प्रथम सर्व मिपाकरांना मिपावर हे वर्ष वाद-संवादाचे आणि बौद्धिक आनंदाचे जावो ही शुभेच्छा. मिपालाही शुभेच्छा. या वर्षी सुद्धा अनेक शतकी-द्विशतकी धागे निघोत, साद-प्रतिसादांनी मिपा समृद्ध होवो.
तर पुन्हा सगुणोपासना. ही सगुणोपासना आम्हांला इतकी आवश्यक का वाटते? आत्मभान हा सोपा मार्ग आम्हांला का नको?
आत्मज्ञान ह्या शब्दाच्या अर्थाविषयी पारमार्थिक आणि ऐहिक अशा दोन्ही पातळ्यांवर विवेचन करता येइल. सगुणोपासनेच्या आवश्यकतेचीसुद्धा दोन कारणे सांगितली जातात. एक म्हणजे भोळ्याभाबड्या जनतेला निर्गुण असे काही कल्पिणे कठिण जाते आणि दुसरे म्हणजे सगुणोपासना हे एक साधन आहे, पायऱ्या आहेत, आणखी कुठेतरी पोचण्यासाठीच्या.
भोळीभाबडी जनता म्हणजे तरी कोण? आपण आंतरजालावर वादविवाद करू शकणारे प्रज्ञावंत खरोखरच भोळेभाबडे आहोत का? की तिसऱ्याच कोणाच्यातरी वतीने त्यांना गृहीत धरून आम्ही बोलतो आहोत? सगुणोपासना हे साधन मानता मानता साध्यच होऊन बसले आहे हे आमच्या लक्षात का येत नाही आहे? अमुक वेळा पारायणाचा, अमुक हजार नामजपाचा, वेगवेगळ्या नेमांचा संकल्प सोडायचा, आणि तो सिद्ध करायचा, असेच चालते ना? आणि ह्याचेच अवडंबर माजते ना? गणेशचतुर्थीसाठी एकच दिवस रजा असते. उत्सवाच्या उरलेल्या दिवसांत घाईघाईने पूजा आटपायची, मंत्रोच्चार, अथर्वशीर्ष, आरती, नैवेद्य सारे उरकायचे आणि 'हुश्श! झाले एकदाचे' म्हणून बाकीच्या कामाला लागायचे असेच बहुतेक सर्वत्र असते ना? म्हणजे पूजा-उपचार हेच साध्य. अष्टसात्त्विक भाव जागृत होतच नाहीत. कारण ते साध्य नसतेच.
विपश्यनेमध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करावयास सांगतात. दर क्षणीचा श्वास ही किती साधी गोष्ट. पण आपल्याला तिची जाणीव नसते. आपल्या देहव्यवहाराची, आपली स्वतःची जाणीव नसते. श्वासाचा कोहं-सोहं नित्य चाललेला असतो. हृदयाचा अनाहत नादही सदैव चालू असतो. हा आघाताविना होणारा नाद आम्ही ऐकतो का? सगळे सांगतात,' दिलकी सुनो'. आम्ही ऐकतो का? "नादबिंदू के पीछे जमया पानी..."(य.कु.ची आठवण येतेय) नादाचा केंद्रबिंदू म्हणजे हृदय बाष्पगद्गद झालेय. सद्गदित झालेय. अगदी सहज अवस्था. हे 'स्व'चे 'स्व'शी अनुसंधान कायम राखायचे, 'स्व'च्या आनंदात, निजानंदात तल्लीन व्हायचे. त्यासाठी कोणत्याच पायऱ्यांची आवश्यकता नाही. निज म्हणजे तरी काय? आत्म, स्व, निज सारे एकच. अध्यात्म म्हणजे आधी आत्म असे विनोदाने म्हणतात. पण अधि आत्म तर आहे? "आत्मा वा अरे द्रष्टव्यः, श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यः| आत्मनो वा अरे दर्शनेन, श्रवणेन, मत्या विज्ञानेन इदं सर्वं विदितम।" अरे, हा आत्मा पाहावा, ऐकावा, त्याचे मनन करावे. त्याच्या दर्शनाने, श्रवणाने आणि बुद्धीने जाणण्याने बाकी सर्व जाणले जाते. आत्मज्ञान हेच अंतिम ज्ञान होय. आपण हा स्व पाहत नाही. त्याला अनेक अवगुंठनांआड, मुखवट्यांआड लपवतो. सर्व मुखवटे, पटले, आवरणे दूर केली की स्व-रूप कळते. 'घूंघट के पट खोल रे, तोहे पिया मिलेंगे'. निखळ स्व-रूप हेच पिया आणि प्रेयसीही तीच. अद्वैतच आहे. आपण कशासाठी बाहेर शोधतो? एकदा का स्व-रूपाची ही जाणीव स्थिर झाली की सगळे लख्ख दिसू लागते असे संत सांगतात. 'कुणाचे हे घर? हा देह कवणाचा? आत्मा राम त्याचा, तोचि जाणे'. रम चा प्रधान अर्थ आनंदी असणे असा आहे. राम म्हणजे आनंददायक, रम्य, सुंदर. जिथे स्वतःच्या ठायी नित्य आनंद आहे, (तिथे) त्याने हे सर्व जाणले.
आता या सर्व प्रक्रियेमध्ये मूर्तिपूजा, स्तोत्र, आरती यांचे स्थान कोणते? माणसामधला विवेक जागवणे हे साध्य या उपायांनी कधी तरी साध्य होईल का? उलट ती जनता एका गुंगीत राहील. आपण पूजाअर्चा करतो आहोत, यात्रा, व्रतेवैकल्ये करतो आहोत, काहीही करायचे बाकी ठेवीत नाही आहोत, ही ती गुंगी.
ही भोळीभाबडी जनता साध्या आजारावरच्या औषधासाठी डॉक्टरकडे गेल्यावर साध्या,स्वस्त गोळ्यांनी समाधान पावत नाही . तिला महागडे इंजेक्शन हवे असते. जरूर नसताही लोकाग्रहास्तव इंजेक्शन देणारा डॉक्टर मोठा. साध्या गोळ्या देणारे छोटे आणि खोटे. ही जनता एका डॉक्टरचे ऐकत नाही, मग अनेक डॉक्टरांनी 'इंजेक्शनची जरूरी नाही' असे पुन्हा पुन्हा सांगायला नको का? (हे एक उदाहरण)
भोळ्याभाबड्या जनतेला उच्चज्ञानप्राप्तीचा मार्ग सोपा व्हावा म्हणून सगुणोपासना चालू राहावी असे आपण म्हणतो तेव्हा सगुणोपासना ही अडाणी जनतेला दिलेली मुभा, सूट, सवलत आहे हे मान्य करतो. एके काळी अशी सवलत असेलही, पण आज दीडदोन हजार वर्षांनंतरही ती चालू राहावी का? शिवाय या सवलतीचा आज दुरुपयोग होऊ लागलाय. पाठ, सप्ताह, यज्ञ, तीर्थयात्रा यासाठी आज प्रायोजक मिळू लागलेत. हे आयते चालून आलेले प्रायोजकत्व राजकीय पक्षांनी न स्वीकारले तर नवल. सध्या मोफत किंवा अत्यल्प खर्चात (उदाहरणार्थ) शिरडी यात्रा घडवण्याची टूम आहे. मोफत बसगाड्या, मोफत निवास, मोफत जेवण. नंतर त्या बदल्यात काहीतरी मिळायचे/मिळवायचे असतेच. लोकांना गुंगीत ठेवण्याचा, मिंधे राखण्याचा, 'जैसे थे' राखण्याचा हा एक डाव आहे. इतरही अनेक क्षेत्रात असे होते पण तिथे बदलासाठी निवडणुका, पोलिस, कायदे इ. अनेक प्रकार उपलब्ध असतात. इथे मात्र विवेकाने मतपरिवर्तन हा एकच मार्ग.
जनता गुंगीत राहणे हे काही जणांच्या फायद्याचे ठरू शकते हा एक लहानसा आणि गौण मुद्दा आहे. मुख्य मुद्दा हा आहे की जनतेने सदैव भोळे-भाबडे का राहावे? भोळेभाबडे असणे/रहाणे ही सगुणोपासनेसाठी पळवाट बनते आहे का? 'आम्ही बुवा अडाणी माणसे. आम्हाला आत्मज्ञान वगैरे काही समजत नाही' असा आम्ही सुशिक्षित लोक आव आणतो आहोत का? की वेड पांघरतो आहोत? विवेकाने येणारी प्रेम, त्याग आणि विश्वास ही त्रयी आम्हाला रोजच्या जीवनात नको आहे का?
व्यावहारिक पातळीवरही हे आत्मभान आपल्याला कितीतरी मदत करू शकते. सवयीमुळे घडणाऱ्या क्षुल्लक अशा वाईट गोष्टी आपण टाळू शकतो. आपण काय करतो आहोत त्याची जाणीव असली तर रस्त्यात थुंकणे, कचरा टाकणे, विनातिकीट प्रवास करणे, भेसळ करणे, लाच देणे/घेणे, काम न करणे या गोष्टी आपल्या हातून होणार नाहीत. प्रत्येक व्यक्तीचे आत्मभान जागृत होऊन एक 'राष्ट्रभान' बनू शकते. एक कल्याणकारी व्यवस्था निर्माण होऊ शकते.
हा अखंड सावधानतेचा सोपा मार्ग आपणां प्रज्ञावंतांना का नको?
ता. क. : या विषयावर सध्यातरी आणखी धागे काढणार नाही. मिपाकरांनी आश्वस्त राहावे.!
पुन्हा सगुणोपासना
गाभा:
प्रतिक्रिया
1 Jan 2014 - 2:21 am | स्पा
मस्त सगुण जिलबी
1 Jan 2014 - 9:41 am | राही
धन्यवाद. पण अहो ही साधीसुधी नेहमीची जिलबी नाहीय, इमरती आहे इमरती! - तोड्याची जिलबी!!
1 Jan 2014 - 3:01 am | खेडूत
आवडले! नव्या वर्षाची सुरुवात चांगली झाली !
1 Jan 2014 - 9:58 am | धन्या
मस्त. सगुणोपासनेच्या नावाखाली लोक कसे धूंदीत राहतात/ठेवले जातात याचे विश्लेषण आवडले.
2 Jan 2014 - 4:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> सगुणोपासनेच्या नावाखाली लोक कसे धूंदीत राहतात/ठेवले जातात याचे विश्लेषण आवडले.
सहमत.
