It has been observed that a newborn baby's response to the stimulus provided by the environment has been increasing in leaps and bounds i.e. in the time frame from prenatal stage to neonatal stage, the feotus and later a newborn is receiving various enhansed stimulus that will impact his/her future response in the out side world .
The other question yet to be answered properly is the impact of stress the modern would be mother undergoes during pregnancy and its long term impact on psyche of the child.
Doctorate in Child Development केलेल्या विदूषी चे उद्गार आहेत हे माझ्या प्रष्नाला. मुलांच्या उद्धट पणा बद्दल खुप तक्रारी वाढ्ल्या आहेत आजकाल. बघुया बदल म्हणुन समुपदेशन घेउया.
मी हसलो. तीला वाटले की चेष्टा करतोय. मी लगेच विचारले, "ह्यावर उपाय काय?
विदूषी उदगारली, " इफ आय कम अक्रॉस द फॉर्मुला, आय विल बी रिचर दॅन मुकेश अंबानी.
तीने मग माझ्या डोक्याचा बुंदी पाड्णारा झारा करायची क्रिया चालु ठेवली. पुढ्ची चर्चा वातावरणातील प्रदुषणाची आणि त्याने होणारे सूक्ष्म जनुकिय बदलामुळे,शरिरावर आणि मानसिकतेत होणार्या परिणामाची.तीच्या म्हणण्यानुसार एक ६ महिन्याची गर्भवती जेंव्हा अंधेरीला विरार लोकल ला चढ्ते, आणि लटकत असताना तीच्या मनातली असुरक्षिततेची आंदोलने गर्भाच्या मानसिकतेवर दुरगामी परिणाम करतात. मिडीयावर सतत विकल्या जाणार्या भितीचा न कळत होणारा आघात कितपत गर्भाला सहन होतो ते नेमक सांगता येत नाही. मिडियावर व रोजच्या आयुष्यात सर्वात जास्त विकले जाणारे प्रॉड्क्ट म्हण्जे भिती ह्यावर मी संपूर्ण सहमत झालो.
भिती दाखवा आणि विका.
मार्कांची भिती दाखवा - समुपदेशन विका.
जंतूंची भिती दाखवा-साबण विका.
वजनाची भिती दाखवा- वजन कमी करणारी पावडर विका.
स्तंभनाची भिती दाखवा- वायग्रा विका, तेल विका, आणखी काय काय विका.
कसल्यातरी प्रयोगाची भिती दाखवा- टी.आर्.पी विका
विका, विका, विका भिती दाखवुन जमेल ते विका.
अरे बापरे न संपणारी गोष्ट च विकली की.
इतके दिवस मला वाटत होते की मुलांच्या वागणूकी बद्द्ल पालकांच्या वाढ्त्या तक्रारी ला १ ते ७ वी मध्ये होणारे दुर्लक्ष आणि इतर नेहेमी सांगितली जाणारी कारणे.(टी.व्ही., एकमेकासाठी वेळ नसणे वगैरे)
असतात.
हे तर भलतेच निघाले.
लगेच प्रष्न विचारला, "तुम्ही गर्भ संस्काराचे क्लास चालवता काय?
मनकवडी होती ती. हो म्हणाली पण फुकट चालवते हे सांगायला विसरली नाही.
इथे लक्षात घेण्यासारखी बाबः पुर्वी मुले नजर धरायला साधारण ४५ दिवस लावायची. आता बरिचशी तान्ही ३ आठ्वड्यात नजर धरतात. "आजकाल मुले किती स्मार्ट असतात हो " हा डायलॉग माझ्यासाठी तर नेहेमीचाच. पहिल्या सहा वर्षात त्याचे प्रचंड कवतिक आणि प्रदर्शन नंतर त्यावर बोंबाबोंब. अर्थात प्रदर्शन हा परत मोठा विषय. असो.
एकंदरीत मी तर बाबा भंजाळलो. तुम्हाला काय वाट्ते हे असे काही असते.
मी तर बाबा ठरवले आहे. पहिल्या चार दिवसात बाळाला बघायला जायचे नाही. " माझा पाळणा बरोबर डीसइन्फेट झाला नाही असे ते बाळ म्हणेल ह्याची भिती वाटते.
