विचीत्र आणि दु:खद वर्तन

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
14 Jan 2014 - 11:17 am
गाभा: 

ठाण्यात प्लेग्रूप (बालगट) शाळेच्या बसची एका कुत्र्यास धडक बसली म्हणे. त्या नंतर कुत्र्यास धडक बसल्याने संतप्त झालेल्या युवकांनी म्हणे शाळेच्या बसची मोडतोड केली म्हणे.

प्रत्येक वृत्तपत्रा गणिक वृत्तात जरासा फरक आहे.एका वृत्तात बस रिकामी नुसती थांबलेली असताना मोडतोड झाल्याचे म्ह्टले आहे तर एका वृत्तात मुलांना खाली उतरवून बसची मोडतोड केल्याचे म्हटले आहे. दुर्दैवाने कुत्र्याचे मालक अबकड राजकीय पक्षाचे आहेत आणि स्कुलच्या मुख्याध्यापिका हळक्षज्ञ विरोधी राजकीय पक्षाच्या आहेत असे काही वृत्तात म्हटले आहे. झाल्या गोष्टीचा राजकीय संबंध असावयास नको. रिकाम्या नुसत्या बसची तोडफोड पण चुकीचीच आणि पालकांमध्ये दहशत निर्माण करणारी ठरते.

कार्यकर्ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असोत घडल्या चुका कबुल करून कायद्दास समोर न जाता राजकिय आरोप प्रत्यारोप करणे योग्य नाही.अशा प्रसंगी संबंधीत पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना परस्पर राजकीय आरोपबाजी पासून आवरण्याची संवेदनशीलता दाखवावयास हवी.बरे हे तथाकथीत दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्या महिला आहेत. बातमी दारांनाही कुत्र्यावरून चालू असलेले राजकारण असे वृत्त देतात. शाळेतल्या मुलांच्या सुरक्षीततेचा विचार बातमीदारही करत नाहीत का काय असा प्रश्न पडतो.

एकुण संयमाचा अभाव असलेल्या विचीत्र वर्तना बद्दल दु:ख होते.

खाली वृत्ताचे दुवे आहे कोणते बरोबर कोणते नाही कल्पना नाही:

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/Dog-injur...

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/Again-rad...

http://www.loksatta.com/mumbai-news/after-school-bus-hits-thane-corporat...

http://www.ibnlokmat.tv/?p=110771

http://prahaar.in/mahamumbai/thane/174484

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

14 Jan 2014 - 11:38 am | मुक्त विहारि

चला मस्त एक एक कटिंग मारू, जमल्यास एक सिगरेट ओढू, वाटले तर मिसळपाव पण खावू आणि नेहमीप्रमाणे मिठाची गुळणी घेवू आणि गुड्डूप्प झोपून जावू.

बातमी बातमीत एवढा फरक का असावा समजत नाही.

http://www.mid-day.com/news/2014/jan/140114-shiv-sena-men-smash-buses-af...

http://www.asianage.com/mumbai/sena-men-vandalise-bus-131

अनिरुद्ध प's picture

14 Jan 2014 - 11:54 am | अनिरुद्ध प

असे आहे ते समर्थाघरचे श्वान आहेत्,म्हणुनच जर भटका कुत्रा असता तर असे घडले असते का?

श्वान कुठल्या समर्थाघरचे आहे, हे पण बघीतल्या जाते.

"सामना आणि सिंहासन" हे दोन सिनेमा बघीतल्या नंतर राजकारण आणि त्यात भाग घेणारी महान मंडळी बघीतली, की अशा बातम्या फक्त वाचनमात्रच असतात असे माझे मत आहे.

ह्या बातमीवर उहापोह करण्यापेक्षा, "गुलाबाचे फळ" वाचणेच जास्त उत्तम.

माहितगार's picture

14 Jan 2014 - 12:32 pm | माहितगार

दर क्षणाला विरामचिन्ह देतच जगत असतो.विरामचिन्हाच्या मागच वाक्य कधी जाऊद्या म्हणत कधी विस्मृतीत टाकत पुढे जात असतो.सामान्य माणसाने बातम्या वाचायच्या ते स्वतःतली संवेदनशीलता जागृत होऊन स्वतःपुरते नीट जगण्यासाठी.

मुक्त विहारि's picture

14 Jan 2014 - 10:08 pm | मुक्त विहारि

"सामान्य माणसाने बातम्या वाचायच्या ते स्वतःतली संवेदनशीलता जागृत होऊन स्वतःपुरते नीट जगण्यासाठी."

१००% मान्य.

किंबहूना ज्याची संवेदनशीलता जागृत आहे, तोच सामान्य माणूस.

खटपट्या's picture

14 Jan 2014 - 12:32 pm | खटपट्या

मस्त चालू आहे !!

मोदक's picture

14 Jan 2014 - 2:56 pm | मोदक

लिंका सवडीने पाहतो...

रच्याकने, सिंघानीया हास्पिटल ठाण्यातच "होते" का हो?

पैसा's picture

21 Jan 2014 - 3:08 pm | पैसा

गोव्यात काही वर्षांपूर्वी एक आंदोलन चालू होतं. (कारण काय ते आता आठवत नाही.) पण आंदोलकांना बसची मोडतोड करायची होती. त्यांनी बस अडवली ती नेमकी स्कूलबस होती. त्यातल्या मुलांना त्यांनी खाली उतरवले. ड्रायव्हर कंडक्टरला खाली उतरवले आणि बसची मोडतोड केली. नंतर मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या त्यांच्या घरी पोचवून दिले!

शैलेन्द्र's picture

21 Jan 2014 - 7:12 pm | शैलेन्द्र

गोवेकर मुळातच सभ्य :) (सं म खु क टा प्र)

मुळात गोव्याचे आंदोलक इतके सुशेगाद असतात की एकदा अडवलेली बस सोडुन देवुन दुसरी आडवायची जिवावर आलं असेल, शिवाय बस तोडल्यावर मुलांना जाता-जाता घरी सोडायला वेळ असलेले आंदोलक फक्त गोव्यातच मिळतील.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Jan 2014 - 3:17 pm | प्रकाश घाटपांडे

तोड्फोड संस्कृती ला न्युज व्हॅल्यु आहे ना? शांततामय मार्गाने आपला निषेध नोंदवणे हे पुळचटपणाचे मानले जाते.तरुणांनाही आपण तोडफोड केली नाही तर काही संघटनेचे/पक्षाचे काम केल्यासारखे वाटत नाही. अशा तोडफोडीतुन झालेले नुकसान शेवटी आपल्या करातूनच भरले जाते.