साहित्य:
Ground Chicken
कांदा
हिरवी मिरची
कोथिंबीर
आले लसूण पेस्ट
वरील सर्व घटक चांगले मिक्स करावेत.
कृती: भांड्यात तेल घेवून त्यात वरील मिश्रण stir fry करून घ्यावे आणि त्यात काळेमिरी आणि मीठ तुमच्या आवडी प्रमाणे घालावे.
आवरणासाठी:
मैद्या मध्ये मीठ घालून कणिक मळून घ्यावे. त्याचे छोटे गोळे करून पातळ लाटून घ्याव्यात. त्यात हे मिश्रण करंजीसारखे भरावे आणि बंद करावे. बांबू स्टीमर असल्यास त्यात हे Dumplings ठेवावे आणि वाफ येऊ द्यावी.
हे Dumplings टोमॅटो, तीळ आणि लसूण यांच्या चटणी बरोबर खावे.
English शब्दांना मराठीत काय म्हणतात ते मला माहीत नाहीए त्यामुळे क्षमस्व.
शुद्धलेखनाच्या चुकांसाठी क्षमस्व.
Dumplings चे सगळे श्रेय आकाश ला आणि त्याच्या मदतीला.
प्रतिक्रिया
16 Jan 2014 - 2:22 am | रामपुरी
ही पाकॄ कोंबडी न घालता करता येईल काय?
16 Jan 2014 - 2:31 am | अनन्या वर्तक
हो नक्की करता येऊ शकते veg Dumpling असतात.
16 Jan 2014 - 2:41 am | प्यारे१
चिकन ऐवजी कॉलिफ्लॉवर/ पनीर/ फरसबी बारीक चिरुन/ मशरुम...
घाला काहीपण!
असं चालेल का?
16 Jan 2014 - 2:50 am | अनन्या वर्तक
हो veg Dumpling मध्ये हेच असते गाजर सुद्धा घातले तरी चालेल.
16 Jan 2014 - 8:05 am | कैलासवासी सोन्याबापु
चिकन मोमो सारखेच आहे हे पण!
16 Jan 2014 - 8:16 am | अत्रुप्त आत्मा
चांगलच डंम्पलय.. आपलं ते हे.. जमलय की! ;)
16 Jan 2014 - 10:33 am | त्रिवेणी
चला आता बांबू स्टीमर शोधणे आले.
16 Jan 2014 - 10:37 am | त्रिवेणी
एक सिरियस प्रश्न
हे बांबू स्टीमर पुण्यात मिळेल का
16 Jan 2014 - 12:02 pm | दिपक.कुवेत
"हे बांबू स्टीमर पुण्यात मिळेल का"..........हो मिळेल कि! पुणे तिथे काय उणे?
16 Jan 2014 - 12:11 pm | प्रभाकर पेठकर
बांबूच्या टोपला विणणार्या कुठल्याही कारागिराकडे (अगदी रस्त्याच्या कडेलाही) झाकणवाली टोपली मिळू शकेल. न मिळाल्यास दोन उथल टोपल्या घेऊन त्यात एकीत डंपलिंग्ज आणि दूसरी झाकण म्हणून वापरता येईल.
16 Jan 2014 - 12:31 pm | सुबोध खरे
गारुड्याची टोपली शोध नाही तर जे डी ला विचारा. त्याच्या कडे एखादी अतिरिक्त टोपली असेल( साप नाही बघून घ्या)
16 Jan 2014 - 8:39 pm | त्रिवेणी
पेठकर काकांची आणि तुमची आयडिया छान आहे.
जेडीनाच सांगते without साप एक टोपली द्यायला.
17 Jan 2014 - 12:34 pm | जॅक डनियल्स
भरपूर आहेत की टोपल्या, पाहिजे असल्यास पाठवून देतो.
17 Jan 2014 - 1:34 pm | मुक्त विहारि
उगाच, एखादा मण्यार किंवा नाग पाठवू नये, ही विनंती.
23 Jan 2014 - 10:07 am | llपुण्याचे पेशवेll
कदाचित शिजल्यावर मण्यारीपेक्षा नाग चांगला लागत असेल.
16 Jan 2014 - 10:40 am | जेपी
आवडला
16 Jan 2014 - 12:13 pm | दिपक.कुवेत
व्हेज डंपलिंग करुन बघेन. एक अंदाज....बांबू स्टीमर नसेल तर मोदक किंवा ईडली पात्रात पण हे उकडु शकतो.
16 Jan 2014 - 12:20 pm | प्रभाकर पेठकर
दिपक,
>>>>बांबू स्टीमर नसेल तर मोदक किंवा ईडली पात्रात पण हे उकडु शकतो.
कल्पना चांगली आहे.
न मागताच एक सुचना करू इच्छितो. प्रत्येक डम्पलिंग खाली एक एक केळीच्या पानाचा तु़कडा ठेवला डम्पलिंग इडली पात्राला चिकटणार ही नाहित आणि एक छान सुगंध येईल.
