कु. सुमार केतकर
यांचे व्यक्तीमत्व रजनीकांथ आलोकनाथ इतके उंच आहे. ( नावात थ अक्षर नसले म्हणुण काय झाले?)
त्यांच्या बद्दलची काही नव्या उजीलाटा ( उचलली जीभ लावली टाळ्याला )
१) कु सुमार केतकर जे लिहीतात त्याला भविष्य कालीन वर्तमान इतिहास म्हणतात.
२) कु सुमार केतकर यांचे व्यक्तीमत्व इतके उत्तुंग आहे की चिमण्या कबुतरे तिथे शिटण्या अगोदर विचार करतात
३) कु सुमार केतकर हे जेंव्हा काही लिहायला घेतात तेंव्हा त्यांच्या मनात विचार येण्या अगोदर कागदावर उमटतो
४) कु सुमार केतकर जे लिहीतात त्याला विचार असे म्हणतात
५) कु सुमार केतकर याम्ना युवरांज्याबद्दल इतके प्रेम आहे की त्यानी त्यांच्या घरातील सर्वप्रीय प्राण्यांची नावे युवराज अशीच ठेवली आहेत. उदा: युवराज झुरळ , युवराज उंदीर , युवराज ढेकुण.ई.
६) कु. सुमार केतकर जेंव्हा एखाद्या वाईट म्हणतात तेंव्हा त्याचा अर्थ चॅनल साठी बाईट असा होतो
७) कु सुमार केतकर जेंव्हा पेन वापरतात तेंव्हा पेन कागदावर फ्रिअण्याऐवजी कागदच पेनाखाली फिरतो.
८) कु. सुमार केतकर यांच्यासाठी कोणताही दिवस हा सोनियाचा दिवसच असतो.
कु.सुमार केतकर
गाभा:
प्रतिक्रिया
8 Jan 2014 - 11:40 pm | माझीही शॅम्पेन
एकदा लहानपाणि साहेबांनी बोबडे बोल कृष्णाला ऐकवले , तेच नंतर कृष्णाने गीता म्हणून अर्जुणानला सन्गितले !!!
9 Jan 2014 - 12:04 am | रामपुरी
नाड्यांच्या (विजारीच्या नव्हे भविष्यवाल्या नाड्या) भाषेत वाचा
"सुमार केथकर"
म्हणजे हे सुद्धा साम्य आहेच...
9 Jan 2014 - 12:08 am | विजुभाऊ
कु सुमार केतकरानी भिंतीवर लिहीतायावे म्हणून चिनी सम्राटानी भिंत बांधून दिली.
कु सुमार केतकराना लिहीताना एकदा खोकला आला त्याचे पडसाद इराक मधे उमटले
10 Jan 2014 - 7:49 pm | सचीन
बालिश
9 Jan 2014 - 1:56 am | रामपुरी
सुमार केतकरचं नुस्तं नाव घेतलं तर पवारच काय पण मौजे वडींगे बुद्रुकचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा इटलीचा पंतप्रधान होऊ शकेल.
9 Jan 2014 - 10:06 am | मारकुटे
कुसुमारकेतकरांचीवटमिपावरएवढिआहेकीत्यांच्याविरुद्धलिहिलेलेप्रतिसादऊडवलेजाताततसेचधागावाचनमात्रहोतोलैडेंजरमनुक्ष.
9 Jan 2014 - 10:39 am | प्रकाश घाटपांडे
:-))
या उजीलाटांच एक मात्र बर असत की आपली लायकी किंवा क्षमता कोणी विचारत नाही! :)
9 Jan 2014 - 2:58 pm | मारकुटे
सहमत आहे. हेच टाळ्या वाजवणार्यांना पण लागू होते का विचार मनात आला.
10 Jan 2014 - 7:51 pm | सचीन
सहमत आहे. हेच टाळ्या वाजवणार्यांना पण लागू होते का विचार मनात आला.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>टाळ्या वाजवणारे निष्पाप असू शकतात. त्यात कोणाचे कौतुकही असू शकते.उजीलाटांच तस नसत मारकुटे काका!
11 Jan 2014 - 7:53 am | मारकुटे
ते तुमच्यावरुन दिसतच आहे. कित्ती निष्पाप आहात तुम्ही!
9 Jan 2014 - 10:13 pm | रामपुरी
हल्ली लायकी किंवा क्षमता कोणी विचारातच घेत नाही. कोणीही माणूस फक्त "लांगूलचालन करणे" या एकमेव गुणावर संपादक होतो मग त्याला साहित्य संमेलनात व्यासपिठावर बोलावतात. अर्थातच तो काहीही बरळतो आणि मिपावर धाग्यावर धागे निघतात. हे सर्व होतं फक्त लायकी किंवा क्षमता विचारात न घेतल्याने...
10 Jan 2014 - 7:54 pm | सचीन
खरा विद्वान
9 Jan 2014 - 12:03 pm | आनंदी गोपाळ
मळमळ पोहोचली :)
12 Jan 2014 - 4:42 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर
ही मळमळ नाही ही ओकारी काढलेली आहे.
केतकरांसारखा चौफेर लिहणारा आणि व्यासंग असणारा संपादक आज राज्यात नाही ,केतकरांच्या विचारात थोडेतरी तथ्य असणारच. केतकर परखड आहेत हे खरे...किप इट अप केतकर सर
12 Jan 2014 - 4:55 pm | वेताळ
त्याना स्पेशल ठिकाणी म्हणजे ठाणे,मिरज किंवा रत्नागिरी ला ठेवले पाहिजे.
12 Jan 2014 - 5:02 pm | बॅटमॅन
अगदी अगदी!!! मिरजेला कृपामयीचा स्टाफ ओव्हरटाईम करू लागेल त्यांच्यामुळे मात्र =))
12 Jan 2014 - 5:07 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर
अरे ज्येष्ठ पत्रकाराविषयी काय बोलत आहात, विचाराला विचाराने खोडून काढता येत नसेल तर निदान गप्प तरी बसावे ,बदनामी कशाला?
