खतखते

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in पाककृती
11 May 2008 - 2:21 pm

साहित्यः

बटाटे - ४ (मध्यम आकाराचे)
मक्याची कोवळी कणसे - ४
लाल भोपळा - १/४ किलो
सुरण - १/४ किलो
लहान वांगी - ४
दोडकी - २
गवार - १२५ ग्रॅम्स
तुरीची डाळ - १ वाटी
चिंच-गुळाचा घट्ट कोळ - अर्धी वाटी
ओले खोबरे - दिड वाटी
लाल तिखट - १ टीस्पून
हळद - अर्धा टी स्पून
तिरफळे - १२
खोबरेल तेल - फोडणीसाठी
हिंग आणि मोहरी - फोडणीसाठी
मीठ - चवीनुसार

तयारी:
भाज्यांचे मोठे तुकडे करा. बटाटा, भोपळा सालासकटच घ्यायचा. गवार आख्खी ठेवायची.
तुरीची डाळ, थोडी हळद घालून, शिजवून, घोटून घ्यायची.
खोबरे + हळद + तिखट एकत्र वाटून घ्यावे.
तिरफळे पाण्यात भिजत ठेवायची.

कृती:
सर्व भाज्या थोडे मीठ आणि बेताचे पाणी घालून शिजत ठेवायच्या.
भाज्या शिजल्या की त्यात तुरीची डाळ, खोबर्‍याचे वाटण, चिंच गुळाचा कोळ आणि तिरफळे घालायची.
चवीनुसार मीठ घालायचे.
वरून हिंग मोहरी घालून खोबरेल तेलाची फोडणी द्यायची.

खोबरेल तेल आवडत नसेल तर गोडेतेल सुद्धा चालेल.

शुभेच्छा....!

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

11 May 2008 - 3:12 pm | स्वाती राजेश

झटपट पाककृती आहे. सोपी सुद्धा दिसते.
नक्की करून पाहीन.

रंगीला रतन's picture

23 Oct 2023 - 8:13 pm | रंगीला रतन

लै झ्याक...

रंगीला रतन's picture

23 Oct 2023 - 8:14 pm | रंगीला रतन

लै झ्याक...

स्वाती दिनेश's picture

11 May 2008 - 4:43 pm | स्वाती दिनेश

सध्या इथे हवा चांगली असल्याने ताज्या भाज्या चांगल्या मिळत आहेत,तेव्हा आता खतखते करून पाहिन आणि तुम्हाला सांगेनच कसे झाले ते,
स्वाती

तिरफळे इकडे अमेरिकेत मिळतात का ते माहीत नाही.
त्याला इंग्रजीत काय म्हणतात?
तिरफळे न घालताच 'खतखते' नीट होते का? होत असेल तर करुन बघावे म्हणतो.

चतुरंग

प्रभाकर पेठकर's picture

11 May 2008 - 6:44 pm | प्रभाकर पेठकर

तिरफळे इकडे अमेरिकेत मिळतात का ते माहीत नाही.

बहुतेक मिळत नसावित. मिळत असली तर ती गुजराथी दुकानात मिळू शकतील. किंवा कुणा 'मासेखाऊ' दर्दी मित्राकडे (भारतातून आणलेली) मिळू शकतील असे वाटते.

त्याला इंग्रजीत काय म्हणतात?

कल्पना नाही.

तिरफळे न घालताच 'खतखते' नीट होते का? होत असेल तर करुन बघावे म्हणतो.

तिरफळे वगळून खतखते करता येईल पण ते एक काडी तुटलेल्या छत्री सारखे होईल. छत्रीचे काम तर करेल पण 'समाधान' मिळणार नाही.

