नवरात्र सुरु झाली. जिकडे बघतो तिकडे गरबा. अगदी खांद्याला खांदा लावुन. निरनिराळी मंड्ळे कुरघोडी करण्याकरिता वेगवेगळ्या शकली काढतात. स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, आणखी काय काय . शिगेला पोचलेला आनंदोत्सव. गरब्यात भाग घेणार्यांचे चेहेरे बघितल्यावर एक्स्साइट्मेंट म्हणतात ती नेमके काय हे कळ्ते. प्रेक्षकांचा पण तुटवडा नाही. काका मंड्ळी बघोजी राव होताना " गेले ते दिवस" चे उसासे सोडतात. परत एखादी सुबक ठेंगणी हेरुन खयालोंकी दुनिया मधे फिरुन येतात. मला मात्र गरब्यात कधीही सहभागी होता आले नाही. तसे खास काही ही कारण नाही. संपर्क वाढतो अशी माहिती मिळाल्यावर गेलो होतो एकदा. पण काही जमले नाही. आणि आपल्याला जमत नाही त्या मेथड वर वेळ आणि पैसा का फुकट घालवा म्हणुन नाद सोडुन दिला. आणि अडकलो तर ची भीती. स्वकर्तुत्वावर भरोसा ठेवलेला बरा.
७० -८० ह्या दशकात मात्र नवरात्रोत्सव संपल्यावर डिसेंबर मध्ये आमच्या हॉस्पिटल मध्ये काम मरेस्तोवर वाढायचे. दिवसाला सुमारे १५० गर्भपात. (इतर वेळी सुमारे ८५ची सरासरी.) ह्यात सुमारे ६० कुमारिका. बहुधा आपण कुमारी का? हा प्रश्न त्याना त्रास देत असावा. गर्बा आणि गर्भा खेळ एकच वेळी खेळायची सोय नवरात्रेत असते..फक्त वेगवेगळ्या ठिकाणी. मग पालक यायचे डोळ्यात पाणी काढत. दुसरा कलाकार कॉलरला धरुन आणत.
१.माझ्या मुलीचा पाय घसरला. २. माझ्या मुलीचे पाय वाकडा पडले. ३. चूकीची वाट धरली. ४. बसत नाही. ५. आंघोळ बंद झाली.
आमच्या हॉस्पिटल मध्ये एक डॉक्टरला ( कर्नाटकी) मराठी चे जुजबी ज्ञान. त्याचे वांदे व्हायचे. सांकेतिक भाषा (क्रिप्टीक) कळायचीच नाही बिचार्याला. जरा सुद्धा अतिशयोक्ती न करता मी बाजुच्या टेबलवर बसुन श्रवण केलेला,
एक पालक आणि त्याचा संवाद खालील प्रमाणे.
१.......= कुठे लागले.
२.......= आपण एक्स रे काढु. फ्रॅक्चर आहे का ते कळेल.
३.......= नीट पत्ता घ्यावा.
४.......= पाय दुखले की बसेल
५.......= पाण्याचे त्रास आहेत का तुमच्या कडे
शेवटी मी मदतीला धावलो. आणि प्रकरण संपविले. डायरेक्ट प्रेग्नंट है ऐसा क्युं नय बोलताय असे मला ऐकावे लागले ते वेगळे.
आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. पालक मंड्ळी एकदम मुद्द्यावार येतात. हल्ली पालकांना मधे न घालता कारभार मोकळा करता येतो की. स्मार्ट रेस आहे ना? खंडाळ्याची ट्रिप काढायची युक्ती करतात.
आय पिल नंतर तर सगळे एकदम सोपे झाले आहे. चेमिस्ट कडे जायचे. एक गोळी ७२ तासाच्या आंत घ्यायची. हाय काय नाय काय. सर्व जण सुखी. पालक पण आपली मुले त्यातली नाही म्हणायला मोकळे. " आम्हाला आमच्या मुलांनी तसल्या त्रासात टाकले नाही हॉ" आमचे संस्कार पाळले."" नविन नविन शोध- नविन सुविधा.विज्ञानाचे अनेक उपयोग.
एका शाळेतुन खाली उतरत असताना ९ वी मध्यी असलेल्या मुलांमधला संवाद
१ला: तेरेको मालुम पडा क्या?
२रा: क्या रे?
१ला: रोन्सेन लोहान के साथ शादी कर रहेला है. ( ढ लोकांसाठी- ह्या दोन हॉलिवूड अभिनेत्री आहेत.)
२रा: क्या बात करता है
१ला: हा रे टाईम्स मे आया था.(प्लेबॉय बघायची गरज नाही. बॉम्बे टाईम्स इमरजन्सी गरज भागवतो)
२रा: आय पील का खर्चा बच गया.
मि. पा. सदस्य बरोबर होते. त्यांचा चेहेरा पांढरा पडला.
ता.क.: कंपन्यांनी आय पील चा स्टॉक भरपुर ठेवला आहे. गुजरातेत काही ट्रक जास्त पाठ्वलेले आहेत. चेमिस्ट कडे आय पील गिर्र्हाईकायिका मध्ये ४१% स्रिया असतात. वय २० -२५ . १७% मुली वय १५ ते २०. बाकी सगळे पुरुष. इथे पण मापात पाप. विश्वामित्र कुठले. आपल्या वेळी ही शिश्टीम नव्हती ह्याचे दु:ख होत नाही - जाम भिती वाटायची गर्भपाताची. स्त्री देहाचे नंतर कॉम्प्लिकेशन ने होणारे हाल बघवत नसत.
आय पील
गाभा:
प्रतिक्रिया
1 Oct 2008 - 5:20 pm | सुचेल तसं
प्रभू साहेब,
चांगला आहे लेख.
ह्यात सुमारे ६० कुमारिका. बहुधा आपण कुमारी का? हा प्रश्न त्याना त्रास देत असावा. गर्बा आणि गर्भा खेळ एकच वेळी खेळायची सोय नवरात्रेत असते
हे छान!!!!
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
1 Oct 2008 - 5:21 pm | अवलिया
म्हणुन तर आम्ही सध्या सिप्ला घ्या सांगतो
आम्हाला आय पील चा काही उपयोग नाही पण पैसे कमवायला कुणी आमंत्रण देण्याची गरज नसते.
1 Oct 2008 - 5:26 pm | बिपिन कार्यकर्ते
जबर्या...
४.......= पाय दुखले की बसेल
मला वाटतं हा या शतकातील महानतम विनोदापैकी एक गणला जावा. ह. ह. मे.
बिपिन.
1 Oct 2008 - 5:27 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
दांडीयाला आजकाल दोन घूंगरू असतात. प्रतिकात्मक असावेत.
8 Sep 2014 - 12:57 pm | प्रसाद गोडबोले
कोणी तरी कुठल्या तरी रेफरन्स मधे ह्या धाग्याची लिन्क दिली ...
=)) =)) =))
8 Sep 2014 - 6:39 pm | अनुप ढेरे
=))
1 Oct 2008 - 5:29 pm | सहज
नवरात्रोत्सव संपल्यावर ....
खर तर आता परत एकदा हा विदा तपासुन पाहीला पाहीजे. ज्यांना ते करायचे आहे ते फक्त नवरात्रीची वाट कशाला पहातील. तसेच कित्येक वर्ष हे ऐकत आहे आता पालक पहिल्या एक, दोन वर्षात जागरुक झाले नसतील काय? बहुदा असेल बुवा काहीतरी अंधश्रद्धा की नवरात्री मधे केले तर मूल होत नाही :-)
खर सांगु का? एकदा का मुलबाळं, कामकचेरी सुरु झाल्यावर "लायसेन्स" मिळालेल्या लोकांच्यात घटलेले "करायचे" प्रमाण पहाता वाटते की च्यायला जेव्हा करता येते तेव्हा करा बिन्धास्त. फक्त जबाबदारी ओळखुन. हा बराच मामला राजीखुशीचा असतो. निदान योग्य ते ज्ञान असलेले काय वाईट?
1 Oct 2008 - 5:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
खर तर आता परत एकदा हा विदा तपासुन पाहीला पाहीजे. ज्यांना ते करायचे आहे ते फक्त नवरात्रीची वाट कशाला पहातील. तसेच कित्येक वर्ष हे ऐकत आहे आता पालक पहिल्या एक, दोन वर्षात जागरुक झाले नसतील काय? बहुदा असेल बुवा काहीतरी अंधश्रद्धा की नवरात्री मधे केले तर मूल होत नाही
मी पण हाच विचार करत होते!
पण नंतर वाटलं, येवढी "मॅनेजमेंट"ची अक्कल नसेल तर मग पहात असतील नवरात्रीची वाट!!
1 Oct 2008 - 6:06 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
इतर वेळी आसाराम बापूंच्या सत्संगाला जातात असे मी कुठे म्हटले आहे. मी फक्त वाढ्लेल्या प्रमाणाबद्दल बोलतो आहे. वातावरण धुंदी वाढवणारे असते. बस.
1 Oct 2008 - 6:49 pm | अवलिया
पण नंतर वाटलं, येवढी "मॅनेजमेंट"ची अक्कल नसेल तर मग पहात असतील नवरात्रीची वाट!!
नाही संहिताजी ही "मॅनेजमेंट"चीच अक्कल आहे.
कारण अशा वेळी बिनधास्त गरब्याला जाते असे सांगुन मुली रात्री १२ - १ - २ पर्यत बाहेर रहातात किंवा मैत्रीणीकडेच झोपते असे सांगुन घराबाहेर पडतात. इतर दिवशी असे कारण सांगणे, मिळणे अवघड असते. किमान इतके सोपे नसते.
