मिसळपाववर गाजत असलेला "स्त्रिया आणि ड्रायव्हिंग"चा धागा पाहिला आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या मनावर असलेल्या "ठराविक साच्यांचा" (इंग्रजी शब्द : स्टीरिओटाईप्स) परिणाम किती पक्का आहे ; या पगड्यामुळे आपण कशी घाऊक विधाने करतो ( स्वीपींग स्टेटमेंट्स) करतो याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले. अनेक सामाजिक कारणे , पिढ्यानुपिढ्यांचे संस्कार आणि इतर परिस्थितीजन्य कारणे या सगळ्यांचा परिपाक म्हणजे हे साचे. "स्त्रियांना ड्रायव्हिंग न येणे" हा असाच एक साचा. या निमित्ताने असा विचार आला की, असे कितीकिती साचे आपण कुठल्याकुठल्या प्रकारे मनात वागवत असू ?
आज तर या निष्कर्षाप्रत यावेसे वाटते की , ज्या ज्या व्यक्तींनी रूढ असे साचे तोडले, त्यांनीच आपल्याला नवा मार्ग दाखवला आहे. "न स्त्रीं स्वातंत्र्यं अर्हति" , "हे पाय जिथे जातील तोच माझा स्वर्ग , तेच माझे वैकुंठ आणि तोच माझा कैलास" , "पायीची वहाण पायीच बरी" अशा प्रकारची साचेबद्ध विधाने आता हास्यास्पद ठरतात, पण केवळ शंभरच वर्षांपूर्वी हा एक रूढ साचा होता. तीच गोष्ट अशा वर्गाची ज्याला हजारो वर्षांपासून गावकुसाबाहेर ठेवले गेले, पायीच्या वहाणेप्रमाणे वागवले गेले. त्या काळापासून आतापर्यंतच्या काळातला फरक हा असे साचेबद्ध कल्पना धुत्कारून लावलेल्या व्यक्तींमुळे निर्माण झाला. अचानक साक्षात्कार झाल्याप्रमाणे समाज आणि एकूण जग काही बदललेले नाही. असामान्य व्यक्तींच्या धैर्याने आणि नुसत्या धैर्यानेच नव्हे तर रक्ताची, घामाची , अश्रूंची , अथक प्रयत्नांची किंमत देऊन हे साध्य झाले आहे. त्यांनी ज्या अनेकानेक गोष्टी केल्या त्यातली एक ठळक गोष्ट म्हणजे रूढ संकल्पनांना तडा देणे.
काही साच्यांकडे आपण खेळीमेळीच्या नजरेने पाहू शकतो परंतु खेळीमेळीने पहाणे आणि अपमानकारक असे साचे बनवणे यातली सीमारेषा फार फार सूक्ष्म आहे. " स्त्रियांना इतर अनेक हक्क आणि सुविधांप्रमाणे , गाडी चालवण्याची सुविधासुद्धा , अलिकडेच मिळाली आहे. स्त्रियांच्या हातून ही सुविधा वापरताना मला चुका होताना दिसतात. प्रसंगी गमतीदार प्रसंग निर्माण होतात." अशा प्रकारची विधाने आणि "महिला॑ना कार-ड्रायव्हि॑ग येत नाही " यासारखी सरसकट विधाने यात फरक आहे. तो सूक्ष्म आहे पण महत्त्वाचा आहे.
साच्यांची ही कर्मकहाणी आजची नाही ; आणि ती आपल्या देशापुरतीच मर्यादितही नाही. अमेरिकेतल्या शतकापूर्वीपर्यंतच्या गुलामगिरीचा आणि त्यानंतरच्या वंशभेदाचा परिणाम म्हणजे कृष्णवर्णीयांची आर्थिक , सामाजिक स्थिती. आज अमेरिकेत तुम्ही "निग्रो" हा शब्द उच्चारणे म्हणजे आपल्या देशात एखाद्याला "म्हारड्या" म्हणण्यासारखे आहे. "निग्रो" आणि " म्हारड्या" दोन्ही चूकच ; पण शंभर वर्षापूर्वी शेंबडी पोरेही हेच म्हणायची . हीच शिकवण होती; हाच साचा होता.
एक उदाहरणच घ्यायचे झाले तर अशा प्रकारचीच गोष्ट कळत नकळत आपण लैंगिकतेच्या बाबतीत रूढ संकल्पनेपेक्षा वेगळी निवड असणार्या व्यक्तिंच्या बाबतीत करतो आहोत. त्यांची थट्टा उडवणारी विधाने करताना (क्वचित का होईना पण) मिसळपाववरही होताना आपण पहातो. भारतासारख्या देशात अजूनही त्यांचा आवाज क्षीण आहे , अजूनही भारतातले कायदे या बाबतीत अन्यायकारक आहेत. पण माझी खात्री आहे, की या बाबतीत बदल होणार. तो होणे अटळ आहे. कायदे बदलतील , लोकांची या गोष्टींकडे पहाण्याची दृष्टी बदलेल. जे इतर साच्यांच्या बाबतीत झाले तेच याही बाबतीत होईल.
तेव्हा मित्रांनो आणि मैत्रिणींनो , तुम्ही थट्टेने सुरू केलेला एखादा विषय पटकन एखाद्याच्या युगानुयुगांच्या अन्यायाच्या जखमेवर बोट ठेवल्यासारखा होऊ शकतो. सरसकट विधाने करताना थोडी सावधानता बाळगा हेच मी तुम्हाला सुचवतो आहे. आपण आपल्यातले फरक जे आहेत ते साजरे करायला हवेतच. किंबहुना , भिन्न लिंगांच्या , जातिधर्माच्या माणसांचा आवाज जितका मुख्य प्रवाहात येईल तितके आपण समृद्धच होऊ. या प्रक्रियेत आपण त्या त्या गटाची वैशिष्ट्ये , गमतीदार गुणधर्म याचा सुद्धा आनंद घेऊच. पण कुठल्याही एका गटाला अपमानास्पद वाटेल असे बोलणे/वागणे आपण सोडायला हवे.
प्रतिक्रिया
28 Sep 2008 - 10:22 am | यशोधरा
पटले तुमचे लिखाण.
3 Oct 2008 - 8:10 pm | संदीप चित्रे
अजून एक साचा असतो की पुरूषांना यंत्रांची आवड असते(च) आणि त्यांना दुरूस्त्या वगैरे करणं आवडतं(च) :)
28 Sep 2008 - 11:20 am | अनामिका
अगदी योग्य शब्दात आपण मांडणी केली आहे विचारांची.
पुर्वापार चालत आलेल्या रुढीं प्रमाणे स्त्रियांवर आणि तत्सम उपेक्षित घटकांवर ताशेरे ओढणे हे पुरुषप्रधान संस्कृतीचेच लक्षण आहे.आता तरी या दुष्टचक्रातुन पुरुषांनी आणि स्वतला अबला म्हणवुन घेणार्या स्त्रियांनी बाहेर पडायलाच हवे.
वर्षानुवर्षे उपेक्षिल्या गेलेल्या एखाद्या जातीला ठराविक विशेषणा ने संबोधणे केंव्हाही गैरच्.सरसकट विधाने करताना प्रत्येक व्यक्तीने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
सुनित यांच्या मतांशी १००% सहमत !
"अनामिका"
28 Sep 2008 - 11:20 am | भडकमकर मास्तर
अगदी लै वेळा सहमत
काही साच्यांकडे आपण खेळीमेळीच्या नजरेने पाहू शकतो परंतु खेळीमेळीने पहाणे आणि अपमानकारक असे साचे बनवणे यातली सीमारेषा फार फार सूक्ष्म आहे.
आपण लिहिता त्याप्रमाणे योग्य शब्दरचनेने सिचुएशन टाळता आली असती...
असो...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
28 Sep 2008 - 11:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
"बायकांना गणित जमत नाही", या गोष्टीवरही चर्चा बर्याचदा कानावर पडते. आणि माझा विषय साधारण संबंधित असल्यामुळेतर खूपदा जेवताना या गोष्टींवर गप्पा होतात. त्यातही एक आणखी निरीक्षण, लग्न झालेल्या पुरुषांपैकी एकही माणूस बायकांना अमूक एक गोष्ट जमत नाही असं म्हणत नाही, त्यांची मतं उलटीच दिसतात आणि लग्न न केलेले किंवा घरात बहिण नसणारे पुरुष "बायकांना फलाण्या गोष्टी जमत नाहीत" अशी सर्वसाधारण टोचणारी विधानं करतात. पण तेव्हाच अजूनही किती टक्के मुलींना घरातल्या मुलांएवढीच संधी मिळते किंवा ग्रॅज्युएशननंतर पहिल्यांदा लग्नाच्या गोष्टी सुरू होतात याचा विचार कधीही होत नाही.
