नमस्कार,
आपण मागच्या एका धाग्यात अजूनही मराठी लेखन अवघड आहे ? या विषयावर चर्चा केली. मराठी विकिपीडियाचा बंधू प्रकल्प विकिस्रोतवर येत्या काळात ऑनलाईन मराठी टंकन (टायपींग) स्पर्धा आयोजीत करण्याचा मानस आहे.
विकिस्रोतावर स्पर्धा घेण्याचा एक उद्देश शुद्धलेखना पेक्षा अधिक विवीध टकंन पद्धतीत अधिकतम वेग किती साधता येतो ते पहाणे आणि ऑनलाईन मराठी टंकनास प्रोत्साहन देणे हाही आहे.विकिस्रोतात मुळ दस्तएवजात जसे लेखन आहे ते जसेच्या तसे करावे लागते त्यामुळे या प्रकल्पाकरता शुद्धलेखनाचा सरळ संबंध येत नाही.
पण इतर संस्स्थळावर अशी स्पर्धा आयोजीत करताना शुद्धलेखन वाल्यांचा वेगळा गट आणि शुद्धलेखन व्यवस्थीत न येणार्यांचा वेगळा गटांचा विचार करता येऊ शकेल.
प्रत्येक मराठी संकेतस्थळाचे स्वत;चे काही निकष असू शकतात तरीही ऑनलाईन मराठी टंकन (टायपींग) स्पर्धा आयोजीत करावयाची झाल्यास सर्वसाधारण उद्दीष्टे, निकष, धोरणे काय असू शकतात/ठेवावीत या बद्दल मिपा सदस्यांची मते जाणून घ्यावयाची आहेत.
(*तळटिप: मराठी विकिस्रोत प्रकल्पाबद्दल अधिक माहिती या ऑनलाईन सादरीकरणात सुद्धा उपलब्ध आहे.) )
प्रतिक्रिया
24 Dec 2013 - 1:47 pm | सुनील
सर्वसाधारणपणे टायपिंग स्पर्धेकरीता प्रति मिनिट किती शब्द टंकता येतात हे पाहिले जाते. सदर स्पर्धेसाठी ह्यापेक्षा वेगळा निकष लावण्याची गरज नसावी.
24 Dec 2013 - 2:25 pm | माहितगार
प्रतिसादा करता धन्यवाद
इंटरनेटवर ऑनलाईन असल्यामुळे शब्द मोजण्याकरता कदाचित एक्सटर्नल एडीटर मध्ये जाऊन शब्द मोजण्याचा पर्याय वापरावा लागेल.
पण बाईट्स मध्येच मोजणी करणे सोपे पडेल का ?
24 Dec 2013 - 3:39 pm | थॉर माणूस
...प्रति मिनिट किती शब्द चूका न करता टंकता येतात...
जो उतारा टंकनपरीक्षेसाठी दिलेला असतो तो तसाच्या तसा टंकणे महत्वाचे असते. फक्त वेग नव्हे तर अचूकतादेखील महत्वाची मानली जाते.
माझ्याकडील माहिती कदाचित जुनी असेल पण टंकलेखन परीक्षेची पद्धत अशी होती.
वेळ : ७ मिनीटे
उतार्याची शब्दमर्यादा : वेगावर अवलंबून (उदा. ३० शब्द प्रतीमिनीट करीता उतारा २१० शब्दांचा असावा.)
उत्तीर्ण होण्याचे निकष :
- जास्तीत जास्त १८-२० चूकांची मर्यादा
- उतार्यातील न टंकलेला प्रत्येक शब्द + शब्द टंकताना झालेल्या चूका अशी चूका मोजण्याची सर्वसाधारण पद्धत.
- यापेक्षा जास्त चूका म्हणजे अनुत्तीर्ण. (स्पीड प्रकारात अनुत्तीर्ण झाल्यास संपूर्ण परीक्षेत अनुत्तीर्ण मानण्यात येते. जरी लेटर+स्टेटमेंट प्रकारात चांगले गुण मिळाले तरी)
25 Dec 2013 - 7:41 am | माहितगार
थॉर माणूस, महत्वपूर्ण माहिती करता खूप खूप धन्यवाद.