त्याचप्रमाणे या दिवसांत असे उद्योग चालतात हे माहित असल्याने हौटेलही स्पेशल अर्धातास, एकतास असे पैकेज देतात. चेक इन - चेक आउट - हवे ते पैकेज घ्या. बाकी सोयी पण उपलब्ध असतात त्यामुळे दुकान बंद झाले तरी अडचण येत नाही.
असो. समाज बदलत आहे हे नक्की.
1 Oct 2008 - 7:08 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
बराबर. एक्दम डीटेलमंदी.
1 Oct 2008 - 5:33 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
ऍड्रिनलीन ची वाढ आणि मोका दुसरे काय?
1 Oct 2008 - 10:03 pm | सखाराम_गटणे™
खर सांगु का? एकदा का मुलबाळं, कामकचेरी सुरु झाल्यावर "लायसेन्स" मिळालेल्या लोकांच्यात घटलेले "करायचे"
कोणतीही गोष्टीत तोचतोच पणा आला की कंटाळा येणे सहाजिक्च आहे. जरा शोध लावायचे, वेगळी पद्दत वापरायची, प्राचीन काळापासुन भरपुर लिखाण उपलब्ध आहे. नेट वर पण बर्याच साईटस आहे, भरपुर चांगले ज्ञान आहे.
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)
1 Oct 2008 - 10:05 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
तेवीस ची आयडीया लोक वापरतच नाही. सारखे आपला एकाचा पाढा.
1 Oct 2008 - 10:28 pm | सखाराम_गटणे™
सहमत (८९.१२%)
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)
2 Oct 2008 - 8:37 am | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
समक्ष बोलू राहिलेल्या ११.८२ बद्द्ल.
1 Oct 2008 - 5:49 pm | विजुभाऊ
एखाद्या चांगल्या निर्मळ उत्सवाचा चंगळ वादा मुळे कसा विचका होतो. ते पाहुन वाईट वाटते.
नवरात्राला सध्या धिंगाणा हे एकमेव स्वरूप आलेले आहे.
नवरात्रानन्तर गर्भपाताचे प्रमाण वाढलेले असते हे जेंव्हा प्रथम ऐकले तेंव्हा मनाला खूप यातना झाल्या होत्या. अजून होतात.
पैशानी हा उत्सव विकला गेला आहे.
"बाई" ही उपभोग्य वस्तु ठरविली गेल्यानन्तर संस्कृती उरतेच कोठे.
स्वतःला सुसंस्कृत म्हणवुन घ्यायला लाज वाटते मला
1 Oct 2008 - 6:58 pm | सखाराम_गटणे™
>>"बाई" ही उपभोग्य वस्तु ठरविली गेल्यानन्तर संस्कृती उरतेच कोठे.
ही तर खरी अडचण आहे.
भाउ, तुन्ही विसरला, सगळे होते ते दोघांच्या संमतीने.
त्यामुळे,
"बाई" ही उपभोग्य वस्तु ठरविली
कसे म्हणता येयील>?
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो.
1 Oct 2008 - 7:02 pm | अवलिया
जियो गटणे जियो
बोळा निघत आहे किंवा निघाला आहे.
1 Oct 2008 - 8:29 pm | मदनबाण
जियो सख्या जियो !!!!!!!!!!!
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
3 Oct 2008 - 7:57 am | नीधप
शरीर ही उपभोग्य वस्तू आहे असं म्हणा..
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
1 Oct 2008 - 5:50 pm | सखाराम_गटणे™
४. बसत नाही. ५. आंघोळ बंद झाली.
सहमत
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो.
1 Oct 2008 - 6:41 pm | प्राजु
नवरात्राचा उपयोग अशा 'कामा'साठी होतो..किंबहुना केला जातो याची खरंच कल्पना नव्हती. आणि हे जर खरं असेल तर समजासमोर एक प्रचंड मोठ आव्हान आहे नव्या पिढीला जागरूक करण्याचं ...
प्रभूसाहेब आपला लेख नीट समजला यावेळी. कदाचित क्रिप्टीक कमी वापरले आहे किंवा आता मलाच क्रिप्टीक वाचायची सवय झाली आहे... :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Oct 2008 - 6:48 pm | सुचेल तसं
प्राजु,
प्रभूसाहेब आपला लेख नीट समजला यावेळी. कदाचित क्रिप्टीक कमी वापरले आहे किंवा आता मलाच क्रिप्टीक वाचायची सवय झाली आहे...
मस्त रिप्लाय... मला सुद्धा (पहिल्यांदाच) प्रभू साहेबांचा लेख कळला आणि हायसं वाटलं. :-)
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
1 Oct 2008 - 7:15 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
बहुतेक मंड्ळी झोपा काढ्ताहेत. आय पील चा सहज वापर आणि त्याची कोम्प्लिकेशन्स हा वेगळा विषय आहे. ह्या सहज चा मि.पा. सद्स्य सहज शी काही ही संबध नाही.
1 Oct 2008 - 7:26 pm | सुचेल तसं
प्रभूसाहेब,
ह्या विषयातील तुमचं ज्ञान पाहून एक प्रश्न विचारतो - कामशास्त्र तज्ञ विठ्ठल प्रभूंशी तुमचं काही नातं आहे का?
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
1 Oct 2008 - 7:31 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
विठ्ठ्ल प्रभु शी काहीही नाते नाही. दोनदा भेट झाली आहे. मी डॉ. प्रकाश कोठारी बरोबर काम केले आहे ड्ब्ल्यु. एच. ओ. मध्ये असताना. अजुनही चांगला दोस्त आहे माझा तो.
1 Oct 2008 - 9:25 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
कायच क्रिप्टिक नाय वो ताई.
1 Oct 2008 - 6:52 pm | अवलिया
मि. पा. सदस्य बरोबर होते. त्यांचा चेहेरा पांढरा पडला.
कोण हो? त्यांचा माझा कधी काही संबंध आला असेल असे तुम्हाला वाटते का? :?
किमान माझ्या कुठल्यातरी एका लेखाशी संबंध नक्कीच आला असेल. नाही का? 8}
1 Oct 2008 - 7:04 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
विविध संबध हा विषय गाजतोय मि.पा. वर. त्यानाच विचारतो प्रथम. त्याना तुमच्याबरोबरचे संबध गुप्त ठेवायाचे अस्ले तर.
बा़की तुमच्या लेखाबरोबर संबध न आलेला प्राणी सापडणार नाही ह्याची मी तुम्हाला खात्री देतो. विविधता तर मी पण मान्य केली आहे की.
1 Oct 2008 - 7:42 pm | वाटाड्या...
प्रभू साहेब,
फारच भीषण वगैरे काय म्हणतात असा अनुभव...
माझ्याही लहानपणी (असेच म्हणावे लागेल..तेव्हाही आणि आताही :) ) माझा असाच एक जिवलग मित्र आहे. ९१-९२ साली तो सुद्धा जायचा असाच. प्रचंड उत्साही गरबा खेळायला. मला कळायचं नाही हा इतका उत्साही का ते? घरी आमचे आई वडील आम्हाला दटावून जाऊ द्यायचे नाहीत. नंतर कधी कधी गरब्याच्या दुसर्या दिवशी भेटायचा (फ्रेश असेलतर) ...आणि अगम्य भाषेत सांगायचा..काल रात्री ३ दा जेवलो. सगळी हसायची. आपल्याला जाम कळायचे नाही. मग मला कडेला घेऊन सांगायचा खरी माहीती..आमच्या अंगावर काटा यायचा.
आता त्याला बघतो तर बिचारा म्हणतो तू सुखी आहेस कारण तू असं काही केलं नाहीस. आता 'त्या' गोष्टीत रस राहीला नाही. लग्न होऊन फक्त ४ वर्ष झालीत.
पण हे आजकालच्या पोरांना पटणार नाही. त्यांच्या दृष्टीने हा भंकसपणा आहे...कालाय तस्मै नमः ...
बाकी हे कळलं नाही....
१.......= कुठे लागले.
२.......= आपण एक्स रे काढु. फ्रॅक्चर आहे का ते कळेल.
३.......= नीट पत्ता घ्यावा.
४.......= पाय दुखले की बसेल
५.......= पाण्याचे त्रास आहेत का तुमच्या कडे
जरा विस्ताराने सांगाल काय??
मुकुल
1 Oct 2008 - 7:50 pm | बिपिन कार्यकर्ते
१.माझ्या मुलीचा पाय घसरला. २. माझ्या मुलीचे पाय वाकडा पडले. ३. चूकीची वाट धरली. ४. बसत नाही. ५. आंघोळ बंद झाली.
1 Oct 2008 - 8:01 pm | कलंत्री
भाषा आली की त्या भाषेची संस्कृती आपोआपच मागे येत असते असे म्हणतात. अमेरिकन संस्कृतीत असे असते असे म्हणतात.
या सर्व मुली बहुधा अ-मराठी असाव्यात असा माझा संशय आहे. कारण आजही मी बर्याच मराठी घरात पारंपारीक द्रुष्टीकोनच पाहतो.
एकुण प्रकार अवघड आहे. असे लेख वाचल्यानंतर जागृत पालक योग्य ती काळजी घेतीलच.
1 Oct 2008 - 8:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> या सर्व मुली बहुधा अ-मराठी असाव्यात असा माझा संशय आहे. कारण आजही मी बर्याच मराठी घरात पारंपारीक द्रुष्टीकोनच पाहतो.
असहमत! हा 'सिलेक्शन इफेक्ट' असावा!
