सर्वप्रथम काही गोष्टी स्पष्ट करतो.
1-
खालील निबंधातील निवडलेला भाग ( मात्र जसा आहे तसा साठेंच्याच शब्दात) हा श्री. मकरंद साठे यांच्या सांस्कृतिक अस्मिता आणि जागतिकीकरण या अत्यंत प्रगल्भ अशा निबंधा चा एक लहानसा भाग मात्र आहे.पुर्ण पुस्तक मार्केट मध्ये उपलब्ध आहे ते विकत घेउन एकवेळ जरुर वाचावे अशी आग्रहाची विनंती.
2-
श्री मकरंद साठे यांची मांडणी तशी जुनी च आहे पण समकालीन वास्तवात ती कीती रेलेव्हंट आहे हे आपल्या परस्पर विरोधी मत असलेल्या गटांच्या चर्चामधुनही लक्षात येते, त्यांनी याच मांडणीला “चौक” या अत्यंत प्रगल्भ अशा नाटकाने ही अभिव्यक्त केलेले आहे ते ही आपण जरुर बघावे. त्यांचा शांता गोखले यांनी घेतलेला सकाळ दिवाळी अंकातील इंटरव्ह्यु ही फ़ार सुंदर आहे वर्ष आठवत नाही बहुधा २०१० चा अंक आहे.
3-
यातील केवळ मला अगत्य असणारया विषयाला मी निवडुन काढलेले आहे जो साधारणपणे पहील्या ३० पानांत येतो. याचे कारण म्हणजे मला असे वाटते की हा भाग म्हणजे एका समस्येची मुलभुत मांडणी आहे व यापुढील भाग हा साठे यांनी केलेले त्यांच्या मतानुसारचे या समस्येचे विश्लेषण आहे. तर मला इथे साठेंच्या समस्येच्या मांडणीवर चर्चा व्हावी असे वाटते. आणि तीचे विश्लेषण हे प्रत्येकाचे वेगवेगळे असु शकते. ते जाणुन घेण्याची इछ्छा मला आहे.( पुढील भागात रस असणारयास पुर्ण पुस्तक वाचनास मार्केटमध्ये सदैव उपलब्ध आहेच )
4-
खालील भाग हा मी ओळखी च्या समस्येसंदर्भातील जी साठे यांची मांडणी आहे ती मांडणी जो भाग अधिक नेमकेपणाने दाखवुन देते तो भाग च घेतलेला आहे. अर्थात त्यांचे शब्द जसे चे तसे घेउन. आणि श्री.साठे च इतकी नेमकेपणाने मांडणी, इतक्या अचुकतेने व प्रगल्भतेने करतात की त्यात मी माझा एकही स्वत:चा शब्द घुसडुन त्या पांढरया सदरयावर डाग पाडु इछ्छीत नाही.
तर आता साठे यांच्या निबंधातील काही निवडक भाग खाली देत आहे आणि तो संपल्यानंतर त्या संदर्भातील मला महत्वाचे वाटणारे मुद्दे व प्रश्न देत आहेत. यावर मंथन व्हावे इतकीच माझी अपेक्षा आहे.
साठेंच्या निबंधातील निवडक भाग सुरु..........................
ओळख (identity) हा विषय मुळातच गहन क्लिष्ट व्यामिश्र (complex) इत्यादी त्यातुनच आजच्या घटकेला त्याला इतक्या मिती जोडल्या गेल्या आहेत की त्याचा वेध घेणे दुरापास्त होउ लागले आहे. या विषयाची मुळातच असणारी गहनता व आजमितीला त्यात निर्माण झालेली व्यामिश्रता व विखंडीतता हे दोन्ही प्रकार मला कसे जाणवतात ते आधी मी सांगण्याचा प्रयत्न करतो ( येथे मी सामाजिक ओळख या अर्थी बोलत आहे) इंग्रजी Identity या शब्दासाठी आज मराठीत अस्मिता हा शब्द वापरला जातो. परंतु अस्मिता या शब्दाला जोडुन उगाचच एक अभिनिवेशी भाव असतो असे मला वाटते त्यापेक्षा ओळख हा रोजच्या संभाषणात वापरला जाणारा शब्द जसे की मी अमुक म्हणुन ओळखला जातो किंवा ओळखपत्र (identity card) इत्यादी मला जास्त सोयीचा वाटतो परंतु या ओळखीचा इंग्रजी recognition या शब्दाशी संबंध जोडला जाउ नये म्हणुन हा खुलासा.
सेन यांच्या मते आपल्या ओळखीत सामाजिक परीस्थीतीचा जाणिवांचा वाटा असला तरी त्या (ओळखी) केवळ समाजातुन, सामाजिक मान्यता लाभलेल्या परंपरांतुन ठरत नाहीत .आपण आपली विवेकबुद्धी (reason)वापरुन त्या बदलु शकतो. आपल्याला या निवडीचे ( ओळखीच्या निकषांच्या निवडीचे ) स्वातंत्र्य असते,( freedom of choice) आपण एकाच समाजाचे –इतर जगापासुन पृथक अशा समाजाचे- संपुर्ण घटक म्हणुन जगत राहण्याचे कारण नाही; त्या समाजातुन सहज उदभवणारया ओळखींपासुन वेगळ्या ओळखी आपण विचारांती धारण करु शकतो; निरनिराळे समाज आणि संस्कृती अशा एकमेकांपासुन विलग अवस्थेत., एकमेकांत कधीही मिसळु न शकणारया अशा बेटांसारख्या असण्याचे आज कारण नाही; त्यामुळे एखादी व्यक्ती ही अशा बेटांवर अडकुन राहण्याचे कारण नाही; विवेकाने या मर्यादा उल्लंघुन आपण जाउ शकतो इत्यादी मांडणी सेन यांनी मोठ्या तरलतेने व सम्यकतेने केली आहे, ही गृहीत धरुन मी पुढे जातो. ओळखींच्या निवडीचे स्वातंत्र्य आपणास असते हा त्यांचा मुद्दा मान्य करुन माझ्या विषयाची माझ्या विषयाची सुरुवात म्हणुन मी तो थोडक्यात मांडला आज या ओळखीचे या निवडीच्या स्वातंत्र्याचे काय होते हा माझा विषय आहे. हे निवडीचे स्वातंत्र्य प्रत्येक व्य्क्तीस असते निदान काही प्रमाणात असते असे आपण मान्य केले व त्याकडे जास्त जवळुन पाहीले तर असे लक्षात येते की गेल्या काही दशकांत या निवडीच्या प्रक्रियेतच अनेक कारणांनी काही मुलभुत बदल झालेले आहेत .या निवडीच्या परीणामातही त्यामुळे बदल झालेले आहेत.
आज दोन भिन्न संस्क्रृतींमधील सर्व पातळ्यांवरची देवाणघेवाण, दुसरया संस्कृतीतील व्यक्तीबरोबरचा (अगदी सामान्य माणसांचाही ) संपर्क इत्यादी मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अलग विचारचौकटीतुन निर्माण झालेल्या श्रध्दा वा क्षीण झालेल्या श्रध्दा ,विज्ञान, तत्वज्ञान, व्यापार,कलाव्यवहार ,तत्वप्रणाली ,तत्वप्रणालींवरचा उडालेला विश्वास किंवा मी एक तत्वप्रणाली मान्य करुन जगत असता त्या तत्वप्रणालीवरचा ज्यांचा विश्वास उडालेला आहे अशांशी येणारा संपर्क, इत्यादी अनेक गोष्टींबाबत ही देवाणघेवाण असते.संपर्कात येणारया संस्कृती या ऐतिहासिक दृष्ट्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उभ्या असतात(एका अर्थी विकासक्रमाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असतात) त्यामुळे वेगवेगळ्या अवकाशात त्या त्याप्रमाणे जगत असतात, त्याप्रमाणे वेगवेगळ्या काळातंही त्या जगत असतात, नवे तंत्रज्ञान, नवी संपर्कमाध्यम व्यापाराचे (आणि त्यातुन राजकीय वर्चस्वासाठी) उघडणारे दरवाजे, त्यातुन उदभवणारे जागतिकीकरण( globalization) या सर्वाचा रेटा या देवाणघेवाणी मागे आहे. या देवाणघेवाणीमुळे या संपर्कामुळे आपण ज्या विषयी विचार करीत आहोत ती निवड ज्या शक्यतांमधुन करावयाची त्यांची संख्या अफ़ाट वाढत आहे, आणि त्यांचे स्वरुप व्यामिश्र (complex) होत आहे.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या शक्यता एकमेकांशी असंगत अशा चौकटींतुन संचामधुन उदभवलेल्या आहेत.
