चैतन्य -चूर्ण

Rahul Bhuskute's picture
Rahul Bhuskute in काथ्याकूट
2 Jan 2014 - 6:20 pm
गाभा: 

नमस्ते मंडळी

माझा पेशा अध्यापन असला तरी मी समाजाच्या कष्टकरी वर्गातूनच आलेलो आहे .

हा मिसळपाव . कॉम वर लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे

तर आजचा मुद्दां असा आहे की तंबाखू च्या सेवना वर नानाविध पद्धतीने बंदी आणून सरकार असे भासवण्याचा प्रयत्न करीत आहे ,की त्याना देशातील जनतेच्या आरोग्याची फारच काळजी आहे …। इत्यादी .

परंतु ग्यानबाची मेख अशी की सिगारेट व दारू महाग आणि कथित उच्चभ्रू व्यसनांवर कोणी बंदीची कुर्हाड आणू इच्छित नाही .

परंतु गोरगरीब कष्टकरी जनतेला आपल्या रोजच्या रोजीरोटी च्या चिंतेवर आणि श्रम परिहार म्हणून घटका भर रिलीफ देणार्या " चैतन्य -चूर्ण " स्वस्त आणि मस्त तंबाखू वर या सरकारची वक्रदृष्टी का बरे?

जर तंबाखू मुळे Cancer होतो ,तर तो सिगारेट व दारू मुळे ही होऊ शकतोच की !

प्रतिक्रिया

रमेश भिडे's picture

2 Jan 2014 - 6:28 pm | रमेश भिडे

फार निराळा विशय काढला की राव ...

इकडे अनेकजण रेडी आहेत काथ्या कुटायला ...

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jan 2014 - 7:13 pm | अत्रुप्त आत्मा

बार हा लाऊनी गार वाटे जीवा
भेटेल गारवा,पींssssssssकं-ताही!

आनंदराव's picture

2 Jan 2014 - 8:52 pm | आनंदराव

बार हा लाऊनी गार वाटे जीवा
भेटेल गारवा,पींssssssssकं-ताही!

क्या बात ! क्या बात !

अत्रन्गि पाउस's picture

2 Jan 2014 - 9:05 pm | अत्रन्गि पाउस

स्वाती ठकार ह्यांची प्रतिक्रिया अप्रोप्रिएट वाटेल

आदूबाळ's picture

2 Jan 2014 - 10:17 pm | आदूबाळ

अगदी अगदी!

मिपावरच्या बर्‍याच धाग्यांवर त्यांच्या (संभाव्य) प्रतिक्रियांची कल्पना करून बर्‍याचदा मी एकटाच खुदखुदतो. (एका पायाची घडी घालून ... वगैरे..)

बॅटमॅन's picture

3 Jan 2014 - 5:47 pm | बॅटमॅन

त्या बाईंना टुकारबाई असे नामाभिधान काही वर्तुळांत आहे. त्यांना याचि देही याचि डोळा पाहण्याचे भाग्य मिळालेल्या नरपुंगवांपैकी अस्मादिक एक आहेत म्हटलं!!!

आदूबाळ's picture

3 Jan 2014 - 6:01 pm | आदूबाळ

काय सांगतांव!

त्या खर्‍या आहेत होय? मला वाटलं ते एक फिक्शनल कॅरेक्टर आहे! मुक्तपीठ प्रतिक्रिया लेखकांचे पण कट्टेबिट्टे होतात की काय?

अवांतरः "टुकारबाई" नाव ठेवणारं हे वर्तुळ कोणतं?

मारकुटे's picture

2 Jan 2014 - 10:49 pm | मारकुटे

सर्वविषयपारंगत अखिलब्रह्मांडज्ञानसागर स्वभानसम्राट दत्तोबांचं काय म्हणणं आहे ह्या विषयावर?

श्रीरंग_जोशी's picture

3 Jan 2014 - 12:09 am | श्रीरंग_जोशी

तंबाखू च्या सेवना वर नानाविध पद्धतीने बंदी आणून

केवळ १८ वर्षे वयाखालिल व्यक्तिस तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी घातल्याचे पाहिले होते. त्याखेरीज आपण उल्लेखलेल्या नानाविध पद्धती कृपया उलगडून सांगाव्या.

मिपावर स्वागत आहे.

चैतन्य चूर्णाने खाणाऱ्यांना गारवा मिळतो का ?त्याने कर्करोग होतो का ?
माहित नाही .
हे लोक (आणि खाइके पान वाले ) पिंका टाकून घाण फार करतात .
रेल्वे स्टे आणि सार्वजनिक जागा रंगवण्याचा हक्क यांच्याकडे आहे .
घरातल्या कोपऱ्यात नक्षी काढा ना .

अगदी सहमत. सगळ्यात घाणेरडा प्रकार म्हणजे तंबाखू मळून झाली की हे महाभाग त्यांच्या उपयोगाचा नसलेला तंबाखूचा भाग जिथे बसले असतील तिथे टाकून देतात. म्हणजे घरी बसले असतील तर तिथेही!!

+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११!!!!!!!!!!!!!!!!!!!

थांबा पिंक टाकुन येतो .

विजुभाऊ's picture

3 Jan 2014 - 10:20 am | विजुभाऊ

दारू आणि सिगरेट पिवुन कोणी पचापचा थुंकत नाहीत.
तुम्ही तंबाखू खावुन इथे तिथे पचापच थुंकणार नसाल तर तुम्हाला सूट मिळू शकेल

अमोल मेंढे's picture

3 Jan 2014 - 2:39 pm | अमोल मेंढे

बिरबल तंबाखु खायचा, आपले पुलं सुध्दा तंबाखु खायचे, मी पण खातोय...पण पचापचा कुठे थुंकत नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jan 2014 - 3:25 pm | अत्रुप्त आत्मा

@पण पचापचा कुठे थुंकत नाही.>>> मी पण..मी पण..! ;)
http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c1/Streichholz.jpg/300px-Streichholz.jpg
अतीसमांतर- अता न खाणारे या धाग्यावर किति थुंकतात ते बघायचं ! =))

प्रकाश घाटपांडे's picture

3 Jan 2014 - 3:18 pm | प्रकाश घाटपांडे

तंबाखू सिगरेट दारु मुळे शासनाला रेव्हिन्यु मिळतो व हॉस्पिटल ला कापायला रुग्ण मिळतात. बर हे सगळ आपखुशीने!

अतीसमांतर- अता न खाणारे या धाग्यावर किति तथुंकता ते बघायचं ! +१
तंबाखू खाणारे पचापचा थुंकत नाहित . ते काम मावा सुपारि आणि गुटखे खाणारे करतात.