मंदीरांचे व्यवस्थापन राज्य सरकारच्या ताब्यात द्यावे का?

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture
टॉपगिअर्ड फिलोसॉफर in काथ्याकूट
16 Jan 2014 - 3:24 pm
गाभा: 

आजच्या वर्तमानपत्रामध्ये पंढरपुर मंदीराचे व्यवस्थापन हे राज्य सरकारच्याच ताब्यात राहील असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारने अधिनियम करुन १९८५ साली मंदीर व्यवस्थापन ताब्यात घेतले होते. त्याला बडवे व उत्पात या पुजारीं लोकांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
http://divyamarathi.bhaskar.com/article-ht/MAH-WMAH-pandharpur-temple-ma...
अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर मुस्लिमांच्या आणि इंग्रजांच्या राजवटीतही आमचे अधिकार सुरक्षीत होते जे स्वराज्यात काढून घेतले जातात असा पुजारी सेवेकरी लोकांचा सूर आहे.

महाराष्ट्र राज्यात अनेक मंदीरे आहेत, जिथे व्यवस्थापनाकडून अनागोंदी कारभार ,भ्रष्टाचार, दर्शनपास, पूजेसाठी व अभिषेकासाठी पुजार्यांकडून करण्यात येणारी सक्ती या सारख्या गोष्टींमुळे भाविक त्रस्त होत असल्याच्या बातम्या आपल्या निदर्शनास येत असतात. परंपरागत हक्क असणारे, पुजेचे मानकरी बर्याचदा स्वतःच मंदीराचे खाजगी मालमत्तेप्रमाणे व्यवस्थापन करताना बघायला मिळते . अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी या मंदीरांचे व्यवस्थापन राज्य सरकारने प्रस्थापीत कायद्यात बदल करुन ताब्यात घ्यावे काय? असे ताबांतर करुन मंदीरे, देवस्थाने यांची परिस्थीती सुधारेल का एवढाच प्रश्न शिल्लक राहतो.....

प्रतिक्रिया

मंदीरांचे व्यवस्थापन राज्य सरकारच्या ताब्यात द्यावे का?>>>>>>>>>>होय तेच योग्य राहील.

परिंदा's picture

16 Jan 2014 - 3:31 pm | परिंदा

परंपरागत बडवे काढून नवे खादीतले बडवे आणल्याने काय परिस्थीती बदलणार हाय?

संजय क्षीरसागर's picture

16 Jan 2014 - 3:34 pm | संजय क्षीरसागर

कारण ताबांतर केलं तरी मूळ प्रश्न तसाच राहातो! तो म्हणजे `किती वेळ ताबा ठेवणार'?

अनागोंदीचा कारभार होऊ नये म्हणून मंदीरं ताब्यात घेत असाल तर मग त्याच बरोबर मशीदी आणि चर्चची व्यवस्थापनं सुद्धा 'धर्मनिरपेक्ष' राज्य सरकारने ताब्यात घ्यावीत अशी मागणी होऊ शकते. अर्थात ती रास्त आहे, शक्य आहे आणि अशा या सर्व धर्मांच्या देवस्थानांचं व्यवस्थापन सरकारने एकाच वेळी ताब्यात घेणं चांगलं जेणेकरून कोणत्याच विशिष्ट धर्माच्या ठरावीक लोकांना 'आमच्यावरच हा अन्याय का?' अशी ओरड करता येणार नाही. मात्र, ही देवस्थाने सरकारच्या ताब्यात गेल्यानंतर त्यांचं नीट व्यवस्थापन होईल का?

प्रसाद गोडबोले's picture

16 Jan 2014 - 4:06 pm | प्रसाद गोडबोले

१००% टक्के सहमत :)

मात्र, ही देवस्थाने सरकारच्या ताब्यात गेल्यानंतर त्यांचं नीट व्यवस्थापन होईल का?

सरकारने ज्याप्रकारे देशाचे व्यवस्थापन चालवले आहे ते पाहुन असे वातते की इथेही "व्यवस्थापन" नक्कीच छान होईल ... लवकरच पांडुरंग घोटाळा / पंढरपुर स्कॅम वाचायला मिळेल ...

अवांतर सुचना : मंदीराच्या उत्पन्नापैकी ठराविक रक्कम हज यात्रेवर खर्च करावी . आणि ओरीसा / नॉर्थ ईस्ट / केरळ भागात आदिवासी पाड्यात जिथे क्रिश्चन मिशनरी "समाजसेवा " करीत आहेत तिथेही देण्यात यावी .

|तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे ||

एका परंपरागत बडव्याकडून दुसर्‍या खादीतल्या नाहीतर प्रशासकीय बडव्याकडे ताबा देण्यात काय अर्थ आहे?

जे लोक सैन्यासाठी शस्त्र वगैरे विकत घेताना भ्रष्टाचार करतात ते लोक मग पूजेचे सामान वगैरे खरेदीत घोटाळा करतील. फरक काय पडणार आहे का?

उडन खटोला's picture

16 Jan 2014 - 4:22 pm | उडन खटोला

अनागोंदीचा कारभार होऊ नये म्हणून मंदीरं ताब्यात घेत असाल तर मग त्याच बरोबर मशीदी आणि चर्चची व्यवस्थापनं सुद्धा 'धर्मनिरपेक्ष' राज्य सरकारने ताब्यात घ्यावीत अगदी सहमत

देवळाचे, मस्जिदिचे, चर्चचे व्यवस्थापन हे शासनाच्याच हातात हवे. धार्मिक विधींसाठी त्या विषयात तज्ञ पगारी कर्मचारी ठेवण्यात यावा.

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

16 Jan 2014 - 4:57 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

सहमत

कोंकणी माणूस's picture

16 Jan 2014 - 4:33 pm | कोंकणी माणूस

त्याने काही फरक पडेल असे वाटत नाही फक्त आपला शब्दप्रयोग बदलेल

"विठ्ठलाचे सरकारी बडवे "

धर्म सत्ता राजसत्तेच्या आधीन झाल्यास तेच होईल जे राजसत्ता धर्मसत्तेच्या ताब्यात होती तेव्हा जे घडले.

सबब, आहे ती व्यवस्था ठीक आहे. अधिक पारदर्शक कारभार कसा करता येईल ते पहावे.

बॅटमॅन's picture

16 Jan 2014 - 5:05 pm | बॅटमॅन

सगळं पाल्टिक्स आहे भेंडी. बडवे नालायकपणा करत असतील असे एकवेळ मानू, पण अशी किती देवळे आहेत जिथे अशी लुबाडणूक होत नाही??? कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळातसुद्धा आत्तापर्यंत बायकांना प्रवेश नव्हता. मध्ये मोडला तो नियम पण त्यानंतर काय झाले?

शनी शिंगणापूरला येणारा भाविकांचा ओघ थांबू नये म्हणून काय काय लबाड्या केल्यात हेही सर्वांस विदित असेलच. हम तो कहते हैं घंटा कुछ नही उखाडा ये निर्णय लेके. विठ्ठल आणि बडवे हे प्रकर्ण गाजलं इतकंच कारण तो लै पापिलवार देव आहे या ना त्या कारणामुळे. त्यात परत उत्पात लोक ब्राह्मण, त्यामुळे त्यांना विरोध केला की जातिव्यवस्था उखडून टाकल्याचा बकवा करता येतो. अन्यत्र बघा म्हणावं, लेकिन उनसे ना हो पायेगा.

उत्पातांना हाकलल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावला आहे.

एका's picture

16 Jan 2014 - 6:29 pm | एका

बर हाय की, इपरित झाल की सरकारच्या नावान शन्ख करायचा (नेहमी करतो तसा). आता बड्व्याचे पायही धरवत नाही अन शिव्याही देववत नाहीत.

कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळातसुद्धा आत्तापर्यंत बायकांना प्रवेश नव्हता. मध्ये मोडला तो नियम पण त्यानंतर काय झाले
अरे हो.. काय झाले? बरेच दिवस गेलो नाही देवळात. बहुतेक अजुन बंदी आहेच. हौदिल्लो??

बॅटमॅन's picture

16 Jan 2014 - 7:41 pm | बॅटमॅन

गोत्तिल्ला, बहुतेक प्रवेशबंदी अजूनही आहेच.

(एक दुरुस्ती: देवळात प्रवेश नव्हता ऐवजी गाभार्‍यात प्रवेश नव्हता असे वाचावे.)

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

16 Jan 2014 - 5:15 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

चांगल्या चर्चेत जातिवाद वगैरे कशाला आणताय, भाविकांच्या दृष्टीने जरा विचार करा बॅटमन, पुजार्यांच्या नव्हे.

तेच म्हणतोय. भाविकांना इतर देवळांत देवागत वागणूक मिळते अन फक्त विठ्ठलाच्या देवळात उत्पात माजलेत असं काही आहे का? की कुठला बडा पॉलिटिशिअन पंढरपूरच्या देवळामागे नसल्याने ही उत्पन्न लाटण्याची झुंबड उडालीये?

चैतन्य ईन्या's picture

16 Jan 2014 - 7:20 pm | चैतन्य ईन्या

नाही म्हणजे देवा धर्माचे त्यातुन बामण लोकांना झोडपणे असेच धागे फक्त फिलोसॉफर आणि थिंकर लोक करतात काय? हल्ली अश्यांनाच फिलोसॉफर आणि थिंकर म्हनत्यात काय :)

फक्त विठ्ठलाच्या देवळात उत्पात माजलेत असं काही आहे का?