1 Oct 2008 - 8:25 pm | मदनबाण
प्रभू वाणी अतिशय वास्तवातील आहे !!
या सर्व मुली बहुधा अ-मराठी असाव्यात असा माझा संशय आहे.
आम्ही १० वी वगरै असताना देखील मोठ्या मुलांच्या ग्रुप मधील मुलांचे प्रताप पाहुन हादरलेलो आहे !!सर्व मुली सारख्याच
अगदी उच्च वर्णिय जातीतील आमच्याच वयातील मराठी मुलींचे प्रताप आम्ही पाहिले आहेत !!
आपला समाज अजुन हे मानालाच तयार नाही की हे एव्हड मोठ्या प्रमाणात चालते !!सत्य हे सत्य असते हे आमच्या पोरांच्या भाषेत सांगाचे झाले तर टेमका लागला की पोरींच्या घरच्या ना कळत आपल्या लाडक्या मुलीचे दांडिया खेळण्याचे परिणाम !!!
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
1 Oct 2008 - 9:28 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
टेमका हा नेमका कुठं अस्तुया.
2 Oct 2008 - 8:10 am | मदनबाण
टेमका :-- (गर्भार )
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
2 Oct 2008 - 3:00 pm | बिपिन कार्यकर्ते
मदन्या लेका, टेमकर आडनावाची उत्पत्ति आज समजली बघ... ;)
बिपिन.
3 Oct 2008 - 9:03 am | llपुण्याचे पेशवेll
पण आमच्या शाळेत आणि आसपास काही सभ्य वाटणार्या मुली पण होत्या.. मागाहून कळले कि त्याही 'मी नाही त्यातली...' वाल्या होत्या.
बाकी टेमक्याला आमच्या कॉलेजात गेटर म्हणत.. :) म्हणजे दिसले नाही तरी
पुण्याचे पेशवे
1 Oct 2008 - 8:56 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
मानवी देहाच्या रचनेत मराठी आणि अमराठी असा फरक नसतो. अर्ली एक्स्पोजर हा मुद्दा सर्व जणाना मान्य आहे. त्यात लेले आले,गोखले आले, प्रभु पण आले. एकदा का विशिस्ठ ग्रंथीचे ओवरटाईम सुरु झाला की कोणीही थांबत नाही.
1 Oct 2008 - 9:27 pm | टारझन
एकदा का विशिस्ठ ग्रंथीचे ओवरटाईम सुरु झाला की कोणीही थांबत नाही.
हे काहींना समजले नसेल तर खास मिपा शब्द प्रणाली मधे ..." एकदा मोरी तुंबली की बोळा काढण्यासाठी कोणी थांबत नाही. "
बाकी प्रभु साहेब तुम्ही म्हणताय ते वाचुन थोडा थबकलोच राव. आपला मित्र आहे बी.जे. मेडिकल कॉलेजात. त्याने हीच माहिती मला ४-५ वर्षांपुर्वी दिलेली .. पण त्याने तो एक विनोद केला असं समजून आम्ही त्याचीच खिल्ली उडवलेली ..
जे आहे ते चांगलं की वाईट यावर चर्चा निष्फळ आहे.. कोणी कधी काय करावे हे सामाजिक नसून वैयक्तिक आहे... पण आपल्या इथे मात्र त्याला सामाजिक चर्चेचा टिकेचा आणिक कशाचा तरी मुद्दा बनवला जातो. बाकी वर विजाभौंनी जे वाक्य वापरले ""बाई" ही उपभोग्य वस्तु ठरविली गेल्यानन्तर संस्कृती उरतेच कोठे." या सरसकट विधान केल्याबद्दल आणि पुरूषांच्या नितीवर बोट ठेवल्याबद्दल एक जाहिर निषेध. बाकी नवरात्रात आम्ही फक्त 'गर्बा' चे ट्राय केलेले पण ते एवढ्या 'गर्भा'च्या थराला जातात असं स्वप्नात देखिल वाटलं नव्हतं असो ... "जो जे वांछिल तो ते लाभो .. आय पील जवळ असो "
आज दा विंसींनी कळेल असा कोड लिहीला ... ते पण ओपन ओपन .. म्हणून ओपन "दा विंसी कोड" चं स्वागत आहे
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
2 Oct 2008 - 7:07 am | गणा मास्तर
यात सगळेच लोक येतात अमराठी काय आणि मराठी काय?
श्रीमंत काय आणि गरीब काय?
आणि हो कुठल्याच राजकीय पक्षाच्या हातात हा प्रश्न दिल्याने काहीही होणार नाही.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
1 Oct 2008 - 8:12 pm | वाटाड्या...
मी जो अनुभव सांगितला तो आम मराठी घरातला आणि त्यातही "तो" आणि "त्या" चक्क मध्यमवर्गीय मराठी घरातल्या....आता बोला...
1 Oct 2008 - 8:37 pm | टग्या (not verified)
एकदा का "आपण"/ "आपले"/ "आपली संस्कृती"/ "आपली भारतीय संस्कृती"/ "आपली हिंदू संस्कृती"/ "आपली मराठी संस्कृती"/"आपली ब्राह्मणी संस्कृती"/"आपली (आपला जो काही सबसेट असेल तो त्याची) संस्कृती" ही तमाम दुनियेत सर्वश्रेष्ठ, "आमच्यात असलं काही चालत नाही बॉ!", हे आपलं आपणच ठरवून टाकलं, की मग झापडं आपोआपच लागतात, आणि मग आजूबाजूला काय चाललंय ते दिसेनासं होतं. आणि ही वृत्ती भारतीय/हिंदू/मराठी/ब्राह्मण यांच्यातच आहे असा मुळीच दावा नाही; ही मानवी वृत्ती आहे.
"असलं काही" हे खरोखरच वाईट का, त्याचे निकष काय, हा पूर्णपणे वेगळा मुद्दा.
1 Oct 2008 - 8:19 pm | रेवती
काय बोलणार अश्या मुलामुलींना. नवरात्रानंतर असणारे गर्भपाताचे प्रमाण वाढते हे ऐकून होते पण ७० ते ८०च्या दशकात?
एकतर साधारणपणे ऐकलेला आकडा हा दिवसाला २५ ते ३० असावा आणि सांगणारे लोक आकडा फुगवून सांगत आहेत असे वाटायचे. गरबा प्रकरण हे फार प्रसिद्ध का असतं हे समजूनही चार पाचच वर्षे झाली.मुलींना निदान आपल्या तब्येतीची तरी काळजी हवी. नंतर होणारे स्त्री देहाचे हाल (कॉम्प्लीकेशन्स) त्यांना सांगितले पाहिजेत.
रेवती
1 Oct 2008 - 8:27 pm | टग्या (not verified)
साधारणतः १९८८ साली मुंबईच्या लोकलला लटकत असताना आजूबाजूच्या दोन वयस्क नव्हे तरी बर्यापैकी प्रौढ गुजराती सद्गृहस्थांच्या "आपला (गुजराती) समाज कुठे चाललाय / हल्ली आपल्या समाजात कायकाय म्हणून सर्रास चालतं / काय व्हायचं आपल्या समाजाचं" अशा काहीश्या आशयाच्या संभाषणातून उदाहरण म्हणून ही खंत ऐकली होती. त्यामुळे हे प्रकरण नवीन निश्चितच नाही. आणि तेव्हाही सर्रास चालत असावं / प्रसिद्ध असावं. आपल्याला उशिरा समजलं म्हणजे असं काही नव्हतंच असं मुळीच नाही.
1 Oct 2008 - 8:59 pm | रेवती
आपल्याला उशिरा समजलं म्हणजे असं काही नव्हतंच असं मुळीच नाही
हे असं काही नव्हतच असं मी कुठेही म्हटलेलं नाही.
रेवती
3 Oct 2008 - 8:01 am | नीधप
यासाठीच तर लैंगिक शिक्षणाची गरज आहे ना.
'समाजस्वास्थ्य' कशासाठी काढत होते र. धो. कर्वे?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
1 Oct 2008 - 8:28 pm | शेखस्पिअर
मागील वर्षी केलेल्या सर्वेक्षणा नुसार नवरात्रीच्या काळात अहमदाबाद व बडोदा या ठिकाणी कंडोम ची विक्री
अनुक्रमे २८% व ३५% वाढली ..
असा निष्कर्ष होता...
सुशिक्षितपणा बहुतेक हाच असावा...
1 Oct 2008 - 8:40 pm | कलंत्री
हे तर बिहारी आक्रमणापेक्षाही जास्त घातक आहे.
मला तर कधी वाटते मुला आणि मुलींच्या लग्नाच्या वय वाढल्यामुळे हे घडत असावे.
हे जर असेच चालले तर अमेरिकन आईसारखीच भारतीय आईसुद्धा गर्भप्रतिबंधक गोळी आपण स्वःताहुन आपल्या मुलीला देत जाईल.
आपल्या माहितीतील पालकांचे आणि मुला-मुलीचे प्रबोधन करायला हवे.
शेवटी या गोळ्या सुद्धा शरीराला घातक असतात हे लक्षात घ्यायला हवे. ( यावर एक वेगळा लेख देण्याचा विचार आहे.)
1 Oct 2008 - 8:47 pm | मदनबाण
मला तर कधी वाटते मुला आणि मुलींच्या लग्नाच्या वय वाढल्यामुळे हे घडत असावे.
काय राव अवं टीव्ही वर असलेल्या सिरीयल्स मधे सुद्धा मुलीचा कोण ना कोण तरी बॉय फ्रेंड असतोच,, वयच वगरै सोडुन ध्या हो ज्या वयात हे प्रकार घडतात ते वय लग्नाच नसतंच मुळी !!!
