भारताचे कायदे विचीत्र आहेत इथे समानतेच्या मोठ्या गप्पा मारल्या जातात परंतु प्रत्यक्षात कायदाच समान हक्क देत नाही. या संबधीची एक सर्वात खटकणारी बाब म्हणजे हिंदु पुरुष असेल व त्याची एका पेक्षा अधिक स्त्रीयांशी विवाह करण्याची आकांक्षा/ क्षमता असेल आणि संबंधित स्त्रीयांची ही आनंदाने या विवाहाला संमती/तयारी असेल तरी एका हिंदु पुरुषाला भारताचा कायदा द्विभार्या प्रतिबंधन घालुन हा हक्क नाकारतो. आणि त्याच वेळी इतर धर्मीयांस ही परवानगी देतो. यात कसली आलीय समानता? असा प्रतिबंध नेमका कोणत्या भुमिकेतुन हिंदु प्रुरुषांवर लादण्यात आलेला आहे याची माहीती नाही. म्हणजे हिंदु पुरुषांना ही एकपत्नीव्रता ची जाचक अट का कायद्यात घातली यामागे हिंदुंची कोणती परंपरा गृहीत धरण्यात आलेली होती याची मला माहीती नाही( जाणुन घेण्याची आकांक्षा आहे) कारण अपवादात्मक उदाहरणे सोडली तर बहुपत्नीत्व हे हिंदु परंपरेचे एक महत्वाचे लक्षण आहे. एका एकपत्नीव्रती महापुरुषाच्या विरोधात शंभर बहुपत्नीव्रती महापुरुषांची उदाहरणे देता येतील,मग हा कायदा बनवितांना कोणती मुळ परंपरा गृहीत धरण्यात आली होती माहीत नाही.या कायद्याने हिंदु पुरुषांच्या एकापेक्षा अधिक विवाह करण्याच्या आणि संबधित विवाहास संमती असणारया स्त्रीयांच्या ही असा विवाह करण्याच्या मुलभुत मानवी हक्कांवर गदा येते यात शंका नाही.याने अनेक हिंदु पुरुष आणि स्त्रीया विवाहाच्या सहजीवनाच्या नैसर्गिक आनंदाला पारखे होतात.
आता असे विवाह करण्याची आकांक्षा असलेल्या हिंदु पुरुषांना कायद्यात तरतुद नसल्याने मग निष्कारण चुकीचे मार्ग अवलंबाबे लागतात. कायद्याच्या भीतीने त्यांना त्यांच्या नैसर्गिक प्रेमभावने वर बंधन घालावे लागते.अन्यथा निष्कारण मग धर्मांतराचा मार्ग अवलंबवावा लागतो. आजकाल तर केवळ विवाहसाठी जर कोणी धर्मांतर करीत असेल तर त्यालाही परवानगी असणार नाही असा काहीतरी कायदा अस्तित्वात आल्याची माहीती आहे.( कायद्याच ज्ञान नसल्याने कृपया जाणकार अधिक माहीती देतील अशी अपेक्षा आहे). म्हणजे हिंदु पुरुषांना आजपर्यंत जो एक मार्ग होता धर्मांतर करुन असा विवाह कायदेशीर करण्याचा( ज्यात धर्मांतराची अत्यंत चुकीची सक्ती होती तरीही तो त्याग प्रेमासाठी सहन करुन कीमान असा विवाह करण्याची संधी होती) आता ती ही काढुन टाकण्यात आलेली आहे. मग बहुपत्नीकांक्षी हिंदु पुरुषाने आता करावे तरी काय? हा जाचक कायदा बदलायलाच हवा व इतर धर्मीयांप्रमाणेच हिंदु पुरुषांनाही एकापेक्षा अधिक स्त्रीयांशी विवाह करण्याची परवानगी देउन सर्वाना समान हक्काची घटनेच्या तत्वाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली पाहीजे.
याचा सर्वात मोठा फ़ायदा म्हणजे मग संबधित दुसरया स्त्री ला व तिच्या संततीला ही मग व्यवस्थित कायद्याचे पुर्ण संरक्षण मिळते व समाजात मानाने वावरण्याची संधी मिळते. म्हणजे वरील बंधनामुळे चोरटे संबंध ठेवण्याकडे जो कल वाढतो व त्यामुळे कायदेशीर हक्कांसंबधित ज्या समस्या निर्माण होतात त्याही टाळता येउ शकतात.उदारणार्थ मग श्री. तिवारीं च्या पुत्राला जो संघर्ष करावा लागला तिवारींना स्वत: कायद्याच्या बंधनामुळे संबध लपविण्याची कसरत करावी लागली ते सर्व टाळता आले असते.
(डावीकडे रजथी जी उजवीकडे दयालु जी मध्ये करुणानिधी )
असे एका पुरुषाचे एकापेक्षा अधिक स्त्रीयांशी होणारे अनेक विवाह अत्यंत यशस्वी झाल्याची अनेक सुंदर उदाहरणे उपलब्ध आहेत. तामिळनाडु चे डीएमके पक्षाचे राजकारणी श्री करुणानिधी यांनी दोन स्त्रीयांशी विवाह केलेला आहे. त्यांच्या एका पत्नीचे नाव आहे दयालु( कीती समर्पक !) व दुसरीचे नाव आहे रजथी या दोन्ही वेगवेगळ्या घरांत राहतात व करुणानिधी परस्पर सामंजस्याने दोघींशी अल्टरनेट वेळा पाळुन दाम्पत्यजीवनाचा गाडा गेली अनेक वर्षे यशस्वीपणे हाकत आहेत यांना दोन्ही स्त्रीयापासुन अनेक मुले झालेली आहेत व सर्व भावंडे गुण्यागोविंदाने एकमेकांशी प्रेमाने मिळुन मिसळुन राहतात अजुन काय हवे?.
