पाट्याबाबतचा अभिनेते संजय मोने यांनी लिहलेला एक लेख एका वर्तमानपत्रात नुकताच वाचण्यात आला. त्यात त्यांनी दिलेली काही उदाहरणे अशी
‘फोटो वाईट आल्यास फोटोग्राफरला दोष देऊ नका. तुमच्या पालकांचाही त्यात हिस्सा असू शकतो.’
‘चौकश्या थांबवा! आमच्या दिलीपचे लग्न जमले.’
‘विमा एजंटांनी आत येऊन त्रास देऊ नये आम्ही अमर आहोत.’
‘इथले वाढपी आमचे नोकर आहेत तुमचे नाही. सबब नीट वर्तणूक ठेवा.’
‘इथले पदार्थ खाऊन माजा. टाकून माजू नका.’
एका पुस्तकाच्या दुकानातील पुस्तकांच्या वर्गीकरणानुसार लावलेल्या तीन पाट्या ‘1) उत्तम साहित्य 2) लोकप्रिय साहित्य 3) सुशिक्षीत म्हणून मिरवण्याचे साहित्य’
हा लेख वाचून पाटी संस्कृती व तिचे रक्षक ही संस्कृती जोपासत आहेत याचे समाधान वाटले. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय लोकांपर्यंत पोहचविणारे पाटी एक जबरदस्त ताकदीचे माध्यम आहे यात वादच नाही. पाटीलेखन (म्हणजे पाटी लिहणारा पेंटर नाही) ही एक कला आहे. मंदीर, बसस्थानक, हॉस्पीटल अशा सार्वजनिक ठिकाणी लिहलेल्या पाट्यांच्या माध्यमातून प्रामुख्याने सूचना, मार्गदर्शन, विनंती सरळपणे केलेली दिसते.
पण खाजगी घरमालक, दुकानदार व व्यावसायिकांनी लावलेल्या ‘अनुभवसिध्द’ पाट्यामधून सूचना, मार्गदर्शन, विनंत्या मात्र सरळपणे न करता त्यातून तिरकसपणे, कल्पकतेने त्रागा, संताप, खोचकपणा, तिरकसपणा, छद्मीपणा, उपहास, टोमणे, विनोद, कुचकेपणा अशा अनेक छटा त्यातून व्यक्त केलेल्या दिसतात. त्यामुळेच या पाट्यांची मजा काही वेगळीच असते. त्यातील शब्दांवरुन पाटीलेखकाच्या स्वभावाची कल्पना वाचणाऱ्यांना येण्यास (त्यांना प्रत्यक्ष न भेटतासुध्दा) मदत होते.
चार ओळींच्या चारोळ्यांना साहित्यात स्थान आहे, तर एक ओळीपासून सुरू होणाऱ्या काही ओळींच्या या पाटीलेखनाला का नसावे? पण दुर्देवाने महाराष्ट्रभर विखुरलेले पाटीलेखक असंघटीत असल्यामुळे कदाचित या मागणीला पाहिजे तसे बळ मिळाले नसावे.
किमान शब्दात कमाल आशय आणि त्यातून लेखकांची कल्पकता व त्यांच्या स्वभावांचे विविध पैलू व्यक्त करणाऱ्या या कला प्रकाराचे प्रदर्शन (प्रत्यक्ष पाट्या नाही तरी किमान त्यांच्या छायाचित्रांचे तरी) दरवर्षी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी भरवून या दुर्लक्षित, उपेक्षित कलेचा गौरव केला जावा ही अपेक्षा.
प्रतिक्रिया
10 Feb 2014 - 10:37 am | मुक्त विहारि
दुर्लक्षित, उपेक्षित कलेचा गौरव केला जावा ही अपेक्षा.
अहो, पूणे नामक शहरांत ह्याचे कायमस्वरुपी प्रदर्शन मांडलेलेच आहे.
(पळा आता, पूणेकरांच्या अस्मितेला धक्का लागलेला आहे.)
10 Feb 2014 - 12:06 pm | सूड
र्हस्व आहे.
10 Feb 2014 - 12:31 pm | प्यारे१
त्यांच्या अस्मितांसारखाच 'र्हस्व'.
उच्चारुन पटकन संपणारा.
(समीधा!)