स्वाती दिनेश's picture

11 May 2008 - 6:48 pm | स्वाती दिनेश

तिरफळे वगळून खतखते करता येईल पण ते एक काडी तुटलेल्या छत्री सारखे होईल. छत्रीचे काम तर करेल पण 'समाधान' मिळणार नाही.
आवडले,
स्वाती

llपुण्याचे पेशवेll's picture

13 May 2008 - 8:57 am | llपुण्याचे पेशवेll

तिरफळाचा मिरमिरणारा वास हा एकदम मस्त वाटते. झक्कास. तसे तिरफळ हे जास्तकरून कोकणात वापरले जाते असे मला वाटते. विषेशतः मालवणी पदार्थात तिरफळ जास्त वापरले जाते.
माझे वडील सांगतात कि पूर्वी कोकणात बांबूच्या नळीची बंदूक करून त्यातून हे तिरफळ मारले जायचे. जाम चरचरते म्हणे हे तिरफळ लागले की.
असो . खतखते, माझ्या आजीने केलेले मी उदंड खाल्ले आहे. बघू आता परत भारतात गेलो परत की कोकणात जाऊन खाईन म्हणतो. :)
पुण्याचे पेशवे

शितल's picture

11 May 2008 - 6:50 pm | शितल

माझी आजी खतखते करत असे, त्या मध्ये जास्तकरून क॑द वर्गातील भाज्या॑चा वापर केला जात असे. पण मला त्या भाज्या॑ची नावे आठवत नाहीत.
पण हे खतखते देखिल करून पहायला हवे.

रोचीन's picture

12 May 2008 - 12:09 pm | रोचीन

म्हणजे मसाल्यांच्या पदार्थातीलच ना!!! का वेगळे असतात? यालाच त्रिफळा असेही म्हणतात का?? आमच्याकडे कधी वापरत नाही म्हणून म।हीत नाही. :(

प्रभाकर पेठकर's picture

14 May 2008 - 8:07 am | प्रभाकर पेठकर

म्हणजे मसाल्यांच्या पदार्थातीलच ना!!!
होय. खाली चित्र दिले आहे.

यालाच त्रिफळा असेही म्हणतात का??
नाही. त्रिफळा वेगळे. त्यात आवळा, बेहडा आणि अजून एक फळ असते. ही औषधी फळांची त्रयी आहे. आणि तिरफळ वेगळे ते एकच फळ असते. मसाल्यात वापरतात.

चतुरंग's picture

14 May 2008 - 11:22 am | चतुरंग

आवळा + हिरडा + बेहडा = त्रिफळा.

(अवांतर - रात्री कोमट पाण्याबरोबर घेतले तर सकाळी एकदम 'त्रिफळा'चीत! ;) )
चतुरंग

प्रभाकर पेठकर's picture

14 May 2008 - 1:41 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद श्री. चतुरंग.

रोचीन's picture

17 Jun 2008 - 11:09 pm | रोचीन

चित्र आणि माहितीबद्दल!!! :)

>>>>त्रिफळा वेगळे. त्यात आवळा, बेहडा आणि अजून एक फळ असते. ही औषधी फळांची त्रयी आहे.

:) हे माहीत होते मला!! पण आमच्या इथे एका गुजराथी वाण्याच्या दुकानात याचे नाव त्रिफळा असे लिहीलेले आहे. म्हणून मला असे वाटले की तिरफळ हे त्रिफळा चा अपभ्रंश आहे.

असो!! पुन्हा एकदा मनापसून धन्यवाद!!!!!!!!! :)

मनिष's picture

12 May 2008 - 1:14 pm | मनिष

तिरफळ काय असते?

ऋचा's picture

12 May 2008 - 1:41 pm | ऋचा

तिरफळ काय असते?

त्याला दुसरं काही नाव आहे का??

रघुनाथ.केरकर's picture

28 Jul 2016 - 12:22 pm | रघुनाथ.केरकर

हे वीषेशता मासे करताना वापरतात, तीरफळामुळे माश्यांना जो हीमुस (वैतस) वास येतो तो तीरफळाच्या वापराने येत नाही, आणी माश्याची कडी / तीकलं अधीक रुचकर होते.

तीरफळाचे झाड सावरी च्या झाडा सारखे दीसते, पण खोडावर मगरीच्या पाठीसारखे काटे/टोके असतात.