ता.क.: वेस्टर्न रेल्वे ने चार ट्रॅक पुर्ण करुन बरेच दिवस झाले त्याप्रमाणात लोकल नाही वाढ्ल्या. कुठे आहे रे तो डॅमेजर. घाला लाथा. काहीतरी काऴजी आहे कि नाही भारताच्या पुढ्च्या पिढीची.
प्रतिक्रिया
25 Sep 2008 - 8:37 pm | प्रभाकर पेठकर
भारतापेक्षा कितीतरी प्रगत देश आहेत जे ह्या सर्वातून आधी गेले आहेत. त्यांचे अनुभव तपासून पाहिले पाहिजेत. त्यांच्या आताच्या पिढीत जे गुण -दुर्गूण आहेत तेच काही वर्षांनी आपल्याकडे दृष्यमान होतील का? ह्यावर संशोधन केले पाहिजे.
25 Sep 2008 - 8:40 pm | चंबा मुतनाळ
विप्रसाहेब,
लवकरच लग्नात मंडपाबाहेर वा कार्यालयांमधे चाटेज् गर्भ संस्कार क्लासेसच्या जाहिराती लागतील.
26 Sep 2008 - 11:34 am | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
बस एवढ्च
25 Sep 2008 - 8:52 pm | सखाराम_गटणे™
चांगली विषय आहे,
अनुभवी लोकांनी लिहावे, येणार्या पिढीला उपयोगी पडेल.
-----
नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
25 Sep 2008 - 8:59 pm | रामदास
हे आपल्याला माहिती नाही. आपल्या अगोदरच्या पिढ्यांशी तुलना करण्यासाठी पुरेशी माहिती नाही.
तरीपण एक सर्वसाधारण बदल प्रत्येक दशकात दिसतो हे खरे आहे.आता हा बदलाचा वेग वाढला आहे हे पण खरं आहे.
यासाठी गर्भ-संस्कार किती उपयोगी ठरतात हे मला माहीती नाही.
माझ्या नजरेत भिती दाखवून आणि प्रलोभन दाखवून माल विकणे एकाच तागडीत बसते.
भावनांना आवाहन करून विक्री करणे हे तंत्र फार जुने आही नाही का?
पण तुम्ही म्हणता त्या प्रमाणे मुलं आता लवकर मोठी व्हायला लागली हे खरं असेल तर एका दृष्टीने बरेच आहे.
मला असं ही वाटतं की नवी जनरेशन फार लवकर मोठी म्हणजे फार लवकर पोक्त पण होईल हे नुकसान आहे नाही का?
निसर्गाची हीच इच्छा असेल तर ठीक आहे पण नसेल तर ...?
अवांतर: मी तुमच्याच पिढीतला माणूस आहे पण तुम्ही लिहीलेले मला बर्याच वेळा समजायला कठीण जातं.
वेळेचा अभाव मी समजतो पण विचार लिहीताना मला(आम्हाला) सोबत घेऊन चला बॉ.
महानुभाव पंथाची शिकवण फार सुरेख होती. पण मानभावी दूर गेले समाजापासून कारण लिखाण क्लिष्ट-क्लिष्ट होत गेलं.(असं मी एमेच्या पुस्तकात वाचलं होतं.)
समुपदेशकानी ढ विद्यार्थ्यांसोबत थोडंस....
अती अवांतर--लिपी ब्राम्ही असो वा देवनागरी ढ दोन्हीकडे सारखाच लिहीला जातो म्हणे..
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
25 Sep 2008 - 9:05 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
आयला तुम्हीसुद्धा. काय पट्ले नाय बॉ.
ती विदुषी काही पण विकत नव्हती. वाचा की निट.
25 Sep 2008 - 9:30 pm | विनायक प्रभू
तुम्ही ढ तर मी बिपाशा बसु. सांगाल तिथे बसीन.
/
25 Sep 2008 - 9:07 pm | लिखाळ
>>भिती दाखवा आणि विका.<<
सुंदर लेख..
हे खरेच आहे. हल्लीची मुले स्मार्ट का? याबद्दलचा अंदाज बरोबर वाटतो.
>>भारतापेक्षा कितीतरी प्रगत देश आहेत जे ह्या सर्वातून आधी गेले आहेत. त्यांचे अनुभव तपासून पाहिले पाहिजेत. त्यांच्या आताच्या पिढीत जे गुण -दुर्गूण आहेत तेच काही वर्षांनी आपल्याकडे दृष्यमान होतील का? ह्यावर संशोधन केले पाहिजे.<<
पेठकरकाकांच्या या मताशी सहमत आहे.
