मध्य प्रदेश सहल - ४ दिवस फिरण्याचे ! - भाग दुसरा

आनंदराव's picture
आनंदराव in भटकंती
19 Jan 2014 - 12:54 pm

http://www.misalpav.com/node/26634#comment-547109
मध्य प्रदेश सहल - ४ दिवस फिरण्याचे !

वरील लेख लिहिल्यावर त्याचा पुढचा भाग आज लिहितोय. कार्यबाहुल्यामुळे सवड झाली नाही. जे लोक पुढील भागाच्या प्रतिक्षेत होते आणि जे नव्हते त्यांची पण जाहिर माफी मागुन सुरुवात करतो.

दुसर्‍या दिवशी जरा उशिराच उठलो. कालचा driving चा शीण होता आणि कालचे सराफा बाजारात खाल्लेले असे काही अंगावर आले होते कि सकाळी डोळे लवकर उघडलेच नाही.
आणि आम्ही शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात राहत असल्यामुळे सगळी ठिकाणे अगदी जवळ असल्यामुळे घाई कसलीच नव्हती.
सकाळची आन्हीके आवरुन राजवाडा बघण्यासाठी निघालो.पण आधी लगीन पोटाचे... म्हणून जवळ्च्याच विजय चाट हाऊस मधे गेलो. इन्दौरी लोकं फारच चाटप्रेमी बुवा ! सकाळी सकाळी सामोसा , कचोरी ... नाश्त्याला ??
सामोसा.... आह...
samosaa

मग काय ताव मारला. सामोसा,कचोरी,फ्राईड खमण ( नको त्या सुखद आठवणी.. तोंडाला पाणी सुटलेय ), मग एवढे पित्तकारक खाल्यावर पित्तशमन व्हावे म्हणून मग चिकूमिल्कशेक... आहाहा ! झकासच !
पेटपूजा झाल्यावर राजवाडा च्या दिशेने कूच केले. हे सगळे चालत फिरलो आम्ही. सगळ्या गोष्टी दोन कि.मी. अंतरात असल्यामुळे चालतच हिंडलो. शिवाय पायी चालल्यामुळे शहराचा नकाशा डोक्यात फिट्ट बसायला मदत होते.
चालता चालता राजवाडा आला पण ! बाहेरुन च काय सुंदर आहे हो... खरचं राजवाडा ! दरवाज्यावरील कलाकुसर तर अक्षरशः बघत रहावी अशीच !

रु.१०/- असे भरभक्कम तिकिट काढून आम्ही आतमधे प्रवेश केला. आतमधे मोठा चौक.
sabhamandap

sa

समोर सभामन्डप ! तिथे गणपतीची मुर्ती होती.
त्यावर पहिल्या मजल्यावर दरबार... पण त्याची डागडुजी केल्यामुळे असा काही जुना किंवा ऐतिहासिक फील आला नाही.
दरबार
darbaar

तिथून समोरच्या भागात पहिल्या मजल्यावर एक संग्रहालय आहे. त्यात सर्व होळकर घराण्याचा इतिहास मांडला आहे. अगदी त्यांच्या मूळ पुरुषा पासुन ची चित्रे / तत्कालीन फोटो तिथे मांडले आहेत.
या मोठ्या लोकांमधे वारसांना तीच तीच नावे पुन्हा ठेवण्याच्या सवयीमुळे वंशावळ समजायला फार गोंधळ होतो.पण असो.
तिथे त्यावेळची म्हणजे साधारण २५० वर्षांपासून ते १०० वर्षे पुर्वी पर्यंतची नाणी , तलवारी ( गंजलेल्या), ठासणीच्या बंदुका, त्या बंदुकांचे गोळे (हो हो ! गोळेच ), १८९० मधला रूम हीटर(???), इमर्जन्सी लाईट, दोन छोट्या तोफा ( साधारण लांबी ३ फूट ) , चीन वरुन आलेली (की मागावलेली) भांडी, फुलदाणी (फ्लॉवर पॉट ), वगैरे वगैरे..
एकंदरच एकदा आवर्जुन बघण्यासारखा वाडा आहे. ( कोण म्हणाले कि आमच्या शनवारवाड्याची सर नाही ते ;) )
वाडा बघेपर्यंत दुपार झाल्यामुळे पोटाने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. आणि आम्ही ५६ दुकान नावाच्या भागात गेलो.
५६ दुकाने खाण्याची
56 dukaan