10 Feb 2014 - 2:57 pm | बॅटमॅन
स्पेलिंगमध्ये र्हस्व असला तरी प्रत्यक्षात दीर्घ आहे म्हणे.
10 Feb 2014 - 12:15 pm | सुबोध खरे
मिपा वरच किती साहित्यिक आहेत ते पहा.
उदा.१) आमच्या येथे सर्व आनंदावर विरजण घालून मिळेल.
२) मी झोपतो करून हिमालयाची उशी.मुद्दाम गहन विचार करणार्यांची आम्हाला गरज नाही
३)कुणी निंदा अथवा वंदा...आमचा आनंदाचा धंदा
४)स्वाक्षरी: बुद्धी स्थिर रहाते,अक्कल मात्र वाहू लागते.
५)दिसामाजी काहीतरी लिहीत जावे!!मिपावरी जिलब्या पाडीत राहावे!!
६)एक गोपाळ असतो. तो आनंदी असतो!
७)अक्कल गहाण ठेवली असल्यास किमान त्याचे जाहीर प्रदर्शन करु नये अशी नम्र विनंती.
कोणीतरी या साहित्याचे संकलन केले तर बरे होईल असे वाटते
10 Feb 2014 - 3:14 pm | सू डोकू
कोणीतरी या साहित्याचे संकलन केले तर बरे होईल
असे थोर स्वाक्षरीकर्ते साहित्यीक मिपा वर पूर्वी कधीतरी नांदून गेले असा बोध मिपा वर येणाऱ्या भावी पिढीला व्हावा असा उद्देश यामागे असावा.
11 Feb 2014 - 4:05 pm | मुक्त विहारि
पिंकांनी सजवी धागे | ट्रोलिंगही येई वेगे | सर्वां ब्रम्हज्ञान सांगे | तो एक विचारवंत ||
10 Feb 2014 - 3:56 pm | आदूबाळ
"पूणे शहर पाट्यांसाठी प्रसिद्ध आहे" असं म्हणणं म्हणजे कोणालातरी "अभ्यास वाढवा" असं येऊन सांगायला आमंत्रण देणं आहे. इथे पाट्यांचं स्पेशलायजेशन असतं.
त्या ज्ञानसागरातील हे "पार्किंग" विषयक शिंपले:
- येथे पार्किंग करू नये. नारळ पडतात. (एस्पी कॉलेजपाठिमागच्या एका गल्लीत)
- (मोठ्ठ्या अक्षरात) तुम्हाला वाचता येते का? (तर्जनी दाखवणारे चिन्ह) (बारीक अक्षरात) नो पार्किंग
- आज पार्किंग समोर आहे. (मोतीबाग, शनिवार पेठ इथल्या गल्लीतल्या एका घराच्या भिंतीवर कायमस्वरूपी रंगवलेली अक्षरं. शेजारच्याच खांबावर पी१/पी२ चा बोर्ड आहे!)
- नो पार्किंग आहे (बेक्कार हसू आलं होतं)
- या इमारतीतले रहिवासी, व्यापारी आणि त्यांचे ग्राहक यांव्यतिरिक्त कोणी दुचाकी लावल्यास हवा सोडली जाईल. (तांबड्या जोगेश्वरीसमोरच्या गल्लीतली एक पाटी.) त्याच पुठ्ठ्यावर खाली "हवा भरण्याचे दुकान भाऊ रंगारी गणपतीजवळ" असा उ:शाप सुद्धा दिला आहे! माहितीसाठी: मी तिथे नेहेमी गाडी लावतो, पण कधी कुणी हवा सोडलेली नाही.
10 Feb 2014 - 4:10 pm | बॅटमॅन
जबरी =))
बाकी पुण्यातच "देवळासमोर गाडी लावली तर हवा आपोआप कमी होते" अशी पाटी असल्याचा एक फटू फिरत होता ते एक लै आवडलेलं =))
तू दिलेल्या यादीत 'नो पार्किंग आहे' हे सर्वांत जबरी!!! अन उ:शापही खासच.
10 Feb 2014 - 6:55 pm | आदूबाळ
त्या "नो पार्किंग आहे" च्या पाटीखाली "बरं" असं लिहायचा प्लॅन लै दिवस डोक्यात होता. :))
11 Feb 2014 - 4:26 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))