तीरफळtirafal

आंम्ही वर्षाला ५०० ते ८०० कीलो तिरफळ वीक्री करतो.

रघुनाथ.केरकर's picture

28 Jul 2016 - 5:37 pm | रघुनाथ.केरकर

tree

सूड's picture

28 Jul 2016 - 5:45 pm | सूड

फारच विचित्र दिसतंय.

स्वाती राजेश's picture

12 May 2008 - 2:09 pm | स्वाती राजेश

तिरफळ हे गोवा,कारवार साइडला जास्त वापरतात.
ते तपकिरी काळपट रंगाचे , बोरासारखे असते. त्याचे बी काढून टाकून फक्त वरचे कवच वापरतात.
बी खूप कडू असते. तसेच याचे झाड कडलिंब (कडिपत्ता) सारखे असते. तिरफळ ही घड/गुच्छ सारखी असतात. अशीच बाजारात मिळतात.
ते डायरेक्ट फोडणीत वापरत नाहीत तर ते शिजताना कालवणात टाकतात. चवीला, आणि वासाला खूप छान लागते.

शेजारी कामतकुटुंब राहत असल्यामुळे ही माहिती आहे, तसेच ते मासे करताना याचा उपयोग करायच्या.
मी मात्र कधी कधी आमटीत वापरते.

ऋचा's picture

12 May 2008 - 2:11 pm | ऋचा

खूप छान माहीती दिलिस,
धन्यवाद!!!

सुनील's picture

12 May 2008 - 2:18 pm | सुनील

तिरफळ काय असते?

हाय कम्बख्त तुमने तिरफळ चखाही नही?

वर स्वाती राजेश यांनी तिरफळाचे वर्णन केले आहेच. तिरफळाला इंग्रजीत शेझ्वान पेपर असे म्हणतात.

टीप - तिरफळे घातलेल्या बांगड्याच्या आमटीला जगात तोड नाही (आणि दुर्दैवाने हे टंकण्याची पाळी माझ्यावर सोमवारी यावी, हा दैवदुर्विलास!! ).

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रभाकर पेठकर's picture

12 May 2008 - 8:07 pm | प्रभाकर पेठकर

तिरफळाला इंग्रजीत शेझ्वान पेपर असे म्हणतात.

तुमचे म्हणणे बरोबर दिसते आहे. कारण चायनिज जेवणात शेझवान मध्ये तिरफळांचा वापर करतात.

'तिरफळे' शोधायला हरकत नाही :)

चतुरंग

ऋचा's picture

12 May 2008 - 2:43 pm | ऋचा

नही चखा
तो क्या बच्चेकी जान लेगा क्या???? :W

मनिष's picture

12 May 2008 - 3:11 pm | मनिष

ह्यालाच 'भोकर' म्हणतात का? गुजराती लोणच्यांमधे खाल्लेले असेच एक फळ आठवते.

प्रभाकर पेठकर's picture

12 May 2008 - 8:02 pm | प्रभाकर पेठकर

नाही. भोकरं वेगळी.

रुस्तम's picture

28 Jul 2016 - 7:30 pm | रुस्तम

भोकर म्हणजे गुजरातीत गुंदा

प्रभाकर पेठकर's picture

12 May 2008 - 8:05 pm | प्रभाकर पेठकर

डाव्या बाजूची 'तिरफळं', उजव्या बाजूला त्यातील बिया. ह्या वापरत नाहीत. काढून फेकून द्यायच्या. दोन्ही कसे दिसते ह्याचा अंदाज यावा म्हणून बिया दाखविल्या आहेत.

चतुरंग's picture

12 May 2008 - 8:28 pm | चतुरंग

आता चायनीज स्टोअरमधे 'तिरफळे' म्हणजे नक्की काय शोधायचं हे पक्कं झालं!