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
1 Oct 2008 - 8:51 pm | टग्या (not verified)
बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड असण्यात नेमकं काय वाईट आहे? त्यानं भारतीय संस्कृती नेमकी का बुडावी?
आईबापांनी निवडून दिलेल्या मुलाशी/मुलीशी निमूटपणे संसार करणं हीच भारतीय संस्कृतीची महती आहे काय? याइतका भारतीय संस्कृतीचा (ऍज़ इट वॉज़ मेंट टू बी) दुसरा अपमान नसावा.
1 Oct 2008 - 9:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
टग्याशेटच्या दोन्ही मुद्यांशी १००% सहमत.
>> आईबापांनी निवडून दिलेल्या मुलाशी/मुलीशी निमूटपणे संसार करणं हीच भारतीय संस्कृतीची महती आहे काय?
आणि मग स्वतःची निवड लादण्यासाठी स्वतः मुलांना जन्म देऊन वेठीस धरावं का?
1 Oct 2008 - 9:18 pm | मदनबाण
आईबापांनी निवडून दिलेल्या मुलाशी/मुलीशी निमूटपणे संसार करणं हीच भारतीय संस्कृतीची महती आहे काय?
अहो पण ज्या मुलींचे ४ बॉयफ्रेंड असतात त्यांचे काय ??
मित्र हा सखा झाला तर चांगलच आहे पण लग्नापुर्वी संबंध ठेवण्याची घाई कशाला ?
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
1 Oct 2008 - 9:37 pm | सखाराम_गटणे™
>>मित्र हा सखा झाला तर चांगलच आहे पण लग्नापुर्वी संबंध ठेवण्याची घाई कशाला ?
सहमत (१००%)
हेच म्हणतो, आणि आजकाल आईबाप जबरदस्ती करत नाहीत, आणि ज्या मुले-मुली लग्ना आधी इतक्या गोष्टी करतात. ते जबरदस्ती करुन घेतील का?
आजकाल व्यक्ती स्वातंत्र्यानावाखाली काहीही चालते असा गैरसमज पसरतो आहे.
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)
1 Oct 2008 - 9:51 pm | टुकुल
>>>आजकाल व्यक्ती स्वातंत्र्यानावाखाली काहीही चालते असा गैरसमज पसरतो आहे.
व्यक्ती स्वातंत्र्य हा हेवढा स्वस्त शब्द झाला आहे कि त्याच्या नावाखाली काही ही चालते. ज्यांना धुवायची पण अक्कल आलेली नसते ते पण वापरतात.
>>>वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
=)) =))
1 Oct 2008 - 8:57 pm | कलंत्री
हे जे चालले आहे किंवा जितक्या सहजपणे आपण चर्चा करत आहोत त्याचा मला विस्मय वाटतो.
आचारावर घाला घातला जातो मग विचारावर आपोआपच घाला पडतो.
माझ्या मते या विषयावर शास्त्रीय पद्धतीने माहिती काढली जायला हवी. आपण जी काही चर्चा करत आहोत त्याने किती घरे आणि मने उद््ध्वस्त होणार आहे याचा आपण विचारतरी करीत आहोत काय?
येशुचा कोणीतरी विचार उधृत केला आहे त्याचा विचार करायला हवा. ( अपूर्ण)
1 Oct 2008 - 9:09 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
कुठले खांब धरुन बसला आहात कलंत्री साहेब. चर्चेने घर सावरतील. जेव्ढी मोक्ळी तेव्ढ बरे. अर्थात मि.पा. चे नियम न मोडता.
त्याची सुद्धा काळ्जी नसावी. तात्याच्या हाती बटन आहे की. पॉर्नोग्राफिक साईटला जास्त विझिट कोणाच्या असतात. १२ ते २५ वर्षे मुलांच्या. आई बाप झोपल्यावर. पॉप अप्स ची काळ्जी घेउन.
1 Oct 2008 - 9:35 pm | टग्या (not verified)
होते आहे म्हणून तर चर्चा होते. आणि सहजपणे, मोकळेपणाने चर्चा करून काय होते आहे, का होते आहे ते समजून घ्यायचे, की केवळ आपली चौकट मोडली म्हणून धक्क्यात जाऊन परत आपल्याच चौकटीत गुरफटायचे?
मुळात आपली चौकट काय आहे, ते तरी आपल्याला कळले आहे काय? ते समजण्याचा आपण प्रयत्न करतो काय? की आपली चौकट तीच बरोबर, बाकी सर्व चूक, हेच मुळात गृहीतक असते?
चौकटीबाहेरचे काही आले की धक्का कोणालाही बसतो, ते स्वाभाविकच आहे. आणि त्यासाठी आपली चौकट सुधारणे हे प्रत्येकाला प्रत्येकवेळी शक्य होतेच असे नाही (मलाही नाही होत कित्येकदा!). पण म्हणून आपल्या चौकटीबाहेरही काही असू शकते, आपल्या चौकटीलाही मर्यादा आहेत हेच मुळात ऍक्नॉलेज का नाही करायचे?
बरे, आपली चौकट बरोबर असेलही, अगदी ती १००% बरोबर आहे असे गृहीत धरू. पण ती का बरोबर आहे, चौकटीबाहेरचे नेमके का चूक आहे, हे तरी आपल्याला स्पष्ट आहे काय? समांतर चौकटींचे सोडून द्या, आपलीच चौकट जरी १००% खरी मानली, तरी त्या चौकटीत विश्व मावत नाही, त्याबाहेर जात आहे हे एकदा लक्षात आल्यावर त्यामागील कारणांसाठी विश्वाबरोबरच आपली चौकटही तपासून पाहायला नको काय?
मुळात हे आचार कोणी, कधी ठरवले, कशासाठी? ते नेहमी असेच होते का? बदल म्हणजे नेहमीच चूक का? किती बदल हा ग्राह्य आहे आणि किती नाही, आणि का? या मूलभूत मुद्द्यांवर विचार व्हायला नको का?
याहीपुढे जाऊन, मी ठरवलेले आचार सगळ्यांनी पाळले पाहिजेत हे ठरवणारा मी कोण?
'शास्त्रीय पद्धतीने' म्हणजे नेमके काय? आणि इथे नेमके काय वेगळे चालले आहे?
'उद्ध्वस्त' म्हणजे नेमके काय? आणि आपल्या मनात जी 'उद्ध्वस्त'ची व्याख्या आहे (असे मला वाटते), ती जरी ग्राह्य मानली, तरी हा विचार आताच का सुचावा? ही काही नवीन गोष्ट नाही. मलाच माहीत होऊन २० वर्षे उलटून गेली. आपल्याला आज कळली असेल. कदाचित मला कळण्यापूर्वीही २० वर्षे चालत असेल, कोणाला माहीत. मग किमान २० वर्षे यातून काही 'उद्ध्वस्त' वगैरे होत आहे असे कोणाला वाटले नाही, तर मग आजच याचा विचार कशाला? (किमानपक्षी ज्यांचे काही 'उद्ध्वस्त' वगैरे झाले, त्यांना तर नक्कीच वाटले असते?)
की 'कदाचित हे लोण आपल्यांपर्यंतही पोहोचले तर' ही यामागची भीती आहे? जर २० वर्षांत पोहोचू शकले नाही (आजूबाजूला सर्रास चालू असता), तर आजच (हे कळल्यावर - आणि तेही 'मिसळपावा'वर वाचून) का पोहोचावे? पण तरीही तुमची काळजी रास्त असू शकते. आणि त्याकरता वैयक्तिक पातळीवर, स्वतःच्या कुटुंबापुरत्या (तुम्हाला योग्य वाटतील त्या) पायर्या (तुम्हाला योग्य वाटत असतील तर) तुम्ही निश्चितच घेऊ शकता. त्या जर योग्य असतील आणि योग्य तर्हेने त्याची अंमलबजावणी करू शकलात (आणि ज्यांच्यासाठी त्या घ्यायच्या त्यांना ते पटवू शकलात) तर उपयोग होईलही, नाहीतर होणार नाही. पण समाजाने कसे वागावे, समाजाकरता योग्य काय हे आपण कसे ठरवणार?
त्याआधी मुळात 'पाप' म्हणजे काय, ते कोणी आणि कशाच्या आधारावर ठरवायचे हे स्पष्ट व्हायला हवे.
1 Oct 2008 - 9:41 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
नतमस्तक आहे मी आपल्या पुढे. खुप आवड्ले ट्ग्या राव तुम्ही लिहिलेले.
1 Oct 2008 - 10:03 pm | साती
सहमत टग्या!
आय्.पिल्.ला कुणाचा आरोग्याच्या दृष्टीकोनातून विरोध असेल तर समजू शकतो. संस्कृतीवर आघात वैगेरेमुळे नाही.
नवरात्रात या गोष्टी वाढलेल्या दिसणे हा कदाचित संधी मिळत असल्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट असावा. ज्यांना असं वागायचंय ते कधी ना कधी वागणारच.
मुळात आपण बाळबोधपणे आपल्या समाजात असं काही नाही , असलं तर हल्लीच वाढलंय वैगेरे समजतो किंवा तसा दावा करतो हेच चुकीचं आहे. विवाहबाह्य्,विवाहपूर्व संबंध हे इथे पूर्वीपासूनच आहेत, अन्यथा इतके अनाथाश्रम दिसले नसते. (आता अनाथाश्रमांच्या जागी आय. पिल. आणि निरोधची पाकिटे दिसतील कदाचित. यांपैकी चांगले कुठले हे कोण ठरवणार?)
