दृश्य १:
कुठे आहे तुझा तो देव/जगदीश्वर? जर तो सर्वत्र आहे तर मला ह्या खांबात का दिसत नाही? असे म्हणत ज्यावेळेला हिरण्यकश्यपुने(भक्त प्रल्हाद च्या वडिलांनी) खांबावर गदेने वार केला व खरोखर त्यातून भगवान "नृसिंह अवतारात" प्रगट झाले. पुढे काय झाले ते सर्वश्रुत आहेच. संदर्भ :श्रीमद भागवत कथा
काय भक्त प्रल्हाद एक शास्त्रज्ञ होता गॉड पार्टीकल्स शोधणारा? कि हिरण्यकश्यपु?
ही निव्वळ साहित्यकथा समजायची कि काही गूढ लपले आहे त्यात?
"नृसिंहपुराण" यात काही मुलतत्वे सापडतील का?
दृश्य २:
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा ॥
नमू शारदा मूळ चत्वार वाचा । गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥
दिसेना जनीं तेंचि शोधूनि पाहें| बरें पाहतां गूज तेथेचि आहे| करीं घेउं जातां कदा आडळेना| जनीं सर्व कोंदाटले तें कळेना ॥ श्लोकार्थ: या दृष्य सृष्टीत जे सहज दिसत नाही त्याचा सूक्ष्म विचाराने शोध घ्यावा. शुध्द विचाराने नीट पाहिले की त्याचे गूढरहस्य तेथेच दडलेले आढळेल. मात्र ते हातात प्रत्यक्ष घेता येणार नाही. कारण ते इंद्रियांना कदापि जाणवत नाही. वस्तूमात्रात ते ओतप्रोत भरलेले असूनही सहजासहजी कळून येत नाही. जे जगतात चर्मचक्षूंना दिसत नाही त्या ब्रह्माचाच शोध घेऊन अनुभव पाहावा.
हा उपदेश वरवर पाहिल्यास चमत्कारिक वाटेल. पण विचारांती हाच योग्य ठरेल. जे बाहेर दिसते तेच पाहण्याची दृष्टीला सवय असते. पण पुष्कळ ठिकाणी महत्त्वाची वस्तू अंतरात गुप्त असते. नारळातील खोबरे बाहेर दिसत नाही, आत असते. नरोटी फेकून तेच घ्यावे लागते. असेच परमार्थात आहे.
समर्थ म्हणतात, ‘प्रगट तें जाणावें असार| आणि गुप्त तें जाणावें सार| गुरुमुखें हा विचार| उमजो लागें॥ (दासबोध)ब्रह्म हे चर्मचक्षूनें दिसत नसले तरी अनेक सज्जनांनी ज्ञानचक्षूने ते अनुभविले असून त्यासंबंधी सर्वांची एकवाक्यता आहे. मग ते डोळ्याला दिसत नसले तरी नाही असे कसे म्हणता येईल? म्हणून त्या संत आनंताचा शोध घेण्याचे कष्ट घेतले पाहिजेत कारण त्यापासून बुध्दिग्राह्य अशा आत्यंतिक शाश्वत सुखाचा लाभ आहे.
चंद्रावर वास्तव्य, अणुसंशोधन या क्षणिक सुखाच्या गोष्टी विज्ञानांत स्तुत्य, प्रगतीच्या व मानवी ज्ञानाच्या द्योतक ठरतात, तर चंद्रालाही जी तेज पुरविते व अणूलाही जी वस्तू आधार आहे ती वस्तू आपण स्वत: असल्याचा अनुभव घेणे हा मानवाचा महापुरुषार्थ नव्हे का? सृष्टीयंत्रात कोणतीही गडबड न माजविता सस्वरुपाची ओळख पटवून घेणे यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे. एखाद्या सृष्ट पदार्थाचे ज्ञान असावयाचे पण आपण स्वत: कोण याचे ज्ञान नसावयाचे हा आत्मघातच. म्हणून न दिसणार्याण ब्रह्माचाच शोध घे, असे समर्थ म्हणतात. ज्ञानाने बुध्दीवरील अज्ञानाचे आवरण दूर झाले की स्वयंप्रकाश आत्मा आहेच.
चर्मचक्षूने न दिसणारी वस्तू ज्ञानचक्षूने शोधिली पाहिजे. अशा बर्या> रीतीने पाहत गेल्यास ब्रह्म हे सर्वत्र अगदी जवळ असून जणू काय गुप्त असल्याचे आढळून येईल. डोळ्यासमोर डोळ्यात असूनही त्यांना न दिसणारी अशी ही अजब वस्तू आहे. सर्व ठिकाणी भरलेली असूनही एखाद्या पदार्थाप्रमाणे हातावर देण्यासारखी ही वस्तू नाही. समर्थ सांगतात, करी घेतां नये टाकितां न जाये| ऐसें रुप आहे राघवाचें॥ राघवाचें रुप पाहातां न दिसे| डोळां भरलेसे सर्व काळ॥
स्थूल नव्हे सूक्ष्म नव्हे| कांही येकासारिखे नव्हे| ज्ञानदृष्टीवीण नव्हे| समाधान॥ (दासबोध)
परब्रह्माचा सुगावा लागेल व त्याच्याशी तादात्म्य होईल अशी ज्ञानदृष्टी सज्जन देऊ शकतात. त्यांच्याकडून होणार्याे महावाक्योपदेशाने ही ज्ञानदृष्टी प्राप्त होते. असे सुद्गुरुकडून ज्ञान झाल्याशिवाय जन्ममरणांतून सुटका नाही.
