 Feb 2014 - 1:48 pm | आत्मशून्य

तसेच पुढे मागे काळ बदलेल
आणि लोक नथुलाही खुनी मानायचे बंद करतील

शक्य आहे! जगात काहीही घड़ने शक्य आहे. जसे सध्या मी पांडवाना हीरो मानने बंद केलय.

ज्ञानव's picture

21 Feb 2014 - 2:43 pm | ज्ञानव

मी पण रावणाला हिरो म्हणेन कारण बहिणीसाठी त्याने जीव गमावला आणि सीतेला पळवूनसुद्धा साधा विनयभंग हि नाही केला.
कालीयुग्ग का काय ते हेच का ?

आणि सत्य, तर प्रत्येकाचे वेगळे असते.

आत्मशून्य's picture

21 Feb 2014 - 3:01 pm | आत्मशून्य

......!

तसेच पुढे मागे काळ बदलेल आणि लोक नथुलाही खुनी मानायचे बंद करतील

हे असं काही व्हायचे दिवस भारतात माझ्या जीतेपणी येऊ नयेत इतकीच मनोकामना!

सध्या ह्याला राजवट उलथून टाकण्याच्या प्रयत्नांमधले काही प्रयत्न असे म्हणूयात. जर राजवट बदलली नसती तर आजही सरकार दरबारी हे खूनीच ठरले असते. पण राजवट बदलली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, अर्थातच मग आपल्याला इतिहास लिहायची परवानगीसुद्धा मिळाली. त्यानुसार त्यांची पावले जुलमी सत्तेविरूद्ध क्रांतीकारक मानली गेली. स्वतंत्र भारतात जन्मलेला आणि आजही भारताशी एकनिष्ठ असा नागरीक म्हणून मी जुन्या राजवटीविरुद्ध आणि नव्या राजवटीसाठी लढलेल्यांचा अर्थात आदरच करणार. पण स्वतंत्र भारतात घडलेल्या घटनांचा विचार करताना तोच दृष्टीकोन ठेवणे चुकीचे आहे.

त्यानंतर भारतात कुठलेही स्वतंत्रता आंदोलन वगैरे यशस्वी झालेले नाही. त्यामुळे सध्या तरी या इतिहासात काही बदल घडेल अशी अपेक्षा नाही. भविष्यात कुठला नथुराम समर्थक गट किंवा तत्सम कुणी भारतात लोकशाही उलथून नवे राज्य वगैरे आणले आणि नथुरामला नायक बनवले असे काही घडेल? माहिती नाही.

सुहासदवन's picture

22 Feb 2014 - 1:34 pm | सुहासदवन

पिवळा पितांबर कस्तुरी लल्लाटी ||
देव सुरवर नित्य येती भेटी ||

चारच माणसं चर्चा करतायत, काय हे मिपाचं झालं. :-P

बॅटमॅन's picture

20 Feb 2014 - 6:00 pm | बॅटमॅन

गांधीजी व नथुरामचा विषय असूनही अजून शंभरी न भरल्याची एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

क्लिंटन's picture

20 Feb 2014 - 6:21 pm | क्लिंटन

कंटाळा आला असेल बहुदा त्याच त्याच गोष्टीवर पुन्हापुन्हा लिहायचा. सध्या केजरीवालवर धागा काढला की कमितकमी सेंच्युरी नक्कीच.आणखी काही महिन्यांनी केजरीवालवरच्या धाग्यांवरही प्रतिसाद येणे कमी होईल. :)

बॅटमॅन's picture

20 Feb 2014 - 6:40 pm | बॅटमॅन

अगदी खरंय.

बायदवे हाफ सेञ्च्युरी!!!

कावला असेल. नथुराम जिवंत असतातर त्याने स्वःताला जाहिरपणे फासावर चढवले असते.

