जगाच्या इतिहासात अनेक धर्मांतरे घडली आपल्या भारत भूमीत हि अनेक धर्मांतरे घडली ह्याचे काय कारण असावे?
लोक धर्मांतर का करत असावेत?
माणूस हा आपल्या धर्मावर प्रेम करतो.त्याचा आदर करतो. धर्माने दिलेल्या रिती परंपरा, पाळतो आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे नि दुसर्याचा धर्म कसा टाकावू आहे ह्याबद्दल घसा सुकेपर्यंत चर्चा करतो वाद विवाद करतो प्रसंगी गुद्दागुद्दी हि करतो तरीही धर्मांतरे का होतात?.
धर्माबद्दल काही बोलले शंका घेतल्या कि माणूस रागावतो उत्तरादाखल दुसऱ्या धर्मातील चुका दाखवतो. काहीना आपला धर्म हा प्राचीन वाटतो काही जणांना तर तो माणसाने निर्माण केलाय असे वाटतच नाही. एरवी सामान्य असणारा माणूस धर्माच्या नावाने दंगली करायलाही मागे पुढे पाहत नाही आपला धर्म खतरे मे असे त्याला वाटू लागते नि तो दुसर्या धर्मियावर तुटून पडतो परधर्मीय बद्दल द्वेष हा त्याला स्वधर्माचा अभिमान वाटतो.
धर्मावर असे अनिर्बंध प्रेम करणारा माणूस धर्मांतर का करत असावा?धार्मिक दंगलीत तळहातावर शीर घेवून लढणारे धार्मिक लोक पाहिले तर त्यांच्या धर्मप्रेमाचे आश्चर्यच वाटते पण इतके होवूनही एक प्रश्न पडतो कि धर्मावर निरतिशय प्रेम करणारा माणूस धर्मांतर का करत असावा ? धर्मांतरे का होतात ???आपल्या भारतातही अनेक धर्मांतरे झालेली आहेत त्याचे काय कारण असावे?
प्रतिक्रिया
25 Dec 2013 - 1:47 pm | अभ्या..
इथे बहुतेक कोणी नाहित धर्मान्तरित. व्हा पुढे. ;-)
25 Dec 2013 - 2:00 pm | प्रकाश घाटपांडे
आपल्याच धर्मात जर बाकीचे धर्मबांधव आपल्याला हीन व माणुसकीविहीन जगण जगायला लावत असतील तर त्यांनी धर्म का बदलू नये? हिंदु धर्मातील दलितांनी केलेली धर्मांतरे ही याच प्रकारात मोडतात. हाणुन मारुन मुसलमान हा शब्दप्रयोग सक्तीच्या धर्मांतरातून आला आहे. स्वेच्छेने केलेली धर्मांतरे देखील असतात. लाभापोटी केलेली पण असतात. धर्म बदलल्याने त्यांच्या जगण्यात फरक पडतोच असे नाही.
25 Dec 2013 - 2:03 pm | जोशी 'ले'
एका शतका नंतर लगेच दुसरी ईनींग सुरु, ऊलशीक उसंत घ्या राव
25 Dec 2013 - 2:03 pm | गणपा
आंजाच्या इतिहासात अनेक धागे प्रसवले गेले. आपल्या मिपाभूमीत हि अनेकजण धागे प्रसवतत असतात ह्याचे काय कारण असावे?
लोक धागे का प्रसवत असावेत?
धागाकर्ता हा आपल्याच धाग्यावर प्रेम करतो. त्याचा टिआरपी वाढवतो. धर्माने दिलेल्या रिती परंपरा, पाळतो आपलाच धागा कसा श्रेष्ठ आहे नि दुसर्याचा धागा कसा टाकावू आहे ह्याबद्दल घसा सुकेपर्यंत चर्चा करतो वाद विवाद करतो प्रसंगी गुद्दागुद्दी हि करतो तरीही धागे प्रसवले का जातात?.
स्वत:च्या धाग्याबद्दल कुणी काही वाईट बोलले शंका घेतल्या कि माणूस रागावतो उत्तरादाखल दुसऱ्याच्या धाग्यातील चुका दाखवतो. काहीना आपला धागा हा सर्वोत्कृष्ट वाटतो काही जणांना तर तो माणसाने निर्माण केलाय असे वाटतच नाही. एरवी शांत असणारा आयडी धाग्यांच्या नावाने दंगली करायलाही मागे पुढे पाहत नाही आपला धागा खतरे मे असे त्याला वाटू लागते नि तो दुसर्या धाग्यांवर तुटून पडतो परकीयलेखना बद्दल द्वेष हा त्याला स्वलेखनाचा अभिमान वाटतो.
स्वलेखनावर असे अनिर्बंध प्रेम करणारा आयडी धागे प्रसवत असावा का? जालिय दंगलीत तळहातावर शीर घेवून लढणारे आयडी पाहिले तर त्यांच्या धागाप्रेमाचे आश्चर्यच वाटते पण इतके होवूनही एक प्रश्न पडतो कि मिपावर निरतिशय प्रेम करणारा आयडी दंगा का करत असावा ? धागे का प्रवसतात ???आजही आपल्या मिपावरही अनेक धागे प्रवसले जात आहेत त्याचे काय कारण असावे?
25 Dec 2013 - 2:07 pm | जोशी 'ले'
_/\_
25 Dec 2013 - 2:13 pm | प्रकाश घाटपांडे
:)
25 Dec 2013 - 2:14 pm | मुक्त विहारि
काय राव आता तुम्ही पण....
एकूणच "मिपा=विडंबन+दंगा+निखळ मैत्री"
25 Dec 2013 - 11:28 pm | पैसा
=)) =))=)) मेले हसून!
म्हणून तू हल्ली लिहीत नाहीस काय!
27 Dec 2013 - 1:23 pm | मृत्युन्जय
अरारा. वाईट्ट हाणलाय राव.
27 Dec 2013 - 8:36 pm | ईन्टरफेल
25 Dec 2013 - 3:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
संस्थळावर एखादी आयडी धागा-दंगा करते म्हणून इतरानी त्या आयडीला भरपूर प्रतिसादिक चोप दिला म्हणून त्या आयडीने आयड्यांतर केले (डूआयडी घेतली) किंवा संस्थळांतर केले तर ते धर्मांतरासारख्या शतकी धाग्याची जिल्बी पाडून चघळता येईल काय?
25 Dec 2013 - 4:55 pm | जेपी
=))
=))
=))
25 Dec 2013 - 8:10 pm | इरसाल
धर्मांतरे का होतात ?
तुम्हाला असे धागे काढायला मिळावेत म्हणुन !!!! टेन्शन इल्ला....
25 Dec 2013 - 9:45 pm | विद्युत् बालक
फारच अपेक्षेने लेख उघडलेला पण काहीच मजा आली नाही !
रामू सारखी उतरती कळा लागली कि काय तुमच्या लेखनाला?
तुमच्या निरागस विनोदी विडंबन साहित्याचा शेकडो चाहत्यान पैकी एक --- बालक
25 Dec 2013 - 11:54 pm | विजुभाऊ
धरर्मांतर का करतात : उत्तर अगदी सोप्पे आहे: लोकाना वेळ घालवायला नवे साधन मिळते म्हणून.
26 Dec 2013 - 10:32 am | रमेश आठवले
ए. आर. रेहमान या ख्यातनाम संगीत दिग्दर्शकाने धर्मांतर का केले असावे ? त्यांच्या धर्मांतराची कारणे काय ?
माहितगारांनी प्रकाश टाकावा.
26 Dec 2013 - 3:39 pm | चौकटराजा
नकी माहीत नाही पण त्याचे वडील हे ही संगीतकार होते. व त्यांच्या आजारात काही मद्त अन्य धर्माच्या लोकांकडून झाली असे वाचल्याचे आठवते.
27 Dec 2013 - 6:10 pm | राजो
रहमान (पूर्वीचा दिलीप, त्याचे संगीतक्षेत्रातले मित्र अजूनही त्याला दिलीप च म्हणतात) च्या लहानपणी त्याच्या बहिणीला काही गंभीर आजार झालेला होता, सर्व डॉक्टरी उपाय संपल्यावर पूजा, प्रार्थना, जप, इ. प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर इतर धर्मातील वैद्य, मौलवी इ. चा ही आधार घेण्यात आला. या सर्वांदरम्यान या कुटंबावर इस्लाम चा प्रभाव पडला, आणि त्यांनी इस्लाम स्वीकारला
संदर्भ : "ए. आर. रहमान - संगीतातील वादळ", अनुवादित पुस्तक
26 Dec 2013 - 11:04 am | सुनील
आमच्या आवडत्या प्रिटी वूमनचे धर्मांतर आठवले!
26 Dec 2013 - 2:15 pm | रमेश आठवले
हरयाणाच्या सरकारच्या एका विवाहित मंत्र्याने त्याच्याच धर्माच्या दुसर्या बाईशी लग्न करायचे ठरवले आणि त्यासाठी दोघांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता.
26 Dec 2013 - 9:07 pm | सचीन
सगळ्या विषयांवर सांगोपांग चर्चा करणारे विद्वान धर्मांतरा सारख्या महत्वाच्या प्रश्नावर का टोलवा टोलवी करतायत ते कळत नाही ?
26 Dec 2013 - 9:36 pm | शेखर
टोलवा टोलवी ही तुम्हाला केलेली आहे. विषयाला नाही. ह्यातुन काही अर्थबोध घेतला तर बरे पडेल.
26 Dec 2013 - 9:51 pm | सचीन
अर्थबोध झाला फक्त सोयीचाच काथ्याकुट होतो
26 Dec 2013 - 10:10 pm | विश्वनाथ मेहेंदळे
ज्जे बात!!! एकच मारा पर शाॅलिड मारा.
26 Dec 2013 - 10:42 pm | विनायक प्रभू
कं प ल स री आहे का?
27 Dec 2013 - 2:06 am | विजुभाऊ
ए आर रहेमानच्या आजारात त्याच्या पालकानी कोणत्या तरी पिराला नवस केला होता. त्यामुळे नवसाची उतराई म्हणून त्यानी धर्म बदलला
27 Dec 2013 - 2:08 am | अभ्या..
हम्म. आम्ही पण करायला हवा. ;) पुरुषविभागासाठी.
27 Dec 2013 - 1:13 pm | पिलीयन रायडर
नक्की क्करा..
पण आधी डिल काय ते बोला..
27 Dec 2013 - 1:17 pm | अभ्या..
मिस्टराना प्रवक्ते पद देऊ. ;-)
27 Dec 2013 - 1:29 pm | पिलीयन रायडर
थोडक्यात परत मलाच..!! जमतय..