पदार्थापलिकडे चिरंतन अशी ही वस्तू आहे व तेच आपले स्वरुप आहे, हे कळून येते. ब्रह्म हा कांही एखादा पदार्थ नाही की जो चटकन हातात देता येईल. तो एक अनुभव आहे व तो ज्याचा त्यानेच घेतला पाहिजे. पण हा अनुभव कसा घ्यावा याचा संकेत म्हणजे निश्चअय हा सद्गुरूंकडूनच होतो.
समर्थ सांगतात,पदार्थाऐसे ब्रह्म नव्हे| मा तें हाती धरून द्यावें| असो हे अनुभवावें| सद्गुरूमुखें॥ (दासबोध) हा निश्चहय खुणेने कसा होतो हे समजण्यासाठी शाखाचंद्रन्यायाचा दृष्टांत समर्थांनी दिला आहे. अगदी सूक्ष्म कोर असलेला शुद्ध द्वितीयेचा चंद्र दिसत नाही. तो ज्याने पाहिलेला असतो तो न पाहिलेल्यास झाडाच्या विवक्षित फांदीची खूण दाखवून त्या दिशेने पाहावयास सांगतो, त्या खुणेच्या दिशेने पाहिले की चंद्रकोर दिसते. चंद्रदर्शनानंतर तो खुणेची फांदी सोडून देतो व चंद्रच पाहात राहतो. असेच सज्जनांच्या विवेचन श्रवणाने घडते. परब्रह्म हा चंद्र, महावाक्य ही फांदी, मुमुक्षु हा चंद्र पाहण्याची इच्छा करणारा व सज्जन सद्गुरू हे ज्याने आधीच चंद्र पाहिलेला असतो तो. हे श्लो्काचे विवरण झाले. येथे तत्त्वे पंचीकरण बरोबरच महावाक्याचे स्वरुप काय हे ठाऊक असणे जरुरीचे. कारण आत्मज्ञानासाठी महावाक्य उपदेश महत्त्वाचा विषय असून त्याचे विवरण हे मुख्य ज्ञान आहे, असे समर्थ म्हणतात.
महावाक्याचे विवरण| हे मुख्य ज्ञानाचे लक्षण| शुद्ध लक्ष्यांशे आपण| वस्तूच आहे॥ (दासबोध)
हे मुख्य ज्ञानदान ब्रह्मनिष्ठ, अनुभवी अशा सद्गुरूकडूनच व्हावयास हवे. चार वेदांची प्रत्येकी एक अशी चार महावाक्ये आहेत. ऋग्वेद – प्रज्ञानं ब्रह्म॥ यजुर्वेद – अहं ब्रह्मास्मि॥ सामवेद – तत्त्वमसि॥ अथर्ववेद – अयमात्मा ब्रह्म॥ चारीही महावाक्ये ब्रह्मात्मैक्य म्हणजेच जीव हा ब्रह्मस्वरूपच असा बोध करितात. महावाक्यरूप शाखेवरून संत हे ब्रह्मचंद्राची दिशा दाखवितात. परंतु मनन व अभ्यास या दोन डोळ्यांनी मुमुक्षूनेच याचा प्रत्यय घेतला पाहिजे असा या श्लोाकाचा भावार्थ आहे.
यावरून जीव =ब्रम्ह म्हणजेच गॉड पार्टीकल्स तर नाहीत ना? अशी दाट शंका येते.
तदृश्य ३:
जयपूरमधे पायाची शस्त्रक्रिया सुरु आहे,जे अमेरिकास्थित भारतीय डॉक्टर पारेख करत आहेत आणि जगभरात हि दृश्ये आंतर्जालावर LIVE बघितली जाऊ शकतात. हा नवा शोध जगासमोर आला तो म्हणजे गुगल ग्लास ह्याच्या सहाय्याने डॉक्टर शस्त्रक्रिया करत असतांना नजर न हटवता आपल्या चर्मचक्षुंच्या सहाय्याने रुग्णाचे क्ष किरण/ MRI scan बघू शकतो व फोटो व वीडीओ देखील काढू शकतो व ही दृश्ये आंतर्जालावर पाठवली जाऊन दुसऱ्या ठीकाणी असलेल्या डॉक्टरांची मदत हि instantly घेऊ शकतो.
आजच्या या जगात जो पर्यंत सद्गुरू भेटत नाही तो पर्यंत चर्मचक्षुंवरच आपली श्रद्धा/विश्वास ठेवत असतो, यात काही गैर नाही.
कळावे, लोभ असावा
आपला लाडका: आयुर्हीत
ता.क. संपादक मंडळाने सांगितल्याप्रमाणे हे सदर चर्चाकारांकरता व चर्चाप्रस्तावकांकरता खास राखून ठेवले आहे. आपण मराठी माणसं वैचारिक, आणि बुद्धीवादी वगैरे चर्चा करण्यात एकदम पटाईत असतो.येथे होणार्या चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी इच्छा आहे!
बुद्धीवादी चर्चा करणाऱ्यांनीच ह्यात प्रतिसाद द्यावा हि नम्र विनंती.
प्रतिक्रिया
12 Jan 2014 - 7:41 pm | बर्फाळलांडगा
खतरनाक लिखाण. चर्म चक्षु काय ज्ञान चक्षु काय गूगल ग्लास काय....
12 Jan 2014 - 8:03 pm | चित्रगुप्त
लेख आवडला.
सदा स्वरूपानुसंधान
हे मुख्य साधुचे लक्षण
जनी असोन आपण
जनावेगळा.
12 Jan 2014 - 8:56 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर
छान मांडणी.
12 Jan 2014 - 9:33 pm | प्यारे१
लेख आवडला.