--लिखाळ.
25 Sep 2008 - 9:22 pm | झकासराव
आजकाल मुले किती स्मार्ट असतात हो ">>>>>>>>
हम्म.
मला वाटत की अनेक कारण असतील.
माझ्या लक्षात आलेली दोन कारण.
पहिल एक ह्याला बहुतेक कारण असेल त्याना मिळत असलेल एक्सपोजर. आजुबाजुच वातावरण.
मी लहान असताना एका गल्लीत एक किंवा दोघांकडेच टिव्ही असायचा. आणि अर्थातच चॅनल एकच दुरदर्शन.
मग त्यावेळी आम्हाला सास बहुची राजकारण कशी कळणार??
मग आम्ही मोठे होइतो आम्हाला त्यात फारस कळायच नाही.
आताची परिस्थिती प्रचंड बदलली आहे.
शिवाय दुसर एक कारण असेल अस वाटत ते म्हणजे मिळणारी औषधं.
आपल्या आधीच्या पिढीत गर्भवतीची काळजी घेताना नेमकी कोणती औषध देत असायचे हे आता माहीत नाही.
पण हल्ली सगळ्या डिफिशियन्सीज गर्भवतीला गोळ्या औषध देवुन पुर्या केल्या जातात. जस की फोलवाइट, आयरन, कॅल्शियमच्या गोळ्या.
अर्थात मला मेडिकल मधल नॉलेज शुन्य आहे. कुणी जाणकाराने ह्या विषयी लिहिल्यास जास्त बर.
पण ह्याचा प्रभाव मुलांच्या वाढीवर होत असावा अस वाटत.
वि प्र तुम्ही लेख छान लिहिता. पण थोडी गाडी डबल फास्ट असते. तो वेग पकडायला लेख २-३ वेळा वाचावा लागतो.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
25 Sep 2008 - 9:24 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
झकासराव,
मी फास्ट आहे हे एकदम मान्य.
25 Sep 2008 - 9:39 pm | संजय अभ्यंकर
प्रभू साहेब,
आपण विचार प्रवर्तक विषय मांडलात.
आपल्या देशात ह्या विषयावर फारसे लेखन आढळत नाही.
मि.पा. वरचे परदेशस्थ भारतीय यावर ज्यास्त प्रकाश टाकू शकतील.
अमेरिकेत, पालकांना समुपदेशन केले जाते असे एकून आहे.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
26 Sep 2008 - 2:32 pm | ब्रिटिश
>>"ह्यावर उपाय काय? विदूषी उदगारली, " इफ आय कम अक्रॉस द फॉर्मुला, आय विल बी रिचर दॅन मुकेश अंबानी.
there is no standart formula for this as every one in this world has an unique identity
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
26 Sep 2008 - 2:59 pm | विजुभाऊ
इथे लक्षात घेण्यासारखी बाबः पुर्वी मुले नजर धरायला साधारण ४५ दिवस लावायची. आता बरिचशी तान्ही ३ आठ्वड्यात नजर धरतात.
हे कशावरुन?
पूर्वी बाळंतीणीची खोली अंधारी असायची हल्ली ती भरपूर उजेडाची असते बाळाच्या डोळ्याला प्रकाशाची सवय लवकर होते हे कारण असु शकेल.
बाकी हल्लीची मुले थोडी रागीट असतात त्याना पटकन राग येतो. हा टीव्ही वरच्या कार्टुन्स चा प्रभाव असु शकेल.
कार्टून्स न बघता पुस्तके वाचणारी, आणि मैदानात खेळणारी मुले कमी रागीट असतात.
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
27 Sep 2008 - 6:25 pm | सखाराम_गटणे™
बाकी हल्लीची मुले थोडी रागीट असतात त्याना पटकन राग येतो. हा टीव्ही वरच्या कार्टुन्स चा प्रभाव असु शकेल.
कार्टून्स न बघता पुस्तके वाचणारी, आणि मैदानात खेळणारी मुले कमी रागीट असतात.
हल्लीची मुले एकटी एकटी खुप राहतात, त्यामुळे असेल कदाचीत.
पुर्वी मैदानी खेळच जास्त होते.