-दिलीप बिरुटे
1 Jan 2014 - 10:15 am | arunjoshi123
सगुणोपासनेचा फॉर्मॅट बनवता येतो. इतर उपासनांचा नाही. अल्लाला आठवायची (दिवसातून पाचवेळा) कडक अट नसती तर आज इस्लामच नसता. मजिदीतून परतणार्या मुसलमानाला काय केलं तिथे म्हणून विचारलं तर नमाज पढा म्हणेल. म्हणजे नक्की काय म्हणाल तर चटाई कशी टाकली, कसे वाकलो, काय शब्द बोललो हे सांगेन. ती पून्हा सगुणोपासनाच आहे.
उपासना ही सगुणच असते. बाकी निर्गुण, निराकार परब्रह्माची उपासना हे शास्त्रीय संशोधन असते.
1 Jan 2014 - 11:00 am | डॉ सुहास म्हात्रे
सगुणोपासनाच नाही तर कोणत्याही धर्मातल्या कोणत्याही उपासनेमधली कर्मकांडे पाहिली की पॉवलॉव्हच्या प्रयोगाची आठवण येते... तोच तो प्रयोग, ज्यात घंटी वाजवून नंतर खाणे देत राहिल्याने काही काळाने कुत्रा केवळ घंटीच्या आवाजाने लाळ गाळायला सुरुवात करतो. कारण केवळ घंटीच्या आवाजाने त्याला खाणे मिळाल्याचा "आभास" व्हायला लागतो ! कर्मकांडीचे काहिसे तसेच आहे.
सुरुवातीला उदात्त विचारांनी निर्माण केलेली असली तरी एका ठाराविक काळानंतर सर्व कर्मकांडांचा ताबा मुख्यतः उपजिविका, अर्थकारण आणि सत्ताकारण करणार्यांकडे जातो अथवा काही कर्मकांडे ही तर केवळ भौतिक फायद्यासाठी मुद्दाम बनवलेली साधने असतात, हा इतिहास आहे. मग देव/सत्य शोधनाचा मूळ उद्देश आपोआप बाजूला पडून कर्मकांडांचे महत्व वाढत जाते / वाढविले जाते. थोडक्यात साध्य विसरले जाते, केवळ साधनाचे अवडंबर वाढते. कारण:
१. यजमानातर्फे केलेया साधनाच्या प्रयोगाने कोणा ना कोणा मध्यस्थाचा भौतिक फायदा नक्की असतो.
२. यजमानाचा (मृत झाल्यावर) अधिभौतिक फायदा होतो की नाही हे आजपर्यंत कोणाला कळले आहे काय?... आणि झाला तरी तो फायदा यजमानाचा, त्याचा मध्यस्थाला काय फायदा?... आणि नाही झाला तरी यजमान परत जिवंत होऊन थोडाच मध्यस्थाला जाब विचारायला येऊ शकतो?
मग साध्याचा विसर पडला आणि साधनांचा गवगवा झाला तर आश्चर्य कसे काय? शेवटी आपण सर्व माणसेच ना !
1 Jan 2014 - 2:36 pm | प्रकाश घाटपांडे
मस्त प्रतिसाद! पॉवलॉव्ह चे उदाहरण अगदी झकास! श्रद्धा अंधश्रद्धांची मानसशास्त्रीय चिकित्सा करायची झाल्यास मेंदुचे अंतरंग समजावून घ्यावे लागते. आज मानसशास्त्रात अनेक प्रयोग चालूच आहेत. मेंदुच्या मनात- लेखक सुबोध जावडेकर, मेंदुतला माणुस - डॉ आनंद जोशी, सुबोध जावडेकर, मनात- अच्युत गोडबोले ही पुस्तके यासाठी उपयुक्त ठरतात. मनुष्य हा काही विवेकवाद, मानवतावाद, बुद्धीप्रामाण्यवाद वगैरे यांचे प्रोग्रामिंग फीड केलेला जैवरासायनिक यंत्रमानव नव्हे. त्याला केवळ बुद्धी नाही तर भावनाही आहेत
1 Jan 2014 - 3:19 pm | राही
भावना तर आहेतच. पण विवेकाची कास धरा असे म्हणताना 'भावनावश न होता सदसद्विवेकबुद्धीने निर्णय घ्यावेत' असे अभिप्रेत आणि अनुस्यूत असते. प्रगत मेंदू आणि प्रगत बुद्धी फक्त मानवाकडे आहे, मानवाने तिचा उपयोग करून घ्यावा. काम क्रोधादि विकार आहेतच, त्यांवर जमेल तेवढा विजय मिळवून बुद्धी शक्यतो स्थिर करावी असे म्हणायचे आहे. संपूर्ण निर्विकारी तर मानव बनू शकत नाही. मग संयत आणि सतत प्रयत्नाने जेवढे जमेल तेवढे करावे. शेवटी, आणखी काही लोक म्हणतात त्याप्रमाणे दैवताचे मानवीकरण (ह्युमनाय्ज़ेशन ऑव्ह गॉड) आणि मानवाचे दैवतीकरण (डिविनाय्ज़ेशन ऑव्ह हयूमन बिइंग्ज़) असे द्वंद्व आपल्यामध्ये चालत असतेच. कुठेतरी सुवर्णमध्य साधला गेला तर स्टेबल स्थिती निर्माण होऊ शकते.
1 Jan 2014 - 4:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
... दैवताचे मानवीकरण (ह्युमनाय्ज़ेशन ऑव्ह गॉड) आणि मानवाचे दैवतीकरण (डिविनाय्ज़ेशन ऑव्ह हयूमन बिइंग्ज़) ...
खरी गम्मत ह्यातच आहे. त्या दैवतीकरण झालेल्या मानवाला किंवा मानवीकरण झालेल्या दैवताला सगळे पूजतात, तिर्थ-प्रसाद खातात आणि दुसर्या क्षणापासून "व्यवहार" हे कारण" सांगून त्यांच्या शिकवणूकिंची आणि तत्वांची पायमल्ली करायला मागेपुढे पाहत नाहित.त्या महामानवांना किंवा दैवी अवतारांना अपेक्षित असलेली खरी पूजा-अर्चना त्यांच्या तत्वांचे, शिकवणूकींचे अनुसरण करणे आहे; हे किती जण "करतात"?... सुवर्णमध्य साधण्याऐवजी मध्यालाच शेवट समजले जाते !
1 Jan 2014 - 3:53 pm | अजया
प्रतिसाद आवडला!
1 Jan 2014 - 11:02 am | अर्धवटराव
आत्मभान ठेवणे हि देखील सगुणोपासना आहे.
असो.
1 Jan 2014 - 2:21 pm | संजय क्षीरसागर
तुम्ही मूर्तीपूजेला विपश्यनेचा पर्याय सुचवतायं, ते आत्मभान नव्हे. ती ध्यानप्रणाली आहे.
लेखात शेवटी तुम्ही आत्मभानाची वर्तनाशी सांगड घातली आहे (विनातिकीट प्रवास करणे, भेसळ करणे, लाच देणे/घेणे, काम न करणे वगैरे). पण परिस्थिती विपरित आहे, स्व गवसलेली व्यक्ती यथोचित वागत असली तरी वर्तणूक सुधारुन स्व गवसेल असं नाही. ती Behavioral Therapy आहे. स्व ही स्थिती आहे ती प्रक्रियेनं गवसू शकत नाही.
स्व आणि आत्मभान या गोष्टींवर लिहीण्याचा प्रयत्न मी केला आहे पण संकेतस्थळाच्या बहुसंख्य सदस्यांची वृत्ती भक्त्तीमार्गी आहे. त्यात काही जण तर विषयाचा सुतराम गंध नसतांना इतके निम्न दर्जाचे प्रतिसाद देतात की विषय भरकटतो (ते तुम्ही पाहिलं असेलच) आणि ते इथल्या धोरणांच्या (बहुदा) आड येत नसल्यानं या विषयावर न लिहीण्याचा निर्णय मी (सध्या तरी) घेतला आहे. तस्मात तुम्ही ज्याला आत्मभान (किंवा स्व-स्मरण) समजता आणि लेखात व्यक्त केलंय तो सांख्ययोग नाही. थोडक्यात, देव या संकल्पनेचं निराकरण झाल्याशिवाय सगुणोपासना थांबत नाही, मग तुम्ही कशाही प्रकारे प्रबोधन करा.
1 Jan 2014 - 3:05 pm | राही
मी मूर्तिपूजेला विपश्यनेचा पर्याय सुचवलेला नाही. 'विपश्यनेमध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करायला सांगतात' या वाक्यातून तसे सूचित होत नाही.
वर्तणूक सुधारून स्व गवसेल असे नाहीच. उलट स्व गवसला की वर्तणूक सुधारते असे आहे.
खुल्या संकेतस्थळावर वेडेवाकडे किंवा कसेही प्रतिसाद येणारच हे गृहीत धरले आहे.
प्रत्येकाची इंटर्प्रिटेशन्स वेगळी असू शकतात, किंबहुना असणारच. आपण आपला मुद्दा मांडावा, जमल्यास प्रतिसादाचे खंडन करावे.पण आपले खंडन समोरच्याला स्वीकारार्ह असेलच असे नाही, तेव्हा सोडून द्यावे अशी माझी भूमिका आहे. वाटल्यास भाबडेपणा म्हणा.
खुल्या दिलाने दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
1 Jan 2014 - 5:09 pm | धन्या
तुम्ही आणि संक्षी ज्या "स्व" चा उल्लेख करत आहात ते स्व म्हणजे नेमकं काय? आणि ते गवसतं म्हणजे काय होतं? तुमच्याकडून उत्तर न देण्याचे बहाणे न ऐकता उत्तर मिळू शकेल म्हणून तुम्हाला विचारतोय. :)
1 Jan 2014 - 5:41 pm | स्पा
=)) =))
1 Jan 2014 - 9:57 pm | अत्रुप्त आत्मा
@उत्तर न देण्याचे बहाणे न ऐकता उत्तर मिळू शकेल>>>
1 Jan 2014 - 4:44 pm | सस्नेह
हा विवेक अलिकडे खूप दुर्मिळ झालाय...
1 Jan 2014 - 5:58 pm | अर्धवटराव
विवेकाचा सुकाळ कधि होता?
1 Jan 2014 - 9:59 pm | सस्नेह
साधारणतः स्वातंत्र्यपूर्व आणि उत्तर दहा वर्षांच्या काळात हा प्राणी भरतवर्षात अस्तित्वात असावा असा संशय आहे.
2 Jan 2014 - 11:51 am | मारकुटे
नव्हता !
2 Jan 2014 - 11:54 am | अर्धवटराव
याच कालखंडात आधुनीक भारतातला सगळ्यात मोठा रक्तपात झाला.
2 Jan 2014 - 12:03 am | राही
@ धना,
आत्मभान हा शब्द मी शक्यतो ऐहिक संदर्भात वापरायचा प्रयत्न केला आहे. कारण आत्मा, परमात्मा,ब्रह्म, परब्रह्म ह्या संज्ञा फार व्हेग, अंधुक, अस्पष्ट होत जातात आणि गोंधळ माजतो. स्वतःविषयीचे ज्ञान, स्वतःच्या देहव्यापाराचे, मनोव्यापाराचे ज्ञान आणि भान इतक्या सोप्या अर्थाने मी तो शब्द वापरला आहे.
2 Jan 2014 - 12:25 am | संजय क्षीरसागर
ते आत्मभान नव्हे. ती निव्वळ सजगता (Self awareness) आहे. विपश्यनेत ती शिकवतात. जे. कृष्णमूर्तींच्या शिकवणीचा तो बेस होता. त्यानं मन एकदिशीय राहतं पण जाणीव सतत ओरियंटेड राहिल्यामुळे शेवटापर्यंत तो प्रयासच राहातो.
आत्मभान ऐहिक नाही. ते ऐहिक व्यपणारं साक्षित्व आहे.
आत्मभान आणि तुम्ही वापरलेल्या शब्दांचा काहीएक संबंध नाही त्यामुळे गोंधळ आहे.
2 Jan 2014 - 12:27 am | राही
थोडेसे स्पष्टीकरण जरूरीचे वाटते.
आपली बुद्धी विकारांच्या आहारी गेली की आपल्याला आपल्या वागण्या-बोलण्याचे भान रहात नाही आणि चुकांवर चुका घडत जातात, आयुष्य दु:खमय होऊन जाते. आणखी म्हणजे आपल्या मर्यादा तसेच क्षमता आपण जाणल्या नाहीत तर आपण चुकीचे निर्णय घेण्यास प्रवृत्त होतो. पुन्हा दु:ख आलेच. आजूबाजूच्या अनेक गोष्टी आपल्यावर प्रभाव पाडत असतात. आपली बुद्धी स्थिर असेल, आपण आपल्या ठायी स्वस्थ असू तर आपल्याला या गोष्टींच्या आरपार पहाता येते, माणसांचे वागणे ओळखता येते. परिस्थितीचा त्वरित अंदाज घेता येतो. कुणाला न दुखवता हुशारीने मार्ग काढता येतो. सुखी माणसाचा सदरा असा सहज मिळून जातो.
प्रत्येक क्षणी स्वत्व न विसरणे, सतत जागरुकता, अखंड सावधानता आणि सतर्कता बाळगणे हेच संतांनी सांगितलेले आत्मभान होय.
स्वभान जागृत असले की श्वास स्थिर लयीत चालतो, हृदय लयीत चालते. एकतानता येते. आसमंतातली छोटीशी,सूक्ष्म हालचालसुद्धा जाणवू लागते. निसर्गातले बदल पटकन जाणवतात. सभोवतालाशी एकरूपता साधली जाते. अंतरात अतिशय शांत वाटते. एक असीम आनंद मनात उसळत रहातो.
2 Jan 2014 - 12:48 am | धन्या
आत्मभान या शब्दाच्या अर्थ यापेक्षा सोप्या आणि नेमक्या शब्दांत सांगता येईल असं वाटत नाही.
2 Jan 2014 - 12:51 am | संजय क्षीरसागर
पण या प्रतिसादात तुम्हाला क्रॉस करण्याचा हेतू नाही. तुमचा नेमका मुद्दा :
हा आहे.
आणि जोपर्यंत `स्व' म्हणजे काय हा उलगडा होत नाही तोपर्यंत तुम्ही वर्णन केलेल्या सर्व गोष्टी योग्य असल्या (श्वास स्थिर लयीत चालतो, हृदय लयीत चालते. एकतानता येते....निसर्गातले बदल पटकन जाणवतात.... सभोवतालाशी एकरूपता साधली जाते. अंतरात अतिशय शांत वाटते. एक असीम आनंद मनात उसळत रहातो...वगैरे) तरी साध्य होऊ शकत नाहीत.
2 Jan 2014 - 8:05 am | सस्नेह
संतवचनांचा परिपाक यापेक्षा वेगळा नसावा.
आणि आत्मभान जागृत असले की 'स्व' सापडायला काहीच अडचण नाही !
...संक्षी सरांनी शब्दांचा नाद सोडून भान जागृत करावे अशी नम्र सूचना.
2 Jan 2014 - 9:16 am | संजय क्षीरसागर
आत्मभान जागृत होणं म्हणजे देह-मनाचं निरिक्षण नव्हे.
2 Jan 2014 - 9:30 am | धन्या
मग काय आहे?
2 Jan 2014 - 9:42 am | स्पा
सर तुम्हाला "स्व" गवसलाय का?
2 Jan 2014 - 9:53 am | संजय क्षीरसागर
पण याविषयावर इतका उहापोह झालायं की आता लिहीण्याची इच्छा नाही. सदस्यांनी त्यांच्या मार्गानं जावं हे उत्तम. जिथे चूक वाटेल तिथे सांगण्याचा प्रयत्न करेन (उदा. केजरीवालांवरची पोस्ट, किंवा `त्रिगुणात्मक त्रैमूर्ती' वगैरे) त्यानं लोकांना वेगळी बाजू कळू शकेल. पण सत्य किंवा स्व या विषयावर सविस्तर लेखन (सध्या तरी) करणार नाही.
2 Jan 2014 - 9:58 am | स्पा
काय उमगलय ते सविस्तर येउंद्यात, कदाचित त्याने लोकांचे समज बदलीत ( तुम्हाला अनुकुल होतील) आणि चर्चा सुकर होइल
2 Jan 2014 - 10:05 am | संजय क्षीरसागर
महाराज... पण यापेक्षा जास्त चर्चा होणार नाही.
2 Jan 2014 - 10:53 am | राही
आत्मभान म्हणजे देहमनाचे निरीक्षण नव्हे हे एका अर्थाने खरे आहे कारण असे काही मुद्दाम निरखावे लागतच नाही. सगळे आपल्याला कळतेय अशी सहज अवस्था होते, सर्व ज्ञानेंद्रिये शार्प, धारदार, तरल रहातात, रिस्पॉन्सिव रहातात. जरा काही खुट्ट झाले, अगदी टाचणी पडली, तरी त्याचे कंप आपल्याला जाणवतात. आपण ते मुद्दाम निरखतो असे नाही.
आपण ऑन-लाइन असलो की जगाचे व्यवहार आपल्यापर्यंत पोचत रहातात.
ही सदैव तरल, सूक्ष्म, रेडी टु रेस्पाँड, रेडी टु अॅक्ट अवस्था म्हणजे (देखील) आत्मभान.
2 Jan 2014 - 11:19 am | अत्रुप्त आत्मा
राही.. आंम्हाला तुमचं सोप्या शब्दातलं विवेचन कळतय. ते आणखि करा. :)
(संपादित)
2 Jan 2014 - 12:07 pm | प्रकाश घाटपांडे
आत्मभान हा बराच शाब्दिक कसरतीचा विषय आहे. पण निजदेहभान अशी संवेदना असते हा शोध शेरिंग्टन नावाच्या मेंदुतज्ञाने लावला
.आपला देह ही आपली प्रॉपर्टी आहे याची जाणिव. हा एक प्रकारचा वेगळाच सिक्स्थ सेन्स आहे.
2 Jan 2014 - 12:36 pm | यशोधरा
सगळे स्व भलतेच जागृत झालेले दिसतायत! :D
2 Jan 2014 - 12:43 pm | संजय क्षीरसागर
अज्ञानी त्याला अहंकार म्हणतील पण त्यानं काहीएक फरक पडत नाही *ok*
2 Jan 2014 - 12:37 pm | प्यारे१
१. उत्तमा सहजावस्था| मध्यमा ध्यानधारणा| तृतीया प्रतिमापूजा| तीर्थयात्रा अधमाधम|| - तुकाराम महाराज
सह-ज : बरोबर जन्मलेलं. आपल्याबरोबर जन्मते ती (अवस्था).
२. सगुणाचेनि 'आधारे'| 'निर्गुण' पाविजे निर्धारे| सारासारविचारे| संतसंगे|| - समर्थ रामदास
सगुणाच्या आधारानं निर्गुणाची प्राप्ती हा विषय समर्थ मांडतात.
३. पहावे आपणासि आपण| या नाव ज्ञान|| -समर्थ रामदास
४. आपणिया आपणपै देखे - ज्ञानेश्वर महाराज
वरील संतांनी हेतूतः सगुणाचा स्वीकार केला होता.
बाकी सगुणोपासनेला मुळातच 'सकामता' नि 'यांत्रिकता' हे 'शाप' आहेत असं संत वचन आहे.
वर अर्धवटराव म्हणतात त्या प्रमाणं शब्दाला गुण असतात. विचारालाही गुण असतात. ज्याला नाम आहे नि रुप आहे त्या प्रत्येकाला गुण असतात.
ते असार (न टिकणारं आहे)आहे. निर्गुणा- सार गोष्टीचा- शाश्वता-चा साक्षात्कार करुन घ्यायला तुम्ही सांगताय त्या पद्धतीमध्ये शब्द या सगुणाची गरज आहेच. मूर्ती नि रिलेटेड हे 'ग्रॉस' आहे. शब्द हे 'सटल' आहे.
आपण नवीन काही सांगत आहात असं वाटत नाही(अधिक्षेप नाही) नि सांगताय ते अत्यंत बरोबर सांगताय.
मात्र ते संख्येनं फार कमी असलेल्या समुदायासाठी आहे. ही वस्तुस्थिती आहे.
त्यामुळं इत्यलम.
2 Jan 2014 - 1:17 pm | संजय क्षीरसागर
अर्थ चुकीचे लावलेत
हे सही आहे पण त्याचा असा अर्थ :
चुकीचा आहे.
स्व जन्म वगैरे घेत नाही ती कायम स्थिती आहे. सहजचा अर्थ विनाप्रयास स्वरुपाशी एकरुपता असा आहे.
इथे संतसंगे हा अत्यंत महत्त्वाचा शब्द नजरेतून सुटला आहे. सगुणाच्या आधारनं निर्गुणाकडे जाण्याची मेथडॉलॉजी मूर्तीपूजा किंवा कर्मकांडं नाही. "संतसंग" म्हणजे ज्याला सत्य गवसलंय तोच (त्या पद्धतीविषयी) मार्गनिर्देश करु शकतो (अन्यथा सगुणोपासना निर्गुणाकडे नेणं अशक्य आहे). कारण प्रतिसादात तुम्हीच म्हटलंय :
"सगुणोपासनेला मुळातच 'सकामता' नि 'यांत्रिकता' हे 'शाप' आहेत असं संत वचन आहे."
इथे "ज्ञान" हा शब्द वापरला आहे. ज्ञान म्हणजे माहिती, सत्य नव्हे. स्व-निरिक्षणानी जाणिव एकसंध होते आणि देह-मनाच्या क्रियांचं आकलन वाढतं असा अर्थ आहे.
या पेक्षा ज्ञानेश्वर महाराजांच्या या ओळी :
" अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुज ध्यान कळो आले;
तुझा तुची देव तुची भाव...फिटला संदेह, अन्यासक्ती"
जास्त समर्पक आणि मार्गदर्शक आहेत.
2 Jan 2014 - 2:04 pm | प्यारे१
:)
बरोबर आहे. बाकी अनुभव नाही हे आम्हास ठाऊक आहेच. आठवण करुन दिल्याबद्दल आभार.
ज्ञानेश्वर महाराजांच्या अनेक विराण्या आहेत ज्यामध्ये त्यांनी काय होतं ते सांगितलं आहे.
सहज म्हणजे आपली जन्मावेळची स्थिती/ अवस्था. (सह म्हणजे बरोबर घेऊन जन्मलेला असा भाव) नवजात बालकाला द्वेष, मत्सर, राग, लोभ, स्पर्धा इ.इ.इ. काहीही नसतं. आप पर भाव नसतो. आत्यंतिक नैसर्गिक प्रेरणा तेवढ्या असतात. ही सहजावस्था उत्तम.
2 Jan 2014 - 2:06 pm | मारकुटे
गीता पूर्ण वाचायला किती वेळ लागतो हो प्यारे बौ !!
2 Jan 2014 - 4:10 pm | प्यारे१
:)
गावामधला ढ ही म्हण माहिती आहे का?
2 Jan 2014 - 7:02 pm | सूड
>>गावामधला ढ ही म्हण माहिती आहे का?
म्हणजे 'गावंढ्या गावात गाढवी सवाशीण' सारखी गत का?
4 Jan 2014 - 6:55 pm | निराकार गाढव
इश्श्य!!
4 Jan 2014 - 7:31 pm | बॅटमॅन
तुम्ही निराकार असला तरी सगुण संबोधनास उद्देशून सगुण प्रतिक्रिया का बरे देताय ;)
5 Jan 2014 - 11:01 am | निराकार गाढव
चल् वेडा कुठला.
पुन्हा पुन्हा वाचा. प्रतिक्रियादेखिल निराकारच आहे.
2 Jan 2014 - 2:36 pm | विटेकर
इथे "ज्ञान" हा शब्द वापरला आहे. ज्ञान म्हणजे माहिती, सत्य नव्हे. स्व-निरिक्षणानी जाणिव एकसंध होते आणि देह-मनाच्या क्रियांचं आकलन वाढतं असा अर्थ आहे.
ही पूर्ण ओवि अशी आहे
ऐक ज्ञानाचें लक्षण| ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान |पाहावें आपणासि आपण| या नांव ज्ञान ||१||
दशक ५ समास ६
ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हे इतकं स्वच्छ लिहिलं आहे !! तुम्ही म्हणता तसे ज्ञान म्हणजे माहीती नव्हे ! कृपया चुकीची माहीती इतक्या आत्मविश्वासाने लिहून दिशाभूल करु नये ही विनंती !
मुख्य देवास जाणावें| सत्य स्वरूप वोळखावें |नित्यानित्य विचारावें| या नांव ज्ञान ||२||
जेथें दृश्य प्रकृति सरे| पंचभूतिक वोसरे |समूळ द्वैत निवारे| या नांव ज्ञान ||३||
मनबुद्धि अगोचर| न चले तर्काचा विचार |उल्लेख परेहुनि पर| या नांव ज्ञान ||४||
2 Jan 2014 - 2:39 pm | मारकुटे
>>कृपया चुकीची माहीती इतक्या आत्मविश्वासाने लिहून दिशाभूल करु नये ही विनंती !
कुणाच्याही धंद्यावर गंडांतर आणू नये ही विणंती
2 Jan 2014 - 4:29 pm | संजय क्षीरसागर
आणि दुसरं म्हणजे सत्य एकच असल्यानं त्याची गरजही नाही.
ज्या प्रतिसादाला मी उत्तर दिलंय त्यात तो श्लोक आहे. एनी वे,
आता तुम्ही म्हणतायं :
याविषयी वरच्या प्रतिसादात चर्चा झाली आहे. तुम्हाला निरिक्षणानं आत्मज्ञान होईल असं वाटत असेल तर जरुर चालू ठेवा.
जर निरिक्षणासारख्या सोप्या प्रक्रियेनं स्व गवसतो अशी तुमची माहिती असेल तर परिक्रमा कशासाठी असा प्रश्न येतो. यावर तुम्ही पुढच्या प्रतिसादात म्हटलंय :
मग स्व-निरिक्षणाचं प्रयोजन काय? ती अंतर्यात्रा नव्हे काय? जाणिवेचा रोख अंतर्मुख करण्यापलिकडे त्या प्रक्रियेचं प्रयोजन काय? माझ्याकडे माहिती नसली तरी अनुभव आहे आणि माझ्या विधानांच्या समर्थनार्थ तो पुरेसा आहे.
पुढे जे काही ज्ञानाबद्दलचे श्लोक तुम्ही उधृत केलेत त्यावर तुम्हीच निरुपण करुन त्यातून "स्व" ही सनातन स्थिर अवस्था कशी प्राप्त होईल ते (वेळ झाल्यावर आणि इच्छा असल्यास) लिहावे.
बाकी यानिमित्तानं ओशोंचं एक सुरेख वाक्य आठवलं, ते असं : "ग्यानी क्या बोलता है उसे सुनो और अज्ञानी क्या करता है उसे देखो!
असो,... करा शांतपणे परिक्रमा!
2 Jan 2014 - 6:18 pm | विटेकर
(वेळ झाल्यावर आणि इच्छा असल्यास)
वेळ ही नाही आणि इच्छा तर अजिबात नाही,तस्मात आमचा पास !
आम्ही आमच्या अज्ञानात अत्यंत सुखी आहोत आपण आपले " देखो" चालू ठेवावे. आमचे काहीही म्हणणे नाही!
एक शंका:
"ग्यानी क्या टंकता है उसे पढो" असे ओशो नी म्हंटले आहे का ? तसे असल्यास जरुर सांगावे आम्ही आपले टंकन अतिशय लक्षपूर्वक वाचू. जमल्यास दोन्ही हात जोडून स्व-कडे बघत बघत अतिशय भक्तिभावाने .. पण वाचायचे असल्याने डोळे मिट्ता येणार नाहीत, ते चालेल का ?
2 Jan 2014 - 2:47 pm | अर्धवटराव
हे निर्गुण म्हणजे इतर काहि नसुन शरणागती आहे. निर्गुण, निराकाला जाणण्याची शक्यताच नाहि. 'इथे माझी गुण जाणण्याची शक्ती संपली. आय सरेण्डर, आय क्वीट. नेती नेती.' निर्गुण म्हणजे गुणरहितता नाहि, निराकार म्हणजे आकाररहितता नाहि. तर ते आकाराबाधित गुणाच्या शक्यतेची समाप्ती आहे. त्यापुढे केवळ प्रेमाची शक्यता उरते...भक्ती.
2 Jan 2014 - 12:47 pm | अर्धवटराव
थँक्स फॉर द क्लीनप.
2 Jan 2014 - 1:00 pm | प्यारे१
सगळे सं. भलतेच जागृत 'आहेत' ;)
2 Jan 2014 - 1:23 pm | संजय क्षीरसागर
पण त्यामुळे कंपूची पंचाईत आहे *pleasantry*
2 Jan 2014 - 1:05 pm | विटेकर
सध्या सगुणात आनंद आहे .. तो टिकावा हीच इच्छा आहे . त्यामुळे पास !
उपासनेला दृढ चालवीन,
भूदेव संतासी सदा नमीन
सत्कर्म योगे वय घालवीन
सर्वा-मुखी मंगल बोलवीन
2 Jan 2014 - 1:37 pm | संजय क्षीरसागर
आणि प्रतिसाद तर अजिबात वाचू नका कारण
2 Jan 2014 - 2:43 pm | विटेकर
१. माझ्या सहीचा अर्थ आपण लक्षात घ्यावा , श्री शिवाजीमहाराजांनी प्रतापगडावर खानाची आतडी बाहेर काढली असा तो अर्थ आहे.. त्याचा लक्ष्यांक्ष असाही आहे की .. आत्मज्ञान झालेल्या केसरीने म्हणजे सिंहाने काम-क्रोधादी मत्त हत्ती मारला.. आता तुम्हाला " अभ्यास वाढ्वा " म्हणणे म्हणजे पिंडिला पाय लावल्यासारखे होईल तेव्हा तसे म्हणत नाही !
२. परिक्रमा म्हणजे तीर्थयात्रा नव्हे , ती एक अंतर्यात्रा आहे.. जाऊ दे , साखरेची गोडी सांगून कळत नाही !ती अनुभवावी लागते !
३. अधमाधम तीर्थयात्रा ही अतिअधमाधम अशा शाब्दिक अवडंबरापेक्षा बरी असे माझे वैयक्तिक मत आहे !
बाकी चालू द्या !
2 Jan 2014 - 1:13 pm | कवितानागेश
वाचतेय.. :)
2 Jan 2014 - 2:00 pm | मारकुटे
हा हा हा
2 Jan 2014 - 2:03 pm | प्रकाश घाटपांडे
दुर्गुणॉपासने पेक्षा सगुणोपासना चांगलीच. निर्गुणोपासना करता आली तर उत्तम. बाकी चालू द्यात.
2 Jan 2014 - 2:36 pm | अत्रुप्त आत्मा
=))
2 Jan 2014 - 2:52 pm | विटेकर
दासबोध दशक ६ समास ७ सगुणोपासना हा मूळातून वाचावा असे सुचवीन. तुमच्याच प्रश्नाचे सविस्तर उत्तर समर्थांनी दिले आहे . शिष्य प्रश्न विचारतो आहे :
ज्ञानें दृश्य मिथ्या झालें| तरी कां पाहिजे भजन केलें |तेणें काय प्राप्त झालें| हें मज निरूपावें ||१||
ज्ञानाहून श्रेष्ठ असेना| तरी कां पाहिजे उपासना |उपासनेनें जनां| काय प्राप्त ||२||
मुख्य सार तें निर्गुण| तेथें दिसेचिना सगुण |भजन केलियाचा गुण| मज निरूपावा ||३||
जें समस्त नाशवंत| त्यासि भजावें किंनिमित्त |सत्य सांडून असत्य| कोणें भजावें ||४||
असत्याचा प्रत्ययो आला| तरी मग नेम कां लागला |सत्य सांडून गलबला| कासया करावा ||५||
निर्गुणानें मोक्ष होतो| प्रत्यक्ष प्रत्यय येतो |सगुण काय देऊं पाहतो| सांगा स्वामी ||६||
सगुण नाशवंत ऐसें सांगतां| पुनः भजन करावेंम्हणतां |तरी कासयासाठीं आतां| भजन करूं ||७||
उत्तर आपण मूळ समासात वाचावे. इथे चिकटव्ल्यास अकारण धाग्याची लांबी वाढेल ! फक्त एक ओवी लिहण्याचा मोह आवरत नाही ..
रघुनाथभजनें ज्ञान झालें| रघुनाथभजनें महत्ववाढलें |म्हणोनि तुवां केलें| पाहिजे आधीं ||३१||
2 Jan 2014 - 3:04 pm | Dhananjay Borgaonkar
हा दुवा बघा.सगुण, निर्गुण यातला फरक छान सांगितला आहे.
बाकी आपल्याला स्व गवसला आहे, कळाला आहे हे कसे ओळखवे?
स्व गवसण्यासाठी काय करावे?
2 Jan 2014 - 3:11 pm | स्पा
कृपया आमच्या कंपनीशी संपर्क साधावा
2 Jan 2014 - 3:17 pm | म्हैस
संजय क्षीरसागर च्या पहिल्या २ प्रतिसादांशी सहमत .
माझ्या मताप्रमाणे आत्मभान म्हणजे विवेकाने काय चांगले आणि काय वाईट हे समजणे आणि त्याप्रमाणे वागणे .
'स्व' समजणे म्हणजे आत्मानुभूती . मी कोण ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे स्व गवसणे .
प्यारे१ ने ४ हि वचनांचे चुकीचे अर्थ लावलेत . त्यातला मुख्य शब्दच विचारात घेतला नाहीये.
सहजावस्था म्हणजे कुठल्याही प्रयत्नाची गरज नसते . डोळे बंद केले कि किवा एका ठिकाणी चित्त एकाग्र झाला कि आपोआप समाधी लागणे .(समाधी लागण्याचा अर्थ काही लोक झोप लागणे वगेरे असं घेतात. समाधी अत्यंत उच्च आणि वेगळ्या प्रकारची स्थिती आहे. परंतु हा इथे विषय नसल्यामुळे टाळते )
सगुण आणि निर्गुणातला फरक संत संगामुळे लक्षात येतो असं अर्थ आहे.
ह्या दोन्ही वाक्यांचा अर्थ आपणच आपल्याला जेव्हा दिसतो त्याला ज्ञान म्हणतात . आता काही जन म्हणतील आपण आपल्याला आरशात सुधा दिसतो. पण आरसा हा इथे माध्यम असतो. आणि त्यात फक्त बाह्यरंग दिसत . अंतरंग नाही. ह्या कुठल्याही माध्यमाशिवाय आपलं स्वरूप आपल्याला जेव्हा दिसत त्या स्थितीला ज्ञान म्हणलाय. सागुनोपास्नेचा इथ काहीही संबंध नाही
2 Jan 2014 - 4:00 pm | प्यारे१
अजून वाचतोय, शिकतोय.
सांभाळून घ्या!
आत्मज्ञान मिळालेल्या तरीही सगुणोपासक संतांचे दाखले देण्याचा प्रयत्न वरील चारी उदाहरणांमध्ये होता.
त्यांनी ज्ञानोत्तर भक्ती अवलंबिली आहे.
१. सहज चा अर्थ सह-ज असाही होतो. नवजात बालकाच्या स्थितीचा विचार आहे. ते वर लिहीलेलं आहे.
२. निर्गुण पाविजे ही भाषा व्यवहार म्हणून वापरावी लागते. 'जुने ठेवणे मीपणे आकळेना' ह्या समर्थउक्तीप्रमाणं आपलंच आहे आपल्याला कळत नाही अशी स्थिती. नित्यप्राप्ताची प्राप्ती असंही म्हणतात.
३. 'संतसंगे' हा विचार घेतला नव्हता कारण सगुण निर्गुणाचा विचार हा लेखाचा विषय आहे. सगुणभक्ती मध्ये किंवा ध्यानप्रक्रियेच्या विचारामध्ये देखील (विश्वास ठेवा अन्यथा ठेवू नका) अशी व्यवस्था असते की ज्याद्वारे योग्य मार्गदर्शन मिळतं. घरबसल्या सुद्धा ते मिळू शकतं. 'अचानक' वाटू शकेल असा संतसंग होतो.
2 Jan 2014 - 4:06 pm | स्पा
का प्यारे काका का ?
किती चुकीचे ज्ञान आहे तुम्हास , तरी वाद घालटाय
कधी शहाणे होणार तुम्ही , कधी येणार तुम्हाला आत्मभान
- स्पाही
2 Jan 2014 - 4:12 pm | बॅटमॅन
कवितेतलं मीटर अन यमक हुकलेलं आहे. आधी ते सुधारा अन मग करा स्व-च्या गोष्टी!!
-धृतराष्ट्र हस्तिनापूरकर.
2 Jan 2014 - 4:23 pm | स्पा
इथे
आणि मग, पूर्ण प्रकरण हाताबहेरच गेलं
मन जेंव्हा जाणीवेच्या पलीकडे जाते, तेंव्हा त्यात स्व हरवून जातो, तिथेच आत्मभानाचा प्रवेश होतो, आत्मभान हे सत्व असते, सत्व हे नाचणी चेही असते, रोज एक चमचा दुधातून घेतले कि, तब्येत मस्त राहते, पण हा सुद्धा एक भास असतो
सेल्फ अवेरनेस . मुळात तब्येत नसतेच , काहीच नसत , सत्व असत , ते बटाट्याच्या किसापासुनही करतात, ते दुर्मिळ असत , सहजासहजी मिळत नाही, तसेच मन सहज तावडीत सापडत नाही , मग मूर्तीपूजा आली. सगुण मूर्तीपूजा आणि निर्गुण मूर्तीपूजा . पूजा भट्ट सगुण आहे कि निर्गुण ठाऊक नाही पण तेही भासच , निरीक्षण करत राहायचे. जाली स्थळी काष्टी पाषाणी मग निर्गुणच , संस्थळी पण मग भास होतात, मग मोठे जड जड शब्द पुस्तकातून वाचायचे , इथेच लादायचे, वाद घालायचा , मग मन सुक्ष्मकार होते , फक्त आपण सत्य भासू लागतो. मग भास खरे होतात , सत्वाची गरज उरत नाही , नाचणी च्या सुद्धा , हवतर बटाट्याचे चालेल पण नसले तरी हरकत नाही.हवतर माझ्या भयकथा वाच मागच्या लिंक देणार नाही ,पिशाच्च जाणवतील, तीही निर्गुणच
2 Jan 2014 - 4:29 pm | बॅटमॅन
हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =))
अरे काय चालवलंय्स हराम्या =))
आणि या धृतराष्ट्राच्या बलीवर्दाला तर संपादित.
2 Jan 2014 - 4:51 pm | प्यारे१
स्पावड्या,
बरा आहेस ना?
स्वाक्षरीसाठी एक मिसळ, दोन पाव नि पेश्शल चाय.
दिलखुश!
2 Jan 2014 - 6:35 pm | अत्रुप्त आत्मा
@आमचे येथे श्रीक्रुपेकरुन किरकोळ तसेच घाउक दरात स्व, स्वत्व, विवेक, जाणिव,नेणिव, आत्मभान, आत्मन्यान जाग्रुत करुन मिळेल.>>> > बेक्कार! पांडुब्बा की जय हो!
3 Jan 2014 - 4:45 pm | कवितानागेश
दुर्गुणी स्पांडू!! =))
कुठे फेड्शील ही पापं???
- आत्मभानामतीदेवी माउ
2 Jan 2014 - 4:44 pm | संजय क्षीरसागर
इथेच वर दिलेल्या प्रतिसादात मी म्हटलं होतं :
म्हणजे नक्की काय होतं याची प्रचिती वरचे प्रतिसाद पाहून येईल.
2 Jan 2014 - 4:51 pm | स्पा
उत्तम निर्णय
2 Jan 2014 - 6:44 pm | मारकुटे
+१
असेच म्हणतो
3 Jan 2014 - 10:54 pm | रामपुरी
काही आयड्यांनी लेखनसंन्यास घेऊन मानवजातीवर असंख्य उपकार करून ठेवले आहेत...
3 Jan 2014 - 5:57 pm | होकाका
याला म्हणतात उदाहरणासहीत स्पष्टीकरण.
2 Jan 2014 - 6:43 pm | धन्या
सगुणोपासनेच्या नावाखाली मच्छिंद्र कांबळींच्या संचाला लाजवेल असा वस्त्रहरणाचा खेळ चालू आहे.
2 Jan 2014 - 7:13 pm | बॅटमॅन
आणि दिव्यदृष्टी असल्याचा दावा करणारे धृतराष्ट्र इतरांना सांगताहेत- "तो वाघ नसून मांजर आहे."
3 Jan 2014 - 5:51 pm | होकाका
च्या आनंदी प्रसंगी असं मार्मिक वाक्य आल्यावर ... वाह वा!
Heppy New Year to all Mippaakars...
3 Jan 2014 - 5:52 pm | होकाका
Oops! "New Year" हे शब्द लिहिले गेले नाहीत...