डोळ्यांमध्ये विशिष्ट अंजन घातले असता जसे गुप्तधन दिसते असा समज आहे तसे सद्गुरुं च्या कृपेने आपली नजर बदलून जाते अशा अर्थाची ओवी दासबोधामध्ये आहे.
संपादकांना विनंती: दोनदा प्रकाशित झालेला नि अनावश्यक भाग काढून टाकता आला तर पहावे. (उतना तो कर ही सकते हो आप! ;) )
12 Jan 2014 - 10:06 pm | आयुर्हित
बर्फाळलांडगा,चित्रगुप्त,टॉपगिअर्ड फिलोसॉफर,प्यारे१
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
स्वाक्षरी/अंतिम पंक्ती/tag lines खूप छान आहेत.मनापासून आवडल्या.
आणि हो, संपादकांना व्यनि विनंती केलेली आहेच.
कळावे, लोभ असावा
आपला लाडका: आयुर्हीत
12 Jan 2014 - 11:21 pm | खटपट्या
लेख तीनदा टाईप झालाय का ?
का फक्त मलाच तसं दिसतंय ?
13 Jan 2014 - 1:18 am | काळा पहाड
अवघड आहे. हिग्ज बोसॉन मूलकणांचे आस्तित्व "असू शकण्याचा" प्रयोग सिद्ध झाल्यापासून प्रत्येक सोमाजी गोमाजी कापसे गॉड पार्टीकल बद्दल बोलायला लागलाय. मुळात लीऑन लिडरमन नुसार या मुलकणाला "गॉड डॅम पार्टीकल" (याचं मराठी रुपांतरण "हे भगवान! मुलकण" असं होवू शकतं का?) असं नाव ठेवलं जायला हवं होतं. कारण हा मूलकण सापडतच नव्हता. अति उत्साही लोकांनी त्याचं संपूर्ण विरुद्ध नाव उचललं. हा मुलकण पदार्थाला वस्तूमान देतो. आणि याचा जीव, ब्रम्ह, ढमका, फलाणा या गोष्टींशी काहीही संबंध नाहीये. तेव्हा संशोधक अशा गोष्टींच्या संशोधनासाठी आकाश पाताळ एक करत असताना उगाचच या गोष्टींवर तरी अंधश्र्द्धा तयार व्हायला नकोत. तो गोंधळ प्राचीन भारत वर्षातली विमानं, अवकाशयानं, मिसाईल्स वगैरे त्या भागात चालू दे. उगाच क्वांटम थियरी, नॅनो सायन्स, जेनेटीक्स इत्यादी भागात लुडबूड करू नये ही नम्र विनंती.
13 Jan 2014 - 3:47 am | आयुर्हित
खरोखर अवघड आहे.आणि म्हणूनच समजून घ्यायचा प्रयत्न करतोय.
जीव=ब्रम्ह म्हणून ते ढमका,फलाणा होत नाही.
संशोधक अशा गोष्टींच्या संशोधनासाठी आकाश पाताळ एक करत असताना नेमके त्यांना हि कल्पना सर्व प्रथम कोणी सुचवली हेच तर आपण शोधतोय! यात अंधश्रद्धा आली कुठून?
उलट अंधश्रद्धा होती म्हणून तर आज पर्यंत कोणी हा कण शोधला नाही. ज्या दिवशी त्याचे श्रद्धेत रुपांतर झाले, सर्व शोध घ्यायला पाठबळ मिळाले व शोध लागले. (म्हणजे परत एकदा लागले म्हणजे जगासमोर आले)
लीऑन लिडरमन ज्या "गॉड (डॅम?) पार्टीकलचा" शोध लावताय तो एका भौतिक कणाचा (ज्याला कुणीही ढमकाकण,फलाणाकण म्हणू नये),ती कल्पना एका भारतीय शास्त्रज्ञाचीच होती.
"गॉड (डॅम?)पार्टीकल" याचे मुळचे नाव सोमाजी गोमाजी कापसे मूलकण नसून (हिग्ज पण नाही तर फक्त)"बोसॉन मूलकण" हि कल्पना मुळातच "पद्म विभूषण सत्येंद्र नाथ बोस या भारतीय शास्त्रज्ञाची, जी त्याने १९२४ साली लावली.हि कल्पना अल्बर्ट आईन्स्टाइन नेही उचलून धरली.ह्या संकल्पनेवर बऱ्याच लोकांना नोबेलही मिळाले पण बोसना नाही मिळाले हे आमचे भारतीयांचे दुर्दैव.
कळावे, लोभ असावा.
आपला लाडका: आयुर्हीत
13 Jan 2014 - 8:53 am | धन्या
मोठे व्हा.
नोबेल, ऑस्कर यांसारखे पुरस्कार जागतिक पातळीवरील त्या त्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असले तरीही केवळ हा पुरस्कार नाही मिळाला तर ते दुर्दैव मानण्यासारखे काहीही नाही. हे पुरस्कार मिळाला तर तो शोध, वैज्ञानिक किंवा चित्रपट जगाच्या कानाकोपर्यात पोहचेल हे जरी खरे असेल तरे हे पुरस्कार नाही मिळाले तरी त्या शोधाचे किंवा चित्रपटाचे महत्व कमी होत नाही.
दासबोधावर प्रवचन करणार्या व्यक्तीने भारतीय शास्त्रज्ञाला त्याच्या कामासाठी नोबेल नाही मिळाले म्हणून "बऱ्याच लोकांना नोबेलही मिळाले पण बोसना नाही मिळाले हे आमचे भारतीयांचे दुर्दैव." असे म्हणत उसासे टाकणे हे मात्र नक्कीच दुर्दैवी आहे.
