विवेकसिंधु हा कवी मुकुंदराज यांनी लिहिलेला ग्रंथ मराठी भाषेतील आद्य काव्यग्रंथ समजला जातो.विवेकसिंधु ग्रंथाबद्दलच्या मराठी विकिपीडियाव्रील लेख अद्ययावत करताना विवेकसिंधूचे लेखन अंबेजोगाई, आंभोरा, फलटण,पैकी नेमके कुठे झाले हि चर्चा सध्या पुढे आली आहे. मराठी विकिपीडियाचे एक जाणते सदस्य त्या बद्दल सध्या चर्चा:विवेकसिंधु येथे विवीध संदर्भ उधृत करत आहेत.
त्यातील एका संदर्भातील एक किस्सा रोचक वाटला म्हणून मिपा वाचकांसाठी त्याचा थोडा भाग.
*उद्धवसुताने लिहिलेला रामदास चरित्र हा ग्रंथ शके १६९६ (इ.स. १७७४)चा आहे. या ग्रंथाच्या ३९व्या अध्यायात मलयगंधर्वाची एक कथा आहे त्यातील उपकथेत एका राजा जैतपाळाचे वर्णन आले आहे ते थोडक्यात असे:
जैतपाळ राजाला ब्रह्मप्राप्तीची इच्छा झाल्याने त्याने अनेक साधुसंतांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. साधुसंतांच्या उत्तराने जर त्याचे समाधान झाले नाही तर तो त्यांना तळे खोदण्याच्या कामाला लावीत असे.
राजाची चातुर्यकथा वाटते ? पण मूळकथा वेगळ्या दिशेने जाते. विवेकसिंधु वाचलेला नाही पण त्यातील 'विवेक" ही महत्वाची गोष्ट राजा जैतपाळाकडे असावी असे दिसते.विवेकसिंधु बद्दल या निमीत्ताने अधिक जाणून घ्यावयास आवडेल.
प्रतिक्रिया
13 Jan 2014 - 11:26 pm | मारकुटे
>>>यातील 'विवेक" ही महत्वाची गोष्ट राजा जैतपाळाकडे असावी असे दिसते
१) हा निष्कर्ष कसा काय काढला?
२) आता समजा जैतपाळ आज असता आणि त्याने काही शास्त्रज्ञांना बोलावून क्वांटम थिअरी, रिलेटीव्हीटी इत्यादी यावर प्रश्न केले असते आणि समजा त्या शास्त्रज्ञांच्या उत्तराने त्याचे समाधान झाले नसते व त्याने त्यांना तळे खोदायला लावले असते तर त्याच्याकडे विवेक आहे असे प्रतिपादन तुम्ही केले असते का?
३) एकंदर तुमच्या धाग्यांवरुन तुम्हाला अनेक गोष्टी माहित नसतांना सुद्धा तुम्ही स्वत्:ला माहितगार का म्हणवता?
13 Jan 2014 - 11:49 pm | माहितगार
१) आणि २) हा निष्कर्ष कसा काय काढला?
अंधविश्वास ठेवत नव्हता तरीपण विवेक शब्द योग्य नाही एकदम सहमत. दुष्टबुद्धी नसेल तर फारतर चातुर्य म्हणता येईल.
३) एकंदर तुमच्या धाग्यांवरुन तुम्हाला अनेक गोष्टी माहित नसतांना सुद्धा तुम्ही स्वत्:ला माहितगार का म्हणवता?
:) आपल्याला बरेच काही माहित नाही याची कल्पना असणे हि वस्तुस्थिती आदर्पुर्वक स्विकारणे माहित असल्यामुळे आणि माहिती मिळवण्याचे प्रयत्न करून एका ठिकाणाहून दुसरी कडे पोहोचवण्यामुळे :)
14 Jan 2014 - 12:08 am | विकास
"माहीती"च्या बाबतीत मामला अंमळ "गार" असल्याने म्हणत असाल. ;)
एनीवे, गंमतीचा भाग सोडा. तुमच्या धाग्यातून बरीच नवीन माहिती कळत असते. ह्या धाग्यातील प्रस्तावाबाबत सगळेच नवीन असल्याने माहितीपूर्ण प्रतिक्रीया/चर्चा वाचण्यास उत्सुक.
14 Jan 2014 - 5:04 pm | माहितगार
या वेळी "माहीती"च्या बाबतीत मामला जरा अधीकच अंमळ "गार" होता हे खरे.जैतपाळाच्या बाबतीतील विशेषणे देण्यात निश्कर्ष घाई झाली हेही खरे.(म्हणूनच आम्ही मराठी विकिपीडियावर विशेषणे टाळण्याचा आग्रह धरत असतो कारण विशेषणे जाम गोत्यात आणू शकतात).
मराठी भाषेतून ज्ञान देण्याच्या वाटेतले सारे अडथळे जैतपाळच्या मार्गाने हटवता आले असते म्हणजे जसेकी आयुर्वेद कायदा अशा इतरही विषयांच मराठीतून शिक्षणच बाद करणार्यांना जैतपाळच्या तळे खोदवून घेणे किंवा चणे भरडून घेणे अशा शिक्षा देता आल्या असत्या तर किती बरे झाले असते अशी दाट भावना येऊन हा धागा लावला. :) आणि शिरच्छेद कर कडेलोट कर या मानाने तळे खोदवून घेणे किंवा चणे भरडून घेणे या जैतपाळ शिक्षा जरा सौम्य होत्या नाही का ?
आमच्या माहितीची गत आमच्या मायबोलीत नाही म्हणून आमच्याकडे नाही अशी असते माहिती नाही म्हणूनच शोधत असतो (माहितीनसलेल्या या गार जिलेब्यांवर मिपाकरांच्या मिसळपाव अन्नछत्रात पाकाची धार धरली जाईल या अपेक्षेने धागे उघडत असतो :)) आणि म्हणून "माहीती"च्या बाबतीत मामला अंमळ "गार" हि कोटी मनोमन आवडली.प्रोत्साहन पूर्ण प्रतिसादा करिता धन्यवाद.
जसे नेहमी प्रंमाणे विवेकसिंधु ग्रंथा बद्दल अधिक माहिती पिडिएफ या अपेक्षा ही या धाग्यातून आहेतच.
14 Jan 2014 - 12:07 am | प्रचेतस
विवेकसिंधु ह्या ग्रंथाचा काळ कोणता ते माहित नाही पण जैत्रपाळ हा पराक्रमी यादव राजा भिल्लम पाचवा याचा सेनापती होता.
होयसाळ आणि भिल्लम यांच्या युद्धात भिल्लमाचा पराभव झाला. ह्याच युद्धात त्याचा पराक्रमी सेनापती जैत्रपाल अथवा जैतुगी ह्याचा वध झाला.
होयसाळांच्या एका शिलालेखात 'होयसाळनृपती बल्लाळाने आपल्या खङगाला कामदेवाच्या रक्ताचे पाणी पाजले, भिल्लमाच्या मस्त्करूपी पाषाणावर धार लावली आणि जैतुगीच्या मुखकमलात ती बद्ध केली' असे वर्णन आहे. उपलब्ध शिलालेखांवरून हे युद्ध साधारण इ.स. ११९० साली लढले गेले.
ह्या युद्धात यादवांचा पराभव झाला तरीही होयसाळांचेपण प्रचंड नुकसान झाले. हेमाद्रीच्या राजप्रशस्तीत याचे वर्णन भिल्लमाने 'होयसाळ नरेशाला अपंग बनवले' असा उल्लेख येतो. (कल्याणश्रियमप्यवाप्य विधधे यो होसलेश व्यसुम्)
14 Jan 2014 - 3:49 am | अर्धवटराव
साला काय काय इन्फोर्मेशन असते वल्लीशेठकडे. नाव काढण्याचा अवकाश, डाटा हजर.
14 Jan 2014 - 7:44 am | विकास
एकदम सहमत.