16 Jan 2014 - 8:55 pm | अनन्या वर्तक
केळीच्या पानाबरोबरच हळदीची पाने सुधा चालतील आणि खरच मस्त सुगंध येईल.
16 Jan 2014 - 12:27 pm | सौंदाळा
मस्त सादरीकरण.
एकदम आवडता प्रकार.
16 Jan 2014 - 12:37 pm | आदूबाळ
मोमो!!
जीव अर्धा अर्धा झाला अक्षरशः!
माझा एक आसामी मित्र याबरोबर खाण्यासाठी टोमॅटो आणि लाल मिरच्या घातलेली "टेगांझा" की अश्या काहीतरी नावाची चटणी करायचा. ती इतकी तिखट असायची की आम्ही टोचून टोचून खायचो पण तो श्रीखंड खाल्ल्यासारखी खायचा!
16 Jan 2014 - 5:46 pm | प्रभाकर पेठकर
>>>>ती इतकी तिखट असायची की आम्ही टोचून टोचून खायचो पण तो श्रीखंड खाल्ल्यासारखी खायचा!
नंतर रात्रभर काजव्यासारखा फिरत असेल.
9 Feb 2014 - 12:27 pm | आनंदी गोपाळ
बुडाशी पेटलेला असतो तो काजवा..
ह.ह.पु.वा. झाली
16 Jan 2014 - 9:06 pm | अनन्या वर्तक
बरोबर आहे माझ्या ऑफिस मधील एक चायनीज मैत्रीण ह्या बरोबर प्रचंड तिखट अशी टोमॅटो आणि लाल मिरच्या घातलेली चटणी खात असते. मला वाटते Sriracha sauce पण टाकत असतील म्हणून इतकी तिखट चव असेल.
16 Jan 2014 - 1:56 pm | उद्दाम
छान
16 Jan 2014 - 2:10 pm | सूड
बांबू स्टीमर नसेल तर रवळीत केलं तर चालेल का?
16 Jan 2014 - 5:33 pm | Mrunalini
आहाहा.. काय मस्त दिसतायत ते ड्म्प्लिंग्स.. माझे ऑल टाईम फेवरेट.
16 Jan 2014 - 8:51 pm | मुक्त विहारि
बरेच प्रश्र्न आहेत.
16 Jan 2014 - 9:08 pm | अनन्या वर्तक
तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.
16 Jan 2014 - 9:15 pm | आयुर्हित
खूप छान आहे ही पाकृ!
घरी करून पाहता येईल!
मुलांना नक्कीच आवडेल हो!
अजून येऊ द्या अशाच नवीन पाक्रु!!!!
आपला मिपास्नेही :आयुर्हीत
16 Jan 2014 - 11:06 pm | सानिकास्वप्निल
मस्तचं दिसातयेत डम्प्लिंग्ज :)
पाकृ आवडली व फोटोज +१
17 Jan 2014 - 12:23 pm | सस्नेह
फोटो भारीच !
17 Jan 2014 - 1:00 am | अनन्या वर्तक
सानिकास्वप्निल, दिपक.कुवेत, गणपा, जागु, प्रभाकर पेठकर आणि Mrunalini तुमच्या पाककृती नेहमी पाहूनच मला आपणही काही नवीन प्रयोग करून पाहावे असे विचार मनात येऊ लागले. बनविलेला पदार्थ तेवढ्याच उत्तम रीतीने सादर सुधा करावा हि गोष्ट मला तुमच्या पाककृती पहाताना समजत गेली.
त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.
17 Jan 2014 - 9:50 pm | मुक्त विहारि
"बनविलेला पदार्थ तेवढ्याच उत्तम रीतीने सादर सुधा करावा हि गोष्ट मला तुमच्या पाककृती पहाताना समजत गेली."
हे असेच सुंदर सादरी करण तुम्ही ह्या आधी पण केले आहेच की....
http://www.misalpav.com/node/24544
आम्हाला ते लोणचे बनवायला अद्याप वेळ मिळालेला नाही, हेवेसांनल.
17 Jan 2014 - 11:02 pm | समीरसूर
खूप सुटसुटीत पाककृती! अनन्या, डम्पलिंग्ज बघून तोंडाला पाणी सुटलयं. आकाश पाककलानिपुण झालेला दिसतोय. फोटो देखील उत्तम आलेले आहेत. फेसबुकावर देखील पाहिले. :-)
पुढील लिखाणासाठी शुभेच्छा! आणि नक्कीच लिहित रहा.
18 Jan 2014 - 3:28 am | अर्धवटराव
पट्दिशी मटकावेशे वाटताहेत कोंबडीमोदक :)
21 Jan 2014 - 9:18 pm | पैसा
मस्तच आहे पाकृ आणि फोटो!