विकिस्रोतावरील स्पर्धेत कॉपीराईट फ्री झालेल्या जुन्या पुस्तकांच्या स्कॅनकॉपी / छायाचित्रे/ पिडीएफ मधील मजकुर टंकावा लागेल. उद्देश जुनी पुस्तके जसे की साने गुरूजींची अथवा लोकमान्य टिळक ज्योतीबा फुले अशी अनेक जुनी पुस्तके युनिकोडात आणणे आहे.म्हणजे स्पर्धाही होते युनिकोडात आणण्याचे कामही आपसूक होते.त्यामुळे झालेले शब्द आणि मिनीटे नंतर कॅल्क्यूलेट करावी लागतील. विकिस्रोता करीता आपण म्हटले तसे "जो उतारा टंकनपरीक्षेसाठी दिलेला असतो तो तसाच्या तसा टंकणे महत्वाचे असते. फक्त वेग नव्हे तर अचूकतादेखील महत्वाची मानली जाते." हा निकष महत्वाचा असेल.
इतर संकेत्स्थळांना वेळ मोजण्यासाठी काही मार्ग काढावा लागेल.
25 Dec 2013 - 8:00 am | माहितगार
काही शंका
*सर्वसाधारणपणे टंकन स्पर्धा/परिक्षा एका मिनीटात किती किती शब्दांच्या असत/असतात ?
*मराठी टंकनाकरता आता पर्यंतचे अधिकतम वेगाची काही रेकॉर्डसची माहिती उपलब्ध असल्यास उपयूक्त ठरेल असे वाटते.
*काही लोक कमी वेगाने पण अधिक वेळा करता टंकन करू शकतात त्यांच्या करताही काही स्वतंत्र स्पर्धा/परिक्षा निकष सूचवता येऊ शकतीला का
26 Dec 2013 - 3:18 pm | थॉर माणूस
परीक्षा खालीलप्रमाणे असतात.
इंग्रजी : ३०,४०,५० श.प्र.मी.
मराठी : ३०,४०, श.प्र.मी.
यापुढच्या परीक्षा शॉर्टहँड प्रकारात असतात.
मुळात सलग सात मिनीटे अचूकपणे वेगवान टंकलेखन करणे हेच माझ्या मते खूप आहे. :) जर एखाद्या व्यक्तीला सात मिनीटापर्यंत वेगाचे सातत्य राखता आले तर शक्यतो ती व्यक्ती त्याच वेगाच्या आसपास जास्त वेळ टंकलेखन करू शकते. त्यात संगणकाच्या कळफलकावर ३० किंवा ४० चा वेग गाठणे आणि त्यात सातत्य राखणे जास्त सोपे आहे.
मराठीतल्या अधिकतम वेगाच्या अधिकृत नोंदी आहेत का या विषयी मात्र मला माहिती नाही.
26 Dec 2013 - 12:54 pm | माहितगार
नमस्कार,
अद्याप या चर्चेला प्रतिसाद कमी असलेतरी, उपरोक्त चर्चेतील आतापर्यंत आलेल्या सुचना आणि मराठी विकिस्रोत संकेतस्थळाच्या गरजा लक्षात घेऊन मराठी विकिस्रोतावर विकिस्रोत:मराठी_युनिकोड_टायपिंग_स्पर्धा हे पान बनवले आहे. मराठी भाषिक संकेतस्थळांमध्ये अशा प्रकारचा पहीलाच प्रयत्न असल्याने , संबंधीत पानाचे अवलोकन करून अजून काही सुधारणा इत्यादी सुचल्यास आवर्जून कळवावे हि नम्र विनंती.
24 Jun 2014 - 9:29 am | माहितगार
या उपक्रमाची विवीध माध्यमातून जसे की मराठी संकेतस्थळे आणि नेटवर्क/पेजेस ग्रूप्स इत्यादी माध्यमातून स्पर्धेस प्रसिद्धी करण्यात (स्वयंसेवी) सहकार्य हवे आहे.