12 Jan 2014 - 5:18 pm | बॅटमॅन
बदनाम होगा तो क्या नाम ना होगा????
- कृष्णमौक्तिकाचा कप्तान जॅक स्पॅरो.
तदुपरि
गांधीस कुणा पडता मार, केवढी तकतक कर जमेल तैशी त्वां;
औषध वेडघरचि तुम्हां, मोपेड फिलॉसॉफर व्यक्तिमत्त्वां.
12 Jan 2014 - 5:20 pm | वेताळ
हे तरी पटवुन द्या.सरांसारखे उटायचे व एका व्यक्ती विषयी गळा काढुन बसायचे ह्यात कसले विचार?नरेंद्र मोदी इतका हलकट असता तर त्याला ५८% लोकानी पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला नसता.सरांचे म्हणणे खरे मानायचे तर जवळ जवळ ६०% लोकाना वेडे म्हटले पाहिजे.तुमच्या सरांची थिअरी काय आहे? बर प्रस्तापितांच्या विरुध्द बोलुन इतक्या वर्षात सरांनी काय उजेड पाडला आहे? त्याची दर्जेदार कामे तरी इथे सांगा.
12 Jan 2014 - 5:37 pm | सचीन
नाही पण वेताळा सरांच्या वक्तव्यात तत्थ्य वाटते ते अभ्यासू आहेत उगाच कुणाची बदनामी नाही करायचे
12 Jan 2014 - 8:49 pm | पिंपातला उंदीर
नरेंद्र मोदी इतका हलकट असता तर त्याला ५८% लोकानी पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला नसता
कधी ? कुठे ? कसा ? survey चे आकडे देऊन असली बेधडक विधान करत अस्ताल तर तुम्हाला कंबरेत झुकून कुर्निसात
12 Jan 2014 - 9:15 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर
काय आहे, आता केजरीवाल आले आहेत ,त्यामुळे मोदींचे आऊट ऑफ फोकस जाणे मोदीभक्तांना रुचलेले नसावे. त्यामुळे आकडे फूगवुन सांगण्यात येत आहेत.
12 Jan 2014 - 9:40 pm | टवाळ कार्टा
तुमच्याकडे खरे आकडे असतीलच ना??? द्या की मग
12 Jan 2014 - 9:46 pm | पिंपातला उंदीर
अहो हे आकडे निवडणुकी नंतरच कळतील . बाकी असले आंधळे भक्त असल्यावर मोदी आणि भाजप ला वेगळ्या शत्रूंची गरज नाही
12 Jan 2014 - 10:11 pm | टवाळ कार्टा
मग तोपर्यंत ५८% धरुन चाला...निवडणुकीनंतरच तुमचा प्रतिसाद द्या
13 Jan 2014 - 10:23 am | वेताळ
मागील एक दोन आठवड्यात हा सर्वे झाला होता. त्यात केजरीवालांना २५% व राहुल बाबा ला १४% मतदारानी पसंती दिली आहे.
13 Jan 2014 - 10:04 am | इरसाल
मराठी लेखनाला सहाय्य करणारे सॉफ्ट्वेयर चांगले काम करु लागल्याचा हा पुरावा.
किंवा मग तुम्ही फारच प्रतिभावान दिसता.
9 Jan 2014 - 12:52 pm | सचीन
विसुमार लेखन
9 Jan 2014 - 9:45 pm | सचीन
विसुमार लेखन! विभा केतकरांना सुमार म्हणताना किती सुमार लेख लिहिलात हो.
10 Jan 2014 - 2:08 am | बॅटमॅन
तरी अंमळ गंडलेच. केतकरांइतके सुमार लिहिता येत असेल कुणाला असे वाटत नाही. पण नै, तो
चे(उकार पाहिजे होता)त्या भगत देखील तितकेच सुमार लिहितो.
10 Jan 2014 - 7:40 am | मारकुटे
अगदी अगदी
सुमारांची यादी फार मोठी आहे.. अग्दी नेमाडे सुद्धा त्याच लायनीत येतात
9 Jan 2014 - 1:09 pm | प्रसाद गोडबोले
मागे आमच्या एकामैत्रीणीने असेच एक विधान केले होते
=))
9 Jan 2014 - 2:29 pm | सचीन
केतकर सरच काय तुकाराम महाराजांशी कुणाशीही तुलना होवू शकत नाही.
मात्र एक खरे सध्याच्या काळातले अभ्यासू, परखड, लोकमताची पर्वा न करता जे सत्य आहे ते परखडपणे सांगणारे केतकर सरांसारखे व्यक्तिमत्व विरळाच.
9 Jan 2014 - 2:58 pm | मारकुटे
सहमत आहे. भारतरत्नासाठी त्यांचा विचार व्हायला हवा
9 Jan 2014 - 4:22 pm | मुक्त विहारि
कुणाचा?
9 Jan 2014 - 7:22 pm | मारकुटे
अर्थातच महान महनीय महत्तम कुसुमारांचाच
9 Jan 2014 - 8:58 pm | मृगनयनी
अग्गदी ख्खर्र !!!!!! मागे एकदा ते असेच परखड, लोकमताची पर्वा न करता जे सत्य आहे ते ओकले होते.... तेव्हा सम्भाजी बी-ग्रेड वाल्यांनी त्यांच्या घरावर मोर्चा काढला होता आणि काळे फासले होते....असो...
बाकी 'नरेन्द्र' नावाच्या दोन व्यक्तींचा बादरायण सम्बन्ध जोडण्याचा जो पराक्रम त्यांनी केला... त्याला खरोखर तोड नाही!! :)
मला तर वाटते बहुतेक नरेन्द्र दत्त उर्फ स्वामी विवेकानन्द यांचे नाव जोडण्यास बहुधा केतकर विसरले असावेत!.. मोदींच्या फोबियातून बाहेर पडल्यावर पुढचा नम्बर स्वामी विवेकानन्दांचा असेल!