बॅटमन एकतर अख्ख्या महाराष्ट्राचे दैवत आहे त्या बद्दल अपेक्षेचा बार उंचावर असतो.मी तसा मोठ्या रांगेत गर्दीत उभेराहून दर्शने घ्यावयाचे टाळतो.पण अनायसे पंढरपुरात आहोत म्हणून एकदा रांगेतन दर्शन घेतले.सध्याचे माहित नाही माझी पंढरपूरला दहा एक वर्षांपूर्वी भेट झाली होती अख्ख्या महाराष्ट्राच्या देवतेच्या मुर्तिच्या बाजूला उभ्या व्यक्ती - पुजारी होत्या उत्पात का बडवे माहित नाही-त्यांनी मला गर्दीतही जास्तवेळ दर्शन घेण्यासाठी मुर्तिच्या बाजूला जास्त वेळ थांबू दिल तरीही मला त्यांचे वर्तन पाहून आनंद वाटला नाही.मी सूटा बूटात (नव्हे सॉक्सात) होतो म्हणुन जास्त दक्षीणा मागितली तर ठि़क पण एकाच वेळी दोन दोनदा दक्षिणा देऊनही जो लोचट पणा दाखवला जात होता त्याच वेळी बाकीची जनता मेंढरांसारखी ढकलली जात होती वाईट वाटले होते.त्यावेळी स्वतःच्या मनाची समजूत काढली होती कि लोचट व्यक्तीच्या हातातही पैसे जावेत हि इश्वराचीच इच्छा असेल.पण मनाच्या मागे नेहमीच याच मंदिराचे दरवाजे उघडण्याकरता साने गुरूजींनी उपोषण केले ते त्यांनी त्या वेळी न थांबवता तेथला पुजारी वर्गहि त्याच उपोषणाच्या वेळी बदलून घ्यावयास हवा होता हे मना च्या आतन वाटल हे खरं.

कुठला बडा पॉलिटिशिअन पंढरपूरच्या देवळामागे नसल्याने ही उत्पन्न लाटण्याची झुंबड उडालीये?

शिर्डी आणि कोल्हापूरला देणग्या मोजण्यासाठी नोटा मोजणार्‍या मशिनची गरज भासते. आळंदी आणि पंढरपुरात नाणी मोजावयास लागतात त्यामुळे आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने आळंदी आणि पंढरपुरात पॉलीटीशियन्सना किती इंटरेस्ट असेल याची शंका वाटते पण त्यांचा इंटरेस्ट पब्लिसिटी फोटो काढून घेणे या दृष्टीने असु शकतो

चैतन्य ईन्या's picture

16 Jan 2014 - 8:13 pm | चैतन्य ईन्या

तुम्हाला पूर्ण अनुमोदन. मी स्वतः गेले ८ वर्ष झाले मंदिरात गेलो नाहीये. आमचे कुलदैवत बालाजी. मागे एकदा सहावी का सातवीत असताना गेलो होतो. ज्या पद्धतीत सगळे चालू होते पाहून तेंव्हा उबग आला. पुजारी डोके आपटतो काय आणि १ क्षणपण धड मूर्ती पाहून देत नाही. पंढरपूरला पण हाच अनुभव घेतला आणि नंतर सर्व प्रसिद्ध देवळात जाणे बंद केले. फुकाच्या चर्च्या करून काय उपयोग. त्यापेक्षा जाणे बंद करा. तसेही दर्शन घेतले काय आणि नाही घेतले काही फार फरक पडत नाही.

शिद's picture

16 Jan 2014 - 8:20 pm | शिद

फुकाच्या चर्च्या करून काय उपयोग. त्यापेक्षा जाणे बंद करा. तसेही दर्शन घेतले काय आणि नाही घेतले काही फार फरक पडत नाही.

असहमत आणि सहमत दोन्हीही. असो.

सोत्रि's picture

16 Jan 2014 - 6:49 pm | सोत्रि

उत्पन्न लाटण्याची झुंबड उडालीये?

बिंगो,
एकदा का हे मूळ 'अर्थ'पूर्ण कारण कळले की बाकीची चर्चा फोल ठरते. सगळा देवस्थानात जमा होणार्‍या पैशाचा खेळ आहे. त्यापलीकडे काही नाही.

- (देवळात न जाणारा) सोकाजी

चिरोटा's picture

16 Jan 2014 - 8:21 pm | चिरोटा

सहमत. तिरुपती,सिद्धीविनायक्,शिरडी येथेही हाच प्रकार आहे.

चला तर मग लवकर, विठ्ठलाचे फुकटात दर्शन करायला.

कारण,

पुढच्या वर्षी २०१५ मध्ये बातमी असेल:
मंदिराची दुर्दशा,सरकारी बडव्यांना ६ महिन्यापासून पगार नाही!
पगार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा ४५० करोडचा divestment प्लान.
विठ्ठलाच्या मूर्तीचा "प्रथम या प्रथम मिळवा" या पद्धतिने ३ लाखात आदर्श लिलाव!

त्यापुढच्या वर्षी २०१६ मध्ये बातमी असेल:
स्वित्झर्लंडमध्ये बँकेच्या आवारात मध्ये विठ्ठलाच्या मुर्तीचा लिलाव!
लंडन संग्रहालयाने ३५००करोडला विठ्ठलाची मूर्ती विकत घेतली.
लंडन संग्रहालयामध्ये भारतीयांना फी मध्ये ५०% सवलत.
फी देऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी भारतीयांच्या मोठ्या रांगा!

त्यापुढच्या वर्षी २०१७ मध्ये बातमी असेल:
सर्व मंत्रीगण मुख्यमंत्र्यांसह सहकुटुंब सहपरिवार आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या पूजेला लंडनला निघाले!
मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे: अशीच अंबाबाईचे दर्शनाला न्यूयॉर्क वारी नवरात्रीत लवकरच होऊ दे!

पुढच्या वर्षी २०१८ मध्ये बातमी असेल:
"विठ्ठलाची पूजा कशी करावी?" यासाठी पुण्याच्या सर्व नगरसेवकांचा लंडनला अभ्यास दौरा!

पुढच्या वर्षी २०१९ मध्ये बातमी असेल:
महाराष्ट्र सरकारची श्रावणबाळ योजना: सर्व जिल्हापरिषद सदस्यांना आईवडिलांना घेऊन लंडनचा दौरा कम्पलसरी!

बघा एक निर्णय सरकारला किती फायदा देऊन जातो ते!
(साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है ह्या धर्तीवर)

आपला मिपास्नेही : आयुर्हीत

या (व अश्या इतर) काथ्याकुटात सहभागी झालेले बरेचसे आयडी कधी न बघितलेले का असतात?

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

16 Jan 2014 - 10:55 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

या (व अश्या इतर) काथ्याकुटात सहभागी झालेले बरेचसे आयडी कधी न बघितलेले का असतात?

आजकाल स्पष्टवक्ते आणि परखड बोलणारे लोक फारच कमी झालेत ,कारण स्पष्ट बोललेलं लोकांना आवडत नाही.

थोडे विषयांतर - किती तऱ्हेचे पारंपारिक सेवाधारी पंढरपुरच्या मंदिरात असतात.
काट्यावलंबित मूर्ती(कटेवर हात ठेवलेली पांडुरंगाची) आहे. विठ्ठल मुर्तीच्या सेवाधाऱ्यांची परंपरा
१. पुजारी (बडवे) - पुजाविधी करणे , २. बेणारे - पुजेसमयी मंत्र म्हणणारे, ३. पारिचारक - पाणी आणून आरती देणे, ४. हरिदास - भगवंताचे गुणगान करणे, ५. डांगे - चोपदार, ६. दिवटे- दिवटी घेऊन आरती प्रसंगी गाभाऱ्यात कमानीजवळ उभे राहणारे, ७. डिंगरे- श्री विठ्ठलाला आरसा दाखवणारे व शेजारती वेळी शेजघरापर्यंत पायघड्या घालणारे.

पाडुरंगाचे मुख्य पुजारी बडवे घराण्यातील. रुक्मिणीचे पुजारी ते सुदेव ब्राह्मण वंशातील. त्यातील एकानी एका दरोडेखोराला मारून त्याच्या त्रासातून पंढरपुरकरांना मुक्त केले. चोराला शिक्षा करणाऱ्याचा उत्पात केला म्हणून त्यांचे उपनाव उत्पात पडले. संदर्भ ग्रंथ - आपली संस्कृती.

प्यारे१'s picture

17 Jan 2014 - 3:30 am | प्यारे१

अतिअवांतरः
>>>शशिकांत ओक - थोडे विषयांतर- किती तऱ्हेचे पारंपारिक सेवाधारी पंढरपुरच्या मंदिरात असतात.
खरंय! ना डीना ही! ;)
आणि माहितीबद्दल खरोखरीच्च आभार!

धाग्याबद्दल अवांतर :
सोत्रिंच्या 'आर्थिक' मताशी सहमत आहोत.
बाकी एक साधंसं शांत देऊळ घ्यावं. त्यात आराध्याची दोन-अडीच फुटी रेखीव देखणी मूर्ती असावी. शांतपणं पूजा अर्चना करता यावी, देवाची साग्रसंगीत पूजा, अभिषेक, नैवेद्य, दर्शन असं घेता यावं.
बाकी गर्दीच्या देवस्थानांना जाणं झालंच तर 'वार', उत्सव इ.इ. दिवस चुकवून मगच बर्‍यापैकी आरामात कधीही दर्शन घ्यावं.

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Jan 2014 - 10:24 am | llपुण्याचे पेशवेll

बाकी एक साधंसं शांत देऊळ घ्यावं. त्यात आराध्याची दोन-अडीच फुटी रेखीव देखणी मूर्ती असावी. शांतपणं पूजा अर्चना करता यावी, देवाची साग्रसंगीत पूजा, अभिषेक, नैवेद्य, दर्शन असं घेता यावं.
यासाठी खाजगी देवस्थान स्वतःच्या पैशानं काढणं यासारखा उत्तम उपाय नाही. तरीही असे आहे की खाजगी देवस्थानात लोकांना दर्शनाला यायचे असते ते ही त्या मालकाचे नियम न पाळून. खाजगी देवस्थान जर लोकांना पावणारे झाले तर त्याचेही सार्वजनिकीकरण करायला कज्जे दाखल होतात, आणि त्या पुढे हे अर्थकारणवालेच असतात. झालंच तर देवाचे तोंडही न पाहणारे नास्तिक आणि स्वतःला बुद्धीवादी आणि संतुलित म्हणवणारे, समाजसुधारक म्हणवण्यासाठी अशा खटल्यांना सहाय्य पुरवतात. असो.