सविस्तर डिल साठी व्यनि करा मग!
27 Dec 2013 - 1:13 pm | बॅटमॅन
हा हा हा ;)
27 Dec 2013 - 9:50 am | नाखु
म्ह्णजे काय त्ये माहिति पडू दे मग पुढचं बघू..
संदर्भ : प्यारेंचा "दत्त"धागा आनि "मंदार कात्रेंच्या धाग्यावरिल विचारव्(जं)त प्रतिसाद.
27 Dec 2013 - 12:19 pm | मारकुटे
आर्थिक कारणांमुळे
27 Dec 2013 - 12:31 pm | श्रीगुरुजी
धर्मांतराचं राहू देत. तुमचे पवारसाहेब अनेकवेळा पक्षांतर का करतात ते सांगा पाहू.
27 Dec 2013 - 2:09 pm | सचीन
गुरुजी बर झाले तुम्ही इथे आलात तुम्हीच सांगा धर्मांतर का होत? का लोक एखाद्या धर्माला विटून दुसऱ्या धर्मात जातात?
गुरुजी हा धर्मावरचा धागा आहेत ते पवारांचं जावू द्या. आणि काय हो उठसूट पवार, मोदी करत बसता उद्या तुम्हाला कुत्रा चावला तरी बोलाल हा पवारांनीच सोडला होता.
27 Dec 2013 - 2:57 pm | नाखु
का लोक एखाद्या पक्षाला विटून (पंतप्रधान न होता आल्याने) दुसऱ्या पक्षात जातात? आणि नंतर पाठींबा देवून "खाते" मिळवतात.
27 Dec 2013 - 3:18 pm | नाखु
१)स्वतःच्या धर्मातल्या लोकांकडून होणारा छळ/पीडा/अपमान/पिळवणूक इ...इ..
२)दुसर्या धर्माबद्दल अंधळ आकर्षण/मिळणारी हरेक स्वरुपातली प्रलोभन
३)आपल्या दुबळ्या समाजावर अत्याचार पूर्वक धर्म लादला जाणे.
४)आणी शेवट(दुसर्या धर्मातल्या) वैयक्तिक कुतुहला पासून ते उपासनामार्ग अवडल्यामुळे.
५) तुमच्या सार्ख्यांना धागे काढायला विषय मिळावा म्हणून..
28 Dec 2013 - 2:13 pm | श्रीगुरुजी
>>> तुम्हीच सांगा धर्मांतर का होत? का लोक एखाद्या धर्माला विटून दुसऱ्या धर्मात जातात?
ज्या उच्च नीतिमूल्यांसाठी व तात्विक भूमिकेतून पवारसाहेबांनी १९७८ साली पक्षांतर केले त्याच कारणातून धर्मांतर होते. ज्या देशहिताच्या कारणांमुळे पवारसाहेब काँग्रेसला विटून दुसर्या पक्षात गेले त्याच कारणांमुळे लोक एखाद्या धर्माला विटून दुसर्या धर्मात जातात.
>>> उद्या तुम्हाला कुत्रा चावला तरी बोलाल हा पवारांनीच सोडला होता.
छे. आम्ही असं कशाला म्हणू. अहो, कुत्र्याचं पिल्लू गाडीखाली आम्हाला वाईट वाटतं. मग आम्ही असा आरोप कसा करणार?
28 Dec 2013 - 6:26 pm | ग्रेटथिन्कर
ज्या धर्मात आपमतलबी ,स्वार्थी, रक्तपिपासु ,लोकांकडे धर्मसत्ता असते, असा धर्म लोक सोडून देतात अथवा असल्या फालतु धर्माचा अभिमान वगैरे बाळगत नाहीत.
28 Dec 2013 - 6:34 pm | गब्रिएल
त्याबराबर ज्या धर्मात आपमतलबी ,स्वार्थी, रक्तपिपासु ,लोकांकडे धर्मसत्ता असते त्यांचा धर्म दूसर्यांवर लादला जान्याचि जास्त उदाहारण जगात आहेत... आणि अश्या धरमाच्या कडे धर्मांध भाट-चरनान्ची मोठी फौजपन असते नायका?
28 Dec 2013 - 8:21 pm | ग्रेटथिन्कर
उलट सांगत आहात, असा आपमतलबी धर्म एका ठराविक प्रदेशात सिमित होऊन जातो आणि त्यातले लोक मोठ्या संख्येने अशा डबकेरुपी धर्माचा त्याग करतात, मग त्या धरमातल्या आपमतलबी लोकांना धर्मातराची चिंता करावी लागते .'शुद्ध करुन धर्मात घेतो' वगैरे फुटकळ अमिषे दाखववी लागतात, पण त्यांना कुणी भीक घालत नाहि.
(मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातली तत्वे आवडणारा आणि विचारांनी बुद्धीष्ट असणारा परंतू कागदोपत्री हिंदू -ग्रेटथिन्कर )
28 Dec 2013 - 9:05 pm | गब्रिएल
आयला, ग्रेट थिंकर लोकान्लाबी "आब्यास वाडवा", "इतिहास वाचा" अगर "आजूबाजूला बगा, पेपरं वाचा, त्ये खांद्याव का मानेच्या वर काय असतय ते वापरा" असा सांगायच दिवस आले... लोकं नावालाबी जागायची बंद झाल्यावर अजून काय व्हनार !!! पन ईनोद बरा व्हता. लईच कर्म्णुक करून ह्राय्ले रावसाय्ब
28 Dec 2013 - 9:51 pm | arunjoshi123
सम्यक बुद्धीने असे असेल तर फार चांगली गोष्ट आहे. हिंदू धर्मावर ३६० डिग्री द्वेष मात्र नसावा. हिंदू धर्मातही बरंच त्याज्य असं काही आहे, ते वजा जाता बाकी गोष्टींवर प्रेम असायला हवं. ते नसेल तर वाईट बापामुळे दुखावलेले मूल कूटूंबाचा तिरस्कार करू लागते त्यातला प्रकार होईल. लोकशाहीने ६०-७० वर्षांतच लोकांच्या आशा आकांक्षांवर पाणी फेरले आहे. इस्लाम व ख्रिश्चन धर्म त्यामानाने नवे आहेत. ते इतके भ्रष्ट झालेले नाहीत. हिंदू धर्म फारच जूना आहे आणि आज तर पूर्णतः रसातळाला गेला आहे. पण सरासरी काढली तर जुन्या एका काळात हिंदू धर्माने भारतीय उपमहाद्वीपात बरेच चांगले जीवनमान दिले होते हे नाकारू नये.
बाय द वे, ख्रिश्चनांचे व मुसलमानांचे अंतर्गत वर्तन फार चांगले आहे असे मानून चाललो तरी त्यांचे इतर धर्मांशी वर्तन हिंदूंपेक्षा खालच्या दर्जाचे होते हे वादातीत आहे.
28 Dec 2013 - 11:13 pm | ग्रेटथिन्कर
सहमत
28 Dec 2013 - 11:14 pm | टवाळ कार्टा
आता बघु काय उत्तर येते :)
29 Dec 2013 - 1:00 pm | मारकुटे
>> ख्रिश्चनांचे व मुसलमानांचे अंतर्गत वर्तन फार चांगले आहे असे मानून चाललो
शिया सुन्नी भाई भाई
कॅथोलिक प्रोटेस्टंट हॅलो ब्रदर
जावू द्या छप्परबंद मुस्लिमांचं काय?
अरे कोण म्हण्तो तिक्डे त्यांच काढू नका.. तुमचं काय ते बोला... ओके
अय माय स्वारी....
हिंदू तेव्ढे खराब बाकी सगळॅ छान... खुष ? अरे खुष? काय करावं या विचारवंतांना ... सदैव एरंडाचे तेल प्यायलेले.. हसत पण नाहीत.
28 Dec 2013 - 11:20 pm | विनोद१८
अरे बाबा दुसर्याला भीक घालण्यासाठी मुळात आप्ल्याकदे काहीतली ?? असावे लागते, ते जर मुळातच नसेल भीक कसली घाल्णार आपण ?? आपला सगळाच नन्नाचा पाढा दिसतोय, एकुणच सगळा आनन्दी आनन्द. यालाच म्हणतात 'आडातच नाही तर पोहर्यात कुठुन येणार'
(मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातली तत्वे आवडणारा आणि विचारांनी बुद्धीष्ट असणारा परंतू कागदोपत्री हिंदू म्हणजेच एक ना धड.. असा धेडगुजरी- *fool* ग्रेटथिन्कर *fool* )
( आपले मत अधर्मनिरपेक्ष, कुपुरोगामी, आदर्श देश-लुटारु व सर्वकालीन सर्वात महाभ्रष्ट पक्षालाच द्या - असा जीवाचा आटापिटा करून टाहो न फोडणारा ) विनोद१८
29 Dec 2013 - 1:12 pm | श्रीगुरुजी
>>> उलट सांगत आहात, असा आपमतलबी धर्म एका ठराविक प्रदेशात सिमित होऊन जातो आणि त्यातले लोक मोठ्या संख्येने अशा डबकेरुपी धर्माचा त्याग करतात, मग त्या धरमातल्या आपमतलबी लोकांना धर्मातराची चिंता करावी लागते .'शुद्ध करुन धर्मात घेतो' वगैरे फुटकळ अमिषे दाखववी लागतात, पण त्यांना कुणी भीक घालत नाहि.
गर्व से कहो हम हिंदू है!
>>> आपले मत धर्मनिरपेक्ष ,पुरोगामी पक्षालाच द्या
ताकाला जाऊन भांडे कशाला लपविता? सरळ स्पष्ट शब्दात सांगा ना की आपले मत 'भाजप'लाच द्या म्हणून.
29 Dec 2013 - 1:37 pm | ग्रेटथिन्कर
भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष नाही आणि हिंदुत्ववादी तर आजिबातच नाही.
खरा हिंदुत्ववादी पक्ष काँग्रेस आहे ,मुस्लिमांना गाफिल ठेवून काँग्रेसने खरी सत्ता आजपर्यंत हिंदुच्याच ताब्यात ठेवली आहे.राज्यात दलित मते तीन दशके मिळवून दलितांना एकही पद दिले नाही ,तसे..
आजपर्यत एकही काँग्रेसी पीएम मुस्लिम नव्हता...या उलट फेकू गुजरातमध्ये मुस्लिमांचे भले केले' असे सांगत फिरत आहे. उद्या हेच मुस्लिम हिंदूंच्या उरावर बसले तर पून्हा काँग्रेसकडे बोट दाखवायला आपण मोकळे ..कसे?
जिथपर्यंत भारतातले पक्ष विचारकरुन थांबतात, तिथुन पुढे काँग्रेस विचार करायला सुरवात करते...
