अतिशय सोपी व चविष्ट अशी ही बंगाली पद्धतीची डाळ आहे. पाँचफोरोन म्हणजे पाच प्रकारचे जिन्नस ह्यात वापरले आहेत मोहरी, जीरे, बडीशेप, मेथी-दाणे व कांद्याचे बी (कलौंजी). हे मसाले अख्खेच फोडणीत वापरले जातात.
साहित्य:
१ वाटी मसूर डाळ स्वच्छ धुवून १०-१५ मिनिटे भिजवणे
१ टोमॅटो चिरलेला
२ हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून जीरे
१/४ टीस्पून बडीशेप
१/४ टीस्पून मेथी-दाणे
१/४ टीस्पून कांद्याचे बी (कलौंजी)
१/२ टीस्पून हळद
मीठ चवीनुसार
१/२ टीस्पून लिंबाचा रस
तेल / राईचे तेल
पाकृ:
मसूर डाळ कुकरला मऊसर शिजवून घ्या.
शिजवलेली डाळ चांगली घोटून घ्या.
पाँचफोरोन एकत्र करुन घ्या.
कढईत तेल गरम करून पाँचफोरोन व मिरच्यांची फोडणी करून घ्या.
त्यात शिजवलेली मसूरडाळ, चवीप्रमाणे मीठ, हळद व आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवावे.
डाळीला उकळी फुटली की त्यात चिरलेला टोमॅटो घालून, ५-८ मिनिटे शिजवावे.
सगळ्यात शेवटी लिंबाचा रस घालून गॅस बंद करावा.
(पंजाबी लोणच्यासारखी पण माईल्ड) छान लागते. ह्या डाळी बरोबर मला वांग्याचे काप तोंडीलावणे म्हणून आवडले.
प्रतिक्रिया
3 Feb 2014 - 3:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
नाव वाचून ही कोणती फॉरेनची डाळ ? असं म्हणून धाग उघडला !
डाळ फॉरेनची नसली तरी प्रेझेंटेशन (नेहमीप्रमाणेच) फॉरिनच्या तोंडात मारणारे आणि डाळ लाळ-उत्पादक आहे :)
3 Feb 2014 - 3:35 pm | दिपक.कुवेत
पण पाँचफोरोन आख्खे घालण्याएवजी त्यांची पावडर करुन घातली तर चवीला अजुन छान लागेल का?
3 Feb 2014 - 3:46 pm | सानिकास्वप्निल
पाँचफोरोन तेलात (फोडणीत) आख्खे घातले तर त्यांचा स्वाद तेलात उतरतो, पावडर घालून तितका स्ट्राँग स्वाद नाही येणार.
मुळातचं पाँचफोरोन हे बंगाली पाककृती जसे भाज्या, शुक्तो, डाळ, लोणची.इ. मध्ये अख्खेच वापरले जातात.
धन्यवाद.
3 Feb 2014 - 3:43 pm | स्वाती दिनेश
छान दिसतेय डाळ..
स्वाती
3 Feb 2014 - 3:55 pm | रेवती
छान दिसतीये डाळ व मसूर आणून करणार. आज लसूणी दाल दुसर्यांदा करणार आहे.
3 Feb 2014 - 4:48 pm | अनन्न्या
ते वांग्याचे काप कुठे गेले?
3 Feb 2014 - 5:33 pm | प्यारे१
छान!
वांग्याचे काप (लिहीलेलं) शोधावे लागले मला.
सानिकाला नेहमीचा प्रतिसाद. :-/
3 Feb 2014 - 6:53 pm | रेवती
मागल्यावेळी तिला कारल्याचे काप आवडले होते.
3 Feb 2014 - 5:24 pm | मुक्त विहारि
मी हा धागा का उघडला?
आता भोगा आपल्या कर्माची फळे.
मागच्याच आठवड्यात, ती लहसुनी दाल खाल्ली.तिची चव अद्याप जीभेवर आहे.
जरा उंसत मिळतेय न मिळतेय तोच, अजून एक पा.क्रु.
(मनातल्या मनात......
नुसता छळवाद आहे.
च्यामारी आता ह्याच्या वर उतारा म्हणून एखादी रेशीपी टाकावी काय?)
(टु बी ऑर नॉट टू बी) हतबद्ध मुवि.