माझा स्वतःचा अनुभव आहे, (नशीब घरातून नाही, पण बाहेरचे) झालं ना एम.एस्सी, "आता कशाला पुढे शिकायला हवंय, योग्य वय उलटून जायच्या आत लग्नाचं काय ते बघ!" असं किती मुलांना ऐकवलं जातं. मी स्वतः हे किंवा अशाच अर्थाचं वाक्य कमीतकमी पाच लोकांकडून ऐकलं आहे, आणि आता स्टॅटीस्टीक्स काढायचं तर त्यातले चार पुरूष होते आणि एक स्त्री, सगळे तेव्हाच साठी पार केलेले होते.
त्याचबरोबर मी हे पण ऐकलं आहे, "आधी काय ते शिकून घे, करीयरला सुरूवात कर आणि मगच लग्न कर. दोन्ही गोष्टी एकाच वेळी करायच्या फंदात पडू नकोस काहीच नीट एंजॉय करता येणार नाही." हे म्हणणार्या सगळ्या माझ्या मैत्रीणी, एकूणएक लग्न झालेल्या, माझ्यापेक्षा साधारण चार किंवा थोड्या जास्त वर्षांनी मोठ्या!
माझ्या मैत्रिणींनी तेव्हा मला जो काही मोलाचा सल्ला आणि मानसिक आधार दिला तो किती मुलींना मिळतो, घरातून किंवा जवळपासच्या नातेवाईक, मित्रमैत्रीणींकडून? उत्तर खूपच कमी येईल.
हे बदलण्यासाठी काय करावं हा मोठा प्रश्न कालच्या "चारचाकी चालवण्याच्या चर्चे"वरून मला पडला आहे.
28 Sep 2008 - 7:08 pm | टारझन
आजी तुझं आणि मुक्तसुनित रावांच जे मत आहे ते आधी पासूनच पटलेलं आहे.
"आता कशाला पुढे शिकायला हवंय, योग्य वय उलटून जायच्या आत लग्नाचं काय ते बघ!" असं किती मुलांना ऐकवलं जातं.
हे मात्र एकदम चुकीचं आहे ..
स्त्री-पुरूष हा भेदभाव उरायलाच नाही पाहिजे... म्हणूनच बस मधे खास स्त्रीयांना राखिव जागा ... सरकारी कार्यालयात राखिव भरती .. शिक्षणक्षेत्रात आरक्षण .. इव्हन मिसळपाववर पण कुठेतरी स्त्रीयांना काही राखिव द्या असं म्हणणार्यांना आपण सगळ्यांनी (जे स्त्री-पुरूष समानतेचा पुरस्कार करतो) .. ऑन द स्पॉट फाटावर मारायला हवं .. कारण अशी स्पेशल ट्रीटमेंट भेटली की त्या विषमतेला खतपाणी मिळणारच ... सरसकट विधाने टाळावीत .. आपण जे आहे ते प्रांजळ पणे ऍक्सेप्ट करायला शिकावं ... कोणीही असो मग ... असो ... बाकी चालू द्या...
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
1 Oct 2008 - 10:35 am | विजुभाऊ
लग्नपूर्वी उत्तम चित्रकला/ गायन /नृत्य/ वादन वगैरे येणार्या फुलपाखरु हुशार मुलींचे लग्नानन्तर गृहीणी नामक सुरवंटात रुपांतर का होते?
बी एस सी झालेल्या मुलेचे बी कॉम मुलाशी लग्न झाल्यावरही तो मुलगा तिच्या गणीताबद्दल शंका घेत असतो. हे असे का होते. हे असे बोलु धजावण्याची परवानगी त्याला कोण देते.
आत्मैव ह्यात्मनो बन्धु आत्मैव रीपुरात्मनः
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
18 Jul 2012 - 3:19 am | चित्रगुप्त
लग्नापूर्वी उत्तम चित्रकला/ गायन /नृत्य/ वादन वगैरे सुरवंट मुलींचे लग्नानन्तर गृहीणी नामक सुंदर फुलपाखरात रुपांतर होते, असे का म्हणू नये? गृहिणीची योग्यता कमी का लेखावी? ती कितीतरी आव्हाने समर्थपणे पेलत संसाराचा सुंदर बगीचा फुलवत असते...
एका विशिष्ट वयानंतर चित्रकला, नृत्य, इ.इ. मधे प्रवीण, अविवाहित मुली अतिशय भकास जीवन जगत असलेली उदाहरणे बरीच बघितलेली आहेत... अश्या क्षेत्रातील ग्लॅमर लवकरच ओसरते, आणि उरते एक भयाण पोकळी... वरकरणी कितीही आव आणला, तरी ती पोकळी या कला भरू शकत नाहीत...
28 Sep 2008 - 11:46 am | ऋषिकेश
लेख आवडला... पटला
+१
हे मात्र कठीण आहे हो.. कशाने कोणाला कधी अपमानास्पद वाटेल सांगता येणार नाहि. :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
28 Sep 2008 - 7:00 pm | मुक्तसुनीत
>>> हे मात्र कठीण आहे हो.. कशाने कोणाला कधी अपमानास्पद वाटेल सांगता येणार नाहि.
माझ्या मते एक ठोकताळा असा : तुम्ही जे विधान कराल ते समोरच्याला अपमानस्पद वाटत असेल तर ते विधान करण्यामागची तार्किक संगती म्हणा - त्या मागच्या फॅक्ट्स आणि प्रसंगी फिगर्सही - तुम्हाला सांगता यायला हवे. नाहीतर आपले विधान केवळ अपमान करण्यासाठी आहे असे समजून चालायला हरकत नाही.
28 Sep 2008 - 7:49 pm | ऋषिकेश
तार्किक संगती म्हणा - त्या मागच्या फॅक्ट्स आणि प्रसंगी फिगर्सही तुम्ही ढीग सांगाल हो पण तरीही अपमान करून घ्यायचं ठरवलं तर होतोच.. शिवरायांच्या पुतळ्याला विरोध करणे कितीही फॅक्ट्सने सांगितलं तरी संभाजी ब्रिगेडना अपमान वाटतोच ना.
इथे विचार करा त्या अग्रलेखाचा संभाजी ब्रिगेड ऐवजी हाच विरोध अब्दुल कलामांनी केला असता तर?
तेव्हा समाजाने तयार केलेल्या साच्यापेक्षा पुर्वग्रह टाळावा असे वाटते..
"बाकी साच्यात अडकायचं नाहि" या साच्यातही अडकणे वाईटच..
स्वगतः मुक्तरावांना खाली प्रियालीताईंनी मुद्द्यांने केलेले विधान अपमानास्पद वाटले का? :?
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
28 Sep 2008 - 7:54 pm | मुक्तसुनीत
म्हणूनच मी जो उपाय सांगितला तो "ठोकताळा" या स्वरूपाचा होता. "सिल्वर बुलेट" या अर्थाने मी ते म्हणालो नाही.
28 Sep 2008 - 1:33 pm | बबलु
अगदी १००% सहमत.
....बबलु-अमेरिकन
28 Sep 2008 - 2:41 pm | गणा मास्तर
उत्तम वैचारीक स्फुट
कुठ्ल्याही रंगाचा गॉगल न चढवता दुनियेकडे पहायला शिकले पाहिजे म्हणजे दुनिया ज्या रंगाची आहे त्या रंगाची दिसेल.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
28 Sep 2008 - 7:01 pm | मुक्तसुनीत
अगदी बरोबर. यालाच मराठीत "कावीळ होणे" असेही म्हणतात. ते टाळावे.
28 Sep 2008 - 2:48 pm | प्रकाश घाटपांडे
समर्पक समारोप. तरी देखील हे साचे साहित्यात परंपरा टिकवुन आहेत. भाषा, संस्कृती , समाज यांच्यातील
संबंध दर्शवणारे त्या त्या काळातील पाउल खुणा आहेत. एखाद्या शारिरिक, सांस्कृतिक, सामाजिक व्यंगावर बोट ठेवताना देखील संवेदनशीलतेमुळे तो दुखरा भाग वेदना देतो. डॉक्टर तपासताना दुखरा भाग तपासतात ते वेदनामय भाग नेमका कुठे आहे ते तपासण्यासाठी. संवेदन व वेदना यांचे मिश्रण हे पुन्हा स्थलकालव्यक्ति सापेक्ष असते. दुखण्याने बेजार झालेला रुग्णाला डॉक्टरांचे तपासणे हे शिक्षा वाटते. क्षणभर डॉक्टर हे आपले शत्रु वाटायला लागतात. मुद्दामुनच ते आपल्याला त्रास देताहेत असे वाटायला लागते. एखाद्याच्या विनोदात एखाद्याच्या वेदना लपलेल्या असतात. त्या परिस्थितीतुन जेव्हा आपण बाहेर येतो त्यावेळी आपण त्या विनोदात सहभागी होउ शकतो . मग आपल्याला वाटते कि आपण उगीचच संवेदनशील होतो.