चतुरंग

पिवळा डांबिस's picture

13 May 2008 - 9:50 am | पिवळा डांबिस

आता चायनीज स्टोअरमधे 'तिरफळे' म्हणजे नक्की काय शोधायचं हे पक्कं झालं!
चतुरंग, त्यापेक्षा मागा नं!
आम्ही मित्र नाहीतर काय कामाचे?
घरांत तिच्यायला, बाटल्या भरल्यांत तिरफळांच्या!!!
प्रत्येक वर्षीच्या हंगामाची चव वेगवेगळी!!

बाकी प्रभाकरजी, एक गोष्ट सांगायची विसरलांत या अनभिज्ञ जनांना!!:)
तिरफळं ही चोखून टाकून द्यायची अस॑तात, ती चावून खायची नसतात! जीभ जर पोळून घ्यायची नसेल तर!!:))

अच्च गोंयकार,
पिवळा डांबिस

काका, अहो कोणतीही नवीन गोष्ट शोधण्यात एक गंमत असते! :) आणि तरीही नाहीच गावली तर हक्काने मागून घेऊच की ;)

चतुरंग

मनस्वी's picture

13 May 2008 - 5:35 pm | मनस्वी

बिया फेकण्याऐवजी तिरफळाचे झाड लावले तर?

रघुनाथ.केरकर's picture

28 Jul 2016 - 12:26 pm | रघुनाथ.केरकर

तिरफळाची झाडे स्वताहुन लावलेली मी तरी अजुन पाहीलेली नाहीयत, जी काही झाडे रानात आहेत / असतात ती अशीच रुजुन आलेली आहेत. कोकणात अशी झाडे लाउन त्यांचे संगोपन करण्याबाबत खुप उदासिनता होती. पण आता ती बदल्तेय. नर्सरी मध्ये तिरफळांच्या सीडलींग्ज विक्री साठी उप्लब्ध आहेत.

वरदा's picture

12 May 2008 - 8:09 pm | वरदा

हे तिरफळ काय असते ह्यावर संशोधन करावे म्हणते...भारतात गेल्यावर नक्की करुन पाहीन....
मला फक्त आळूचे फतफते माहीत आहे..

अवांतरः काय छान लागतं ना आळूचे फतफते ..मि इथे वडीच्या आळूचं करुन पाहीलं पण ते तिथल्या भाजिच्या आळूसारखं नाही लागत्...आणि फुकट दारात उगवलेलं तोडून भाजि करण्यातलि मजाच वेगळी.. ;)

स्वाती दिनेश's picture

13 May 2008 - 11:34 am | स्वाती दिनेश

हं,त्याची चव तर वेगळीच!
अळूत डाळ,दाणे तर असतातच पण आमच्याकडे डाळिंब्या आणि ओले काजू घातलेले अळू करतात. वावा,बोटं चाटत खाल्लं जातं,:)

यशोधरा's picture

12 May 2008 - 10:10 pm | यशोधरा

>>> काय छान लागतं ना आळूचे फतफते...

वरदाताई, एकदम मोठ्ठा अनुमोदक तुम्हांला!! अळूच फतफतं शेंगदाणे घालून नाहीतर डाळ घालून........ आई गं, चांगल्या पदार्थांच्या आठवणी ते पदार्थ समोर नसताना आणि लगेच मिळायची शक्यताही नसताना काढू नयेत हेच खरं!!

वाट पाहते फतफत्याची...... :W

विशाखा बहुलेकर's picture

9 Dec 2008 - 8:01 pm | विशाखा बहुलेकर

आळुच्या फतफत्यात चुक्याचि भाजी व मुळ्याचे तुकडे घातल्यास ती जास्त चान्गलि होते.

वरदा's picture

12 May 2008 - 10:18 pm | वरदा

शेंगदाणे, डाळ आणि मस्त नारळाचं दूध, चिंच गूळाची चव्..आहा!!!

यशोधरा's picture

12 May 2008 - 10:41 pm | यशोधरा

>>> शेंगदाणे, डाळ आणि मस्त नारळाचं दूध, चिंच गूळाची चव्..