भारतासारख्या विकसनशील देशांत ,सांस्कृतीक विकासाच्या अनेक टप्प्यांमधुन गेल्यानंतर समोर ठाकाव्यात, अशा या अनेक शक्यता त्या टप्यांमधुन न जाताच सामोरया येत आहेत. इथल्या व्यक्तींच्या मनोभुमिका आणि अर्थव्यवस्था, निर्मीतीची हत्यारे (tools of productions), ज्ञानमार्गाचा विकास इत्यादी या निवडीसाठी योग्य प्रकारे तयार होण्याच्या आधीच त्या सामोरया येत आहेत. समाज एकसंध ठेवणारया श्रध्दा अगदी जागतिकीकरणाच्या रेट्याच्या काहीशा बाहेर राहीलेल्या अशा आदिवासी समाजात सुद्धा आज (वा निदान नजीकच्या भविष्यात) अनाघ्र अशा अवस्थेत सापडणे अशक्य आहे. या श्रध्दा निरनिराळ्या टप्प्यांवर बदलत असतातच , निवड करण्याचे स्वातंत्र्य आपण त्या त्या वेळी घेत असतोच.परंतु प्रचंड वेगाने होणारा संस्कृतीसंकर ही गोष्ट च वेगळी आहे माझे विवेचन या संस्कृतीसंकराला अनुलक्षुन आहे. हा संस्कृतीसंकर निवडीच्या शक्यता अफ़ाट वाढवितो . एका अर्थी मला समृध्द करतो; एतिहासिक दृष्ट्या पुढच्या टप्प्यावर नेतो. परंतु दुसरया अर्थी मला पेचात टाकतो.
एका व्यक्तीच्या अनेक व्यामिश्र ओळखी निर्माण करतो. ती व्यक्ती एकाच वेळी भारतीय ,(पण) लंडननिवासी, स्त्रीवादी, वित्तीय धोपटमार्गी( fiscal conservative), मॆक्डोनाल्ड बर्गर आवडणारी, लोककलांचा अभ्यास करणारी, सॅक्सोफ़ोन वाजविण्यात निष्णात असणारी इत्यादी अनेक ओळखी प्राप्त करुन घेउ शकते. एकापेक्षा जास्त ओळखी पुर्वीही होत्याच परंतु त्यांची संख्या सामान्यत: इतकी नव्हती (इतकीच्या जवळपासही नव्हती) आणि दुसरे म्हणजे त्या ओळखीतही एकात्मता असे. याचा अर्थ असा की पुर्वीही निवडीच्या शक्यता (अगदी एकमेकींशी विसंगत अशा शक्यताही) अस्तित्वात होत्या. पण या सगळ्या शक्यता एकाच चौकटीतुन (frame) उदभवलेल्या असत. एकाच एकात्म विचारसंचाचा भाग असत. आज या ओळखी अनेकदा एकमेकींशी विसंगतच नव्हे तर असंगत ही असतात. दोन ओळखींमध्ये किंवा त्याच्यामागील जाणिवांमध्ये काही संबंधच नसतो. म्हणजे त्याचा उदभव वेगवेगळ्या असंगत चौकटींमधुन, प्रणाली – पद्धतीमधुन (system) झालेला असतो.
म्हणजे दोन ओळखी एका जाणिवेतुन , एका प्रणालीतुन चौकटी श्रद्धेतुन उमललेल्या नसतात. त्यांना ज्यातुन प्रामाण्य (योग्यतेचे प्रामाण्य- validity ) मिळते त्या गोष्टीही त्यामुळे वेगळ्या असतात. या अनेक व्यामिश्र ओळखी एकाचवेळी अस्तित्वात असतात. त्या कायम बदलणारया व वेगवेगळ्या बिंदुमुळे परीणामीत होणारया अनेक घटकांवर आपले अस्तित्व, निदान तीव्रतेचा कमीजास्तपणा अवलंबुन ठेवत असतात. त्या एकमेकींशी संबध नसणारया श्रद्द्दामधुन ,संस्कृतीमधुन, अनुभवांमधुन,भाषांमधुन, ज्ञानसंच यामधुन , अवकाश आणि काळांमधुन फ़ुललेल्या असतात.त्यांच्या प्रामाण्यातील एकात्मतेचा शोध त्यामुळे विफ़ल ठरतो.प्रामाण्याबाबत आणिबाणीची स्थिती ( crisis of validity )असे त्याचे वर्णन करता येईल. अशा परीस्थीतीत काय चांगले काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय नैतिक काय अनैतिक याबाबत गोंधळाची परीस्थीती निर्माण होउ शकते.