बाकी गर्दीच्या देवस्थानांना जाणं झालंच तर 'वार', उत्सव इ.इ. दिवस चुकवून मगच बर्‍यापैकी आरामात कधीही दर्शन घ्यावं.
हे बाकी खरं बोललास बघ. आणि मुळातच पापे कमी केली तर भितीपोटी देवदर्शनाची वेळ कमी येते.

चावटमेला's picture

17 Jan 2014 - 9:25 am | चावटमेला

बडवे हे पुजारी नव्हेत. इन फॅक्ट, बडवे सेवाधार्‍यांपैकी सुध्दा नाहीत. पुजारी वेगळे आणि बडवे वेगळे. जुन्या काळात कधी तरी विठ्ठ्लाचे धुणे बडवायला कर्नाटकातील देव निंबर्गी गावातून चार भाऊ तत्कालीन मंदिर विश्वस्ताने आणले होते. कालांतराने त्यांनी विश्वस्ताचा विश्वास संपादन करून हळूहळू मंदिराचा कारभार हातात घेतला. ह्या विश्वस्ताला काही मूलबाळ नव्हते, त्यामुळे त्याच्यानंतर बडवेच डि-फॅक्टो मॅनेजर झाले. धुणे बडवायला आले ते 'बडवे' हे नांव तसेच चालू राहिले. पांडुरंगाच्या पूजेचा हक्क मात्र त्यांना नाही. असो, अवांतर लै झाले, बाकी चालू द्या

प्रचेतस's picture

17 Jan 2014 - 12:58 pm | प्रचेतस

बडवा म्हणजे सेवक.
पंढररपूरच्या इस. १२७३-१२७७ (शके ११९५-९९) दरम्यान लिहिल्या गेलेल्या चौर्‍यांऐशीच्या शिलालेखात बडव्यांचा उल्लेख आहे. प्रस्तुत शिलालेख विठ्ठलमंदिर स्थापन होऊन ८४ वर्षे झाल्याचे सुचित करतो.

श्रीविठलाचा फूलबडुआ दामोधरे द | द्रा १० दे फु

ह्याचा अर्थ श्री विठ्ठलाला फळ अर्पण करणारा दामोधर नावाचा सेवक.

अवांतरः विठ्ठ्लमंदिराच्या इथे अजून एक शिलालेख उपलब्ध झाला. त्यात विठ्ठलमूर्तीच्या योगक्षेमासाठी दान दिल्याचा उल्लेख आहे व हा दानाचा धर्म जो पाळणार नाही म्हणजे जो अपहार करील तो पापी (मळकू) अशी शापवाणी दिलेली आहे. आणि हे दान जो पाळील ते विठ्ठलदेवाचे भाग्यवान क्षेत्रपती असा उल्लेखही आहे.

हा धर्मु जो नाणि लोपि तो मळकु | पालि ते विठलदेवा खेत्रपति सदैवु |

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jan 2014 - 1:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

फळ की फूल ?

येथे फुल हा शब्द जरी आलाय तरी तो फळ अर्थानेच आहे. फुलांना पुष्प अशा अर्थी शब्द आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jan 2014 - 1:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

असं आहे होय !

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jan 2014 - 1:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

असं आहे होय !

अनिरुद्ध प's picture

17 Jan 2014 - 12:08 pm | अनिरुद्ध प

माहिती साठी धन्यवाद्,पहिल्यान्दा एव्हडी विगतवार माहिती मिळाली.

माहितगार's picture

17 Jan 2014 - 8:30 am | माहितगार

दैनिक सकाळ मध्ये विठू मोकळा मोकळा... (अग्रलेख दैनिक सकाळ) आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या संकेतस्थळावर निकालाची लिंक शोधत होतो पण काल मिळाली नाही.

*THE PANDHARPUR TEMPLES ACT. 1973 -(इंग्रजी)

*THE PANDHARPUR TEMPLES ACT. 1973 (मराठी)

THE PANDHARPUR TEMPLES ACT. 1973 चा दुवा दिला आहे पण वाचताना एकुण अ‍ॅक्ट मध्ये अ‍ॅप्लिकेशन ऑफ माईंड ची कमतरता वाटली.बहुसंख्य देवस्थानांमध्ये देवमुर्ती हिच पर्सन समजून तिच्या नावे कारभार केला जातो पंढरपूरच्या बाबतीत असे नाही का ? आणि नसेल तर का हे उमजले नाही.

प्रॉपर ट्रस्ट स्थापन करवून त्यात परंपरागत बडवे वारकरी किर्तनकार यांचे प्रतिनिधी संस्कृत विषयातील महाराष्ट्रातील त़़ज्ञ या सर्वांना व्यवस्थित संधी असा फॉर्मॅट का नसावा. एवढी संस्कृत विद्यापिठे भारतभर आहेत त्यातून टेंपल अ‍ॅडमिनीस्टृएशनचे कोर्स घेऊन मग त्यातील लोकांना अ‍ॅडमिनीस्ट्रेशन मध्ये घ्यायचे ते सोडून रिटायर्ड सरकारी आधिकार्‍यांना एक्झीकटीव्ह ऑफीसर म्हणून सरकार नेमणार आणि त्याचा पगार सरकारी खर्चातन त्यातून सकारच्या सेक्यूलर प्रतिमेवर हकनाक बोट ठेवले जाणार सोबत मिसमॅनेजमेंटची जबाबदारीही सरकारवर. सरकारी कायद्यास नेमक कुठे थांबायच हे समजण अपेक्षित असावयास पाहीजे होत अस वाटल.

माहितगार's picture

17 Jan 2014 - 8:40 am | माहितगार

लोक्सत्ता संपादकीय अधिक माहितीपुर्ण आणि समतोल वाटते

प्रसाद गोडबोले's picture

17 Jan 2014 - 11:23 am | प्रसाद गोडबोले

दोन्ही अग्रलेख वाचले .

एकाही अग्रलेखात "सरकार इतर धर्मियांच्या प्रार्थना स्थळांविषयी असा निर्णय घेणार का ?" ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही .

बाकी विठोबा बडवे उत्पातांच्या तुरुंगातुन सुटला हे चांगलेच झाले , शंकाच नाही , पण तो सरकारच्या , तेही असल्या "धर्मनिरपेक्ष" सरकारच्या हातात गेला हे लय वाईट झाले ...आता बघुया पुढे काय होते ते :(

अवघड आहे .

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

17 Jan 2014 - 11:11 am | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

हे पुजारी लोक दक्षिणेसाठी वारकर्यांना जाच करायचे त्यातूनच हे प्रकरण वाढल्याचे लोकसत्ताच्या लेखात म्हण्टले आहे, सरकारीकरणाने भक्तांचा जाच कमी झाला असेही त्यात नमूद केले आहे.

पुजारी लोक दक्षिणेसाठी जाच करत असतील तर ते चुकीचे आहे.

माहितगार's picture

17 Jan 2014 - 1:11 pm | माहितगार

गूडनेस मी घेतलेला अनुभव फक्त माझ्या एकट्याचा नव्हता तर हे आता लक्षात येतय.मी माझा पंढरपुर मंदिरातला अनुभव जरासा वर दिलाच आहे.प्रवासात बसस्टँड रेल्वेस्टेशनवर बुट पॉलीश वाल्यावर एखाद्या कष्ट करणार्‍याला दुप्पट चौपट पैसे देण्याचा माझा स्वभाव मंदिरात मागच्या खिशात जेवढे सुटे असतील ते दक्षिणा पेटीत कधी मधी घरच्यांची मर्जी राखण्याकरता एखाद्या मंदिरात अभिषेकाच्या यादीतील सर्वात कमीत कमी खर्च येणारा जो कोणता अभिषेक असेल तो.

प्रसंग पूर्ण आठवत नाही पण माझ्या त्या एकदिवसाच्या पंढरपुर भेटीत सोलापूरहून एटीएम वरन २०००/- (५०० च्या चार नोटा) वर एस्टीकरता शंभर एक रूपये सुटे नेलेले.मंदिरात मुर्ती समोर पोहोचताच पुजार्‍याने देवाच्या गळ्यातली फुलांची माळ माझ्या गळ्यात टाकली अर्थात त्याने काही हुरळून गेलो नाही पण जरा अचंबित झालो होतो तेवढ्या गर्दीतही दोन पायावर बाजूस उभेटाकता येण्या साठी जागा आणि दोन हात जोडून नमस्कार करण्याकरता काही क्षण म्हटल्यावर नाही म्हटल तरी सुखावलो होतो. मग पुजार्‍यांनी देवापुढे दक्षिणा ठेवण्याची विनंती केली मी मागच्या खिशातले सुटे ठेवले. 'इथ पर्यंत आलाय आणि एवढेच ?' मी पन्नासची नोट ठेवली कमीतकमी ५००तर ठेवा म्हणाला. म्हटले देवाची इच्छा असेल मागणार्‍याला नाही का म्हणायचे देव देईल मागाहून म्हणून ५०० देवा पुढे ठेवले तेवढीच अंमाऊंट अजून कशाची तरी असते ती ठेवा म्हणाले ठिक आहे तीही ठेवली.मला वाटले झाले आता. कसचे काय म्हणाले 'आमची दक्षिणा' खिशात विसची नोट होती ती काढून दिली नाही घेत म्हणाले जेवढे देवाच्या पायावर ठेवले तेवढे हवेत एकदा नाही म्हटले तर चेहरा फारच पाडला म्हणून एक पाचशेची एक नोट त्यांच्या हातात का थाळीत ठेवली तर घेत नाही म्हणाले देवापुढे ठेवले त्या पेक्षा कमी आहेत आणि आता चक्क लोचटपणा होता धुडकावून देऊन निघू शकलो असतो का कोण जाणे लोचटपणा जाणवूनही मन मोडवले नाही म्हटले असेल देवाचीच इच्छा म्हणून जवळचे उरले सुरले ५००ही दिले . मंदिरा बाहेर पडलो तेव्हा जेवण्यासाठी वापस जाण्या साठी पैसे नव्हते. एटीएम शोधल तर माझ्या बँकेच एटीएम पंढरपुरात नाही हे लक्षात आल.तरी बरीगत सोलापुरात माझा डिस्ट्रीब्यूटर होता पंढरपुरात डायरेक्ट ओळख नसली तरी रिटेल नेटवर्क होतच पण डिस्ट्रीब्युटरला फोन लावण्याकरता सुटेही नव्हते कारण ते तर प्रथम संपवले होते.एका अनोलखी रिटेलरकडे गेलो कंपनीच व्हिजीटींग कार्ड ठेवल आणि डिस्ट्रीब्युटरशी फोनवर बोलून घडला प्रकार सांगितला रिटेलरनेही तो ऐकला डिस्ट्रीब्युटर आणि रिटेलर आपापसात बोलले आणि माझी सोलापूरला वापस येण्याची व्यवस्था झाली.मी मनातली वेदना काढून टाकून हे सर्व घडण्याची इश्वराचीच इच्छा असावी म्हणून सोडून दिल.पण माझ्या पेक्षा अती सामान्य माणस कोठून कोठली ओळख आणणार ?