चैतन्य ईन्या's picture

20 Feb 2014 - 10:42 pm | चैतन्य ईन्या
माहितगार's picture

21 Feb 2014 - 3:06 pm | माहितगार

चैतन्य ईन्या आपण दिलेल्या तूनळ्या पाहिल्या नाहीत पण त्या "तारेख फता" ची फटाफट मुलाखत टाईमस ऑफ इंडीयावर वाचण्याचा योग आला. त्यांच्या काशिर आणि बलुचिस्तान भूमिकेत सुधारणेस वाव आहे पण सर्वात महत्वाचे आमच्या १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश या धाग्याला उत्तम होप आहे तर; चैतन्य ईन्या धन्यवाद

विटेकर's picture

21 Feb 2014 - 2:36 pm | विटेकर

गांधी हत्येनंतर महराष्ट्रात ब्राहमण समाजावर जे अत्याचार झाले त्याच्यामुळे ब्राहम्न समाज अंतर्बाह्य सुधारला. पाच "त"कारापासून ( तक्क्या , तट्टू, तगाई, तांबूल, तस्त ) त्याची सुटका झाली ती कायमचीच !
एका पिढीचे झाले नुकसान पण निदान ब्राह्मणांना कष्टाची किंमत तरी कळली !हा नथुरामने करुन दिलेला फायदा आता ६० वर्षांनी दृगोचर होतो आहे. कालौघात घटनांचे संदर्भ इतके बदलतात !

बॅटमॅन's picture

21 Feb 2014 - 2:57 pm | बॅटमॅन

सहमत आहे.

बाकी तगाई म्हणजे काय?

विटेकर's picture

21 Feb 2014 - 3:05 pm | विटेकर

भाषाप्रभू , तुम्ही हा प्रश्न विचारलात ?
तट्टू- घोडा , कुलकर्णीपणाच्या उचापती करायला
तांबूल - विडा घ्या हो नारायणा
तस्त - तांबूला नंतर तस्त येणारच , उठून थुंकायची तसदी कोण घेणार ?
तक्क्या -तांबूल / तस्त नंतर तक्क्या अपरिहार्य ! दुपारचे जेवण चेपले की झाले आडवे , संध्याकाळ पत्तुर चिंता नाय !
तगाई- सदासर्वादा कर्जात , तगाई - कर्ज

बॅटमॅन's picture

21 Feb 2014 - 3:11 pm | बॅटमॅन

धन्यवाद विटेकरजी :)

बाकीचं माहिती होतं, पण तगाईचा नेमका अर्थ ठौक नव्हता. धन्स!

प्रसाद गोडबोले's picture

21 Feb 2014 - 3:06 pm | प्रसाद गोडबोले

गांधी हत्येनंतर महराष्ट्रात ब्राहमण समाजावर जे अत्याचार झाले त्याच्यामुळे ब्राहम्न समाज अंतर्बाह्य सुधारला.

१००% अनुमोदन ! आमचे ( आजोबांचे) गावाकड्चे घर जळाले पुढे उरली सुरली जमीनही गेली कुळकायद्यात ... मग पोटापाण्याच्या निमित्ताने आजोबा सातार्‍याला आले ... आम्ही दिल्ली मुंबै ला आलो .... पुढे मागे पोरं परदेशात स्थायिक होतील ...
जळितकांड झालं म्हणुन बाहेर पडलो ( पडतोय ) ह्या चक्रातुन .... नाहीतर गावाकडं कुठंतरी पत्रिका पंचांगात ग्रहतार्‍यांशी खेळत राहिलो असतो देव जाणे ...
खरंच कधीकधी बरंच वाटतं ,झालं हे चांगलंच झालं
जो हुवा अच्छा हुवा , जो होरहा है अच्छा हो रहा है और जो होगा वह भी अच्छाही होगा :)

बाकी

तक्क्या , तट्टू, तगाई, तांबूल, तस्त

>>> ह्यातील तट्टू तगाई तस्त म्हणजे काय ?

रामदासकाकांच्या एका लेखात एक अप्रतिम वाक्य आहे.

"जे कूळकायद्यानं गमावलं ते सिलिकॉन व्हॅलीनं कमावलं".

यातच याचे सार सामावले आहे.

चैतन्य ईन्या's picture

21 Feb 2014 - 3:43 pm | चैतन्य ईन्या

होय पण ते पण लोकांच्या डोळ्यावर येतय. कष्ट करून पुढे गेलेल पण पाहवत नाही आणि स्वतःही काही करवत नाही. मग उठसुठ नथुरामला शिव्या द्यायच्या

लोकांना घाला १२ गडगड्याच्या व्हिरीत.

पण बाकी नथुराम वाय झेड होता असे माझे म्हणणे आहे. असो.

चैतन्य ईन्या's picture

21 Feb 2014 - 3:59 pm | चैतन्य ईन्या

त्यात काही शंकाच नाही हो. पण दुख ह्याचे आहे की अजूनही काही जनता नाथूचा उदो उदो करते आणि तितकेच लोक त्याच्या नथीमागून बमान्नाना शिव्या घालतात. असो

बॅटमॅन's picture

21 Feb 2014 - 4:02 pm | बॅटमॅन

सहमत आहे.

