गिलक्या (घोसाळी) चे भजी

आरोही's picture
आरोही in पाककृती
16 Feb 2014 - 9:30 pm

bhaji

साहित्य :1 गिलके ,१ वाटी बेसन ,एक चमचा लाल तिखट,अर्धा चमचा हळद,एक चमचा ओवा ,थोडी कोथिम्बिर चिरून,मीठ चवीनुसार ,तळण्यासाठी तेल, पाणी .

कृती : गिलके धुऊन पुसून घ्या .
त्याच्या गोल गोल बारीक चकत्या करा
आता बेसनात लाल तिखट,हळद, मीठ,ओवा,कोथिम्बिर घालून भाज्यांचे पीठ भिजवून घ्या .

आता कढाई मध्ये तेल तापायला ठेवा.
तेल तापल्यावर त्यात गिलक्याचे काप बेसन मध्ये घोळवून तळून घ्या .

मस्त गरम गरम गिलक्याचे भजि खायला द्या.

मी हे आज च केले आहेत ,सोबत गरम भात ,साधा पण अत्यंत चविष्ट असा दालकांदा ,आणि शेंगदाण्याची चटणी असा फक्कड बेत आहे.

1

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

16 Feb 2014 - 9:34 pm | प्यारे१

वड ए वड!

लई भारी. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Feb 2014 - 9:46 pm | अत्रुप्त आत्मा

छळ आहे हा........! पहिला फोटू इतका कातिल टाकून काडी लावली,आणि शेवटी प्लेटीत जे काही एकत्र आणलय... ते पाहून वैश्वानर-जठराग्नीने एक प्रदिप्त आरोळी पोटात मारली आहे...!

अत्रन्गि पाउस's picture

16 Feb 2014 - 9:54 pm | अत्रन्गि पाउस

पोटात कावळे काव काव करतांना हे म्हणजे अत्याचारच आहेत...

मला एक कळत नही कि कांदा/बटाटा/पालक वगैरे भजी मिळतात तिथे गील्क्याची भजी का मिळू नये ?

असो...उद्या गील्क्याची भजी इजे मष्ट .!!!!

घोसाळे किदर मिला तुमको , आमच्याकड पावसाळ्यात मिळतात फक्त . पाक्रु मस्तच बाकी घोसाळे फक्त तेलात परतुन खाले तरी भारी लागतात .

अत्रन्गि पाउस's picture

16 Feb 2014 - 9:55 pm | अत्रन्गि पाउस

कालच आणले आहेत...:)

मुक्त विहारि's picture

16 Feb 2014 - 10:33 pm | मुक्त विहारि

रेसीपी पण कातील....

आयला, एक जबरदस्त मिपा बल्लव संमेलन भरवू या का?

सं.मं. जरा मनावर घ्या...घ्या म्हणजे काय घ्याच....

मी आयोजकत्व स्वीकारायला तयार आहे.

ठि़काण, अर्थात डोंबिवलीच...

स्वाती दिनेश's picture

16 Feb 2014 - 10:40 pm | स्वाती दिनेश

घोसाळ्याची भजी अत्यंत आवडती..
पहिल्या फोटोतली भज्यांची प्लेट पळवावीशी वाटत आहे..
स्वाती

मुक्त विहारि's picture

16 Feb 2014 - 10:56 pm | मुक्त विहारि

ते डायेट गेले खड्यांत....

आरोही's picture

16 Feb 2014 - 11:08 pm | आरोही

सर्वांचे आभार .....
आणि माझ्याकडे मी बनविलेल्या सर्व पदार्थांचे फोटो आहेत ते मला कलादालन मध्ये टाकायचे होते पण
error येतो आणि टाकता येत नाहीयेत ...
काय बोलता बघायचे आहेत का सर्वाना??????????
सर्वांचा होकार असेल तर टाकेन ..
आणि पाककृती सदरात टाकता येतील का? recipe नसली तर चालेल ????

साती's picture

17 Feb 2014 - 11:25 am | साती

वर्च्युअल मेजवानी किंवा अश्याच काही प्रकाराचं नाव द्या धाग्याला.
प्रत्येक पदार्थाच नाव आणि फोटो असं स्वरुप ठेवा.
इंटरेस्टींग वाटणार्या प्रकारांची विचारणा होईल, मग त्यांच्या पाकृ टाका.

भजी छान कुरकुरीत दिसतायत, तुम्ही फकस्त फोटू असले तर कला दालनात टाका. पाकृ विभाग हा फक्त पाकृ आणि सोबत फोटू यांच्यासाठी आहे. पाकृंचे फोटू देताना लाळेर्‍यांची सोय करा. इथे बर्‍याचजणांना आवश्यकता असते. ;)

आरोही's picture

17 Feb 2014 - 11:59 am | आरोही

धन्यवाद रेवति ताइ ,

मि मी कलादालनात फोटो टाकणार आहे .........

श्रीरंग_जोशी's picture

17 Feb 2014 - 9:14 am | श्रीरंग_जोशी

गिलक्यांची भजी मला प्राणप्रिय आहेत. आज अनेक वर्षांनी किमान फटू पाहायला मिळून कृतकृत्य झालो.