व्यक्तीची सामाजिक ओळख याविषयी आपण बोलत आहोत तेव्हा या संदर्भात आपण जेव्हा निवडीचे स्वातंत्र्य असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ नैतिक निवडीचे स्वातंत्र्य असा मुख्यत्वेकरुन होतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवणे आवश्य्क आहे. आता अशी निवड जरी तर्कावर , विवेकावर , वैज्ञानिक तर्कशास्त्रावर ( scientific reason) अवलंबुन असली तरी फ़क्त त्यावर अवलंबुन राहुन आपण फ़क्त काही अंतर च आपण जाउ शकतो. वैज्ञानिक तर्कावर( scientific reason) अवलंबुन राहुन नैतिक निवडीच्या प्रामाण्याचे(validity) अंतिम टोक गाठता येत नाही. त्यासाठी काही मुल्य गृहीतके( apriori) आपण मान्य केलेली असतात. त्यांच्यावरच कुठल्याही तर्कशास्त्राचा, तत्वप्रणालीचा ,धर्माचा, सर्वस्पर्शी निवेदनाचा (grand naarative) डोलारा उभारलेला असतो. ही गृहीतके कधी श्रद्धांच्या ( मग ती यातुधिष्ठीत असो वा अन्य) रुपात असतात. कधी भावनांच्या , कधी रुढींमधुन, तर कधी निधर्मी तसेच उपयुक्तततेच्या , सामाजिक कराराच्या इत्यादी रुपांत असतात. हा एका अर्थी त्या मार्गावरचा प्रामाण्य सिद्ध करण्याचा अंतिम भोज्या असतो. पुर्वी ओळखीचे स्वरुप एकसंध असतांना , निदान एकच अंतिम भोज्या असे, एकच श्रद्धा व गृहीतक असे. आता असे अनेक अंतिम भोज्ये येणार हे वरील विवेचन मान्य केल्यास उघड आहे. आज व्यक्तीच्या एका ओळखींचे प्रामाण्य ती व्यक्ती उपयुक्तततेवर अवलंबुन ठेवते. दुसरीचे प्रामाण्य आधीच खिळखीळ्या झालेल्या पण अजुन टीकुन असणारया धर्मश्रद्धेवर ठेवते , तर तिसरया ओळखीचे प्रामाण्य भावनेवर ( त्यातही एका विशीष्ट समाजाची मान्यता मिळालेल्या भावनापोतावर ) अवलंबुन ठेवते असे अनेकवार आढळुन येते. सामान्य व्यक्तींच्या ओळखीमध्ये, प्राण्यांमध्ये एकात्मता नसली , त्यांनी लावलेले निकष एकाच चौकटीतुन उदभवलेले नसले , तर असंगताची व्याकुळ करणारी भावना, सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यात निर्माण होते मग ती कळत असो वा नकळत.
या निवडप्रक्रीयेकडे अजुन खोलात जाउन पाहीले तर असे लक्षात येते की ती केवळ अनेकविध चौकटीतुन उमललेल्या पर्यायामधुन –व्यामिश्र पर्यांयातुनच करायची आहे असे नव्हे ,तर ती करणे तुमच्यावर काहीसे बंधनकारकच आहे. स्वातंत्र्य अनेकदा सक्तीसारखे (हक्क – कर्तंव्याच्या जोडीप्रमाणे ) वाटु लागते. व स्वातंत्याची ही किंमत मोजावीच लागते हे जरी मान्य केले , तरी ज्यांच्या प्रामाण्याविषयी एकवाक्यता नाही, ज्या शक्यतांमध्ये एकसंधता नाही , त्यात निवड करण्याची सक्ती वा स्वातंत्र्य पुर्वीच्या स्वातंत्र्यापेक्षा वेगळेच पोत घेउन येते.