विटेकर's picture

21 Feb 2014 - 4:02 pm | विटेकर

खरंच कधीकधी बरंच वाटतं ,झालं हे चांगलंच झालं

ब्राह्मण समाजाचे खरोखरच चांगले झाले यात वाद नाही ! एकतर ९८ % लोकांनी गावे सोडली , उरलेल्या २ % लोकांचा एक पाय गावाबाहेर पडला आहेच / या पिढीत पडेलच !
पण बहुजन समाजाचे काय ? ज्या ब्राह्मण समाजाकडे त्यांचे उत्तरदायित्व होते, ते तर गावाबाहेर पडले आणि त्यांनी स्वतः चे भले करुन घेतले! बाकीच्यांचे काय ? जे माय- बाप सरकार त्यांचे भले करणार अशी हाकाटी होती , ते तर पांढर्‍या बगळ्यांनी ओरबडून खाल्ले , आरक्षणाचा फायदा किती टक्क्यापर्यंत पोहोचला ?राज्यकर्त्या जमातीवर आरक्षणाचे कटोरे घेण्याची पाळी का आली ?
एका तात्कालिक उन्मादामुळे पिढ्यांपिढ्या संभाळलेली सामाजिक रचना कोलमडून पडली आणि नव्या व्यवस्थेत " बळी तो कान पिळी " हा जंगल कायदा अस्तित्वात आला ! ब्राह्मण समाजाने आपल्या कोअर मध्ये काम करुन आपले काम साधून घेतले, आता बाकीच्यांचा वाली कोण ?
( आमचे एक कराडचे काका ( वय ८५) म्हणाले , तेव्हा "आमची" घरे जाळलीत आता "तुम्हाला" आत्महत्या कराव्या लागतात ..स्वाभाविकच आहे म्हणा , आम्हाला गावाबाहेर काढले , गावातील कीर्तने , प्रवचने बंद झाली, पाठीवर हात ठेऊन समजाऊन सांगणार कोण ? ...) हा " आमचे - तुमचे " भेद किती वाईट आहे!
आणि त्या तात्कालिक उन्मादाला ब्राह्मण समाज जबाबदार नव्हता की काय ? त्यांच्यावरील पिढ्यांपिढ्याचा राग एका घट्नेवाटे बाहेर पडला (वावट्ळ - व्यंकटेश माडगुळकर)
तेव्हा , जे झाले ते व्यापक समाज हिताच्या दृष्टीने फारसे चांगले झाले असेही म्हणवत नाही !
गांधी हत्येचे असेही दूरगामी परिणाम आहेत, जे कुळ कायद्याने अधिक तीव्र केले !
( बट्ट्मन - आपली यावर एकदा चर्चा झाली आहे , आठवते का ? )

बॅटमॅन's picture

21 Feb 2014 - 4:05 pm | बॅटमॅन

येस, आठवते आहे.

बाकी या घटनेस बरेच पदर आहेत खरे. ते यथावकाश पुढे कधीतरी समजेल तसे मांडीन.

चैतन्य ईन्या's picture

21 Feb 2014 - 4:12 pm | चैतन्य ईन्या

कालच चानेल ४ का बीबीसी २ वर सावूथ आफ्रिकेत सध्या गोर्यांवर काय वेळ आली आहे आणि ते आता झोपडपट्टी मध्ये जावून राहतात ह्याचे चित्रण होते. बाकी हे चित्रण एका काळ्या माणसाने केले होते. एका बाजूला काही शतके झालेला अन्याय त्यामुळे काळ्यांच्या मनात साचलेला राग आणि दुसऱ्या बाजूला सध्याच्या गोऱ्या लहान मुलांचे भवितव्य ह्यामुळे तो काळा फारच दुखी झालेला होता. ह्याला काहीच सोलूशन आहे असे मला वाटले नाही. हां झगडा संपणे कठीण आहे.

श्रीगुरुजी's picture

21 Feb 2014 - 11:15 pm | श्रीगुरुजी

>>> गांधी हत्येनंतर महराष्ट्रात ब्राहमण समाजावर जे अत्याचार झाले त्याच्यामुळे ब्राहम्न समाज अंतर्बाह्य सुधारला. पाच "त"कारापासून ( तक्क्या , तट्टू, तगाई, तांबूल, तस्त ) त्याची सुटका झाली ती कायमचीच !
एका पिढीचे झाले नुकसान पण निदान ब्राह्मणांना कष्टाची किंमत तरी कळली !हा नथुरामने करुन दिलेला फायदा आता ६० वर्षांनी दृगोचर होतो आहे.