आताही आप'ला Expose होताना आपण पहालच.खरी चाणक्यनिती काँग्रेसकडेच आहे.
29 Dec 2013 - 1:58 pm | अर्धवटराव
प्रतिसाद आवडला.
>>जिथपर्यंत भारतातले पक्ष विचारकरुन थांबतात, तिथुन पुढे काँग्रेस विचार करायला सुरवात करते...
-- अगदी खरं. गेल्या दोन दशकात भाजप काँग्रेसकडुन बरेच राजकारण शिकला पण अजुनही मोठा पल्ला गाठायचा आहे. शिवाय आता काँग्रेसमधे जनमानसाचा ठाव घेणारे मुरलेले राजकारणी कमि झालेत... किंबहुना गांधी घराण्याच्या निष्ठेपायी त्यांना डेव्हलप होऊ दिलं गेलं नाहि. राहुल गांधी सध्या काँग्रेसची साफसफाई करण्यावर भर देताहेत. त्यांनी प्रस्थापीत नेत्यांच्या वारसदारांना भाव न देता जर पवारांसारखे सल्लागार निवडले तर काँग्रेस परत आपला बेस कमवेल.
29 Dec 2013 - 4:16 pm | कवितानागेश
नक्की कशावर चर्चा सुरु आहे?
मी आपलं वेगवेगळ्या देवाधर्माचे काहितरी वाचायला मिळेल या आशेवर धागा उघडतेय तर प्रत्येकवेळेस वेगळंच काहितरी पेटतंय! :)
29 Dec 2013 - 5:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
तशी ही चर्चा देवाधर्मावरच चालू आहे. आजकाल राजकिय नेतेच देव (त्यांचे चेले त्यांच्या पाया पडताना, त्यांना दुधाने आंघोळ घालताना किंवा त्यांच्यावर ते बुडून जातिल इतपत खर्या सुमनांचा आणि शाब्दीक स्तुतिसुमनांचा वर्षाव करताना बघितले नाहीत का? !) आणि हे देव म्हणतील तोच त्यांच्या चेल्यांचा धर्म.
देवळातल्या देवाची आरती केली किंवा त्याला प्रसाद चढवला तर हाती काही लागायची शाश्वती नाही... त्यापेक्षा आताचे हे देव हक्काने मागून घेतात आणि तुमचं कामही करतात. सांगा आजकाल कोण जास्त पावर्फूल्ल ? :)
29 Dec 2013 - 11:44 pm | बॅटमॅन
हा हा हा, प्रचंड सहमत!!
29 Dec 2013 - 5:44 pm | वडापाव
म्हणजे तुमच्याच म्हणण्यानुसार काँग्रेस आणि भाजप दोन्हीही धर्मनिरपेक्ष पक्ष नाहीत.
आणि तुम्ही तर म्हणताय, की
याआधी काही धाग्यांवर तुमचे काँग्रेसच्या बाजुचे प्रतिसाद वाचल्येत. त्यांच्याच खाली तुमची हीच स्वाक्षरी तेव्हाही होती. प्रतिसाद आणि स्वाक्षरीत एवढा विरोधाभास का??
30 Dec 2013 - 1:14 pm | श्रीगुरुजी
>>> भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष नाही आणि हिंदुत्ववादी तर आजिबातच नाही.
धर्मनिरपेक्ष नाही आणि हिंदुत्ववादी पण नाही. तुमचा काहीतरी केमिकल लोचा झालेला दिसतोय. हिंदुत्ववादी नाही म्हणजेच धर्मनिरपेक्ष आणि धर्मनिरपेक्ष नाही म्हणजेच हिंदुत्ववादी अशी सोपी व्याख्या आहे.
>>> खरा हिंदुत्ववादी पक्ष काँग्रेस आहे
हा साक्षात्कार कधी झाला म्हणे? काहीतरी जोरदार केमिकल लोचा दिसतोय. गेट वेल सून (म्हणजे चांगली सून शोधू नका आणि लवकर बरे व्हा).
>>> ,मुस्लिमांना गाफिल ठेवून काँग्रेसने खरी सत्ता आजपर्यंत हिंदुच्याच ताब्यात ठेवली आहे.
हिंदूंच्या म्हणजे कोणाच्या ताब्यात ठेवली आहे? सत्ता काँग्रेसने स्वपक्षाच्या ताब्यात ठेवली आहे आणि काँग्रेस हिंदूंचा नसून निधर्मांधांचा पक्ष आहे.
>>> राज्यात दलित मते तीन दशके मिळवून दलितांना एकही पद दिले नाही ,
सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते.
>>> तसे.. आजपर्यत एकही काँग्रेसी पीएम मुस्लिम नव्हता...
याचा आणि हिंदुत्ववादी असण्याचा काय संबंध?
>>> जिथपर्यंत भारतातले पक्ष विचारकरुन थांबतात, तिथुन पुढे काँग्रेस विचार करायला सुरवात करते...
म्हणजे इतर पक्षांची भ्रष्टाचाराची उडी काही लाखांवर किंवा कोटीत जाऊन थांबते. काँग्रेसची उडी १७६००० कोटी (२ जी तरंगलहरी घोटाळा, ७०००० कोटी (राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा), १८६००० कोटी (कोळसा खाण घोटाळा) अशी खूप पुढे जाऊन पडते.
>>> आताही आप'ला Expose होताना आपण पहालच.खरी चाणक्यनिती काँग्रेसकडेच आहे.
जरा वाट बघा. केजरीवाल काँग्रेसचे कसे वस्त्रहरण करतील ते पहा आणि खरा चाणक्य कोण आहे ते कळेलच.
>>> आपले मत धर्मनिरपेक्ष ,पुरोगामी पक्षालाच द्या
तुमच्या म्हणण्यानुसार काँग्रेस हिंदुत्ववादी आहे, म्हणजेच काँग्रेस प्रतिगामी आहे व धर्मनिरपेक्ष नाही.
तुमच्या म्हणण्यानुसार भाजप हिंदुत्ववादी नाही, म्हणजेच भाजप पुरोगामी व धर्मनिरपेक्ष आहे.
आपले मत "धर्मनिरपेक्ष ,पुरोगामी" पक्षालाच द्या अशी तुमची कळकळीची इच्छा आहे.
म्हणजेच "भाजपला" मत द्या असे तुम्हाला आडून सुचवायचे आहे. मग तसे स्पष्ट सांगा ना. उगाच ताकाला जाऊन भांडे कशाला लपविता?
3 Jan 2014 - 10:43 am | प्रभाकर पेठकर
>>>>आजपर्यत एकही काँग्रेसी पीएम मुस्लिम नव्हता...
अब्दुल रेहमान अंतुले - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - ९ जून १९८० ते १२ जानेवारी १९८२
3 Jan 2014 - 11:46 am | ग्रेटथिन्कर
पीएम आणि सीएम यात फरक समजतोय का? कुठून लोक प्रतिवाद करायला येतात देवजाणे!
3 Jan 2014 - 5:12 pm | प्रभाकर पेठकर
घोडचुक झाली साहेब माफी असावी.
3 Jan 2014 - 11:00 am | प्रभाकर पेठकर
>>>>राज्यात दलित मते तीन दशके मिळवून दलितांना एकही पद दिले नाही.
सुशिलकुमार शिंदे - महाराष्ट्र मुख्यमंत्री - १८ जानेवारी २००३ ते ३० ऑक्टोबर २००४
3 Jan 2014 - 11:50 am | ग्रेटथिन्कर
मान्य. परंतु मला आरपीआय व आंबेकडकरी मतांविषयी म्हणायचे होते.
3 Jan 2014 - 11:51 am | ग्रेटथिन्कर
टायपो मिस्टेक, आंबेडकरी मतांविषयी असे वाचावे.
3 Jan 2014 - 4:44 pm | टवाळ कार्टा
याला कोलांटीउडी म्हणतात
असे आधीच लिहावयाला हवे होते
3 Jan 2014 - 5:19 pm | प्रभाकर पेठकर
दलित आणि दलितेतर यात फरक समजतोय का? कुठून लोक प्रतिवाद करायला येतात देवजाणे! - असं आता मी म्हणायचं का?
28 Dec 2013 - 11:11 pm | टवाळ कार्टा
औरंगजेब???
27 Dec 2013 - 2:38 pm | अत्रुप्त आत्मा
@ धर्मांतर का होत? >>> येका शिनुमाचा कंटाळा आला की दुसरा! =))
27 Dec 2013 - 2:41 pm | सचीन
तुम्हाला आला कि नाहि कंटाळा एका शिनेमाचा..
नाव तर अतृप्त दिसतया.म्हणून विचारल.
27 Dec 2013 - 2:51 pm | अत्रुप्त आत्मा
@नाव तर अतृप्त दिसतया.म्हणून विचारल.>>> ती अतृप्ती इहलौकिक गोष्टींबद्दल आहे. धार्मिक गोष्टींबद्दलची नाही. :) तसेही आंम्ही कोणताच प्रस्थापित धर्म वापरत नाही. ती गरजच संपलिये. :)
27 Dec 2013 - 2:55 pm | सचीन
तस असेल तर जावू द्या...
गुरुजी तुम्हीच सांगा हो धर्मातर का करतात? (आणि ह्या धाग्यावर तो मोदिभी नको नि पवार भी नको मोदी राहल्या गुजरातेत पवार राहल्या बारामतीत.)
27 Dec 2013 - 3:10 pm | अत्रुप्त आत्मा
@गुरुजी तुम्हीच सांगा हो धर्मातर का करतात? >>>
१)स्वतःच्या धर्मातल्या लोकांकडून होणारा छळ/पीडा/अपमान/पिळवणूक इ...इ..
२)दुसर्या धर्माबद्दल अंधळ आकर्षण/मिळणारी हरेक स्वरुपातली प्रलोभन
३)आपल्या दुबळ्या समाजावर अत्याचार पूर्वक धर्म लादला जाणे.
४)आणी शेवट(दुसर्या धर्मातल्या) वैयक्तिक कुतुहला पासून ते उपासनामार्ग अवडल्यामुळे.
..................................................................................................
27 Dec 2013 - 3:17 pm | गणपा
आणि यानं 'त्यांचा' आत्मा तृप्त होईल असं वाटतं तुम्हाला बुवा?
धन्य आहे तुमचा आशावाद. बेस्ट लक. :)
बादवे तुम्ही कापुस कोंड्याची गोष्ट ऐकली आहे का?