पाणीपुरी चे दुकान बघुन सौं नी आग्रह केला. स्त्रीहट्ट आणि बालह्ट्ट मोडू नये म्हणतात ... तसेच केले. पण ... पण... काय ही किंमत ? फक्त १० रु. ? २५रु देण्याची सवय आहे हो आम्हाला पुण्यात.
त्याने ( तो पण भैयाच निघाला, कुठे कुठे पोचलेत हे लोक )सांगितले कि पांच पुडी आयेगा. (पुडी = हिंदी, पुरी = मराठी ). आनंद पोटात माझ्या माईना माईना... मनसोक्त पाणीपुरी खाल्ली, वेगवेगळे फ्लेवर्स (मराठी?)... लसुण, कालाखट्टा,तिखट,ईमली,पुदिना.
परत रूमवर येउन भोपाळच्या दिशेने प्रस्थान करण्यासाठी गाडीला स्टार्टर मारला !
क्रमशः

काही मजेदार
हिंदी भाषा...
hotel

रेट बघा
super chaay

दुर्लक्षित स्मारक
c
s

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

19 Jan 2014 - 2:26 pm | आयुर्हित

"राजवाडा" चा फोटो चांगला आलाय. काय छान कलाकुसर आहे!
खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद.
इंदोरला शेव(वरून भुरभूरलेली असते)पोहे खूप छान मिळतात.
हिंदीत कुल्ला म्हणजे गुळण्या(gargling)
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ काही पाहायला मिळाले?

आपला मिपास्नेही : आयुर्हीत

आनंदराव's picture

20 Jan 2014 - 8:32 am | आनंदराव

नाही

पियुशा's picture

19 Jan 2014 - 2:52 pm | पियुशा

च्च च्च च्च...... हात आखडता का घेता हो काका ?, भरपुर फोटु टाका की मजा वाटते बघायला :)

आनंदराव's picture

20 Jan 2014 - 8:33 am | आनंदराव

काका?????
या बद्दल तुमच्यावर अब्रुनुकसानीचा दावा का दाखल करु नये ? ;)

जेपी's picture

19 Jan 2014 - 3:18 pm | जेपी

आवडल .

शैलेन्द्र's picture

19 Jan 2014 - 6:59 pm | शैलेन्द्र

मालक, तुम्ही तिथे राहीलात, तर दुपारच्या जेवणासाठी हॉटेल गुरुकृपा मिस केलत.. ठेश्नाजवळचं..

आनंदराव's picture

20 Jan 2014 - 8:34 am | आनंदराव

आयला... माहित नव्हते कि हो ! नेक्ष्ट टाईम.

सूड's picture

20 Jan 2014 - 7:31 pm | सूड

येवढेच फोटो?

यावेळी कमी दिवसात करायचे होते म्हणून
भोपाळकडे लगेच निघालात पण पुढच्या वेळेस मांडू आणि माहेश्वर कराच .
(भाविकांसाठी आणि तीन जागा आहेत ).छान जमवलीय सहल .फोटो छान .लवकर लिहा .

पैसा's picture

24 Jan 2014 - 8:41 pm | पैसा

पुढचा भाग कधी लिहिताय?

मदनबाण's picture

24 Jan 2014 - 8:54 pm | मदनबाण

ओह्ह... इंदुर माझे आवडते शहर ! पण आता इथे सुद्धा मॉल्सची गर्दी वाढली आहे. मागच्या भागातल्या रबडीचा फोटो पाहुन जीव खाली-वर झाला.पण खरं सांगु का ? काळा नुसार त्या रबडीच्या चवीत बराच फरक पडला आहे.मला माझ्या लहानपणी खालेल्ल्या रबडीची चव अगदी लक्षात राहीली आहे.२ वर्षा पूर्वी निलकांत ठाण्याला {बहुतेक} आले होते तेव्हा त्यांनी फोनवले होते,तेव्हा मी इंदुरातच होतो. जसा वेळ मिळेल तसे मी काढलेले फोटो टाकीन.

सामान्यनागरिक's picture

11 Oct 2014 - 5:48 pm | सामान्यनागरिक

समस्त इंदुरकरांनी सरकारकडे तसेच श्रीश्री शंकराचार्य यांजकडे अर्ज करुन सराफा आणि ५६ दुकान यांना तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी भाग पाडावे ! तसेच ही दोन्ही नांवे उच्चारतांना दोन्ही कानांच्या पाळ्या चिमटीत धरुन डोळे भक्तिभावाने बंद करुन 'बढिया' हा शब्द उच्चारण्याची प्रथा चालु करावी. ईतके ते पवित्र स्थान आहे खवयायांसाठी !