तरी देखील एक प्रश्न पडला: मिपावर "कल्याणश्रियमप्यवाप्य विधधे यो होसलेश व्यसुम्" असे शब्दप्रयोग चालतात का? :) ;)
14 Jan 2014 - 3:52 pm | बॅटमॅन
रोचक!! यादव-होयसळ युद्ध कुठे झाले होते? होयसळांची सत्ता माझ्या माहितीप्रमाणे उत्तर कर्नाटकावर फारशी नव्हती अन यादवही दक्षिणेत फार कै घुसले होते असे वाटत नाही. मिरजेच्या खाली किती गेले होते?
14 Jan 2014 - 4:10 pm | प्रचेतस
चालुक्य सोमेश्वराचा पराभव करून भिल्लमाने कल्याणी जिंकली पण ह्याच कल्याणीवर द्वारसमुद्रच्या होयसाळांचाही डोळा होता. यातूनच संघर्ष घडून यादव आणि होयसाळ यांच्यात गदग जवळ सोराटुर येथे लढाई घडून आली.
अण्णिगेरे येथील इ.स. १२०२ च्या शिलालेखात होयसळ नृपती बल्लाळाने भिल्लमाचा लक्कुंडी ते सोराटुर असा पाठलाग करुन शेवटी सोराटुर येथे त्याचा पराभव केला असे म्हटले आहे.
यादव- होयसाळ हे शत्रुत्व पार शेवटचा यादव सम्राट रामदेवराया पर्यंत चालूच राहिले. यातच उत्तरेकडून येणार्या इस्लामी वावटळीपुढे त्याचे दुर्लक्ष झाले व् याचे पर्यवसान खिलजी-मलिक काफ़ूरकडून आधी देवगिरी आणि त्यापाठोपाठ होयसाळ साम्राज्य बुडण्यात झाले.
14 Jan 2014 - 4:16 pm | बॅटमॅन
आयला भारी. मज्जाच!!!
भारीच रे. ही नवीन माहिती मिळाली. आता ट्रोजन युद्धाचा वेढा उठला की आम्हीही यात घुसावे म्हणतो आहोत.
अवांतरः सोरटूर नामक डॉ. आहेत मिरजेत. त्या नावाचं गाव खरंच अस्तित्वात आहे हे पहिल्यांदा कळालं. :)
14 Jan 2014 - 4:37 pm | प्रचेतस
उतर उतर.
लै भारी इतिहास आहे हा. सिंघण दूसरा याचे पराक्रम तर अद्वितिय. शिवाय तुझ्या मिरिंज देशाचा संदर्भ पण काही ठिकाणी असल्याने आपुलकी वाटेल ते वेगळेच.
14 Jan 2014 - 5:10 pm | बॅटमॅन
येस्सार!!!!
चालुक्य ते यादव व्हाया शिलाहार हा इतिहास खर्या अर्थाने स्थानिक आहे. पाहिलाच पाहिजे.
14 Jan 2014 - 11:03 pm | अर्धवटराव
त्यावर लिखाण, मालिका, चित्रपट वगैरे बनवायला कित्ती स्कोप आहे. आपले बॉलीवुडवाले कधि विचार करतील कोण जाणे.
15 Jan 2014 - 3:54 am | बॅटमॅन
बॉलीवुडवाल्यांचं कल्पनादारिद्र्य जगजाहीर आहेच.
पण कुणी काही केलं तर कौतुक किंवा सयुक्तिक टीका याऐवजी भावना दुखावण्याच्या नावाखाली दीडदमडीचे अडाणचोट लोक जो राडा करून चीप पब्लिसिटी करू पाहतात ते पाहता नैये तेच बरं असं वाटतं काहीवेळेस :( सगळे साले अटेन्शन व्होअर्स आहेत आपल्याकडे :|
15 Jan 2014 - 3:59 am | अर्धवटराव
पण अशोका, जोधा-अकबर वगैरे गल्लाभरु प्रयोगांपासुन सुरुवात करायला हरकत नाहि. शिवछत्रपतींच्या केवळ राज्याभिषेकावर एक सिनेमा निघु शकतो... ते काहि लोकांचा विरोध मग काशीकरांना अवताण वगैरे भानगडी वगळुन देखील.