काही लोक आपली दु:ख सारखी कुरवाळत बसतात. ज्याच जळत त्याला कळत असे म्हणत भुतकाळातल्या खपल्या काढत बसतात किंवा काहीतरी कुरापती काढून आपल्या खपल्या इतरांना काढायला प्रवृत्त करतात. मग जखम झाली कि परत दु:खाच्या कोषात. असे चक्र चालूच असते.काही धुर्त लोक त्यांच्या या वेदनशीलतेचा उपयोग करुन सतत त्यांना तुमच्यावर अन्याय होतोय, सूड घ्या असे चेतवत आपली पोळी भाजुन घेत असतात.
सरसकट विधाने करताना तारतम्य बाळगावे हे मान्य आहे पण ती सरसकट विधाने आपल्याला सरसकट पणे लागु नाहीत आपण अपवाद आहोत याचे देखील तारतम्य ठेवावे. थट्ट मस्करी ही होतच असते. आपण मात्र इतरांची थट्टा करायची पण आपली थट्टा कुणी केली तर आपल्याला चालत नाही अशी सोयिस्कर भुमिका घेतली त॑र वादंग निर्माण होतात. अनेक वेळी अपमान ,दु:ख, अपयश ह. घ्यावी लागतात. त्यावेळी आपण आपली सहनशक्ती वाढवत असतो किंवा दुसर्या अर्थाने संवेदनशीलता कमी करत असतो.
साहित्यात जाती वरुन अनेक म्हणी वाक्यप्रचार आहेत ते जसेच्या तसे घेण्याऐवजी त्याचे अन्वयार्थ लक्षात घेतले जातात. त्या काळातील समाजरचनेत त्याचा उगम आहे हे आपण लक्षात घेतो. उदा. भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी, चांभार चौकशा , रिकामा न्हावी भिंतीला तुमड्या लावी...... वगैरे वगैर
तेव्हा ह घ्यावे हे उत्तम समाजात अनेक प्रकृती आहेत व प्रवृत्ती आहेत. त्याचा धांडोळा घेताना एखादी उफाळुन येते. विचार करायला लावणारा लेख लिहिल्या बद्दल मुक्तसुनीतचे मनापासून आभार.
प्रकाश घाटपांडे
28 Sep 2008 - 3:05 pm | प्रियाली
नवर्याच्या पैशांवर मजा मारणार्या गॄहिणी हा ही एक ठराविक साचा. प्रत्येकाला आपापले साचे दिसून येणे अतिशय महत्त्वाचे.
28 Sep 2008 - 6:57 pm | मुक्तसुनीत
मतांचा प्रतिवाद करायचा तर सरळ स्वच्छ शब्दात बोलावे. सहमती दाखवून मग परत उगाच ठळक शब्दात ठराविक शब्द टाकून आडून वार करणे यातून केवळ तेढच वाढते. असो.
28 Sep 2008 - 7:10 pm | प्रियाली
आडून वार करण्याची गरज ती काय? तसे केले असते तर आपल्याला वर्मी लागल्यासारखे समजले नसते. या गोष्टीला वार म्हणणे मला पटत नाही.
एखादी गोष्ट आपण करतो तेव्हा ती योग्य आहे. चूक नाही माझे सौजन्य आहे हे दाखवण्याची धडपड, मग इथे विच हंटींग चालते म्हणून ओरड, तुमचे लाडके सभासद काय म्हणतात बघा म्हणून केलेली विधाने जर आपली चूक झाकताना होत असतील तर मग दुसरे तेच करतात तेव्हा एवढे मोठे लेख तरी लिहू नयेत.
पूर्वीच्या घटना इतक्या स्पष्ट शब्दांत लिहिण्याची गरज नव्हती असे मला वाटते. मताचा प्रतिवाद करायचा नव्हता. आपले मत योग्य आहे पण ते लिहिताना आपणही असेच केले होते पूर्वी याची आठवण असू द्यावी एवढेच दाखवायचे होते आणि परिणाम साधला गेला असे वाटते.
तेढ वाढवण्याचे आणखीही प्रकार असतात असं वाटतं पण ते विषयाशी संबंधीत नाही.
28 Sep 2008 - 7:15 pm | मुक्तसुनीत
असे, इतरांना थोडा इंटरेस्ट वाटतो असा थ्रेड हा हा म्हणता हायजॅक करणे हेदेखील तेढ वाढवण्याचे प्रकारात मोडते असे दिसते. असो. माझ्याकडून हा विषय संपला. तुमचे चालू देत ! :-)
28 Sep 2008 - 3:18 pm | लिखाळ
स्फुट छान आहे.. असे काही विचार मागच्या चर्चेमुळे मनात आले होते. ते इतक्या चांगल्या तर्हेने वाचायला मिळाले याचा आनंद झाला.
>>काही साच्यांकडे आपण खेळीमेळीच्या नजरेने पाहू शकतो परंतु खेळीमेळीने पहाणे आणि अपमानकारक असे साचे बनवणे यातली सीमारेषा फार फार सूक्ष्म आहे. <<
खरे आहे. ते त्या चर्चेमुळे समजलेच.
>>स्त्रियांना इतर अनेक हक्क आणि सुविधांप्रमाणे , गाडी चालवण्याची सुविधासुद्धा , अलिकडेच मिळाली आहे. स्त्रियांच्या हातून ही सुविधा वापरताना मला चुका होताना दिसतात. प्रसंगी गमतीदार प्रसंग निर्माण होता<<
असे होते अनेक वेळा. पण वाहन चालवणे या बाबत हा निकष कसा ठरावा हे कळत नाही. एकाच पिढीतील मुलगा-मुलगी एकदम वाहन शिकतात तरी अनेकदा फरक दिसतो. पण तो फरक विनोदापुरता उल्लेखला गेला तर ठीक असे वाटते. (कारण मुलगे इतर काही बाबतीत मुलींपेक्षा वेगळे वागुन मुलींच्या दृष्टीने विनोद निर्माण करत असतीलच !) पण यावर आता बरीच चर्चा झाली आहे.
त्या चर्चेमध्ये 'मुलींना बाहुली खेळायला देणे आणि मुलाला गाडी देणे' यामुळे स्वभावात फरक तयार होत जातात असा कुणी मुद्दा काढला होता. हा एक मोठा मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करायला लावणारा प्रश्न आहे. यावर अनेकदा मंथन होत असते. मुली या कोठकोठल्या बाबतीत जात्याच वेगळ्या आहेत आणि कोणत्या बाबतीत त्यांच्या आवडी-निवडी-वागणे समाज अनाहुतपणे त्यांच्यावर लादत असतो आणि तयार करत असतो हा स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे निश्चित.
--लिखाळ.
28 Sep 2008 - 3:27 pm | बेसनलाडू
विवेचन
(विचारशील)बेसनलाडू
28 Sep 2008 - 3:38 pm | नीधप
लेख पटला. आवडला.
लैंगिक भेदावर आधारीत आणखी काही विनोदी साचे.
१. सर्व पुरूष हे नराधम असून सर्व बायका भोळ्या असतात - माझ्या आयुष्यातले वडील, भाउ, नवरा, गुरू, मित्र, सहकारी इत्यादी जे पुरूष आहेत त्यात कोणी नराधम मलातरी आढळलेले नाहीत. माझ्या अनुभवाच्या कक्षेच्या बाहेर नराधम नसतील असं नाही पण तरी ते प्रमाण कितीतरी कमीच. भोळ्या बाया नसतील असं नाही पण तेही प्रमाण तसं कमीच. भोळ्या 'दिसणार्या' मात्र खूप माहितीयेत. ;;)
२. पुरूषाने कणखरच असायला हवे किंवा असतात. तर बाई ही कमजोर असते/ असायला हवी - अनेकांचे प्रेमभंग पाह्यले आणि त्यातून मुलगी ज्या कणखरपणे बाहेर येऊ शकते त्या कणखरपणे एकाही मुलाला बाहेर येताना पाह्यले नाही. अर्थात हे जर दोघांनी मनापासून प्रेम केले असेल तर. या उदाहरणांपासून ते शेतकरी आत्महत्या करतात आणि मागे त्या सगळ्याचे टक्केटोणपे खात उभी रहाते ती त्याची बायको जिला आत्महत्या करणार्याची विधवा असं बिरूद मिळालेलं असतं. या उदाहरणांपर्यंत सोसण्याची आणि जगण्याची ताकद बाईमधेच जास्त असते असं पाह्यलंय.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
28 Sep 2008 - 3:41 pm | जैनाचं कार्ट (not verified)
टाळ्या !!!!!!!
:B सुंदर प्रतिक्रिया !!!
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
17 Jul 2012 - 3:57 pm | बॅटमॅन
आंगाश्शी!!!!!!
28 Sep 2008 - 5:48 pm | शितल
मुक्तसुनीत जी,
तुमचे विचार पटले.
>>>>>सरसकट विधाने करताना थोडी सावधानता बाळगा हेच मी तुम्हाला सुचवतो आहे. आपण आपल्यातले फरक जे आहेत ते साजरे करायला हवेतच. किंबहुना , भिन्न लिंगांच्या , जातिधर्माच्या माणसांचा आवाज जितका मुख्य प्रवाहात येईल तितके आपण समृद्धच होऊ.
हे विधान तर अगदी आवडले.
:)
28 Sep 2008 - 6:02 pm | अवलिया
प्रकाटाआ
28 Sep 2008 - 5:52 pm | विसोबा खेचर
मुक्तराव,
चांगले विचार मांडले आहेस...
एक उदाहरणच घ्यायचे झाले तर अशा प्रकारचीच गोष्ट कळत नकळत आपण लैंगिकतेच्या बाबतीत रूढ संकल्पनेपेक्षा वेगळी निवड असणार्या व्यक्तिंच्या बाबतीत करतो आहोत. त्यांची थट्टा उडवणारी विधाने करताना (क्वचित का होईना पण) मिसळपाववरही होताना आपण पहातो. भारतासारख्या देशात अजूनही त्यांचा आवाज क्षीण आहे , अजूनही भारतातले कायदे या बाबतीत अन्यायकारक आहेत. पण माझी खात्री आहे, की या बाबतीत बदल होणार. तो होणे अटळ आहे. कायदे बदलतील , लोकांची या गोष्टींकडे पहाण्याची दृष्टी बदलेल. जे इतर साच्यांच्या बाबतीत झाले तेच याही बाबतीत होईल.
ह्या उतार्याचा नीट व स्पष्ट शब्दात उलगडा झाला नाही. तू हे समलिंगिंबद्दल बोलतो आहेस का?
तसं असेल तर यावर माझं वैयक्तिक मत --
आपण लैंगिकतेच्या बाबतीत रूढ संकल्पनेपेक्षा वेगळी निवड असणार्या व्यक्तिंच्या बाबतीत करतो आहोत.
रूढ संकल्पना? उलटपक्षी स्त्रियांना पुरुषाचे किंवा पुरुषांना स्त्रियांचे आकर्षण असणे ही रूढ संकल्पना नसून ती नैसर्गिक किंवा मूलभूत संकल्पना आहे! प्रजननही केवळ ह्याचमुळे शक्य होते. समलैंगिकता ही मला अत्यंत अनैसर्गिक व विकृत गोष्ट वाटते!
बाकी तू म्हणतोस ते खरं आहे की निदान भारतात तरी अजून बर्याच ठिकाणी माझ्यासारख्या अनेकांना हा प्रकार अंमळ चमत्कारिक व विकृत वाटतो आणि या प्रकाराची "आदमी हू, आदमीसे प्यार करता हू...." अशी खिल्लीही उडवली जाते! :)
पेजथ्री किंवा उंबरठासारख्या अत्यंत उत्तम चित्रपटांतूनही समलैगिकतेबद्दल सार्थ चीड व्यक्त केलेली आहे असं माझं मत आहे...!
मिसळपाव हे संकेतस्थळदेखील काही रुढी, संस्थळचालकांचा फुकटचा लब्धप्रतिष्ठितपणा, भाषेच्या-सभ्यतेच्या अन् संस्कृतीच्या साचेबद्ध समजुती, संकेतस्थळाचे आधारस्तंभ असलेल्या सभासदांनाच परकी वागणूक देणे, इत्यादी गोष्टींना तडा देऊन जन्माला आलेले संकेतस्थळ आहे असे मी या क्षणी सार्थ अभिमानापोटी म्हणू इच्छितो...! :)
असो, एका उत्तम स्फुटाबद्दल अभिनंदन...
तात्या.
28 Sep 2008 - 6:08 pm | अवलिया
रूढ संकल्पना? उलटपक्षी स्त्रियांना पुरुषाचे किंवा पुरुषांना स्त्रियांचे आकर्षण असणे ही रूढ संकल्पना नसून ती नैसर्गिक किंवा मूलभूत संकल्पना आहे! प्रजननही केवळ ह्याचमुळे शक्य होते. समलैंगिकता ही मला अत्यंत अनैसर्गिक व विकृत गोष्ट वाटते!
सहमत आहे.
माझ्या मते समलैंगिकता ही अत्यंत अनैसर्गिक गोष्ट असुन विकृती आहे. तिचा प्रसार दुर्देवाने काही देशांमधे सरकारी स्तरावर होत आहे ही मानवतेच्या दृष्टीने अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे.
स्त्रियांना पुरुषाचे किंवा पुरुषांना स्त्रियांचे आकर्षण असणे यात गैरच काय किंवा तिला रुढ असे मानुन इतर आकर्षणाला उदात्त मानायचे प्रयोजन काय हे कळले नाही.
अर्थात आम्ही परंपरावादी आहोत त्यामुळे होते काय बिर्याणी केली तरी तो फोडणीचा भातच होतो..
त्यामुळे नीट समजावुन सांगितले तर समजुन घेवु. प्रयत्न नक्कीच करु. राग मानु नये.
बाकी लेख अतिशय छान आहे
नाना
28 Sep 2008 - 7:08 pm | मुक्तसुनीत
खाली तात्यांना म्हण्टल्याप्रमाणे , वुई अग्री टू डिसऍग्री. :-)
28 Sep 2008 - 7:24 pm | नीधप
आपल्यासारखं नाही ते सगळं विकृत असं समजायची नकळतपणे एक सवय लागलेली असते त्यातलाच हा प्रकार नाही ना?
समलिंगी लोकांसाठी त्यांचं वागणं हे नैसर्गिकच असते.
आणि हो आरोग्याचा मुद्दा म्हणाल तर विषमलिंगी संबंधांमधेही धोका आहेच की.
असो. या धाग्याचा हा मुद्दा नाही पण या विषयावर थोडं अधिक वाचन करून मग त्याला शिक्के मारा एवढीच एक विनंती आहे.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
ताकः मी समलिंगी नाही परंतू समलिंगी व्यक्तींना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार इतर कुठल्याही विषमलिंगी माणसाइतकाच आहे हे नक्की मानते.
28 Sep 2008 - 7:34 pm | प्रकाश घाटपांडे
शमत आहे. एके काळची विकृती आता प्रकृती म्हणुन मान्य होत आहे. अजुनही हस्तमैथुन ही काही लोक विकृती मानतात. र.धो. कर्व्यांना काही समकालीन लोक विकृत मानत.
प्रकाश घाटपांडे
28 Sep 2008 - 7:44 pm | टारझन
अजुनही हस्तमैथुन ही काही लोक विकृती मानतात.
=)) =)) =)) =)) =)) आज हसून हसून मरतंय टार्या ...
आहो विकृती ? आता कोणाचा बोळा निघत नसेल तर हातानेच बोळा काढला तर गेलं काय ? =))
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
28 Sep 2008 - 8:15 pm | ऍडीजोशी (not verified)
अरे ए टार्या जरा थंड घे की सोन्या :)
28 Sep 2008 - 9:17 pm | ऋषिकेश
जर तुमचे समलिंगी संबंधांवर ठोस आणि ठाम मत बनलेले नाहि त्यांनी ऑस्कर विनिंग चित्रपट "ब्रोकबॅक माऊंटन" जरूर बघावा.
तसेच ज्यांना अजून हटके चित्रपट पहायचा असेल त्यांनी ट्रांस-अमेरिका हा छक्क्यांच्या भावविश्वावरील भावस्पर्शी चित्रपट जरूर बघावा.
हा प्रतिसाद दिला नी टी व्ही बघायला गेलो.. बघतो तर सोनी पिक्स वर आत्ता ट्रांस-अमेरिका लागला आहे.
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
29 Sep 2008 - 12:20 am | आजानुकर्ण
कोणताही देश समलैंगिकतेचा 'पुरस्कार' किंवा 'प्रसार' करत नाही असे वाटते. असा कोणता देश आहे बॉ जो नानांना अपेक्षित आहे.
आपला,
(साशंक) आजानुकर्ण
28 Sep 2008 - 6:05 pm | शैलेन्द्र
तात्यांशी १००% सहमत..
जे नैसर्गीक नाही, आणि आरोग्यदायकही नाहि, ती सवय लावुन घेणे न घेणे हा ज्याचा त्याचा प्रश्न,
पण समाजाने अशा गोष्टिंना ऊत्तेजन देवू नये असे वाटते.
28 Sep 2008 - 7:06 pm | मुक्तसुनीत
>>> रूढ संकल्पना? उलटपक्षी स्त्रियांना पुरुषाचे किंवा पुरुषांना स्त्रियांचे आकर्षण असणे ही रूढ संकल्पना नसून ती नैसर्गिक किंवा मूलभूत संकल्पना आहे! प्रजननही केवळ ह्याचमुळे शक्य होते. समलैंगिकता ही मला अत्यंत अनैसर्गिक व विकृत गोष्ट वाटते!
याठिकाणी तुमचे नि माझे मत अर्थातच भिन्न आहे. मी माझ्या पोस्ट मधे म्हण्टल्याप्रमाणे , आपल्याला या बाबतीत साच्यांच्या पलिकडे पहायला लागेल असा माझा विश्वास आहे. वुई अग्री टू डिसऍग्री ऑन धिस . येस ? :-)
>>> पेजथ्री किंवा उंबरठासारख्या अत्यंत उत्तम चित्रपटांतूनही समलैगिकतेबद्दल सार्थ चीड व्यक्त केलेली आहे असं माझं मत आहे...!
या चित्रपटांमधे या संबंधांचे चित्रण आहे हे खरे. परंतु त्याबद्दल चीड व्यक्त करण्यात आली असे मला दिसले नाही. पेज थ्री मधील नराधम लहान मुलांना सावज बनवतो. हे निश्चितच देहदंडाच्या पात्रतेचे पाप आहे. याची गल्लत समलिंगी संबंधांशी करणे अयोग्य.
28 Sep 2008 - 7:39 pm | सुनील
समलैंगिकता ही वरकरणी पाहता अनैसर्गिक वाटण्याची शक्यता असते. भिन्नलिंगी आकर्षण हे नैसर्गिक तर आहेच, शिवाय प्रजजनासाठीही हे जरूरीचे आहे, हे मान्य व्हावे.
परन्तु, काही अपवादात्मक परिस्थितीत जेव्हा एकलिंगी व्यक्तींना सतत एकमेकांच्या सहवासात रहावे लागते, तसेच भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास हा सुलभ नसतो, तेव्हा समलिंगी आकर्षण निर्माण होण्याची शक्यता दाट असते.
मुंबईत, एका लहान खोलीत दाटीवाटीने राहणारे पुरुष - विशेषतः उत्तर भारतीय - (अरेच्चा, स्वीपींग स्टेटमेन्ट तर नाही ना?) किंवा स्त्रीया (विशेषतः बारबाला) यांच्यात समलिंगी आकर्षणाचे प्रमाण थोडे जास्त आढळते. याचा अर्थ, सर्वच उत्तर भारतीय किंवा बारबाला अशा असतात असे बिलकुल नाही, पण त्यांच्यात हे प्रमाण थोडेफार असू शकते, हाच याचा अर्थ!
तेव्हा अशा मंडळींकडे तिरस्कारयुक्त नजरेने न बघता थोडे सहानुभूतीने पहावे, असे वाटते.
स्पष्टीकरण - या प्रतिसादाची जागा जरा चुकली आहे. हा प्रतिसाद मुक्तसुनीत यांच्या प्रतिसादाला नव्हे तर नाना चेंगट यांच्या प्रतिसादाला उत्तर म्हणून यायला हवा होता.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Sep 2008 - 7:47 pm | विसोबा खेचर
परन्तु, काही अपवादात्मक परिस्थितीत जेव्हा एकलिंगी व्यक्तींना सतत एकमेकांच्या सहवासात रहावे लागते, तसेच भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास हा सुलभ नसतो, तेव्हा समलिंगी आकर्षण निर्माण होण्याची शक्यता दाट असते.
बापरे..! जपलं पाहिजे..!
एकसारखं मित्रांच्यात राहून उपयोगी नाही! काही मैत्रिणीही हव्यात! ;)
आपला,
(आदमी असलो तरी 'औरत'वरच प्यार करणारा!) तात्या. :)
29 Sep 2008 - 12:16 am | आजानुकर्ण
लैंगिक आवडनिवड हा व्यक्तिगत प्रश्न आहे. एखाद्याला समलिंगी संबंधांतून आनंद मिळत असेल तर तो घेण्यास काहीच हरकत नसावी. समलिंगी संबंध हे पाश्चात्यांचे खूळबिळ नसून भारतात पूर्वीपासून चालत आलेले आहे. अनेक राजेरजवाडे मनोरंजनासाठी स्त्रियांबरोबर पुरुषांनाही वापरत. अकबराच्या खोज्यांबद्दलही वाचले आहे .
आपला,
(सहमत) आजानुकर्ण
28 Sep 2008 - 7:43 pm | विसोबा खेचर
मी माझ्या पोस्ट मधे म्हण्टल्याप्रमाणे , आपल्याला या बाबतीत साच्यांच्या पलिकडे पहायला लागेल असा माझा विश्वास आहे.
पण मुळात स्त्रीपुरुष संबंध हा एखादा साचा किंवा रुढी नसून ती एक अपरिहार्य नैसर्गिक गोष्ट आहे. साचा किंवा रुढी कशाला म्हणतात?
तर,
ब्राह्मणांनी मटण खाऊ नये,
बालविवाह,
कुणाचा दीड दिवसाचा गणपती, तर कुणाचा पाच दिवसांचा,
कुणाकडे कोंबडं कापून नवस फेडतात,
तर कुणाकडे देवाला नारळ चढवून नवस फेडतात,
गुढीपाडव्याला गुढी उभारणे,
दसर्याला सोनं लुटणे,
होळीला रंग खेळणे,
इत्यादी असंख्य साच्याची किंवा रुढीपरंपरांची उदाहरणे देता येतील. १० दिवस गणपती बसवण्याची, अनेक वर्षांची साचेबद्ध किंवा परंपरागत रुढीबद्ध पद्धत एखादा माणूस एकदम दीड दिवसांवर आणतो तेव्हा साचा मोडला असं म्हणता येईल किंवा एखाद्या स्त्रीने गुरुचरित्राचे पारायण करून गुरुचरित्र हे स्त्रियांनी वाचू नये ही साचेबद्ध गैरसमजूत मोडली तरीही ते आपल्या लेखातील मुद्द्यांशी सुसंगत आहे परंतु स्त्रीपुरुष संबंध ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. ती एखादी रुढी किंवा साचेबद्ध परंपरा असूच शकत नाही असं माझं मत आहे. आणि आपल्या लेखातील माझी फक्त त्याच मुद्द्याला असहमती आहे!
आपल्या लेखात साचा मोडण्याच्या नावाखाली, "आदमी हू आदमीसे प्यार करता हू.." या अत्यंत अनैसर्गिक आणि विकृत गोष्टीचं कोठेतरी समर्थन केलं गेलं असं माझं मत आहे...
"आमच्याकडे पाच दिवसाचा गणपती बसतो", किंवा "आमच्या घराण्यात गेली १०० वर्ष वारीला जायची परंपरा आहे" असं म्हणणारी कुटुंबं,
"आमच्याकडे स्त्रीपुरुष समागमानंतरच मुल जन्माला येतं!" असं म्हंणत नाहीत. कारण स्त्रीपुरुष संबंध अन् त्यातनं अपत्यप्राप्ती ही नैसर्गिकच घटना आहे!
पेज थ्री मधील नराधम लहान मुलांना सावज बनवतो. हे निश्चितच देहदंडाच्या पात्रतेचे पाप आहे. याची गल्लत समलिंगी संबंधांशी करणे अयोग्य.
मुक्तराव, आपण चुकीचा संदर्भ घेतला आहे. तो नराधम लहान मुलांना सावज बनवतो हा संदर्भ मला द्यायचाच नाहीये. मी म्हणतोय तो संदर्भ म्हणजे जेव्हा कोंकणा सेन आपल्या प्रियकराला अन् एक मित्राला "आदमी हू, आदमीसे प्यार करता हू.." हा सीन सुरू असताना रंगेहाथ पकडते हा आहे! ;)
त्या दोघांना तश्या अवस्थेत पाहून जो एक अनपेक्षित धक्का तिला बसतो आणि एक किळस तिच्या चेहेर्यावर उत्पन्न होते हे चित्रण माझ्या मते पुरेसे बोलके आहे!
असो,
तात्या.
28 Sep 2008 - 8:36 pm | चित्रा
पेज थ्री मध्ये कोंकणा सेनला धक्का बसलेला दिसतो. तिचा मित्र आणि प्रियकर दोघेही तिचा विश्वासघात करतात ते बघून. किळस आलेली वगैरे वाटली नाही. जवळच्या व्यक्तींनी केलेल्या विश्वासघाताचा धक्का स्त्री-पुरुष कोणालाही बसू शकतो.
असो. एडस आणि त्याअन्वये तयार झालेले कायदेविषयक प्रश्न यासंबंधी टॉम हँक्सचा एक जुना चित्रपट पहावा - फिलाडेल्फिया. यात समलिंगी संबंधांविषयी अर्थातच चर्चा आहे, पण एडस आणि या संबंधांचा अर्थाअर्थी काही प्रत्यक्ष संबंध नाही.
http://www.imdb.com/title/tt0107818/
28 Sep 2008 - 8:54 pm | मुक्तसुनीत
>>>आपल्या लेखात साचा मोडण्याच्या नावाखाली, "आदमी हू आदमीसे प्यार करता हू.." या अत्यंत अनैसर्गिक आणि विकृत गोष्टीचं कोठेतरी समर्थन केलं गेलं असं माझं मत आहे...
मी माझा लेख केवळ समलिंगी संबंधांना नजरेसमोर ठेवून लिहिला नव्हता. त्यामुळे एखाद्या गोष्टीच्या नावाखाली दुसरी गोष्ट करणे असे मी येथे केलेले नाही.
ज्या गोष्टीला तुम्ही विकृत असे म्हणता , काही व्यक्तींना ती गोष्ट श्वासोच्छवासासारखी आहे. भिन्नलिंगी व्यक्तीबद्दलच्या आकर्षणाचे समर्थन आपण कधी करतो काय ? त्यामुळे इथे समर्थन मी करत नाहीच. हे एक सत्य आहे. बस्स. छोट्या प्रमाणात का होईना , पण समाजाचा एक भाग हा असा आहे.
पण फॉर द रेकॉर्ड , होय. मी एक भिन्नलिंगाबद्दल आकर्षण असणारी एक व्यक्ती आहे आणि मी समलिंगी प्रवृत्तीचे अस्तित्व मान्य करतो , हे संबंध वैध आहेत असे समजतो. बहुतांशी पाश्चात्य देशात त्यांना जी मान्यता आहे तशी भारतात त्याना कायदेशीर मान्यता हवी हे मत व्यक्त करतो.
29 Sep 2008 - 1:33 am | विसोबा खेचर
बहुतांशी पाश्चात्य देशात त्यांना जी मान्यता आहे तशी भारतात त्याना कायदेशीर मान्यता हवी हे मत व्यक्त करतो.
आपल्या मताशी मी सहमत नाही..
असो, बाकी खुलाश्याबद्दल धन्यवाद...
तात्या.
--
"आदमी हू आदमीसे प्यार करता हू.." हे फक्त एक गाणं म्हणूनच ठीक वाटतं! :)
28 Sep 2008 - 5:53 pm | स्वाती दिनेश
लिखाळ म्हणाला आहे त्याप्रमाणे मागची "स्त्रिया आणि ड्रायव्हिंग"वरील चर्चा वाचताना असेच काही विचार मनात रेंगाळले होते त्याला तुम्ही चपखल शब्दांत मांडले आहे.
स्वाती
28 Sep 2008 - 6:11 pm | सुनील
वयाच्या साठीत नाझींच्या तुरुंगात राहावे लागलेल्या वूडहाउसला कोणीसे विचारले, "तुला जर्मनांचा तिरस्कार वाटत असेल नाही?"
त्यावर तो क्षणार्धात उत्तरला, "I never hate in plurals".
परंतु, आपल्याकडील किती जणांना हे जमते? आपणांपैकी किती जणं घाऊक विधाने (स्वीपींग स्टेट्मेन्ट) टाळू शकतात?
एखाद्या मारवाडी दुकानदाराकडून किंचितसे फसविले गेल्यावर, "हे मारवाडी म्हणजे.....", असे उद्गार साहजिकपणे येतातच!
ठराविक साचेबंद विचारांतून बाहेर येणे, घाऊक विधाने टाळणे हे एक तत्व म्हणून सर्वमान्य होण्यासारखे असले, तरी व्यवहारात आणणे तितकेसे सोपे नाही. अर्थात, याचा अर्थ त्यादृष्टीने प्रयत्नच करू नये असाही नाही!
उत्तम लेख आणि वर घाटपांडे यांचा सुरेख प्रतिसाद.
(घाऊक विधाने टाळण्याच्या प्रयत्नातील) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Sep 2008 - 10:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> त्यावर तो क्षणार्धात उत्तरला, "I never hate in plurals".
मस्त आहे हे वाक्य!
28 Sep 2008 - 6:25 pm | चित्रा
>>खेळीमेळीने पहाणे आणि अपमानकारक असे साचे बनवणे यातली सीमारेषा फार फार सूक्ष्म आहे.
याची उदाहरणे जागोजागी आढळतात. आणि असे साचे बनवले जाऊ नयेत किंवा निदान आपला हातभार त्याला लागू नये अशासाठी म्हणून प्रयत्न करताना कुठे कुठे पुरेसे पडणार असे वाटते अशी स्थिती आहे.
28 Sep 2008 - 7:40 pm | चतुरंग
स्त्रियांना कायमच दुय्यम वागणूक मोठ्या प्रमाणावर मिळत आलेली आहे. पूर्वी ती उघउअघड असे कारण त्याच बाजूने विचार असणारे बहुसंख्येने असत.
गेल्या काही वर्षात मुलींचे एकूण शिक्षणाचे, घराबाहेर/देशाबाहेर शिक्षण/नोकरीला जाण्याचे, विचारांच्या बंदिस्ततेतून बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते आहे, तसा ह्या स्त्री द्वेष्ट्या विचारांना एकप्रकारचा साळसूद मुलामा देऊन ते विचार येनकेनप्रकारेणं माथी मारण्याचे/गळी उतरवण्याचे प्रयत्न होताना दिसतात.
मुलींना शिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभं रहायला आपण पैसा खर्च करतो आहोत म्हणजे आपण किती महान आणि वेगळे असे विचार असणारे सुशिक्षित बाप आजही संखेने कमी नाहीत!
तोच खर्च मुलाच्या बाबतीत करताना असे विचार करता का? नाही! कारण म्हातारपणी सांभाळणार कोण? हा स्वार्थ असतो बर्याचवेळा! (आणी विरोधाभास म्हणजे कित्येक उदाहरणे अशी आहेत की एकुलता एक वगैरे म्हणवला जाणारा मुलगा बघत नाही/बघू शकत नाही पण मुलगी आई-वडिलांना विचारते!)
मुलीचा जन्म हा बाळाला जन्म देणे, त्याचे संगोपन करणे, संस्कार करणे (हा प्रकार काय असतो कोण जाणे? बापाने पोरांसमोर सिगरेटी ओढायच्या, दारु प्यायची, मित्रांबरोबर टवाळक्या करायच्या आणि मूल मात्र एकदम सुसंस्कारित करण्याचा विडा आईने उचलायचा! मस्त!! ह्याचा परिणाम म्हणून बहुदा स्त्रियांनीही हे सर्व करणे चालू केले असावे, आता करा संस्कार!) बायकांनी सोसायलाच हवे, घरासाठी, बाळासाठी एवढे करायचेच असते वगैरे समजुतीच्या गोड शब्दांनी त्यांना थोपटले की झाले काम! (अरे सोद्या, मग तू कर की वरणभात आणि भरव बाळाला!)
कित्येकवेळा आई आणि सासूच्या रुपात मुलींच्या आयुष्यात येणार्या स्त्रियाच त्यांचे खच्चीकरण करण्यात पुढे असतात असेही दिसते. घरात सुनेला एक न्याय मुलीला लाडाचा दुसरा आणि बाहेर भाषणे स्त्रीमुक्तीची! (सुधारणा घरापासून सुरु करा हे ह्या बाबतीत सांगावेसे वाटते.)
मुले आणि मुली ह्यात नैसर्गिक भेदाभेद असणार आहेत. त्याचे भांडवल होऊ नये हेच योग्य. आता गेल्या काही शतकातल्या दडपशाहीविरुद्ध आजकाल स्त्रियांमधे आवाज उठवण्याची जी काही प्रेरणा निर्माण झाली आहे त्यामुळे दोनेक पिढ्यांसाठी पुरुष त्यात भाजून निघणार, विचारांत बदल करावे लागल्यामुळे अस्वस्थ रहाणार, चिडचिडा होणार कारण उद्रेक कधीही समजूतदार वगैरे नसतो!
साचेबद्ध विचार तोडण्यासाठी घणाचे घावच बसावे लागतात. त्याशिवाय साचे तुटणार कसे? तेव्हा समस्त स्त्रीद्वेष्ट्या वर्गाने (ह्यात स्त्रिया आणि पुरुष दोघेही आले) बदलाला मन घट्ट करुन तयार रहावे!
(असो. लिहिण्यासारखे बरेच आहे, स्वतंत्र लेख होईल इतके. तूर्तास एवढेच!)
चतुरंग
28 Sep 2008 - 7:45 pm | मुक्तसुनीत
>>>असो. लिहिण्यासारखे बरेच आहे, स्वतंत्र लेख होईल इतके. तूर्तास एवढेच!
चतुरंग , लिहाच तुम्ही ! :-)
28 Sep 2008 - 9:10 pm | प्रकाश घाटपांडे
उत्तम प्रतिसाद, तत्वतः मान्य असलेल्या कित्येक गोष्टी वास्तवात पचवायला अवघड जातात.
(बायकोचा लाडावलेला नवरा)
प्रकाश घाटपांडे
28 Sep 2008 - 9:43 pm | प्राजु
मला वाटतं मुक्तसुनित यांनी एकच गोष्ट वेगवेगळ्या मार्गानी करताना त्यामध्ये एक अपमानची जी पुसटशी पण अतिशय महत्वाची रेषा असते ति दाखवून दिली आहे. यामध्ये समलिंगी संबंधाचा उल्लेख उदाहरणादाखल केला गेला आहे.
"कसला हा भात पाणिदार झालाय!!! छे!!" असे वाक्य न टाकता जर "आज आमचा भात चावून खायचा त्रास वाचवला आहे वाटतं!!" असे बोलले गेले तर सत्य जे आहे न बदलता त्यामध्ये खेळीमेळीचे वातावरण येऊ शकते.
आज अमेरिकेमध्ये सिटि बस, स्कूल बस चालवणार्या बहुतांशी स्त्रीयाच आहेत. क्वचित एखाद्या सिटी बस वर पुरूष ड्रायव्हर दिसतो पण स्कूलबसेस तरी केवळ स्त्रीयाच चालवताना दिसतात. याचे एक कारण मुलांचा बस मध्ये होणारा दंगा, त्याची चढण्याची आणि उतरण्याची धडपड सहन करणे आणि त्यांच्यावर न खेकसता त्यांना प्रेमाने वागवणे हे केवळ स्त्रीच करू शकते. कारण ती सहनशील तर आहेच शिवाय उपजतच प्रेमळ असते.
वरती अज्जुका म्हणते त्याप्रमाणे शेतकर्याची आत्महत्या हे केवळ पुरूषाच्या अशक्त मानसिकतेचे लक्षण आहे. त्याच्या मागे मुलांना वाढवते आणि कुटूंबाचा कारभार चालवते ति स्त्रीच. मग यामध्ये कोण खंबीर?? पळ्पुटेपणा करून आत्महत्या केलेला पुरूष की पाठीमागे जबाबदारी पेलणारी स्त्री?
असं म्हणतात की, स्त्री ही पुरूषाला जशी घडवू शकते तशी त्याला रसातळालाही पोचवू शकते.. या एका वाक्यातच स्त्रीची क्षमता सिद्ध होते.
"यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: "
देवाने सृष्टी निर्माण केली, पण सगळ्याच प्राणिमात्रांवर एकाचवेळी प्रेम करायला, त्यांची काळजी घ्यायला त्याला जमेना. आणि म्हणून त्याने स्त्रीची निर्मिती केली.
आज तिच्या इतकी सहन शक्ती स्वतःकडे नाही, तिच्या इतकि मॅच्युरीटी स्वतःकडे नाही, तिच्या इतका आत्मविश्वास स्वतःकडे नाही, तिच्या इतकी जबाबदारी पेलण्याची क्षमता स्वत:कडे नाही आणि कोणत्याही कामात स्वतःला झोकून देऊन काम करण्याची वृत्ती नाही. त्यामुळे नाचता येईना अंगण वाकडे (स्वतःला जमले नाही म्हणून "स्त्रीयांना ड्रायव्हिंग येते का?" असे म्हणणे) हे चुकीचे आहे. कदाचित जिच्या मुळे तुम्हाला ड्रायव्हिंग करताना त्रास झाला तीही हाच विचार करत असेल हे विसरू नये.
तेव्हा आपण बोलतो तेव्हा जे बोलतो ते जपून बोलावे हेच सांगणे आहे.
काल "स्त्रीयांना ड्रायव्हिंग येते का?" ला प्रतिक्रिया दिली नाही त्याबद्दल समस्त महिला स्त्री सभासदांची माफी मागते. आजकाल वाट्टेल ते कौल आणि बर्याचशा चर्चांना प्रतिक्रिया देणं बंद केलं आहे मी. आज मुक्तरावांचा लेख आवडला..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Sep 2008 - 10:13 pm | मेघना भुस्कुटे
प्राजूप्रमाणेच लक्ष जाऊनसुद्धा काल या धाग्यावर काही प्रतिसाद देणं टाळलं. त्याबद्दल माफी मागते.
मुक्त सुनीत यांचा लेख आवडला. समलैंगिकतेबद्दल त्यांनी मांडलेल्या विचारांशीही मी सहमत आहे.
चष्मे अटळच, पण निदान आपले चष्मे आपण पारखून निवडावेत, परंपरांनी दिलेली ढापणे लावून फिरण्यात धन्यता मानू नये.
28 Sep 2008 - 10:58 pm | वेताळ
समलैगिंक संबधाचे समर्थन करणे हे चुकीचे आहे. ते पुर्ण:त चुकीचे व अनैसर्गिक आहे. समलैगिंकता ही अलीकडच्या आधुनिक काळात खरी फोफवली आहे. आपण किती मुक्त,उदात्त विचारसरणी चे आहोत हे दाखवण्याचा तो एक किळसवाणा प्रकार आहे. निसर्गात इतर कोणत्याही सजीवात हा प्रकार आढळत नाही. सिग्मड फ्राईड ने तर लैगिंकता व प्रजनन ह्याचा किती निकट संबध आहे ते स्पष्ट केले आहे. लैगिंकसंबधाचा खरा पाया प्रजनन हाच आहे. फक्त मनुष्यप्राणी ह्याला अपवाद आहेत.समलैगिंकतेचे समर्थन करणे चुकीचे आहे.तसेच पाश्चात्य सिनेमे पाहुन आपण आपली विचारसरणी ठरवावी का?,हा एक विचार करण्याचा मुद्दा आहे. बाकी मुक्तसुनित ह्याचा लेख उत्तम आहे.
आज अमेरिकेत तुम्ही "निग्रो" हा शब्द उच्चारणे म्हणजे आपल्या देशात एखाद्याला "म्हारड्या" म्हणण्यासारखे आहे. "निग्रो" आणि " म्हारड्या" दोन्ही चूकच ; हे मान्य आहे. आणि त्यासाठीच अट्रोसिटी कायदा केला गेला,परंतु आजकाल दलित लोक ह्याच अट्रोसिटी कायद्याचा वापर इतरांविरुध्द हत्यार म्हणुन करत आहेत्.त्याचे काय? ह्या बद्द्ल तुम्ही काहीच बोलत नाही.
वेताळ
28 Sep 2008 - 11:59 pm | नीधप
>>तसेच पाश्चात्य सिनेमे पाहुन आपण आपली विचारसरणी ठरवावी का?,हा एक विचार करण्याचा मुद्दा आहे.<<
यासाठीच जरा विषयाचा अभ्यास करा आणि मग शिक्के मारा अशी विनंती केली होती.
आपल्या खजुराहोच्या शिल्पांमधेही समलिंगी शरीरसंबंधांचे चित्रण आहे. पाश्चिमात्य जगाचा वाराही न लागलेल्या एका बिहारी खेड्यात दोन स्त्रियांनी लग्न करण्याची परवानगी पंचायतीकडे मागितल्याची आणि त्यांना ती मिळाल्याची काही वर्षांपूर्वीची नोंद आहे.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
28 Sep 2008 - 11:52 pm | अभि
...निसर्गात इतर कोणत्याही सजीवात हा प्रकार आढळत नाही....
हे मात्र अगदी खोटे आहे,नॅशनल जिऑग्राफिक वर सिंहाचे देखील समलिंगी संबंध दाखवले आहेत.