त्यातुन ती निवड ज्यावर अवलंबुन करायची ते ज्ञान ,माहीती , शिक्षण, सत्य व त्याचे तात्वीक ज्ञान,हे अनेकदा बहुसंख्यकांच्या आकलनाबाहेर , आवाक्याबाहेर असतांना करावयाची आहे, काही वेळा त्या समाजाची अवस्था काही संकल्पनांना सामोरे जाण्याइतकी उत्त्क्रांत झालेली नसताना त्या संकल्पना त्या समाजावर बाहेरुन आदळल्यामुळे संकल्पना आवाक्यात नसतात. उदाहरणार्थ राष्ट्रीयत्व वा राजकीय राष्ट्रीयत्व(political nationality) या संकल्पनेचे भारतातील आगमन.अशा अनेक संकल्पना वा ओळखी आहेत.दुसरया बाजुला ही निवड प्रत्येक ओळखीबाबत स्वतंत्रपणे करावयाची आहे. म्हणजे एक प्रणाली वा सर्वस्पर्शी निवेदन( grand narrative) आपण निवडले की बाकीच्या ओळखी त्यातुन सुसंगतपणे निघतात ( निदान सैद्दांतिकदृष्ट्या) अशी ही प्रक्रीया नाही. हे सर्व लक्षात घेतले तर या ओळखींमधील व्यामिश्रता, गुंतागंत (complexity)कशी वाढते ते लक्षात येईल.
एकाच व्यक्तीच्या अनेक ओळखी असतात हे आपण पाहीले ( जशा की भारतीय , लंडनवासी, वित्तीय धोपटमार्गी,(fiscal conservative) स्त्रीवादी इत्यादी ) त्या कधी कधी द्वंद्वात्मक असतात. म्हणजे त्यांच्यात झगडा असु शकतो. उदा. लंडनवासी वा सोइसाठी रेठरेवासी (बुद्रुक) ही ओळख आणि त्याच व्यक्तीची वित्तीय धोपटमार्गी ही ओळख . वित्तीय धोपटमार्गी म्हणुन त्या व्यक्तीला सरकारने वित्तीय (fiscal)शिस्त पाळणे , खर्च कमी करणे हे मान्य असेल परंतु त्याच वेळेस एक रेठरेवासी (बुद्रुक) म्हणुन सरकारने रेठरे या गावी जा-ये करणारया बसची संख्या परवडत नसतानाही वाढवावी वा रेठरे गावात नवे कारखाने काढण्यासाठी अनुदाने( subsidy) द्यावीत असे ही वाटेल. या ओळखीप्रमाणेच ओळखी या एकमेकींशी असंगत असतात, त्यांची सुरुवात कशी वेगवेगळ्या गृहीतकांपासुन होते हेही आपण पाहीले.
या अशा व्यामिश्र ओळखी , त्या ज्यावर अवलंबुन असतात अशी व्यामिश्र गृहीतके त्यामुळे एक व्यक्ती म्हणुन भावनिक आणि एक समाज म्हणुन सांस्कृतिक परीणाम काय होतात ? ही परीस्थीती पुर्वीच्या कुठल्याही परीस्थीती पेक्षा वेगळी आहे. त्यामुळे त्याचे परीणाम ही तसेच असणार. ही परीस्थीती प्रत्येकाच्या मनात असुरक्षीतता उत्पन्न करते. व्यक्तीच्या विचारधारेचा, समाजाचा, गटांचा, संस्कृतींचा, श्रद्दां वा तर्कशास्त्रांचा ,प्रामाण्याचा एकसंधपणा नष्ट झाला, तर असुरक्षीततेची भावना , एकटेपणाची भावना निर्माण होते हा एकसंधपणा एखाद्या अभेद्य भिंतीसारखा आपल्या भावनिक विश्वाचे ,कीमान काही दिशांनी संरक्षण करत असतो. निदान तसे आपल्याला वाटते.निश्चीतपणाची भावना थोडी सुरक्षीतता देते. माणसाचा मेंदु त्यासाठी संगतीची मागणी करीत असतो. त्यातुन गेल्या अनेक वर्षांत जगातल्या बहुतेक संस्कृतींची. ह्या असुरक्षीततेच्या भावनेची , सवयच तुटली होती.सामाजिक आठवणीतुन ही ती पुसली गेली होती.समाजातले साधे साधे व्यवहार खात्रीलायकरीत्या होत होते. ७ जुनला शाळा सुरु होणे ; सरकारने आर्थीक नियोजन करणे , साहीत्याची ब्राम्हणी वा दलित अशी वर्गवारी करणे; कायमच्या नोकरया मिळणे व त्या खरोखरीने कायमच्या टीकणे, हे सर्व जणु नैसर्गिक असते, इतका आपला यावर विश्वास बसला होता.संस्कृतीच्या घड्या बसल्या होत्या पावलोपावली निवड करण्याची गरज नव्हती, ज्या ठिकाणी ती होती, तिथे योग्य म्हणुन सिद्ध झालेल्या पथदर्शक खुणा( guidelines) होत्या.