संबंधित लिंक्स
http://www.outlookindia.com/article.aspx?240630
http://en.wikipedia.org/wiki/Karunanidhi_family
दुसरे एक सुंदर उदाहरण म्हणजे दक्षीणेतील महान कुचीपुडी नर्तक श्री. राजा रेड्डी यांनी तर दोन सख्ख्या बहीणी राधा आणि कौशल्या यांच्याशी विवाह केलेला आहे. आणि तिनही जण मिळुन अत्यंत तालबद्ध, लयबद्ध असा दाम्पत्य जीवनाचा पदन्यास आजवर सांभाळत आहेत. यांच्या द्वीतीय विवाहाची गोष्ट अत्यंत रोमॅंटीक आहे. यांचा प्रथम विवाह राधे शी झाला कौशल्या राधे ची लहान बहीण त्यांच्या बरोबर च राहत होती तीही नृत्यांगना च आहे. तर एकदा सिंगापुरला राजा जींचा कार्यक्रम होता तेथे त्यांनी राजांना परफ़ॉर्म करतांना बघितले आणि बस कौशल्या त्यांच्या सौंदर्याने मोहीतच झाल्या आणि त्यांच्या प्रेमातच पडल्या, त्या नंतर बॅकस्टेज ला गेल्या आणि त्यांनी राजांना स्वताहुन विवाहाची मागणीच घातली. तेव्हा ती फ़ारच लहान होती दोघांत वयाचे मोठे अंतर होते. राजांनी सुरुवातील एक साधे आकर्षण असेल म्हणुन सोडुन दिले परंतु कौशल्या मात्र ठाम होती मग तीची ही आकांक्षा जेव्हा तिने राधे ला आपल्या मोठ्या बहीणीला सांगितली तेव्हा राधा ही तयार झाल्या मात्र एका सुंदर कलात्मक अटीवर ती म्हणजे मी राजांना तुझ्या बरोबर शेअर करायला तयार आहे मात्र स्टेजवर जेव्हा राजा परफ़ॉर्म करतील तेव्हा त्यांची संगिनी मी आणि केवळ मीच असेल. तु त्यांच्या बरोबर स्टेज वर कधीही एकत्र परफ़ॉर्म करायच नाहीस. आज राजां ही आपल्या सुंदर दाम्पत्य जीवनाचा गाडा अत्यंत यशस्वीपणे हाकत आहेत. आणि कौशल्यां नी ही आपले मोठ्या बहीणीला दिलेले वचन पुरेपुर पाळले. अजुन काय हवे ?
संबधित लिंक्स
http://blogs.hindustantimes.com/just-people/2009/04/14/about-raja-reddy-...
http://www.tribuneindia.com/1998/98dec27/sunday/view.htm
आणि म्हणुन च माझे असे म्हणणे आहे की असा जाचक कायदा जो हिंदुं पुरुषांना द्विभार्या प्रतिबंध करतो तो रद्द केला पाहीजे व अशा निरागस प्रेमी जिवांना सन्मानाने जगण्याचा हक्क दिला पाहीजे यातच खरया अर्थाने घटनेची समानतेच्या मुल्यांची अंमलबजावणी होईल असे माझे एक हिंदु पुरुष म्हणुन मत आहे.
आणि मी म्हणतो त्यात अतिशयोक्ती काहीच नाही आपल्याच महाराष्ट्र राज्यात अनेक वर्षांपर्यंत विदर्भ प्रातांत (महाराष्ट्राच्या इतर प्रांतात बंदी आल्यानंतर ही काही वर्षे तरी) हिंदु पुरुषाला द्विभार्या विवाह करण्यास कायद्याच्या कुठल्या तरी स्पेशल कलमानुसार बंदी नव्हती. दैनिक दिव्य मराठी त काही दिवसांपुर्वी आलेल्या पंडीत भिमसेन जोशींच्या वारसांत होत असलेल्या संपत्ती वरील कलहा संदर्भात ही बातमी होती( वारसांचे सुर बिघडले असे काहीतरी शीर्षक होते) त्या बातमीत हा उल्लेख मी वाचला. त्यात पंडीत भिमसेन जींच्या प्रथम पत्नी सुनंदाजी हयात असतांना पंडीतजींनी द्वितीय विवाह वत्सलाबाईंशी करण्यासाठी तेव्हाच्या विदर्भ प्रांतातील या कायद्यातील तरतुदीचा वापर केला होता तो दुसरा विवाह विदर्भात कायद्याने मान्य होता म्हणुन म्हणुन हा विवाह पंडीतजींनी विदर्भ या प्रांतात जाउन केला आणि त्याला कायदेशीर मान्यता घेतली.या तततुदीमुळे पंडीतजींवर धर्मांतराची वेळ आली नाही. पंडीतजींनी ही कायद्याचा कुशलतेने उपयोग करुन घेतला व स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले ते गानपंडीतच नव्हे तर कायदे पंडीत ही होते असे या घटनेवरुन दिसुन येते. तर भारत रत्न पंडीत भिमसेन जोशींचे ही उदाहरण आपल्याकडे आहे. यांनी ही दोन स्त्रीयांशी विवाह करुन दाम्पत्यजीवनाचा गाडा यशस्वीपणे हाकुन दाखविला, दोघींची जबाबदारी समर्थपणे पेलुन दाखविली आणखी काय हवे ?
संबधित लिंक्स
http://www.dnaindia.com/mumbai/report-living-in-the-shadow-of-bhimsen-jo...
http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-11-11/bangalore/4392854...
आणखी कीती उदाहरणे हवीत ? तर हा जुलुमी कायदा तत्काळ रद्द केला पाहीजे व हिंदु पुरुषांना एकापेक्षा अधिक विवाह करण्याची परवानगी दिली गेली पाहीजे या माझ्या मताची पुनुरावृत्ती मी करतो. याने दुसरा विवाह करण्यासाठी धर्मांतर करण्याचा मार्ग अवलंबवावा लागणार नाही( वरील उल्लेखाप्रमाणे तो ही मार्ग आता शिल्लक आहे की नाही शंकाच आहे परत एकदा जाणकारांच्या तोंडाकडे बघत आहे त्यांनी मार्गदर्शन करावे ) अथवा चोरटेपणाने असे संबंध ठेवण्याची पाळी ही येणार नाही. व संबधित स्त्री व संतति ला ही कायदेशीर मान्यता मिळुन समाजात सन्मानाने वावरता येईल. अर्थात वरील सर्व विवेचनात संबधित स्त्रीयां ची परवानगी संमती आहे असे गृहीत धरलेले आहे. यातील एकाही संबधित व्यक्त्तीची या विवाहाला मान्यता नसेल तर अर्थातच मग मात्र त्याला परवानगी नसावीच मी सर्वांची संमती ज्यात असते अशा आणि केवळ अशा विवाहांपुरतच या संबधातच ही मागणी करीत आहे. म्हणुन ही अत्यंत न्याय्य आणि मुलभुत हक्काची मागणी मी एक हिंदु पुरुष या नात्याने करीत आहे.
