लघुपाककृतीस्पर्धा निकाल

गणा मास्तर's picture
गणा मास्तर in काथ्याकूट
28 Sep 2008 - 2:18 pm
गाभा: 

नमस्कार,
सर्वप्रथम लघुपाककृती स्पर्ध्येमध्ये भाग घेणार्‍या सर्व स्पर्धकांचे हार्दीक आभार.
प्रथम पारितोषिक
आरती
मुग डाळीचे कबाब

साहित्य :
१ कप मुगाची डाळ, कप उकडलेला बटाटा (मळून), थोडा बारीक चिरलेला कांदा, २ चमचे मिर्चि पावडर, १/४ चमचा गरम मसाला, १/४ चमचा हळद, १ चमचा आल-लसूण पैस्ट, १ चमचा चाट मसाला, २ चमचे कोथिंबीर, चवीपूरता मीठ.

कॄती :
निवडून, धूऊन मुगाची डाळ ऊकडून घ्यावी. त्यात उरलेले बाकीचे साहीत्य नीट मिसळून घ्यावे. मग त्याचे लहान लहान गोळे करावे. मग सळीला लावून मायक्रोवेव्ह मध्ये ३ ते ४ मिनीटे बेक करणे.

गरमागरम कबाब तय्यार......... हिरव्या चटणी बरोबर गरम गरम खावेत.
टीपः कोथिंबिर नको असल्यास पूदिना वापरला तरी वेगळीच चव येते.

उत्तेजनार्थ पारितोषिके
सर्वाधिक पाककृती पाठविल्याबाद्दल
मनस्वी आणि प्रभाकर पेठकर काका
मनस्वीने ६ तर पेठकर काकांनी ५ पाककृती पाठविल्या होत्या. मनस्वीने पाठविलेली कॉर्न उपमा ही पाककृती मिक्सरच्या वापरावर बंधने असल्याने बाद झाली.
मनस्वी आणि प्रभाकर पेठकर काका दोघांचे हार्दीक अभिनंदन

सर्वात सोपी पाककृती
आनंदयात्री
१. दुधाची पिशवी आणावी.
२. ती फोडावी.
३. हवा अंमळ उकाड्याची असल्यास दुध डायरेक्ट तसेच प्यावे.
४. हवा अंमळ थंड असल्यास ते चवीनुसार गरम करुन ऐपतीप्रमाणे साखर घालुन प्यावे.

(टिपः दुधाची पिशवी आपला आहार पाहुन आणावी .. )

सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन.
आपले नम्र
फटु आणि गणा मास्तर
-भोकरवाडी (बुद्रुक)

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

28 Sep 2008 - 3:23 pm | जैनाचं कार्ट (not verified)

विजेत्यांचे अभिनंदन !!!!!!

बाकी मनस्वी व पेठेकर ह्यांनी तर एकापेक्षा एक डिशेश ची रेसेपी दिली खास करुन त्यांचे धन्यवाद !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

विसोबा खेचर's picture

28 Sep 2008 - 4:27 pm | विसोबा खेचर

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धा आयोजकांचे आभार..

तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2008 - 4:30 pm | प्रभाकर पेठकर

आरती ह्यांचे हार्दीक अभिनंदन.

गणा मास्तर,
घटक पदार्थांमध्ये साबुदाणा, कडीपत्ता, कोथिंबिर चिंच, गुळ, हिंग, सोडा, अंडी, कैरी यांचा समावेश नसावा.

आपल्या वरील अटीचे आम्ही तंतोतंत पालन केले. अन्यथा, आम्हीही अजून काही पाककृती वरील प्रतिबंधित पदार्थ वापरून दिल्या असत्या की हो. असो.

उत्तेजनार्थ बक्षिस पाककृतींच्या संख्येवर दिले आहे हे वाचून जरा निराशाच झाली. मला वाटले एखादी पाककृती चुकून आवडली की काय. असो.

उत्तेजनार्थ बक्षिसासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

गणा मास्तर's picture

28 Sep 2008 - 5:08 pm | गणा मास्तर

सर्वांच्याच पाककृती आवडल्या विषेशकरुन तुमचा गार्लीक ब्रेड आणि धनंजयचे सॅन्डविच.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2008 - 5:10 pm | प्रभाकर पेठकर

सर्वांच्याच पाककृती आवडल्या विषेशकरुन तुमचा गार्लीक ब्रेड आणि धनंजयचे सॅन्डविच.

बरं वाटलं वाचून. धन्यवाद.

यशोधरा's picture

28 Sep 2008 - 4:33 pm | यशोधरा

मास्तर, कोथिंबीर वापरायची नव्हती ना?? मग तुम्हीच तुमच्या स्पर्धेचे नियम मोडले की हो!! :)

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!

गणा मास्तर's picture

28 Sep 2008 - 5:11 pm | गणा मास्तर

कोथिंबिरीऐवजी पुदिना वापरता येइल असे आरतीने सुचविले
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

आरती's picture

30 Sep 2008 - 10:25 am | आरती

गणा मास्तर, इतर परीक्षक, तात्या, यशोधरा तसेच पेठकर काका यांचे मनापासून आभार.

गणा मास्तर's picture

30 Sep 2008 - 11:08 am | गणा मास्तर

खरड वाचा
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

आरती's picture

30 Sep 2008 - 3:44 pm | आरती

माफ करा, आत्ता खरड वाचले. आत्ताच उत्तर दिले आहे.

आनंदयात्री's picture

30 Sep 2008 - 10:39 am | आनंदयात्री

चामारी आम्हाला बी लाटरी लागली की !!
धन्यवाद :) .. उत्तेजनार्थ .. वा वा !!

मनस्वी's picture

30 Sep 2008 - 1:31 pm | मनस्वी

विजेत्यांचे अभिनंदन!

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

मुक्तसुनीत's picture

30 Sep 2008 - 8:19 pm | मुक्तसुनीत

सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन !