आज एक सिनेमा पाहिला इन्विजिबल या नावाचा. आत्मा मरणासन्न अवस्थेतलं शरीर शोधतो अशी साधारण कथा असलेला चित्रपट. आयएमडीबीवर रीव्हिव्यू वाचताना ट्रिवियामध्ये एक गोष्ट वाचली.
"The shirt that Nick is wearing at the end of the movie bears a crow on the chest. In some Native American legends (and the graphic novel by James O'Barr bearing the name) the crow could carry a person's soul back from the land of the dead."
(http://www.imdb.com/title/tt0435670/trivia?ref_=tt_trv_trv)
मला वाटायचं पिंडाला कावळा शिवणे, काकस्पर्ष वगैरे भोंदूगिरी आपल्यातच आहे. पण ही भोंदूगिरी युरोपातदेखिल आहे हे वाचून सखेद आश्चर्य जाहले. जगातला सगळ्यात टाकाऊ, निरर्थक गोष्टींनी भरलेला, मागासलेला आपला समाज आहे असं वाटायचं. बुध्दीप्रामाण्यवादी, विज्ञाननिष्ठ वगैरे लोकांची तशी ठाम समजूत असते.
तसाच http://perspectiveszine.webnode.sk/news/ravens-and-crows-in-mythology-fo... या इथे आणखी थोडे वाचायला मिळाले. इंग्रजी थोडी कच्ची असल्याने सगळे काही समजले नाही.
आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे "कावळा" हा समान धागा आहे. इतर कुठलाही पक्षी किंवा प्राणी नाही, कावळाच. हे कावळ्याचं दोनहीकडे समान असणं काही लक्षात नाही आलं. कुणी जाणकार यावर प्रकाश टाकतील का?
प्रतिक्रिया
18 Jan 2014 - 7:33 am | अत्रुप्त आत्मा
त्याच विषयाकडे परत का वळा? ;)
18 Jan 2014 - 11:41 am | प्रसाद प्रसाद
भारतात काही कमी अंधश्रद्धा नाहीत हे मान्यच. पण
पण ही भोंदूगिरी युरोपातदेखिल आहे हे वाचून सखेद आश्चर्य जाहले.
व्हॅम्पायर, वेअरवूल्फ, विचेस हे अंधश्रद्धेचे प्रकार कुठल्या भागात अधिक रुजले आणि वाढीस लागले असं तुम्हांला वाटतं?
18 Jan 2014 - 12:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीची मकेतदारी फक्त भारतानेच घेतली आहे हे कोणी सांगीतले ? खालच्या दुव्यांवर ढीगभर पाश्चिमात्य अंधश्रद्धा सापडतील.
१.., २..
गुगलून पाहिले तर शेकड्यांनी सापडतील.
बादवे पाश्चिमात्य जगातही सर्वसाधारण मर्त्य मानवच राहतात. तेथे बुद्धिप्रामाण्यवादी ज्ञानी माणसांचे प्रमाणही भारताइतकेच आहे. फक्त वसाहतवादाच्या काळाने त्यांना दिलेला "केवळ मानसिक" वरचष्मा त्यांच्या मनात आहे त्यापेक्षा तो भारतियांच्या मनात जास्त आहे.
18 Jan 2014 - 1:06 pm | यसवायजी
नॅशनल जिओग्राफीवर टॅबू (AKA- cultural shocks)नावाचा एक कार्यक्रम असतो. यात भारत व इतर देशातील असे बरेच किस्से बघायला मिळतात.
demon, witchcraft, evil spirit , extreme rituals etc.
(धोक्याची सुचना- बरेच भाग किळसवाणे असतात)
18 Jan 2014 - 1:11 pm | मारकुटे
>>>जगातला सगळ्यात टाकाऊ, निरर्थक गोष्टींनी भरलेला, मागासलेला आपला समाज आहे असं वाटायचं. बुध्दीप्रामाण्यवादी, विज्ञाननिष्ठ वगैरे लोकांची तशी ठाम समजूत असते.
चला माणसांत आले तुम्ही ! अभिनंदन.