3 Jan 2014 - 11:51 pm | राही
काही वर्षांपूर्वी एका अनियतकालिक कवीने केलेला कल्पनाविस्तार वाचला होता. तो काहीसा असा होता : (शब्द नीट आठवत नाहीत, पण काहीसे असे)
रिमझिम रिमझिम
झिमझिम झिमझिम
रुमझुम रुमझुम
झुमझुम झुमझूम
रमझिम रमझिम
झुमझिम् झूमझिम
रमझूम रमझूम
रम रम झूम झूम
4 Jan 2014 - 12:03 am | राही
@विटेकर, आपल्या सूचनेचा आदर आहे. 'पहावे आपणासी आपण' हे वचन माझेही आवडते आहे आणि त्यामुळे जिथेतिथे ते माझ्याकडून उद्धृत केले जाते. दासबोध काही वर्षे नित्य पाठात होता.
4 Jan 2014 - 12:21 am | पैसा
तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे ।
सगुण निर्गुण एकु गोविंदु रे ॥१॥
अनुमाने ना अनुमाने ना ।
श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥२॥
तुज स्थूळ म्हणों कीं सूक्ष्म रे ।
स्थूळसूक्ष्म एकु गोविंदु रे ॥३॥
तुज आकारू म्हणों कीं निराकारू रे ।
आकारूनिराकारू एकु गोविंदु रे ॥४॥
तुज दृश्य म्हणों कीं अदृश्य रे ।
दृश्याअदृश्य एकु गोविंदु रे ॥५॥
तुज व्यक्त म्हणों कीं अव्यक्तु रे ।
व्यक्त अव्यक्त एकु गोविंदु रे ॥६॥
निवृत्ती प्रसादें ज्ञानदेवो बोले ।
बाप रखुमादेविवरू विठ्ठलु रे ॥७॥
ज्ञानियांच्या राजाला सगुण आणि निर्गुण यात फरक दिसतच नव्हता नाही का? तरी अवघा महाराष्ट्र त्यांच्यामागून चालत राहिला! आपणही त्यांच्या पाऊलखुणा शोधत चालत रहावे.
4 Jan 2014 - 12:58 am | अर्धवटराव
सगळ्या साधना, परिक्षणं, ज्ञान, प्रचिती, अनुभव, स्व/इतर काहि गवसणे... त्याची परमोच्च अवस्था म्हणजे हा अभंग.
4 Jan 2014 - 11:11 am | संजय क्षीरसागर
ही वस्तुस्थिती आहे. पण अभंग निर्गुणाचा अनुभव आलेल्यानं लिहीलायं. ज्याला निर्गुणाचा अनुभव नाही त्यानं अभंग जन्मभर म्हटला तरी उपयोग नाही. अर्थात हे समजायची शक्यता प्रत्येकात असेल असं वाटलं होतं कारण निर्गुण मूळ आहे. पण परिस्थिती अशीये आहे की विषयाचा गंध नाही, फक्त निर्बुद्ध आणि असंगत प्रतिसाद देण्यात किंवा अक्कलशून्य सह्या ठोकण्यात मात्र ठराविक लोकांचा हातखंडा आहे. असे विषय भरकटवण्यातच बहुदा हयात जाणार. तर असो, म्हणा अभंग आणि जाणा निर्गुणाला.
4 Jan 2014 - 12:20 pm | प्यारे१
अरे, हम निर्बुद्ध हुए तो क्या हुआ, दिमाग से हम हुश्शार हय हुश्शार.
चल... हवा आन दे!
- राहीतै नि संजयबाबांची शपथ.
(कशाच्याही चालीवर हलकं घेऊन वाचा.)
4 Jan 2014 - 2:32 pm | संजय क्षीरसागर
बाकी जुन्या धारणांचे दळण नव्या गिरणीतून काढण्यापलिकडे त्यातून काही निष्पन्न होत नाही.
तुम्ही काढलेले अर्थ चुकीचे आहेत हे वरच्या प्रतिसाद दाखवून दिल्यावर स्वतःला अनुभव नाही हे तुम्हाला कबूल आहे :
पण दळण इतकं भरपूर दळून ठेवलंय की त्याचं काय करायचं हा प्रश्न उरतोच आणि एखाद्या (किंवा त्याच दर्जाच्या) तद्दन प्रतिसादानं पुन्हा स्फुरण येतं.
एनी वे, पुन्हा वात पेटवण्याची मला इच्छा नाही कारण कंपूच्या आकलनाचा आणि कार्यप्रणालीचा एकूण रागरंग लक्षात आला आहे. तरी या प्रतिसादात इतकंच नमूद करतो की कितीही सारवासारव केली तरी अनुभवशून्यता पुन्हापुन्हा दिसत राहणार.
१) स्व ही कुणाच्या जन्मवेळची स्थिती नाही आणि तो भाव देखिल नाही. ती जन्म-मृत्यूनं अनाबाधित कायम स्थिती आहे
२) जाणीवेची जाणीव झाल्यावर तिच्या नित्यनूतनतेमुळे ज्ञानी व्यक्तीला नवजात बालकाचा ओपननेस प्राप्त होतो. तस्मात नवजात बालकाच्या वृत्तीचा उल्लेख केवळ रुपकात्मक म्हणून केला जातो; पण पूर्वीचं दळण काढत असल्यामुळे केवळ तसल्या उदाहरणांशिवाय वेगळं काहीही सांगता येणार नाही.
३)"अत्यंत नैसर्गिक प्रेरणा तेवढ्या असतात?" हा तर कॉपी-पेस्टचा क्लायमॅक्स आहे.
अर्थात इतकं कळणारा कंपूच्या टाळ्यांवर आरती करणार नाही हे नक्की.
4 Jan 2014 - 3:08 pm | प्यारे१
माझ्या बाबतीतलं आपलं बरोबर आहे. इतर मिपाकरांचा उपमर्द का? :)
बाकी हलकं घेणं म्हणजे टेक इट लाईटली. ते जमणं नाही हेही मान्य आहेच.
4 Jan 2014 - 3:52 pm | संजय क्षीरसागर
तुम्ही म्हटलंय :
सत्यात ग्रे एरिया नाही. Either you have got it or Not. That is all. तुमच्या बाबतीत माझं म्हणणं बरोबर आहे याचा अर्थ तुम्हाला फोर्थ डायमेंशन गवसलेलं नाही तरी तुम्ही बिनधास्तपणे `त्रिगुणात्मक त्रैमूर्ती' वगैरे पोस्ट लिहून, दत्त म्हणजे त्रिगुणाच्या पलिकडे अशी बेधडक विधानं केली आहेत. शिवाय वेळ मिळेल तिथे माझ्या कोणत्याही (अध्यात्मिक नसलेल्या सुद्धा) प्रतिसादावर बाष्कळ कमेंटसची संधी सोडत नाही याला उपमर्द म्हणतात.
ज्याला स्वतःला स्व गवसलेला नाही त्याचं लेखन इतरांची दिशाभूल करण्याशिवाय काही करत नाही. असं लेखन प्रकाशित होतं याला मी अक्षेप घेऊ शकत नाही कारण तो संकेतस्थळ चालवणार्यांचा निर्णय आहे. पण किमान लेखनातल्या तृटी दर्शवण्याचं काम मी करु शकतो ज्यावर निव्वळ व्यक्तिगत आणि उथळ प्रतिसाद देऊन (काही) सुमारबुद्धी लोक सतत चर्चा भरकटवतात. अश्या प्रकारामुळे ज्यांना काही समजण्याची शक्यता असते त्यांच नुकसान होतं आणि त्याला माझा अक्षेप आहे. इतर सदस्यांचा उपमर्द होतो असा कांगावा करुन पुन्हा त्यांची सहानुभूती मिळवणं गैर आहे कारण तो माझा उद्देश नाही. ती इथल्या ठराविक लोकांनी इतरांची पद्धतशीरपणे केलेली दिशाभूल आहे. कुणी काय करावं आणि इथे काय प्रकाशित व्हावं यावर माझं नियंत्रण नाही, मी फक्त माझी पोझिशन क्लिअर केली.
4 Jan 2014 - 4:29 pm | प्यारे१
संजयजी आपण कोण आहात? काय आहात?
मागे माझ्या धाग्यावर विचारलेला प्रश्न पुन्हा विचारतो. तेव्हा तो तुम्हाला व्यक्तिगत वाटला होता.
पुन्हा विचारतो.
हू आर यु?
संजय हे नाव आहे, सी ए व्यवसाय... ज्या बुद्धीच्या बळावर स्व गवसलाय असं वाटतंय नि लिहीताय ते तुमचं विचाराचं साधन आहे.
असं वेगळं उकलत जा! स्व गवसण्याचा मार्ग गवसेल कदाचित.
मला स्व गवसलाय असं म्हणणाराला तो अजिबात गवसलेला नसतो,
ज्याला खरा गवसलेला आहे तो अकारण जाहिरातबाजी, दुसर्याला कमी लेखणं,
दुसर्याच्या उद्धारासाठीच जणू माझा जन्म आहे अशी टिमकी वाजवणं हे प्रकार करीत नाही.
त्याला त्याची गरज नसते.
माझ्यासाठी अनुभव येईपर्यंत साधना करणं हे नि हेच माझ्या स्वतःच्या हातात आहे.
अनुभव आल्यावर अमुक शब्दात असा आला, तसा आला वगैरे सांगण्याची गरज उरणार नाही असा विश्वास आहे.
बाकी लोक कल्याणाची पोटतिडीक 'अनलर्निंग' करण्यासाठी वापरा. जास्त उपयोग होईल.
(शेवटचा प्रतिसाद तुमचाच असेल अशी तजवीज करुन ठेवलेला) प्यारे :)
4 Jan 2014 - 4:36 pm | अवतार
कोणाचाही कॉपीराईट नाही. प्रत्येकाला त्या सत्याची जाणीव होणारच आहे. जगाला अंतिम सत्याचे धडे देणाऱ्या कोणत्याही महापुरुषांची कधीच गरज नव्हती आणि आजही नाही. नदीच्या वाटेत कितीही अडथळे आले तरी खाच-खळग्यातून आणि डोंगर-दऱ्यातून स्वत:च्या शक्तीप्रमाणे प्रवाह निर्माण करून नदी वाहतच राहते. जीवनाचेही असेच आहे. प्रत्येक नदी ज्या दिशेने जात असेल तीच तिची खरी वाट. सर्व नद्यांना एकच वाट दाखवायच्या फंदात कोणी पडू नये.
4 Jan 2014 - 5:49 pm | कवितानागेश
अनलर्निंग!!!!
यु सेड इट.