माहितगार's picture

17 Jan 2014 - 1:42 pm | माहितगार

सरकारी कायद्यांनी आमच्या धर्मात हस्तक्षेप का करावा वगैरे बरोबर आहे.या धाग्या करता मी शोध घेतला तर ERADICATION OF UNFAIR ACTIVITIES AT PANDHARPUR TEMPLES असा काही शासनाने कायदाही केलेला आज दिसला.मी अनुभव घेतला त्या दिवशी मला हा कायदा माहित नव्हता माहित असता तरीही बहुधा वापरला नसता.या पेक्षा नाडला गेलेला माणूस या पेक्षा नको तो पुजारी नको ते दर्शन आणि कदाचित नको तो धर्म म्हणेल.हे सर्व असून सुद्धा या अपप्रवृत्तींकडे दुर्लक्ष करत आमचे कोट्यावधी बंधू आपल्या श्रद्धा जशास तशा जपत जातात तेव्हा त्यांच्या श्रद्धेला सलाम करावा का अंधश्रद्धांना विरोध करणारे बरोबर म्हणून त्यांच्या मंडपात जावे ? पुजारी भरकटतील पण त्यातील अनिष्ठ प्रवृत्तींना चाप लावण्याची समज देण्याची पहिली जबाबदारी धार्मिक क्षेत्रातील वरीष्ठांची असू नये का ? लोक तक्रार करत होते मग केव्हा तरी ७३ मध्ये कायदा आला पण कोर्टातील केसमुळे पुर्ण अंमलबजावणी होऊ शकली नाही तरीही लुबाडणूक चालू होती म्हणून का काय १९८० मध्ये कायदा आणला. मला भक्त असून कायदा माहित नसेल १९८० नंतर वीस वर्षांनी मी तोच अनुभव घेत होतो म्हणजे कायद्याची त्यांनी काहिही भीड ठेवलेली नव्हती.जनाची नसेल कायद्याची नसेल मनाची तरी काही हवी का नको दशकोंदशके स्वतःच्या वागण्यात काहीच परिवर्तन करत नाही ? प्रत्येकस्तरावर कोर्टात केसेस हरत होते (हि पहा सुप्रीम कोर्टाच्या निकालाची लिंक चु.भू.दे.घे. पण त्या आधिचा बाँबेकोर्टाचा निकाल ऑनलाईन शोधून सापडला नाही ) तरीही स्वभावात फरक पडत नव्हता काय म्हणावे याला ?

तरीही शेवटी हेच म्हणेन कि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तरीही संमजस पणा येवो. आणि कायदेही समंजस होवोत. धागाचर्चांमध्ये आपण आपल मन मोकळ करण्या पलिकडे काही करू शकत नाही.

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

17 Jan 2014 - 2:18 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

माहितगार ,अत्यंत विलक्षण असा तूमचा अनुभव आहे, दोन हजार रुपये यांनी उकळले आणि तूमी दिले कसे?
आपल्या कुटुंबासाठी मुलाबाळांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी देवाच्या दारात आगतीक होणार्या, लीन होणार्या भक्ताला त्याच्या भोळेपणाचा फायदा घेऊन असे लुबाडणे याला 'सांस्कृतीक दरोडेखोरी' म्हणावे काय ?

पुजारी बनण्यासाठी स्पर्धा परीक्षा ठेवल्या तर मंदिराला चांगले पुजारी मिळू शकतील का?

माहितगार's picture

17 Jan 2014 - 4:02 pm | माहितगार

शक्य होण्यास हरकत नसावी.मला वाटते काही राज्यात तशी पद्धतही आहे.

तर मिपाला चांगले विचारी तरी मिळू शकतील?

उगा डोक्याला ताप च्यायला.....

माहितगार's picture

17 Jan 2014 - 3:55 pm | माहितगार

>>दोन हजार रुपये यांनी उकळले आणि तूमी दिले कसे?>> दान करणे स्वभावात आहेच पण ते श्रमीकांना करतो.२००० मोठी गोष्ट नव्हती मंदिरांमध्ये मोठे दान त्या आधी आणि नंतर कधी केले नाही त्या मुळे हिशेब बरोबर झाला असेल.झालेल्या गोष्टीत भोळेपणा पेक्षाही समोरची व्यक्ती चुक असली तरी लगेच अपमानीत करावेसे वाटत नाही.माणूस त्याही लोकांना पैसा लागतोच तीही स्खलनशील माणसेच आहेत म्हणून सोडून देतो.सुशिक्षीत होतो अडाणी नव्हतो.२००० देऊन देवा कडून २०००० मिळवायचे आहेत असाही हिशेब मनाशी नव्हता तरीही दिले खरे मटाचा आजचा आग्रलेखही याच विषयावर आहे.

मटा अग्रलेखात म्हणते विठ्ठलाच्या डाव्या-उजव्या पायाशी किंवा रखुमाईच्या चरणाशी उभे राहून सक्तवसुली, दंडेली चालूच होती. 'मुघल-मराठी-ब्रिटिश या तीनही सत्तांनी आम्हाला कधी धक्का लावला नव्हता,' अशी मिजास आता काहींनी मिरविणे ही निव्वळ मध्ययुगीन मनोवृत्ती झाली. तिला देश-कालभान तर नाहीच, पण ज्ञानदेवांपासूनच्या भक्तिपरंपरेचा प्रवासही कळत नाही. हा प्रवास गाडगेबाबांच्या झाडूतून, विनोबांच्या भूदानातून, तुकडोजींच्या ग्रामगीतेतून आणि साने गुरुजींच्या उपवासातून पुढे गेला आहे. विठ्ठलासारखा लोकदेव लोकत्रयी नाही. तो असा कैदेत पडणे, हा मराठ्यांच्या रसरशीत भक्तीचा अपमान होता. तो धुऊन निघाला. आता जबाबदारी सरकारची व भक्तांची आहे. पंढरी म्हणजे भूलोकीचे वैकुंठ. ते पवित्र आहेच. त्याच्या पावित्र्याला यापुढे सर्वांगीण स्वच्छतेची साथ हवी. पावित्र्य आणि ऐहिक नागर मूल्ये यांच्यात द्वैत नसते, हे दाखवून द्यावे लागेल. सुवर्णमंदिर किंवा कोलकात्याचे रामकृष्ण मिशन हेही पवित्र आहेत. मात्र, तिथले पावित्र्य स्वच्छतेने, विनम्र सेवाभावाने आणि कृतिशील भक्तीने उजळून निघते. पंढरी तशी व्हावयास हवी. चंद्रभागेच्या स्नानाचे पुण्य आहेच; या पुण्याला निर्मळ परिसराचेही कोंदण हवे. इतके दिवस, सरकारी मंदिर समिती आहे, पण विठोबा त्यांच्या ताब्यात आहे, अशी कुरकूर असे. ते निमित्त आता संपले. यापुढे, सर्वांची साथ घेऊन पंढरीचा कायापालट व्हावा. इथली सद्दी, चांदी करण्यासाठी नाही, एवढी बुद्धी विठुरायाने सर्वांना दिली तर वारकरी भरून पावतील.

संदर्भ मटा अग्रलेख Jan 17, 2014

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Jan 2014 - 11:18 am | llपुण्याचे पेशवेll

हो. या भूलोकीच्या वैकुंठातच वारीनंतर गटारे वापरून टाकलेल्या निरोधांमुळे तुंबल्याची वार्ता होती. (आता लिंक सापडत नाही. पण अन्य स्थळावर यावेळे वारकर्‍यांची तळी उचलल्याचे आठवते) "मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास" असे वारकरी फक्त १०-२० टक्के असतील बाकी आपले परंपरेने सज्जन आणि पापभिरु म्हणायचे.
असो.

कुठल्याही मंदिरात जो पैसा येतो तो सर्व सामान्य जनतेचा असतो. ह्या पैसा सरकारात जमा झाला तर मंदिरासाठी लागणारा खर्च वगळता इतर पैसा हा विकासकामासाठी वापरता येवू शकतो.

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

17 Jan 2014 - 12:19 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

सहमत

काय्च्या काय (न्हेमीपरमानं) ! उलट अन्भ्व असा हाय की पुधारी आप्ली पिलावळ अश्या जागात बसवतान नी मलाई खातान. विकासकाम करायच अस्त तर टॅक्साचा पैका कायाला स्कॅमा आनि भ्रश्टाचारामादी खाल्ला अस्ता सर्कारच्या मन्त्र्यासन्त्र्यान्नी. आता हे न्विन कुरण झालं, नायका? आता स्कॅमातून थोडा उरलासुरला (ल्येफ्ट ओवर का का ते) भाटमंडलींच्या बी पुढ्यात पडतया म्हना, नाय्का?

प्रसाद गोडबोले's picture

17 Jan 2014 - 2:12 pm | प्रसाद गोडबोले

सचिनराव , गेले काही दिवस तुमची बॅटिंग बघतो आहे ...तरीही केवळ न राहवल्याने ... आता इथे केवळ उत्सुकतेपोटी एक प्रश्न विचारत आहे

हज यात्रेवर होणार्‍या सरकारी खर्चाविषयी आपले काय मत आहे ? तो पैसा कोणाचा असतो ? आणि हाच पैसा सरकार जमा केला तर मुस्लिम समाजातील अशिक्षितता , बेकारी , गरीबी वगैरे विषयक विकासकामांकरीता वापरता येईल का ?