9 Jan 2014 - 3:01 pm | गब्रिएल
तुमच्या मैतरिन स ने नाव सुरु होणारि चीन देशाचि र्हैवाशी होती क्काय? ;)
9 Jan 2014 - 3:07 pm | मंदार दिलीप जोशी
मला हे वाचून अतिशय कोमल हृदयाच्या एका कुंभाराची आठवण झाली. काय प्रसादराव, आठवली का मैत्रिण ;)
9 Jan 2014 - 6:07 pm | चौकटराजा
चि केतकर- बेसुमार डेटा अतिसुमार निष्कर्षाची मनोरूग्ण केस.
9 Jan 2014 - 9:31 pm | सचीन
*mosking* *JOKINGLY* 8P 8p
9 Jan 2014 - 9:39 pm | सचीन
चि केतकर- बेसुमार डेटा अतिसुमार निष्कर्षाची मनोरूग्ण केस.>>>>>>> तुमचे नि त्यांचे विचार जुळत नाहीत म्हणून ते मनोरुग्ण. आणि ज्यांचे नि तुमचे तुमचे विचार जुळतील ते अक्कलवान. बरोबर न चौराजीं... असो ज्याची त्याची दृष्टी.
10 Jan 2014 - 6:34 am | चौकटराजा
आम्ही केतक्ररांसारखे, अभ्यंकरांसारखे व भातखळकरांसारखे इझम वाले नाही .. अन्याय होणार्या शेतकर्याबद्द्ल कणव आहे पण काद्यांचा भाव वाढला की सेलेब्रशन करायचे व पडला की लिलाव बंद पाडायचे असे दुटप्पी ध्रोरण
काय कामाचे हो? पिळवणूक करणारे उद्यूगपती व चुकार कामगार आम्हाला दोन्ही शत्रू वाटतात या देशाचे !
9 Jan 2014 - 6:13 pm | वेताळ
राज्यसभेवर नक्की घेतील.कारण दिग्विजय नंतर पर्फेक्ट बोलणार माणुस पण कॉग्रेस्मध्ये असायला हवा.
9 Jan 2014 - 9:09 pm | सचीन
महाराष्ट्रात जे काही विचारवंत आहेत त्यात केतकरांचे स्थान अग्रणी आहे. एखाद्या विषयात तथ्य असल्याशिवाय केतकर सर त्या विषयाबद्दल बोलणारच नाहीत.
9 Jan 2014 - 9:20 pm | मृगनयनी
गुड कीप इट अप!!! .... "कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा" मुळे अश्या विनोदांची सवय झालीये!!!!! आपण तिकडे असे विनोद पाठवत जा.... त्यानिमित्ताने आपले व केतकरांचेही ग्लोबलायझेशन होईल!!!!! :)
9 Jan 2014 - 9:24 pm | सचीन
तुमच्या विरोधी प्रतिक्रिया दिली तर विनोदी. सगळ्यांनीच तुमचे जे मत असावे त्या मताचे असावे हा अट्टाहास का?
9 Jan 2014 - 9:31 pm | मृगनयनी
तुमच्या विरोधी प्रतिक्रिया दिली तर विनोदी. सगळ्यांनीच तुमचे जे मत असावे त्या मताचे असावे हा अट्टाहास का?
मी कधी असा अट्टाहास केला?... :) मी फक्त माझी प्रतिक्रिया दिली.... :)
9 Jan 2014 - 9:35 pm | सचीन
केतकरांनी जे मुद्दे मांडले ते खोडणे ह्याला म्हणतात प्रतिक्रिया. टिंगल टवाळी तर काय कॉलेजचे पोरही करतात. त्यात कसला आलाय मोठेपणा आपल्या विरोधी विचार खोडता आले नाही कि माणूस हा मार्ग अवलंबतो.
9 Jan 2014 - 9:44 pm | मृगनयनी
कॉमेडी प्रोग्रॅम्स मध्ये देण्याच्या लायकीचे विनोद कुणी कितीही गम्भीरपणे केले अथवा मान्डले, तरी आम्ही ते सिरियसली घेत नाही.... अर्थात आपण एक मोठा विनोद केला, हे करण्यालाच कळू नये.. हा दुसरा विनोद.. अजून काय?!?!....
बाकी चालू द्यात... :)
9 Jan 2014 - 9:53 pm | सचीन
आपल्या विरुद्ध कोणी काही बोलले,लिहिले,प्रतिक्रिया दिली तर बर्याच जणांची अवस्था सहनही होत नाही नि सांगताही येत नाही अशी होत असावी. त्यातूनच अशा विचित्र नि दुसऱ्याला कमी लेखणाऱ्या प्रतिक्रिया प्रसवल्या जातात.
9 Jan 2014 - 10:02 pm | मृगनयनी
ह्म्म्म.. मी तुमची मानसिक स्तिथी समझू शकते!
9 Jan 2014 - 10:19 pm | विद्युत् बालक
सचिन राव नाव सार्थ केले बघा !
मिसळपाव वरील म्याग्रा , अख्तर , वॉर्न ,ली इत्यादींचा अगदी खऱ्या खुऱ्या सचिन ला लाजवेल असे समर्थपणे तोंड देत आहात अर्थात चीकीखाऊ पंचाची पण कृपा आहेच म्हणा ! कीप इट अप ! बाकी तुमचे भिडू पवेलिअन मध्ये परतलेले दिसत आहेत ?
10 Jan 2014 - 12:02 am | खटपट्या
+१
10 Jan 2014 - 9:12 am | नाखु
बघा साधर्म्य... (मिपावर आणि मिपा बाहेरही)
नाद खुळा - Wed, 08/01/2014 - 11:03
कुरापती थयथयाट
माथेफिरू भाषण
रतीब चाटुगिरीचा
सदा डिवचणारे बाष्कळ)धागे
चिवट कि(चिकट) पणा चमचागिरीचा
नको तिथे नाक खूपसून (स्वत:ची वैचारीक बद्ध्कोष्ठ्ता/अपचन्)जगजाहीर करण्याचा कळस
बाकी चालू द्या...(काही नोंदी अद्ययावत केल्या आहेत)
10 Jan 2014 - 12:26 pm | श्रीगुरुजी
सचिन हे नाव एकंदरीत मनोरंजनासाठीच प्रसिद्ध आहे. तेंडुलकरांचा सचिन क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटप्रेमींचे मनोरंजन करत होता तर तितके रूपेरी पडद्यावर खेडेकरांचा व पिळगावकरांचा सचिन प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. संगीताच्या माध्यमातून बर्मनांच्या सचिनने संगीतप्रेमींचे मनोरंजन केले. तर इथला नुसताच सचीन भारंभार विनोदी लेख पाडून मिपाकरांचे मनोरंजन करत आहे.