=P~

विसोबा खेचर's picture

13 May 2008 - 9:01 am | विसोबा खेचर

प्रभाकरशेठ,

खतखतं एकदा खाऊन पाहिलं पाहिजे बर्रका! :)

तात्या.

ऋचा's picture

13 May 2008 - 10:55 am | ऋचा

L) तिरफळ म्हणजे मला वाटतय की,
जे लहानपणी आम्ही मुले "फटुक फळी" नावाचा १ खेळ खेळायचो त्यात जे फळ घातले जात असे ते.
(जे खुपच जोरात लागते.)

वरदा's picture

13 May 2008 - 6:35 pm | वरदा

डाळिंब्या आणि ओले काजू घातलेले अळू
पक्की कोकणी गं तू माझ्यासारखी....आता मला ते लाळ लाळ म्हणावसं वाट्टंय्.. नुसती ओल्या काजुची उसळ पण आठवतेय.. आईला सांगून ठेवलय आल्या आल्या माझ्यासाठी डाळिंब्या कर म्हणून....तात्यांनी तांदुळाच्या भाकरीचा फोटो टाकून चिडवलय ते वेगळच...

स्वाती दिनेश's picture

13 May 2008 - 11:31 pm | स्वाती दिनेश

मी कालच केली होती डाळिंब्यांची उसळ,:) इथे जरा हवा बरी झाली आहे त्याचा फायदा घेऊन वाल भिजत घातले...एस्टिमेटेड टाईमपेक्षा १ दिवस जास्तच लागला मोड यायला,पण चलता है!

चकली's picture

13 May 2008 - 11:25 pm | चकली

आज मि पा वर मेजवानी आहे. एका मागून एक ..

चकली
http://chakali.blogspot.com

सहज's picture

14 May 2008 - 7:48 am | सहज

करुन पाहीलेच पाहीजे असा पदार्थ.

पेठकरकाकांच्या पाककौशल्याबरोबर फोटो काढायचे कसब देखील लई भारी. त्यांच्या प्रत्येक पदार्थाचे फोटो पाहून तोंडाला पाणी सुटते.

प्रभाकर पेठकर's picture

14 May 2008 - 8:03 am | प्रभाकर पेठकर

स्वाती राजेश, स्वाती दिनेश, चतुरंग, पुण्याचे पेशवे, शितल, रोचीन, मनिष, ॠचा, सुनिल, पिवळा डांबिस, मनस्वी, वरदा, यशोधरा, विसोबा खेचर, चकली, आणि सहज.... तुमच्या प्रतिसासादात्मक कौतुका बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

वरदा's picture

14 May 2008 - 8:02 pm | वरदा

काका धन्यवाद वगैरे काय म्हणता? आम्हि तर शिकतोय तुमच्याकडून्....तुम्हाला धन्यवाद आम्हाला एवढ्या नवीन पा क्रु. सांगितल्याबद्दल.......

धनंजय's picture

14 May 2008 - 10:55 pm | धनंजय

पेठकरबाब,

तुका मोगाचो देवबरेकरूं.
तुएं सांगले आसा तशे खतखते करचे म्हणता - हे शनवार-आयतारा. म्हजेकडे त्रफळां आसात, पुणून सुरण खंय मेळटा पळयचे पडतले.

धनंजय's picture

19 May 2008 - 6:31 am | धनंजय

रुच्चीक जाले.

प्रभाकर पेठकर's picture

19 May 2008 - 12:42 pm | प्रभाकर पेठकर

रुच्चीक जाले.

भाषा कळली नाही पण 'बरे' झाले असावे असा आपला एक अंदाज......

बेसनलाडू's picture

20 May 2008 - 9:14 am | बेसनलाडू

रुच्चीक=रुचकर?!
(अंदाजपंचे)बेसनलाडू

रुची आसा ते रुच्चीक

ना जाल्या प्रभाकरबाब किते बरयता ते सगळे रुच्चीक, असोय एक अर्थ नव्या शब्दकोशांत मेळटा.