आणि ह्याला तुम्ही जे काही उत्तर द्याल ते किती आयडीलिस्टीक आणि किती प्रॅक्टीकल आहे ?

मंदार दिलीप जोशी's picture

17 Jan 2014 - 2:15 pm | मंदार दिलीप जोशी

मलाही हाच प्रश्न पडला आहे. सचीनराव उत्तराच्या प्रतीक्षेत.

हज यात्रेची तर अजूनच मजा आहे. हजला जायचे तर स्वतःच्या कमाईच्या पैशातून जायचे असे इस्लाम सांगतो.

तस्मात हज सबसिडी इटसेल्फ इज गैरइस्लामी. पण सोयीचे असल्याने इथे तेरी भी चूप मेरी भी चूप असा प्रकार आहे.

मंदार दिलीप जोशी's picture

17 Jan 2014 - 2:18 pm | मंदार दिलीप जोशी

आणि गंमत म्हणजे एअर इंडियातूनच जायची सक्ती आहे. त्यामुळे तेही लोक वैतागलेत म्हणे.

उद्दाम's picture

18 Jan 2014 - 9:18 am | उद्दाम

एअर इंडीयाला चार पैसे सुटावे म्हणुन हज सबसीडीचा फास रचण्यात आला. त्यामागचं लॉजीक आठवत नाहि, पण हज सबसीडीचा पैसा स्वस्त हवाई सेवा देण्याच्या बहाण्याने एअर इंडीयाच्या खिश्यात जातो असं काहिसं गणीत होतं.

बॅटमॅन's picture

17 Jan 2014 - 2:36 pm | बॅटमॅन

शक्यता नाकारता येत नाही. पाहिले पाहिजे.

प्रदीप's picture

19 Jan 2014 - 11:56 am | प्रदीप

वस्तुस्थिती ह्याउलट आहे. सरकारी उपक्रमासाठी एयर इंडियास राबवण्यात येते, आणि तेही घाट्याच्या व्यवहारात! सौदीबरोबरील करारानुसार, एयर इंडियाची जी विमाने हज्ज यात्रेकरूंना भारतातून तिथे नेतात, त्यांना उलट प्रवासासाठी प्रवासी घेण्याची मुभा नाही, तेव्हा ती तशीच रिकामी परत येतात!

ह्याविषयीच्या 'ऐसी' वरील एका चर्चेत ह्याचा उहापोह झाला होता. तिथे सविस्तर वाचावे.

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2014 - 2:27 pm | श्रीगुरुजी

>>> सौदीबरोबरील करारानुसार, एयर इंडियाची जी विमाने हज्ज यात्रेकरूंना भारतातून तिथे नेतात, त्यांना उलट प्रवासासाठी प्रवासी घेण्याची मुभा नाही, तेव्हा ती तशीच रिकामी परत येतात!

बापरे! म्हणजे दुहेरी तोटा!! हे नादान काँग्रेसवाले मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करून देशाला अजून किती खड्ड्यात घालणार आहेत? काँग्रेस अधिवेशनात बाह्या सरसावत काहीतरी असंबद्ध बरळणारे राजपुत्र या विषयावर का मौन पाळतात?

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

17 Jan 2014 - 2:31 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

बहुतांश मुस्लिम बांधव हज सबसिडी घेत नाहीत..
व्याज खाणे हे देखिल पवित्र कुराणाने वर्ज्य सांगितले आहे, त्यामुळे बहुतांश मुस्लिम बांधव व्याज बँकेला परत करतात असे मी पाहिले आहे.

प्रसाद गोडबोले's picture

17 Jan 2014 - 2:34 pm | प्रसाद गोडबोले

बहुतांश नको , टक्केवारी द्या !

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

17 Jan 2014 - 2:39 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

९९ टक्के मुस्लिम बांधव हज सबसिडी घेत नाहीत ,स्वखर्चाने जातात.

गब्रिएल's picture

17 Jan 2014 - 2:58 pm | गब्रिएल

टॉपगिअर्ड फिलोसॉफर ची १००% टॉपगिअर्ड थाप !

हर देशाला हजसाठी किती इसम पाटव्वयचे त्याचा कोटा असतोया. भारताचा कोटा हज कमिटी ओफ इंडियातर्फे भरला जातो पिलोसोपरसाब आणि सर्कारी खर्च त्या कमिटीच्या सहमतिने क्येला जातो. आत्त ती मदन न घेनारे किती जास्त आन् न घ्येनारे किती थ्योडे त्ये हितं बगा

बगा क्येला ना कचरा विंटरनेटनं तुम्च्या फेलोफिला नुट्रल्गियर मद्दी टाकून ... ही ही ही ही ही ही ही ही ही ही ही ही ही

मंदार दिलीप जोशी's picture

17 Jan 2014 - 3:06 pm | मंदार दिलीप जोशी

:D

प्रसाद गोडबोले's picture

17 Jan 2014 - 3:20 pm | प्रसाद गोडबोले

टॉपगिअर्ड फिलोसॉफर - Fri, 17/01/2014 - 14:39
९९ टक्के मुस्लिम बांधव हज सबसिडी घेत नाहीत ,स्वखर्चाने जातात.

ओके .

http://en.wikipedia.org/wiki/Haj_subsidy इथे मिळालेल्या माहीती नुसार २०११ साली १२५,०५१ इतके लोक सबसीडी घेवुन हज ला गेले , तुमच्या मते हे केवळ १% आहेत , अर्थात २०११ साली भारतातुन हज ला गेलेल्यांची संख्या १,२५,०५,१०० ( अक्षरी : एक कोटी पंचवीस लाख पाच हजार शंभर फक्त ) इतकी आहे तर !!

ओके .
__________________________________________________________
इथे आपली चर्चा संपते !

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

17 Jan 2014 - 3:22 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

त्या एकलाख मुस्लिम बांधवांनी ते पैसे परत केले होते असे वाचलेले.

कुठे ते बोला नाहीतर ही तुमची मुक्ताफळे आहेत असेच समजावे लागेल.

एकतर आधी अनरिअलिस्टिक विधाने करायची अन खोपच्यात सापडले की विधाने बदलायची हे नेहमीचं आहे नाही का मोपेड फिलॉसॉफर?

प्रसाद गोडबोले's picture

17 Jan 2014 - 3:31 pm | प्रसाद गोडबोले

कुठे वाचले होते ?

कारण २००९ साली झाला इतकाच खर्च २०११ साली झाला असे गृहीत धरले तरी तो खर्च INR 8647.7 million
(अक्ष्ररी : जाऊनद्या आता तुमचं तुम्हीच वाचा ) http://en.wikipedia.org/wiki/Haj_subsidy

असे मलातरी कोणत्याही पेप्रात वाचायला मिळाले नाहीये , असे काही झाले असते तर किमान "द हिंदु " ने तरी नक्कीच छापले असते .

आता तुम्ही कुठे छापुन आले होते ते शेयर कराच

(तुमचे लॉजिक लक्षात आल्याने चर्चा संपली असे म्हणालो होतो , पण तुम्ही असा फुल्ल टॉस्स ताकल्यावर परत बॅटींगला यायची खुमखुमी आली . असो . आता मात्र चर्चा खरचं संपली .)

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

17 Jan 2014 - 3:43 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

पवित्र कुराणाच्या नियमाने वागणारा मुस्लिम बांधव त्याच्या धर्माचरणाची बातमी करण्याच्या फंदात पडत नाही ,ते निस्वार्थीपणे हजचे पैसे परत करतात. पैसे परत केल्याची बातमी मी एका वर्तमानपत्रात वाचली होती ,आता त्याची लिँक सापडत नाहीए.

म्हणजे सांगोवांगी अन वडाला वांगी. तुमचा गिअर मोडून पडला आहे ,पेट्रोल तर कधीचेच संपले होते.

अर्धवटराव's picture

17 Jan 2014 - 3:51 pm | अर्धवटराव

सब्सीडी एकदर्शी असते, ति आल्या चॅनलने परत करता येत नाहि हा संदर्भ गटण्या विसरला.

बॅटमॅन's picture

17 Jan 2014 - 4:01 pm | बॅटमॅन

यग्जाक्टलि.

प्रसाद गोडबोले's picture

17 Jan 2014 - 3:49 pm | प्रसाद गोडबोले

असे फुल्ल टॉस्स टाकु नका हो =))
..... काम करु द्या , मी इन्कमटॅक्स भरला नाही तर सबसीडीला पैसे कमी पडतील =))

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2014 - 7:54 pm | श्रीगुरुजी

>>> पवित्र कुराणाच्या नियमाने वागणारा मुस्लिम बांधव त्याच्या धर्माचरणाची बातमी करण्याच्या फंदात पडत नाही

पण धर्माचरणासाठी लाऊडस्पीकरवरून आवाज देतात त्याचं काय?

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

19 Jan 2014 - 10:14 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

गणपती नवरात्र गरबा दिवाळीतले फटाके याबाबत मुस्लिम बांधवांनी णिषेध केला तर चालेल काय आपल्याला?तसेच आपणही त्यांना समजून घ्यावे...

मुक्त विहारि's picture

19 Jan 2014 - 10:57 pm | मुक्त विहारि

आपले विचार किती सुंदर आहेत...

बाय द वे...

एक विचारायचे होते...

पण नकोच राहू दे...

गब्रिएल's picture

17 Jan 2014 - 10:04 pm | गब्रिएल

टॉपगिअर्ड फिलोसॉफर ची १०००% टॉपगिअर्ड थाप ! वर्ची लिंक वाच्ली नायका??? इनोदबी लैच झ्याक जमतया. का सप्नात कायबाय वाचून फकस्त डोस्क्यात आल्या त्या पूड्या सोडन्याला फिलोसोफि म्हंतात आसं वाटत तुमाला ?

विद्युत् बालक's picture

17 Jan 2014 - 10:21 pm | विद्युत् बालक

फिल्लोसफ़र राव तुमचा "गिअर" तपासून पहा !

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2014 - 7:52 pm | श्रीगुरुजी

>>> त्या एकलाख मुस्लिम बांधवांनी ते पैसे परत केले होते असे वाचलेले.