-----
नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
26 Sep 2008 - 4:01 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
मी कुठ्लेही विधान अनुभव घेतल्यावरच करतो. ७०-८० मध्ये सुमारे १०००० तान्ही बघितली आहेत. सर्व प्रकारच्या प्रदुषणाचा जेनेटीक सायन्स मधे आता विचार होतो आहे. समजतो तेव्ढ सोपे प्रकरण नाही.
26 Sep 2008 - 6:11 pm | भडकमकर मास्तर
सूक्ष्म जनुकिय बदलामुळे,शरिरावर आणि मानसिकतेत होणार्या परिणामाची.तीच्या म्हणण्यानुसार एक ६ महिन्याची गर्भवती जेंव्हा अंधेरीला विरार लोकल ला चढ्ते, आणि लटकत असताना तीच्या मनातली असुरक्षिततेची आंदोलने गर्भाच्या मानसिकतेवर दुरगामी परिणाम करतात.
... पण पोरं माहितीच्या एक्स्पोजरमुळे , भीतीमुळे किंवा एकूणच फास्ट लाईफ, टेन्शन्स यामुळे जास्त स्मार्ट होताहेत असं मात्र आहे, याबद्दल सहमत ....
जनुकीय कारणाबद्दल मात्र शंका आहे....
कारण मी तर ऐकलं होतं की जनुकीय बदल घडून यायला अनेक पिढ्या जाव्या लागतात आणि खूप घुसळण आवश्यक असते....
असं एखाद्या दुसर्या पिढीत जनुकीय बदल म्हणजे जरा जास्त वाटतंय...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
26 Sep 2008 - 8:16 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
असुरक्षिततेची मानसिक आंदोलने त्याचा परिणाम मी स्वतः मानतो. प्रगत देशात इंड्स्ट्रीयलायझेशन सुरु झाल्यापासुन डे १ पकडतात. त्या नुसार ४थी पिढी पकडायला हरकत नाही. एकंदरीत ह्या बाबतीत मी पण साशंकच आहे. ही भिती दाखवा आणि काहीतरी विका चे मूळ तर नाही ना? आणि तसे नसेल तर? जेनेटीक सायन्स अजुनही पुर्ण प्रगत झाले आहे का? डोक्याला जाळ.
तुमच्या क्षेत्रात हे अजुन घुसले आहे कि नाही.
26 Sep 2008 - 8:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
... पण पोरं माहितीच्या एक्स्पोजरमुळे , भीतीमुळे किंवा एकूणच फास्ट लाईफ, टेन्शन्स यामुळे जास्त स्मार्ट होताहेत असं मात्र आहे, याबद्दल सहमत ....
मीपण सहमत.
कारण मी तर ऐकलं होतं की जनुकीय बदल घडून यायला अनेक पिढ्या जाव्या लागतात आणि खूप घुसळण आवश्यक असते....
असं एखाद्या दुसर्या पिढीत जनुकीय बदल म्हणजे जरा जास्त वाटतंय...
मलाही असंच वाटतं. आईमधे होणार्या हॉर्मोनल बदलांमुळे जनुकीय बदल होत असतील मला कल्पना नाही.
26 Sep 2008 - 6:51 pm | उर्मिला००
काका,
सहजरित्या न हाताळ्ला जाणारा विषय तुम्ही अगदी सहजरित्या मांडला आहे.मला वाटतं,यासाठी आयुर्वेदाकडे आणि योगशास्त्राकडे वळावंच लागेल.आयुर्वेदानुसार बाळ जन्माला येण्यापुर्वी त्याच्यावर झालेले संस्कार जन्मानंतरच्या संस्काराच्या तुलनेत जास्त प्रभावी ठरतात.यासाठी मातेने पालन करावयाचे नियम आयुर्वेदाकडे आहेत्.ते आहे तसे वापरणे नोकरदार स्त्रीला शक्य नसले तरी त्यात modification करता येते.परदेशात शिक्कामोर्तब झालेले तेच खरे मानणार्या इंग्रजाळलेल्या भारतीयांना याचा प्रत्यय येइलच.
26 Sep 2008 - 8:50 pm | प्रियाली
भीती आणि स्मार्टनेस यांचा परस्परसंबंध कळला नाही. भीती, धाकदपटशा यांनी माणूस दबून राहतो, एकलकोंडा होता, चातुर्य गमावतो एवढीच माझी क्षुल्लक माहिती. :) जनुकिय बदल तेही इतक्या झपाट्याने होणे कठिण वाटते. उद्या कोणीतरी आईला वाटणार्या भीतीमुळेच माणसाचे शेपुट गळून पडले असा निष्कर्ष काढायचे.