हुश्शार झालास की प्यारे. :)
---- स्लो अन-लर्नर माउ ;)
4 Jan 2014 - 11:24 pm | संजय क्षीरसागर
तुमच्या प्रतिसादाचा अर्थ तुम्हाला तरी कळावा इतपत अपेक्षा होती. त्यावर तुम्ही मला तोच प्रश्न पुन्हा विचारतायं ज्याचं उत्तर ऑलरेडी देऊन झालंय. अनलर्निंगची गरज तुम्हाला आहे कारण तेच दळण तुम्ही पुन्हापुन्हा काढतायं. तुमचे समर्थक तर इतके विद्वान आहेत की त्यांना आपला मार्गदर्शक अनुनभवी आहे हे त्यानं स्वतः कबूल करुन देखिल नक्की काय झालंय ते कळत नाही. तस्मात जाऊं द्या हे बेस्ट!
4 Jan 2014 - 11:58 pm | प्यारे१
समर्थक? कोण? ती लीमाऊ?
अहो पक्की भांदकुदळ आहे ती.
काय सांगायचं सर तुम्हाला? नखानं अक्षरशः बोचकारते म्हायत्ये.
माझंच ऐकत जा म्हणे. बघा वर कशी हुश्शार झालास म्हणते मला! चिडवतेय.
ती समर्थक असूच शकत नाही माझी.
बाकी बॅटमॅन तर माझ्याशी परवा परवाच भांडला.
प्या म्हणताना 'प्या' आलं तरी लाल होतो रागानं. तोही समर्थक असणं शक्य नाही.
अर्धवटराव काय, तुम्हाला अनुभव आहेच.
धन्या, स्पा, मोदक, अतृप्त आत्मा, सूड, वल्ली आणि जनता म्हणताय का? अहो पक्के लबाड हो ते!
बारीक बारीक पोरं हो ती. त्यांचं समर्थन घेऊन आपल्याला काय फरक पडणार? एलिट क्लास वगैरे काही नाही त्यांचा!
-समर्थकांच्या शोधात काव आलेला प्यारे! :(
@ राही,
प्यारे नि प्यारे१ हे दोन वेगळे असू शकतात किंवा नसूही शकतात किंवा कसंही! ;)
5 Jan 2014 - 2:50 am | मोदक
अहो पक्के लबाड हो ते!
प्यार्या.. सांभाळून हां.. भारतात परत येणार हैस ना..??
लीमाऊ? अहो पक्की भांदकुदळ आहे ती.
चेष्टेत म्हणाला असलास तरी लै लै वेळा सहमत!!!! +९९९९९९९^९९९९९९९९९९९
5 Jan 2014 - 6:42 am | प्रचेतस
आमचे नाव उगाच घुसडल्याबद्दल निषेध.आम्हास तुमच्या निरर्थक चिखलफ़ेकीत काडीचाही रस नाही.
5 Jan 2014 - 7:56 am | स्पा
त्यांच्या कडच्या काड्या संपतच नाही, मग चिखलफेक कधी नी कशी करणार
5 Jan 2014 - 9:10 am | अत्रुप्त आत्मा
वल्लींशी सहमत! +१
पांडुशी अतिसहमत! :-D
5 Jan 2014 - 9:50 am | सूड
आम्ही लबाड आहोत की आणि ते उघडपणे मान्य करण्याचे गट्स आहेत आमच्यात !!
आता उल्लेख केलाच आहात म्हणून सांगतो, तुमची ती सगुणोपासना आणि त्यावर चाललेला उतमात यात आम्हाला ( पक्षी मला) शष्प घेणंदेणं नाही. यु आर फ्री टू पुट युअर डर्टी नोज़ आपलं ज्यात-त्यात !! :)
5 Jan 2014 - 12:32 pm | प्यारे१
गुड. पुराव्याने शाबित झालं.
@संजय क्षीरसागर,
सांगायचा मुद्दा हाच होता. प्रत्येकाची प्रार्थनापद्धती, प्रत्येकाचं जग वेगवेगळं असतं. घरात एक जण दुसर्याचं ऐकत नाही, बाकीच्यांचं काय घेऊन बसलात? समर्थक वगैरे काही नाहीये कुणी. ते तसं होणार नाही, त्याची गरज देखील नाही.
ग्रुप करुन तुम्हाला टारगेट वगैरे काहीच नाही. दहा मधल्या एक दोन गोष्टी पटतात लोकांना त्याबाबत होकार दर्शवतात.
@ राही,
वरीलप्रमाणेच.
ह्या उप्पर आपण म्हणताय तशी पद्धत सामाजिक पातळीवर कशी आणावी, वापरावी, चळवळ कशी उभारावी ह्याबाबत काही अॅक्शन प्लॅन आहे का? सगुणाला नाकारा. मान्य. आपण पर्याय कसा उभारणार आहोत?
5 Jan 2014 - 1:13 pm | सूड
हेही पुराव्याने शाबित झालं की आपल्या सोयीचे अर्थ लावण्यात तुमचा हात कोणी धरु शकत नाही !!
5 Jan 2014 - 12:03 am | कवितानागेश
मार्गदर्शक?????!!!!
=)) =)) =)) =))
ए प्यार्या, तुला शिवी घातलिये रे इकडे!!! =)) =))
5 Jan 2014 - 12:52 pm | होकाका
हे अजून एक उदाहरणासहीत स्पष्टीकरण.
4 Jan 2014 - 11:36 am | स्पा
ओके सर, तुमचेच " निर्गुण" , आमचे "सगुण"
खुश?
4 Jan 2014 - 2:58 pm | मारकुटे
अरे, हम नास्तिक हुए तो क्या हुआ, आरतीपे टाऴ्या बजाने को पयला नंबर हय पयला
अं
आम्ही नास्तिक असलो तरी आरतीला टाळ्या वाजवायला आमचा पहिला नंबर आहे
चला हवा येऊ द्या
- संस्थापक, संचालक आणि संपादकांची शपथ.
4 Jan 2014 - 4:45 pm | स्पा
थोडक्यात काय तर स्व गवसणे म्हणजे माज करणे, माझीच लाल असे बोंबलत फिरणे, स्वताची बॊद्धिक सुमार लेवल अख्ख्या जगाला दिसत असतानाही, समोरच्याला कशी अक्कल नाही ते मेगाबायटी अर्थहीन प्रतीसाद देउन दाखवणे.
याला स्व नाही ग चि बाधा म्हटले जाते.
- जे खातो तेच.. .
4 Jan 2014 - 5:52 pm | राही
मला वाटते वेगळी वाट चोखाळणारे आणि इतरांपे़क्षा थोडा वेगळा विचार (बरा-वाईट कसाही) करणारे हे नेहेमीच अल्पमतात आणि बहुधा एकाकी असतात. मूळ प्रस्तावात उद्धृतलेला तो ऋषिसुदधा असेच म्हणतोय की 'अरे बाबांनो, मी एवढा हात उंचावून उंचावून सांगतोय, पण कोणीच माझे ऐकत नाहीय'. एकाकी वाटचाल करण्याचे धैर्य असेल तर ती तशीच चालू ठेवावी. कधी कधी समविचारी लोक येऊन मिळतात आणि कारवाँ बनत जातो, तर कधी कधी एकट्यानेच वाळवंट तुडवावे लागते. उपदेशाने लोक फारसे प्रभावित होत नाहीत, आचरणाने थोडेसे होतात.
जोदि तोर डाक शुने केऊ ना आशे, तोबे अॅक्ला चॉलो रे. आपली तत्त्वे ठाम (पटली) असतील तर ही एकल यात्रासुद्धा आनंदमय होते, वाळवंटसुद्धा ओअॅसिस बनून जाते...
4 Jan 2014 - 5:56 pm | साती
राहींच्या इतक्या सुंदर विवेचनानंतर धागा इतका भरकटणे ही अगदीच लाजिरवाणी गोष्टं आहे.
4 Jan 2014 - 6:18 pm | बॅटमॅन
आंधळे असूनही माझीच दृष्टी सर्वांत तेज असा दावा करणार्या धृतराष्ट्रांची गर्दी झाली की असेच होणार.
4 Jan 2014 - 7:40 pm | पिशी अबोली
:(
वाईट वाटलं..
4 Jan 2014 - 7:33 pm | बॅटमॅन
काही लोक इतके फ्रस्ट्रेटेड का आहेत मला अजून कळालं नाहीये.
4 Jan 2014 - 7:46 pm | स्पा
त्याला स्व गवसलाय ना , स्वरुप भयाण आहे हे समजले असेल
4 Jan 2014 - 7:50 pm | बॅटमॅन
आरशात बघितल्यावरच हे ज्ञान झालं असेल. तरीच त्याचा स्व जागृत झालाय.
बाकी स्वाक्षरीतील "श्रीक्रुपेकरुन" च्या जागी "स्वक्रुपेकरून" असे लिहिल्यास मशारनिल्हे धृतराष्ट्राचे वर्णन जास्ती लागू पडेल असे सुचवावेसे वाटते.
4 Jan 2014 - 7:56 pm | राही
@प्यारे१,
मी नवीन काही सांगत नाही हे खरेच आहे. कोणीच तसे काही सांगू शकणार नाही. पूर्वसूरींनी वेगवेगळ्या कालखंडांत वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून सारेच सांगून ठेवले आहे. उपलब्ध सर्व टीका, मल्लीनाथ्या, एका जन्मात वाचून देखील व्हायच्या नाहीत.
त्या त्या कालखंडात म्हणण्याचे कारण असे की देशकालानुसार माणसाचे सर्वसाधारण वर्तन, कर्म, कर्तव्य बदलते. गीतारहस्याचा धागा मिपावर समांतर चालू आहे. त्यातही हा ऊहापोह आहे. सद्यव्यवहारस्थितीशी जुळणारा अर्थ नव्याने लोकांपुढे आणावा (नवा अर्थ सांगावा असे नाही) असे वाटले. ग्रंथांमध्ये इतके काही (आणि प्रसंगी परस्परविरोधीसुद्धा) सांगून ठेवले आहे की नेमके निवडता निवडता दमछाक व्हावी. हे (आपल्याला हवे ते) निवडणे प्रत्येकाच्या दृष्टिकोनानुसार सदैव चालूच रहाणार.