10 Jan 2014 - 12:40 pm | बॅटमॅन
=)) भारीच.
10 Jan 2014 - 1:43 pm | अत्रुप्त आत्मा
+१
10 Jan 2014 - 12:41 pm | चौकटराजा
मला वाटते आय डी च्या नामाभिधानावरून टिपण्णी नसावी.इथे सचिन हे नाव खोटे देखील असू शकते. तेंव्हा अशा टिपण्णीचा कितीसा उपयोग होणार ? दुसरे असे की सचिनना त्यांचा एक दृष्टीकोन आहे , असू शकतो. त्यांच्या त्या "दृष्टीकोनावर" टीका
होऊ शकते त्यांच्यावर नाही.
10 Jan 2014 - 2:32 pm | मुक्त विहारि
+ १
(चौरा भाऊ, ह्या वाक्यावर आपण बेहद्द खुष. एक पार्टी आमच्या कडून लागू.)
11 Jan 2014 - 9:01 am | नाखु
नम्र विनंती आपण प्रतिसाद काळजी पूर्वक पाहील्यास लक्षात येइल कि टिप्पणी हि "त्यांच्या" दृष्टीकोनावरच आहे.
सदर स्तंभ लेखक (कुमार केतकर्/वा मि.पा.चे कु.के.) यांच्या सोनिया/काँग्रेस भलामण व (अचाट)हुजरेगिरीबद्दलच प्रतिवाद आहे.
तस्मात यांचे आय डी नामनिधान "पहिलवान्/छत्रपती/न्यायाधिश/सरसेनापती" असा असता तरी प्रतीसाद देणार्या लोकांना फरक पडला नसता. सबब या आय्डी मुळेच कोणी प्रतीवाद करत आहे असे समजू नये.
स्तंभ लेखकू (मिपावरील व मिपा बाहेरिल) कुमार केतकर यांचे आद्याक्षारात त्यांचे (सुप्तगुण) सामर्थ्य दडले आहे ते आम्ही प्रकट सांगितले ईतकेच.
त्यांच्या लेख्/प्रतीसाद यांच्या दृष्टीकोनामधिल विशीष्ट गूण हेच या स्तंभ लेखकूंचे "आ(वा)गळे पणआहे.
9 Jan 2014 - 11:18 pm | विनोद१८
सुस्वागतम...!!! तुमचे स्वागत असो...!!!
तुम्ही एक उत्तम व निष्णात वकील अहात हे आता सिद्ध झाले निर्विवाद, तुम्हाला किती मिळातात हो त्या कुसुमाराकडुन ??? जरा सान्गितलेत तर बरे होइल, जमल्यास तसे त्या नरेन्द्रला कळौन, त्यालाही तुमच्याकदे पाठ्वण्याचा प्रयत्न केल्या जाइल.
बाकी लगे रहो, अगदी तब्येतीने खिन्ड लढवताय, सर्वान्ना तोन्ड देउन, अर्थात .... ते विचारु नका.
ढन्यवाद
10 Jan 2014 - 1:40 am | विजुभाऊ
९)कु.सुमार केतकर विसाव्या शतकात जे बोलतात ते बाविसाव्या शतकात खरे ठरते.
१०) मंगळाच्या पत्रीकेत कडक कु,सुमार केतकर आहेत.
१२) कु.सुमार केतकर भाषण करायला उभे रहात नाहीत. पृथ्वीच त्यांच्या विचारांच्या वजनाने खाली दबली जाते.
१३) कु.सुमार केतकर भाषण करण्या अगोदरच ते पेप्रात छापुन प्रसिद्ध होते.
१४) कु.सुमार केतकर यांच्या जाज्वल्य वाणीमुळे त्याच्या फोनचा माउथ पीस नेहमीच आगीत धगधगत असतो. ते त्यावरच सिगारेट पेटवतात.( त्यावरुनच फोन लायटरची कल्पना सुचली)
१५) कु सुमार केतकरांनी कु.सुमार केतकरांसाठी बोललेले ( उजीलाटा ) कु सुमार केतकरांचे विचार.म्हणजे अभिव्यक्ती स्वातन्त्र्य
10 Jan 2014 - 2:27 am | खटपट्या
रजनीकांत करू नका आता कुकेचा
10 Jan 2014 - 2:07 pm | मदनबाण
रजनीकांत करू नका आता कुकेचा
खटपट्या अहो रावण रावण खेळुन झाल्यावर विजुभाऊंचा सध्या सुमार सुमार केतकर खेळत आहे. ;)
10 Jan 2014 - 10:37 pm | पिशी अबोली
सध्या अमेरिकेत जी भयंकर थंडी आहे, ती मोदींना व्हिसा नाकारल्यामुळे त्यांनी घेतलेला सूड आहे असं ओबामांना कुमारांनी सांगितलं म्हणे.
10 Jan 2014 - 10:43 pm | विद्युत् बालक
कुमार सोनिया चे ऐकतात ---->> ओबामा कुमारांचे ऐकतात ----->> ओबामा सोनियांचे ऐकतात !!!
10 Jan 2014 - 11:52 pm | प्यारे१
सोनियाजी अंतरात्मा की आवाज सुनती हय!
कुमारजी अंतरात्मा की सुनते हय.
विजु भौ कुमारकी की सुनते हय (कान पे पडेंगा तो सुनाई देंगाच की!)
अशारितीने विजुभौ अंतरात्मा की सुनते हय.
बास्स.
11 Jan 2014 - 12:45 pm | पिशी अबोली
क्या बात क्या बात!
10 Jan 2014 - 11:04 am | चिरोटा
सु.कुमार केतकर लहान असताना ग म भ न लिहू लागले.संपादकीय,एडिटोरियल हे शब्द त्यानंतर प्रचलित झाले.
10 Jan 2014 - 11:32 am | श्रीगुरुजी
सु(कु)मार केतकरांचे तर्कशास्त्र अगाध आहे.
- मागे एकदा ते म्हटले होते की ९० च्या दशकापासून धार्मिक पर्यटन वाढीला लागले त्याचे मुख्य कारण हिंदू "अतिरेक्यांनी" बाबरी मशीद पाडली होती हे आहे. अतिरेक्यांच्या त्या कारवाईमुळे हिंदू उन्माद उफाळून वर येऊन धार्मिक पर्यटन वाढले.
१९९० च्या दशकापासून आर्थिक उदारीकरण व विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामुळे काही व्यक्तींची भरभराट झाली. विमानसेवा, कार इ. गोष्टी काही जणांच्या आवाक्यात आल्या. त्याचा परीणाम म्हणून सर्वच क्षेत्रात पर्यटन वाढले. पण हे विद्वान मात्र याचा संबंध बाबरी मशीदीशी जोडून मोकळे झाले.
- परवाच्या मुलाखतीत त्यांनी अशी मुक्ताफळे झाडली की सोनियामाता इटलीहून भारतात येऊन इथली संस्कृती अंगिकारून निवडून आल्या व त्या पंतप्रधान पदापर्यंत पोचल्या होत्या. शरद पवारांना इटलीत जाऊन तिथला नगरसेवक होणे तरी शक्य आहे का?
इटली या देशात, जो जन्माने इटालियन नागरिक नाही त्याला साधी ग्रामपंचायतीची निवडणू़क सुद्धा लढविता येत नाही. त्यामुळे शरद पवार काय प्रत्यक्ष राहुलला सुद्धा इटलीत साधा ग्रामसेवक सुद्धा होता येणार नाही. भारत सोडून इतर कोणत्याही देशात जन्माने त्या देशाचा नागरिक नसलेल्याला पंतप्रधान, अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, सैन्यातील प्रमुख पदे इ. भूषविता येत नाहीत. भारत धर्मशाळा असल्याने इथे कोणत्याही देशाचे नागरिक येउन मंत्री, खासदार अगदी पंतप्रधान सुद्धा होऊ शकतात. या वस्तुस्थितीकडे मुद्दाम दुर्लक्ष करून केतकरांनी आपला लाळघोटेपणा जाहीररित्या सिद्ध केला.
- काल एका वाहिनीवर बोलताना केतकरांनी वेगळेच तारे तोडले. ठाकरे कुटुंबीय व पर्यायाने इतर मराठी माणसांना कलेची भूक आहे. त्यांना नुसतेच राजकारण व पैसा, व्यापार इ. चालत नाही. याउलट मोदी फक्त राजकारण, राजकारण, काँग्रेस भ्रष्ट आहे इ. बोलतात. त्यांच्या बोलण्यात कलेचा अंशही नसतो. त्यांचे सगळेच व्यवहार, भाषणे इ. कलेच्या अभावी बटबटीत असतात. एकंदरीत गुजराती माणसे व्यापार, स्टॉक एक्स्चेंज इ. पलिकडे जात नाहीत. कलेपासून ते दूर असतात.
गुजराती फक्त पैसा पैसा करतात, कलेचा त्यांच्याकडे दुष्काळ आहे हे अत्यंत मूर्खपणाचे विधान आहे. चित्रपटसृष्टीत केतन मेहता, परेश रावळ, अरविंद त्रिवेदी इ. अनेक नामवंत कलाकार आहेत. काही प्रसिद्ध चित्रकारही गुजराती आहेत. महाराष्ट्राची लावणी फारशी महाराष्ट्राबाहेर गेली नाही, पण गरबासारखे गुजराती नृत्यप्रकार देशभर लोकप्रिय आहेत. केतकरांना या वस्तुस्थितीचा जाणीव नसावी याचे आश्चर्य वाटते. ते गांधी-नेहरू घराणे प्रेमाने व मोदीद्वेषाने इतके आंधळे झाले आहेत की आपण काहीतरी अतार्किक, हास्यास्पद विधाने करून आपले हसू करून घेत आहोत हे त्यांच्या गावीही नाही. नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केले ते सप्टेंबर २०१३ मध्ये. दाभोळकरांची हत्या झाली २० ऑगस्ट २०१३ ला. तरीही या दोन घटनांचा बादरायण संबंध त्यांनी जोडला आहे. तसा संबंध लावायचा तर 'आप'चा उदय किंवा २०१३ मध्ये राहुल गांधींची काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून झालेली निवड इ. गोष्टींचाही संबंध लावता येईल.
केतकर राज्यसभेची खासदारकी किंवा पद्मभूषण पुरस्कारासाठी गांधी घराण्याची चमचेगिरी करत आहेत असे वाटत नाही. गांधी-नेहरू घराण्याची भक्ती त्यांच्या नसानसात मुरली आहे. त्यामुळे कोणत्याही लाभाच्या अपेक्षेने ते ही चमचेगिरी करत आहेत असे वाटत नाही.
10 Jan 2014 - 2:50 pm | थॉर माणूस
Cécile Kyenge बद्दल ऐकलं आहे का काही?
नक्की? हे असलं काही पहिल्यांदाच ऐकतोय... कदाचित असेलही काही देशात खरं, पण...
तिकडे "दी" अमेरीका मधे Ted Cruz तर पार अमेरीकेच्या अध्यक्षपदाची स्वप्न बघतोय म्हणे (बाप क्युबन, आई अमेरीकन, दोघे रहायचे कॅनडात. ह्यांचा जन्म कॅनडामधे) अजून इतर देशात सुद्धा असे प्रकार असणारच (कॅबिनेट मंत्र्यांची उदाहरणे चालत असतील तर कॅनडाकडे बघा, वर इटली आहेच आणि इतर अजूनही नक्की असतील)
कैच्याकै... *lol* भावनेच्या भरात नागरीकशास्त्राची पार एक करताय राव. :D
बाकी कुके, राजकारण, नेते याविषयीच्या गफ्फा/पक्षानुयायी युद्धे हव्या तशा चालूद्या. पण निदान उगाच भावनेच्या भरात कैच्याकै बोलून आपल्याच देशाची इज्जत आपल्या तोंडून काढली जाऊ नये इतकी माफक अपेक्षा.