21 Jan 2014 - 9:30 pm | चैत्रबन
फोटो लैच मस्त :) करुन बघेन एकदा ही पाकृ..
22 Jan 2014 - 8:38 am | सुहास झेले
अतिशय आवडता पदार्थ... पाककृतीसाठी आभार :)
22 Jan 2014 - 12:58 pm | पियुशा
मोमोज अन हा प्रकार सेम सेम आहे का ?
एकदा करुन बघणारच :)
22 Jan 2014 - 6:53 pm | राही
डम्प्लिंग्स वळलेत फार छान. (लाडू वळतात. डम्प्लिंग्सच्या बाबतीत काय करतात?)
22 Jan 2014 - 7:10 pm | jaypal
पाकक्रुती करताना प्रमाण महत्वाचे असते. आपल्या लेखात ते काही कळत नाही. फक्त वस्तुंची नावे आहेत.
चट्णी बनवताना चा प्रमाणा सहित तपशिल द्या
23 Jan 2014 - 2:42 am | अनन्या वर्तक
jaypal मी इथे टोमाटो चटणीची पाककृती देते आहे आणि वरती सुद्धा add करते. Dumpling हे बहुतेकदा Sriracha Sauce किवा Soy-Ginger Dipping Sauce बरोबर देतात. मी माझ्यासाठी ही कमी तिखट Dipping Sauce ची पाककृती बनवली आहे. पण ज्यांना तिखट खावयास आवडत असेल त्यांच्यासाठी वरील दोन्ही Sauce एकदम छान.
चटणी:
एक टोमाटो
दोन पाकळ्या लसून
एक चमचा तीळ
चवीनुसार जिरे पूड
चवीनुसार मीठ आणि काळेमिरी
प्रथम एका नॉन स्टिक भांड्यात थोडे तेल तापवावे. तेल तापल्यावर त्यात लसुन, तीळ व जिरे टाकावे थोड्या वेळाने चिरलेले टोमाटो टाकावे. थोडे शिजल्यावर वरून चवीप्रमाणे मीठ आणि काळेमिरी टाकावे. हे सर्व मिश्रण थंड झालं कि गरजेनुसार पाणी घालुन मीक्सरमधे त्याची पेस्ट करुन घ्यावी आणि तिखट हवे असेल तर Sriracha sauce किवा लाल मिरच्या आवडी प्रमाणे वापरू शकता.
23 Jan 2014 - 2:50 am | अनन्या वर्तक
समीर धन्यवाद. अगदी बरोबर आकाश पाककलानिपुण झालेला दिसतोय आणि म्हणूनच माझा स्वयंपाक घरातील वावर थोडा वाढला आहे. त्याची मदतनीस म्हणून......
23 Jan 2014 - 2:53 am | अनन्या वर्तक
पियुशा मोमोज आणि Dumpling बहुतेक सारखेच असावेत.
23 Jan 2014 - 2:59 am | अनन्या वर्तक
राही (लाडू वळतात. डम्प्लिंग्सच्या बाबतीत काय करतात?)
डम्प्लिंग्सना आपण वेगवेगळे आकार देवू शकतो आपल्या आवडी आणि सोयी प्रमाणे. इथे आहेत
23 Jan 2014 - 2:59 am | अनन्या वर्तक
तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.
23 Jan 2014 - 3:44 am | गणपा
अनन्या फोटो अतिशय सुरेख आलेत.
पाककृती ही मस्तच.
बांबूपात्र तर फार्रच आवड्ल्या गेलं आहे. इथे मिळत नाही कुठे हे असलं. :(
23 Jan 2014 - 7:32 am | अर्धवटराव
अहो मग खजुराच्या टोपल्या वापरायच्या. हा.का.ना.का.
मग.. कधि येऊ हादडायला? :D
23 Jan 2014 - 1:59 pm | स्वाती दिनेश
सुरेख दिसत आहेत डंपलिग्ज,
स्वाती
23 Jan 2014 - 2:49 pm | इरसाल
यु आर माय डम्प्लिंग डम्प्लिंग तु मेरा मोमो मोमो.
2 Aug 2016 - 7:55 am | पिलीयन रायडर
आज करुन पाहिले हो. तुमच्या इतकं सुंदर करायला जमले नाहीत. मी कणिकेचे केले होते. आणि सारण कोबी, गाजर, कांदापात, मिरपुड इ होतं.
2 Aug 2016 - 2:49 pm | युफोरिक
मस्त दिसतायेत इम्पलिंग्स :P
2 Aug 2016 - 3:36 pm | बरखा
>>>>बांबू स्टीमर नसेल तर मोदक किंवा ईडली पात्रात पण हे उकडु शकतो.
मी व्हेज डम्पलिंग ईडली पात्रात केले आहेत. अगदी वरिल फोटोत दिसताहेत तशीच झाले होते. मी मश्रुम, पनिर, कॉर्न हे घटक वापरले होते.