हे काँग्रेसच्या समाचारपत्रात वाचलेलं दिसतंय.

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2014 - 7:50 pm | श्रीगुरुजी

सहमत. विमान तिकिटाची जी काय नॉमिनल किंमत असेल ती मुस्लिम स्वतःच्या खिशातूनच देतात. त्यांना सबसिडीचा एक रूपयासुद्धा हातात मिळत नाही.

इस्लामिक फायनान्सबद्दल भलतेच अज्ञान दिसते..कुणा मुसलमानाचे स्टेट बँकेत समजा खाते असेल तर तो व्याज परत करेल ही शक्यता अतिशय म्हणजे अतिशय कमी आहे. असे एकही उदाहरण माझ्या पाहण्यात नाही.

पण अलीकडे इस्लामिक बँकिंग नावाचा प्रकार रूढ होऊ पाहतोय ज्यात व्याज इ.इ. ब्यान आहे.

साहजिकच प्रश्न उपस्थित होतो की मग बँकव्यवसाय चालणार कसा? कारण व्याज आकारणी हा तर ब्यांकेचा आत्मा आहे.

तर त्याचे उत्तर असे की व्याजाच्या नावाखाली नेहमी जे काही घेतले जाते ते अन्य मार्गांनी आणि वेगळ्या लेबलखाली घेतले जाते. थोडक्यात हिशेब एकच. धर्म काही सांगो, अर्थस्य पुरुषो दासः हे आणि हेच खरे आहे.

व्याजाच्या नावाखाली नेहमी जे काही घेतले जाते ते अन्य मार्गांनी आणि वेगळ्या लेबलखाली घेतले जाते. थोडक्यात हिशेब एकच. धर्म काही सांगो, अर्थस्य पुरुषो दासः हे आणि हेच खरे आहे.

अगदी हेच्च लिहायला आलो होतो.

बर्‍याच इस्लामिक ब्यांका स्विस रेसिडेंट असतात**, कारण काही विशिष्ट कँटन (स्विस जिल्हे) त्यांना चिक्कार करसवलती देतात. इस्लाममध्ये "कर चुकवू नये" वगैरे काहीतरी असतं. त्याचं काय करतात कोण जाणे!

** "त्या" स्विस ब्यांका या नव्हेत

अच्छा, हे ठौक नव्हते. स्विस लोक बाकी खतरनाक बेरकी दिसतात एकदम. :)

मंदार दिलीप जोशी's picture

17 Jan 2014 - 3:05 pm | मंदार दिलीप जोशी

त्यामुळे बहुतांश मुस्लिम बांधव व्याज बँकेला परत करतात असे मी पाहिले आहे.>>

साफ खोटे आहे. पुराव्या द्या.

मुद्दलाच्या दुप्पट व्याज मिळवायचा धंदा पठाण लोक करायचे. ते मुस्लिमच होते ना ब्वा?

पैसा's picture

19 Jan 2014 - 9:54 am | पैसा

मी एका बँकेत २ राज्ये आणि ५ शाखा, एक अ‍ॅडमिनि. ऑफिस एवढ्या जागी २५ वर्षे सर्व्हिस केली. एकाही मुस्लिमाने कधी व्याज परत दिलेले पाहिले नाही. उलट रत्नागिरीत एन आर आय ठेवी मोठ्या प्रमाणात मुस्लिम खातेदारांकडून येत असत. आणि ठेव रिन्यू करताना काही नियमांमुळे मधल्या कालासाठी कमी व्याज दिले तर आवर्जून विचारत असत. कोणीही खातेदारांनी जागरूक असणे चांगलेच, मला त्यात काही गैर वाटत नाही. तिथे धर्माचा काही संबंध येत नाही. पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे गेले तर इस्लामिक देशांमधे बँका कायम तोट्यात चालल्या पाहिजेत कारण व्याजाच्या फरकातून मुख्यतः बँक चालवण्यासाठी पैसे येतात. मध्यंतरी कोणीतरी आर्थिक संस्थेने खास इस्लामिक म्युच्युअल फंडही काढला होता. डिव्हिडंड मिळाल्याशिवाय म्युच्युअल फंड कसा काय चालवता येईल?

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

19 Jan 2014 - 10:10 am | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

ईस्लामिक देशात बँका फक्त सेव्हिंग अकांऊट चालवतात व नॉमिनल व्याज देतात, त्यांची भिस्त कर्जाच्या व्याजावर असावी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jan 2014 - 2:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

ईस्लामिक देशात बँका फक्त सेव्हिंग अकांऊट चालवतात व नॉमिनल व्याज देतात, त्यांची भिस्त कर्जाच्या व्याजावर असावी.

वरचे वाक्य पाहून इतकेच खात्रीने सांगू शकतो की तुमचे इस्लामिक बँकिंगचे अज्ञान अगाsssध आहे ! त्यातले तीनही दावे इस्लामच्या शिकवणीविरुद्ध आहेत !

तुम्ही फक्त काल्पनिक बेजबाबदार दावे करण्याऐवजी जरी थोडासा आंतरजाल अभ्यास केलात (पोत्याने माहिती आहे तेथे) तरी तुमच्या चर्चेला थोडातरी विश्वासूपणा यायला मदत होईल आणि मिपासारख्या सार्वजनिक चौकात तुम्ही जी आयडी घेतलीत तिच्या नावाची लज्जा थोsssडितरी वाचू शकेल. बाकी लोकांचे मनोरंजन हाच हेतू असल्यास... लगे रहो ;)

गब्रिएल's picture

19 Jan 2014 - 3:12 pm | गब्रिएल

हायला.

ही तर टॉपगियर्ड थाप जाली की व वंगाळशेट !

ह्येन्ला आवरा आता नायतर ह्ये असल इस्लामविरुद्द लिवलं म्हनुन त्येच्या नावं फतवा निगुन गियर मोडित निगायचा.

ल्येका, ल्येका, ल्येका, चारचौगात किति खोट ब्वोलून आपली इज्जत चौकात उघडि कराय्याची ? बाकी लोकबी कयबाय वाच्त्यात, त्येन्ला डोस्क अस्तया. त्येंच्यापुडं आप्ल रिकाम खोकं अस उगड नाय करायच प्वोरा. लोकं खो खो हसत्यात बाबा.

प्रदीप's picture

19 Jan 2014 - 12:05 pm | प्रदीप

वेगळे आहे, आणि आता ते जगातील बर्‍याच फायनॅन्स सेंटरांत मूळ धरू लागले आहे (प्रचंड प्रमाणात पैसा इस्लामी जगात, मध्यपूर्वेत उपलब्ध असल्याने, त्यांच्यामागे धावणे जगाला जरूरी आहे आता!)

ह्याच चर्चेत वर बॅटमॅन व आदूबाळ ह्यांनी ह्याविषयी माहिती दिलेली आहे ती पहावी. टॉफ्या खाऊ नयेत, प्रकृतिस अपायकारक असते :)

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2014 - 7:56 pm | श्रीगुरुजी

>>> बहुतांश मुस्लिम बांधव हज सबसिडी घेत नाहीत..
व्याज खाणे हे देखिल पवित्र कुराणाने वर्ज्य सांगितले आहे, त्यामुळे बहुतांश मुस्लिम बांधव व्याज बँकेला परत करतात असे मी पाहिले आहे.

जबरदस्त खोटे वाक्य!

कुठल्याही समाजाच्या सणांवर, धार्मिक गोष्टींवर थोडाफार खर्च केला सरकारने तर बिघडले कुठे? तसे तर सरकार कुंभमेळ्या वरतीही करोडो रुपये खर्च करते.

प्रसाद गोडबोले's picture

17 Jan 2014 - 2:29 pm | प्रसाद गोडबोले

अर्थात "पंढरपुरच्या मंदीरातुन कमाई करा आणि हज यात्रेला सबसीडी द्या " असंच तुम्हाला म्हणायचे आहे तर ?

पंढरपुरच्या मंदीरातुन कमाई करा नि कुंभ मेळ्यावर खर्च करा असेही होवू शकते

प्रसाद गोडबोले's picture

17 Jan 2014 - 3:14 pm | प्रसाद गोडबोले

मग ते करायला सरकार कशाला हवे ? मंदीर विहिंपच्या किंव्वा संघाच्या ताब्यात द्यायले हवे होते मग !

त्यापेक्षा बडवे परवडले

प्रसाद गोडबोले's picture

19 Jan 2014 - 10:49 pm | प्रसाद गोडबोले

म्हणुन तर आम्ही म्हणतोय की हा निर्णय चुकीचाच आहे ... हिंदुंची मंदीरे हिंदुंच्य्याच ताब्यात !!

अनिरुद्ध प's picture

17 Jan 2014 - 3:25 pm | अनिरुद्ध प

एक प्रष्ण आहे उत्तर मिळण्याची अपेक्षा सुद्धा आहे
कुम्भमेळा केव्हा असतो? ज्याच्या साठी सरकार आपल्या सांगण्यापमाणे ईतका खर्च करते,तसेच त्याचा विदा दिलात तर उत्तमच.

सागर वैद्य, एबीपी माझा,
Monday, 25 November 2013 16:16

नाशिकचा कुंभमेळा
नाशिक : नाशिकमध्ये होणऱ्या आगामी कुंभमेळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले यांनी विरोध केलाय. उत्तरप्रदेशातून चित्रविचित्र अवस्थेत येणाऱ्या आणि गांजा पिणाऱ्या साधूंवर दोन हजार कोटी खर्च करण्याऐवजी ते पैसे विधायक कामांवर खर्च करावे असंही संभाजीराजेंनी म्हटलंय..

मराठा आरक्षणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी काढण्यात आलेली शिवशाहू यात्रा घेऊन रविवारी रात्री संभाजीराजे नाशिकमध्ये आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना संभाजीराजेंनी 2015 साली नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याला विरोध केला.

उत्तर भारतातून येणाऱ्या तथाकथित व्यसनींवर पैसे वाया घालण्याऐवजी ते जनतेला उपयुक्त ठरतील अशा विधायक कामांवर खर्च करावे अशी मागणी संभाजीराजेंनी यावेळी केली....