सद्यस्थितीत माहितीचा इतका अजस्र लोंढा अंगावर येऊन आदळतो आहे की हे निवडणे दिवसेंदिवस कठीण होत जाणार आहे. शिवाय लोक रोजच्या साध्या स्वरूपातल्या मातृभाषेपासूनही दूर जात आहेत. मग ही सगुण-निर्गुणाची गहन परिभाषा त्यांना काय कळणार? सगुणोपासना म्हणजे वाडवडील म्हणत आले, करत आले, तीच पूजा, आरती, स्तोत्रपठण, उपासतापास इतकीच माहिती त्यांच्यापर्यंत पोचत रहाणार आणि त्यांच्याकडून निरर्थक यांत्रिकपणे हे सर्व घडत रहाणार. ह्या सगळ्याचा रोख कुठे असायला हवा हे त्यांना कधीच कळणार नाही. आपल्याला (तुम्हांला) जे अनुभव ध्यानातून येतात ते आम जनतेला या सगुणोपासनेच्या पद्धतीने कधीच येणार नाहीत. त्यांची विवेकबुद्धी या पद्धतीने जागृत होणार नाही. मग जर या पद्धतीचा काहीच उपयोग नाही, (आपल्यासारखी एखादी विरळा व्यक्ती सोडून) तर क्षणिक भ्रामक समाधान आणि आनंदासाठी (जो आनंद चित्रपट पहाणे, उत्तम भोजन करणे या प्रकारानेही मिळू शकतो) जनतेने एव्हढा आटापिटा का करावा?
या पुढची पिढी दासबोध, गाथा, ज्ञानेश्वरी वाचणारी नसेल. संस्कृत दूरच राहिले. त्यांच्यापुढे आपण कोणती टँजिबल तत्त्वे/मूल्ये ठेवणार आहोत? केवळ आरत्या, भजने, नैवेद्य, पंचोपचार, मंदिरांसमोर मैलभर लांबीच्या रांगा लावणे आणि भोज्या करून ताबडतोब मागे पळत सुटणे हीच धर्मलक्षणे बनणार आहेत का? हे न केले तर पाप घडले, अरिष्ट कोसळेल, या भ्रमात त्यांनी रहावे का? मूर्तिपूजा आणि सगुणोपासना हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत आणि एकातून दुसर्याला बळ मिळत रहाते, एकातून दुसरी गोष्ट निघत रहाते.
हिंदूधर्मातली उपासनापद्धती (हळूहळू) बदलून स्वकर्तव्ये आणि स्व-उन्नती याबाबत धर्मधुरीणांकडून सद्यस्थितीनुसार मार्गदर्शन व्हावे अशी अपेक्षा बाळगणार्यांपैकी मी एक आहे. आळशी, मंद, कर्तव्यविन्मुख अशी जी समूहस्थिती (डीस्पाइट सगुणोपासना,) सध्या दिसते आहे, ती जाऊन तरतरीत, सावधचित्त, उद्योगी, चपळ समाज तयार व्हावा हे समष्टीचे साध्य अथवा ध्येय रहावे. व्यक्तीचे आत्मभान जागृत असेल तर हे सुलभपणे साध्य होऊ शकेल असे वाटते.
हा मार्ग कठीण नाही, उलट सगुणोपासनेपेक्षा कमी वेळखाऊ, कमी पैसेखाऊ, कमी श्रमखाऊ आणि थेट आहे, कुठल्याही मध्यस्थाशिवायचा, हे विशेष.
4 Jan 2014 - 9:40 pm | प्यारे१
परिस्थिती एवढी वाईट आहे असं का वाटतंय?
मी एवढा निराश नाही. (लोक काका म्हणत असले तरी ३३ म्हणजे तरुण गटात मी सुद्धा मोडतो बरं. ;) )
तुम्ही समष्टीबद्दल (समाज अॅज अ व्होल) बोलताय, मी व्यष्टीबद्दल (व्यक्तीगत मार्ग) बोलतोय.
समाजरचनाच अशी आहे की कुठलीच गोष्ट समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचणार नाही.
तुमची तळमळ कधीच समजलीये. क्रिकेटमध्ये जाणारे हजारो तास नि देवळाच्या रांगांमध्ये मोडणारे हजारो तास तसे सारखेच आहेत. पण ह्यात भक्ती येते कुठे मुळात? देव, देऊळ, ट्रस्ट, धंदा, व्यवसाय, मार्केटींग एकाच माळेत आलेत.
समाजरचना (मुद्दाम परत म्हणतोय) अशी झालीये की कुटुंबं एकेकटी झालीत माझा विचार शेअर करुन घ्यायला अहंकार आड येतो. भाऊ बहिण मामा काका ही नाती ठाऊक नाहीत अशी काही कुटुंबं आहेत. ह्यांना कोलमडल्यावर सावरणारं कोणी नाहीत. त्यांच्यासाठी ही देवळं पुन्हा उभी राहत आहेत. ही 'नशा' आहे, झिंग आहे मान्य आहे. पण ही दुसर्याला त्रास न देणारी नशा आहे. त्यातूनच एखादा आपल्याला अभिप्रेत असलेला उभा राहील.
एखादा तरुण तालीम सुरु करतो. त्याला पहिले पंधरा दिवस तू नुसता ये. पुढचं पुढं बघू म्हणणारा उस्ताद नि वरचं कर्मकांड ह्यात तसा फरक नाही. हळूहळू मर्यादा लक्षात घेऊन त्याला पुढचं काम देण्यात यावं.
शाळेत जायला सुरुवात करताना आधी डबा नि चड्ड्या घेऊन जाव्या लागतात. १००० लाखांत एखादा १०-१२ व्या वर्षी मॅट्रिक होतो.
तरीही काळागणिक साधना करत वरच्या पायर्या गाठल्या जायलाच हव्यात.
एक उदाहरण देतो. घर सोडल्याशिवाय रिक्षात बसता येणार नाही, रिक्षा सोडल्याशिवाय बस, बस सोड्ल्याशिवाय ट्रेन, ट्रेन सोडल्याशिवाय विमान पकडता यायचं नाही. आज मी विमानाचं तिकीट अफॉर्ड करु शकतो म्हणून बसला का नावं ठेवू? किंवा बसनं जाणारांबद्दल करुणा, दया का बाळगू? भौगोलिक अडचणी निपटवता आल्या तर बसनं अमेरिका गाठता येईलच की! विमान आहेच.
बावीस तासात अमेरिका, पण एखादा म्हणतो जाऊ रमत गमत सायकलनं पण. चुकीचं नाही ना ?
बाकी एक गोष्ट. पुराण, कीर्तन, प्रवचन आणि पाठ असे प्रकार आहेत. पुराण कथांना, कीर्तनाला प्रचंड गर्दी असते. (असं मानू) त्यात अनेक अभिव्यक्ती असतात. नवरसांचा समावेश असतो.
प्रवचन कमी गर्दीचं नि पाठ तर मोजक्या लोकांसाठीच. प्रत्येका च्या गरजा नि प्राथमिकता वेगवेगळ्या असतात. त्या मान्य कराव्यात असं मला वाटतं.
बाकी 'कुमुदिनी काय जाणे तो परिमळ' ही 'अमृतानुभव' लिहीणार्या ज्ञानेश्वर महाराजांचीच एक अतिशय चांगली रचना आहे. :)
5 Jan 2014 - 12:38 am | संजय क्षीरसागर
दॅट्स द पॉइंट!
पण उपयोग काय? कारण वाचता येतंय पण अर्थ कळत नाही अशी धृतराष्ट्राच्या बाळाची परिस्थिती! इतकी निर्बुद्ध व्यक्ती अत्यंत दुर्मिळ. काय चाललंय याचा पत्ताच नाही! स्वतःची गोंधळलेली मानसिकता आणि दुसर्याला फ्रस्ट्रेशन आलंय असं वाटणं म्हणजे त्याहून कहर! एकेक नमुनेदार प्रतिसाद आहेत!
5 Jan 2014 - 12:34 pm | बॅटमॅन
ये आया और एक फ्रस्ट्रेटेड प्रतिसाद =))
5 Jan 2014 - 12:54 pm | होकाका
नमुनेदार उदाहरण.
5 Jan 2014 - 2:29 am | अर्धवटराव
फक्त एक लोचा आहे... तिकीट दिल्लीचं काढलं तर मुंबईला गाडी पोचली नाहि म्हणुन कम्प्लेण्ट करु नये. अर्थात, कम्प्लेण्ट करण्यात देखील सुख आहे. त्याकरताच अट्टहास असेल तर एंजोय माडी :)
अवांतरः
>>हा मार्ग कठीण नाही, उलट सगुणोपासनेपेक्षा कमी वेळखाऊ, कमी पैसेखाऊ, कमी श्रमखाऊ आणि थेट आहे, कुठल्याही मध्यस्थाशिवायचा, हे विशेष.
-- मोहोब्ब्तको अंजाम देनेका रास्ता कमी/जास्त वेळ-पैसा-श्रम छुकर नहि जाता चिनॉय सेठ. दिलके सौदेमे मुनाफा और घाटा एक हि होता है जानी (आयला... कसला भारी डॉयलॉग...फ्फ्फ्फू)
5 Jan 2014 - 11:27 am | कवितानागेश
तुम्ही अवांतर म्हणून जे काही लिहिलंय तोच मूळ विषय आहे बरं का. :)
5 Jan 2014 - 11:36 am | मोदक
एका वाक्यात जीवनसार सांगीतलेंत!!
जाताजाता , तुम्हाला स्व गवसला आहे काय हो?
4 Jan 2014 - 11:57 pm | अर्धवटराव
काहि वर्षांनी मिपोपनिशद् जनसामान्यांना सर्वप्रकारच्या अवस्थाप्राप्तीचं अमोघ मार्गदर्शन देणारं संदर्भस्थळ म्हणुन मान्यता पावेल.
या पौरुषेय(स्त्रैय सुद्धा) ग्रंथाच्या अवतरणीकेत आपलं नाव कुठल्या कॅटॅगिरीत, कुठल्या नंबरवर असावं याबद्दल आतापासुन बुकींग करुन ठेवणे गरजेचे आहे. संमं यात लक्ष्य घालतील काय?
अवांतरः स्त्रैय शब्द बरोबर आहे का गं माऊ???
5 Jan 2014 - 12:35 am | कवितानागेश
असणारंच बरोबर! काही शंकाच नाही. ;)
- अर्धवटरावांची खंदी समर्थक माउ =))
5 Jan 2014 - 12:55 pm | बॅटमॅन
आपलं फ्रस्ट्रेशन सगुण रूपात मांडणार्या अन इतरांना उपदेश करून ते लपवू पाहणार्या लघळ दांभिकांमुळेही तितकंच प्रसिद्ध होईल.