+ १

महाराष्ट्रातील ब्राह्मणांचे आजवर एकूण ३ वेळा स्थित्यंतर झाले. औरंगजेबाच्या मृत्युनंतर बाळाजी विश्वनाथांना पेशवेपदाची सूत्रे मिळाल्यावर जवळपास १०० वर्षे ब्राह्मण राज्यकर्ते होते. त्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक ब्राह्मण सरदार व मुत्सद्दी होते. पण १७०७ नंतर ते प्रथमच राज्यकर्ते झाले.

त्यानंतर १९४८ नंतर गांधीवधानंतर झालेली जाळपोळ हा त्याआधी काही दशके ब्राह्मणविरोधी वातावरण निर्माण केले गेले होते त्याचाच उद्रेक होता. पण ही ब्राह्मणांसाठी इष्टापत्ती ठरली. जाळपोळीपाठोपाठ राखीव जागा, राजकारणातून हद्दपारी, कूळकायदा इ. गोष्टींमुळे ब्राह्मण शहरांकडे वळून त्यांची उत्तरोत्तर प्रगतीच झाली.

त्यानंतर १९९०-९१ मध्ये मंडल आयोगाच्या शिफारशींमुळे राखीव जागांचे प्रमाण २२.५ % वरून ४९.५ % पर्यंत वाढल्यामुळे शिक्षण व सरकारी नोकरी हे क्षेत्र ब्राह्मणांसाठी अजूनच आकुंचित झाले. पण ही पण इष्टापत्तीच ठरली. यानंतरच्या काळात ब्राह्मण मोठ्या प्रमाणात संगणक, आर्थिक क्षेत्र, प्रसारमाध्यमे, मालिका-चित्रपट इ. खाजगी क्षेत्रात गेले. परदेशी जाऊन स्थायिक होण्याचेही प्रमाण वाढले.

आता पुन्हा एकदा स्थित्यंतराची वेळ आलेली आहे. २०१४ मध्येच महाराष्ट्र सरकार नवीन विधेयक आणून उर्वरीत खुल्या ५० टक्के जागांपैकी किमान २०-२५ टक्के जागा मराठा जातीसाठी राखीव ठेवण्याची शक्यता आहे. तसे झाले तर शिक्षण व सरकारी नोकरी हे ब्राह्मणांसाठी अजून अवघड होतील. पण त्याही परिस्थितीत ब्राह्मण मार्ग काढतील अशी माझी खात्री आहे. परदेशी स्थलांतर करणे किंवा इथेच राहून नोकरीच्या ऐवजी व्यवसायात गुंतणे हे पर्याय ब्राह्मण स्वीकारतील असे वाटते. अजून अंदाजे २०-२५ वर्षांनी म्हणजे २०३५ नंतरच ब्राह्मणांनी या आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर केले आहे का ते समजेल.

सामान्य भिक्षूकी करून दारिद्र्यरेषे खाली जीवन कंठणार्‍यांना जमीनदाराच्या पंक्तीला बसण्याचा मान आणि तांबूल पर्याय नसलेला विराम या पलिकडे काही मिळत नसावे. तक्क्या , तट्टू, तगाई, तांबूल, तस्त हि स्वातंत्र्यपुर्व सर्वच जमिनदार आणि महसूली यंत्रणेचे चित्र होते.

बर्‍याच मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण होते जमिनदारी आणी महसुली यंत्रणेतील सर्वच ब्राह्मण होते हा निष्कर्ष कदाचित तपासून पहावा लागेल. कोणतीही वडलोपार्जीत समृद्धी सात पिढ्यांच्या पुढे सहसा जात नाही ती कधीतरी संपावयाची होती ती संपली आणि हा समाज स्वतःच्या पायावर उभाटाकण्यास धडपडू लागला हे बरे झाले हे निश्चित.