एक शंका: भांडारकर संस्थेच्या नासधुशीला तुमचा पाठिंबा आहे ना?

पुरोगामी सरकारची बदनामी करणारे आंधळे मोदी भक्त कुठल्या थराला जाऊन खोटं बोलतील याचा नेम नाहि. तिकडे ते टॉपगियर पवित्र कुराणाचा संबंध मोठ्या चलाखीने आतंकवादाशी जोडुन राहिले... आणि इकडे हे... चालु द्या.

अनिरुद्ध प's picture

17 Jan 2014 - 4:06 pm | अनिरुद्ध प

कोर्टात साक्षीदार म्हणुन नाव काढणार तुम्ही,माझ्या माहीती प्रमाणे कुंभ मेळा हा बारा वर्षातुन एकदा येतो/असतो,आणि विदा द्या असे सांगीतल्या वर एखादी बातमी द्या असे नव्हे भारत स्वतंत्र झाल्या पासुन चा म्हणजे ईतक्या वर्षात किती खर्च झाला याचा अभ्यास उपयोगी पडला असता असो प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

कुंभमेळा बारा वर्षातून एकदा येतो म्हणून २००० कोटी खर्च. १२ वर्षातून एकदा येणारा कुंभमेळा नाशिकला १ वर्ष असतो.

हाज यात्रेचा खर्च काढा की. तो जास्त आहे हे उघडच आहे.

कशाला वेस्ट करावे मग सरकारने पैसे हाजवर तरी?

उद्दाम's picture

18 Jan 2014 - 11:41 am | उद्दाम

हिंदु धर्मातील यात्रा , इतर विधीही स्वखर्चानेच करायचे असतात . असा नक्की लेखी नियम नसला तरी संकेत नक्कीच आहे

सचीन's picture

17 Jan 2014 - 4:32 pm | सचीन

हजयात्रेला जाणा-या यात्रेकरूंना भारत सरकारतर्फे दिली जाणारी सबसीडी पुढील दहा वर्षात टप्याटप्याने संपवावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.पण कुंभमेळ्यावरील अफाट खर्चाचे काय?

मंदार दिलीप जोशी's picture

17 Jan 2014 - 4:38 pm | मंदार दिलीप जोशी

तो चालूच रहावा असा आदेश आम्ही देत आहोत :P

बॅटमॅन's picture

17 Jan 2014 - 4:38 pm | बॅटमॅन

तुम्ही आहात की. करा अ‍ॅप्लिकेशन सर्कारकडे, होऊदे खर्च!!! आम्ही तुमच्या स्तुतिपर चार जिलब्या टाकतो हाकानाका.

मंदार दिलीप जोशी's picture

17 Jan 2014 - 4:40 pm | मंदार दिलीप जोशी

आवो त्यांची नेमणूक फकस्त ऑनलाईण आहे.

अनिरुद्ध प's picture

17 Jan 2014 - 5:32 pm | अनिरुद्ध प

म्हणताय्,ते सुद्धा २०१५ च्या कुम्भमेळ्या बाबतीत,बरे एक सान्गा हा खर्च कोण करतो?म्हणजे केन्द्र सरकार की राज्य सरकार?
आणि जर असेच असेल तर ऑलिम्पिक तसेच ईतर स्पर्धा यावर होणारा खर्च सुद्धा तुमच्यासाठी अनावश्यकच असेलना?

सरकारने खेळाला प्राधान्य दिले पाहिजे. धर्माला नव्हे.

परिंदा's picture

17 Jan 2014 - 6:00 pm | परिंदा

मंग मंदिरे ताब्यात घेऊन त्यांच्या व्यवस्थापनाचा खर्च तरी का करावा?

मंदिराचे उत्पन्न अफाट असते. व्यवस्थापनाचा खर्च परवडू शकतो.

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

17 Jan 2014 - 1:02 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

तुमचे चांगले लोकप्रतिनिधी नमो की कोण त्यांना निवडुन द्या मग...

बरोबर नमो आले तर मंदिरांचे व्यवस्थापन सुधारू शकते...

देशाच्या व्यवस्थापनाबद्दल मात्र शंका आहे.

मंदार दिलीप जोशी's picture

17 Jan 2014 - 2:17 pm | मंदार दिलीप जोशी

अहो तुमच्या गुढघ्याला 2014 चे बाशिंग बांधलेल्या पप्पूला थांबायला सांगितलंय त्याच्या इटालियन मम्मीने. नमोमुळे वीतभर फाटलीये काँग्रेसवाल्यांची. "फाटलेली शिवायला वेळ हवा आहे" या सारख्या निवडणुकांच्या आधी पंतप्रधानपदासाठी कँडिडेट घोषित करण्याची परंपरा काँग्रेसमधे नसल्याची सबब पुढे करत पळ काढलाय. :D

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

17 Jan 2014 - 2:26 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांची पब्लिसीटी हायजॅक केली आहे, आता परत ती कशी मिळवायची यासाठी भाजपचे तरुण म्हातारे चिंतन बैठकीला बसले आहेत .:-P

भाजपचे म्हातारे तरुण चिंतन बैठकीला बसले तेरी सरकार मात्र काँग्रेसचेच येणार.

गब्रिएल's picture

17 Jan 2014 - 3:01 pm | गब्रिएल

झाली सुरु परत चरा पड्लेली रेकाट. ;)

मंदार दिलीप जोशी's picture

17 Jan 2014 - 2:10 pm | मंदार दिलीप जोशी

नमो पंढरपुराचे लोकप्रतिनिधी आहेत? :P :D

अनिरुद्ध प's picture

17 Jan 2014 - 3:41 pm | अनिरुद्ध प

उत्तर न देताच पळ काढला काय?

उद्दाम's picture

17 Jan 2014 - 3:45 pm | उद्दाम

सगळी मंदिरे गोदरेज कंपनीला चालवायला द्यावीत ( आणि कुलुपं लावून बंद करावीत. )

मंदार दिलीप जोशी's picture

17 Jan 2014 - 4:24 pm | मंदार दिलीप जोशी

तुम्ही कुलुपांची एजन्सी घेतली आहे का?

*mosking*

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

17 Jan 2014 - 4:42 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

का तुमाला कुलुपं फोडायची भारी हौस आहे काय?

सर्व मशिदी आणि मदरसे ISI च्या हवाली ऑफिशियली करावीत. तसेही अनऑफिशियली कधीच त्यांनी ताबा घेतलाय.

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

17 Jan 2014 - 4:44 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

आँ ????

मंदार दिलीप जोशी's picture

17 Jan 2014 - 4:46 pm | मंदार दिलीप जोशी

काय हो गाडी एकदम रिव्हर्स गिअरात गेली का? :P

सचीन's picture

17 Jan 2014 - 5:23 pm | सचीन

*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

परिंदा's picture

17 Jan 2014 - 4:37 pm | परिंदा

वर माहितगार यांनी जो पंढरपूरचा अनुभव दिला आहे, थोडाफार तसाच अनुभव आम्हाला अजमेर दर्ग्याला आला. (हो, आम्ही दर्ग्यातही जातो. हिंदुत्ववादी असुनही)

जवळ जवळ १-२ किमीवर गाडी पार्क करायला लागली. ड्रायवर लोकलच होता. त्याने सांगितले सगळे दागदागिने, घड्याळं, पैसे गाडीतच ठेवा. जरुरीपुरते पैसे घेऊन जा. गाडी पार्क केली होती एका घराजवळ. त्यांनी २५० रुपये घेतले.
तिथून रिक्षा आणि दर्शन. पर हेड १०० रुपये.
मग दर्ग्याजवळ गेल्यावर ठराविक दुकानातूनच फुले आणि चादर घ्यायला लावली. दुसरे फुलवाले अगदी हाताला धरुन ओढत होते. पण पैसे तेवढेच मागत होते.
मग बरीच ढकलाढकली करत त्या रिक्षावाल्याने आत समाधीजवळ नेले. गळ्यात एक धागा घातला आणि सोडेच्ना. हा काय प्रकार. त्याने तेव्हा दक्षिणा मागितली. परत १०० रुपये पर हेड दिले. तेव्हा त्याने काही मंत्र म्हणून तो धागा गळ्यात बांधला. (गंडाच बांधला म्हणा ना!)
जवळच कुठल्यातरी ट्रस्टच्या ओफिसात नेऊन गरिबांना जेवण देण्यासाठी देणगी द्यायला लावली. मग कसबस गल्लीबोळातून परत रिक्षाने पार्किंग जवळ नेऊन सोडले.

अत्रन्गि पाउस's picture

17 Jan 2014 - 7:02 pm | अत्रन्गि पाउस

फत्तेपूर सिक्रीला असाच ७०० /८०० रुपयांना चुना लावला...
त्यानिमित्ताने 'भ','ग' आणि 'झ' कारयुक्त अपशब्दांची चांगली उजळणी झाली...

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

17 Jan 2014 - 7:10 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

फत्तेपूर सिक्रीला असाच ७०० /८०० रुपयांना चुना लावला...
त्यानिमित्ताने 'भ','ग' आणि 'झ' कारयुक्त अपशब्दांची चांगली उजळणी झाली...

अशीच ऐनॉटॉमी आणि बायलॉजीकल फंक्शन्स ,बिहेवियर या विषयाची उजळणी अनेक मंदीरातदेखिल होते, हे ही नमूद करतो.

सचीन's picture

17 Jan 2014 - 7:43 pm | सचीन

अगदी सहमत

अत्रन्गि पाउस's picture

17 Jan 2014 - 9:15 pm | अत्रन्गि पाउस

म्हणजे आपण 'अनेक' मंदिरात उजळणी करायला जाता कि काय...
माझा अनुभव एकदाच आलेला आहे हे नमूद करणे आवश्यक आहे...

माहितगार's picture

17 Jan 2014 - 7:48 pm | माहितगार

स्टॅटीस्टीकली वाईट आणि चांगली माणस सर्वसाधारणतः सर्व जाती धर्म भाषा प्रांत देश यात साधारणतः सारखीच वाटली जात असावीत आपण नेमके कुठे अनुभव घेत असतो ऐकत असतो त्यानुसार स्थल काल आणि वापरलेल्या पद्धती परत्वे थोडा फार फरक पडत असावा. कोणतीही गोष्ट इन्स्टीट्यूशनलाईज झाली असतील शीते तेथे जमतील भूते असा भूतवास चालू होतो.