प्रतिक्रिया
26 Dec 2013 - 12:52 pm | बॅटमॅन
मियाबिबीची हर्कत नसेल तर काजीची देखील हर्कत नकोच.
पण असा कायदा करूनही किती विवाह होतील अशा प्रकारचे? सी द इकॉनॉमिक्स अँड सबसिक्वेंट फ्यामिली डायनॅमिक्स.
शिवाय याच धर्तीवर एका स्त्रीला अनेक पुरुषांशी लग्न करायचा हक्कदेखील असावा अशी मागणीही पुढे येईलच.
26 Dec 2013 - 2:59 pm | मारवा
एका स्त्री ला अनेक पुरुषांशी विवाह करायचा हक्क तर हवाच त्यात काहीही गैर नाही. पांचालीचे उदाहरण आहेच.शिवाय ब्रोकपा नावाची एक कम्युनिटी जी सर्वात प्युअर आर्यन मानली जाते. हा एक छोटा गट मुळ आर्यांपासुन हजारो वर्ष अगोदर काही कारणाने संपर्कातुन तुटलेला होता व वेगळे जीवन हा समुदाय जगत राहील. हा अॅन्थ्रोपॉलिजीस्टांच्या अनुसार शुद्धतम आर्य वंश मानला जातो. यां टोळीच्या चालीरीतींचा अभ्यास करण्यासाठी जगभरातुन संशोधक येथे येत असतात्.यांच्यामध्ये आर्यांच्या मुळ प्रथांचे चालीरीतीं आढळुन येतात. ( इतर जमातींशी वर्षानुवर्षे संपर्क न आल्याने मुळ परंपरा अबाधित चालु आहेत) यासाठी यांच्या अभ्यासातुन आर्यांचे पर्यायाने हिंदुंचे मुळ रीवाज चालीरीतींचा अर्थपुर्ण वेध घेता येतो. तर या जमातीत बहुपत्नीत्व आणि बहुपतित्व दोन्ही आढळुन येतात. अधिक नेमक बोलायच तर द्रौपदीज अधिक आढळुन येतात.
तर एका स्त्रीला ही अर्थातच अनेक विवाहांची परवानगी हवीच. पण यासाठी लेख/धागा त्या त्या स्त्रीयांनी च काढला पाहीजे ज्यांना या मागणीचे महत्व वाटते. एक पुरुष या नात्याने मी माझी बाजु मांडली. अशा मागणीला ही अर्थातच माझा पुर्ण पाठिंबा असेलच. पण त्यावरील धागा मीच काढावा ही अपेक्षा चुकीची आहे. ज्याने त्याने आपली बाजु मांडावी. मी कोणाकोणाची मांडु अगोदरच माझ्यावर असा आरोप होतोय की मला याच विषयांत रस आहे का म्हणुन.
26 Dec 2013 - 12:53 pm | मंदार दिलीप जोशी
रोचक. बरोबर आहे. असा प्रतिबंध नकोच.
26 Dec 2013 - 12:59 pm | मुक्त विहारि
प्रतिबंध नकोच.
26 Dec 2013 - 1:11 pm | मनिम्याऊ
भारतातील लिंग गुणोत्तर पाहता बरोब्बर याउलट कायद्याची गरज आहे असे आपणास वाटत नाही काय?
26 Dec 2013 - 1:16 pm | मंदार दिलीप जोशी
आयडिया शॉल्लिड आहे :P
26 Dec 2013 - 1:18 pm | सोत्रि
अशी मागणी आल्यास त्यात काय गैर आहे?
मलाही असेच वाटते की जर पुरुषांना असा हक्क असावा तर स्त्रियांना का नको?
- (एकपत्नीव्रता) सोकाजी
26 Dec 2013 - 1:19 pm | मंदार दिलीप जोशी
कदाचित अशा बाबतीत भांडणे/हिंसा होण्याची शक्यता अधिक असावी म्हणून नसेल. पण तसा हक्क स्त्रियांना हवाच.
26 Dec 2013 - 1:23 pm | पिलीयन रायडर
मुळात कायदा एका स्त्रीला अनेक पुरुषांशी लग्न करण्यापासुन रोखतो का? कधी ह्या कायद्याविषयी ऐकलं नाहीये..
जाणकार माहिती देतीलच..
(एकपतीव्रता) पिरा
26 Dec 2013 - 1:53 pm | बॅटमॅन
अर्थातच. गैर काहीच नाही. तशी मागणी आल्यास लेखकाचे मत काय असेल असा एक सुप्त प्रश्न त्यात दडलेला होता.
26 Dec 2013 - 1:24 pm | टवाळ कार्टा
चान चान
आजकाल मिपासुध्धा काहिवेळा डोके बाजुला ठेउन वाचावे लागते ;)
26 Dec 2013 - 1:26 pm | पिलीयन रायडर
आजकाल???
26 Dec 2013 - 8:30 pm | टवाळ कार्टा
=))
26 Dec 2013 - 8:41 pm | प्यारे१
काहिवेळा ??? ;)
3 Jan 2014 - 11:00 pm | पैसा
मिपासुध्धा??? :-/
26 Dec 2013 - 1:29 pm | जेपी
जेंडर रेशो बघता एक मिळायची मारमार :-)
26 Dec 2013 - 1:34 pm | कवितानागेश
रोचक धागा!!!!! नवर्याला देते वाचायला......
मी तर त्याला कधीपासून सांगतेय, अजून एक बायको आण लग्न करुन, माझ्या हाताखाली. मला एकटीला घर आवरणं आणि बाहेरची सगळी कामं सांभाळ्णं फार कठीण जातं.....
ऐकतच नाही माझं! उलट रडका चेहरा करतो!!!
आता कायदाच झाला तर फार बरं होईल. वाट बघतेय....
एकदा का मिपावर हा धागा अॅप्रूव्ह झाला की देशात कायदा व्हायला कितीसा वेळ? ;)
26 Dec 2013 - 2:05 pm | अजया
तुमच्यासारखा इस्त्रियांचा कैवारी कोणीच नाही बघा. मी पण मिपावर अप्रुव्ह झालं की नवर्याला सांगणार आहे,एखादी शोधुन ठेवायला. राजा रेड्डींच्या श्टोरीनी तर मला प्रेरणा मिळाली आहे. मी बाहेर नवर्याबरोबर नाचायला,मिरवायला जाणार आणि घरी गरम गरम ताट तयार ठेवुन दुसरीवाली वाट बघणार. घरचं बघा,बाहेरच बघा...किती दिवस मी एकटी करत बसणार सर्व. हा कायदा झालाच पायजे.
