ही पाककृती मला आंतर जालावरील शोध मोहिमेत मिळाली. पाकृ. सोपी आहे, पण मी पहिल्यांदाच प्रयत्न केला आणि सगळ्याना खूप आवडली.
साहित्यः अर्धा कि. मिक्स्फ्रुट एगलेस केक, ( आपल्या आवडीनुसार कोणताही, चॉकलेट सोडून), दोन चमचे फ्रुट ज्युस, इन्स्टंट ऑरेंज जेली पाकिट ५० ग्रॅ., व्हॅनिला कस्टर्ड पावडर दोन टे. स्पून, साखर चार टे. स्पून कस्टर्डसाठी, एक सफरचंद+ दोन टी स्पून साखर, अर्धा ली. दूध, एक केळं, एक वाटी जास्तीचे दूध, बदाम काप, चेरी सजावटीसाठी.
कृती: पाकिटावरील कृतीप्रमाणे जेली सेट करावी. सफरचंदाच्या साली काढून लहान लहान फोडी कराव्या. त्यात दोन टीस्पून साखर घालून पाच मिनिटे गॅसवर ठेवावे. फोडी जरा मऊ होतील. गॅस बंद करून फोडी गार कराव्या. अर्धा ली. दूध गरम करण्यास ठेवावे. त्यात चार टे.स्पून किंवा आपल्या चवीनुसार साखर घालावी. एक वाटी गार दुधात कस्टर्ड पावडर नीट मिसळावी. हे दूध गरम करायला ठेवलेल्या दुधात मिसळावे. पाच मिनिटे सतत ढवळत ठेवावे. गुठळी होऊ देऊ नये. कस्टर्ड खाली उतरून गार करण्यास ठेवावे. केळ्याचे काप करावे.
केकचे चौकोनी तुकडे करावे. काचेचा बाऊल घेऊन तळाला केकचा थर द्यावा. त्यावर दोन चमचे फ्रुट ज्युस शिंपडावे. त्यावर पाकवलेल्या सफरचंदाच्या फोडी, केळ्याचे काप पसरावे. त्यावर सेट केलेल्या जेलीचे चौकोनी तुकडे करून त्याचा थर द्यावा. सर्वात शेवटी कस्टर्डचा थर द्यावा. सजावटीसाठी बदाम काप आणि चेरीचे काप वापरावे. चार- पाच तास फ्रिजरला सेट करून गार झाल्यावर सर्व्ह करावे.
प्रतिक्रिया
11 Jan 2014 - 6:20 pm | अनन्न्या
हा तयार पुडींगचा फोटो
11 Jan 2014 - 6:29 pm | प्यारे१
भन्नाटच दिसतंय!
जीव गेला.
11 Jan 2014 - 6:29 pm | त्रिवेणी
आलेच ग तायडे खायला.
11 Jan 2014 - 6:37 pm | कवितानागेश
आहा!!! मस्तच. :)
11 Jan 2014 - 6:59 pm | मुक्त विहारि
झक्कास...
11 Jan 2014 - 7:57 pm | साती
मस्तं!
11 Jan 2014 - 8:03 pm | रेवती
masta!
11 Jan 2014 - 8:09 pm | अत्रुप्त आत्मा
दिवंगत....!
आत्मा फोटो पाहुन गेला त रंगत! :D
11 Jan 2014 - 8:41 pm | पैसा
पण हे खाऊन डाएटची वाट लागणार ना पुरती!
11 Jan 2014 - 8:45 pm | सस्नेह
वर्णन वाचून अन फोटो पाहून लै वैट्ट अवस्था झाली !
11 Jan 2014 - 8:52 pm | पाऊस
मस्त!!!
11 Jan 2014 - 9:18 pm | इन्दुसुता
आवडली पाकृ.... लवकरच करून बघेन ( आणि अर्थातच खाऊनही!!! ).
11 Jan 2014 - 10:22 pm | अनन्न्या
तुम्ही करता करताच सेट होऊन जाईल ना?