मुलं स्मार्ट होताहेत कारण त्यांना एक्सपोजर जास्त मिळते आहे.
उद्धट होताहेत कारण हल्ली कमी असतात संख्येने त्यामुळे घरात मिळणारे महत्त्व हे मुख्य कारण आहे. शेअरिंग किंवा आपली गोष्ट वाटण्याची गरज न राहणे हे दुसरे.
बाकी, गर्भसंस्काराचे क्लासेस म्हणजे काय शिकवतात त्यात? पुढची पिढी चक्रव्युहात अडकून मरणारी अभिमन्यू बनली नाही म्हणजे मिळवले.
26 Sep 2008 - 10:00 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
भिती मुळे माणुस स्मार्ट होत नाही. नक्की, नक्की, नक्की?
उत्क्रांती ही सरवायवल च्या भितीने झाली असे मला वाटते. त्यात मुलांचे काय घेउन बसलात. अर्थात भितीचे रुपांतर एखाद्या दुसर्या संवेदन स्पंदनात होउ शकते हे मला मान्य आहे.
आता मुंबईतच बघा, बाँब स्फोटाच्या दुसर्या आठवड्यात विमा मागणार्यांची संख्या वाढते.
ही भिती की हुशारी?
26 Sep 2008 - 10:28 pm | टग्या (not verified)
हा स्मार्टनेस, की तात्कालिक प्रतिक्रिया???
९/११ नंतर डक्ट टेपचा खप वाढला म्हणतात. (डक्ट टेप तर मामूली गोष्ट, ओसामाची भीती दाखवून बुशप्रभृतींनी घाबरलेल्या अमेरिकी जनतेला पूर्णपणे असंबद्ध इराक-युद्धसुद्धा विकले. पण ते एक सोडा.) त्यापूर्वी वायटूकेच्या वेळीसुद्धा बर्याच फालतू गोष्टी खपल्या वगैरे. (चावी मारल्यावर अर्धा तास वगैरे चालणारा रेडियो-कम्-दिवा एरवी कोणी विकत घेईल?)
इथे अमेरिकेत सध्या पेट्रोलटंचाईची नुसती अफवा उठली की तातडीनं केवळ भीती-खरेदी सुरू होऊन आख्ख्या गावातले बहुतांश पेट्रोलपंप काही तासांत वगैरे रिकामे झालेले पाहायला मिळताहेत. जिथे शिल्लक आहे तिथे मैलभर रांगा लागून आहे तेही लवकर संपवण्याच्या मागे लागताहेत. अफवा उठली नसती तर ही (कृत्रिम) टंचाई इतक्या लवकर आली नसती. हा स्मार्टनेस???
मी तर म्हणेन की भीतीमुळे स्मार्टनेस वाढत नाही, तर सारासार विचार करण्याची शक्ती गमावल्यामुळे मूर्खपणा मात्र वाढतो, आणि असल्या बकर्यांना नको त्या गोष्टी विकणार्यांचा स्मार्टनेस तेवढा वाढतो.
27 Sep 2008 - 11:34 am | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
तत्कालिक प्रतिक्रिया त्याच्या कुटूंबाकरिता लाँग टर्म शहाणपणा होतो. नाही का?
27 Sep 2008 - 8:46 pm | टग्या (not verified)
कारण शहाणपणा म्हणून, दक्षता म्हणून जेव्हा माणूस विमा विकत घेतो, तेव्हा तो नीट विचार करून, शॉप-अराउंड करून, आपल्याला योग्य अशा टर्म्सचा विमा योग्य अशा किमतीत चोखंदळपणे विकत घेतो. भीतीपोटी, तात्कालिक प्रक्रियेने दिसल्या पहिल्या एजंटाकडून विमा घेताना हा चोखंदळपणा बाजूला सारला जाण्याचीच शक्यता अधिक, आणि घेतलेला निर्णय लाँग टर्ममध्ये योग्य असेलच याची खात्री नाही.
28 Sep 2008 - 8:55 am | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
तुम्ही म्हणता तसा तुलनात्मक अभ्यास करुन विमा किती जण घेतात?