26 Dec 2013 - 3:59 pm | भावना कल्लोळ
माऊताई आणि अजया १००% सहमत, खरेच होऊ दे हा कायदा पास. मी तर गेले ५ वर्ष सांगुन सांगुन थकले बाई, हा कायदा आला तर फायदाच होईल.
26 Dec 2013 - 2:42 pm | मंदार दिलीप जोशी
आहो एक परवडेना हल्ली दुसरी कोण करतो? ;)
26 Dec 2013 - 2:55 pm | ग्रेटथिन्कर
लोकं आजकाल बायकोला गाडी समजतात... हल्ली परवडत नाही असे म्हणणे म्हणजे स्त्रीचे वस्तुकरण करण्यासारखे आहे. याचा मी निषेध करतो...
26 Dec 2013 - 3:04 pm | मंदार दिलीप जोशी
आहो तुमचा गैरसमज झाला आहे. बायको परवडेना असे नव्हे. तर एकीशी लग्न केल्यावर संसारावर होणारा खर्च परवडेना असा अर्थ घ्यावा. (इतरांनी तसाच घेतला आहे, तुम्हाला म्हणून स्पष्टीकरण देतोय ;) )
26 Dec 2013 - 1:40 pm | दिनेश सायगल
तुम्हाला अशाच विषयांचे फार आकर्शण आहे का हो? लेस्बियन जोडीचे लग्न, लेस्बियनांसंबंधीचा काथ्याकूट आणि आता हे द्विभार्या संबंधीचा धागा.
26 Dec 2013 - 1:41 pm | दिनेश सायगल
तुम्हाला अशाच विषयांचे फार आकर्शण आहे का हो? लेस्बियन जोडीचे लग्न, लेस्बियनांसंबंधीचा काथ्याकूट आणि आता हे द्विभार्या संबंधीचा धागा.
26 Dec 2013 - 1:44 pm | सोत्रि
तुम्हाला ती म्हण माहिती आहे का? 'कोणाला कशाचे अन....' ;)
- (सर्व 'विषया'सक्त) सोकाजी
26 Dec 2013 - 1:46 pm | दिनेश सायगल
:):)):
26 Dec 2013 - 1:54 pm | बॅटमॅन
समजा असलं तर त्याबद्दल टीकाटिप्पणी करायचा तुम्हाला छंद आहे काय?
26 Dec 2013 - 1:56 pm | दिनेश सायगल
छंद? एकदाच तर प्रश्न विचारलाय कि मी.
26 Dec 2013 - 2:01 pm | बॅटमॅन
तेच हो, एकदा नैतर दोनदा विचारण्याचा संबंध नै. असा खोचक प्रश्न विचारण्यामागचा हेतू विचारला इतकेच.
26 Dec 2013 - 2:04 pm | दिनेश सायगल
हेतू काय असणार?
पण प्रस्तुत धागाकर्त्याचे विशय स्त्री पुरुश, स्त्री स्त्री अशाच संबंधांकडे घुटमळताना दिसतात नेहमीच म्हणून. तुम्हाला का पुळका आला म्हणे इतका?
26 Dec 2013 - 2:08 pm | बॅटमॅन
विनाकारणी जजमेंटल शेर्यामागचा हेतू विचारला की पुळका काढला जाणे हे हेतू शुद्ध नसल्याचेच लक्षण आहे.
26 Dec 2013 - 2:11 pm | दिनेश सायगल
तुम्ही लगेच त्यांची बाजू घ्यायला आलात म्हणून विचारले. तुमचा तसा हेतू नसेल तर माझे विधान मी मागे घेतो.
26 Dec 2013 - 2:16 pm | बॅटमॅन
जजमेंटल टीका दिसली, ती अस्थानी वाटल्याने विरोध दिसला की लगेच प्रेफरन्शिअल वागणे दिसते असे वाटल्यास नाइलाज आहे. असो.
26 Dec 2013 - 2:23 pm | दिनेश सायगल
धन्यवाद.
माझाही या विशयावरील हा शेवटचा प्रतिसाद.
26 Dec 2013 - 2:06 pm | ग्रेटथिन्कर
या कायद्यामुळे भारतातले ८० टक्के संसार टिकून आहेत .
हा कायदा रद्द झाला तर अनैतिकता माजेल..
जर एखादीने दुसरा पती करायचे ठरवले तर' नवरोबा तुमी आणखि एक बायको आणा आणि मी दुसरा पती करुन अर्धा आठवडा तिकडे रहायला जाते 'असे प्रकार रोज कानावर पडतील .
एकदंर द्विभार्या ,द्विभ्रतार कायदे रद्द केले तर विवाहसंस्था म्हणजे 'वाईफ/हजबंड स्वॅपीँग क्लब 'होईल ...
26 Dec 2013 - 2:20 pm | मृत्युन्जय
निर्बुद्ध प्रतिसाद.
26 Dec 2013 - 3:00 pm | ग्रेटथिन्कर
यात निर्बुद्ध काय आहे?
4 Jan 2014 - 2:03 pm | देवि
अत्यन्त समर्पक प्रतिसाद..
4 Jan 2014 - 2:05 pm | देवि
अत्यत समर्पक प्रतिसाद
26 Dec 2013 - 2:17 pm | देव मासा
कायद्या सोबत पगार वाढ पण झालिच पहिजे.दिवाळी सोबत होळीचा पण बोनस झाला पहीजे..
*kiss3* *KISSING*
26 Dec 2013 - 2:18 pm | प्रभाकर पेठकर
वरील कायदे झाले तर एकत्र कुटुंब पद्धतीत एका घरात किती माणसे असतील?
एका पुरुषाच्या दोन बायका, त्या दोन बायकांचे दोन-दोन नवरे, त्या दुसर्या नवर्यांच्या पुन्हा दोन-दोन बायका त्या दोन्ही बायकांचे पुन्हा.......बापरे हे प्रकरण तर पसरतच चाललय.