शासकीय नौकरीच्या निमीत्ताने/आमिषाने महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज शेती अवलंबीत्व ब्रिटीशांच्या १८१८ च्या आगमना नंतर हळूवार सोडावयास लागलाच होता यात दुष्काळा सारखी कारणंही समाविष्ट होती. १८४८ मध्ये महात्मा फुलेंनी बहुजन शिक्षणाची आणि ब्राह्मणेतर चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. आणि ( तक्क्या , तट्टू, तगाई, तांबूल, तस्त ) या गोष्टी किमान ब्रिटीश शासित प्रदेशात आणि किमान ब्राह्मण जमीन मालकांकरता चॅलेंज आणि खिळखिळ्या होऊ लागल्या. निजाम शासित प्रदेशात अधिक वेळ लागला असावा पण त्यांच्या करता तो बदल ब्रिटीश शासित प्रदेशा पेक्षा अधिक शॉकींग असा असावा. महसूल गोळा करण्याचे अधिकार गेले प्रिव्ही पर्स बंद झाल्या कमाल जमीन धारणा कायदे आणि कुळ कायदे आले. त्यामुळे तगाईची आणि तट्टूचे (कारण स्वातंत्र्यापुर्वी ग्रामीण भागात फारसे रस्ते नसत त्यामुळे बहुतांश सारा वसूली तगाईची कामे तट्टूवरून केली जात.) काम संपले. उरलेला पैसा संपे पर्यंत नौकरीची सवय नसलेल्या पिढीत तक्क्या , तांबूल, चालू होते तस्तही हरवले.

ब्राह्मणेतर चळवळीचा प्रभाव; महसूल गोळा करण्याचे अधिकार जाणे प्रिव्ही पर्स बंद होणे; कमाल जमीन धारणा कायदे आणि कुळ कायदे गांधी हत्या झाली नसती तरीही झालेच असते. पाच "त"कारापासून ( तक्क्या , तट्टू, तगाई, तांबूल, तस्त ) स्वांतत्र्योत्तर काळात सुटका झाली आणि हा सर्व इतिहास मान्य केलाकी गांधी हत्या झाली नसती तरीही हे सर्व घडलेच असते किंवा कसे म्हणुन विटेकरांनी मांडलेला कार्यकारण संबंध पुन्हा तपासून पाहण्याची गरज आहे का असे वाटते.

महात्मा फुल्यांनी १८४८ मध्ये

१८४८ ते १९४८ या दोनवर्षातील चक्क १०० वर्षांचे अंतरही लक्षात घेतले पाहिजे असे वाटते.

काळा पहाड's picture

21 Feb 2014 - 5:38 pm | काळा पहाड

म्हणून नथुराम उजवा ठरतो.....

अजिबातच नाही. काँग्रेस ने पाकिस्तान ला ५५ कोटी दिले काय किंवा नाही काय फरक पडत होता? बहुजन समाज होता ना द्यायला? काय गरज होती समाजोद्धाराची? मरू द्यायचं ना या अडाणचोटांना!

कपिलमुनी's picture

21 Feb 2014 - 6:20 pm | कपिलमुनी

राजीव गांधींच्या मारेकर्‍यांनी सुद्धा वैयक्तीक कारणांसाठी हत्या केली नाही .. तमिळ लोकांच्या दृष्टीकोनातून ते हीरो आहेत.. नथुराम किंवा मदनलाल धिंग्रा , अनंत कान्हेरे यांच्या पंक्तीत त्यांना बसवायचे का ??

मदनलाल धिंग्रा , अनंत कान्हेरे यांनी केलेल्या हत्या भारतीयत्वाच्या दृष्टीकोनातून योग्य असतील , तर राजीव गांधींची हत्या योग्य ठरते ??

महेश_कुलकर्णी's picture

21 Feb 2014 - 8:28 pm | महेश_कुलकर्णी

वरील लेखात कुठे वैयक्तिक कारण असा उल्लेख आला आहे का?
फरक हा आहे की राजीव गांधीचा खून हा संकुचित भाषावादाच्या अस्मितेतून झाला आहे तर नथुरामने अखंड भारत राहण्यासाठी (हैदराबाद वेगळे होवू नये यासाठी) बापूंना मारले.
कृपया संभ्रमात पडू नये..

विकास's picture

21 Feb 2014 - 9:23 pm | विकास

नथुराम किंवा मदनलाल धिंग्रा , अनंत कान्हेरे यांच्या पंक्तीत त्यांना बसवायचे का ??

नथुरामला तुम्ही मदनलाल धिंग्रा आणि अनंत कान्हेरेंच्या पंक्तीत बसवत आहात का? ते आक्षेपार्ह आहे. एकाने स्वतंत्र राष्ट्रात (राष्ट्रपिता म्हणून देखील नाही अगदी साधे) एका नि:शस्त्र व्यक्तीचा खून केला. ती त्याच्या दृष्टीने राजकीय हत्या असेलही पण अक्षम्यच आहे.