13 Jan 2014 - 12:42 pm | अनिरुद्ध प
तसेच अभ्यासपूर्ण प्रतिसाद्,माहितीचे संकलन छान झाले आहे.
13 Jan 2014 - 1:24 pm | मारकुटे
तीनही दृश्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. पिरिएड.
पहिले दृश्य हे केवळ भक्तीभाव मनात जागृत व्हावा यासाठी रचलेली ( र च ले ली ) कथा आहे. कदाचित आधीच्या काळात ही केवळ हॅरी पॉटर पध्दतीची कथा असेल, मात्र काळाच्य ओघात भक्तीचा शेंदूर चढवला जाऊन किंवा चढून कथेचे आजचे स्वरुप समोर आले आहे.
दुसरे दृश्य हे केवळ तत्वज्ञानातील गृहीत कल्पनेचा विस्तार आहे. त्याचा आणि भौतिकशास्त्रातील सिद्धांताचा मेळ घालणे शक्य नाही. साम्य शोधता येईल पण त्यावर आधारुन कल्पना विस्तार करायला गेल्यास तेल गेले तुप गेले हाती धुपाटणे आले अशा पद्धतीने तत्वज्ञान (अध्यात्म) जाईल भौतिक शास्त्र पण जाईल आणि हातात अगडबंब अध्यात्मातील विज्ञान वा विज्ञानातील अध्यात्म असा धड ना तत्व धड ना ज्ञान असा शब्दबंबाळ ग्रंथ मात्र उरेल. मानवाला त्यापासून शून्य लाभ. अध्यात्म आणि विज्ञान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे खरं पण दोन्ही बाजू आपल्या बाजून पूर्ण खर्या आणि विरुद्ध बाजूने एकमेकांशी जोडलेल्या आहेत. एक बाजू पाहू गेल्यास दुसरी काही काळ झाकावी लागतेच लागते.
तिसरे दृश्य ओढून ताणून आणलेले आहे. इंद्रियांपेक्षा बुद्धी अधिक श्रेष्ट असावी असा आमचा एक अंदाज आहे.
लेखन मनोरंजक आहे. विशिष्ट हेतूने केले आहे. त्यामुळे प्रयोजन साध्य होऊ शकते. :)
13 Jan 2014 - 2:09 pm | आयुर्हित
काळा पहाड, धन्या, अनिरुद्ध,मारकुटे
अभिप्राय मनापासून आवडले, धन्यवाद!
कळावे, लोभ असावा
आपला लाडका: आयुर्हीत
13 Jan 2014 - 2:53 pm | विटेकर
श्री. मारकुटे आणि काळा पहाड यांच्या प्रतिसादाशी काही अंशी सहमत.
गॉड पार्टिकल आणि परब्रह्म एक आहे हे पट्वण्याचा एक क्षीण प्रयत्न केला आहे... आमच्या पूर्वजांनी "हे ही " पूर्वीच सांगून ठेवले आहे हे सांगण्याचा खटाटोप आहे. कदाचित ते खरे ही असेल पण लेख वाचून ते तर्क सुसंगत आहे असे वाटत नाही.
एक वैयिक्तिक सल्ला - असे पट्वून देण्याचा फार प्रयत्न करु नये. जर ते सत्य असेल तर ते नक्किच समोर येईल. त्याचा गाजावाजा नाही केला तरीही !
बाकी माझ्या समजुतीप्रमाणे -
मूळारंभ हा शब्द परब्रह्माच्या ठिकाणी जे चंचळ्त्व निर्माण झाले ( एको हं बहुस्याम ..) त्यातून गुणमाया म्हणजेच गुण-- क्षोभिणी आणि त्यातून अष्टधाप्रकृती आणि त्याद्वारे सृष्टीचा पसारा म्हनून तो मूळारंभ होय ! सर्वा गुणांचा म्हणजे त्रिगुणांचा ! गणाधीश जो आहे तो त्या कार्यकर्त्या गुणांचा !(समर्थांचा गणपती हा कार्यकर्ता गणपती आहे - दशक १ समास २ )
गमू पंथ आनंत या राघवाचा म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी असा प्रवास , त्या मार्गावरील वाट्चाल .. राघव हा उल्लेख इथे दाशरथी रामाचा नसून आत्मारामाचा आहे ! " आनंत " पंथ हा व्यक्तातून पुन्हा अव्यक्तात जाण्याचा आहे म्ह्णून तो आनंत ! ब्याक टू स्क्वेअर वन !
पण हीगेन बोस चे पार्टिकल हे गुणरुप आहेत .. त्याची तुलना करायची झाली तर ती गुणक्षोभिणी मायेशी करावी लागेल. कारण परब्रह्माच्या ठिकाणी कसलेच कर्तृत्व नाही .. ते निर्विकल्प , निराकार , निराभास , निरावेव,निरंजन ,निरंतर , नि:प्रपंच ( एकून ४२ नावे दशक ९ समास १ )आहे , ते काहीही करत नाही ( सदा संचले येत ना जात काही )त्यामुळे हिगेन बोस च्या कणांची तुलना परब्रह्माशी करता येत नाही !
पण अशी साम्यस्थळे शोधून आटापिटा करायची खरेच आवश्यकता नाही . जगाला पटेल तेव्हा पटेल ! आपण पावलापुरता प्रकाश पहावा आणि नरदेहाचे सार्थक करुन घ्यावे.
तिसरे दृष्य हे महाभारतातील धृतराष्ट्राला गीता सांगणार्या संजयाची दिव्य दृष्टी असे फारतर म्हणता येईल.
13 Jan 2014 - 8:12 pm | आयुर्हित
धन्यवाद, आपले मार्गदर्शन बहुमोल आहे.