यशोधरा's picture

19 May 2008 - 8:47 am | यशोधरा

अय्यो, कोकणी बरयलां!! धनंजयदादा, कोकणी उलयतांत तुम्ही??? गोयंकार की??? :)

धनंजय's picture

19 May 2008 - 4:39 pm | धनंजय

म्हजे धाकटेपण गोंयचे. घराकडे मराठी उलयता, पुणून कोंकणी मातशे मातशे उलयपाक कळटा.

यशोधरा's picture

19 May 2008 - 12:45 pm | यशोधरा

पेठकर काका, रुच्चीक म्हणजे मस्तच झालं होतं!! :)

प्रभाकर पेठकर's picture

19 May 2008 - 4:44 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद, यशोधरा.मला वाटलंच होतं अंदाज चुकणार नाही.

चतुरंग's picture

19 May 2008 - 8:03 pm | चतुरंग

चवीची भाषा इथून तिथून एकच - जिभेची!! :)

चतुरंग

अनंत छंदी's picture

9 Dec 2008 - 8:24 pm | अनंत छंदी

पेठकरशेठ
यज्ञकर्ममध्ये आलो की चाखायला मिळेल ना?

प्रभाकर पेठकर's picture

9 Dec 2008 - 11:45 pm | प्रभाकर पेठकर

'यज्ञकर्मात' ह्याहून भारी पदार्थ आहेत... या एकदा....

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

सूड's picture

29 Jan 2014 - 1:46 am | सूड

वाचनखूण साठवली आहे.

प्रभाकर पेठकर's picture

29 Jan 2014 - 1:49 am | प्रभाकर पेठकर

धन्यवाद.
धागा वर आल्यामुळे एक फायदा झाला. गणपाची पाकृ फदफदे ही करून पाहता येईल आणि बरेच दिवस केली नसल्याने 'खतखते' ही करेन.

काकाकाकू's picture

29 Jan 2014 - 6:34 am | काकाकाकू

कोकणात खदखदे म्हणतात. मुख्यतः कंद....अळुकुड्या, करांदे, कणगरं, भोपळा, सुरण वगैरे घालून करतात. नारळ, लाल मिरची असे वाटप असते.

प्रभाकर पेठकर's picture

29 Jan 2014 - 10:03 am | प्रभाकर पेठकर

काकाकाकू,

धन्यवाद. 'करांदे, कणगरं' म्हणजे काय? मुंबई-पुण्याकडे मिळतात का?

माझ्या जवळ अस्सल कोंकणी पाककृतीच्या तिनही पुस्तकांमध्ये 'खतखते' असाच शब्द आहे. त्यामुळे तोच प्रमाण मानून मी वापरला. कोंकणात कधी दीर्घकाळ राहण्याचा (बायको चिपळूणची असूनही), कोंकणी संस्कृती जवळून अनुभवायचा आनंद उपभोगता आला नाही. जो कोंकण पाहिला तो पर्यटनातून आणि पाककृतींच्या पुस्तकांमधून. 'खतखते' की 'खदखदे' हा वादाचा मुद्दा नाही. पाककृती माझी आवडती आहे.

तुमची (किंवा कोणाचीही) एखादी वेगळी पद्धत असेल तर मिपावर जरुर जरुर टाका. एकच पदार्थ दोन (किंवा जास्त) पद्धतींनी बनवायलाही मजा येईल.

काकाकाकू's picture

30 Jan 2014 - 2:58 am | काकाकाकू

हो, करांदे, कणगरं हि मुंबई-पुण्याकडे मिळतात.....एकाच पाककृतीची दोन नावेही असु शकतात. पाककृतीकरुन इथे टाकण्याचा नक्की रयत्न करु.

