नुकताच मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये एका मुलीच्या विनयभंगाचा प्रयत्न झाला . गेल्या वर्षी दिल्लीत एवढे कांड होवूनही पोलिसांनी या प्रकरणात जो ढिसाळपणा दाखवला ,तो पाहता कोणाही जागरूक नागरिकाला संताप आणणारा आहे !
सन्दर्भ- http://prahaar.in/maharashtra/konkan/164988
मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करणा-या एका तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न या तरुणीने दाखवलेल्या निर्भयपणामुळे हाणून पडला.
ठाणे- मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करणा-या एका तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न या तरुणीने दाखवलेल्या निर्भयपणामुळे हाणून पडला. विशेष म्हणजे मदतीसाठी रत्नागिरी व चिपळूण पोलिसांना फोन करूनही त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्याने अखेर या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आरोपी अब्दुल कादरसाहेब यास अटक केली.
फॅशन डिझायनिंगच्या तृतीय वर्षाला शिकणारी विद्यार्थिनी १४ डिसेंबर रोजी कुडाळ येथे जीवनविद्या मिशनच्या एका कार्यक्रमाला गेली होती. रविवारी रात्री साडेअकरा वाजता ती मत्स्यगंधा एक्सप्रेसने मुंबईला येण्यासाठी निघाली.
तिच्यासोबत काही भक्तही होते. मोबाइल चार्जिग करायला गेली असताना अब्दुल कादरसाहेब (२८) हा तरुण तिच्याजवळ आला. तिला सिगारेट ओढते का, अशी विचारणा केली. त्यानंतर त्याने त्याच्याकडील दोन पुडय़ांमध्ये असलेले अंमली पदार्थ सिगारेटमध्ये टाकले. तसेच ते शौचालयात ओढल्यावर कुणालाही संशय येत नाही, अशी माहिती दिली. हा तरुण अंमली पदार्थाच्या व्यवसायात असल्याचे निदर्शनास येताच तिने मोबाइलवरून मुंबई आरपीएफला फोन लावला. त्यानंतर रत्नागिरीला एका हवालदाराने तिला तक्रार करण्यासाठी रेल्वे स्थानकात उतरायला लागेल, असे सांगितले.
रात्रीचा एक वाजल्याने तिने खाली उतरण्यास नकार दिला. त्यानंतरही पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही. त्यानंतर तिने पाठपुरावा कायम ठेवला. चिपळूणलाही पोलिसांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर हा आरोपी गायब झाल्याने तिने त्याचा शोध सुरू केला. अखेर टीसी दिसल्यावर त्याला पकडले. त्याच्या कानावर हा प्रकार गेल्यानंतर त्याने आरोपीला पकडले. अखेर पनवेल रेल्वे स्टेशनात रेल्वे पोलिसांनी तरुणीला सुरक्षा पुरवून आरोपी अब्दुलला अटक केली.
प्रतिक्रिया
19 Dec 2013 - 6:21 pm | मुक्त विहारि
आज काल काही सांगता येत नाही.
20 Dec 2013 - 12:54 pm | विशाल चंदाले
तरुणीचा प्रयत्न कौतुकास्पद.
23 Dec 2013 - 1:20 pm | मिनेश
आता त्या तरुणावर अंमली पदार्थ कायद्या अंतर्गत कारवाई होईल का विनयभंगाची???
24 Dec 2013 - 5:21 pm | पैसा
पण अंमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेल्या माणसाकडून तिला कायमची भीती नाही का आता? यात पोलिसांचा ढिसाळपणा असे म्हणता येणार नाही. कारण तक्रारीची दखल तर घेतली गेली शेवटी. पण रेल्वेतल्या गुन्ह्याची नोंद वगैरे कशा प्रकारे होते माहिती नाही. म्हणजे रेल्वे पोलिसांची जबाबदारी आहे की पोलिसांची. इ.