१००% सहमत.भारतीय दर्शनशास्त्रात भौतिक(माया)आणि आधीभौतिक(ब्रह्म)हा फरक अगदीच स्पष्ट सांगितला आहे.
हे मात्र मान्य नाही.
कारण माया ही परब्रह्मातूनच तर उत्पन्न झाली आहे त्यात सर्व काही आले.
आपल्या सर्वच पुराणकालीन/महाभारत कालीन वाङमयात "रूपकाचा" जास्त वापर झालाय आणि त्यामुळे असे बरेच काही कूटप्रश्न आहेत/पडत असतात, कदाचित जे येत्या काळात चर्चा घडवून आणतीलही!
कळावे, लोभ असावा
आपला लाडका: आयुर्हीत
13 Jan 2014 - 8:31 pm | प्यारे१
>>>परब्रह्माच्या ठिकाणी कसलेच कर्तृत्व नाही.
करुन अकर्ता, भोगून अभोक्ता अशा संज्ञा त्यामुळेच आल्या आहेत. :)
विटेकर काकांनी पूर्ण प्रतिसाद योग्य प्रकारे लिहीलेला आहे.
मी तीन गोष्टींमधलं साम्य म्हणजे दृष्टी बदलणे एवढंच लक्षात घेतलं होतं.
14 Jan 2014 - 11:48 am | अनिरुद्ध प
हा गहन विषय आहे तरी,
>>>परब्रह्माच्या ठिकाणी कसलेच कर्तृत्व नाही.
हे जरा उलगडुन सान्गीतले तर उत्तम
13 Jan 2014 - 11:42 pm | मारकुटे
>>कारण माया ही परब्रह्मातूनच तर उत्पन्न झाली आहे
कशी?
14 Jan 2014 - 10:00 am | धन्या
तसं पोथ्या, पुराणे आणि ग्रंथांमधून लिहिलंय. ज्यांनी लिहिलंय ते ज्ञानी होते.
14 Jan 2014 - 1:21 pm | प्यारे१
ज्याप्रमाणे आकाश शांत असताना काहीही जाणवत नाही मात्र अचानक वारा वाहू लागतो तेव्हा आपल्याला जाणवतं तसं परब्रह्मामध्ये हालचाल झाली (जसं बिग बँग झालं तसंच.) नि त्यातून मूळमाया निर्माण झाली.
हे सगळं एकत्रच झालं. त्यानंतर पुढचा विचार. (जसं इव्होल्युशन झालं)
पृथ्वी असताना काहीतरी अवकाश आहे, ती नसतानाही असेल. पृथ्वी नव्हती तेव्हा ही ते होतं. त्या अवकाशाला आपण आपल्या कालगणनेनुसार नि कालग णनेमुळे पूर्वी, आज, भविष्यात वगैरे मानतो. अवकाशाच्या दृष्टीनं काहीही नाहीये.
पुन्हा तेच वाद, विवाद, संवाद.
हे सगळं कसं झालं हे समजून घेऊन करायचं काय? त्यानं आपले प्रश्न सुटणारेत का? आपलं जग मर्यादित असतं. त्याचा प्राथमिकतेनं विचार करुन अनावश्यक विचारांना एका मर्यादेपर्यंत फाटा च देणं इष्ट.
14 Jan 2014 - 1:43 pm | प्रचेतस
आकाश का अवकाश?
14 Jan 2014 - 1:49 pm | प्यारे१
आधी च्या वाक्यात आकाश (जमिनीवरचा वातावरणाचा भाग) , नंतरच्या वा़क्यामध्ये अवकाश (स्पेस)
14 Jan 2014 - 1:51 pm | प्रचेतस
ओके
14 Jan 2014 - 2:02 pm | मारकुटे
>>>परब्रह्मामध्ये हालचाल झाली (जसं बिग बँग झालं तसंच.) नि त्यातून मूळमाया निर्माण झाली.
हे सगळं एकत्रच झालं. त्यानंतर पुढचा विचार. (जसं इव्होल्युशन झालं)
ही हालचाल किंवा काय जे असेल ते का झाले?
>>>>हे सगळं कसं झालं हे समजून घेऊन करायचं काय?
का? ज्ञानासाठी ज्ञान नसावं का?
>>>>त्यानं आपले प्रश्न सुटणारेत का? आपलं जग मर्यादित असतं.
सगळेच संदर्भ प्रश्न सुटण्यावर का असावेत? मर्यादीत जग असलं तरी ज्ञान मर्यादीत नसतं ना? घ्यावा की शोध
>>> त्याचा प्राथमिकतेनं विचार करुन अनावश्यक विचारांना एका मर्यादेपर्यंत फाटा च देणं इष्ट.
हा सोइस्कर युक्तीवाद आहे. पळवाट आहे.
14 Jan 2014 - 2:19 pm | प्यारे१
पळवाट म्हणताय? म्हणा.
उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत रहा. शुभेच्छा!
माझं मतः
१. असं का झालं ह्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकणार नाही ह्याबाबत खात्री आहे. (मुळात विचारणारे आपण कोण?)
२. पहिलं विधान चुकीचं आहे ह्याचं उत्तर मिळेपर्यंत तुम्ही शिल्लक असाल ह्याची खात्री नसेल. पुढच्या पिढ्यांसाठी करायचं असेल तर करावं.
३. आपल्याला काय साध्य करायचं आहे ह्याचा विचार आधी करावा.
४. ज्या मार्गानं विज्ञान जातंय त्याच्या समांतर मार्गानं भारतीय तत्त्वज्ञान मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतं त्यासाठी स्वत:च (प्रथमपुरुषी एकवचनी) काही गोष्टी कराव्या लागतात ते करण्याची तयारी नसते.