साती
3 Oct 2008 - 8:03 am | नीधप
परफेक्ट!!!
एकदम करेक्ट
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
1 Oct 2008 - 10:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या मते या विषयावर शास्त्रीय पद्धतीने माहिती काढली जायला हवी. आपण जी काही चर्चा करत आहोत त्याने किती घरे आणि मने उद््ध्वस्त होणार आहे याचा आपण विचारतरी करीत आहोत काय?
चर्चा करुन घरं उध्वस्त होणार असं तर तुम्ही सुचवत नाही आहात ना?
बाकी पुन्हा एकदा टग्याशेटशी सहमत.
1 Oct 2008 - 9:49 pm | सखाराम_गटणे™
>>>
जे काही मुले-मुली करतात, ते काही चुक असे नाही, हा निसर्ग नियम आहे. पुर्वी मनावर ताबा असावा, जीवनाचा हेतु उदात्त असावा, मेणबत्तीसारखे दुसर्यासाठी जळावे इति. इति.
आता, जो तो जीवन उपभोगणे च्या मागे लागला आहे, आता प्रत्येकाचे जीवन उपभोगणे वेगळे.
बालविवाह पुन्हा चालु करावेत असे माझे मत आहे.
हे जे आकडे आहेत ते इतर साधने फेल झाल्यानंतरचे आहेत. आणी दरवेळीच गर्भधारणा दरवेळीच होते असे नाही.
काही पपया, धोतरा असे उपाय आहेतच.
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो.
1 Oct 2008 - 9:55 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
पपयाने **काही होत नाही.
1 Oct 2008 - 10:01 pm | भास्कर केन्डे
लेखाचे नाव पाहून वाटले जरा "टंकलेखना"त गडबड असावी. आम्हाला बुवा ते "आय पी एल" वाटले.
पण लेखकाचे नाव पाहून काही तरी नवीन प्रकार असणार म्हणून वाचले आन बॉ आपले डोके गरागरा फिराय लागले. गुगलावरुन "आय पील" काय आहे हे समजून घेतले.
आम्हाला अगम्य अज्ञानातून बाहेर काढल्याबद्दल प्रभू साहेबांचे तसेच प्रतिसाद देणार्यांचे डोंगरा येवढे उपकार.
आपला,
(अज्ञानी) भास्कर
आम्ही येथे वसतो.
2 Oct 2008 - 7:46 am | पिवळा डांबिस
लगे रहो मुन्नाभाय!!!:)
जे काही मुले-मुली करतात, ते काही चुक असे नाही, हा निसर्ग नियम आहे.
सहमत! आणि आज जेंव्हा आयुष्यातील बाकीची ध्येये मिळवण्याच्या ध्यासामुळे (चांगल्या अर्थाने) लग्नाला उशीर होतो. त्यामुळे हे असे वर्तन होणे सहाजिकच!!
पुर्वी मनावर ताबा असावा, जीवनाचा हेतु उदात्त असावा, मेणबत्तीसारखे दुसर्यासाठी जळावे इति. इति.
आता, जो तो जीवन उपभोगणे च्या मागे लागला आहे
पूर्णपणे असहमत!! पूर्वीचे लोक काही उदात्त , सत्शील वगैरे नव्हते!! लग्नाआधी अनैतिक संबंध ही मनुष्यजातीची हजारो वर्षांची परंपरा आहे. कुंतीचेच उदाहरण घ्या. कर्ण कसा काय जन्माला आला?
बालविवाह पुन्हा चालु करावेत असे माझे मत आहे.
ह्ये मात्र तुफान ईनोदी!!! सख्या, तुझ्यासाठी आता एखादी १० वर्षांची बालिका शोधूयात!!!:)
हे जे आकडे आहेत ते इतर साधने फेल झाल्यानंतरचे आहेत. आणी दरवेळीच गर्भधारणा दरवेळीच होते असे नाही.
सहमत! पण ठराविक वयात गर्भधारणा व्हायचा संभव जास्त असतो. हे निसर्गतःच होते. विशितल्या मुलीला चाळिशीतल्या स्त्रीपेक्षा गर्भधारणा होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते असे म्हणतात!
काही पपया, धोतरा असे उपाय आहेतच.
पपया....!! कोणत्या युगात वावरतात आहेत रे हे लोक!!!! अरे दादरच्या गर्भपात क्लिनिकची जाहिरात गेली ३५ वर्षे तरी होते आहे रे मुंबईच्या लोकल गाड्यांमध्ये!!! जरा आजूबाजूला वाचा रे प्रवास करतांना!!!!!:)
माझ्या मते कायद्याने सज्ञान असलेल्या पुरुष आणि स्त्रीयांनी आपखुषीने लैंगिक संबंध ठेवण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. फक्त त्यातून निष्पन्न होणार्या परिणामांची काळजी आनि जबाबदारी घेण्याची तयारी असणे आवश्यक आहे. परिणाम (गर्भधारणा) टाळण्यासाठी आज अनेक उपाय उपलब्ध आहेत. तेही जर आजकालच्या तरूण्-तरुणींना माहीती नसतील तर त्यांच्या अज्ञानाची कीव करावी तेव्हढी थोडीच!!! निरोधाची जाहिरात गेली ३०-३५ वर्षे तरी लोकलच्या डब्यात होत आहे.
बाकी पालकांचं म्हणाल (ते १-५ प्रश्न आणि त्याची पालकांनी दिलेली उत्तरे) हा केवळ भोंदूपणा (हिपोक्रसी) आहे असे मी म्हणेन!! आपल्या मुला-मुलीना योग्य ते लैंगिक शिक्षण देण्याची अंतिम जबाबदारी पालकांची आहे. आपले किती पालक ती पार पाडतात? वरील प्रतिक्रियांमध्ये कुठेतरी अमेरिकन आया आपल्या मुलीना संततीप्रतिबंधक साधनांची माहिती देत असल्याबद्द्ल उपहासपूर्वक उल्लेख आहे. पण मला सांगा, त्यात काय चूक आहे? आपल्या मुलांवर आपण २४ तास तर लक्ष ठेवू शकत नाही (आणि तसे ठेवूही नये!) मग आपल्या पाल्याला या विषयात सज्ञान करण्यात काय चूक आहे?
पालकांनो एक लक्षात ठेवा! तुम्हाला आवडो वा न आवडो, तुमची वयात आलेली मुलं-मुली हे लैंगिक संबंधांबद्दल उत्सुक असणारच! ते तुम्ही कितीही म्हटलं तरी टाळू शकत नाही!! आता त्यांना योग्य माहिती देऊन पुढील परिणामांविषयी (व ते टाळण्याविषयी) जागृत करणं ते तुमच्या हातात आहे. आपण ऍक्टिव्ह रोल घ्यायचा कि पॅसिव्ह राहुन फक्त माझी मुलं हे असं काही करणारच नाहीत या फोल कल्पनेमध्ये मश्गुल व्हायचं हे तुमच्या हातात आहे!!!!
आमेन!!!!!:)
2 Oct 2008 - 8:15 am | कलंत्री
विचार प्रवर्तक आणि दिशा देणारा असा हा प्रतिसाद आहे.
हा विषयावर आपल्या घरी चर्चा झाली तर त्यातुन शिक्षण होईल हे १००% मान्य.
इतकेच कश्याला आपल्या मुलांच्या आणि मुलींच्या मित्रमंडळींना एकत्र आणून यावर अभ्यास चर्चा करायला हरकत नसावी.
प्रभूसाहेबांच्या मते आपण १९४७ ची विचारसरणी ठेवत आहे यातही तथ्य आहे.
2 Oct 2008 - 8:26 am | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
अय शेख तेरी तू देख. आपल्या मुलांचे आपण बघा. मित्रमंडळीचे पालक " आमच्या मुलाना बिघडवता का" म्हणुन जोडे हाण्तील. भारतीय
प्रजासताकाचा विजय असो.
असे जोडे अनेक वेळा खाउनही जिवंत आहे मी.
आपला नम्र
वि.प्र.
2 Oct 2008 - 8:42 am | पिवळा डांबिस
असे जोडे अनेक वेळा खाउनही जिवंत आहे मी.
जिवंत असल्याबद्दल अभिनंदन!!:)
पण एक लक्षांत ठेवा विनायकराव! तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरच तर सर्व भिस्त आहे आमची!!!
अन्यथा हिपोक्रिट संस्कृतीरक्षकांनी एव्हांना एका समस्त समाजाचा संपूर्ण नास केला असता....
8 Sep 2014 - 6:30 pm | कवितानागेश
प्रतिसाद आवडलाय.
2 Oct 2008 - 8:02 am | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
आयुष्यातील ३० वर्षे जाळली ह्या क्षेत्रात. पण शिकल्या सवरल्या लोकांच्या मनोव्रुत्तीत ह्या विषयात फारसा फरक नाही. ह्यांची आपली १९४७ भारत देश स्वतंत्र झाला टाईप विधाने चालू असतात. आपण विषय खोलात जाउन लिहील्याबद्दल मनापसुन धन्यवाद.
2 Oct 2008 - 8:15 am | पिवळा डांबिस
हॅपी टू हेल्प!!!!
:)
2 Oct 2008 - 9:31 am | गणा मास्तर
खरेतर आपला समाज कुठल्यातरी खोट्या कल्पनांपायी बोलायला घाबरतो.
काल परवाच काही जपानी सहकार्यांसोबत लग्न, लैंगिक संबंध याबाबत चर्चा झाली.
इथे शक्यतो प्रेमविवाह होतात आणि लग्नाआधी जोडीदाराबरोबर लैंगिक संबंध असतातच असतात.