10 Jan 2014 - 5:59 pm | सचीन
कैच्याकै... Lol भावनेच्या भरात नागरीकशास्त्राची पार एक करताय राव. Biggrin>>>>>>>>अहो ते नकली गुरुजी आहेत
12 Jan 2014 - 6:32 pm | श्रीगुरुजी
जरा उशीरा उत्तर देतोय.
>>> Cécile Kyenge बद्दल ऐकलं आहे का काही?
या व्यक्तीबद्दल माहिती गुगलून मिळाली. एकंदरीत माझ्या माहितीचा स्त्रोत चुकीचा होता. इटलीत स्थलांतरीत मंत्री झाल्याचे हे पहिलेच उदाहरण असावे. पण इतर देशांप्रमाणेच इटलीत अध्यक्षपदाची निवडणुक स्थलांतरीतांना लढविता येत नाही हे नक्की.
>>> भारत सोडून इतर कोणत्याही देशात जन्माने त्या देशाचा नागरिक नसलेल्याला पंतप्रधान, अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, सैन्यातील प्रमुख पदे इ. भूषविता येत नाहीत.
> नक्की? हे असलं काही पहिल्यांदाच ऐकतोय... कदाचित असेलही काही देशात खरं, पण...
तिकडे "दी" अमेरीका मधे Ted Cruz तर पार अमेरीकेच्या अध्यक्षपदाची स्वप्न बघतोय म्हणे (बाप क्युबन, आई अमेरीकन, दोघे रहायचे कॅनडात. ह्यांचा जन्म कॅनडामधे) अजून इतर देशात सुद्धा असे प्रकार असणारच (कॅबिनेट मंत्र्यांची उदाहरणे चालत असतील तर कॅनडाकडे बघा, वर इटली आहेच आणि इतर अजूनही नक्की असतील)
- अमेरिकेच्या नागरिकत्वाच्या कायद्यानुसार जन्माने अमेरिकन नागरिक नसलेल्या व नंतर अमेरिकेत स्थलांतर करून नियमानुसार नागरिकत्व मिळविलेल्या नागरिकांस अमेरिकेच्या अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपदाची निवडणुक लढविता येत नाही. गुगलून बघा. या कायद्याविषयी असंख्य संकेतस्थळे सापडतील. टेड क्रूझ हा एखाद्या राज्याचा गव्हर्नर किंवा खासदार किंवा केंद्रात मंत्री होऊ शकतो. पण तो स्थलांतरीत असल्याने कधीही अमेरिकेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष होऊ शकणार नाही. पूर्वी हेन्री किसिंजर आणि अलिकडच्या काळातील मॅडलीन ऑलब्राईट याच कारणांमुळे अध्यक्ष/उपाध्यक्ष होऊ शकले नाहीत.
इतर अनेक देशात असाच कायदा आहे. स्थलांतरीतांना सर्वोच्च पदावर पोचू देणारा कदाचित भारत हा एकमेव देश असावा.
>>> भारत धर्मशाळा असल्याने इथे कोणत्याही देशाचे नागरिक येउन मंत्री, खासदार अगदी पंतप्रधान सुद्धा होऊ शकतात.
कैच्याकै... भावनेच्या भरात नागरीकशास्त्राची पार एक करताय राव.
भारतात ७ वर्षे वास्तव्य केल्यानंतर कोणताही परदेशी नागरिक भारताचा कायदेशीर नागरिक होऊ शकतो व घटनेनुसार भारताचा नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती कोणत्याही पदाची निवडणूक लढवू शकते. सोनिया गांधी हे याचे अगदी उत्तम उदाहरण आहे. आसाममध्ये तर कायदेशीर्/बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांनी एक पक्ष स्थापन करून निवडणुका लढविलेल्या आहेत. आता तर असं बोललं जातंय की २०१६ किंवा २०२१ मधला आसाममधील मुख्यमंत्री हा एक कायदेशीर/बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरीत असेल. बिहार/बंगालमधून एक नेपाळी बेकायदेशीर काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाल्याचा खटला न्यायालयात आहे.
एकंदरीत स्थलांतराविषयी फारसे कडक नियम नसल्याने व भ्रष्टाचारामुळे बेकायदेशीर स्थलांतरीत भारतात घुसून कोणत्याही सर्वोच्च पदापर्यंत पोचू शकतात.
बाकी कुके, राजकारण, नेते याविषयीच्या गफ्फा/पक्षानुयायी युद्धे हव्या तशा चालूद्या. पण निदान उगाच भावनेच्या भरात कैच्याकै बोलून आपल्याच देशाची इज्जत आपल्या तोंडून काढली जाऊ नये इतकी माफक अपेक्षा.
12 Jan 2014 - 8:45 pm | टवाळ कार्टा
फक्त ७????
13 Jan 2014 - 2:45 pm | श्रीगुरुजी
याबाबतीतले नियम
Obtain citizenship by registration.
The Central Government may, on an application, register as a citizen of India under section 5 of the Citizenship Act 1955 any person (not being an illegal migrant) if he belongs to any of the following categories:-------
•a person of Indian origin who is ordinarily resident in India for five years before making an application for registration;
•a person of Indian origin who is ordinarily resident in any country or place outside undivided India;
•a person who is married to a citizen of India and is ordinarily resident in India
before making an application for registration;
13 Jan 2014 - 12:12 pm | थॉर माणूस
माझ्या मते इटलीमधे सुद्धा आपल्याप्रमाणेच पार्लिमेंटरी सिस्टीम आहे, प्रेसीडेंशीअल नव्हे. त्यामुळे असेंब्लीमधे निवडून गेलेला कुठलाही नेता अध्यक्ष होण्यास पात्र ठरेल आणि आपल्या प्रमाणेच ह्या नेत्याला असेंब्लीने निवडावे लागेल. अध्यक्षपदासाठी वेगळे नियम फक्त प्रेसीडेंशीअल सिस्टीममधे असतात (कारण तिथे या पदासाठी थेट लढत असते.)