हे सगळं मान्य नसल्यास पहिल्या दोन वाक्यांचा अवलंब करायला आपण स्वतंत्र आहात. धन्यवाद.
15 Jan 2014 - 11:32 am | मारकुटे
१.ओके
२.ओके
३.ओके
४. हा निष्कर्ष कसा काढला?
ब्रह्म आणि माया एकमेकांशी कसे संबंध्द आहेत ते सांगा
14 Jan 2014 - 2:21 pm | विटेकर
ही हालचाल किंवा काय जे असेल ते का झाले?
याचे प्लेन उत्तर " माहीत नाही " हेच आहे !! ही त्या परमात्म्याची लीला आहे . आपण एकाचे बहु व्हावे असे त्याला/ तिला का वाटले ? माहीत नाही!
? When Swami Vivekananda had gone to Europe, in one of his lectures, one question was put to him: why had God created this world? Swamy Vivekanand answered, the Indian philosophers have given the boldest answer to this question, we don't know,. It is Leela.
15 Jan 2014 - 11:46 am | धन्या
"एकोहं बहुस्याम" आणि कर्माचा सिद्धांत हे भारतीयांनी लावलेले दोन अफलातून शोध आहेत. :)
14 Jan 2014 - 2:15 pm | विटेकर
सुखी व्हायचं ! प्रपंचात जितके सुवर्ण महत्वाचे तितकेच परमार्थात पंचीकरण ! तेव्हा पंचीकरण समजणे महत्वाचे !
.....तुटे संशयाचे मूळ येकसरा !
प्रश्न सुटणार नाहीत तर प्रश्न हे प्रश्नच वाटणार नाहीत !
अगा जे झालेची नाही , त्याची वार्ता पुसशी काई ?
बिल्कुल नाही , जेवढे संकोचून लहान व्हाल तेवढा त्रास अधिक होईल.
स्ंकोचून काय झालासे लहान , घेई आपोषण ब्रह्मांडाचे !
तुटे वाद संवाद तो हितकारी !!
विवरता विशेषा विशेष कळू लागे !
चूक भूल द्यावी - घ्यावी !
14 Jan 2014 - 2:34 pm | बॅटमॅन
विटेकरांशी प्रचंड सहमत!!!!! स्वतःचा संकोच जितका करू तितके जगापासून तुटत जातो. झापडे बांधलेल्या घोड्यासारखी अवस्था होते. "मला काय त्याचे" ही प्रवृत्ती एकदा का या ना त्या ठिकाणी बळावली की संपले. कुठलं अध्यात्म आणि कुठली जागृती?????
14 Jan 2014 - 2:40 pm | प्यारे१
प्रश्न :
पंचीकरणाचं ज्ञान कुठल्या साधनांद्वारे मिळवणार?
त्या साधनांचा वापर करण्याची समोरच्या व्यक्तीची तयारी आहे का?
निव्वळ वाद विवादात कापाकापी करण्यासाठी प्रश्नांची बरसात होते का?
ज्ञानासाठी ज्ञान मिळवायचा मार्ग आपण म्हणता आहात 'स्वतःचं शरीर नि मन हे साधन वापरुन होऊ शकतो' हे प्रश्न विचारणाराला मान्य आहे का?
तसे नसल्यास पुढे काय करावे?
व्यावहारिक जग मर्यादित असत नाही का?
आपोषण ब्रह्मांडाचं घेण्यासाठी कोणती स्थिती आवश्यक असते?
ती स्थिती कुठल्या साधनांद्वारे मिळवणार?
14 Jan 2014 - 2:43 pm | बॅटमॅन
वरील प्रश्न पाहता हा प्रश्न विशेष आवडला.
14 Jan 2014 - 3:08 pm | विटेकर
उत्तर :
>>>>>पंचीकरणाचं ज्ञान कुठल्या साधनांद्वारे मिळवणार?
नरदेहाद्वारे !
नरदेहीं येऊन सकळ| उधरागती पावले केवळ |येथें संशयाचें मूळ| खंडोन गेलें ||२०||
>>>>>>त्या साधनांचा वापर करण्याची समोरच्या व्यक्तीची तयारी आहे का?
समोरच्याचे जाउ दे , तुमची आहे का ? तुमची असेल तर समोर्च्याशी बोलता येईल नाही का ?
>>>>निव्वळ वाद विवादात कापाकापी करण्यासाठी प्रश्नांची बरसात होते का?
आम्ही आधीच सांगितले आहे , तुटे वाद संवाद तो हितकारी !
>>>>>ज्ञानासाठी ज्ञान मिळवायचा मार्ग आपण म्हणता आहात 'स्वतःचं शरीर नि मन हे साधन वापरुन होऊ शकतो' हे प्रश्न विचारणाराला मान्य आहे का?
म्हणजे तुम्हाला मान्य आहे असे समजायचे ना ?
>>>>>तसे नसल्यास पुढे काय करावे?
तसे नसल्यास सोडून द्यावे ! हाय काय आणि नाय काय !
दोहींवेगळा तिजा नुद्धरे| तरी महिमा कैंचा उरे |असो हें जाणिजे चतुरें| येरां गाथागोवी ||३५||
>>>>>व्यावहारिक जग मर्यादित असत नाही का?
नाही.. आपण वाढवू तेवढे वाढते ! विश्वाचा आकार केवढा? ज्याच्या त्याच्या डोक्याएव्ढा !!