27 Dec 2013 - 3:23 pm | अत्रुप्त आत्मा
@आणि यानं 'त्यांचा' आत्मा तृप्त होईल असं वाटतं तुम्हाला बुवा? >>> नाहीच होणार . मी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. :)
@धन्य आहे तुमचा आशावाद. बेस्ट लक. Smile>>> हा "माझा" आशावाद वग्रे काहिही नाही. फक्त कारण मिमांसा आहे. धन्यवाद.
@बादवे तुम्ही कापुस कोंड्याची गोष्ट ऐकली आहे का>>> ती मला चांगलीच ठाऊक आहे. कदाचित धागाकर्त्यास उपयोगी पडेल. :)
27 Dec 2013 - 3:25 pm | बॅटमॅन
रजनीकांतला ती गोष्ट अथपासून इतिपर्यंत ठाऊक आहे. ती गोष्ट सांगून त्याने अलका कुबलला चांगले तासभर हसविले होते.
28 Dec 2013 - 2:16 pm | श्रीगुरुजी
>>> गुरुजी तुम्हीच सांगा हो धर्मातर का करतात?
ज्या उच्च नीतिमूल्यांसाठी व तात्विक भूमिकेतून पवारसाहेबांनी १९८६ साली पक्षांतर केले त्याच कारणातून धर्मांतर होते. ज्या देशहिताच्या कारणांमुळे पवारसाहेब समाजवादी काँग्रेसला विटून काँग्रेसमध्ये परत गेले त्याच कारणांमुळे लोक एखाद्या धर्माला विटून दुसर्या धर्मात जातात.
28 Dec 2013 - 6:37 pm | गब्रिएल
आमी तर गहू, तांदूळ, पैसे घेऊन झालेले लै धर्मांतर बघले आहे, सचीन. तुमी काय मंताव?
27 Dec 2013 - 6:24 pm | जोशी 'ले'
अलका कुबल वरुन आठवलं ते कुबल कैरी लोणचे मसाल्याचे धर्मांतर करुन लिंबु लोणचे बनवता येईल का?
27 Dec 2013 - 8:47 pm | सूड
कुबल तितकंसं बरं नसतं, बेडेकरांचं कैरीचं लोणचं घेऊन पाहा एकदा !!
27 Dec 2013 - 9:38 pm | जोशी 'ले'
लिंबं घरी पडलिच आहेत, ऊद्याच करुन बघतो
28 Dec 2013 - 9:59 am | अनुप ढेरे
पाककृती पण टाका.. फटु सकट.
27 Dec 2013 - 9:19 pm | आनंदी गोपाळ
क्रूपया मार्गदर्सन करावे.
-*_*-
वर लिवलाय, किमान तितक्या प्रतिसादापुरता माझा आयडी आयझ्याक न्यूटन किंवा अल बेरूनी किंवा भंते अमुकतमुक असा आहे असे समजा :)
मिपावर लै सूज्ञ लोक आहेत, पैकी सक्रिय मॅक्स २५-३० आहेत. सचिन वगैरे चार दोन आयडींना कंपू करून झोडपणे सध्या फारच जोरात आहे. मला तरी लोचा हा दिसतो आहे, की या आयडीज चिमट्या फार योग्य जागी काढतात. त्यामुळे उत्तर देणे म्यांडेटरी होऊन जाते.. नसेल करायची चर्चा धागा विषयाबद्दल तर फाट्यावर मारा ना? कुणी जबरदस्ती केली आहे का? मास्तुरेंना प्रश्न विचारलेला दिसला, त्याचे उत्तर कुठेय?
असो.
चालू द्या.
ता.क.
गणपाभौ रेस्प्या का टाकत नाहीत आजकाल?
27 Dec 2013 - 9:59 pm | गणपा
आजवर अनुल्लेखानंच मारत आलोय असल्या काकुंना. पण काये ना गोपाळराव, कधी कधी सहन शक्ती संपते.
जरी प्रतिसाद या धाग्यात असला तरी तो केवळ या धाग्याकर्त्या पुरता मर्यादित नाही.
हल्ली लोकं उठतात ऑनलाईन पेपरातली एखादी बातमी उचलतात आणि त्याची लिंक टाकून ४-५ ओळी खरडुन लोकांची मतं मागत बसतात. याचा वीट आला होता.
या उपहासात्मक्(विडंबन) प्रतिसादातुन त्या कोंडलेल्या वाफेला वाट करुन दिली इतकेच.
27 Dec 2013 - 10:07 pm | सचीन
अरे बापरे इतका थोर मानुस गणपा शेठ आमचा अनुल्लेख करणार.
काय बरे करावे आता.
गणपा शेठ उपहासात्मक विडंबन चान होते कोणाकडून लिहून घेतलेत?
28 Dec 2013 - 11:06 am | वडापाव
पब्लिक धुलाई चालू असली की आपणही हात साफ करून घेण्याचा मोह आवरत नाही हो
28 Dec 2013 - 3:57 pm | बाळकराम
वडापाव- हा प्रतिसाद व्यक्तिगत तुम्हाला उद्देशून नाही. पण घरात बायको विचारत नाही, ऑफिसात साहेब शिव्या घालतो, मित्र उसने देत नाहीत- थोडक्यात ज्यांच्या आयुष्याचं केळं झालेले आहे अशी पिचपिची लोकंच पब्लिक धुलाईमध्ये हात धुवून घेण्याचा "शूरपणा" दाखवत असतात, असं आजपर्यंतचं निरीक्षण आहे.
असो.
28 Dec 2013 - 4:21 pm | जोशी 'ले'
तुम्हाला तुमची सहचरणी विचारते, हापिसात बाॅस मानानं वागवतो, मित्रांच्या ऊधारी - उसनवारीतुन मजेत चाललंय, थोडक्यात जीवनाचा हापुस झालाय ते हि असो व्यायामानं शरिरही चांगलच कमावलय, शुरही आहात...मजेत चाललंय कि तुमचं ...मग येवढ का चिडताय? मजेत घ्या
28 Dec 2013 - 5:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
28 Dec 2013 - 6:40 pm | बाळकराम
पण कुणी टोळ्या करुन एकट्या-दुकट्याला त्रास द्यावा आणि आपण त्यात मजा घ्यावी असं वाटत नाही, म्हणून ही कॉमेंट बाकी काही. त्यात पुन्हा कुंपणच शेत खायला लागलं की मग उद्विग्नता वाढते. सचीन यांच्या लेखांतील मतांशी मी सहमत असेनच असं नाही, पण एखाद्याला असं टार्गेट करुन त्याची रेवडी उडवणं मनाला पटत नाही इतकंच म्हणणं.
28 Dec 2013 - 11:16 pm | टवाळ कार्टा
खीक :)
27 Dec 2013 - 11:39 pm | खटपट्या
धागा बराच पेटलाय
28 Dec 2013 - 7:03 pm | arunjoshi123
माझे एक धर्मांतर झाले आहे. इथे 'एका धर्मांतराची कथा' धाग्यात त्याचे वर्णन आहे. अजून तरी तो धागा पहिल्याच पानावर आहे. मला बुलेट पाइंटमधे प्रश्न विचाराल तर मी ऑब्जेक्टीव उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन.
28 Dec 2013 - 11:25 pm | रमेश आठवले
जवाहरलाल नेहरू यांनी स्वत: विषयी असे म्हटले आहे---
'By education I am an Englishman, by views an internationalist, by HEART a Muslim, and I am a Hindu only by accident of birth…' -
28 Dec 2013 - 11:35 pm | विनोद१८
.धेडगुजरी पुरोगामी.
29 Dec 2013 - 2:04 am | खटपट्या
खालील लिंक वर उत्तर मिळते का बघा.
http://blog.sureshchiplunkar.com/2007/04/blog-post_18.html
29 Dec 2013 - 1:37 pm | उद्दाम
मुळात माणसाला जो जन्मजात धर्म मिळालेला असतो, तोदेखील त्याच्यावर सक्तीनेच लादलेला नसतो का? हिंदु आईबापांनी जन्म दिला म्हणून हिंदु ..... मग धर्मातील काही गोष्टी चांगल्या असतातच, त्यामुळे तो धर्म आपला वाटू लागतो.
माणसाला १०-२० वर्षापर्यंत धर्मच नसावा. त्यानंतर त्याने आनंदाने स्वतःला हवा तो धर्म निवडावा. असे आम्हाला वाटते.
29 Dec 2013 - 2:01 pm | arunjoshi123
सहमत
29 Dec 2013 - 2:17 pm | अत्रुप्त आत्मा
@त्यानंतर त्याने आनंदाने स्वतःला हवा तो धर्म निवडावा. असे आम्हाला वाटते.>>> अगदी सहमत. आणी थोडी भर- @त्यानंतर त्याने आनंदाने स्वतःला हवा तो धर्म निवडावा--- आणी कुठल्याच प्रकारे धर्माची गरज नसेल,तर स्वखुषीनी निधर्मी रहावं. :)
29 Dec 2013 - 2:22 pm | अर्धवटराव
आपण जसं कधि वडापाव, कधि भेळ, कधि मिसळ असं आलटुन पालटुन जिभेचे चोचले पुरवतो तसं सणवार किंवा इतर सोयी बघुन दिवसा/महिन्यागणिक धर्म बदलावा... आणि उपास करायचा असेल त्या दिवशी निधर्मी राहावं :)
29 Dec 2013 - 2:45 pm | अत्रुप्त आत्मा
वरील धोरण अमान्य... जिथे धर्मच नको... तिथे हे धोरण (आमच्या सारख्यांच्या) काय कामाचं? :) ते ज्यांना कुठेच सिरियस व्हायचं नसेल त्यांच्यासाठी योग्य आहे. :)
29 Dec 2013 - 11:22 pm | अर्धवटराव
म्हणजे तुम्हाला आयुष्यभर सिरीयस उपास करायचा आहे कि काय ?? ;)
29 Dec 2013 - 11:26 pm | अत्रुप्त आत्मा
@सिरीयस उपास करायचा आहे कि काय ?? >>> निधर्मींन्ना इहलौकिकाचा भोग पुरतो. उपासाची गरजच नाय! :D
29 Dec 2013 - 11:29 pm | प्रचेतस
अहो पण तुमचीच सही होती ना मागे की 'इहलौकिक जग हे अर्धसत्य आहे' अशी.