किंबहुना असे सबंध ठेवायला जोडीदाराने नकार दिला तर त्यात काहितरी कमतरता, आजार आहे असे समजले जाते.
इथे टीव्ही मालिकांमधुन सेफ सेक्सची माहिती दिली जाते.
कदाचित विषयांतर झाले असावे.
पालकांनी मुलांना याची माहिती नेमकी कशी द्यावी यावर कोणी प्रकाश टाकु शकेल काय?
संवादाला सुरुवात कशी कोठुन आणि कधी करावी.
(खरेतर एखाद्या चांगल्या लेखमालेच्या प्रतिक्षेत)
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
2 Oct 2008 - 9:40 am | प्रभाकर पेठकर
संस्कार, नितीमत्ता, जीवनमुल्य वगैरे वगैरे शब्द कानावर पडले की हल्ली नाकं मुरडली जातात.
निसर्ग १२-१३ वर्षापासून मुलीला माता बनण्याचे अधिकार देतो. कायदा १८व्या वर्षापासून हा अधिकार प्रदान करतो. तरी शिक्षण, करियर, स्वातंत्र्य उपभोगणे इ. इ. कारणांसाठी मुलींची लग्ने २५ वर्षे आणि त्या पुढे होतात.
लग्ना आधी इतरांशी शरीरसंबंध (गर्भनिरोधके वापरून) ठेवलेला जीवनसाथी किती मुला-मुलींना चालतो?
एखाद्या मुलीशी लग्न ठरल्यावर एखादा मित्र म्हणाला, 'आयला, फटाका आहे पोरगी. आम्ही दोघांनी कित्येकदा अमु़क अमु़क हॉटेलात रात्र-रात्र मजा केली आहे. बिनधास्त लग्न कर. मजा मारशील लेका.' असे म्हंटले किंवा एखाद्या मुलीची मैत्रीण म्हणाली, 'अग सॉलीड रोमँटीक आहे तो पोरगा. मी आणि तो अमुक अमु़क हॉटेलात कित्येक रात्री जागलो आहोत. अग झोपूच देत नाही. काय धमाल करतो म्हणून सांगू...' तर किती मुले मुली ठरवलेले लग्न पार पाडतील? ९९% मुले-मुली ताबडतोब लग्न मोडतील. तरीपण ह्या ९९% मुलामुलींसमोर वरील (संस्कार, नितीमत्ता, जीवनमुल्य) शब्द उच्चारले तरी तेही नाकेच मुरडतील.
लग्नापूर्वी शरीरसंबंध (अगदि जिच्याशी/ज्याच्याशी लग्न ठरलेले आहे ती व्यक्तीशीही...) नितीमत्तेत बसत नाहीत. ही नितिमत्ता कोणी ठरवली? त्यांना काय अधिकार? ह्या प्रश्नांचे ढोबळ मानाने उत्तर असे देता येईल की 'समाजाने'. (कोणी एकाने नाही). समाज आरोग्यपूर्ण आणि एकसंघ राहावा ह्या उद्देशाने असे अलिखित नियम केले गेले. लग्नापुर्वीच्या शरीर संबंधांमधून जर संतती जन्मास आली आणि त्याची जबाबदारी पित्याने नाकारली तर अनौरस संतती वाढत जाईल आणि अशा संततीची भावनिक वाढ नीट आणि योग्य दिशेने न झाल्याने, जन्मतःच आपल्याला नाकारलेले आहे ह्या चिडीतून ती संतती समाजाचे नियम झुगारून स्वतःच्या नियमांनी कशीही वागू लागेल आणि समाजाच्या आरोग्याचे संतुलन बिघडेल. हे सर्व होऊ नये म्हणून सामाजिक आणि व्यक्तिगत नितिमत्ता महत्त्वाची आहे.
पुर्वीच्या काळी साधने नव्हती (एवढी प्रचलीत आणि सहज उपलब्ध नव्हती) तेंव्हा कायदे जरा जास्त कडक होते. ती त्या काळची गरज होती. आज तसे नाही आय्. पील. आहे , निरोध आहे.तेंव्हा आता तशी नितीमत्ता बाळगण्याचे कारण काय? आता संतती रोखता येऊ शकते. करून सवरून नामा निराळे राहता येते. तरी पण सुखी संसारातील एकनिष्ठता आणि विश्वास ह्याला तडा जाणार्या गोष्टीने लग्न संस्था कमकुवत होऊ शकते. आणि पुन्हा वैयक्तीक तसेच सामाजिक नुकसानच होते. अनेकांशी शरीर संबंध आल्यावर जर संसारात मन रमले नाही तर पुरूषाला किंवा स्त्रीला लग्ना नंतरही, लग्न बंधनात राहूनही, इतरांशी शरीरसंबंध ठेवण्याचे आकर्षण वाटू शकते. आणि शेवटी लग्न म्हणजे काय तर, 'कायदेशीररित्या स्त्री पुरूष शरीर संबंध' अशी एक उथळ व्याख्या तयार होईल. असे होणे कोणाच्या हिताचे आहे? मुलांना जर जाणवले की आपले बाबा दुसर्या स्त्री बरोबर झोपतात किंवा आईचे दुसर्या कोणा पुरुषाशी शरीर संबंध आहेत तर त्याचे भावविश्व उध्वस्त होइलच कि नाही? मुसलमान धर्मातही 'चार विवाहांना संमती आहे' 'चार अनैतिक संबंधांना नाही'.
अनैतिक शरीर संबंध हा समाजातील आजचा बदल नाहीए. पुरातन काळापासून चालत आलेला आहे. पुरूष प्रधान समाजात 'अंगवस्त्र' ही उच्चभ्रू समाजाची मिरासदारी होती. वेश्या व्यवसाय हा विश्वातला सर्वात जुना व्यवसाय आहे. पण 'अंगवस्त्र' बाळगणार्या कुटुंबप्रमुखाच्या कुटुंबातील इतर घटकांची मानसिक कुचंबणाच व्हायची. घरच्या लक्ष्मीला कधीच मनःस्वास्थ लाभायचे नाहि. पण कुटुंबप्रमुखाचा घरात 'पोलीसी कायदा' असायचा. 'ह्या विषयावर कोणी काही चकार शब्द काढायचा नाही' अशी सक्त ताकिद असायची. वेश्या व्यवसायालाही, ज्यांची लग्ने होत नाहीत, व्हायची आहेत, झालेली आहेत पण काही कारणाने घरात सुख नाही अशा पुरूषांनी इतर निरपराध स्त्रीयांवर बलात्कार करून नये म्हणून सरकारने परवानगी दिलेली आहे असे म्हणतात. तरी पण तेही आपल्याकडे नितीमत्तेत बसत नाही. वेश्या गमनी पुरुषाकडे चांगल्या नजरेने बधितले जात नाही.
शारीरीक गरज कितीही तीव्र आणि नैसर्गिक असली तरी त्यावर ताबा ठेवता येतच नाही असे नाही. हे आपण स्वानुभवावरून आणि आजूबाजूच्या अनेक ओळखिच्या उदाहरणांमधून पाहू शकतो. एखाद्याने अन्याय झाला म्हणून संतापाच्या भरात समोरच्याचा खून केला तर आपली सहानुभूती त्याला मिळू शकते पण तरीही तो गुन्हेगारच ठरतो. समाज रक्षाणासाठी केलेल्या कायद्या बाहेर तो वागलेला असतो. आपल्या भावनांवर, त्या कितीही नैसर्गिक असल्यातरी, ताबा ठेवण्यास तो असमर्थ ठरलेला असतो. आपली कितीही सहानुभूती त्याला मिळाली तरी पण ' त्याने असे वागायला नको होते' असाच सर्व हितचिंतकांचा सूर असतो. त्यात काही गैर आहे का?
शिक्षणाच्या, ज्ञानाच्या प्रसाराने, व्यक्तिस्वातंत्र्याच्या अवास्तव कल्पनांमुळे, घरातल्यांच्या संस्काराच्या अभावाने, नितिमत्ता, जिवनमुल्ये आदी विषयांवर घरात होणार्या संवादाच्या अभावाने, बळावलेल्या आत्मकेंद्रीत वृत्तीमुळे, वाढत्या बंडखोरीमुळे, शरीर सुखाची चटक, चोरून शरीरसुख मिळविण्यातील थरार आदी घटकांमुळे विवाहपुर्व शरीर संबंधांचे प्रमाण हल्ली जास्त वाढलेले आहे असे दिसते.
श्री. विनायक प्रभू ह्यांना त्यांच्या वैद्यकिय अनुभवातून हे प्रकर्षाने जाणवले आणि हे चित्र भयावह आहे असे वाटले. नविन पालकांनी, ज्यांची मुले अजून लहान आहेत त्यांनी, ह्या विषयावर सखोल विचार करून आई-वडीलांनी आपापसात चर्चाकरून आपल्या मुलांवर कसे संस्कार करावेत हे त्याना ठरविता यावे. त्यांना वास्तवाचे भान करून द्यावे म्हणून हा लेखनप्रपंच मांडला आहे असे मला वाटते.
एका चांगल्या गहन विषयाला चर्चेसाठी मांडल्या बद्दल श्री विनायक प्रभू ह्यांचे आभार आणि अभिनंदन.
2 Oct 2008 - 10:15 am | सखाराम_गटणे™
सहमत,
>>लग्ना आधी इतरांशी शरीरसंबंध (गर्भनिरोधके वापरून) ठेवलेला जीवनसाथी किती मुला-मुलींना चालतो?
ज्यांना गरब्यातील संबध म्हणजे काहीच वाटत नाही, त्यांनी उत्तर द्यावे.
