गाभा:
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Modi-Pawar-secret-meeting/...
http://www.loksatta.com/desh-videsh-news/narendra-modi-sharad-pawar-secr...
केजरीवालांनी सत्ता हाती घेतल्यावर काही दिवसात अपेक्षाभंगाला सुरवात केली.
मोदींनी सत्ता मिळवायच्या आधीच केली की काय असे वाटू लागले आहे. संधीसाधूश्रेष्ठ शरच्चंद्ररावजी पवार मोदींशी हातमिळवणी करण्याबद्दल बोलत आहेत अशी कुजबूज चालू झाली आहे. जाणता राजा काँग्रेसचे भूत आणि भविष्य व्यवस्थित जाणून आहे असे दिसते आहे.
मोदींच्या सत्तेचा सूर्य उगवण्याआधीच राहुकेतू त्याला गिळायला निघाल्यागत वाटते आहे. राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणार असेल तर भाजप सत्तेवर न आलेलाच बरा असे माझे मत.
तशात प्रफुल्लप्रशंसा ऐकून संशयाची पाल पुन्हा पुन्हा चुकचुकत आहे.
देव करो आणि ही अमंगळ युती टळो.
प्रतिक्रिया
31 Jan 2014 - 1:24 pm | अनिरुद्ध प
+१
31 Jan 2014 - 1:33 pm | अत्रुप्त आत्मा
@ ही अमंगळ युती टळो.>>> मलाही असेच वाटते.पण... पॉवरकाका हेच खुद्द मंगळ आहेत. ते कुणाच्याही पक्षराशीला झपाटू शकतात. स्थानिक राजकारणातही त्यांनी बरेच ठिकाणी हव्या'त्या पक्षां'शी युती केलेली आपल्याला पहायला मिळालेली आहेच्च!
31 Jan 2014 - 1:50 pm | प्रसाद१९७१
सहमत
31 Jan 2014 - 1:51 pm | जेपी
अस झाल्यास महायुती गप्प राहील का ?
शेट्टी आणी आठवले यांनी कालच सभेत याला विरोध केला आहे .
31 Jan 2014 - 3:10 pm | प्यारे१
सदीच्छा भेट घ्यायला काय हरकत आहे म्हणतो मी?
मोदी पवार भेटू शकत नाहीत का? ;)
राजकारणाचा भाग असतोय. राष्ट्रवादी निवड्णुकीपूर्वी तरी युतीत येत नाही. सोडून बोला.
31 Jan 2014 - 9:11 pm | अर्धवटराव
बातमी जर मुद्दाम पसरवण्यात आलि असेल तर मेक्स सेन्स...वातावरण निर्मीती चांगली झाली. कदाचीत काँग्रेसनेच बातमी पसरवली असेल. पवारांना युतीच्या माथी मारण्यात काँग्रेसचा खुप फायदा आहे. तसंही सत्ता कोणाचिही आलि तरी पवारांना योग्य तो सन्मान केंद्रात मिळेलच. शिवाय बर्याच ठिकाणिस्थानीक पातळीवर भाजप आणि रा.काँ.ची हात मिळवणी आहेच.
31 Jan 2014 - 11:37 pm | हुप्प्या
शरद पवार आणि सत्य यांचा संबंध म्हणजे ओसामा बिन लादेन आणि धर्मनिरपेक्षता यांच्या संबंधासारखा आहे. ३६ चा आकडा!
त्यामुळे ते काय म्हणत आहेत आणि काय करणार आहेत त्याची संगत लावणे भल्याभल्यांना जमलेले नाही.
तुकाराममहाराज म्हणून गेले की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. त्याच्या बरोब्बर विरुद्ध काय ह्याचे उदाहरण द्यायचे तर शरदरावांकडे बोट दाखवावे लागेल.
राजा हरिश्चंद्राने स्वप्नात दिलेले वचन पाळले म्हणतात. उलट जाणत्या राजाने वचन दिले की दोनचार दिवसांनी आपण साहेबांनी दिलेले वचन स्वप्नात पाहिले असावे असा जनतेला भास होऊ लागतो म्हणतात! असो.
1 Feb 2014 - 12:43 am | अर्धवटराव
पवार एव्हढा क्षुल्लक चान्स घेणार नाहित. मागच्या विधानसभा इलेक्शनच्या वेळी सेनाप्रमुख लंडनला जाऊन पवारांशी संपर्कात होते. हि तर क्रिटिकल लोकसभा निवडणुक आहे. राजधानीत राहुन पवार असं काहि करणार नाहित.