जितुका व्याप तितुकें वैभव| वैभवासारिखा हावभाव |समजले पाहिजे उपाव| प्रगटचि आहे ||२६||
>>>>आपोषण ब्रह्मांडाचं घेण्यासाठी कोणती स्थिती आवश्यक असते?ती स्थिती कुठल्या साधनांद्वारे मिळवणार?
साधन - नरदेह आणि सदगुरु कृपा आणि अनन्यता असेल तर सारे साध्य आहे
सद्गुरुकृपेस्तव| झाला संसार वाव |ज्ञान झालिया ठाव| पुसे अज्ञानाचा ||३७||
आहे तितुकें नाहीं झालें| नाहीं नाहींपणें निमालें |आहे नाहीं जाऊन उरलें| नसोन कांहीं ||३८||
तिळ्गुळ घ्या गोड बोला
14 Jan 2014 - 3:15 pm | प्यारे१
>>> साधन - नरदेह आणि सदगुरु कृपा आणि अनन्यता असेल तर सारे साध्य आहे
हेच 'आम्हाला' मान्य नसतंय हो काका! ह्यात काही दिसतं/दाखवता कुठं? अनुभव येतो निव्वळ.
>>> तसे नसल्यास सोडून द्यावे ! हाय काय आणि नाय काय !
तेच तर केलं ना वर! ;)
15 Jan 2014 - 11:52 am | धन्या
या धाग्यावर चाललेल्या चर्चेला कितपत अर्थ आहे हे माहिती नाही. मात्र विटेकरांची नम्रता, त्यांचं एकंदरीत या विषयाचं आकलन पाहता अशा अध्यात्माने देव भेटेल किंवा मोक्ष मिळेल का हे माहिती नाही. मात्र आयुष्याचं सोनं निश्चित होईल.
14 Jan 2014 - 2:31 pm | बॅटमॅन
साफ असहमत. ज्ञानासाठी ज्ञान मिळवणार्यांना वेड्यातच काढलेत की याद्वारे!!! याइतकी चुकीची विचारसरणी पाहिली नाही.
14 Jan 2014 - 2:41 pm | प्यारे१
ओके!
14 Jan 2014 - 3:03 pm | धन्या
तुमच्या लिखाणातील ठामपणा पाहता परब्रह्मामध्ये हालचाल होऊन त्यातून मूळमाया निर्माण होताना तसेच बिग बँग होत असताना तुम्ही तिथे हजर होता असेच वाटते. :)
14 Jan 2014 - 3:11 pm | बॅटमॅन
अरे धनोत्तम, असं काय करतोस, पुरावा आहे, उगाच नाही सांगत!!!!
असे आम्ही उभे..तिथून आलं परब्रह्म!! अरे त्याच्यासारखं ते... अचानक मग ते हललं रे ! मग मूळमाया तयार झाली!!! मग परब्रह्म मायेला म्हणालं, "बेटा, पडदा निकालो, डरनेकी होई बात नही"!!! मग म्हणालं, "अशीच जर माया मिळाली असती, तर आम्हीही नश्वर झालो असतो!!!"
आणि काय सांगू तुला धनोत्तम, त्या महामायेच्या डोळ्यांतून टपटप अश्रू ओघळले. त्यांच्यापासून आकाशगंगा झाली. मग परब्रह्माने तिला या नश्वर जगात पाठवली.
14 Jan 2014 - 3:14 pm | विटेकर
बट्ट्मन तात्या , झकास !
14 Jan 2014 - 3:17 pm | गवि
तात्या, किती अगरबत्त्या विकल्या गेल्या आज?
लेलेवाड्यातून पाच छत्र्यांची ऑर्डर आहे, लक्षात आहे ना? नायतर नेनेवाड्यात पोचवाल..
14 Jan 2014 - 3:25 pm | बॅटमॅन
अहो बक्कळ विकल्या गेल्या की. नाय म्हणायला तेवढी चवलीची मोड घेऊन अधेली परत केली बघा =))
14 Jan 2014 - 4:13 pm | पिलीयन रायडर
गप की मेल्या...!!!
14 Jan 2014 - 4:17 pm | बॅटमॅन
का ओ आज्जी उगा नातवांना गप्प करताय????
14 Jan 2014 - 4:37 pm | पिलीयन रायडर
वर एवढी गंभीर चर्चा चालु आहे.. ब्रह्म आणि माया आणि काय न काय... आणिक अचानक माया पदर काय उचलतेय आणि डोळ्यातुन अश्रुच काय आले..!!!
मी हसुन हसुन मेले ना..
14 Jan 2014 - 4:49 pm | बॅटमॅन
बहुत धन्यवाद ;) =))
21 Jan 2014 - 3:29 pm | पैसा
एवढ्यात आणंद साजरा क्रू नै!
21 Jan 2014 - 4:27 pm | प्यारे१
१. अरेरे!
२. अरे वा!
३. हह्ह्ह्ह्ह्ह! (सुस्कारा)
४. :-/
21 Jan 2014 - 4:49 pm | कवितानागेश
भयानक प्रतिसाद! =))
धमुची आठवण होतेय..
3 Jul 2014 - 11:15 am | अधिराज
एक नंबर,अगदी चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.
लेखापेक्षा हा प्रतिसाद जास्त विनोदी आहे हे नमूद करतो.
14 Jan 2014 - 3:13 pm | विटेकर
तुम्ही ही होतच की !
आपण सगळेच होतो की! किंब्हुना तू मी आपण असले भेद तेव्हा नव्हतेच ! सारे एकच होते ! आणि पुन्हा एक होणार आहोत .. नव्हे आताही एक्च आहोत , तो अज्ञानाचा पडदा दूर केला की झाले !