प्रत्येक पावलावर निवड करणे हे मनुष्याला ओझे वाटते. त्यातुन ही निवड असंगत गोष्टींमधुन करायची वा दोन विसंगत गोष्टी एकत्र मान्य करुन करायची , थोड हे थोड ते अशी ही करायची , ती ज्यावर अवलंबुन अशा ज्ञानापासुन वंचित असतांना करायची, त्यापासुन सहेतुकपणे वंचित ठेवले गेलो असता करायची , अनेकदा तर ते ज्ञान ही संदिग्ध ( आजच्या काही वैज्ञानिक सिद्धांताप्रमाणे) असता करायची, ते ज्ञानच गहनतेचे( theory of complexity) किंवा गोंधळाचे(chaos) सिद्दांत मांडत असता करायची. या प्रकारातुन व्याकुळता तरी येते, किंवा ही सर्व व्यामिश्रता अमान्य करत सर्वसमावेशक निरपेक्ष एकात्मतेच्या मृगजळाला चिकटुन राहण्याचा प्रयत्न करीत राहायचे , यासारख्या गोष्टी उदभवतात.
यातुन एकतर भावनिक अवस्था नाजुक, पटकन भडका उडेल अशी तरी होते, किवा दुसरया बाजुला माणुस पुर्णपणे कोडगा,स्वार्थी ,संवेदनाशुन्य संधीसाधु पद्धतीन जगणारा, समाजात बेटासारखा जगणारा असा तरी होतो. यातील पहील्या भुमिकेतुन मुलतत्ववादी , अतिरेकी देशीवादी (nativist)जाती/गट/धर्मवादी इत्यादी भुमिका उभरतात.
तर दुसरयामुळे सार्वत्रिकीकरण, लघुत्तम साधारण विभाजकावर विसंबणे, सांस्कृतिक जागतिकीकरण, साचेबंदपणा(standardization globalization of culture) , सपाटीकरण, समोर अन्याय ,बलात्कार ,खुन होत असता थंड राहणे इत्यादी मनोभुमिका त यार होतात. या दोन्ही विरोधी वाटणारया मनोवस्था या प्रकारे एकाच कारणातुन उदभवतात.या दोन्ही मनोवस्थांना निवडीचे स्वातंत्र्य (किंबुहना कुठलेच स्वातंत्य्र नको असते) हे दोन्ही मार्ग बहुतेक उदाहरणांत व्यक्तीवादी असल्याचे आढळतील , परंतु त्यांना स्वातंत्र्य नको असते.व्यक्तीवाद आणि स्वातंत्र्य या दोन सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत. याचे भान आपल्याला पुर्वापार होतेच वरील विवेचनाने याही रीतीने त्याला पुष्टी मिळ्ते.
साठेंच्या निबंधातील निवडक भाग समाप्त......................
वरील ओळखी च्या विवेचना संदर्भात निर्माण होणारे काही प्रश्न. जाणकारांनी प्रकाश टाकावा ही नम्र विनंती !
१-या ओळखी च्या मांडणी बाबत तुमचे बेसिक-जनरल ओपिनियन काय आहे ?
२-एका व्यक्तीच्या अनेक ओळखी असु शकतात या मताशी तुम्ही सहमत आहात काय ? तुम्हाला कधी याचा अनुभव प्रत्यक्ष जीवनात आलेला आहे का ? तुम्ही या कडे कशा रीतीने बघतात ?