11 Jan 2014 - 10:43 pm | इन्दुसुता
हो जरा दोन मिनिटं बाहेर ठेवलं की व्यवस्थित सेट होणार.... येत्या शुक्रवारी मैत्रिणीच्या मुलांसाठी करायचं ठरवलं आहे :)
11 Jan 2014 - 10:26 pm | अनन्न्या
नवीन करून पहायला भिती वाटते, पण घरी सुध्दा खूप आवडलं सगळ्याना!
@पैसाताई, डाएट बंद एक दिवसापुरतं!
सर्वांचे आभार! नक्की करून पहा.
11 Jan 2014 - 11:33 pm | सानिकास्वप्निल
आवडता प्रकार :)
12 Jan 2014 - 12:47 am | प्रचेतस
वॉव.......!!!!!!!!! भारीच.
12 Jan 2014 - 10:13 am | अजया
इतकी सुंदर पाककृती करुन एकटीने खाल्ल्याबद्दल अनन्न्याचा निषेध आहे! ;)
14 Jan 2014 - 1:28 pm | अनन्न्या
रत्नागिरीला यावे लागेल.
12 Jan 2014 - 11:13 am | जेपी
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo:
13 Jan 2014 - 11:41 am | सुहास..
ते चव कशी का असेना , पण तु स्वयंपाक सोडुन , फोटुग्राफी करावी असा एक , मध्यल्या आळीतला पुणेकरी शेरा मारतो ;)
आवडली आहे हे वे सां न ल
13 Jan 2014 - 11:54 am | सूड
'स्वयंपाक वैगरे ठीकै, जमलं तर तेवढी फोटोग्राफी शिकून घ्या' असं म्हणायचंय का? ;)
14 Jan 2014 - 11:30 pm | सुहास..
'स्वयंपाक वैगरे ठीकै, जमलं तर तेवढी फोटोग्राफी शिकून घ्या' असं म्हणायचंय का? >>>>
चालायचचं !!
लग्नाळु पुरुष आपोआप प्रश्नाळु होतो याचे उत्तम उदाहरण !!
@ अनन्या : पाकृ छानच आहे , शिवाय फोटुग्राफीकला ही उत्तम असे म्हणत होतो .....शेवटी काय ? आपल म्हणजे सर्वधर्मसमभाव ...आ म ले ट्ट ;) ..घ्या आम लेट घ्या ;)
15 Jan 2014 - 6:19 pm | अनन्न्या
.....................
13 Jan 2014 - 12:57 pm | Mrunalini
मस्तच एकदम. तोंपासु :)
13 Jan 2014 - 1:38 pm | अनिरुद्ध प
पा क्रु आवडली.
13 Jan 2014 - 1:54 pm | शिद
जबराट...!!!
13 Jan 2014 - 7:34 pm | दिपक.कुवेत
पण हि पद्धत वेगळि दिसतेय. करुन पाहिन. ते दुसर्या फोटोत मोठि टिंब जॅमची आहेत का?
14 Jan 2014 - 1:25 pm | अनन्न्या
फोटूचं काय, तुमच्या तोंडाला पाणी सुटावं इतपत जमतोय ना, मग झालं तर! मी मोबाईल कॅमेय्राने काढते फोटो त्यामुळे कदाचित तेवढा चांगला नसेल येत!
@ सुहास आणि @सूड, पदार्थाच्या चवीबद्द्ल खात्री आहे, फोटोग्राफीचा सल्ला विचाराधीन आहे, प्रयत्न केला जाईल्, जमेल याची शाश्वती नाही. प्रतिक्रियेसाठी आभार!
सर्वांना खूप खूप धन्यवाद!
14 Jan 2014 - 2:02 pm | वात्रट मेले
बोलेतो झकास.......
तुमचे प्रयत्न असेच चालु राहो आणि आमच्या तोंडाला असेच पाणी सुटो.
14 Jan 2014 - 4:12 pm | इस्पिक राजा
प्रचंड आवडल्या गेले आहे.
15 Jan 2014 - 9:19 am | मनीषा
छान दिसते आहे पुडींग ..
17 Jan 2014 - 4:51 pm | मदनबाण
वाह्ह...
3 Feb 2014 - 1:14 pm | दक्षिणा
वाह! फारच सुरेख. तोंडाला पाणी सुटलं फोटो पाहून.