15 Jan 2014 - 12:43 pm | बॅटमॅन
येस्स!!! अस्मितांची लढाई फार होणार नाही अशा कथानकांवर पिच्चर निघाले तर अजून बरे त्यातल्यात्यात. मुस्लिमपूर्व भारतावर असा पिच्चर निघावा एखादा.
15 Jan 2014 - 12:47 pm | मारकुटे
छे छे तिथे सुद्धा मुलनिवासि, वैदिक, जैन, बौद्ध, हा वाद आहेच की.
वैदिक पूर्व जावे तर सिंधू कुणी अडवली, हल्लेखोर अतुन की बाहेरुन आर्य अनार्य नकोच
अतिप्राचीन जावे तर... उरते काय नर मादी प्रेम हेवे दावे टोळ्या....
मग आजचा पिच्चर काय वाईट? खानदान की इज्जत खतरे मे बेस्ट
फक्त आता एखादी मुलगी वेगळ्या जातीची केली म्हणून भडकणारा बाप दाखवण्यापेक्षा
थोडाफार समलैगिंक तडका लावावा... फिल्म फेअर पक्के. राश्त्रीय पुरस्कार चान्स वाढतो. ओस्कर वारी घडेल. वर पुरोगामी झेंडा फडकवता येईल. कसे?
15 Jan 2014 - 12:50 pm | बॅटमॅन
अगदी अगदी. सब चू**का बाजार भरा पडा है.
14 Jan 2014 - 11:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
लय भारी ! काय काय माहिती गोळा करून ठेवलियत राजे ! पुस्तक लिहा, पुस्तक लिहा !!
14 Jan 2014 - 5:08 pm | माहितगार
प्रतिसादांबद्दल धन्यवाद.गीतारहस्य प्रमाणे या धागाचर्चेच्या निमीत्ताने सुद्धा विवेकसिंधूची कॉपीराईट फ्री मूळप्रत पिडिएफ मिपा सदस्यांकडून उपलब्ध होउ शकल्यास ऑनलाईन लावण्याकरता हवी आहेच.
16 Jan 2014 - 2:15 pm | माहितगार
विवेकसिंधु ग्रंथनिर्मितीविषयी मुकुंदराजांनी याच ग्रंथात लिहिले आहे की, "नृसिंहाचा बल्लाळु | तेयाचा कुमरु जैतपाळु |तेणें करविला हा रोळु | ग्रंथरचनेचा ||
ओवीत कवी मुकुंदराज म्हणताहेत नृसिंहाचा बल्लाळु। तेयाचा कुमरु जैतपाळु ।; म्हणजे नरसिंह बल्लाळाचा कुमार तो जैतपाळ असेच नव्हे का ? आणि हा होयसाळ राजा दुसरा नरसिंह बल्लाळ असण्याची शक्यता अधिक वाटते कारण तो जैन धर्मानुयायी होता (या संदर्भाने मराठी विश्वकोशात काही माहिती दिसते आहे.)
"होयसाळ राजा दुसरा नरसिंह बल्लाळ याचा मुलगा जैतपाळ" आणि "होळसरांचा शत्रू यादव राजा भिल्लम पाचवा याचा सेनापती जैत्रपाळ अथवा जैतुगी " हे दोन उल्लेख परस्पर विरोधी आणि सध्यातरी माझ्याकरता कनफ्युजींग आहेत.
आणि होयसाळ / होयसळ घराणे कोणत्या ठिकाणचे होते ? हे जाणून घेण्यास आवडेल
14 Jan 2014 - 12:50 am | धन्या
असं लिहिलंय की जसं काय की तो कोण जैतपाळ की चैतपाळ लढत असताना क्यामेरामन पुष्पक चौरासियासह हे आम टीव्हीवर लाईव्ह टेलिकास्ट देत होते.