1 Feb 2014 - 12:49 am | विकास
सेनाप्रमुख हे तुम्ही उद्धव ठाकर्यांना म्हणत असाल तर शक्य आहे. मला वाटते, बाळासाहेबांनी आधी कधी केले असले तर कल्पना नाही, पण गेल्या २-३ दशकात सीमोलंघ्घन केले नसावे असे वाटते.
1 Feb 2014 - 5:05 am | अर्धवटराव
विकासराव असताना आपल्याला डाटा व्हॅलिडीटी चेक करायची गरज नाहि :) राव बरोब्बर चुक पकडतात.
31 Jan 2014 - 11:57 pm | पैसा
गुहागर विधानसभा मतदारसंघात १९७२ पासून सतत डॉ. श्रीधर नातू आणि त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र डॉ. विनय नातू २००९ पर्यंत म्हणजे सलग ३६ वर्षे मोठ्या फरकाने निवडून येत होते. (जनसंघ/जनता पक्ष/भाजप तर्फे). डॉक्टर असल्याने यात दोघांच्याही वैयक्तिक लोकप्रियतेचा हात होता. पण अचानक २००९ साली ही जागा शिवसेनेला बहाल करण्यात आली. परिणामी डॉ. नातू स्वतंत्रपणे अपक्ष म्हणून उभे राहिले आणि भाजप/शिवसेना यात मतविभागणी होऊन राकाँ चे भास्कर जाधव निवडून आले. डोळे झाकून डॉ. नातू निवडून आले असते अशी जागा त्यांच्या हातून काढून घेण्यात साहेबांचा मोठा हात होता असं स्थानिक लोक म्हणतात. तिथे साहेबांची मोठी मालमत्ता आहे आणि तिची व्यवस्था एक भाजपचा कार्यकर्ता बघतो! :D
1 Feb 2014 - 12:00 am | विकास
तिथे साहेबांची मोठी मालमत्ता आहे आणि तिची व्यवस्था एक भाजपचा कार्यकर्ता बघतो!
आपण प्रथम सगळे भारतीय आहोत, पक्ष वगैरे सगळे नंतर सोयीने! ;)
1 Feb 2014 - 2:34 am | प्यारे१
>>>आपण प्रथम सगळे भारतीय आहोत, पक्ष वगैरे सगळे नंतर सोयीने!
नुकतंच हे वाक्य 'वेगळ्या' काँटेक्स्ट्नं वाचल्या सारखं वाटतंय. काय ते फापटपसारा वगैरे. द्रष्टेपण हेच का?
1 Feb 2014 - 6:54 am | हुप्प्या
गेल्या वर्षी कधीतरी दुष्काळ ऐन भरात असताना एका नेत्याने आपल्या अपत्याचे लग्न नेत्रदीपक थाटामाटाने केले होते आणि पवारांनी नापसंती व्यक्त केली होती तेच ना भास्कर जाधव?
नंतर बहुधा असेही ठोकून दिले की कुण्या "परोपकारी" कंत्राटदाराने सगळा खर्च केला मग मी काय करू शकणार वगैरे.
1 Feb 2014 - 1:56 am | पिवळा डांबिस
मला तर वाटतं की उद्धवसेना, पवारसेना आणि राजसेना हे एकत्र यावेत, (हो, पवारकाकांना आहे ते शक्य!) आणि त्यांनी परप्रांतीय मोदीसेना आणि राहुलसेनेला महाराष्ट्राच्या कुरुक्षेत्रावरून पळवून लावावं!!
जय महाराष्ट्र! जय तामिळनाडू!!!
:)
1 Feb 2014 - 8:01 am | विकास
सहमत.
फक्त महाराष्ट्राची अस्मिता जपायची असल्याने, कुरूक्षेत्र म्हणण्याऐवजी, महाराष्ट्रातला कात्रज दाखवू असे म्हणूयात. म्हणजे कसे मग साहेबांचे काम देखील सोपे होईल. ;)
1 Feb 2014 - 2:29 pm | रमेश आठवले
केजरीवालांनी सत्ता हाती आल्यावर ज्या प्रकारचे आचरण आणि भाषणे केली आहेत त्यावरून ते बावचळे तर नाहीत ना अशी शंका येते आणि हा शेर आठवतो .