अयोग्य गोष्टीं शोधून त्यांचा विरोध समाजबदल आणि निर्मूलन करताना जाती धर्म भाषा प्रांत या नूसार भेद आणि अपवादही करू नयेत तरच त्यांना सवलत देता आम्हाला का नाही असा आवाज कमी होतो.पण वाईट वागण्यात त्यांना सवलत म्हणून आम्हालाही द्या याचे मात्र हे समर्थन ठरू नये.

माहितगार's picture

17 Jan 2014 - 7:53 pm | माहितगार

फेल्यूअर टू आयडेंटीफाय अँड अ‍ॅक्ट हि खरतर सवलत नव्हेच फेल्यूअर इज अ फेल्यूअर.

Dhananjay Borgaonkar's picture

17 Jan 2014 - 4:54 pm | Dhananjay Borgaonkar

हा धागा मुद्दामुन चिथवण्यासाठीच काढला गेला आहे हे (लेखकाच्या) प्रतिसादावरुन स्पष्ट होतय.
स्वतःच्या खाली काय जळतय ते पहा. यांच्यात उगा येऊन कोणी पण सोम्या गोम्या फतवा काढतो आणि हे खाली मुंडी घालुन स्वःताचं डोकं न चालवाता ऐकतात.हे काय सांगणार आम्हाला.

अत्रन्गि पाउस's picture

17 Jan 2014 - 9:17 pm | अत्रन्गि पाउस

ह्यात शंका नाहीच....

मुक्त विहारि's picture

17 Jan 2014 - 5:39 pm | मुक्त विहारि

आणि अप्रतिम प्रतिसाद.

लगे रहो

+1 करमणुक झाली कालपासुन

मुक्त विहारि's picture

17 Jan 2014 - 9:40 pm | मुक्त विहारि

हे असेच उत्तम धागे वरचे वर निघावेत.

बाय द वे आपली भेट कधी होणार?

परदेशी माणसांची भेट झाली, पण आपली भेट अद्याप बाकी आहे.जमले तर या डोंबिवलीला. मस्त बियर पिवू आणि सुरेल जूनी हिंदी गाणी ऐकत पडले राहू. (आमंत्रण जरी नागपूरी स्टाइलने असले, तरी यजमान मुंबईकर आहे, हे आपल्या सारख्या मुद्दामहून जास्त विचार न करणार्‍या व्यक्तीला सांगायला नकोच.)

उद्दाम's picture

18 Jan 2014 - 11:39 am | उद्दाम

आमालाही बोलवा की.

मुक्त विहारि's picture

18 Jan 2014 - 3:45 pm | मुक्त विहारि

आम्ही तुम्हाला बोलावू शकत नाही. ह्याचे उत्तर महाभारतात दिले आहे.

बाय द वे आपली भेट कधी होणार?

परदेशी माणसांची भेट झाली, पण आपली भेट अद्याप बाकी आहे.जमले तर या डोंबिवलीला. मस्त बियर पिवू आणि सुरेल जूनी हिंदी गाणी ऐकत पडले राहू. (आमंत्रण जरी नागपूरी स्टाइलने असले, तरी यजमान मुंबईकर आहे, हे आपल्या सारख्या मुद्दामहून जास्त विचार न करणार्‍या व्यक्तीला सांगायला नकोच.)
बघु कधि जमतय. :-)

श्रीगुरुजी's picture

18 Jan 2014 - 1:13 pm | श्रीगुरुजी

हा़जला दिली जाणारी हजारो कोट्यावधी रूपयांची प्रत्यक्ष सबसिडी व १२ वर्षातून एकदा येणार्‍या कुंभमेळ्यावरील खर्च यात गफलत होताना दिसत आहे. हाजला जाणार्‍या प्रत्येकाला अत्यंत स्वस्तात (म्हणजे प्रतिमाणशी रू. १२,००० फक्त) विमानाचे जाण्यायेण्याचे तिकीट दिले जाते. पुणे-बंगळूर या ५०० कि.मिं.च्या सव्वा तासाच्या विमानप्रवासाला जाऊनयेऊन १५-१६ हजार रू. लागतात. पण भारतातल्या कोणत्याही कानाकोपर्‍यातून किमान २००० कि.मि. हून अधिक अंतर असलेल्या सौदी मध्ये जाण्यासाठी फक्त १२ हजार रू. लागतात. बाजारभावाने तिकीट काढले तरी किमान ३०००० रू. लागतील. म्हणजे हाजसाठी प्रतिमाणशी किमान १८-२० हजार रू. ची प्रत्यक्ष सबसिडी प्रवाशांना मिळते.

याउलट कुंभमेळ्यासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून जाणार्‍यांना भाविकांना कोणतीच प्रत्यक्ष सबसिडी मिळत नाही. कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्या शहराची सफाई केली जाते, रस्ते/सांडपाणी व्यवस्था/वीज पुरवठा इ. दुरूस्तीची कामे केली जातात. घाट, नदीकाठचा परिसर साफ करून सुशोभित केला जातो. या इन्फ्रस्ट्रक्चरशी संबंधित कामांचा फायदा अंतिमतः त्या शहरातील नागरिकांनाच होतो. एखाद्या शहरात राष्ट्रपतींची भेट असेल तर त्या निमित्ताने ते ज्या भागात जाणार असतील त्या भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजवून, रस्ते साफ केले जातात. याचा प्रत्यक्ष फायदा त्या भागातील रहिवाशांनाच होतो. कुंभमेळ्याच्या निमित्ताने केलेल्या विकासकामांचा असाच फायदा होतो. अशी कामे करणे म्हणजे सबसिडी नव्हे. कुंभमेळ्याला जाणार्‍या कोणालाही सरकार स्वतःहून एक रूपया सुद्धा देत नाही. हाजला जाणार्‍यांना प्रत्यक्ष सबसिडी मिळते, पण तशी कोणतीही सबसिडी कुंभमेळ्याला जाणार्‍यांना मिळत नाही.

कुंभमेळ्याचा एक अजून फायदा म्हणजे कुंभमेळ्यासाठी अनेक परदेशी पर्यटक भारतात येऊन त्यात सहभागी होतात. अनेक विदेशी वृत्तवाहिन्या कुंभमेळ्याचे चित्रीकरण परदेशात दाखवितात. पर्यटनवाढ हा देखील कुंभमेळ्याचा फायदा आहे.

त्यामुळे मुस्लिमांचे लांगूललाचन करण्यासाठी सबसिडीच्या स्वरूपात दिलेली लाच व कुंभमेळ्याच्या निमित्ताने केलेली शहरसुधारणा यात जमीनअस्मानाचा फरक आहे.

बाकी तुमचं चालू द्या.

उद्दाम's picture

18 Jan 2014 - 2:08 pm | उद्दाम

यात्रा झाल्याने त्या गावाचा पार उक्किरडा होतो. मंजूर झालेल्या पैशाचा काही क्रिएटिव फारसा होत नाही. वाडी , पंढरपूर बघा म्हणजे समजेल.

विमानाचे तिकिट किती हवे हे सरकार ठरवते. आता दिले सरकारने सवलतीत तिकिट तर ते नाकारावे, असेही कुठे पुस्तकात लिहिले नसावे नै का? त्यामुळे उगाचच हजच्या बाबतीत गळे काढू नयेत ..

फारच मनस्ताप होत असेल तर पोराला कावड घ्यायला सांगून त्यात बसून हिंदूंनी काशीयात्रा करावी. :)

उद्दाम's picture

18 Jan 2014 - 2:09 pm | उद्दाम

शहर सुधारणाच करायची असेल तर कुंभमेळ्याचे निमित्त कशाला? आणि जिथे कुंभमेळा भरत नाही, तिथल्या लोकानी काय पाप केले आहे? त्याना नकोत काय सुधारणा?

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

18 Jan 2014 - 2:39 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

ही बातमी वाचा
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5724976.cms?prtpage=1
- म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई
महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात तिसऱ्यांदा सत्ता ग्रहण केलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने आगामी वषीर्च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजापुरच्या भवानीपासून मालवण तालुक्यातील भराडी देवीपर्यंत सर्व देवस्थानांच्या विकासाकरिता भरीव तरतूद करून देवदेवतांचा कोप होणार नाही याची चोख व्यवस्था केली आहे. याचप्रमाणे नाटककार विजय तेंडुलकर यांच्यापासून निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती जतन करण्याकरिता तरतूद करण्यात आली आहे.
........
* तुळजापूरच्या भवानीमातेच्या देवस्थानाकरिता विकास प्राधिकरण. आगामी वर्षाकरिता ७५ कोटी रुपयांची तरतूद
* संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जन्मचतु:शताब्दीनिमित्त देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर व पालखी तळ या ठिकाणच्या कामांसाठी १४० कोटी रुपये
* शेगाव येथील गजानन महाराजांच्या समाधीस १०० वषेर् पूर्ण होत असल्यामुळे तेथील सोहळ्याकरिता २५० कोटी रुपये. त्यापैकी ६५ कोटींची तरतूद आगामी वर्षात.
* तीर्थक्षेत्र पैठणच्या विकासासाठी तुळजापूर, शिडीर्च्या धतीर्वर विकास प्राधिकरण स्थापन करणार. त्यासाठी २०० कोटींचा विकास आराखडा प्रस्तावित.
* जेजुरी देवस्थान विकासाकरिता पाच कोटी रुपये
* कोकणातील श्री क्षेत्र परशुरामकरिता पाच कोटी, भराडी देवी माता देवस्थानाकरिता दोन कोटी तर श्री क्षेत्र कुणकेश्वरकरिता दोन कोटी रुपये
......................

एवढे पैसे खर्च करुनही हज यात्रेच्या नावाने फुका गळा कशाला काढताय वर धाग्यचा विषय धरुन एवढेच म्हणतो की इतके कोटी या देवस्थांनाना द्यायचे वर यांचीच मनमानी ऐकूण घ्यायचे काय कारण?