तर दुसरीकडे, मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे यांनी वायली आणि जॅक्सनचे "वध" केले कारण ते परकीय सत्तेचे प्रतिक होते. आणि त्यांना गुन्हेगार या अर्थाने खुनी म्हणायचे असले तर ब्रिटीशांच्या संपूर्ण खानदानाला आणि तत्कालीन ब्रिटीश राज्यकर्त्यांना गुन्हेगार आणि खुनीच म्हणावे लागेल. कारण त्यांनी तेच तर केले. त्याला उत्तर म्हणून जर कोणी त्या वेळेस योग्य वाटले म्हणून हत्यार उचलले असले तर त्यात गैर काहीच नाही. साधे लोकलट्रेन मधे गर्दीत कुणाचा घुसताना पाय पायावर पडला तर पब्लीक खेकसतं, इथे तर देशाला पारतंत्र्य आले होते आणि जनतेचे हाल देखील केले जात होते. आणि पारतंत्र्याच्या मुकाबल्यासाठी शस्त्र घेणे म्हणजे दहशतवाद असेल तर तसे काय जॉर्ज वॉशिंग्टनपण दहशतवादी ठरतील. एखाद्या अमेरीकन समोर असे म्हणून बघा काय मत होते ते...

मदनलाल धिंग्रा , अनंत कान्हेरे यांनी केलेल्या हत्या भारतीयत्वाच्या दृष्टीकोनातून योग्य असतील, तर राजीव गांधींची हत्या योग्य ठरते ??

प्रामाणिकपणे ह्या प्रश्नाला माझ्या लेखी सोपे उत्तर नाही... तरी देखील एका वाक्यात - राजीव गांधींची हत्या अयोग्यच ठरते.

आता किंचित स्पष्टीकरणः श्रीलंकेच्या स्वातंत्र्यानंतर तिथल्या स्थानिक तमिळ जनतेस कायम सापत्नभावाची वागणूक मिळालेली आहे. ती उत्तरोत्तर अधिकच अन्यायकारक होत गेली. त्याची परीणिती लिट्टे तयार होण्यात आणि प्रभाकरन सारखा तिथल्या तमिळांना सुरवातीस हिरो वाटेल असा नायक तयार होण्यात झाली. पण ह्या प्रभाकरनमुळेच एका अर्थाने कुठलीही तडजोड न झाल्याने नागरी युद्ध सुरू झाले. प्रभाकरन हा केवळ नेता न रहाता गुंड झाला ज्याचे दुष्परीणाम असंख्य तामिळींना भोगावे लागले आहेत (ज्यातील काही मी जवळून पाहीले आहेत). पुढे राजीव गांधींनी श्रीलंका सरकारच्या मदतीस शांतीसेना पाठवायची आणि भारतासाठी व्हिएतनाम तयार केला. सैनिकांचे हाल झाले आणि श्रीलंकेतील तामिळ जनतेचे देखील हाल अधिक झाले (ऑपरेशन पवन). त्या आधी राजीव-प्रभाकरन भेट झाली होती, त्यांच्यात करार झाला होत, वगैरे बरेच काही आहे, म्हणले जाते पण त्यातले खरे किती ते माहीत नाही. पण त्याचा सगळ्यास राजीव गांधी कारण आहेत असे लिट्टेला वाटले आणि मला वाटते पहीलाच ह्युमन बाँब तयार केला गेला. पण त्याचा सगळ्याचा परीणाम हा भारत श्रीलंकन तमिळींच्या विरोधात जाण्यात झाला. तामिळनाडूत मदत मिळाली असेल कदाचीत पण देशाकडून मिळणारी रसद थांबली. नंतरच्या काळात (९१ सालानंतर) जे काही संगणकक्षेत्रामुळे झपाट्याने बदल झाले त्यात तामिळनाडूचे स्वतःच्या भाषा - संस्कृतीबद्दलचा अतिरेकी अभिमान राहीला असेल कदाचीत पण आपण वेगळे आहोत आणि स्वतंत्र तमिळीस्तान वगैरेची कल्पना लोप पावत गेली. शेवटी त्या प्रभाकरनला स्वतःच्या मुलाला मुद्दामून डोळ्यासमोर मारलेले बघून मरावे लागले. पण ते त्याच्या कर्माचे फळ होते, झालं!