29 Sep 2008 - 11:24 pm | टग्या (not verified)
बहुतांश नाही घेत, मान्य! पंण मग यात हुशारीचा, स्मार्टनेसचा भाग कुठे आला?
30 Sep 2008 - 2:35 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
माझेच काही तरी चुकतय बहुदा.
26 Sep 2008 - 10:24 pm | प्रियाली
अहो याला स्मार्टनेस म्हणतात का? आणि असलाच स्मार्टनेस तर तो लोकांचा की विमा एजंटांचा?
माझ्यामते हा निव्वळ मूर्खपणा.
मागे एका बापाकडून मार खाऊन तोतरे बोलणार्या मुलाचे उदाहरण दिले होते. तो जर भीतीने स्मार्ट झाला असता तर मोठ्ठा वक्तृत्वपटू झाला असता ना स्मार्टनेसमुळे.
27 Sep 2008 - 6:06 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
विमा मागणारांची संख्या वाढते.
त्यांत ए़जंट कुठुन आले.
माझ्या माहिती प्रमाणे विमा कुटुंबाकरिता असतो.
तो काढण्याकरिता स्फोट्च हवा असतो काही जणांना.
ह्या ट्रीगरने जरी काढला तर तो कुटुंबाकरिता शहाण पणाच ना.
मुलगा नागपुरला आता जी.एस आहे. सर्व काही ठीक आहे.
आता वक्त्रुत्व पटु व्हायला बापाने मारायला पाहिजे असा नियम निघु नये म्हणजे मिळवली.
27 Sep 2008 - 6:28 pm | प्रियाली
लेख तान्ह्या मुलांसाठी आहे. तिथे प्रौढ माणसांची भीती दाखवून विमा काढण्याचे उदाहरण सयुक्तिक नाही. उदाहरणे द्यायचीच झाली तर भीतीने लहान मुले स्मार्ट कशी होतात ते पटवून द्यावे?
तो मुलगा आता काय आहे त्याचा प्रश्न नाही. तो जो आता आहे तो समुपदेशाने हे आपण सांगितले म्हणजे बापाने जी भीती घातली त्याने तो स्मार्ट होऊन जीएसला गेला असे म्हणणे विपर्यस्त आहे.
मला वाटतं घाईघिसाडीने लेख टाकत राहण्यापेक्षा तुम्हाला कोणते मुद्दे सांगायचे त्यांच्यासाठी कोणती उदाहरणे लागू होतात त्यावर विचार करून लेख टाकावेत.
संबंध काय? गोष्टही तुम्हीच सांगणार आणि विपर्यस्त अनुमानही तुम्हीच काढणार. कमाल आहे.
आणि विमा काढणे हा कुटुंबासाठी शहाणपणा नाही. केवळ सावधपणा. शहाणपणा यात आहे की जेव्हा आपल्यावर अवलंबून काही जीव आहेत याची जाणीव झाल्यावर लगेच विमा काढणे. मृत्यू काही बॉम्बस्फोटातच येतो असे तर नाही.
27 Sep 2008 - 9:21 pm | ऋषिकेश
चर्चा वाचून पुलंचं जावे त्यांच्या देशा मधील वाक्य आठवलं (नीट लक्षात नाहि साधारण देतो):
"विका विका विका! बालपण विका, तारुण्य विका, शक्ती विका, भीती विका, कौमार्य विका, विकण्यासारखं उरत नाहि ते वार्धक्य!
विक्री हा ज्या देशाचा मुलमंत्र आहे त्या देशांत वार्धक्याचं निर्माल्य होत नाहि पाचोळा होतो.." - पुल.
ऋषिकेश
27 Sep 2008 - 9:27 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
प्रियाली ताई,
प्रकटनात मी कुठे विदुषी बरोबर सहमत झालो आहे. . सर्वात महत्वाचे म्हणजे मी स्वतः विदुषी जे सांगत आहे ते भिती दाखवुन आण्खी काही विकायचा प्रकार आहे ह्या बाबतीत प्रष्न केला आहे की. बाकी तुम्ही मुलाच्या स्वभावात फरक यायची कारणे म्हणत आहात त्याचा उल्लेख आहे की.