आणि पार्लिमेंटरी सिस्टीम राबवणार्या अनेक देशात असा कायदा नाही सुद्धा. टेडचे उदाहरण निव्वळ अशासाठी दिले होते की अमेरीकेसारख्या प्रेसीडेंशीअल सिस्टीम राबवणार्या आणि नॅचरल बॉर्न सिटीजनचा नियम असलेल्या देशातही असे गोंधळ होत आहेत. मग पार्लिमेंटरी सिस्टीम जी नियमानेच निवडून आलेल्या प्रत्येकाला पंतप्रधान होण्याचा हक्क देते त्या ठिकाणी हे चूक कसे? आणि तरीही भारतात आजवर किती स्थलांतरीत पंतप्रधान झाले आहेत?
हेच्च... हेच तर म्हणतोय. वर तुम्ही लिहीलं होतं "इथे कोणत्याही देशाचे नागरिक येउन मंत्री, खासदार अगदी पंतप्रधान सुद्धा होऊ शकतात" आणि म्हणून मी तुम्हाला नागरीकशास्त्राची एक करू नका अशी विनंती केली होती. एकदा भारतात नागरीकत्व घेतले की ते भारताचे नागरीक होतात, आणि नियमानुसार तोवर ते निवडणूका लढवू शकत नाहीत.
स्थलांतरीतांचा प्रश्न मोठा आहे आणि तो जगभर आहे. वर उदाहरण दिलेली Cécile Kyenge ही एक बेकायदा स्थलांतरीत होती. तिने नंतर एका इटालिअन माणसाशी लग्न करून नागरीकत्व मिळवले आणि आता केंद्रिय मंत्री आहे. कॅनडामधे स्थलांतरीत लोक मंत्री आहेत. अगदी अमेरीकेतसुद्धा खालच्या पातळीवरच्या निवडणूकात हे घडतं, आणि स्थलांतरीतांची मुले वरच्या निवडणूका लढवतायत. अमेरीकेत तर बेकायदा स्थलांतर कैच्याकै झालंय आजवर.
आपल्याकडे फक्त स्थलांतराचा प्रश्न नसून बेकायदेशीर स्थलांतरविरोधी कायद्यांच्या अंमलबजावणीतल्या कामचुकारपणाचा आहे. पण म्हणून ते थेट निवडणूका लढवू शकत नाहीत. हे कायदे जर नीट अंमलात आणले तर मुळात भारतात रहाण्यासाठी परवानगी होती का हे दाखवावं लागेल, इथेच बरेच बेकायदा स्थलांतरीत उमेदवार लटकतील. आणि कायदेशीर रीत्या राहीले तर मग त्यांना नियमानुसार नागरीकत्वासाठी अर्ज करावा लागेल. एकदा ते नागरीक झाले की त्यांनाही ते हक्क मिळतील जे इतर भारतीयांना आहेत. यात चुकीचं काय आहे? आणि भ्रष्टाचारामुळे हे नियम धाब्यावर बसवले गेले तरी निवडून देणे न देणे कुणाच्या हातात आहे?
13 Jan 2014 - 8:15 pm | श्रीगुरुजी
थॉर माणूस,
आपल्या प्रतिसादावर दुपारी ३ च्या सुमारास एक दीर्घ प्रतिसाद टंकलेला होता. एखाद्या देशात स्थलांतर करून नागरिकत्व मिळविलेल्यांना सर्वोच्च पदे देणे हे कसे अयोग्य आहे व इतर देशांना कसे त्याचे वाईट अनुभव आले होते हे त्यात सोदाहरण लिहिले होते व त्याच कारणामुळे इतर देशात अशा नागरिकांना सर्वोच्च पदाची निवडणुक लढता येत नाही हेही सोदाहरण लिहिले होते.
परंतु "प्रकाशित करा" या गुंडीवर टिचकी मारल्यावर "मिसळपाव १५:०० ते १७:०० या काळात बंद राहील" असा संदेश दिसला आणि माझा प्रतिसाद नष्ट झाला. आता परत एवढा मोठा प्रतिसाद टंकण्याची इच्छा नाही.
10 Jan 2014 - 6:05 pm | सचीन
गुजराती फक्त पैसा पैसा करतात, कलेचा त्यांच्याकडे दुष्काळ आहे हे अत्यंत मूर्खपणाचे विधान आहे. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>केतकर सर बरोबर बोलतायत खेळ, विज्ञान,लष्कर, साहित्य ह्या क्षेत्रात गुजराती पार पिछाडीवर आहेत.गुजरात हा आर्थिकदृष्ट्या आघाडीवर आहे. पण इतर आघाड्यांवर फारच पिछाडीवर आहे.
लष्करात अनेक प्रांतांच्या रेजिमेंट आहेत गुजरातची सोडून 1965 साली भारतीय सैन्याने गुजरात रेजिमेंट उभारायचा प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्न फसला, कारण गुजरात मधून कोणी भरती व्हायलाच तयार झाले नाही.
10 Jan 2014 - 7:10 pm | इष्टुर फाकडा
व्वा ! बरोबर आहे, कारण महार रेजिमेंट मध्ये फक्त महारच लोकं असतात आणि मराठा मध्ये मराठा आणि पंजाब मध्ये पंजाबी ! तुमच्या आकलन क्षमतेच्या प्रदर्शनाने तुम्ही तुमच्या आराध्याचीच खोलून लायकी काढता आहात असे नाही का वाटत ?