जबसे सुना के मरने का नाम जिंदगी है-
बांधे कफन सरपे कातिल को ढूण्ड रहा हू.
कफन - प्रेताला गुंडाळतात ते पांढरे वस्त्र
कातिल - मारेकरी.
2 Feb 2014 - 9:51 am | मदनबाण
निवडणुकीचे वातावरण तापत आहे... अश्या बातम्या, वादविवाद, नेत्यांची वेगवेगळी वक्तव्य,पूर्ण झालेल्या कामाचे {जी पूर्ण व्हायला किती वर्ष आणि का लागली ? याची उत्तरे गुलदस्त्यातच असतात.} श्रेय घेण्यासाठी चढाओढ, नविन कामांची उद्घाटने,न्यूज चॅनलवर डिबेटच्या नावावर चाललेली भयंकर शाब्दिक मारामारी,जिथे अनेक वर्ष रस्त्यांवर डांबर टाकले गेले नाही तिथे अचानक डांबराने भरलेले डंबर दिसणे,वर्तमानपत्र आणि टिव्हीवर विविध पक्षांच्या जाहिराती दिसणॅ अश्या सर्व गोष्टी नजरेस पडु लागल्या आहेत.सोशल मिडीयाचा मोठा वापर हा यावेळी मोठा घटक ठरत आहे.याच सोशल मिडीयामुळे रजनिकांत्,आलोकनाथ व आता राहुल गांधींचा नंबर लागला ! { थॅक्स टु अर्णब गोस्वामी ;) }
जशी जशी निवडणुक जवळ येईल तसे या आणि अशाच विविध चर्चांना उधाण येइल. अगदी आजचीच गोष्ट सांगायचं झाल तर AgustaWestland प्रकरण तापणार असं दिसतय.
जाता जाता :---
काँग्रेसची `अॅड गर्ल` अडचणीत...
2 Feb 2014 - 11:31 pm | हुप्प्या
http://www.youtube.com/watch?v=8q_JY_2_fF0
पवारांचा संधिसाधूपणा, पाठीत खंजीर खुपसणे वगैरे बद्दल लोकांची मते.
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या लोकांची सर्व काही आलबेल आहे वगैरे सांगताना उडणारी धांदल गंमतीची आहे.
भाजपा आणि स्वाभिमानीचे लोक ओरडून सांगत आहेत की आम्हाला भ्रष्ट पवार नकोत. राष्ट्रवादीचे लोक आणखी जोरात ओरडत आहेत की आम्हाला जातीयवादी नकोत. तरी कुणालाही शाश्वती वाटत नाही की पवार रालोआत सामील होणारच नाहीत. कारण पवार कसे वागतील ते बरम्देवबी सांगू शकत नाही!
4 Feb 2014 - 4:36 pm | llपुण्याचे पेशवेll
बाकी आप आप करून टाळ्या पिटणार्यांनी आप कसे सत्तेत येईल हे बघावे. जर पवारांबरोबर जाऊन भाजपचे नुकसान होणार असेल तर होऊदे की. चांगलेच आहे.
5 Feb 2014 - 6:32 am | हुप्प्या
आप सारखा कुठला तरी पक्ष बाप बनावा आणि त्याने काँग्रेस, राष्ट्रवादीच काय पण शिवसेना, भाजप आणि मनसेलाही सणसणीत चपराक लगावून महाराष्ट्राची सत्ता मिळवावी असे मनापासून वाटते.
महाराष्ट्रातले मुंढे, ठाकरे, गडकरी असले नेते पवारांपेक्षा फार काही चांगले वाटत नाहीत. अस्सल स्वार्थी, संधीसाधू राजकारणी लोक. काँगेस व राष्ट्रवादीला स्टेजवरून तारस्वरात शिव्या घालतात आणि सगळे संपले की त्यांच्याच गळ्यात गळा घालतात.
येत्या निवडणुकीत ह्या लोकांना नेहमीच्याच राजकारणाची डाळ आता शिजेनाशी झाली आहे असे लक्षात आणून द्यावे असे वाटते आहे.
6 Feb 2014 - 3:07 am | मदनबाण
अगदी आजचीच गोष्ट सांगायचं झाल तर AgustaWestland प्रकरण तापणार असं दिसतय.