29 Sep 2008 - 12:18 am | मृदुला
चर्चा प्रस्ताव पटला, आवडला. साच्यांबद्दलचे पुष्कळसे प्रतिसाददेखील आवडले. वि. प्रकाश घाटपांडे व चतुरंग यांचे.
समलिंगी 'संबंध' नैसर्गिक आहेत. पुष्कळ वेळा 'संस्कारांमुळे', म्हणजे वाढीच्या वयात अनुभवलेल्या विविध घटनांमुळे किंवा वर उल्लेखल्याप्रमाणे भिन्नलिंगी जोडीदार मोठ्या काळापर्यंत उपलब्ध नसेल तर मनुष्य समलिंगी होऊ शकतो.
तृतीयपंथी लोक हे त्यांच्या नावाप्रमाणेच स्त्री व पुरूष सोडून तिसर्या वर्गातले, म्हणजे यापैकी नाही वर्गातले असतात. त्यांच्यांत सहसा जनुकीय दोष असतो.
समलिंगी व तृतीयपंथी हे वेगवेगळे गट आहे, त्यांचीदेखील गल्लत होऊ नये.
29 Sep 2008 - 1:42 am | नंदन
स्फुट, लेखात व्यक्त केलेल्या विचारांशी सहमत आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
29 Sep 2008 - 9:45 am | सहज
असेच म्हणतो.
समलिंगी संबध हा विषय पुढे त्याबद्दल घृणा, विरोध इ भावना ह्या लहान मुलाला अंधाराची [तीव्र] भिती, विषारी सापाची [जबरदस्त] भिती अश्या सारख्या [फीयर ऑफ अननोन!] भितीतुनच आल्या आहेत. विषारी साप हे काही समोर आलेल्या कुणालाही चावत सुटत नाहीत. अंधाराला घाबरणारे प्रत्येक लहान मुल आयुष्यभर अंधाराला घाबरतेच असे नाही. आयुष्यभर परिणाम होईल अश्या मोजक्या वाईट घटना घडल्यातरी अंधार व विषारी साप हे रियालिटी आहेत व बहुसंख्य लोकांना हे प्रकार नीट कळले आहेत व योग्य ती उपाययोजना केल्यास अंधार, विषारी साप व आपण हे तीन्ही घटक पृथ्वीवर व्यवस्थीत नांदु शकतो.
खरे तर "समलिंगी संबध" ह्या विषयासाठी वेगळा धागा करावा. बर्याच लोकांनी यावर विचार केला नसतो फक्त घृणा/किळस करुन सोडून दिला असतो.
बाकी मुळ स्फुट, लेखात व्यक्त केलेल्या विचारांशी सहमत आहे.
खरे तर ५० च्या वर प्रतिसाद गेले की त्या धाग्यातील पुढचे प्रतिसाद बघणे जरा किचकट असते. चर्चा चालू रहाणार असेल तर कृपया भाग २ सुरु करावा
29 Sep 2008 - 2:44 am | पिवळा डांबिस
मुक्तसुनीतांनी व्यक्त केलेल्या विचारांशी सहमत!
आपण उराशी बाळ्गलेल्या ठराविक साच्यांमुळे आजच्या काळातही काही गोष्टी लोकांना स्वीकार करायला जड जातात....
उदा.
उत्तम स्वयंपाक करता येत असलेला (किंवा एकंदरीत गृहकृत्यदक्ष!!) नवरा...
बीफ खाणारा हिंदू....
शेकडो/हजारो लोकाना मॅनेज करू शकणारी कॉर्पोरेट मॅनेजर (श्रीमती इंद्रा नूयींसारखी) समर्थ स्त्री...
प्रेमळ आणि मायाळू सासू...
रसिक/विद्वान/रोमँटिक श्रीमंत माणूस... ही हिन्दी सिनेमांची देणगी! खरा रोमँटिक प्रियकर हा गरीबच आणि ज्या श्रीमंताशी लग्न लागते तो अरसिक किंवा फक्त पैशाच्या मागे लागलेला.... :)
मस्त धागा आहे, चालू द्या...
30 Sep 2008 - 9:08 pm | नारायणी
समलैंगिकते बद्द्ल किळस व्यक्त करण्या आधी, या विषयावर १९ सप्टेंबर च्या लोकप्रभात आलेला हा लेख नक्की वाचा. बरेच गैरसमज दूर होतील.
http://www.loksatta.com/lokprabha/20080919/lpfront.htm
30 Sep 2008 - 10:42 pm | प्रभाकर पेठकर
लेख वाचला. त्यात समलिंगी लैगिकतेबद्दल वैद्यकिय दृष्टीकोन काय आहे ह्या विषयावर उहापोह नाही. हा मानसिक आजार आहे का? ह्यावर वैद्यकिय उपचार आहेत का? असे प्रश्न मनात निर्माण होतात.
त्यांच्या बद्दल किळस वाटत नसली तरी असे वागणे नैसर्गिकही वाटत नाही.
30 Sep 2008 - 11:03 pm | नारायणी
लेख जरा लांबलचकचं आहे हो.मलाही संपूर्ण लेख लक्ष देउन वाचता नाही आला.
वैद्यकिय दृष्टीकोन काय आहे ह्या विषयावर उहापोह नसला तरी लेखात असे वागणे हे नैसर्गिक असते, हे दिलेले आहे. शब्द वेगळे असतील पण अर्थ हाच आहे.
1 Oct 2008 - 12:14 pm | विजुभाऊ
शिळा झालेल्या अहिल्येचा रामाने पायाच्या अंगठ्याने उद्धार केला.
तेंव्हापासुन प्रत्येक तथाकथीत पुरुषाला वाटते की त्याच्या समोर शिळा उभी आहे आणि तो स्वतः राम आहे.
स्वतःच्या पायाचा अंगठा फ्रॅक्चर करुन घेण्याव्यतीरीक्त दुसरे काहीच तु करु शकत नाहीस हा धडा त्याला ती शिळा शिकवते.
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
3 Oct 2008 - 1:19 pm | विसुनाना
शेतकरी संघटनेचे अध्वर्यू श्री. शरद जोशी यांनी एका मराठी पाक्षिकात शेतकरी महिला आघाडीच्या निमित्ताने लिहिलेला 'स्त्री पुरुष समानता : चांदवडची शिदोरी' अशा काही नावाचा लेख नुकताच वाचनात आला. अत्यंत अभ्यासपूर्ण लेख!
विविध विदा, प्रत्यक्ष अनुभव आणि थोरामोठ्या संशोधकांची मते यावर आधारित हा लेख असे सिद्ध करतो की स्त्रिया आणि पुरुष सर्व बाबतीत समान नसले तरी ज्याप्रमाणे काही बाबतीत पुरुष वरचढ आहेत त्याप्रमाणेच काही बाबतीत स्त्रिया वरचढ आहेत.
त्यामुळे कोण श्रेष्ठ? असे जनरलायझेशन शक्य नाही.
अनेक चुकीचे पूर्वग्रह (उदा. स्त्रिया पुरुषांपेक्षा लहानखुर्या असतात, त्यांची बुद्धीमत्ता कमी असते इ.) त्यांनी पुर्णपणे खोडले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जर स्त्रियांनी आपल्याहून लहानखुर्या पुरुषांबरोबर संतती निर्माण करणे काही युगे सातत्याने सुरू ठेवेले तर पुरुष स्त्रीपेक्षा कायमचा लहानखुरा होऊन जाईल.
शिवाय पुनरुत्पादन हा निकष धरला तर स्त्री पुरुषाच्या प्रत्यक्ष संगाशिवायही/कुटुंबात न राहताही पुनरुत्पादन करू शकते आणि अशा अपत्यावर केवळ तिचाच हक्क राहील. आजही अनेक पुरुष स्त्रीने चालवलेल्या संसारात परजीवी (पॅरासाईट) सारखे चिकटून असतात. हे केवळ अपत्यप्राप्तीसाठी बाळगलेले ओझे जर स्त्रीने झुगारले तर एक वेगळाच स्त्रीप्रधान समाज तयार होईल ज्यात पुरुषाला केवळ एका स्पर्म बँकेइतके महत्त्व असेल. सध्यातरी स्त्रीच्या भावनाशीलतेमुळे (भारतात तरी) तसे घडलेले नाही.
या अर्थाने पाहिले तर स्त्रीच श्रेष्ठ ठरते.
मूळ लेख वाचण्याजोगा आहे.
.............................................
माझ्या माहित आलेल्या अनेक स्त्रिया त्यांच्या पुरुषांपेक्षाही हुशार आणि कर्तबगार आहेत. (यात माझ्या पत्नीचाही समावेश होतो .)