शिक्षणाच्या, ज्ञानाच्या प्रसाराने, व्यक्तिस्वातंत्र्याच्या अवास्तव कल्पनांमुळे, घरातल्यांच्या संस्काराच्या अभावाने, नितिमत्ता, जिवनमुल्ये आदी विषयांवर घरात होणार्या संवादाच्या अभावाने, बळावलेल्या आत्मकेंद्रीत वृत्तीमुळे, वाढत्या बंडखोरीमुळे, शरीर सुखाची चटक, चोरून शरीरसुख मिळविण्यातील थरार आदी घटकांमुळे विवाहपुर्व शरीर संबंधांचे प्रमाण हल्ली जास्त वाढलेले आहे असे दिसते.
पुर्णपणे सहमत,
व्यक्तिस्वातंत्र्याचा उपयोग काही तरी चांगले, समाज उपयोगी कार्य करण्यासाठी करा,
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)
2 Oct 2008 - 10:35 am | पिवळा डांबिस
>>लग्ना आधी इतरांशी शरीरसंबंध (गर्भनिरोधके वापरून) ठेवलेला जीवनसाथी किती मुला-मुलींना चालतो?
ज्यांना गरब्यातील संबध म्हणजे काहीच वाटत नाही, त्यांनी उत्तर द्यावे.
आपल्याला काय चालते आणि काय नाही हा इथे प्रश्नच नाहिये असे मला वाटते.....
आता यापुढे आपल्याला असेच चॉईस मिळणार आहेत (आपण जर अगदी घनघोर खेड्यात जाउन विवाह केले नाहीत तर!!)
वर निर्देशित केलेल्या कोणत्याही कारणाने असोत, विवाहपूर्व संबंध अस्तित्वात असणार हि शक्यता आता नाकारता येत नाही. आता हल्लीच्या मुला-मुलींपुढे प्रश्न हा आहे की आपल्याविषयी काळजी करणार्या, आपल्यावर आजतरी प्रेम करणार्या व्यक्तिशी लग्न करणार की तिच्या पूर्वेतिहासात जाऊन तिला होकार/नकार देणार....
सखारामजी, नव्या पिढिचे पाईक या नात्याने तुमच्या प्रतिसादाची वाट पहात आहोत.....
२० वर्षांपूर्वीच लग्न करून सगळे करून भागलेला,
डांबिसकाका
:)
2 Oct 2008 - 11:57 am | सखाराम_गटणे™
आता हल्लीच्या मुला-मुलींपुढे प्रश्न हा आहे की आपल्याविषयी काळजी करणार्या, आपल्यावर आजतरी प्रेम करणार्या व्यक्तिशी लग्न करणार की तिच्या पूर्वेतिहासात जाऊन तिला होकार/नकार देणार....
मी खरे उत्तर देतो, उगाच तोंडदेखले नको.
दोन्हीही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. पुर्वे इतिहास पण तितकाच म्हत्वाचा आहे. इतिहास हा माणसाच्या भविष्याचा आरसा असतो. (प्र. वाळींबे), प्रेम हे महत्वाचे आहेच आणि त्या बरोबर चारीत्र ही महत्वाचे आहे. जर मी बाहेर गुण उधळत असेन तर मुलीने गुण उधळले असतील तर तीला बोलण्याचा मला हक्क नाही. हे मी मानतो.
लग्नापुर्वी संबंध ही गोष्ट दुर्लक्ष करण्याजोगी नाही, हे ही तितकेच खरे.
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)
2 Oct 2008 - 11:15 pm | पिवळा डांबिस
दोन्हीही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. पुर्वे इतिहास पण तितकाच म्हत्वाचा आहे. इतिहास हा माणसाच्या भविष्याचा आरसा असतो. (प्र. वाळींबे), प्रेम हे महत्वाचे आहेच आणि त्या बरोबर चारीत्र ही महत्वाचे आहे. जर मी बाहेर गुण उधळत असेन तर मुलीने गुण उधळले असतील तर तीला बोलण्याचा मला हक्क नाही. हे मी मानतो. लग्नापुर्वी संबंध ही गोष्ट दुर्लक्ष करण्याजोगी नाही, हे ही तितकेच खरे.
तुझ्या उत्तरावरून मला असे समजते की तुला म्हणायचे आहे की ही केस्-बाय-केस आणि तारतम्याने विचार करायची गोष्ट आहे. १००% सहमत! गुड जॉब!!
आयुष्य हे कधी ब्लॅक एन्ड व्हाईट नसतं, त्यात ग्रे रंगाच्या अनेक शेडस असतात. अभिनिवेशाला बळी पडूनकोणतीही एकच बाजू कवटाळून न बसता प्रत्येक बाबीचा सर्वांगिण विचार करून मत बनवणे हेच शहाणपणाचं असतं रे! :)
अति सर्वत्र वर्जावे,
हट्टनिग्रही न पडावे,
प्रसंग पाहोनी वर्तावे,
विवेकी पुरुषे
-समर्थ रामदास
3 Oct 2008 - 8:55 am | सखाराम_गटणे™
मत समजावुन घेतल्याबद्दल आभारी आहे.
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)
2 Oct 2008 - 1:22 pm | अवलिया
वर निर्देशित केलेल्या कोणत्याही कारणाने असोत, विवाहपूर्व संबंध अस्तित्वात असणार हि शक्यता आता नाकारता येत नाही.
इतकेच काय विवाहपश्चात बाह्य संबंध ही सुद्धा आता सामान्य गोष्ट बनत जाणार आहेच. तुम्ही फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवु शकता.
2 Oct 2008 - 11:10 am | आनंदयात्री
जियो पेठकर काका जियो. अत्यंत सुंदर प्रतिसाद दिला आहे तुम्ही !!
2 Oct 2008 - 11:19 am | मदनबाण
काकाश्रींशी १००% सहमत...
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
2 Oct 2008 - 9:54 pm | वाटाड्या...
पेठकर काकांशी १००% सहमत. ज्या लोकांनी असल्या प्रकाराला (व्यभिचाराला) एक प्रकारे मान्यता दिली आहे त्यांना एक प्रश्न : पुर्वी ज्या बायकांनी यवनांच्या अत्याचारापासुन आपल्या शील रक्षणासाठी प्राण दिले त्या बायकांची तुमच्या लेखी काय किमत आहे?
अवांतर : जर कोणी म्हणेल की त्या बायका (ज्यात कुमारीका ही होत्या) मुर्ख होत्या तर आपले तोंड गप आणि कोणी म्हणेल की त्या बरोबर होत्या तर मग अश्या मुल्यांच आपण समर्थन कसे करु शकतो?
2 Oct 2008 - 10:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मुकुलराव, मला असं वाटतंय की तुम्ही दोन वेगवेगळ्या गोष्टींमधे गल्लत करताय. यवनांच्या अत्याचारांपासून स्वतःला वाचवण्यासाठी प्राण देणार्या बायका आणि स्वखुशीने शरीर संबंध ठेवणार्या यांत बराच फरक आहे. पहिल्या प्रकारात अत्याचार होते आणि दुसर्यात राजीखुशी, या मुलींच्या मनाविरुद्ध (बर्याचदा) गोष्टी घडत नाहीत. या मुलींवर उद्या कोणी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्याही पेटून उठतीलच ना?
2 Oct 2008 - 10:52 pm | वाटाड्या...
मी फक्त नीतीमत्तेची गोष्ट करत होतो. नीतीमत्ता एकच..'त्या' गोष्टी फक्त लग्न झालेल्या जोडीदाराबरोबरच कराव्यात ही नीतीमत्ता...व्यक्तिस्वातंत्र्य मिळाले म्हणुन शेण खाण्याच्या प्रवृत्ती बद्दल इथे कोणाच्या तरी प्रतिसादात मी काहीशी सहमती बघत आहे अथवा अश्या गोष्टींना सहमती मिळत आहे ज्या लग्नाशिवाय करायला प्रोत्साहन देते...
3 Oct 2008 - 9:48 am | सखाराम_गटणे™
मुकुल, मला वाटते की तुला असे म्हणायचे आहे.
ज्या स्त्रीया आपला संबध नवर्याशिवाय दुसर्या कोणाशी येउ नये म्हणुन प्राणत्याग करतात आणि आज कालच्या स्त्रीयांना ह्या नवर्याशिवाय दुसर्या कोणीशी संबध म्हणजे काहीच वाटत नाही.
आणि त्या गोष्टी व्यक्तिस्वातंत्र्य च्या नावाखाली चालतात.
म्हणजे पुर्वीच्या जोहार करण्यार्या स्त्रीया मुर्खे होत्या काय?
नीतीमत्त्ता ही चुकीची भ्रामक कल्पना आहे काय?
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)
3 Oct 2008 - 10:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
व्यक्तिस्वातंत्र्य मिळाले म्हणुन शेण खाण्याच्या प्रवृत्ती बद्दल इथे कोणाच्या तरी प्रतिसादात मी काहीशी सहमती बघत आहे अथवा अश्या गोष्टींना सहमती मिळत आहे ज्या लग्नाशिवाय करायला प्रोत्साहन देते...
लग्न न करता आयुष्यभर एकत्र रहाणारी, खर्या अर्थाने सहजीवन जगणारीही जोडपी असतीलच ना? त्यांच्यावर असं बोलण्यामुळे अन्याय होतो असं मला वाटतं.
