गाभा:
कोल्हापुर पोलीसानी एका ४९ वयीन इसमास संशयास्पद रीत्या चहा पिण्याअबद्दल अटक केली. त्याबद्दल न्यायालयाने त्याना फटकारले आनि संशयास्पदरीत्या चहा कसा पितात ते दाखवुन द्या असेही सांगितले.
मटा मधील बातमीचा भाग कॉपी करतोय
" संशयास्पदरित्या चहाचे घुटके घेतल्याचे कारण देत ४९ वर्षीय इसमाला अटक केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर पोलिसांना चांगलेच फटकारले आहे. 'चहा कसा प्यावा याबद्दल कोणताही कायदा काहीही सांगत नाही. प्रत्येकाची चहा पिण्याची वेगळी स्टाईल असू शकते. त्यात संशय घेण्यासारखे आणि चुकीचे काय आहे,' असा सवालही न्यायालयाने केला".
अधीक बातमी या इथे http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Bombay-high-co...
मिपावर कोणी काय व कसे प्यावे याचे जाणकार बरेच आहेत. संशायास्पद रीत्या चहा कसा प्यायला असेल हे कोणी साम्गेल का?
प्रतिक्रिया
19 Dec 2013 - 11:38 am | देवांग
आता होऊ दे पाचकळ चर्चा
19 Dec 2013 - 11:40 am | सुहास..
चहा च माहीत नाही दिग्गजुभाऊ ;) ..पण आम्ही जे काही पितो त्यानंतर आम्हाला बरेच जण संशायास्पद नजरेने बघतात ;)
19 Dec 2013 - 11:48 am | जेपी
जागा पकडुन बसतो . हामाला बी चर्चा ऐकायची हाय
19 Dec 2013 - 11:55 am | मिनेश
19 Dec 2013 - 11:56 am | सुहास झेले
२० सप्टेंबर २०१३ ... बाकी चालू द्या :)
19 Dec 2013 - 12:18 pm | प्यारे१
त्यांनी आज वाचली असेल हो बातमी!
होतो उशीर!
19 Dec 2013 - 12:01 pm | कवितानागेश
अले बाप्ले!!!!!!
19 Dec 2013 - 12:01 pm | सुबोध खरे
दुर्दैवाने खटल्याचा खर्च आणी झालेला मनस्ताप याची किंमत कशी भरून काढणार? त्यासाठी आपल्याला दुसरा खटला चालवावा लागतो आणी खर्च म्हणून १९०४ साली ठरविलेली रुपये पस्तीस फक्त नुकसान भरपाई आपल्याला मिळते. जर अशा निष्कारण केलेल्या खटल्याचा खर्च जर अशा पोलीस अधिकार्याच्या पगारातून देण्याची तरतूद् कायद्यात केली तर असे फालतू आणी न्यायालयाचा वेळ खर्च करणारे खटले उभे राहणार नाहित.
19 Dec 2013 - 12:30 pm | स्पा
विजभाय वेळ जात नाये का >?
जिल्ब्याच टाकायच्या असतील तर ताज्या तरी टाका :D
जानेवारी लिहा बघू
19 Dec 2013 - 2:42 pm | मारकुटे
संशयास्पदरीत्या धागा टाकल्याबद्दल अटक...............करा लेखकाला
19 Dec 2013 - 3:01 pm | गवि
अँ ? संशयास्पदरित्या चहा पिण्याबद्दल अटक हा प्रकार रोचक आहे खराच पण हे प्रकरण हायकोडतापर्यंत पोचणे.. इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया..
अरे वर्षानुवर्षांचा अन दशकानुदशकांचा तो प्रलंबित ढिगारा उपसा पहिल्यांदा..!!
19 Dec 2013 - 4:14 pm | मनीषा
यात पिणारा संशयास्पद होता?..की चहा ? .. की ...
जाऊ दे
ये मेरा India, I love my India :)
19 Dec 2013 - 4:23 pm | बॅटमॅन
प्रतिक्रिया न्हेमीपर्माने जब्री आहेत मटावर-पण मुपीची सर नाही.
बाकी पोलिसांनी त्याआधी बोम्मारिल्लू पिच्चर मधील जेनेलियाला देखील अटक करावयास पाहिजे होती असे आमचे स्पष्ट मत आहे. शिवाय कोल्लापुरात येऊन त्यानं भौतेक आधी मिसळ खाल्ली नसेल. आधी मिसळ अन मग च्या हा फंडा सर्वप्रसिद्ध असताना तो उल्लंघिण्याचे साहस त्यांनी केलेच कैसे?