29 Dec 2013 - 11:31 pm | अर्धवटराव
त्यांचा भोग आणि उपास देखील अर्धसत्य आहे :)
29 Dec 2013 - 11:33 pm | प्रचेतस
=))
30 Dec 2013 - 2:23 am | अत्रुप्त आत्मा
@त्यांचा भोग आणि उपास देखील अर्धसत्य आहे >>> आता मात्र... असोच! :)
30 Dec 2013 - 2:25 am | अत्रुप्त आत्मा
@अहो पण तुमचीच सही होती ना मागे की 'इहलौकिक जग हे अर्धसत्य आहे' अशी.>>> पुन्हा निरर्थक! :-/
30 Dec 2013 - 2:44 am | अभ्या..
गुरूजी आपण या अगोबाला छळायचे का? ;-)
तुम्ही नुसते हो म्हणा. :-D
30 Dec 2013 - 2:45 am | अत्रुप्त आत्मा
होsssssssss.........! =))
4 Jan 2014 - 1:33 am | डॉ सुहास म्हात्रे
"... पलायनमपी मिथ्या ।" हे वचन आठवा. म्हणजे सगळे स्पष्ट होईल :)
29 Dec 2013 - 3:28 pm | खटपट्या
ख्रिस्मस ला केक खायला मिळतो म्हणून मला ख्रिचन धर्म आवडतो.
ईद ला मस्त मित्राकडे जावून बिर्याणी चापतो तेव्हा मला इस्लाम प्यारा वाटतो.
आणि बाकी आपले गणपती, दिवाळी आहेतच.
थोडक्यात मस्त चविष्ट खाणे हा माझा धर्म.
29 Dec 2013 - 2:37 pm | उद्दाम
धर्मपंडितानी वाळीत टाकलेल्या आमच्यासारख्या माणसाच्या विचारानाही सहमती मिळाली, हे वाचोन आमचा धर्मांतरीत आत्मा धन्य झाला.
29 Dec 2013 - 3:19 pm | arunjoshi123
विरोध वा सहमती ही विचारांशी असते, व्यक्तिशी नाही.
29 Dec 2013 - 3:54 pm | आनंदी गोपाळ
ख्रिश्चन मूल, मुस्लिम मूल, हिंदू मूल असं काही नसतं हे तो म्हणतो.
जन्माला आलल्या मुलाला कोणताही 'धर्म' नसतो.
उदा. अफगाणीस्तानात मुस्लिम मातापित्यांच्या पोटी जन्माला येईल त्या बाळावर आपोआपच आईबापाच्या 'धर्माचे' 'संस्कार' 'केले जातात'. (तिन्ही ठिकाणी अवतरण देण्याचा उद्देश तेच वाक्य तिन्ही शब्दांवर जोर देऊन वाचून पहावे, हा आहे.) हीच बाब त्या मुलाच्या जागी भारतातल्या हिंदू मातापित्यांच्या पोटी जन्मलेल्या मुलाबद्दल, वा कुठे इंग्र्लंडमध्ये ख्रिश्चन मातापित्यांच्या मुलांबद्दल.
हे सगळे 'धर्मसंस्कार' कोवळ्या वयात, धर्म म्हणजे काय, देव कशाला हवा? इत्यादी कसलेच विचार नसलेल्या, व ते करायची इच्छा, / गरजही नसलेल्या बाळावर थोपविले जातात, व त्याला आपोआप 'मुसलमानाचे पोर' किंवा 'हिंदूचे पोर' म्हणण्या ऐवजी (असे आपल्याकडे पूर्वी म्हणत, जे जास्त योग्य होते) मुसलमान पोर वा हिंदू पोर असे संबोधले जाते.
स्वतंत्र विचार करण्याचे वय व स्वातंत्र्य आल्यानंतर सुंता/बाप्तिस्मा/मौंज इत्यादि कराची इच्छा आहे काय असे विचारल्यास, एक मोठी टक्केवारी कोणताच धर्म नको असे म्हणणारीच आढळळेल, व तशीच वागणूक बहुतेकांची असते, फक्त तोपर्यंत धार्मिक बाळकडू खोलवर भिनलेले असल्याने 'आमच्यात हे असेच करतात' (शिडीवर चढणार्या माकडांची गोष्टःसंदर्भ) या बेसिसवर 'धर्म' सोडायची वा बदलायची इच्छा/गरज वाटत नाही.
रोजच्या जगण्यात अशा कृत्रीम धर्माची गरजच नसल्याने, रोटिबेटी व्यवहारात कुठेतरी त्याची गरज लागते, किंवा सांघिक उपासना सक्तीची असलेल्या धर्मांच्या आचरणातून, वा अशा धर्मांबद्दलच्या हेव्यादाव्यातून धर्माच्याच नावाखाली पेटवलेल्या तथाकथित 'भावनां'साठी त्याची गरज लागते.
यातून चटके बसलेला विरळाच कुणी धर्मांतर करून दुसर्या धर्मात जातो, असे माझे निरिक्षण आहे. आमिष वगैरे दाखवून लोक देशांतरही करतात. उदा. अम्रिकेचे नागरिकत्व स्वीकारून भारतभूला टाटा करणे हे हिंदु धर्म सोडून औषधोपचार्/अन्नासाठी ख्रिश्चन होणार्या आदिवाश्यापेक्षा बेसिकली फार वेगळे आहे, असे मला तरी दिसत नाही.
विचारपूर्वक जर केले जात असेल. तर ते धर्मांतर = धर्माला अंतर देऊन निधर्मी वागणूकीकडे वळणारेच मला तरी सर्वच धर्मांत दिसतात. जितकी शैक्षणिक वा सांस्कृतिक प्रगल्भता जास्त, तितके हे प्रमाण वाढलेले दिसते.
आपण रोजच्या दिनचर्येत 'धर्म' किती व कसा पाळतो, तथाकथित 'धर्मा'पासून किती दूर असतो, हा विचार केला तरी आपले धर्मांतर किती व का झाले, हे लक्षात येईल.
**
असो.
आजकाल चर्चा विषयाला धरून न बोलता तिसरेच फाटे फोडत हाणामार्या, टपल्यांची देवाणघेवाण करण्याची स्टाईल असतानाही माझा हा ओल्ड फ्याशण्ड प्रतिसाद कडूचा गोड करून घ्यावा ही विनंती.
29 Dec 2013 - 4:25 pm | बाळकराम
सुंदर प्रतिसाद! तर्कसुसंगत आणि महत्त्वाचे म्हणजे, समंजस आणि संयत! आता वन-अप-मन शिपच्या आणि टोळीयुद्धाच्या हेडॉनिस्टिक कर्कश्श गदारोळात हा समजूतदारपणाचा आवाज कितपत टिकतो ते बघूयात.
29 Dec 2013 - 6:24 pm | राही
अगदी सहमत.
थोडे अवांतर आणि भरही. अमेरिकेत स्थाईक झालेल्या भारतीयांच्या अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या पुढच्या पिढीतील मुलांची लग्ने पुष्कळदा स्थानिक अमेरिकनांशी होतात आणि ती स्वतः हिंदू राहिली तरी त्यांची मुले कित्येकदा क्रिस्टिअन धर्म स्वीकारतात. याचे कारण त्यांना एकलपणा (आय्सोलेशन) नकोसा वाटत असावा किंवा पीअर प्रेशर हे असावे. अर्थात स्वतःचे घेटोज़ करून रहाण्यापेक्षा असे मिसळून जाणे कदाचित बरे. ह्या मुलांच्या आवडीनिवडीही भारतीय राहिलेल्या नसतात. (आजकाल आम्हा भारतीयांच्या आवडीनिवाडीसुद्धा तशा शुद्ध भारतीय कुठे राहिल्या आहेत म्हणा!)
29 Dec 2013 - 4:48 pm | प्यारे१
प्रतिसाद आवडला!
29 Dec 2013 - 5:32 pm | अत्रुप्त आत्मा
@स्वतंत्र विचार करण्याचे वय व स्वातंत्र्य आल्यानंतर सुंता/बाप्तिस्मा/मौंज इत्यादि कराची इच्छा आहे काय असे विचारल्यास, एक मोठी टक्केवारी कोणताच धर्म नको असे म्हणणारीच आढळळेल, व तशीच वागणूक बहुतेकांची असते, फक्त तोपर्यंत धार्मिक बाळकडू खोलवर भिनलेले असल्याने 'आमच्यात हे असेच करतात' (शिडीवर चढणार्या माकडांची गोष्टःसंदर्भ) या बेसिसवर 'धर्म' सोडायची वा बदलायची इच्छा/गरज वाटत नाही.>>> +++++१११११
30 Dec 2013 - 10:07 am | नाखु
ख्रिश्चन मूल, मुस्लिम मूल, हिंदू मूल असं काही नसतं हे तो म्हणतो.
जन्माला आलल्या मुलाला कोणताही 'धर्म' नसतो.
उदा. अफगाणीस्तानात मुस्लिम मातापित्यांच्या पोटी जन्माला येईल त्या बाळावर आपोआपच आईबापाच्या 'धर्माचे' 'संस्कार' 'केले जातात'. (तिन्ही ठिकाणी अवतरण देण्याचा उद्देश तेच वाक्य तिन्ही शब्दांवर जोर देऊन वाचून पहावे, हा आहे.) हीच बाब त्या मुलाच्या जागी भारतातल्या हिंदू मातापित्यांच्या पोटी जन्मलेल्या मुलाबद्दल, वा कुठे इंग्र्लंडमध्ये ख्रिश्चन मातापित्यांच्या मुलांबद्दल.
हे सगळे 'धर्मसंस्कार' कोवळ्या वयात, धर्म म्हणजे काय, देव कशाला हवा? इत्यादी कसलेच विचार नसलेल्या, व ते करायची इच्छा, / गरजही नसलेल्या बाळावर थोपविले जातात, व त्याला आपोआप 'मुसलमानाचे पोर' किंवा 'हिंदूचे पोर' म्हणण्या ऐवजी (असे आपल्याकडे पूर्वी म्हणत, जे जास्त योग्य होते) मुसलमान पोर वा हिंदू पोर असे संबोधले जाते.
स्वतंत्र विचार करण्याचे वय व स्वातंत्र्य आल्यानंतर सुंता/बाप्तिस्मा/मौंज इत्यादि कराची इच्छा आहे काय असे विचारल्यास, एक मोठी टक्केवारी कोणताच धर्म नको असे म्हणणारीच आढळळेल, व तशीच वागणूक बहुतेकांची असते, फक्त तोपर्यंत धार्मिक बाळकडू खोलवर भिनलेले असल्याने 'आमच्यात हे असेच करतात' (शिडीवर चढणार्या माकडांची गोष्टःसंदर्भ) या बेसिसवर 'धर्म' सोडायची वा बदलायची इच्छा/गरज वाटत नाही.