त्या ह्या प्रत्येक बाईची प्रत्येक नवर्यापासून दोन-दोन मुले म्हणजे कमीत कमी ३०-४० मुले. त्यांचे प्रत्येकी (किमान) १५ लंगोट, १५ झबली-टोपडी, ३०-४० दुधाच्या बाटल्या, ३०-४० औषधाच्या बाटल्या, प्रत्येक बाटलीला ३-३ बुचं, सहाण, रक्तचंदन, साधं चंदन, रुईची पानं, घुट्या, चाटणं, ग्राईप वॉटरच्या बाटल्या, डोंगरे बालामृत अबबबबबबबब!
आणि ही सगळी कार्टी रात्री बेरात्री ठ्यां करून रडून आख्खं घर (वन बेडरुमचा फ्लॅट) डोक्यावर घेणार, ते ऐकून शेजारच्या फ्लॅट ची पोट्टी-सोट्टी जागी होणार, सुरात सुर मिसळणार करता करता आख्ख्या इमारतीतील चार-पाचशे पोरं रात्रीबेरात्री भोकाड पसरणार...नको....नको....नको....विचार मनांत येतील आणि पुन्हा एकदा एक नवरा आणि त्याला एकच बायको त्यांना २ मुलं हिच पद्धत रुढ होणार............... तर मग आत्ता काय वाईट आहे???????
26 Dec 2013 - 2:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
अहो येवढी माणसं असणार तर त्यात कमावणारी माणसंही तेवढ्याच संख्येनं नाही का वाढणार? व्यवसाय काढला तर नोकर ठेवायलाच नको... सगळे घरचेच कामाला. म्हणजे सगळं उत्पन्न घरातच, सिए पण घरातलाच, वकील पण घरातलाच... खर्च शुन्य ! मग घर पण कमीतकमी १५-२० खोल्यांचा राजवाडा असणार नाही का? परत शेजार्याची काय टाप आवाज काढेल २५-३० जवानांची फौज पाहून, म्हणजे जास्त सुरक्षितता ! अजून एक मोठ्ठा राजकीय फायदा म्हणजे गठ्ठा मतांमुळे राजकारणीही खिशात ठेवता येतील... किंबहुना स्वतःच राजकारणी बनता येईल नै का? :)
26 Dec 2013 - 3:11 pm | मुक्त विहारि
हा सुर्य आणि हा जयद्रथ...
http://www.dailymail.co.uk/news/article-1358654/The-worlds-biggest-famil...
26 Dec 2013 - 3:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
हायला ! बघा आता. आम्ही नुसत्या थियर्या मांडत बसलो... ह्यो ग्रेट मानूस प्रॅक्टिकलबी करून मोकळा झाला :)
26 Dec 2013 - 4:00 pm | हाडक्या
हा हा हा.. येकच नम्बर... पण मग शेजार्यांची त्याहून मोठ्ठी फौज नसणार कशावरून ? ;)
26 Dec 2013 - 3:55 pm | llपुण्याचे पेशवेll
ओ एक्काशेठ, शेजार्याची पण फौज नसेल काय मग? मग काय पुन्हा एकदा महाभारत का?
26 Dec 2013 - 4:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
अहो पुपे, तो मुविंचा वरचा दुवा बघा... फौज उभी करायची तर काय अशीतशी करायची काय? एकदम सम्राटाची फौज उभी करायची. काय बिशाद शेजार्याची... तो आपला मांडलिक झाला पाहिजे, काय? सुन त्सु म्हणून गेलाय: "लढाईविना मिळवलेला विजय हाच सर्वश्रेष्ठ विजय !"
26 Dec 2013 - 3:30 pm | विजुभाऊ
अहो पेठकर काका. फारच पुढचा विचार करताय तुम्ही.
हा विचार करा की स्वतन्त्र फ्लॅट घ्यायचा खर्च वाचला. दुसर्या कोणाच्या फ्लॅट मध्ये आपसूकच जागा मिळेल.
असो. हा कायदा आला तर वारसा हक्क कायद्याचे काय होइल.
( माझा मुलगा आणि तुझा मुलगा मिळून आपल्या मुलाला मारताहेत.... )
26 Dec 2013 - 3:37 pm | विजुभाऊ
अहो पेठकर काका. फारच पुढचा विचार करताय तुम्ही.
हा विचार करा की स्वतन्त्र फ्लॅट घ्यायचा खर्च वाचला. दुसर्या कोणाच्या फ्लॅट मध्ये आपसूकच जागा मिळेल.
असो. हा कायदा आला तर वारसा हक्क कायद्याचे काय होइल.
( माझा मुलगा आणि तुझा मुलगा मिळून आपल्या मुलाला मारताहेत.... )
26 Dec 2013 - 2:28 pm | सूड
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
26 Dec 2013 - 2:31 pm | प्रसाद गोडबोले
आमच्या मते >>>
मुळातच लग्न संस्था ही एक अत्यंत्य निर्बुध्द प्रकार आहे ... सहजीवनासाठी कायद्याचे वा धर्माचे बंध्अन कशाला ?
तस्मात , द्विभार्या वगैरे नाही तर ओपन रीलेशनशीप , लिव्ह इन ह्यांना आमचे समर्थन आहे !
अवांतर :ओशोचा मॅरेज अॅन्ड चिल्ड्रेन असा एक अत्यंत सुंदर प्रवचन व्हिडीयो युट्युब वर होता , आता दिसत नाहीये :(
26 Dec 2013 - 3:38 pm | मंदार दिलीप जोशी
गोडबोले तुम्ही ते प्रगोच का?
26 Dec 2013 - 5:18 pm | प्रसाद गोडबोले
मंदार दिलीप जोशी म्हणजे तुम्ही मंजो का काका का ठोंब्या का गप्पिष्ट ;) ?
26 Dec 2013 - 2:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
असा एकाच बाजूचा प्रतिबंध का काढावा ? या समानतेच्या काळात स्त्रीलाही अनेक पतींचा हक्क का असू नये?
कायद्याप्रमाणे सज्ञान असलेल्या स्त्री अथवा पुरुषाने परस्पर संमतीने लग्नाशिवाय कितीही संबंद्ध ठेवले तरी ते कायद्याने दंडनीय नाही किंवा त्याच्या परिणामांची काही कायदेशीर जबाबदारीही नाही. पण तोच व्यवहार कायदेशीरपणे करून त्याच्या परिणामांची (मुले, निधनोत्तर संपत्तीतला वाटा, इ) कायदेशीर जबाबदारी घ्यायला कायद्याची परवानगी नाही ! कायदा गाढव असतो असे म्हणतात ते काही उगाच नाही !
काही (केवळ) निरिक्षणे...
