रेसिडेंट एरिया मधील इंडस्ट्री ...

mahajana cha ganya's picture
mahajana cha ganya in काथ्याकूट
3 Jan 2014 - 7:18 pm
गाभा: 

सहा महिन्या पूर्वी नवीन फ्ल्याट घेतला . सोसायटी जवळ एक इंडस्ट्री आहे जिचा आवाज दिवस रात्र येत आसतो . त्यात काम करणारे कामगार दिवस रात्र एक मेकांची आई बहिण मोठ्या आवाजात काढत आसतात . आवाजाच्या त्रासाची कंपनी च्या मालक कडे तक्रार करून उपयोग झाला नाही ..कोणाकडे तक्रार करावी कुणाला माहिती आहे का .

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

3 Jan 2014 - 7:25 pm | चिरोटा

कामगारांच्या आया/बहिणींकडे? ह्.घ्या.
पोलिसांकडे सांगा.

अनिरुद्ध प's picture

3 Jan 2014 - 7:37 pm | अनिरुद्ध प

त्रास आपल्या एकट्यालाच होतो का? तसे नसेल तर सोसायटी मधील जे ईतर हा त्रास भोगणारे असतिल त्यानी एकत्र येवुन या विषयावर लढा द्यावा असे वाटते,बाकी जाणकार(मि पा वरचे) योग्य तो सल्ला देतिलच.

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Jan 2014 - 8:03 pm | राजेंद्र मेहेंदळे

तुम्ही जागा घेताना बघुन घेतली नाही का? असो पूर्ण सोसायटीने मिळून कायदेशीर लढा देणे योग्य राहील.

खडुस's picture

7 Jan 2014 - 1:16 am | खडुस

नियमाप्रमाणे कंपनी जर महानगरपालिका क्षेत्रात येत असेल तर बरंच काही करु शकता .पण आधी त्या कंपनीच्या मालकाशी /व्यवस्थापनाशी बोलून त्यांना तुम्हाला होणारा त्रास सांगून बघावं.नं भांडता काम होत असेल तर कशाला ऊगाच पुढे जायचं?

प्रसाद१९७१'s picture

7 Jan 2014 - 2:25 pm | प्रसाद१९७१

ह्याच विषयावर २०-२५ वर्षा पूर्वी एक नभोनाट्य ऐकले होते. त्यात तुमच्या सारखाच एक त्रासलेला माणुस आवाज बंद व्हावा म्हणुन खुप प्रयत्न करतो. पोलिसांकडे जातो, नगरसेवका कडे जातो. काही उपयोग होत नाही. उलट त्याला धमक्या मिळतात आणि तो घाबरुन वेडा होतो.

आनंदी गोपाळ's picture

7 Jan 2014 - 10:22 pm | आनंदी गोपाळ

सोसायटी इंडस्ट्रियल एरियात नाहिये ना? :)

विद्युत् बालक's picture

7 Jan 2014 - 10:45 pm | विद्युत् बालक

तुमच्या अडचणी वरून एक इंग्लंड मधील किस्सा आठवला .

एका माणसाने त्याच्या शेजाऱ्याची बायको रतिक्रीडा करत असतात प्रचंड दीर्घकाळ ओरडायची म्हणून त्याने न्यायालयात धाव घेतली होती तेव्हा न्यायालयाने शेजाऱ्याला (बायकोला नव्हे ! =)) ) सणकून दंड ठोठावला होता ! :)

महायोग's picture

11 Jan 2014 - 6:33 am | महायोग

यासाठि आपन उप विभागिय दन्डाधिकारि यान्चेकडे तक्रार नोन्दवावि

तिमा's picture

12 Jan 2014 - 10:08 am | तिमा

तुमची सोसायटी कुठे आहे ते माहित नाही. पण हल्ली असा एक ट्रेंड होत चालला आहे की आधी सरकारच एमआयडीसी करते. तिथे रीतसर उद्योगधंदे येतात. ते स्थिरावतात. त्यानंतर भ्रष्ट राजकारणी त्याच्या जवळच बिल्डरांना घरे बांधायला परवानगी देतात.लोकं रहायला आली की त्यांना आवाजाचा, केमिकल्सच्या वासाचा त्रास होऊ लागतो. लोकांच्या रेट्यापुढे मग सरकारच त्या उद्योगांना दुसरीकडे जायला सांगते. डोंबिवली, तारापूर, बदलापूर एमआयडीसी ही त्याची उदाहरणे आहेत.