रोजच्या जगण्यात अशा कृत्रीम धर्माची गरजच नसल्याने, रोटिबेटी व्यवहारात कुठेतरी त्याची गरज लागते, किंवा सांघिक उपासना सक्तीची असलेल्या धर्मांच्या आचरणातून, वा अशा धर्मांबद्दलच्या हेव्यादाव्यातून धर्माच्याच नावाखाली पेटवलेल्या तथाकथित 'भावनां'साठी त्याची गरज लागते
ईथपर्यंत जोरदार सहमत
यातून चटके बसलेला विरळाच कुणी धर्मांतर करून दुसर्या धर्मात जातो, असे माझे निरिक्षण आहे. आमिष वगैरे दाखवून लोक देशांतरही करतात. उदा. अम्रिकेचे नागरिकत्व स्वीकारून भारतभूला टाटा करणे हे हिंदु धर्म सोडून औषधोपचार्/अन्नासाठी ख्रिश्चन होणार्या आदिवाश्यापेक्षा बेसिकली फार वेगळे आहे, असे मला तरी दिसत नाही.
विचारपूर्वक जर केले जात असेल. तर ते धर्मांतर = धर्माला अंतर देऊन निधर्मी वागणूकीकडे वळणारेच मला तरी सर्वच धर्मांत दिसतात. जितकी शैक्षणिक वा सांस्कृतिक प्रगल्भता जास्त, तितके हे प्रमाण वाढलेले दिसते.
आपण रोजच्या दिनचर्येत 'धर्म' किती व कसा पाळतो, तथाकथित 'धर्मा'पासून किती दूर असतो, हा विचार केला तरी आपले धर्मांतर किती व का झाले, हे लक्षात येईल
पन ईथेच बेसिक लोच्या आहे कारण आपला धर्म पाळणे म्हणजे नक्की काय हे शिक्षीत्/अशिक्षीत्,निवासी-अनिवासी,मूळ हिंदु/हिंदु धर्म त्यागून मुस्लीम किरिस्ती झालेले,गरिब्/श्रीमंत्,अडाणि/विचारवंत यांना नक्की माहीती नाहीये,आणि ते माहीती करून घ्यायची अजिबात ईच्छा ही दिसत नाहीये.
अशा संभ्रमावस्थेत साहजिक्च "आसारामां"समान भोंदुंचे फावते.
संभमावस्थेचे ऊदाहरण म्हणजे मूळ हिंदु अस्लेल्या पण मुस्लिम धर्म स्विकारलेल्या समाजाला आजही हिंदू सण्-वार करण्याची असोशी असतेच्.
तीच बाब ईतरांमध्ये..यातील सगळ्यात मोठा खेद्जनक भाग म्हणजे जो स्वतःला हिंदू समजतो त्याला ही हिंदू "धर्म" आहे का "जीवन प्रणाली"(ज्या मध्ये वेग-वेगळे धर्म्-पंथ्,जाती आहेत्)याचा ऊलगडा नाही.माग आप्-आप्ल्या मगदूरानुसार मी-माझी जात जे पाळते ते नियम/कर्मकांड म्हण्जे धर्म अस्सा सोयीस्कर अर्थ काढला जातो.
या समजास नेते/अभिनेते/अभिनय करणारे नेते सुद्धा/स्वघोषीत धर्म मार्तंड्/विकावू विचारवंत खत-पाणी घालून आप्-आप्ला स्वार्थ साधून घेतात..
आपली (सर्व समाजाची)अवस्था नेहमीच "कोणता झेंडा घेऊ हाती" अशीच असते
30 Dec 2013 - 1:41 pm | श्रीगुरुजी
>>> उदा. अफगाणीस्तानात मुस्लिम मातापित्यांच्या पोटी जन्माला येईल त्या बाळावर आपोआपच आईबापाच्या 'धर्माचे' 'संस्कार' 'केले जातात'. (तिन्ही ठिकाणी अवतरण देण्याचा उद्देश तेच वाक्य तिन्ही शब्दांवर जोर देऊन वाचून पहावे, हा आहे.) हीच बाब त्या मुलाच्या जागी भारतातल्या हिंदू मातापित्यांच्या पोटी जन्मलेल्या मुलाबद्दल, वा कुठे इंग्र्लंडमध्ये ख्रिश्चन मातापित्यांच्या मुलांबद्दल.
धर्माचे संस्कार केले जातात व होत जातात. मुस्लिमांमध्ये लहान वयातच सुंता केली जाते. शिख ४-५ वर्षांच्या मुलाला फेटा बांधायला सुरूवात करतात. ख्रिश्चन लहान वयातच बाप्तिस्मा देतात. हिंदूंमध्ये फक्त एक ४-५ टक्के असलेला अल्पसंख्य वर्ग मुंज वगैरे करतो. उर्वरीत ९४-९५ टक्के अधिकृत हिंदू होण्यासाठी असे कोणतेही औपचारिक संस्कार करत नाहीत. त्यामुळे तुमचे वरील विवेचन फक्त ४-५ टक्के हिंदूनाच लागू पडेल.
>>> हे सगळे 'धर्मसंस्कार' कोवळ्या वयात, धर्म म्हणजे काय, देव कशाला हवा? इत्यादी कसलेच विचार नसलेल्या, व ते करायची इच्छा, / गरजही नसलेल्या बाळावर थोपविले जातात, व त्याला आपोआप 'मुसलमानाचे पोर' किंवा 'हिंदूचे पोर' म्हणण्या ऐवजी (असे आपल्याकडे पूर्वी म्हणत, जे जास्त योग्य होते) मुसलमान पोर वा हिंदू पोर असे संबोधले जाते.
हिंदू वगळता इतर मुख्य धर्मात सरसकट सर्व मुलांवर हे संस्कार थोपविले जातात. हिंदूंमध्ये फक्त ४-५ टक्के कुटुंबात असे होते.
हे संस्कार जसे केले जातात तसे होतही जातात. एकवेळ संस्कार करणे थांबविता येईल पण संस्कार होणे हे कसे थांबविता येणार? एखाद्या हिंदू कुटुंबाने ठरविले की आपला मुलगा/मुलगी सज्ञान झाल्यावर कोणता धर्म स्वीकारायचा हे ठरवतील. आपण कोणतेही हिंदू संस्कार त्यांच्यावर करून त्यांच्या मनात पक्षपात निर्माण करायचा नाही. पण घरात जेव्हा पूजा होईल, दिवाळी साजरी केली जाईल किंवा गणपती बसविला जाऊन १० दिवस पूजाअर्चा, आरती होईल तेव्हा हे संस्कार आपोआपच त्यांच्यावर होतील. त्यांचे मन पक्षपाती होऊ नये म्हणून त्यांना याच्यात सहभागी न करता हे उत्सव साजरे करता येतील किंवा ते सज्ञान होईपर्यंत घरात उत्सव, पूजाअर्चा टाळायची का जेणेकरून अज्ञान अवस्थेत त्यांच्यावर हिंदू संस्कार होणार नाहीत? असे करणे शक्य नाही. त्यामुळे कितीही टाळले तरी कुटुंबाच्या धर्माचे संस्कार मुलांच्या मनावर कळतनकळत होणारच.
>>> स्वतंत्र विचार करण्याचे वय व स्वातंत्र्य आल्यानंतर सुंता/बाप्तिस्मा/मौंज इत्यादि कराची इच्छा आहे काय असे विचारल्यास, एक मोठी टक्केवारी कोणताच धर्म नको असे म्हणणारीच आढळळेल, व तशीच वागणूक बहुतेकांची असते,
या निष्कर्षाला काही आधार्/पुरावा/आकडेवारी आहे का? तसेच धर्मनिहाय याची आकडेवारी आहे का? का तुमचा स्वतःचा अंदाज आहे?
>>> फक्त तोपर्यंत धार्मिक बाळकडू खोलवर भिनलेले असल्याने 'आमच्यात हे असेच करतात' (शिडीवर चढणार्या माकडांची गोष्टःसंदर्भ) या बेसिसवर 'धर्म' सोडायची वा बदलायची इच्छा/गरज वाटत नाही.
एखादी लाभाची, चांगली, नवीन गोष्ट मिळणार असेल तरच जुन्या गोष्टींचा त्याग केला जातो. तसेच धर्मबदलाच्या बाबतीतही आहे.
>>> रोजच्या जगण्यात अशा कृत्रीम धर्माची गरजच नसल्याने,
तुम्हाला अशी गरज नसली तरी इतरांना अशी गरज असू शकते आणि आहे.
>>> रोटिबेटी व्यवहारात कुठेतरी त्याची गरज लागते,
एखादे झाड उपटून दुसरीकडे लावताना झाड आधी होते तसेच वातावरण, माती इ. गोष्टी जितक्या जास्त प्रमाणात असतील तितकी ते झाड नवीन ठिकाणी रूजण्याची जास्त शक्यता असते. लग्न होऊन मुलगी नवीन घरी जाताना नवीन घर हे आईवडीलांच्या घराशी, संस्काराशी मिळतेजुळते असल्यास मुलगी तिथे रमण्याची शक्यता जास्त असते. पूर्णपणे नवीन वातावरण असलेल्या घरात ही शक्यता कमी असते. त्यामुळे समान धर्मात रोटीबेटी व्यवहार प्रचलित झाले असावेत.
>>> किंवा सांघिक उपासना सक्तीची असलेल्या धर्मांच्या आचरणातून, वा अशा धर्मांबद्दलच्या हेव्यादाव्यातून धर्माच्याच नावाखाली पेटवलेल्या तथाकथित 'भावनां'साठी त्याची गरज लागते.
तुम्ही फारच जनरालायझेशन केलेले आहे.
>>> यातून चटके बसलेला विरळाच कुणी धर्मांतर करून दुसर्या धर्मात जातो, असे माझे निरिक्षण आहे. आमिष वगैरे दाखवून लोक देशांतरही करतात. उदा. अम्रिकेचे नागरिकत्व स्वीकारून भारतभूला टाटा करणे हे हिंदु धर्म सोडून औषधोपचार्/अन्नासाठी ख्रिश्चन होणार्या आदिवाश्यापेक्षा बेसिकली फार वेगळे आहे, असे मला तरी दिसत नाही.
मला तसे वाटत नाही. पण तुमच्या मताबद्दल आदर आहे.
>>> विचारपूर्वक जर केले जात असेल. तर ते धर्मांतर = धर्माला अंतर देऊन निधर्मी वागणूकीकडे वळणारेच मला तरी सर्वच धर्मांत दिसतात. जितकी शैक्षणिक वा सांस्कृतिक प्रगल्भता जास्त, तितके हे प्रमाण वाढलेले दिसते.
असेल कदाचित
>>> आपण रोजच्या दिनचर्येत 'धर्म' किती व कसा पाळतो, तथाकथित 'धर्मा'पासून किती दूर असतो, हा विचार केला तरी आपले धर्मांतर किती व का झाले, हे लक्षात येईल.
कर्मकांडे कमी झाली म्हणजे धर्मांतर झाले असे नव्हे.