3 Feb 2014 - 5:35 pm | मधुरा देशपांडे
नवीन प्रकार कळला. नक्की करून बघेन.
3 Feb 2014 - 7:08 pm | इशा१२३
काय देखणे फोटो आहेत.फोडणीचा वास दरवळला बघूनच.रेसेपी करतेच आता.
3 Feb 2014 - 7:37 pm | भ ट क्या खे ड वा ला
अतिशय उत्तम सादरीकरण
लवकरच करून बघण्यात येईल.
पाँचफोर बद्दल ऐकले होते , अखंड दाणे जेव्हा तळले जातात तेव्हा एक वेगळाच सुगंध दरवळतो.
3 Feb 2014 - 8:07 pm | सुहास..
कल्ला ! धिगाणा !! वल्लाह रेशीपि !!
3 Feb 2014 - 8:39 pm | प्रभाकर पेठकर
एक सुंदर, चविष्ट डाळ सोबत वांग्याचे काप (मला तर माशाची तळलेली तुकडी जास्त आवडेल) असा मेनूचा ट्राय मारला पाहिजे.
5 Feb 2014 - 8:28 pm | सोत्रि
पेठकरकाका, पुण्यात कधी येताय ते बोला? माशाची तुकडी माझ्याकडे लागली!
- (खवय्या) सोकाजी
6 Feb 2014 - 8:44 pm | प्रभाकर पेठकर
२८ मार्चला पुण्यात येतो आहे. बाहेर जायचे आहेच. पुण्यात १० एप्रिल पर्यंत येऊन जाऊन असेन. नक्की नक्की भेटूया/बसूया.
3 Feb 2014 - 8:42 pm | निवेदिता-ताई
अतिशय सुरेख
3 Feb 2014 - 9:41 pm | सूड
सैंपाक लाख जमेल पण तुमच्यासारखं प्रेझेंटेशन जमेल तो सुदिन !! ;)
5 Feb 2014 - 5:01 am | उपाशी बोका
फक्त ते दुसर्या फोटोत जर प्रत्येक चमच्यावर आणि भांड्यांवर मधोमध एक-एक कॉपिराईट टाकला असता, तर अजून बहार आली असती. जणू काही पाँचो उंगलिया घी मे और सर कढाई में !
5 Feb 2014 - 2:48 pm | सानिकास्वप्निल
तुम्हाला का बरं इतका कॉपिराईटचा प्रॉब्लेम? नाही म्हणजे मागे ही मी तुमची कॉपिराईटबद्द्लची कॉमेंट वाचली होती, तेव्हा दूर्लक्ष केले. तुम्हाला कोणी निमंत्रण दिले होते का इथे येऊन फोटो / पाकृ वाचा म्हणून? आणी हो कॉपिराईट टाकायचा की नाही टाकायचा हे मी ठरवेन तुमच्या सजेशनची गरज वाटत नाही.
धन्यवाद.
5 Feb 2014 - 3:25 pm | प्यारे१
दुर्लक्ष बालिके दुर्लक्ष!
त्यांचं नाव वाचा की! 'उपाशी' बोका हायेत ते.
बाकी उपाशी बोका शेठ , कढीपत्ता काढून खाता ना जेवताना?
तसंच अल्लाद बाजूला करायचं नाव फारच त्रास होत असला तर.
फोटो बघा की, नाव काहून बघू र्हायले? बाकी फोटो ज्याचा आहे त्याचं नाव असायला काय हरकत आहे ब्वा?
तसंही स्टीलच्या भांड्यांवर अगदी वाट्या, पेले ह्यावरही खरी नावं काढतातच ना? कार्यालयाचे असले तर टिळा असतोच की रंगांचा!
5 Feb 2014 - 9:26 pm | उपाशी बोका
@सानिकास्वप्निल
ती कॉमेंट पेठकर काकांना केली होती, त्यामुळे तुम्हाला का जळजळ व्हावी?
कॉपिराईट टाकायचा की नाही टाकायचा किंवा कसा टाकायचा हे नक्कीच तुम्ही ठरवू शकता, पण म्हणून मी मत द्यायचे नाही का? (मी इंटरनेटवर व्यक्तिगत बोलणे सहसा टाळतो आणि व्यक्तिगत हल्ला करतोय असे तुम्हाला वाटेल, म्हणून फोटोच्या लायकीबद्दल काही लिहित नाही).