प्रसाद गोडबोले's picture

24 Feb 2014 - 10:01 pm | प्रसाद गोडबोले

वर आधीच मुद्दा मांडला आहे , अनंत कान्हेरे , मदनलाल धिंग्रा हे तत्कालीन परीस्थितीत खुनी होते मग पुढे भारत ताब्यात आल्यावर त्यांना आपण "धेशप्रेमी कांतिकारक" घोषित केले ....पुढे मागे ... नथुराम चे ही तसे होवु शकेल ...

सगळा काळाचा महीमा आहे ...

कालोsह्यं निरवधीर्विपुला च पृथ्वी ||

आत्मशून्य's picture

21 Feb 2014 - 9:24 pm | आत्मशून्य

दश्कांचा लढा महासत्तेविरुध्द अहिंसेने यसस्वी दिला अख्खा देश ज्यातुन एकसंध बनवला असे तत्वद्न्यानजन्माला घालून यशस्वी जोपासले आशा जागतिक पातळिवरिल नेत्याने दोन दिवसात म्यान केले असते तर तर खरी गंमत आली असती नाही ? एखाद्याच्या प्रभावाखाली गेले, अन्ना हजारे अथवा केजरीवाल झालाय, अथवा अगदीच गेला बाजार अर्ध्या हळकुंडाच्या पिव्ळ्या वाकड्या नि हमखास बायपोलार निदान तर केले च असते ;)

आत्मशून्य's picture

21 Feb 2014 - 9:30 pm | आत्मशून्य

गांधीजी अचानक आक्रमक वगैरे झाले असते तर्च्या या गोष्टी म्हणा.!

हुप्प्या's picture

22 Feb 2014 - 4:44 am | हुप्प्या

मागे वळून बघताना असेच वाटते की नथुराम गोडसेने गांधींना मारून चूक केले. गांधी संपला पण गांधीवाद कायमचा बोकांडी बसला. भारतात दुसरा कुठला सत्पुरुष होऊन गेला की नाही अशी शंका येण्याइतपत ह्या माणसाचा उदोउदो सुरू झाला. प्रत्येक नोटेवर गांधी छापण्याचा खुळचटपणा हे एक उदाहरण.
अर्थात १९४८ साली नंतर काय घडेल हे कळण्याचा मार्ग नव्हता हे ही खरे. पण गांधी जगले असते तर गांधीवाद लवकरच हास्यास्पद झाला असता असा माझा ठाम विश्वास आहे. फाळणीच्या आगीत होरपळलेल्या एखाद्या निर्वासिताने गांधींचा निकाल लावला असता तर कदाचित त्या खुन्याला माथेफिरु वगैरे म्हटले गेले नसते.
फाळणी होताना आणि झाल्यावर गांधींना केवळ मुस्लिम निर्वासितांचीच चिंता होती. हिंदूबद्दल काहीही सहानुभूती नव्हती असेच दिसते.

तमाम महाराष्ट्रातील ब्राह्मण जातीवर त्या हत्येनंतर जे अत्याचार झाले ते सर्वथा निंदनीय होते. त्यामुळे ब्राह्मणांचे आणि समाजाचे नुकसान झाले. जरी ब्राह्मण त्याल पुरून उरले असले तरी काही क्षेत्रातून ब्राह्मण कायमचे हद्दपार झालेले आहेत. जसे राजकारण. मोजके अपवाद वगळले तर बहुतेक राजकारणी हे मराठा वा अन्य तथाकथित मागास जातींभोवतीच फिरते. चूक की बरोबर ते वेगळे पण पिढ्यानपिढ्या बुद्धीवादी म्हणून वागवलेला एक वर्ग राजकारणात शिरला असता तर कदाचित समाजाचा फायदा झाला असता. टिळक, सावरकर, आगरकर, गोखले, कर्वे अशी उदाहरणे आहेतच. पण नंतर हे प्रमाण कमी झाले. दंगलींनंतर बहुधा ब्राह्मण समाज हा बहुतांश आत्मकेंद्रित बनला असावा.
अर्थात ह्यामुळे वेगळ्या क्षेत्रात लोकांनी आपली चमक दाखवायला सुरवात केली हेही खरे.