30 Dec 2013 - 10:37 pm | आनंदी गोपाळ
>>
रोजच्या जगण्यात अशा कृत्रीम धर्माची गरजच नसल्याने, रोटिबेटी व्यवहारात कुठेतरी त्याची गरज लागते, किंवा सांघिक उपासना सक्तीची असलेल्या धर्मांच्या आचरणातून, वा अशा धर्मांबद्दलच्या हेव्यादाव्यातून धर्माच्याच नावाखाली पेटवलेल्या तथाकथित 'भावनां'साठी त्याची गरज लागते.>>
हे ५ वेळा एडिट करून लिहिले आहे, मास्तुरे!
हातभर प्रतिसाद आला त्याबद्दल धन्यवाद. ह्यानंतर तुम्हास इथे लिहीनच, असे नाही.
तुमचा तो हातभर प्रतिसाद फक्त डोळ्याखालून घातलाय, नीट वाचला नाहिये. तरीही जाताजाता,
हे: "वा अशा धर्मांबद्दलच्या हेव्यादाव्यातून धर्माच्याच नावाखाली पेटवलेल्या तथाकथित 'भावनां'साठी त्याची गरज लागते." बोल्ड करून पुनः लिहितो.
"हेव्यादाव्यातून" "पेटविण्याचा" "तुमचा" अजेंडा आहे, इतकेच म्हणतो. :)
बाकी,
"संस्कार" "केले जातात"
त्या बाळाला "करून घ्यायची" इच्छा नसते. इट्स अ चाईल्ड यू नो?
31 Dec 2013 - 4:44 pm | श्रीगुरुजी
>>> हे ५ वेळा एडिट करून लिहिले आहे
५ वेळा एडीट करा नाहीतर ५० वेळा करा. काय फरक पडतो?
>>> हातभर प्रतिसाद आला त्याबद्दल धन्यवाद. ह्यानंतर तुम्हास इथे लिहीनच, असे नाही.
तुम्ही ४ हात लांब विवेचन केल्यावर निदान हातभर प्रतिसाद तरी येणारच. नै का?
>>> तुमचा तो हातभर प्रतिसाद फक्त डोळ्याखालून घातलाय, नीट वाचला नाहिये.
बर
>>> तरीही जाताजाता,हे: "वा अशा धर्मांबद्दलच्या हेव्यादाव्यातून धर्माच्याच नावाखाली पेटवलेल्या तथाकथित 'भावनां'साठी त्याची गरज लागते." बोल्ड करून पुनः लिहितो.
बोल्ड, इटालिक, अंडरलाईन असे काहीही करून लिहिले तरी काय फरक पडतो?
>>> "हेव्यादाव्यातून" "पेटविण्याचा" "तुमचा" अजेंडा आहे, इतकेच म्हणतो.
बापरे. माझ्या प्रतिसादातून तुम्हाला माझा अजेंडा पण कळला. हहपुवा.
>>> बाकी,"संस्कार" "केले जातात". त्या बाळाला "करून घ्यायची" इच्छा नसते. इट्स अ चाईल्ड यू नो?
बाळाला संस्कार नको असतील तर त्याने नाही म्हणावं. नाही का?
31 Dec 2013 - 5:46 pm | ग्रेटथिन्कर
धर्माच्या अफूची गोळी खाणार्यांचा कोणताच अजेंडा नसतो, हिंदू धर्म व्यापक सर्वसमावेशक व्हावा यासाठी चार्वाकापासून अनेकांनी अनेक चांगले अजेंडे राबवले, असे चांगले अजेंडे लोकांसमोर आले कि अशा अजेंड्यांना गाढवी विरोध करायचा एवढाच या धर्मवेड्यांचा हेतू असतो. यांचे धर्मावर गाढवी प्रेम असे.
(निधर्मी असलेला- ग्रेटनिधर्मी)
2 Jan 2014 - 9:55 am | आनंदी गोपाळ
बाकीच्या बालीश टंकनाला उत्तर देऊन तुमच्या पातळीवर गटारी कुस्ती खेळता येईल.
उदा.
>>बोल्ड, इटालिक, अंडरलाईन असे काहीही करून लिहिले तरी काय फरक पडतो?
<<
उत्तर: त्यामुळे लिहिलेले जरा 'आत' शिरेल असे वाटते.
पण तुमच्या पातळीवर उतरता येत नाही, मास्तुरे. सबब फाटा.
फक्त, "बाळाला संस्कार नको असतील तर त्याने नाही म्हणावं. नाही का?" या वाक्याचं उत्तर देण्यासाठी हे लिहितो आहे. ते वर शीर्षकात दिले आहे, पहा. :)
शब्दशः 'रेप' कदाचित चुकीचा दृष्टांत होईल, पण जे काय चाल्लंय ते समजतच नाही अशा वयात जर ते केलं, तर त्याला बलात्कार हाच शब्द योग्य होईल. उदा. बाळाला कपडे घातलेले नको असतात. चप्पल नको असते. काढून फेकतात. त्यावर कपडे घालून फिरण्याचे "संस्कार" आपणच "ज ब र द स्ती च" करतो.
रच्याकने, ते इटॅलिक केलेले व न केलेले याबद्दल मुद्द्यास धरून बोलणे सोडून विदा कसला मागताय :))
2 Jan 2014 - 1:04 pm | श्रीगुरुजी
>>> बाकीच्या बालीश टंकनाला उत्तर देऊन तुमच्या पातळीवर गटारी कुस्ती खेळता येईल.
तुम्ही आधीच बिनबुडाचे बाळबोध प्रतिसाद खरडून गटारात उतरला आहात. मला तिथे यायची इच्छा नाही.
>>> >>बोल्ड, इटालिक, अंडरलाईन असे काहीही करून लिहिले तरी काय फरक पडतो?
उत्तर: त्यामुळे लिहिलेले जरा 'आत' शिरेल असे वाटते.
पुन्हा तेच. आपण काहीतरी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" अशा स्वरूपाची वाक्ये लिहून ती ५० वेळा एडीट करून बोल्ड, इटालिक वगैरे करत आहात. पण मुळातच हे खरडलेलं बाळबोध स्वरूपाचं आहे. त्यामुळे बोल्ड वगैरे करून आणि ५० वेळा एडीट करून काहीही फरक पडत नाही.
>>> पण तुमच्या पातळीवर उतरता येत नाही, मास्तुरे. सबब फाटा.
मी सुद्धा तुम्ही उतरला आहात तितक्या खालच्या पातळीवर उतरू शकत नाही. सबब टाटा.
>>> शब्दशः 'रेप' कदाचित चुकीचा दृष्टांत होईल, पण जे काय चाल्लंय ते समजतच नाही अशा वयात जर ते केलं, तर त्याला बलात्कार हाच शब्द योग्य होईल. उदा. बाळाला कपडे घातलेले नको असतात. चप्पल नको असते. काढून फेकतात. त्यावर कपडे घालून फिरण्याचे "संस्कार" आपणच "ज ब र द स्ती च" करतो.
आपण काय खरडलं आहे ते तुम्हाला तरी समजत आहे का? काहीतरी अर्थहीन बाळबोध वाक्ये ५० वेळा एडिट करून खरडण्यापेक्षा वरील वाक्ये ५० वेळा वाचून पहा आणि त्यातून काही अर्थबोध होतोय का ते बघा.
>>> रच्याकने, ते इटॅलिक केलेले व न केलेले याबद्दल मुद्द्यास धरून बोलणे सोडून विदा कसला मागताय
कसलं इटालिक आणि कसलं काय? आपण काहीतरी जबरदस्त लेखन केलेलं आहे हा तुमचा गोड गैरसमज आहे. प्रत्यक्षात तुम्ही जे काही लिहिलं आहे, ते अर्थहीन व तर्कहीन बाळबोध आहे.
असो. जे काही करत आहात त्यात तुमचा दोष नाही.
2 Jan 2014 - 1:09 pm | श्रीगुरुजी
"पुन्हा तेच. आपण काहीतरी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" अशा स्वरूपाची वाक्ये लिहून ती ५० वेळा एडीट करून बोल्ड, इटालिक वगैरे करत आहात. पण मुळातच हे खरडलेलं बाळबोध स्वरूपाचं आहे. त्यामुळे बोल्ड वगैरे करून आणि ५० वेळा एडीट करून काहीही फरक पडत नाही."
आधीच्या प्रतिसादातील वरील वाक्य खालीलप्रमाणे वाचावे.
"पुन्हा तेच. आपण काहीतरी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" किंवा "बचेंगे तो और भी लढेंगे" अशा स्वरूपाची काहीतरी जबरदस्त वाक्ये लिहिली आहेत असा तुमचा गैरसमज झालेला आहे व त्यामुळे ती वाक्ये खरडून आणि ५० वेळा एडीट करून बोल्ड, इटालिक वगैरे करत आहात. पण मुळातच हे खरडलेलं अत्यंत बाळबोध स्वरूपाचं आहे. त्यामुळे बोल्ड वगैरे करून आणि ५० वेळा एडीट करून काहीही फरक पडत नाही.
2 Jan 2014 - 2:23 pm | ग्रेटथिन्कर
गुर्जी ते शेंगा आणि टरफले राह्यलं की... आणि ती एकनाथांचि आणि यवनाची गोष्ट कधि लिवणार?
2 Jan 2014 - 2:43 pm | श्रीगुरुजी
>>> गुर्जी ते शेंगा आणि टरफले राह्यलं की... आणि ती एकनाथांचि आणि यवनाची गोष्ट कधि लिवणार?
ते तुमच्यासाठी ठेवलंय. लिहिल्यावर बोल्ड आणि इटालिक करायला विसरू नका. आणि प्रकाशित करायच्या आधी कमीतकमी ५० वेळा एडीट पण करा, म्हणजे त्याच्यात जरा वजन येईल.
2 Jan 2014 - 4:40 pm | बॅटमॅन
ते नथूगुग्गुळवटी विसरलात काय हो सांगायला =))
3 Jan 2014 - 12:45 pm | श्रीगुरुजी
>>> ते नथूगुग्गुळवटी विसरलात काय हो सांगायला
ते वेगळं सांगायची गरज नाही. विषय कोणताही असला (उदा. विश्वचषक फूटबॉल, जपानमधील भूकंप इ.) तरी ते नथूग्ग्गुळवटी आणतातच.
3 Jan 2014 - 3:17 pm | ग्रेटथिन्कर
अहो नथुगुग्गुळवटी ,गोपाळारीष्ट ही औषधे खास हिंदुत्ववाद्यांसाठी तयार केली आहेत. आम आदमी वगैरेंची सरशी पाहून पोटात दुखल्यास रोज रात्री झोपताना घ्यायचे ते चुर्ण आहे..