भारतात बहुपत्नीत्व आणि बहुपतीत्व पुराणकाळापासून आहे. त्याला पहिला विरोध आणि एकपत्नीव्रताचा महिमा (माझ्या माहितीप्रमाणे, नसल्यास जाणकारांनी दुरुस्ती करावी) वसाहतवादाच्या काळात ख्रिश्चन धर्माच्या प्रभावाखाली आणि बहुदा "तुमचा धर्म किती मागासलेला आहे आणि आमचा धर्म किती पुढारलेला आहे" हे अधोरेखीत करण्यासाठी आणि स्थानिकांना कमी लेखण्यासाठी वापरला गेला.
त्याकाळच्या भारतिय समाजसुधारकांनीही तो विचार उचलून धरला हे सर्व बरोबर होते किंवा नाही हा मुद्दा मी येथे मांडत नाही... पण खरी मेख पुढे आहे...
वसाहतकाळात आपले विचार / धर्मनियम गुलाम राष्ट्रांवर लादणार्या देशांच्या नागरिकांनी आजच्या घडीला एकपत्नित्वच काय पण एकूण लग्न्संस्थेचीही लक्तरे बनविली आहेत... तेथे सहजीवन (लिव्हींग टुगेदर) आणि सिव्हिल मॅरेज यांनाच केवळ चर्चमध्ये पाद्र्याच्या उपस्थितीत झालेल्या लग्नाएवढेच कायदेशीर महत्व आहे इतकेच नव्हे तर लग्नाच्या कोणत्याही जबाबदारीशिवाय (मूव्हिंग इन) एकत्र राहणे ही काही जगावेगळी गोष्ट राहिली नाही. या एका गोष्टिच्या बळावर काही देशांमध्ये स्थायिक व्हिसासाठी अर्जही करता येतो... आणि त्याचा गैरफायदा घेऊन व्हिसा मिळवलाही जातो ही काहि फार गुपित नाही.
भारतीय पुराणात असलेल्या (म्हणून बुरसटलेल्या) आणि पण आता पाश्चिमात्यमार्गांनी आलेल्या (म्हणून पुरोगामी) अश्या या गांधर्वविवाहाचे आता भारतातले पुनरागमनाचे व्यक्तिगत स्वातंत्र्याचे लक्षण म्हणून कायदेशीर स्वागत होत आहे !
26 Dec 2013 - 2:40 pm | बॅटमॅन
अंमळ जास्तच मार्मिक!!!!
26 Dec 2013 - 2:43 pm | मदनबाण
ह्म्म्म... सोचना पडेगा ! ;)
जाता जाता :- च्यामारी... इथे एक सँपल सांभाळताना भारी पडतं, त्यात जर दुसरीचा जुगाड केलात...तर तुमचे मॅनेजमेंट स्किल्स हुच्च कोटीचे आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही असे वाटते. ;)
बाकी फिरंगी लोक मात्र याही बाबतीत पुढेच बघा ! अहो तो हल्क हॉगन { हो तोच तो डब्लूडब्लूई वाला...}त्याने म्हणे ५००० { पाच हजार }चा आकाडा पार केला अशी ऊसगावात वार्ता हाय म्हणे... खरे खोटे तोच जाणे.
26 Dec 2013 - 3:02 pm | बॅटमॅन
हल्क होगन याही बाबतीत हल्क आहे तर!!! मान गये ;)
26 Dec 2013 - 4:33 pm | मदनबाण
हल्क होगन याही बाबतीत हल्क आहे तर!!! मान गये
हॅहॅहॅ... ओसामा बीन लादेन याच्या देखील ५ बायड्या होत्या... {हा ऑफिशल काउंट आहे,अन ऑफिशिअल तोच जाणे.}१८ वर्षीच त्याचा पहिला निकाह लागला.
जाता जाता :- हे अमेरिकन कोणती कोणती माहिती तुमच्या देशातुन गोळा करुन गेलेत कोणास ठावुक, पण अगदी पर्सनल माहिती देखील त्यांच्याकडुन टिपायची राहिली नाही.सौदीचा राजा अब्दुल्ला हा वयाच्या ९२व्या वर्षा पर्यंत Viagra चे भरपुर सेवन करायचा ही खाजगी माहिती सुद्धा त्यांना मिळालीच.
संदर्भ :- Viewing cable 08RIYADH1077, UPDATED PERSONAL INFO ON SAUDI KING
आता आपल्या देशाची आणि कुणा-कुणाची कशी माहिती त्यांच्याकडे जमा झाली असेल याचा फक्त विचार करुन पहा.
26 Dec 2013 - 4:51 pm | बॅटमॅन
हा हा हा अगदी!
अन सौदीचं आम्रिकेशिवाय पान तरी हल्तं का म्हणा. ही म्हायती असणारच.
26 Dec 2013 - 4:01 pm | llपुण्याचे पेशवेll
हल्क च्या ५००० पत्न्या आहेत का आजवर ५००० झाल्या आहेत? दुसर्याची शक्यता जास्त वाटते.
बादवे पिअरी वूडमॅन त्याच्या आसपास असावा.
26 Dec 2013 - 4:36 pm | मदनबाण
आजवर ५००० झाल्या आहेत
हेच... इतक्या मिळत असताना तो लग्नासाठी तो त्याचा "अमुल्य" वेळ कशाला घालवील म्हणतो ? ;)
26 Dec 2013 - 2:45 pm | बाबा पाटील
दुसर्या लग्नाला एका पायावर तयार,जर दररोज पाय चेपुन देणारी मिळणार असेल तर ......???
26 Dec 2013 - 3:10 pm | मारवा
पाय चेपुन देणारा बबलु असेल तर अनेक बबलीज सुद्धा तयार आहेत हो ! तस काय परवडणार नाय तुम्हाला !
26 Dec 2013 - 3:00 pm | म्हैस
मनिम्याऊ च्या मताशी सहमत …
पुरुषांपेक्षा स्त्रियांनाच एकापेक्षा अनेक लग्न करण्याची परवानगी कायद्याने दिली तर जास्त बरं होईल
26 Dec 2013 - 3:18 pm | ऋषिकेश
भारतातही हिंदु पुरूषास एकाहून अधिक जोडीदारांसोबत रहायची परवानगी आहे.
फक्त दोन्ही व्यक्तींशी विवाहाचा करार करायची संमती नाही. कारण विवाह हा धार्मिक संस्कार वगैरे नसून एक कायदेशीर करार आहे.