एका कागदावर सही केली किंवा गळ्यात दोरा बांधला की झालं का सगळं? मी स्वतः या गोष्टीचा गेले अनेक महिने विचार करत आहे. माझं वैयक्तिक मत असं आहे की एका कागदावर सही केल्यामुळे मला काहीही फरक पडला नाही. बॉयफ्रेंडचा नवरा झाला आणि गर्लफ्रेंडची बायको; पण आमची एकमेकांबद्दल असलेली मतं, आमच्या एकमेकांबद्दलच्या भावना, आमची कमिटमेंट फक्त त्या सह्या आणि कागदामुळे बदलल्या नाहीत.
मान्य आहे की अशी उदाहरणं सामान्यतः दिसत नाहीत, पण मला तुमचं विधान सरसकट वाटलं म्हणून फक्त! बाकी चालू द्या.
2 Oct 2008 - 10:52 pm | सुचेल तसं
अतिशय सुंदर प्रतिसाद (नेहेमीप्रमाणे)..
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
2 Oct 2008 - 10:40 am | वेताळ
खर तर गरबा हे एक निमित्तमात्र आहे. गणपती उत्सवात हे घडत नाही का? घडते आणि ते मी पाहिले आहे. त्यामुळे शरिरसुखासाठी आसुसलेल्या जोडप्याना कोणताही सण चालतो.बाकी तीन तीन दिवस चालणारया लग्नात देखिल तुम्हाला हेच बघायला मिळेल.उत्सव किंवा समारंभ आला कि उत्साह येणार. आणि त्यातुन उन्माद येणार.
"बाई" ही उपभोग्य वस्तु ठरविली गेल्यानन्तर संस्कृती उरतेच कोठे.
असहमत....इथे जे काही घडते ते दोन्ही बाजुला आपण काय करणार आहोत, हे माहित असताना होत असते. किंबहुना मुलीच पुढाकार घेतात.कधीतरी गरबा किंवा गणपती मध्ये रात्री बाहेर पडा ,लक्षात येइल. आजकाल मुलीचे ऑर्कुट प्रोफाइल बघा,त्याना इम्रान हशबी आवडतो.चॉईस बदलत आहे राव.
आपण आपल्या संस्कृती चा टेंभा मिरवायची काही गरज पण नाही. मुळात शरिरसबंध हे अतिशय वाईट असतात हे मुलामुलीच्या मनात लहान पणा पासुन बिंबवले जाते. हीच गोष्ट त्याच्यातील उत्सुकता वाढवण्यास कारणीभुत ठरते. त्यातुन हे चोरटे सबंध निर्माण होतात.हिच जर माहिती त्याना योग्य वयात मिळाली तर शरिरसबंधाचे फायदे तोटे लक्षात येतील.आदिवासीच्या पाड्या मध्ये तरुण मुलामुलींना राहण्याची वेगळी व्यवस्था असते.वयात आल्यावर त्याना आपसुक च सगळ्या गोष्टीची माहिती मिळते.परंतु आपण आपल्याला पंरपरा ,रुढी ह्याच्या बंधनात जखडुन ठेवले आहे.लग्नासाठी कुमारिका मुलगी हवी. बाकि मुलाने कोठेही शेण खाल्ले तरी चालते. ह्यातुन आता बाहेर पडले पाहिजे.आपण आपल्या विचारसरणी त बदलत्या काळाप्रमाणे बद्दल घडवले पाहिजे.
ह्याचा अर्थ मुक्तस्वैराचार करावा असा नाही.
बाकी कंडोम व आयपील चा वापर वाढला हि चांगली गोष्ट आहे का नाही हे अजुन उमगले नाही.
वेताळ
3 Oct 2008 - 9:32 am | llपुण्याचे पेशवेll
गणपती उत्सवात हे घडत नाही का? शक्यतो गणपती उत्सवात असे घडत नसावे. कारण माझ्या माहीतीनुसार गणपती उत्सवात बुधवरात जाणार्या लोकांची संख्या जास्त असते त्यामुळे निरोधाचा खप वाढत असेल पण गर्भनिरोधक गोळ्यांचा खप देखील वाढतो का?
जाणकारानी प्रकाश टाकावा.
पुण्याचे पेशवे
2 Oct 2008 - 10:49 am | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
वापर वाढला आहे हे नक्की. आजही कंडोम नीट कसा वापरावा ह्याचे शास्त्र फक्त ३५% पुरुषांना माहित असते. आय पीलने गर्भपात होतो हा समज रूढ आहे. खरे तर आय पील ने गर्भ धारणा ट्ळते.
2 Oct 2008 - 11:00 am | पिवळा डांबिस
आजही कंडोम नीट कसा वापरावा ह्याचे शास्त्र फक्त ३५% पुरुषांना माहित असते.
कर्म आमचं! दुसरं काय!!!
तुमच्यापुढे खूप काम बाकी आहे, विनायकरावजी!! या सगळ्या ६५% अडाण्यांना शहाणं करायचं!!!!:)
2 Oct 2008 - 11:51 am | सखाराम_गटणे™
>>आजही कंडोम नीट कसा वापरावा ह्याचे शास्त्र फक्त ३५% पुरुषांना माहित असते.
सहमत,
आम्हाला ११ वीलाच हे शिकवले होते.
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)
3 Oct 2008 - 12:27 am | बिपिन कार्यकर्ते
गटणे साहेब, आपली शाळा / आपले कॉलेज कुठले? ;)
बिपिन.
3 Oct 2008 - 12:32 am | टारझन
ऐकावं ते नवलंच .. ११वीला गर्भनिरोधक साधनांचं प्रशिक्षण ? प्रॅक्टीकल पण होतं काय रे बाबा ? गटण्या असले बाँब टाकून आम्हाला पेचात नको टाकत जाउस लेका.... बिपीनभौ .. जरा पत्ता काढा हो गटणेच्या ११वीच्या शाळेचा ...
ज्या ६५% लोकांना अजुन कंडोम कसे वापरावेत हे माहित नाही .. त्यांना उपयोग होइल :)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
3 Oct 2008 - 10:11 am | llपुण्याचे पेशवेll
तेही कॉलेजातूनच पण तसे काही प्रशिक्षण किंवा शिक्षण वगैरे दिले नव्हते कोणी. ज्ञानाच्या देवाणघेवाणीतूनच समजले होते. :)
पुण्याचे पेशवे
3 Oct 2008 - 10:44 am | सखाराम_गटणे™
आम्हाला प्रात्याक्षिक दाखवले होते,
अगदी मस्त, हवेचा बुडबुडा अडकुन काय त्रास होतो हे पण सागिंतले.
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)
3 Oct 2008 - 10:58 am | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
ज्ञानाची ही देवाणघेवाण सहसा उघड्याकडे गेले वागडे आणि रात्रभर कुड्कुडले असे अस्ते.
3 Oct 2008 - 12:54 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
ज्याला बुड्बुड्याची शिश्टीम कळली., तो सर्व बुड्बुड्यापासुन मुक्त होतो.
2 Oct 2008 - 4:58 pm | मिसंदीप
नितिमत्ता, संस्कार हे सर्व धाब्यावर बसवुन या किड्यांचे चाललेले चाळे बघुन, माणुस हा इतर जनावरांच्या पेक्षाही खालच्या दर्जाचा झाला आहे याची खात्री पटते.
2 Oct 2008 - 7:54 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
मी संदिप - काय कळले नाय बाबा.
3 Oct 2008 - 12:29 am | बिपिन कार्यकर्ते
हीहॉहॉहॉ....
साक्षात क्रिप्टिक ला क्रिप्टिक टाकला!!!! जियो मीसंदिप...
बिपिन.
3 Oct 2008 - 1:47 am | भडकमकर मास्तर
विप्र,
उत्तम लेख... जरा उशीराच वाचला...
सगळा समजला... :)
प्रतिक्रियाही भारीच आहेत...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
3 Oct 2008 - 10:42 am | वेताळ
नितिमत्ता, संस्कार हे सर्व धाब्यावर बसवुन या किड्यांचे चाललेले चाळे बघुन, माणुस हा इतर जनावरांच्या पेक्षाही खालच्या दर्जाचा झाला आहे याची खात्री पटते.
नेमके तुला काय म्हणायचे आहे? नितीमत्ता संस्काराचा मक्ता तुच एकट्याने घेतला आहेस कि काय? जे काही घडते आहे त्यावर इथे चर्चा चालली आहे. वाईट वाटुन घेण्याइतपत काहिच नाही.
वेताळ
3 Oct 2008 - 12:36 pm | मिसंदीप
वेताळबुवा.. फारच वर्मी लागलेले दिसते.. माफी असावी.
नेमके तुला काय म्हणायचे आहे? नितीमत्ता संस्काराचा मक्ता तुच एकट्याने घेतला आहेस कि काय?
मुळीच नाही. मि या संस्कारांचे पालन करण्याचा प्रयत्न करतो आहे.
करण्यासाठी माणुस काहीही करु शकतो, पण अविचाराने केले तर माणसात आणि जनावरात फरक तो काय?
मनुष्येतर प्राणी हे आपल्या कामवासनेवर नियंत्रण ठेवु शकत नाही, पण मनुष्यप्राणी ते ठेवु शकतो , आणि ते त्याने ठेवणे हाच एक संस्काराचा नितिमत्तेचा एक भाग झाला.
विशिष्ठ वयात आल्यानंतर, कामवासना जागृत होणे हि एक नैसर्गिक भाग आहे , पण ति नियंत्रणात ठेवणे, हे माणुस जातीला जमु शकते.आणि त्याने ते करावे असे माझे प्रामाणिक मत आहे. प्रकाशित झालेल्या एका प्रतिक्रिये मध्ये या गचाळ वागण्याचे परिणाम पण दिले आहेत. ते वाचावे हि विनंती.