अन्यथा नथुरामचा अतातायिपणा आणी समाजपरिणाम असे शिर्षक, लिखाण हवे. गांधिंपुर्वी विवीध जातीधर्माचे अनेक थोर क्रांतिकारी होउन गेले (नाइलाजानेच हे वाक्य लिहताना एक भारतिय म्हणून मला अतिशय लाज वाटली आहे. सुज्ञांनी मला यासाठी क्षमा करावी) परंतु अख्या भारताचा एकसमान शत्रु इंग्रज असुनही भारत हा एक संलग्न देश आहे आणि या देशाने एकजुटिने इंग्राजाविरुध लढा उभारायचा आहे ही जाणिव फक्त महात्मागांधिच्या लढ्यातुनच जनसमुदायात निर्माण झाली पसरत गेली. थोडक्यात भारत एकसंध राष्ट्र बनायची निर्मीतीप्रक्रिया केवळ गांधिजींमुळे निसंशय सुरु केली/झाली. ज्याला पुर्णत्व अर्थातच सरदार पटेलांनी दिले. अन्यथा एंग्रज एकाचा शत्रु अन दुसर्‍याचा मित्र किंव्हा त्याचा लढा तो देइल माझा लढा मी असा प्रकार असे.

राजकिय ह्त्या पौराणीक काळापासुन पृथ्विवर सर्व देशात होत आल्याच आहेत (अगदी उसगावही अपवाद नाही). म्हणून हत्येमागील उद्देश साध्य करता आला नसेल तर हत्या जस्टीफाय करणे कधिच शक्य होत नाही, कारण सर्व काही बोलाचीच कढि अन बोलाचाच भात उरते. यातुन प्रत्यक्ष हत्येचे समर्थन तर होत नाहीच पण त्याचे जे कॉन्सिक्वेंन्सेस असतात त्याचीही किंमत मोठी असते अन या दोन्हीच्या परिणामात हत्येच्या निर्णयाबाबत खरी चर्चा नक्कि कशाबद्दल करायची यात बहुतांश गोंधळुन जातात.

फाळणीच्या आगीत होरपळलेल्या एखाद्या निर्वासिताने गांधींचा निकाल लावला असता तर कदाचित त्या खुन्याला माथेफिरु वगैरे म्हटले गेले नसते.

ही तर अतिशयोक्तीला विनोदाची झालरही आहे...!

आज ६० वर्षांनंतरही त्याचे सर्व पक्षांकडुन निव्वळ राजकारण केले जाते ज्यात सर्वसामान्यजनहितांचा वेळोवेळी बळी जातोय ही एकमेव गोष्ट जरी टाळता आली तर भारताच्या कोणत्याही स्वातंत्र्यसैनीकाचे बलिदान खर्‍या अर्थाने व्यर्थ गेले नाही असे मानता येइल.

हुप्प्या's picture

25 Feb 2014 - 11:24 am | हुप्प्या

>>ही तर अतिशयोक्तीला विनोदाची झालरही आहे...!

मुद्द्याला उत्तर देता येत नसल्यामुळे विनोदाची झालर वगैरे पुस्ती जोडताय का?

भारत एकसंध बनायचे श्रेय फाळणीच्या जन्मदात्याला देणे हा खरा विनोद आहे.

टिळकांना तेल्या तांबोळ्यांचे पुढारी असे तुच्छतेने म्हटले जात असे. पण त्याच्यामागचा अर्थ असा आहे की त्यांनी स्वातंत्र्यलढा सामान्य लोकांपर्यंत नेला. तेव्हा निव्वळ गांधीजींना त्याचे श्रेय देणे हे ढोंगीपणाचे आहे. गांधीजींचे योगदान कुणी नाकारत नाही पण त्यांचा अतिरेकी मुस्लिम अनुनय अक्षम्य आणि नुकसानकारकच होता. त्याची घातक फळे आजही भोगत आहोत.

ह्म्म... त्याचे श्रेय इंडिअन नॅशनल कोन्ग्रेसला (तेव्हाच्या) देणे योग्य ठरेल. गांधींच्या व्यक्तीगत करिश्म्याला कोंग्रेस ची साथ मिळाली नसती तर हे होणे तसे कठीण होते.

श्रीगुरुजी's picture

25 Feb 2014 - 2:04 pm | श्रीगुरुजी

भारतातला पहिला अतिरेकी हैद्राबादमधील अब्दुल रशीद हा होता. त्याने स्वामी श्रध्दानंदांचा खून केला होता. याच अब्दुल रशीदला नंतर गांधींनी भाई असे म्हटले होते.