14 Jan 2014 - 1:30 pm | प्रचेतस
:)
16 Jan 2014 - 9:32 am | श्रीनिवास टिळक
डॉ रा चिं ढेरे यांच्या शोधशिल्प या English पुस्तकात विवेकसिंधु, मुकुंदराज, आणि परंपरा या विषयावर बरेच लेख लिहिले आहेत.ती माहिती जालावर उपलब्ध आहे(पहा www.rcdhere.com).त्यातील काही उपयुक्त भाग (थोडे बदल करून खाली देत आहे)
Excerpts from Shodhashilpa by Dr R. C. Dhere
Chapter 15
Some points of research related to Mukundraj
Birthplace of Mukundraj is believed to be Ambejogai as related by Shri N.B. Pawagi in ‘Prakrut ani Marathi bhashecha itihas’ (History of Marathi and Prakrit languages) and Dasganu in Santastotra. However he [Mukundraj] is related to Nanded as well. One comes across legends of his ancestors staying near Nanded. Some of the successors are known to exist in Nanded in the eighteenth century. However one cannot confirm the relation of Mukundraj with Nanded.
Age of Mukundraj at the time of composing Viveksindhu
One of the verses in Viveksindhu states “For me, breathing itself requires effort. In such a stage, why should one set forth to write a book?” Hence many scholars believe that it was written by Mukundraj at a very advanced age. However, it may refer to unwillingness due to unattached mindset and to the inability due to old age.
One of the works named Pavanvijay is ascribed to Mukundraj. It is related to Swarodaya. The work refers to Mukundraj and Mukundmuni. But it may not be related to the author who wrote Viveksindhu.
Spiritual brethren to Mukundraj
The teacher of Mukundraj, Raghunath, had a fellow student called Vishwambharnath. In this tradition Garibnatha, Jyotinatha and Purnaprakashananda nath have written books such as panchikritvivek, and Poornaprabodhachandrodaya etc.
The Tarakabrahma mantra
It is this chanting verse that was passed on from the successions of gurus. There are five manuscripts related to the tradition in the Samartha Vagdevata Mandir, Dhule. The Vishvambharanath tradition is important in the history of the Nath sect in Maharashtra.
Chapter 17
Bhavishyottar Purana and biographies of saints.
While praising his teacher Harinath, Mukundraj relates that his guru’s biography is described in Bhavishyottar Puran. Mahipati in Bhaktavijay mentions Bhavishyottar Purana. Shridhar in a small work related to Dnyaneshwar, too, mentioned Bhavishyottar Puran. Dr Dhere raises the question if Harinath was chronologically closer to Mukundraj and much before Ramdas, why should Harinath be mentioned in Bhavishyottar Puran? It may mean that there are many Puranas known by the same name- Bhavishya or Bhavishyottar Puran. Dr Dhere speculates that inclusion of contemporary people in various Puranas must be taking place much faster than we think of. One may an example of such rapid inclusion of a person from Mahanubhav tradition, in [Bhavishya?] Purana. Search for such Puran is important. If one can find the [Bhavishyottara] Puran, it may throw light on the cultural history of Maharashtra during the period of Yadav.
Chapter 18
The essay refers to a Sanskrit translation of Viveksindhu and some confusion related to Sanskrit Viveksindhu by Mukundraj and Vivekamrut by Gopal Mudgal. Dr Dhere explains that Sanskrit Viveksindhu was written by Mukundraj. But Sanskrit translation of Viveksindhu was done by Gopal Mudgal with inspiration from Raghunath Lamb. However, wherever Mukundraj has praised the Marathi language, the translator has praised Sanskrit and his own inspiration, someone named ‘Lamb,’ instead of King Jaitrapal in the Marathi work.