३-संस्कृतीसंकर निवडीच्या अफ़ाट शक्यता वाढवितो व तुम्हास पुढे नेणे व पेचात टाकणे एकाच वेळेस करतो या विधानाशी तुम्ही सहमत आहात का ?
४-श्रद्धेंना ज्यातुन प्रामाण्य मिळते त्यांतील एकात्मतेचा शोध हा साठे म्हणतात तसा नेहमीच विफ़ल असतो हे विधान तुम्हास पटते का ? त्यात एकात्मता साध्य आहे असे तुम्हास वाटत असल्यास ती कशी होउ शकते याचे एखादे उदाहरण देउ शकता का ?
५-वरील विवेचनातुन ध्वनित होणारी विज्ञानाची नैतिकते संदर्भातील प्रश्न सोडविण्याची मर्यादा आपणास मान्य आहे का ? असल्यास मग जो प्रयत्न विज्ञान या संदर्भात करते उदाहरणार्थ उत्क्रांतीच्या आधारे आधुनिक मानसशास्त्र जे मानवी वर्तनाचा-नैतिकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न करते मग त्याला काय अर्थ नाही ?
६-निवडीच्या ओझ्याने येणारी व्याकुळता आणि त्यामुळे एकीकडे होणारी भावनिक भडका कधीही उडेल अशी स्थिती व दुसरीकडे येणारी बधिरता याविषयी आपले काय मत आहे?
७-असे वरील प्रकारे बळी न पडता कोणीच माणुस निवड करुच शकत नाही हे आपणास पटते का ? जो प्रयत्न साठे स्वत: वरील निबंधात करत आहेत.
८-आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे काही मुल्य-गृहीतके ( a priori) आपण निवडलेले असतात. आणि हा अंतिम भोज्या असतो हे विधान आपणस पटते का या कडे आपण कसे बघतात. (साठेंचे दाखविलेले sources मान्य करुन)
९- आणि या वरील प्रश्नां व्यतिरीक्त वरील मांडणीत तुम्हाला यात महत्वाचे काय वाटते ?
प्रतिक्रिया
23 Dec 2013 - 11:57 am | आंबट चिंच
सगळं डोक्यावरुन गेले. सोडून द्या हो हे असले गहन विचार. ज्याला रोजची मीठभाकरी मिळताना मारामार तो आपली कायओळ्ख सांगणार.
23 Dec 2013 - 12:00 pm | मारकुटे
हा लेख कुणी मराठीत ट्रानस्लेट करेल काय?
23 Dec 2013 - 2:08 pm | शेखर काळे
रजनीकांतला हा लेख आणि प्रश्न जरूर पाठवावेत.
23 Dec 2013 - 2:34 pm | अत्रुप्त आत्मा
बटाटा कसा शिजतो? >>> कूकरला लाउन वाफ काढल्यावर...
बटाटा कसा शिजतो?>>> सामान्यत: बटाटा हा एक कंद आहे. कंदाची जमिनी खाली असणारी पातळी. व त्याच्या टणकतेच्या घटकांचं जैवीक अवलोकन याची व्यापक पातळी लक्षात घेता. पाण्याचा आणी त्याचा परस्परान्वयी गुणानुभाव...... (ह्हा..... थकलो बाबा!) असो!
23 Dec 2013 - 2:37 pm | मारकुटे
>>>सामान्यत: बटाटा हा एक कंद आहे. कंदाची जमिनी खाली असणारी पातळी. व त्याच्या टणकतेच्या घटकांचं जैवीक अवलोकन याची व्यापक पातळी लक्षात घेता. पाण्याचा आणी त्याचा परस्परान्वयी गुणानुभाव...... (ह्हा..... थकलो बाबा!) असो!
बटाटा हे कंदमुळ आधी भारतात नव्हतं. ते कुणी आणलं, कधी आणलं इत्यादी तपशील राहिला.
23 Dec 2013 - 2:51 pm | अनिरुद्ध प
बटाटा हे कंदमुळ आहे?आम्ही शाळेत असताना वनस्पतिशास्त्रानुसार Modified Stem असे काहीसे शिकलो असे आठवते. जाणकारान्च्या उत्तराच्या प्रतिक्षेत.