10 Jan 2014 - 7:59 pm | चिरोटा
ह्यामागे अनेक सामाजिक्,आर्थिक कारणे असतात.दावूद्,छोटा राजन आणि त्यांचे अनेक टोळी सदस्य हे मराठी आहेत्.म्हणून मराठी माणूस गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे असा अनुमान काढायचे का?भ्रष्टाचार्,गुन्हेगारी टोळ्या,बिल्डर लॉबी ह्यात महाराष्ट्राचा वरचा क्रमांक लागतो.मग मराठी माणूस भ्रष्ट आहे असे म्हणायचे का?
10 Jan 2014 - 8:03 pm | सचीन
तुमच्या गुजरातेत रामराज्यच आहे म्हणायचे
13 Jan 2014 - 12:11 pm | मंदार दिलीप जोशी
ह्म्म हे बरोबर आहे. पुण्यात मराठा रेजिमेंट असा बिल्ला असलेल्याला मी मराठीत पत्ता विचारला तर त्याने बिहारी हेल असलेली हिंदी बोलायला सुरवात केली :D
10 Jan 2014 - 6:25 pm | सचीन
सु(कु)मार केतकरांचे तर्कशास्त्र अगाध आहे.>>>>>>> गुरुजी पण केतकर बोलतात त्यात तथ्य दिसतेय
10 Jan 2014 - 6:35 pm | अनिरुद्ध प
सचीनजी,
आपण प्रतिसाद सुद्धा उलटे (खालुन वर) वाचता असे आपल्या प्रतिसादावरुन जाणवते.
10 Jan 2014 - 2:22 pm | इरसाल
श्रीगुरुजी हे **** पुढे गीता वाचायचा प्रयत्न करत आहे. श्रीगुरुजी तुम्हाला अनेकानेक शुभेच्छा, देव तुम्हाला बळ देवो.
10 Jan 2014 - 3:27 pm | राही
कुमार केतकर : मिपाश्री, मिपाभूषण.
कुमार केतकर : मिपाचे आलोकनाथ.
कुमार केतकर : मिपावर केतकर को मार
10 Jan 2014 - 3:46 pm | मुक्त विहारि
ट्टो....
10 Jan 2014 - 6:30 pm | बॅटमॅन
राहीजी ने क्या बात बोली है....बोली है तो ऐसे बोली है जैसे बंदूक की गोली है!!!! वाह!!!!!!!
10 Jan 2014 - 8:37 pm | विद्युत् बालक
हा धागा अजून वाचनमात्र कसा झाला नाही बरे?
संपादकांचा बळीचा बकरा ---- बालक :-(
10 Jan 2014 - 8:57 pm | शिद
ह्या प्रश्न येथे विचारुन पहा... कदाचित ऊत्तर मिळेल.
10 Jan 2014 - 8:56 pm | विश्वनाथ मेहेंदळे
साला एक डु आयडी सबको प्रतिसादक बना देता है !!!
नाना मेहेंदळे
10 Jan 2014 - 10:53 pm | मुक्त विहारि
शेवटी वैदिक अंडे कामाला आले म्हणायचे.
11 Jan 2014 - 6:02 pm | विश्वनाथ मेहेंदळे
काही कळले नाही.
11 Jan 2014 - 4:28 am | हुप्प्या
http://www.youtube.com/watch?v=EdP4SpRaUvs
ही क्लिप पाहिलीत तर केतकरांची बिनडोक तारेतोड दिसेल. साहित्य संमेलनात राजकारण आणले ते पुरेसे नव्हते की काय म्हणून आता राजकारणात साहित्यिक मनोवृत्ती आणण्याचा आचरटपणा.
काय तर म्हणे मोदींना साहित्याचा गंधही नाही. निव्वळ स्टॉक मार्केट आणि काँग्रेसद्वेष इतकेच भांडवल. याउलट बाळ ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मनाने साहित्यिक (!). त्यामुळे त्यांच्यात आणि मोदींमधे कुरबुरी सुरु झाल्या आहेत म्हणे. ठाकरी भाषा जी बाळासाहेबांनी सुरु केली आणि जी राज ठाकरे पुढे चालू ठेवत आहेत त्या भाषेला एका साहित्यिकाची भाषा म्हणणे जअअअअअअअअअअरा अतीच होते आहे असे मला वाटते. काही सडकछाप डायलाग इतकेच ह्या लोकांच्या भाषेबद्दल म्हणवते. ते लोकांना भावतात, त्याला टाळ्याही पडतात. उदा. महाराष्ट्रात आप कशाला तिथे त्यांचा बाप आहे की! हा एक ताजा डायलॉग.
पण केतकर आता सोनियास्तुतीपाठक वा गांधीगुणगायक ह्या भूमिकेतून आता शकुनीमामाच्या भूमिकेत उतरु पहात आहेत. येनकेन प्रकारेण भाजपा, शिवसेना आणि मनसे ह्यांच्यात फूट पाडायचे मनोरथ शिजत आहेत. तसेही शिवसेना आणि मनसे एकमेकांशी ३६ चा आकडा ठेवून आहेतच. पण जर मनसे भाजपापासून दुरावला तर आपल्या लाडक्या काँग्रेसचे पारडे थोओओओओओओओडे जड होईल आणि आपले राज्यसभेचे पारडेही जड होईल असा काही डाव असावा.
चालू द्या. आमचीही थोडी करमणूक होईल.
11 Jan 2014 - 8:40 pm | सचीन
क्लिप दिल्याबद्दल धन्यवाद. केतकर सरांच्या वक्तव्यात तथ्य आहे.
11 Jan 2014 - 10:05 am | इरसाल
सन्माननीय श्री कुमार केतकर सरांविषयी अद्वा तद्वा, वाईट, व अविचारी बोलणे बोलुन महात्मा गांधीसमान असणार्या व्यक्तिमत्वावर चिखलफेक करणार्या तुम्हा सर्वांचा देवबाप्पा कान कापेल.
आणी किनई तो तुमचे घर किनई उन्हातच बांधेल......बघाच तुम्ही !
11 Jan 2014 - 1:30 pm | टवाळ कार्टा
१००
12 Jan 2014 - 4:57 pm | फिरंगी
+१०००
12 Jan 2014 - 4:59 pm | फिरंगी
वेरी सॉरी..
+1000001