बीजेपीच्या म्हणते ही तर बोफोर्स प्रकरणाची पुनरावॄत्तीच आहे.बीजेपीच्या रवी शंकर प्रसाद म्हणतात :- "Why in't there any categorical denial? Michel's letter clearly names Sonia Gandhi. He said Sonia Gandhi was the driving force,"
या सर्व प्रकरणातला दलाल ? {middleman}Christian Michel याने २०११ -२०१२ या काळात ३१ वेळा हिंदूस्थानाची वारी केली होती,आणि त्यानीच केलेल्या पत्रव्यव्हारात बरीच नावे आली होती.पण सध्या मला तरी कुठल्याही न्यूज चॅनलवर या प्रकरणाच्या बाबतीत मोठ्या चर्चा होताना आढळुन येत नाही.
9 Feb 2014 - 9:50 pm | हुप्प्या
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/sharad-pa...
मोदी काही अतिरेकी नाहीत मुख्यमंत्री आहेत. एक कृषीमंत्री एका मुख्यमंत्र्याला भेटला तर काय बिघडले? असा बिन्तोड सवाल केला आहे साहेबांनी.
थोडक्यात भेटलोच नाहीपासून सुरवात करुन भेटलो तर काय बिघडले पर्यंत गाडी आली आहे. पुढच्या सरकारच्या मंत्रीमंडळात कृषीमंत्र्यांची पोस्ट अॅडव्हान्स बुकिंग करुन ठेवण्याचा प्रकार असावा.
9 Feb 2014 - 10:59 pm | बाबा पाटील
कितीही कुथल तरी भाजप आघाडी २२० च्या पुढे जात नाही,कारण काही राज्यांत ते अस्तित्वातच नाही ही वस्तुस्थीती कट्टर संघवाले पण नाकारु शकत नाही,काँग्रेसच्या पानीपतात पप्पुशेठचा विश्वासराव नक्की आहे, अशा अवस्थेत कडबोळा तयार करुन पाटीलबाबा शिंदेंनंतर दोनशे वर्षांनी दिल्ली ताब्यात घेण्याचा प्रयत्न थोरले पवार नक्की करणार.त्यामुळे त्यांनी जांगडगुत्याची व्यवस्थीत तयारी सुरु केली आहे, मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरणे,तिसर्या आघाडीच्या व्यासपिठावर उपस्थीती,मोदींची भेट्,राज ना एस.पी चे मैदान खुले करुन देणे,फासे तर फेकायला सुरुवात झाली आहे,बघुयात आगे आगे होता है क्या ?
10 Feb 2014 - 11:07 am | अनुप ढेरे
सहमत आहे. प. बंगाल, ओरीसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, आणि इशान्य भारत या राज्यांमध्ये भाजपाचं अस्तित्व फारच कमी आहे. आणि या राज्यांमध्ये ~१७५ च्या आसपास जागा आहेत. भाजपाला इथले मित्रपक्ष मिळवावेच लागतील. त्यात जयललिता कम्युनिस्टांबरोबर गेल्या. ममता बॅनर्जी बेभरवश्याच्या आहेत. BJD नी पत्ते अजून उघड केलेले नाहीत. त्यामुळे एकंदर अवघड आहे भाजपाचं.
11 Feb 2014 - 11:15 pm | हुप्प्या
बाकी राज्यात भाजपाचे अस्तित्त्व नाही म्हणून पवारांशी साटेलोटे करणे आवश्यक आहे हे पटत नाही.
१. ह्या उल्लेखलेल्या राज्यात पवारांच्या राष्ट्रवादीचा काय स्थान आहे?
२. तमाम भारतात पवारांचा पक्ष किती शिटा मिळवेल असे वाटते? मला तरी वाटते की राष्ट्रवादीच्या मुजोर, धनदांडग्या लोकांमुळे त्यांचे महाराष्ट्रात तरी पानिपत होईल. त्यामुळे पवारांच्या गळ्यात गळा घालून अशी किती सिटांची भर पडेल?
11 Feb 2014 - 11:18 pm | हुप्प्या
http://www.youtube.com/watch?v=B-ckzMhJRus
मुंडे छातीठोकपणे सांगत आहेत की पवार आघाडीत येणार नाहीत.
गडकरी सांगत आहेत की सगळ्यांचे (पवारांसकट) आघाडीत स्वागत आहे.
भाजपाचे दुर्योधन आणि दु:शासन एकमेकांशी ३६ चा आकडा ठेवून आहेत तेही निवडणुक व्हायच्या आधीच हे मोठे रंजक आहे!