23 Dec 2013 - 3:17 pm | अत्रुप्त आत्मा
चला,,,
"शिजला" ब टा टा! ;)
23 Dec 2013 - 3:19 pm | मारकुटे
आता खा
23 Dec 2013 - 3:26 pm | अत्रुप्त आत्मा
:p
24 Dec 2013 - 8:42 am | दिवटा कारटा
बटाटा कसा शिजतो? >>> कूकरला लाउन वाफ काढल्यावर...
बटाटा कसा शिजतो?>>> सामान्यत: बटाटा हा एक कंद आहे. कंदाची जमिनी खाली असणारी पातळी. व त्याच्या टणकतेच्या घटकांचं जैवीक अवलोकन याची व्यापक पातळी लक्षात घेता. पाण्याचा आणी त्याचा परस्परान्वयी गुणानुभाव...... (ह्हा..... थकलो बाबा!) असो!
०===०===०===०===०
एकदम सही.
किचकट विषय सोपा करून सांगणारे संत आणि सोपा विषय किचकट करून सांगणारे ते विचारवंत.
23 Dec 2013 - 3:29 pm | गणपा
एखाद्या लेखकाच्या पुस्तकातील उतारा जसाच्या तसा इथे देण्यापुर्वी तुम्ही त्या लेखकाची परवानगी घेतली आहे का?
23 Dec 2013 - 3:35 pm | मारकुटे
सहमत आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे.
23 Dec 2013 - 3:56 pm | प्रमोद देर्देकर
आं मादी आंगोल रहिली ना हे थगलं वाच्ता ना
![s](https://fbcdn-sphotos-d-a.akamaihd.net/hphotos-ak-frc3/32163_301651146627283_466225170_n.jpg?lvh=1)
अच्र्त बाव्ल्त कुतले.
24 Dec 2013 - 4:49 am | निनाद मुक्काम प...
झोप येत नव्हती म्हणून मिपावर यावे म्हटले
ह्या लेखाचे विशेष आभार
डोळ्यावर पेंग यायला लागली आहे , ह्या विषयावर थोडे मनन करण्याचा प्रयत्न करतो , म्हणजे ...
शुभ रात्री
24 Dec 2013 - 5:39 am | रामपुरी
कोण मकरंद साठे???
कधी कानावरून गेल्याचं सुद्धा स्मरत नाही.
असो... पु ले शु
(स्वगतः पहिल्या दोन ओळी वाचल्यानंतर गरूड छाप तपकीरीची आठवण यायचं कारण काय असावं बरं?)
24 Dec 2013 - 5:51 am | खटपट्या
आधी लेखाची लांबी बघितली, खूप मोठा वाटला म्हणून प्रतिसाद बघितले, प्रतिसाद बघून……
24 Dec 2013 - 4:58 pm | हाडक्या
जल्ला "हा मकरंद साठे कोण?" यावरती तुमच्या प्रतिक्रिया ठरणार काय ? म्हणजे उद्या या माणसाला (समजा) नोबेल, बुकर नाय तर गेला बाजार ज्ञानपीठ मिळाले तर इथेच येवून त्याची 'लय भारी' स्तुती होणार..
त्याने काय लिहिलंय त्यापेक्षा 'तो कोण' आणि पेपरात नाव आले नसताना असले जड-शीळ लिहितो म्हणजे काय ? त्याची ही हिम्मत?
बाकी इथे सर्व सामान्यांना न समजेल अशा संस्कृत ओळी किंवा दाढी खाजवण्यासाठी पण 'अतिकंडूशमनार्थ स्मश्रुकर्तन' असले प्रतिसाद (जे उत्तमच आहेत त्यांच्याबद्दल वाद नाही) पण 'वा वा ! कं लिवलय! काय ती प्रतिभा! ' असे नावाजणारे लोकं इथे टिंगल करताना पाहिले की दांभिकतेचा वास येतो.
बाकी कंपूबाजी वगैरे माहित नाही, परंतु ग्रेट थिंकर वगैरे लोकांची बाधा इतरांना होऊ नये ही आशा. बाकी चालु द्या..
(लेखाबद्दल नंतर बोलूच)
24 Dec 2013 - 5:02 pm | बॅटमॅन
सहमत आहे. मुद्यांकडे पाहून वादप्रतिवाद/चर्चा व्हावी.
25 Dec 2013 - 9:23 am | मारकुटे
पण मुद्देच मुद्दलात नसतील आणि मुद्दे असल्याचा फक्त आव आणलेला असेल तर?