रहाता राहीला एक्स्ट्रीम स्टिम्युलस मुळे माणसाच्या स्वभावात काय फरक पडेल हे कोणालाच सांगता येणार नाही. तो भित्रा पण होईल, स्मार्ट होईल. किंवा आण्खी काय होइल हे ठाम पणे सांगता येणार नाही.(नक्की) शेवटी तान्ही कधी ना कधी तरी माणुस होणार आहेत. आणि विदुषी हेच म्हणते आहे. आणि जगभर ह्या विषयावर संशोधन चालु आहे गेली काही वर्षे. पण कुठ्ल्याही ठाम निर्णय होत नाही नेहेमीप्रमाणे. पण शक्यता पण नाकारत नाही मंड्ळी. आहारातुन येणार्या प्रदुष्णाने जेनेटीक प्रोफाइल्स बदलु शकतात ह्यावर जवळ जवळ एकमत होउ घातले आहे. परत हा वादग्रस्त मुद्दा आहे हे मला मान्य आहे.(प्रोटीन कंटामिनेशन)मांणसाला मात्र (सगळीच नव्हे ) हुशार व्हायला ट्रिगर लागतो हे २००० वर्षात अनेक वेळा सिद्ध झाले आहे. हुशार माणसाना ट्रिगर लागत नाही. आणि सगळी हुशार असती तर आज जी परिस्थीती उद्भ्वली आहे ती उद्भवली नसती.(लोकसंख्या, ग्लोबल वार्मींग वगैरे) .
माझ्या लेखात सर्व मुद्दे आणि उदाहरणे अगदी बरोबर आहेत अशी आग्रही भुमिका मी कधीच घेतली नाही. उलट संभाळुन घ्या ही नम्र विनंती आधीच केली आहे. किबहुना इथेलिहले जाणारे सर्व बुकर प्राइजच्या लायकीचे असते असे तुम्हाला म्हणायचे नाही ना.
मग फार लांब जायची गरज नाही. आज दोन दिवसात मी पण वाचतो आहे की.
एका गोष्टीबद्दल मनापसुन धन्यवादः नॉन स्टॉप फुकट सप्लाय बद्द्ल एड्रिनिलिनच्या.
29 Sep 2008 - 10:48 pm | भास्कर केन्डे
प्रभू साहेब,
विषय रंजक आहे. ऐरणीवर घेतल्याबद्दल आभार!
जगभरातल्या संशोधकांचे एका बाबतीत आता मतैक्य होत आहे - आईच्या विचारपद्धतीवर तसेच आजूबाजूला काय घडते आहे यावरुन गर्भावर संस्कार सुरु होतात. तसेच जन्माला आल्या नंतर मिळणारे वातावरण हे ही मुलांच्या स्वभावाला करणीभूत असते.
एक छोटे, सामान्य (अनुभवलेले) उदाहरण: अमेरिकन बालके त्यांच्या बुस्टर सीट मध्ये बसून जेवायच्या वेळेला त्यांचे आई-बाप देतील ते मुकाट्याने खातात. त्यांच्या मागे लागावे लागत नाही. मात्र देशी बालके पाच-सहा वर्षाची झाली तरी एका जाग्यावर बसून हाताने जेवत नाहीत. त्यांच्या आया घास घेऊन मागे व लेकरू पुढे असा खेळ बहुतांश देशी (अमेरिकन) घरात चाललेला असतो. कारण? मुलांना लहानपणापासून लावलेल्या सवयी की जैवीक फरक? तर मुलांना लहानपणापासून लावलेल्या सवयी. काही देशी पालक अमेरिकन पद्धतीने अगदी ६व्या महिन्यापासून त्यांच्या लेकरांना बुस्टर सीटवर केवळ खायच्या वेळेतच खायला देतात. नाही खाल्ले तर बस उपाशी... पुढच्या वेळी त्या लेकराची काय मजाल की भूक असून खाणार नाही?
बालके अजूबाजूच्या वातावरणाकडून शिकलेली प्रत्येक लहान-मोठी गोष्ट त्यांच्या स्वभावतून/वर्तनुकीतून/बोलण्यातून दाखवून देतात.
जितके जास्त विषय त्यांना पहायला मिळतील तितके जास्त ते शिकतात.
बाकी आपण काढलेला विषय फार विस्तृत आहे. पण तुर्तास एवढेच.
स्-स्नेह,
(जिज्ञासू पालक) भास्कर
आम्ही येथे वसतो.