रघुनाथ.केरकर's picture

28 Jul 2016 - 12:33 pm | रघुनाथ.केरकर

करांदे म्हणजे मालवणीत "कनारे" मिरी च्या वेली सारखी वेल असते त्याल हे करांदे लागतात, ह्यात दोन प्रकार असतात कडवे आणी गोडे. कडव बर्‍याच ठीकाणी आढळतात पण गोडे तुरळ्क दीसतात. काही रंगाने करडे असतात तर काही काळे. चव बर्‍याच प्रमाणात शिंगाड्यांसरखी असते.

विनायक प्रभू's picture

29 Jan 2014 - 12:23 pm | विनायक प्रभू

खत्खते ही सारस्वतांची पेस्सल पाक्रु.
ओल्या मिर्च्या, हिरवा मसाला.
कमीत कमी २२ भाज्या.
गणपतीला मेन कोर्स

अमेय६३७७'s picture

29 Jan 2014 - 9:01 pm | अमेय६३७७

नक्की करून पाहणार. तिरफळेही आहेत.
अवांतर : हिरवी तिरफळे आम्ही बांबूची नेपटी म्हणून बन्दूकीसारखे खेळणे करायचो त्यात काडतुसासारखी वापरायचो. भयंकर आग व्हायची लागल्यावर

रघुनाथ.केरकर's picture

28 Jul 2016 - 12:37 pm | रघुनाथ.केरकर

तुम्ही कदाचीत हसोळी बद्दल बोलत असाल.... आम्हि लहान असताना गावी हसोळीची फळे नेपटीत भरुन गोळ्या मारयचो.

हसोळीची झाडे कुंपण करायला वापरतात. हसोळिची पाने पानवेली सारखी दीसतात, पानांना भरपुर शिरा असतात.

राही's picture

28 Jul 2016 - 1:52 pm | राही

बर्‍याच दिवसांनी हसोळीचा उल्लेख पाहिला. शरदिनी डहाणूकरांनी त्यांच्या एका पुस्तकात हाशाळीविषयी लिहिले आहे की ही हाशाळी लहानपणी रानमेवा म्हणून त्यांनी खाल्ली आहेत. हाशाळी आणि हसोळी एकच का? तोरणे-राजणे-करवंदे-बिंबले यासारखी हसोळीसुद्धा खातात का? आपल्याकडे वा कुणाहीकडे हसोळीची वेल आणि फळे यांचा फोटो असल्यास प्लीज़ डकवा.
बाकी तिरफळ (त्रिफळ?) हे नाव या फळाची तीन शकले पडतात त्यावरून पडले असावे.

रघुनाथ.केरकर's picture

28 Jul 2016 - 6:21 pm | रघुनाथ.केरकर

test

बंडा मामा's picture

30 Jan 2014 - 12:20 am | बंडा मामा

वा! चांगली रेसिपी मिळाली. गोव्याकडे ह्या तिरफळांचे हुमण बनवतात. ते फार चविष्ट असते. त्याची रेसेपी कुणाला माहित आहे का?

वामन देशमुख's picture

23 Oct 2023 - 8:32 pm | वामन देशमुख

गोव्याकडे ह्या तिरफळांचे हुमण बनवतात. ते फार चविष्ट असते. त्याची रेसेपी कुणाला माहित आहे का?

दहा वर्षे होत आली, कुणीतरी उत्तर द्या हो.

मला इंटरनेटवर सापडली नाही. कुणी सांगितली रेसिपि तर मीही ट्राय करून पाहीन.

मुक्त विहारि's picture

28 Jul 2016 - 12:55 pm | मुक्त विहारि

धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद.

बाळ सप्रे's picture

28 Jul 2016 - 2:01 pm | बाळ सप्रे

केरकर आडनाव आणि त्यांचे प्रतिसाद वाचून सिंधुदुर्गात गेल्यासारखं वाटलं.

हे कशा बरोबर खायचं की नुसतच ओरपायचं ?

ओरपता-ओरपता खायचे.

झेन's picture

28 Jul 2016 - 8:06 pm | झेन

मका कोंकणी उलोपा येवू ना. ते यज्ञकर्म खै असा ?