26 Dec 2013 - 5:51 pm | आनंद घारे
पुरुषाने दुसरे तिसरे चौथे वगैरे लग्ने करण्याला त्याच्या आधीच्या पत्नींची संमती असल्यास त्याने आणखी लग्ने करायला कायद्याने संमती द्यावी असे लेखकाने लिहिलेले आहे. या अटीमुळे निदान ९९ टक्के (द्विभार्याविवाहोत्सुक) पुरुष त्यातून कटाप होतील. "मला घरकामात मदत करायला दुसरी बायको घेऊन ये असे मी माझ्या नवर्याला कधीचे सांगते आहे" असे ज्यांनी (विनोदाने) लिहिले आहे अशा भगिनीसुद्धा "पण त्या बायकोची निवड मी करेन" अशी अट घालून कोणालाच कधीच निवडणार नाहीत याची मला खात्री आहे. पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या काळात पहिल्या बायकोला मूल होत नाही म्हणून तिनेच हट्ट धरून आपल्या लहान बहिणीला सवत करून घेतल्याचे उदाहरण मी पाहिले आहे. लोभीपणाने किंवा हुंडा देणे टाळण्यासाठी एकाद्या गरीब बापाने आपल्या मुलीचे लग्न विवाहित पुरुषाबरोबर लावून दिल्याची उदाहरणेही आहेत. पण आजच्या युगात हे मुद्दे असू नयेत.
इस्लामम्ध्ये पहिल्या लग्नालासुद्धा नवरा आणि नवरी या दोघांची संमती असणे आवश्यक असते आणि काझीच्या समोर दोघांनीही "कुबूल है" असे कबूल केल्यानंतरच तो विवाह होतो. हिंदू धर्मामध्ये वरमाला घालणे आणि ख्रिश्चन धर्मात "आय डू" म्हणणे वगैरे असते. पण या सर्वांनध्ये फसवणूक किंवा जबरदस्ती केली जाण्याची शक्यता असते आणि काही जागी तसे घडतेही.
पुरुषाने दोन किंवा अधिक लग्ने करण्याचे काही फायदे लेखात दाखवले आहेत, पण लग्नानंतर त्या बायकांचे आपसात पटणे कठीणच नाही तर अशक्य आहे असे मला तरी वाटते. यामुळे समाजाला त्यापासून त्या फायद्यांच्या कित्येक पटीने जास्त तोटे होणार आहेत. या सर्वांचा विचार करूनच काही शहाण्या लोकांनी हिंदूंसाठी द्विभार्याप्रतिबंधक कायदा केला आहे. मुसलमानांना चार बायका करण्याची परवानगी दिलेली असली आणि "आमचे मात्र हम दो हमारे दो आणि त्यांचे हम पाच हमारे पचास" असा खोडसाळ प्रचारही होत असला तरी तसे प्रत्यक्ष होतांना दिसत नाही. माझे जेवढे मित्र आहेत (हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध वगैरे) त्यातल्या कोणालाही दोन बायकाही नाहीत आणि दोनपेक्षा जास्त मुले ही नाहीत.
26 Dec 2013 - 5:56 pm | प्रसाद गोडबोले
नक्की ? शुअर ?? कॉन्फिडंट ??? लॉक किया जाय ????
26 Dec 2013 - 8:05 pm | विकास
"वरमाला" पेक्षा मला "हार" हा शब्द जास्त चपखल वाटतो. कारण मुहूर्त साधून वधूवरांना एकमेकांकडून "हार पत्करणे/स्विकारणे" म्हणजे काय याचा अर्थ जगण्याची सुरवात करावी लागते. ;)
26 Dec 2013 - 6:24 pm | ग्रेटथिन्कर
खरंय ,मुस्लिमांपेक्षा झोपडपट्टीतले हिंदुच जास्त पोरं जन्माला घालतात.पगार चार आणि पोरं पाच असा प्रकार असतो.
26 Dec 2013 - 6:43 pm | तिमा
जरुरत है, जरुरत है, या गाण्यातले प्रत्येक वर्णन म्हणजे एक पत्नी अशी कल्पना करावी.
जसे, एक श्रीमतीकी,कलावतीकी, सेवा करे जो पतिकी वगैरे वगैरे!
निव्वळ त्रिशतकी होण्यासाठी !
26 Dec 2013 - 7:18 pm | बहारिन् चा खलिफा
बायको मी दुसरे लग्न करतो आहे तुझ्या सल्ल्यानुसार
26 Dec 2013 - 7:34 pm | अत्रन्गि पाउस
लेखाचे शीर्षक वाचूनच ठरवले आधी प्रीतीक्रिया वाचायच्या आणि मग लेख...
तसेच करतोय...:-
26 Dec 2013 - 8:02 pm | विकास
राजा रेड्डींचा त्यांच्या पत्नींसमवेतचा फोटो पाहील्यावर, राजांशी लग्न करण्यास दोघी भगिनी "एका पायावर" तयार झाल्या असाव्यात असे वाटले. :)
बाकी द्विभार्याप्रतिबंधक कायदा येण्याआधीच्या पिढीतली अशी प्रसिद्ध मराठी उदाहरणे देखील आहेत. पण कुणाच्याही वैयक्तीक आयुष्यावर लिहीणे टाळू इच्छीतो. :)
हा लेख / ही चर्चा जरी "समाज" विषयात असली तरी खर्या अर्थाने ती "विरंगुळा" मध्ये वर्गिकृत आहे असे समजत आहे. :)
26 Dec 2013 - 8:12 pm | लक्ष्या
प्रत्येक घरात "क" ची मालीका चालु होईल. मी कधि बघत नाहि पन अपङेट भेटत असतात की काही दीवसा अगोदरच त्यानी नविन लग्न केले आहे. घरीच मजा येईल. :)
26 Dec 2013 - 8:12 pm | निनाद मुक्काम प...
दोन भाऊ व त्यांची एक बायको हि महाभारतातील परंपरा आजही हिमाचल प्रदेशात पाळली जाते.
26 Dec 2013 - 8:57 pm | रेवती
हे बरय राव! मी आत्ताच हा धागा पाहून नवर्याला तसा आग्रह केला तर तो म्हणाला की तुझ्यासारख्या महामायेशी एकदा लग्न झाले आहे तेवढे पुरे! यापुढे या जल्मीच नव्हे तर पुढील जल्मीही तो लगीन करणार नाही.