Chapter 19
In search of King Jaitrapal
Viveksindhu was created at the behest of Jaitrapal who was presumed to be King Jaitugi from Yadav dynasty or Nrisinha from Hoysala/Yadav dynasty, or subjugate to Kalchuris at Ambejogai. Dr Dhere discusses in this essay some of the references from Mahanubhav literature to trace the history of Jaitrapal. Yakshdev Vridhdhanvaya by Meghchand indicates that he was a king at Zadimandala and a nephew to Mukundraj. Considering various references to Zadimandala, Dr Dhere concludes that it constituted of Buldhana and Akola and Rajur-Rohinkhed, which probably was a capital city of the state as supported by a Telugu reference.
The adopted son of Jaitrapal could be Sharangadhar, a son of Mahadeva. Mahadeva was defeated by Ganapati Kakatiya around 1228 C.E. He founded the city of Sarangapur. One such Sarangapur exists near Mehkar, Yavatmal. However, due to lack of knowledge about the history of Andhra, the view cannot be supported by suitable evidences. Scholars could search along this direction.
Chapter 20
Atmaramswami in Dasavishramdham indicates that Keshavswami Bhaganagarkar hails from the tradition of Mukundraj. In the published work of Keshavswami this is fleetingly indicated just once. A tradition explained by Mudalagi Math indicates a succession: Harinath-Raghunath- Mukundraj- Nrisinha Bharati- jagannath-Sahajabodh-Rangabodha-Keshav.
Chapter 21
An unknown branch of Mukundraj tradition
In a manuscript of Ramayana, written by Avadhutvarad Vitthal or Dattavarada Vitthal, Dr Dhere found a hitherto unknown tradition of Mukundraj: Adinath-Harinath-Raghunath-Mukundaraj- Nrusinha-jagannath- Sahajabodh- Rangabodha-Trimbakbodh- Ramakrishna. The said Ramakrishna was Vitthal’s father with the surname Ghugari. Ramakrishna is also referred to as Vimalbodha. He had six children including Vitthal (also known as Dnyanbodha Vitthal) who had composed about 75,000 verses. The essay describes birth dates of the children of Ramakrishna and some of poetry of Ramakrishna and the succession chart of Mukundraj tradition. It also gives horoscope of the poet Vitthal who was born in 1722 C.E.
Chapter 23
The tradition of Anantabodha is given as follows: Mukundraj- Nrusinha-Jagannath- Sahajabodh- Rangabodha-Adwayabodha –Shivabodha.
Chapter 25
Spread of Viveksindhu in Karnataka.
Disciple of Sahajananda, Purnananda has written a critique on Gurugeeta, which is influenced by Viveksindhu of Mukundraj. In chapter 25 Dr Dhere cites examples to support the view. In the biography of Purnananda written by Hanumadatmaja, who hailed from the tradition of Sahajanand, he has actually supported the conclusion. Gurucharitra is influenced by Viveksindhu suggesting that during fifteenth and sixteenth century Viveksindhu had considerable influence in the region around Kalyani, Kalburga, Vijapur. Similarly Shantabodha literature is influenced by Nijagunashivayogi, which in turn is influenced by Viveksindhu. It is found that the Vivekchintamani of Nijgunashivayogi has its roots in Vivekchintamani in Telugu composed by Paramanandtirtha, The said Paramnandtirtha was a follower of advaita Datta sect, and he was influenced by Marathi tradition. Thus it can be concluded that the disciples of Mukundraj and Dnyaneshvar had spread their message in southern Dravidian regions, before Nijagunashivayogi.
In the appendix to chapter 26 of Shodhshilpa Dr Dhere lists about 55 references which can be useful for any further study of Mukundraj and his parampara.
16 Jan 2014 - 9:33 am | मारकुटे
ह्याचे कूणी मराठीत भाषांतर करेल काय?
16 Jan 2014 - 2:19 pm | माहितगार
अभ्यासपूर्ण माहिती करिता श्रीनिवास टिळकांचे धन्यवाद.खाली मारकुटेंनी म्हटल्या प्रमाणे मायबोलीत अनुवादीत होऊन मिळाल्यास सर्वांनाच उपयोगी ठरेल (मला विकिपीडियात संदर्भ देण्यास :) ) .