@इतरांसाठी
कॉपिराईट काढणे अतिशय सोपे आहे. पण त्याची गरज आहे का किंवा मी इतर काय करू शकतो(ते), असा विचार करावासा वाटला, तर हा लेख वाचावा.
6 Feb 2014 - 8:26 pm | सूड
>>तुम्हाला कोणी निमंत्रण दिले होते का इथे येऊन फोटो / पाकृ वाचा म्हणून?
=))))
4 Feb 2014 - 12:58 am | स्वप्नांची राणी
लगेच करुन पाहिली. पाँचफोरोन ची झक्कास चव उतरली होती! मस्त मस्त!!
4 Feb 2014 - 4:33 am | अर्धवटराव
त्याची रेसीपी कुठे आहे??
आयला, खाल्लं असेल बरेचदा... पण चव काहि लक्षात येत नाहिए.
4 Feb 2014 - 3:13 pm | Mrunalini
सहिच दिसतीये डाळ. एकदा करुन बघायला पाहिजे.
4 Feb 2014 - 11:45 pm | अत्रुप्त आत्मा
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह!
मला या डाळिबरोबर.. गरमगरम पोळ्या..त्याही तूप सोडलेल्या..आणी त्याही तव्यावरून आपल्या पानात कोणितरी सोडतय.. असं,एव्हढं सगळं दिसलं .. ! :)
5 Feb 2014 - 1:54 am | अर्धवटराव
यातलं हे "कोणितरी" जास्त महत्वाचं आहे काय गुर्जी??? आयला, व्हॅलेंटाइन डे फिवर गुर्जींवर पण जबरा चढलाय ;)
5 Feb 2014 - 2:11 pm | अत्रुप्त आत्मा
@आयला, व्हॅलेंटाइन डे फिवर गुर्जींवर पण जबरा चढलाय >>> =))
डे फिवरचं काय घेऊन बसलात? आमच आयुक्षच या फिवरमधे असतया! =))
5 Feb 2014 - 10:43 am | जेपी
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
5 Feb 2014 - 10:46 am | मितान
मस्त रेसिपी ! सुरेख फोटो !
पंचफोरन मलाही आवडते. अगदी साधी कोबीची किंवा बटाट्याची भाजीही पंचफोरन घालून खूप छान लागते.
5 Feb 2014 - 7:43 pm | लॉरी
रेसिपी करून पाहीली.. आवडली.. न रहावून त्यात थोडा गुळही टाकला.. :)
5 Feb 2014 - 8:12 pm | पैसा
पण आमच्याकडे कलौंजी मिळत नाय त्यामुळे त्याशिवायच करते!
5 Feb 2014 - 8:32 pm | सोत्रि
नेहमीप्रमाणे रेसीपीऐवजी त्या चमच्यांवरच फिदा झालेलो आहे! काय ती नजाकत, व्वा!!
- (खवय्या) सोकाजी
6 Feb 2014 - 12:40 pm | दक्षिणा
मी मिपावर नविन आहे. हा माझा अगदी पहिल्या दहातला एक प्रतिसाद असेल. :)
इथे मेंबर झाल्यावर वाचन करताना सहज पाककृती विभागात गेले आणि तुमची फॅन झाले.
अत्यंत निगुतीने टाकता तुम्ही प्रत्येक पदार्थ.
ही डाळ ही सुरेख आहे. करून पाहिन एकदा.
6 Feb 2014 - 4:34 pm | सुदर्शन काळे
हि कलौंजी मिळेल कुठे सानिकास्वप्निल? पॉच फोरोनची अस्सल चव तरी घेउद्यात.
6 Feb 2014 - 4:41 pm | सानिकास्वप्निल
कलौंजी (कांद्याचे बी) वाणसामनाच्या दुकानात, डी-मार्ट, सुपर मार्कटला सहज मिळेल.
धन्यवाद.
6 Feb 2014 - 5:35 pm | सुहास झेले
सहीच.. तोंडाला पाणी सुटले आणि सादरीकरण नेहमीप्रमाणे अप्रतिम :)
6 Feb 2014 - 10:25 pm | सुहास..
काय एक एक नमुने आहेत जगात ? खाण्याचे पदार्थ बघायचे सोडुन चमच्यांवर काय लिहीले आहे ते बघत बसतात ?
लाळग्राही खाद्य पदार्थांचा चमचा
बोक्याशी वाश्या