वेगळेपणाची माता| ते लटिकी वंध्येची सुता |म्हणूनियां अभिन्नता| मुळींच आहे ||३५||
14 Jan 2014 - 3:27 pm | आयुर्हित
१००% सहमत
मानले विटेकर सर आपणास!
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ॥
आइका जी तुम्ही भक्त भागवत। कराल ते हित सत्य करा॥
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर। वर्म सर्वेश्वरपूजनाचे॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदु:ख जीव भोग पावे॥
आपला लाडका: आयुर्हीत
14 Jan 2014 - 3:28 pm | धन्या
फक्त एक सांगा, या ओव्या ज्ञानेश्वरीमधील आहेत का? :)
14 Jan 2014 - 3:37 pm | प्यारे१
दासबोध.
14 Jan 2014 - 3:43 pm | अनिरुद्ध प
ज्ञानेश्वरी ही तुकारामांनी लिहीली का ज्ञानेश्वरांनी? कारण वरच्या अभंगात तुकारामांचा उल्लेख जाणवला म्हणुन विचारले हो(आमचा गावठी प्रष्ण हो )
14 Jan 2014 - 3:45 pm | बॅटमॅन
आमच्या माहितीप्रमाणे सच्चिदानंदबावांनी.
14 Jan 2014 - 3:54 pm | प्यारे१
हा हा.
गविंचं लेखन टंचनिका माफ करा टंकनिका करत असली तरी श्रेय गविंना देता ना? ;)
@ अनिरुद्ध प,
धन्यानं तो प्रश्न विटेकर काकांनी दिलेल्या ओवीच्या संदर्भात विचारला असावा.
आपला प्रतिसाद कुणाच्या खाली तिरका आला आहे ते पाहिले की लक्षात येतं बघा.
आपल्या लाडक्या आयुर्हित ह्यांनी नंतर वेगळा अभंग मांडला तो तुकाराम महाराजांचा आहे.
(@अनिरुद्ध प, ख व चेक करावी)
14 Jan 2014 - 4:04 pm | अनिरुद्ध प
ते तर स्वता धनाजीरावानी धागा काढुनच सिद्ध केले आहे,पण मला वरच्या श्री आयुर्हित यानी दिलेल्या ओव्या बद्दलच्या प्रष्णाबद्दल वाटल्या म्हणुनच कारण धनाजीरावान्चा प्रष्ण हा कोणाला होता तेच कळले नाही.
14 Jan 2014 - 4:11 pm | विटेकर
वरती एकदा "हा हा" आणि एकदा "हो हो" असा प्रतिसाद आला म्हणून माझा "ही ही " ( की हि हि असा असायला हवा ?)
आता पुढचा हु हु असा असला पाहीजे की हू हू ????
15 Jan 2014 - 12:01 pm | अनिरुद्ध प
हू हू पर्यन्त ठिक आहे पण त्यापुढे तू तू लागायला नको म्हणजे मिळवले कसे?
14 Jan 2014 - 4:19 pm | धन्या
मी काहीही सिद्ध केलेलं नाही हो. परब्रम्हातून माया वेगळी होताना, बिग बँग होताना, इतकंच काय ज्ञानदेवांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी लिहून घेताना मी हजर नव्हतो.
माझं ते लेखन कथा स्वरुपातील होतं जे माझ्या वाचनावर आधारीत होतं. त्यात तथ्यांश असेलच असं नाही.
14 Jan 2014 - 10:59 am | कवितानागेश
कशीबशी!! ;)
14 Jan 2014 - 2:16 am | अर्धवटराव
नॉट अगेन.
14 Jan 2014 - 9:37 am | विटेकर
तुम्ही "रेडी टू थिंक" वाले ना ?
मग आता द्या की उत्तर !
14 Jan 2014 - 10:39 am | अर्धवटराव
पण प्रश्न काय आहे?
14 Jan 2014 - 10:42 am | विटेकर
प्रश्न असा आहे की " कशी?"
14 Jan 2014 - 10:49 am | अर्धवटराव
आमच्या सत्यसंकल्पात सामिल झाल्याबद्दल आभारी आहोत.
>>प्रश्न असा आहे की " कशी?"
-- आता असते एकेकाची मर्जी. आपण व्यक्ती/अव्यक्तीस्वातंत्र्य स्वीकारलं पाहिजे.
14 Jan 2014 - 1:25 pm | प्यारे१
>>>सत्यसंकल्पात
सातत्य आवश्यक असण्याची पहिली पायरी तुम्ही यशस्वीतेनं पार पाडली आहे. एका धाग्यावर केलेला सत्यसंकल्प दुसर्या धाग्यावर आणून आवश्यक विस्कळीतपणा बर्यापैकी जमतो आहे.
कीपीटप! =))
14 Jan 2014 - 10:50 am | बर्फाळलांडगा
त्यातून आपणास काही विशेष सुख मिळते काय?
14 Jan 2014 - 12:26 pm | शशिकांत ओक
अशी अटच घातल्याने निर्बुद्धींनी जे जे लिहिले ते ते पहावे, समजले तर वाचावे...
14 Jan 2014 - 6:24 pm | प्रसाद गोडबोले
मला असले धागे आवडत नाहीत
*NO*
15 Jan 2014 - 12:25 pm | मारकुटे
उगी उगी
क्लिक करु नाही अशा धाग्यांना ...
16 Jan 2014 - 2:34 pm | म्हैस
वितेकरनचे सगळे प्रतिसाद आवडले आणि त्यांच्या सगळ्या प्रतिसादाशी सहमत आहे. .
3 Jul 2014 - 5:00 am | भृशुंडी
खत्त्तरनाक लेख.
अजून येऊ द्या.