26 Dec 2013 - 9:00 pm | प्रभाकर पेठकर
खी: खी: खी: चुका करणं नैसर्गिक असतं. पण तिच पुन्हा करणं शहाणपणाचं नसतं.
27 Dec 2013 - 12:55 am | अर्धवटराव
तसंही येत्या काहि वर्षांत अनेक स्त्रि-पुरुषांचे अनेक स्त्रि-पुरुषांशी अनेक लग्नं/लग्नबाह्य संबंधं असं कमालिचं इंट्रेस्टींग कौटुंबीक/समाज स्ट्रक्चर तयार होणार आहे. फल ज्योतिषाने बीग बँग थेअरीचं हे भविष्य नाडिपट्टीवर कोरुन ठेवलय कधिचं.
29 Dec 2013 - 1:43 pm | उद्दाम
सहमत
31 Dec 2013 - 8:12 am | कैलासवासी सोन्याबापु
कायतरीच काय राव!!!
31 Dec 2013 - 11:54 am | चिरोटा
नुकताच राजस्थान सहलीनिमित्त जोधपूर येथील अतिभव्य राजवाडा पाहण्याचा योग आला.जसवंतसिंग नावाचे राजे(http://en.wikipedia.org/wiki/Jaswant_Singh ) तेथे होवून गेले.१८७३ ते १८९५ ह्या काळात. गाईडच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा तर त्यांना २० अधिकृत बायका व ३० अनधिकृत बायका.जेथे बाळंतपण व्हायचे ती वेगळी मोठी खोली गाईडने दाखवली.बर्याचवेळा एक बाळंतपण आटोपले की लगेच दुसर्या आठवड्यात आणखी एक्.शेवटी राजकुमार्/राजकन्यांची कुंडली मांडण्यासाठी एक पूर्णवेळ पंडितच तेथे असायचा.पडदा पद्धत तेव्हा होती.त्यामुळे पंडितजी खोलीबाहेर बसत. जन्म झाला की सुईणबाई लिंबू फेकून मारत्.लिंबू अंगावर पडले की पंडित ताबडतोब ग्रह तारे पाहून कुंड्ली मांडत.
काही वर्षांनी जसवंत महाराज 'सुधारले' व त्यांनी प्रजेकडे ल़क्ष द्यायला सुरुवात केली.काही चांगली कामे केली.हयातीत त्यांना जनतेने त्यांना देवत्वही बहाल केले.त्यांच्या पश्चात जसवंत थडा(जसवंतचे थडगे)बांधण्यात आला. राजस्थानचा ताजमहल ओळखला जातो.
31 Dec 2013 - 12:10 pm | राजेश घासकडवी
म्हणजे, त्या काळी प्रत्येकाने मल्टिपल बायका करण्यासाठी दुप्पट मुली पैदा व्हायच्या असं तुम्हाला म्हणायचं आहे का?
31 Dec 2013 - 12:46 pm | कवितानागेश
एक सहज विचारतेय,
बाकीच्या देशांमध्ये बहुपत्नित्व नाही का? उदाहरणार्थ इथियोपियामध्ये किंवा मलेशियामध्ये किंवा पोर्तुगालमध्ये किंवा पेरुमध्ये कायकाय रीती आहेत?
माझ्या मते हिंदूंचे काही वेगळं नाहीये. जगभरच सगळीकडे संधी मिळाली तर बर्याच (सगळ्या नाही!) पुरुषांना एकापेक्षा जास्त लग्न करायची इच्छा असेलच.
अवांतरः कुठलीही शहाणी बाई मात्र दुसर्या लग्नाची इच्छा करणार नाही. एकाचवेळेस दोन दोन सासूसासरे कोण सांभाळणार??? ;)
31 Dec 2013 - 5:24 pm | मुक्त विहारि
अहो...
सासरा पण एक ८-१० बायका करेलच ना?आपल्या तरूण बायकोला घेवून सासरा कशाला येतोय सुनेकडे?
आणि आपल्या अशा ८/१० बायका सांभाळणार्या बापाला मुले पण भरपूर असतील.
आम्ही आपले चांगले गेला बाजार अजून एक तरी बायको येईल म्हणून स्वप्न रंगवत होतो, तर तुमचे आपले भलतेच.(खरे तर दुसरे लग्न करायला हरकत नाही, पण २/२ सासूंना सहन करायची आजकालच्या पुरुषांची हिंमत नाही.)
वरील प्रतिसाद, १००% विनोदी असल्याने, आणि तो फक्त "लीमाउजेट ताईंना" असल्याने,माबोकर आणि तत्सम मं.नी उगाच आपापला आणि माझा वेळ वाया घालवू नये.
31 Dec 2013 - 7:56 pm | धन्या
नुकतेच राघवेंद्र जोशी यांचे, पंडीतजींच्या थोरल्या मुलाचे (पहिल्या पत्नीपासून झालेल्या) "गाणार्याचे पोर" हे आत्मचरीत्र वाचलं. या पुस्तकानूसार परिस्थिती तुम्ही म्हणताय त्याच्या अगदी उलट होती.
31 Dec 2013 - 8:41 pm | मारवा
आपल नेमक म्हणण काय आहे ? पुस्तकात काय आहे ? जरा विस्ताराने लिहील तर बर होईल.
1 Jan 2014 - 8:18 am | कैलासवासी सोन्याबापु
थोडे स्पष्ट बोलायचे पर्मिट असेल तर काही मुद्दे मांडेन म्हणतो.
1 Jan 2014 - 10:47 am | ग्रेटथिन्कर
परमिशन ग्रांटेड
4 Jan 2014 - 3:04 pm | कैलासवासी सोन्याबापु
पुरुषांचे बहुपत्नीत्वा संबंधी कल अन स्त्रीयांचे प्रणयाराधनातले नखरे हे दोन्ही उत्क्रांती तुन आलेले स्वभाव विशेष आहेत इतकेच मी म्हणेन. पण मेंदु च्या जबरदस्त क्रियाशील सहभागामुळे "सामाजिक प्राणी" ह्या पुढे जावुन मनुष्य जमात फ्लरिश झाली , संस्कृती उदयाला आली. म्हणुन निसर्ग विचारात घेतलेस बहुपत्नीत्व हे नैसर्गीस दृष्ट्या प्रबळ असणारी इच्छा आहे अन मानवीय प्रगती पाहील्यास ती इच्छा चुक आहे