3 Jan 2014 - 12:07 am | आनंदी गोपाळ
कर्रेक्ट!
दोष माझा नव्हे, तुमचा आहे, हे खरेच समजले की काय तुम्हाला? :o
एकंदरितच कुठे मध्यमवयिन स्त्री-पुरुष समाजधुरिणांनी समाजाच्या चलनवलनाबद्दल, त्याच्या नियमांबद्दल उर्फ धर्माबद्दल चर्चा केली, तर उग्गं 'हिंदू खत्रेमे' करत ओरडा का घालायलात तुम्ही??
3 Jan 2014 - 12:42 pm | श्रीगुरुजी
>>>>>>असो. जे काही करत आहात त्यात तुमचा दोष नाही.
>>> कर्रेक्ट!
दोष माझा नव्हे, तुमचा आहे, हे खरेच समजले की काय तुम्हाला? :o
"तुम्ही जे करत आहात यात तुमचा दोष नाही" या वाक्यातील उपरोध तुम्हाला कळेल असे वाटले होते. पण तुम्हाला ते समजलेले दिसत नाही. असो. त्यात तुमचा दोष नाही.
>>> एकंदरितच कुठे मध्यमवयिन स्त्री-पुरुष समाजधुरिणांनी समाजाच्या चलनवलनाबद्दल, त्याच्या नियमांबद्दल उर्फ धर्माबद्दल चर्चा केली, तर उग्गं 'हिंदू खत्रेमे' करत ओरडा का घालायलात तुम्ही??
मी कोणत्या प्रतिसादात "हिंदू खत्रेमे" असे ओरडलो ते जरा दाखवाल का?
"बाळाला कपडे घालणे हा त्याच्यावर केलेला बलात्कार आहे" अशा अर्थाची अत्यंत हास्यास्पद विधाने तुम्ही केलीत. तसं पाहिलं तर बाळाला लस असलेलं इंजेक्शनही टोचून घ्यायचं नसतं. त्याचे आईवडील त्याला रोगप्रतिबंधक लस देतात हा त्याच्यावर केलेला बलात्कारच नाही का? तुमच्या अत्यंत अतर्क्य तर्कानुसार बाळ सज्ञान झाल्यावरच आपल्याला लस हवी का नाही हे त्याने ठरवायला हवे, नाही का? लहान मुलांना शाळेत पण जायचं नसतं, अभ्यासही करायचा नसतो. जरा विचार करा तुमच्या पालकांनी तुमच्यावर शिक्षणाची बळजबरी केली नसती (तुमच्या भाषेत शाळेत बळजबरीने घालण्याचा बलात्कार केला नसता), तर तुम्ही आज इथे येऊन खरडत बसला असता का?
एनीवे, चालू द्यात. जे घडतंय त्यात तुमचा दोष नाही.
3 Jan 2014 - 3:24 pm | ग्रेटथिन्कर
श्रीगुरुजी आपण वैयक्तीत पातळी उतरत आहात ...असो ,यात दोष तुमचा नाही माझाच आहे... मीच तसं करायला नको होतं (उपरोध समजला ना!)
2 Jan 2014 - 2:37 pm | बाळकराम
कुठे लक्ष देताय यांच्याकडे? जाने दो पियेला ---आपलं, " अर्धी चड्डीवाला है! : कुणीतरी कसलं तरी "बौद्धिक" घेतल्याशिवाय यांच्या डोक्यात कधी शिरत नाही, इतका केविलवाणा प्रकार आहे हा, कुठे तुम्ही यांच्यापुढे गीता-बिता वाचत बसताय?
30 Dec 2013 - 10:41 pm | आनंदी गोपाळ
<<
अॅबसोल्यूट बिनडोक वाक्य आहे. :)
30 Dec 2013 - 10:42 pm | आनंदी गोपाळ
की इट्यालिक्स बद्दल वाद घालायचाय? :P
31 Dec 2013 - 4:54 pm | श्रीगुरुजी
"अॅबसोल्यूट बिनडोक वाक्य आहे. "
मागचे पुढचे संदर्भ न वाचता व न समजता मधलेच एखादे वाक्य उचलले की असेच वाटायला लागते. त्यामुळेच "स्वतंत्र विचार करण्याचे वय व स्वातंत्र्य आल्यानंतर सुंता/बाप्तिस्मा/मौंज इत्यादि कराची इच्छा आहे काय असे विचारल्यास, एक मोठी टक्केवारी कोणताच धर्म नको असे म्हणणारीच आढळळेल" अशासारखी बिनबुडाची हास्यास्पद विधाने खरडली जातात.
असो. यात तुमचा दोष नाही.
31 Dec 2013 - 5:37 pm | बॅटमॅन
यात बिनबुडाचे काय ते कळाले नाही. अन अशी लोकं पाहिलीत तस्मात हे बिनबुडाचं नाही हेही ठौक आहे.
31 Dec 2013 - 8:59 pm | श्रीगुरुजी
>>> यात बिनबुडाचे काय ते कळाले नाही. अन अशी लोकं पाहिलीत तस्मात हे बिनबुडाचं नाही हेही ठौक आहे.
यात मोठी टक्केवारी म्हणजे किती टक्के जनता असे म्हणते? एखादे डॉ. लागू किंवा डॉ. दाभोळकर असे म्हणतात म्हणजे मोठी टक्केवारी होते का? असे काही सर्वेक्षण झाले आहे का? याच्या बाबतीत काही पुरावे/आधार/आकडेवारी आहे का? आकडेवारी असल्यास धर्मनिहाय आकडेवारी आहे का?
पुरावे/आकडेवारी उपलब्ध नसेल तर हे विधान बिनबुडाचे का म्हणता येणार नाही?
31 Dec 2013 - 9:44 pm | ग्रेटथिन्कर
वाढीच्या काळात जेव्हा मेंदू hard wired होत असतो, तेव्हा असल्या तकलादू गोष्टींपासून मुलांना लांब ठेवले पाहीजे.
1 Jan 2014 - 12:11 am | बॅटमॅन
इथे पहा. ३ टक्के भारतीय पक्के नास्तिक असल्याचे यात म्हटले आहे.
आणि तसेही नास्तिकांचा कसला आलाय धर्म?
3 Jan 2014 - 1:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आमच्या निमसरकारी शाळेत धर्म लादायचे बुवा! मुलगी म्हणून जन्माला आल्याने नशीबाने ते मुंज वगैरे भैताडं घरून गळ्यात पडली नाहीत. पण मग बांगड्या घाला, टिकली लावा वगैरे जबरदस्ती शाळेकडून होत असे, धर्माच्या नावाखालीच. (घरातल्या माफक निधर्मीपणावर शाळेत बोळा फिरवला गेलाच.) शिवाय प्रार्थना असायचीच रोज. ती पण हिंदू देवांची. सक्तीने. प्राथमिक शाळेत गीता, गीताई, रामरक्षा, मारुतीस्तोत्र वगैरे हिंदू लोकांच्या गोष्टी लादल्या गेल्याच ... काहीही समजत नसताना.
माझा एक मित्र (दुसऱ्या निमसरकारी शाळेत होता) शाळकरी वयातच नास्तिक बनला. त्याने हिंदू देवाची प्रार्थना म्हणायला नकार दिला तर प्रार्थना सुरू असताना, भिंतीकडे तोंड करून उभं रहाण्याची शिक्षा हिंदू शिक्षकांनी त्याला दिली होती. तरी बरं, हा मुंजवाल्या गटातला नाही हो!
आणि हे सगळं कॉंग्रेसच्या राज्यात घडलेलं.
शिवाय गणपती, दिवाळी, संकष्ट्या, वटपौर्णिमा, रामनवमी, गोकुळाष्टमी वगैरे प्रकारही घराघरांतून होताना दिसतात. हे हिंदू संस्कार नाहीत असा दावा आहे का काय तुमचा? अगदी रामचंद्र गुहांसारखे लोक स्वतःला सांस्कृतिक हिंदू म्हणवतात ते कशामुळे असावं?
29 Dec 2013 - 5:32 pm | जेपी
आनंदी गोपाळ यांचा प्रतिसाद आवडला .
29 Dec 2013 - 6:40 pm | जेपी
पुन्यांदा माझ्याकडुन एका धाग्याचे शतक
30 Dec 2013 - 11:25 pm | चिन्मय खंडागळे
ह्या धाग्यात 'धर्मांतर' ऐवजी 'लिंगबदल' असा बदल करून एक छानशी जिलबी पाडता येईल, नाही?
कोण येतंय पुढे?
31 Dec 2013 - 12:34 am | खटपट्या
*lol* *stop*
31 Dec 2013 - 8:43 pm | प्यारे१
___/\___
=))
2 Jan 2014 - 11:39 am | मारकुटे
मी हाच आणि असाच प्रतिसाद दिला होता तो ताबडतोब उडाला. =))
चिन्मय साहेब मोठ्या वर्तुळातले दिसताहेत... मज्जा आहे ब्वा ! ;)
3 Jan 2014 - 2:41 am | चिन्मय खंडागळे
त्याचं कारण मी प्रीमियम मेंबरशिप घेतली आहे म्हणून.
तुम्ही फ्री मेंबरशिप घेतली असणार ;)
2 Jan 2014 - 5:50 pm | सचीन
खरच चांगलीच जिलेबी पाडता येईल. पण ती तुम्हीच पाडा तुम्हीच लिंगबदल ह्याबद्दल चांगले लिहू शकाल.
31 Dec 2013 - 9:06 pm | भ ट क्या खे ड वा ला
अफूची पहिली गोळी संपली कि मग काय चघळायचे?
31 Dec 2013 - 9:56 pm | प्यारे१
संप्रदाय म्हणजे अफूची गोळी.
धर्म म्हणजे त्या त्या गोष्टीचे मुलभूत गुण.
उदा: अग्नीचा धर्म उष्णता नि प्रकाश, पाणी वाहते नि थंड, माती- वजन इ.इ.
(धर्म हे चुकीचं नाव पडलंय. आता म्हणूया तेच्च पण ते चुकीचं आहे.)
तर पहिली गोळी संपण्यापूर्वीच , पहिल्या गोळीचा नीट अनुभव न घेता, कदाचित नुसतीच टेस्ट घेऊन झालेली अस्ताना, नवीन गोळी आकर्षक वेष्टनात, साखरेचा लेप लावून, सुरुवातीला गोड वाटेल अशा प्रकारे अशा माध्यमातून नि लोकांमार्फत दिली जाते की आधीची गोळी दिसत नाही, दिसली तरी फेकावीशी वाटते, दुसर्यानं घेतलेली असता त्या व्यक्तीला नाकारलं जातं वगैरे