मदनबाण's picture

17 Feb 2014 - 12:00 pm | मदनबाण

किती अत्याचार आहे हा...

(मूगभजी प्रेमी) :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Feb 2014 - 12:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

घोसाळ्यांची भजी हा अत्यंत आवडता पदार्थ आहे. परवाच हरिहरेश्वरहून येताना माणगावला घोसाळी घेतली होती आणि काल त्यांच्या भज्यांवर ताव मारला ! पैला फतू यकदम हुबेहूब ! परत तोंपासु.

प्यारे१'s picture

17 Feb 2014 - 12:51 pm | प्यारे१

>>> परवाच हरिहरेश्वरहून येताना माणगावला घोसाळी घेतली होती आणि काल त्यांच्या भज्यांवर ताव मारला !

आँ? भारतात आहात?

सौंदाळा's picture

17 Feb 2014 - 12:07 pm | सौंदाळा

मस्त.
भजीचा सगळ्यात आवडणारा प्रकार. उपवास सोडताना बर्‍याचदा असतात ताटात.
उद्याच अंगारकी आहे, घरी सांगतो आजच.

दिपक.कुवेत's picture

17 Feb 2014 - 12:08 pm | दिपक.कुवेत

भजी कातिल दिसत आहेत. ह्या सोबत कोथींबीर-पुदिना चटणी बेस्ट लागेल आणि हो हि भजी मात्र आम्हि आपली वाफाळत्या चहासोबतच खाणार!

सानिकास्वप्निल's picture

17 Feb 2014 - 2:33 pm | सानिकास्वप्निल

भजी आवडली.

आरोही's picture

17 Feb 2014 - 3:01 pm | आरोही

+) धन्यवाद ......

भन्नाट दिसताहेत भज्या... उद्याच्या अंगारीका संकष्टीला शेवटच्या फोटोत असणारा भरलेला ताट जर मिळाला तर क्या कहने...!!!

अनन्न्या's picture

17 Feb 2014 - 5:00 pm | अनन्न्या

झक्कास भजी!

मला गिलक्याची भाजी सुद्धा खुप आवडते.

प्रभाकर पेठकर's picture

22 Feb 2014 - 2:40 pm | प्रभाकर पेठकर

गिलक्यांची भजी आणि भाजी दोन्ही अगदी आवडीची आहे.

इथे मस्कतात मी जेंव्हा नोकरी करीत होतो (१९८१ ते ९०) माझ्या ऑफिस बाहेर एका अरब मदतनिसाने गिलक्यांचा वेल लावला होता. तो एसीच्या पाण्यावर मस्त फोफावला. त्याला फुलं आणि फळं आली पण कोणी खायचे नाहीत. माझा जीव जळायचा. एके दिवशी मी त्या अरबाला १-२ गिलकी घेऊ का विचारलं. त्याला भयंकर आश्चर्य वाटलं. ' आप इसे खाते है?' असे त्याने विचारताच मी आनंदाने 'हो' म्हंटले. तो म्हणाला 'जितना चाहो लेके जाओ।' त्या दिवशी मी पिशवीभर गिलकी घरी नेली. दोन दिवस गिलक्यांची, मुगाची डाळ टाकून केलेली, भाजी आणि भज्यांचा सपाटाच लावला. पुढे पुढे तो अरब स्वतःच गिलकी काढून मला आणून द्यायचा. दुर्दैवाने, पेठकरला फुकटची भाजी मिळते आहे हे मलबार्‍यांच्या डोळ्यात सलू लागले. जो तो गिलकी तोडू लागला (न विचारता). बरे तोडताना काळजी तरी घ्यायची. पण नाही. गिलक्यांबरोबर वेलही ओरबाडला जाऊ लागला. एक गिलके त्याने वेलीवरच सुकविण्यासाठी ठेवले होते. त्याच्या बिया पेरून अजून वेल लावणार होता परंतू ह्या नतद्रष्टांनी तेही तोडून पळविले आणि शेवटी वेल तोडला. त्या अरबाला आणि मला खूप वाईट वाटले. फुकटची भाजी गेली म्हणून नाही. तर वेल जगवून भाज्या पिकवायच्या, त्या अरबाच्या, सृजनशिलतेवरच मूर्खांनी हल्ला केला आणि त्याचा उत्साहच मावळून टाकला. जाऊदे..

आरोही's picture

23 Feb 2014 - 11:43 am | आरोही

खरच वाटले नव्हते कि गिलक्यांचे भजी एवढ्या लोकांना आवडत असतील ...माझ्या ३ वर्षाच्या मुलाला अद्वेय ला पण खूप आवडतात हि भजी ...आता जेव्हा जेव्हा मी गिलक्यांचे भजी करेन तेव्हा मिपाकरांची आठवण येईल ...
आणि सर्व प्रतिसाद कर्त्यांचे पुन्हा आभार ...
पेठकर काका तुम्हाला काही काळ का होईना गिलके मिळाले हे वाचून बरे वाटले ....

पैसा's picture

23 Feb 2014 - 4:30 pm | पैसा

फोटो खासच आलेत!